ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास
अर्थात नोकरशाहीचें बंड
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीचं पहिलं पान
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
हे प्रचीतीचें बोलणे। विवेकें प्रचीत वाणें ।
प्रचीत पाहतील ते शहाणे। अन्यथा नव्हे ॥
श्री समर्थ
ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास
अर्थात
नोकरशाहीचें बंड
मुख्य संपादक
केशव सीताराम ठाकरे
वक्तृत्वशास्त्र, कोदण्डाचा टणत्कार, कुमारिकांचे शाप, Life & Mission of Ramdas इ. पुस्तकांचे कर्ते
मदतनीस संपादक
विनायक सीताराम जयवंत
प्रकाशक
यशवंत शिवराम राजे
लेडी जमशेटजी रोड, सोराब मिल लेन,
मिरांडाची चाळ, दादर (मुंबई)
किंमत
कापडी बांधणीची प्रत रु. १-१३-०
कागदी बांधणीची प्रत रु १-०-०
प्रकाशन वर्ष १९१९
प्रकाशकाचे दोन शब्द
जाती मत्सराने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. हाच प्रकार या उप्पर तसाच चालू राहणे बरे नव्हे, म्हणून त्याचे खरेखुरे राक्षसी स्वरुप देशबांधवांसमोर मांडण्यास ते या निरर्थक वादापासून देशाचा बचाव करण्याचा काही तरी योग्य मार्ग शोधून काढतील. या आशेने हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येत आहे. जातिमत्सराचा नायनाट होऊन आमच्या सर्व देशबंधूची मने एक देशीयत्वाच्या उज्ज्वल विचारांनी भरून यावी, निरनिराळ्या जातींची सामाजिक व धार्मिक बाबतीतील मनुष्यकृत कृत्रिम बंधने शिथिल व्हावी, निदान राष्ट्रीय कामगिरीत एका आईची सर्व लेकरे या नात्याने प्रयत्न करण्याच्या कामात त्यांचा अडथळा उत्पन्न होऊ नये इतकी तरी त्याची व्याप्ती संकुचित व्हावी आणि ऐनकेन प्रकारेण परस्परांचा काया वाचा मने द्वेष करण्याची कबुली अतःपर कोणांतही उत्पन्न होऊ नये, हा या पुस्तक प्रकाशनाचा मुख्य उद्देश आहे.
या पुस्तकात ऐतिहासिक सत्याचे निरूपण स्पष्ट केले आहे. रुचिभिन्वत्वाने ते कित्येकास आवडेल, कित्येकांस आवडणार नाही त्याला आमचा इलाज नाही आम्हाला पुणे भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या अहंपणाचा ताठा मिरविण्याचा अधिकार नाही किंवा इच्छाही नाही पुस्तकात नजरचुकीने किंवा अन्य कारणाने इतिहासविषयक काही चुका किंवा विधाने कोणी विद्वजनानी सप्रमाण नजरेस आणून दिल्यास त्यांचा आम्ही साभार स्वीकार करू आणि दुसऱ्या आवृत्तीत ती सुधारणाही करू प्रस्तुत पुस्तकावर नियतकालिकांत टीका किंवा चर्चा करणारांनी कृपा करून त्या पत्राचा अगर मालिकाचा अंक आमचेकडे अवलोकनार्थ पाठविण्याची मेहेरबानी करावी. वास्तविक शिष्टसांप्रदायाप्रमाणे हे काम त्याच प्रकारचे असते. पण इतकी उदारमनस्कता आमच्या पत्रकारांत मुळीच आढळून येत नाही. फार काय अंक पाठविण्याबद्दल पत्राने विनंती केली असतानाही त्याचे उत्तर मिळत नाही.
उपोद्घात्ताकरिता लिहिलेला बराच मजकूर पुस्तकांची पृष्ठसंख्या अवसानाबाहेर वाढल्यामुळे आयत्या वेळी बाजूला ठेवावा लागला याबद्दल फार दिलगीर आहोत. मराठेशाहीतील व विशेषतः पेशवाईतील मोठमोठया पुस्तकांची स्वभावचित्रे त्यांची धोरणे त्यांची परस्परांविषयीची स्पर्धा आणि त्यांचा राष्ट्रावर झालेला परिणाम याविषयी रा. ठाकरे यांनी केलेली साधार व सोपपत्तिक चर्चा वास्तविक याच पुस्तकात यायला हवी होती. परंतु नाईलाज आहे. मजकूर बराच मोठा असून त्याचे एक स्वतंत्र पुस्तक आम्ही लवकरच छापून प्रसिद्ध करणार आहोत.
त्यातून सध्या ऐतिहासिक व्यक्त्यांच्या बाप्तिस्म्यांचा धुमाकुळ सुरू झाला आहे. सावित्रीबाई ठाणेदारणीला कोणी कायस्थ ज्ञातीतून चित्पावन ज्ञातीत ढकलीत आहेत. कोणी तिला कादंबरीतील नायिका म्हणत आहेत, कोणी नाना फडणीसांच्या अंतःकरणाच्या खाणीतून कोहीनुराचे ढीगच्या ढीग बाहेर काढीत आहेत. कोणी त्यांच्या मनोमय भूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरविण्याच्या गडबडीत आहेत, कोणी गोपीनाथ पत बोकीलाला शिवाजीची चिटणीशी वतन बहाल देण्याच्या धामधूमीत आहेत. कोणी हेमाडपंतालाही ब्राह्मणी पोशाख चढविण्याच्या तजविजीत आहेत तर कोणी मराठ्या आठवल्याला चित्पावनी बारिया देण्याच्या खटपटीत आहेत. असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलेला आहे. तेव्हा या भानगडीत काय काय उलाढाल्या होतील ते पाहिले पाहिजे. न जाणो अफजलखान हा शिवाजीचा मामा ठरण्याचा बराच संभव आहे. कारण कृष्णाने कंस मामाला ठार मारले म्हणून आणि मुरारबाजी हा चित्पावन असल्याचाही दस्तऐवजी पुरावा सापडणार नाही कशावरून ? ही सगळी धामधूम किंचित शांत झाली म्हणजे निवांतीने वरील पुस्तक आम्ही प्रसिद्ध करू.
सरतेशेवटी ज्या ज्या विद्वान मंडळींनी या पुस्तकाच्या बाबतीत मदत केली त्यांचे, ज्या विद्वान वकारांच्या गंधाच्या ठिकठिकाणी पुरावा घेण्यात आला आहे, त्यांचे व तत्वविदेचक छापखान्यातील मालक व सर्व कामगार लोक यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.
सर्वांचा नम्र
यशवंत शिवराम राजे. प्रकाशक,
बुधवार, आषाढी एकादशी, शके १८४१
तारीख ९ जुलै १९१९ इ. दादर, मुंबई.
॥ श्री ॥
उपोद्घात
जगातील कोणच्याही धर्मात पश्चातापाचे महत्त्व फार आहे. कृतकर्माचा उच्चार होऊन त्याबद्दल पश्चाताप झाला, म्हणजे मनुष्य पुनित होतो, तो ते कर्म पुनश्च सहसा करीत नाही, आणि तो पश्चाताप जर खरोखरी नाटकी नसेल तर कृतकर्माची व मनुष्याची पुन्हा यावज्जीव गांठ पडत नाही. परंतु पश्चाताप व्हायला तरी पदरी कांही पुण्याई लागते म्हणतात त्यांतून कृतकर्माच्या पातकांची स्मृति होणे हे देखिल मनाच्या शुद्धतेचे द्योतक समजले जाते. कृतपापाची तंतोतंत मोजदाद ठेवून त्याची वारंवार आठवण देण्याचे पुण्य कृत्य गतकालाचा इतिहांस निस्पृहाणे करीत असतो. उत्क्रांत्यवस्थेच्या प्रवासात मानवी पायांना गतकालीन पातकांच्या धोंड्यावर ठेचाळण्याचा वारंवार प्रसंग येऊ नये म्हणून हाच इतिहास गतानुभवाची दिवटी घेऊन मानवी सृष्टीच्या पुढे पुढे याप्रमाणे नांचवित असतो. परमेश्वरी दिव्य इच्छेचे गूढ तत्व बरोबर नीट न उमगल्यामुळे मनुष्यांच्या हातून जी घोर अमानुष कृत्ये घडतात, ती पुन्हा घडू नयेत म्हणून हाच इतिहास साधून मानवांच्या कृतपापाचा घडा त्यांच्या थोबाडावर निर्भिडपणाने घडाघडा वाचून दाखवून, त्यांची कानउघाडणी करतो. भूतकाळामधे घडलेल्या क्षुल्लक चुकीचा भयंकर परिणाम वर्तमानकालीन मानवांना स्पष्टस्पष्टपणे सांगून त्यांच्या विचारयंत्राला नियंत्रित करण्याची कामगिरी हाच इतिहास सांगत असतो. भूतकालांतील पापांचे पर्वत तुमच्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत आणून उभे करणारा आणि `पहा, या उपर तुम्ही जर आपले वर्तन नीट सुधारलें नाहींत, तर हेच पर्वत मी साऱ्या जगाच्या प्रदर्शनांत मांडून तुमच्या बदनामीचा डंका पिटीत राहीन म्हणून सडेतोड दम भरणाराहि इतिहासच. कृतपापावर जाणून बुजून पांघरूण घालणाऱ्या आणि डोळयांवर कातडे ओढून पुण्याईचा तोरा मिरवणाऱ्या दांभिकाच्या मुस्कटांत भडकावून, चल चोरा! पापाचे माप भरल्याशिवाय पुण्याईच्या गप्पा मारतोस ? अशी खरमरीत तंबी बिनमुक्त देणारा इतिहासच खऱ्याला खोट्याचा आणि खोट्याला खऱ्याचा मुखवटा घालून आडमार्गांत ऐतिहासिक विश्वामित्री सृष्टीचे ठाणें देऊन वेळोवेळी डाकेखोरपणा करण्यास सवकलेल्या बिलंदाज टगांचे राजवाडे हुडकून काढणारा पटाईत डिटेक्टीव इतिहासच. पापांचे माप पदरात बांधण्यात इतिहास जितका निर्दय आणि निस्पृह आहे, तितकाच पुण्यांची गांठोडी घेऊन अडीअडचणीच्या वेळी मदतीस धावण्याइतिका तो मनाचा उदारहि आहे. बिकट परिस्थितीच्या उलट्या लाटा नाकातोंडात पाणी कोंबून राष्ट्राचा जीव गुदमरून टाकू लागल्या की प्राचीन संस्कृतीच्या पुण्याईचा ‘लाईफ बोय्’ घेऊन इतिहास पाठीमागे त्यास हात देण्यास दत्त म्हणून उभाच असतो.
राजकीय किंवा धार्मिक जुलमांची तात राष्ट्राच्या मानेला लागतांच प्राचीन संस्कृतीच्या व अनुभवाच्या तीव्र शस्त्रानें ती तात ताडकन् तोडून राष्ट्राचा कासावीस झालेला जीव वाचविणारा कोण ? इतिहासच, पोटांत एक आणि ओठात एक अशा दांभिक गारुड्याच्या चलचल मदारीच्या हातचलाखीने खोट्यानाट्या कल्पनांची धूळ डोळ्यांत गेल्यामुळे राष्ट्र जेव्हा डोळे चोळू लागतें आणि आत्मविनाशक शाबरी मंत्र्यांच्या ‘पासेस’मुळे त्यांची आत्मविश्वासशक्ती लंजूर होऊन त्याची प्राणज्योत मिणमिण करू लागते, तेव्हा केसरीवत् गर्जना करून त्या डोंबाऱ्याच्या पांतड्यावर झडप घालून त्याची हाडके नरम करणारा आणि राष्ट्राच्या कानांत त्याच्या पूर्वसंचिताचा दिव्य मंत्र फुंकून त्याला निमिषार्धात सचैतन्य करणारा इतिहासाशिवाय दुसरा अश्वीनीकुमार कोण?
२. सत्कृत्यांचा योग्य तो अभिमान असणें आणि त्यांचा निरंतर उपचार करून स्तुति करणें हे जितके स्वाभाविक आहे, तिच दुष्कृत्यांकडे कानाडोळा करणे हेहि अस्वाभाविक नाहीं. हा मनुष्याचा स्वभावच पडला. परंतु उत्क्रांतीतत्त्वाला पातकांचा उच्चार आणि तत्संबंधी पश्चाताप ही जितकी पथ्यकारक होतात, तितका सत्कृत्यांचा जयघोष उपयोगी पडत नाहीं पुराणकालाबद्दल फाजील अभिमान बाळगून जुने तितकें सोनें अशा प्रवृत्तीमुळे राष्ट्राच्या भूतकालीन पातकांवर पांघरून घालणे म्हणजे नव्या मन्वंतराच्या नव्या आशिर्वादास आम्ही कुपात्र आहोत, अशी जबानी देणेंच होय. प्राचीन ग्रीक व रोमन राष्ट्रांच्या वैभवाबद्दल. बुद्धिमत्तेबद्दल आणि संस्कृतीबद्दल योग्य तो आदर राखून, त्यांच्या हातून जाणूनबुजून अथवा नकळत घडलेल्या पातकांची शक्य त्या निस्पृहतेनें छाननी केल्यामुळेच आज पाश्वात्य राष्ट्र लक्ष्मीसरस्वतीच्या प्रसादास पात्र झाली आहे. खुद इंग्लंडकडे जरी पाहिलें तरी तेथील लोकांच्या राष्ट्राभिनाची मुळतत्वे त्यांनी जरी अभंग ठेविली आहेत तरी सुद्दा त्यांच्या प्राचीन इतिहासातील कृष्णकृत्यांचा खरमरीत निषेध करण्याला त्यांची मनोदेवता किंचित सुद्धा कचरत नाहीं.
एलीझाबेथ राणीच्या कारकीर्दीत ब्रिटीशांच्या नव्या मन्वंतराचा उदय झाला, म्हणून तिच्या चरित्राकडे ब्रिटन लोक जितक्या अभिमानाने पहातात व त्याचे स्तुतिपाठ गातात, तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने त्याच राणीच्या अमदानीत बोकाळलेल्या ढोबळढोबळ अनीतीमूलक गोष्टींचे बाभाडे काढायला त्यांची सत्यप्रियता मुळींच मागेंपुढे पाहत नाही. प्रजासत्तक राज्यपद्धतीचे उद्धारक म्हणून अग्रेसरत्वाचा धौशा चौखंडी गाजविणारे अमेरिकन लोक. गुलामगिरीच्या व्यापाराचा प्रश्न डोळ्यांपुढे येतांच त्याचा तितक्याच जोरानें निषेध करायला ते अझूनही दिक्कत बाळगीत नाहींत उलटपक्षी त्या काळ्याकुट्ट इतिहासांतील बारीकसारीक भारतीय संशोधन करण्यात ते अझुनहि अविश्रांत श्रम करीत असतात. दिव्याखाली अंधेर हा असावयाचाच. परंतु जेव्हां एखादे राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच इतिहास तेवढा पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणूनबुजून अज्ञान दाखविते तेंव्हां तें राष्ट्र त्याची प्राचीन संस्कृति कितीहि उज्वल असो-नवीन मन्वंताराच्या प्रसादाला पात्र होणें कधींहि शक्य नाहीं असे ठाम समजावें.
३. महाराष्ट्राच्या इतिहासातील ग्रामण्याचा इतिहास हा एक काळाकुट्ट परंतु अत्यंत महत्वाचा भाग आहे. ग्रामण्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक दिव्याखालचा अंधार आहे. हा इतिहास हे एक कटुतम सत्य आहे. या सत्यावर मुद्दाम घालून ठेवलेलें अनुपलब्धतेचे आणि क्षुल्लकपणाचे पांघरूण आमच्या राष्ट्रीय आकांक्षाचे पाय मधूनमधून खोलावर ओढीत नेत असतात. आमच्या आकांक्षारूपी गजेंद्राचा पाय या ग्रामण्यांच्या नक्राने पकडला आहे. परंतु आपला पाय कोण व का ओढीत आहे याची जाणीव आम्ही नीट न ओळखल्यामुळे भगवंतालासुद्दा आमच्या हाका आरोळयांना उत्तर देण्याची पंचाईत पडली आहे. पाश्चात्य देशांतील गुलामांच्या व्यापाराचा इतिहास वाचणाऱ्या पुष्कळ महाराष्ट्रीय इतिहासवाचकांस कदाचित कल्पनाही नसेल की गुलामगिरीच्या अमदानीत सुधारकपणाची शेख मिरविणान्या पाश्चात्यांच्या हांतून जी अमानुष कृत्ये घडली, त्यापेक्षा अधिकपटीनें हलकट पशुवृत्तीचे वर्तन आमच्या महाराष्ट्रांतील राष्ट्रधुरीणांच्या आणि धर्मसंरक्षक (?) वर्गाच्या हांतून पडलेले आहे. अर्थात या पातकाला चव्हाट्यावर बांधल्याशिवाय त्याच्या पुनरावृत्तीचा बंदोबस्त करणारा " दवा " कोण कसा सांगू शकेल ? म्हणून आम्ही हा राष्ट्राच्या सडक्या भागाचा इतिहास-आमच्या महाराष्ट्रांचें हें राष्ट्रीय दुखणे आतां चव्हाट्यावर बांधण्याचा उपक्रम करीत आहोत.
४. ग्रामण्य शब्दाची व्युत्पत्ति जर शोधली तर हा शब्द धेडगुजरी दिसतो म्हणून सर्वमान्य शब्दकोशांत अझून त्यास मिळावें तें स्थान देण्यांत आलेले नाही. याचे कारण असे आहे की ‘ग्रामण्य’ या शब्दाचा इतिहास जसा अतिव्यापी तसा त्याचा अर्थसुद्धा अतिव्यापी आहे. ग्रामण्य म्हणजे बहिष्कार असा अर्थ एका मराठी कोशाकाराने दिलेला आहे. परंतु बहिष्कार म्हणजेच ग्रामण्य जर मानले तर स्वदेशी चळवळीने इंग्रजी व्यापारावर ग्रामण्य उभे केलें अशी वाक्यरचना करायला हरकत नसावी. पण त्याला कोणी ग्रामण्य म्हणत नाहीं. ग्रामण्य शब्द ऐकतांच मनांत ज्या ज्या कल्पना उद्भूत होतात, त्या त्या सर्व एक शब्दांत व्यक्त करून दाखविणारा शब्द ग्रामण्याशिवाय खुद्द मराठीत नाहीं. मग इतर भाषांची तर गोष्टच नको ! ग्रामण्य म्हणजे ग्रामण्य !!
व्युत्पत्तीच्या काथ्याकुटांतून मोकळे होऊन आपण जर ग्रामण्याच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे दृष्टी फेंकली तर त्यांत `वेदोक्ताचें बंड` हें एक मूळ खूळ आहे, असें आपल्याला दिसेल. फार काय पण ग्रामण्याच्या एकंदर व्याप्तीची जर कसोशीनें आणि चौकस बुद्धीने आपण पाहणी केली नाहीं, तर ग्रामण्याच्या पितृव्याचा आरोप वेदोक्तावर करण्याचा कदाचित आपणांस मोह पडेल. वेदोक्त आणि ग्रामण्य हे दोन शब्द दुर्दैवाने इतके जवळ जवळ आणून भिडवले आहेत की ते परस्पराचे अनुषंगीच आहेत असाहि आपल्याला भास झाल्याशिवाय रहात नाहीं. वेदोक्ताचें बंड धार्मिक क्षेत्रांतलें आहे. मग ग्रामण्यार्थे बंड शुद्ध धार्मिक बंड म्हणायें तरी पंचाईत आहेच! कारण त्याच्या पायाचा शोध केला तर त्यांत कितीक तरी मोठमोठे चिरे सामाजिक आणि राजकीय खाणीतले दिसतात. बरें तें सामाजिक म्हणावें तर धार्मिक क्षेत्रांतल्या सोंवळ्या धाबळ्या. जानव्यांची भेंडोळी आणि गोमुत्राचे घडे यांचा सांवळा गोंधळ पाहून तसेंहि म्हणण्यास मनुष्य कचरतो. राजकीय बंड म्हणावे तर आजपर्यंत ग्रामण्याचा एकहि चळवळ्या छत्र मोर्चेले उडवीत सिंहासनाधिष्टित शककर्ता झाल्याचे इतिहासांत नमूद नाहीं उलट राजकीय चाबुतऱ्यावरून ग्रामण्यांच्या धुडगुसाकडे पाहू लागले तर ही सारी भानगड सामाजिक स्पर्धेची आहे असें दिसतें क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन प्रमुख समाजातला हा तंटा आहे, यांत राजकीय भानगडीचा अंशहि नाहीं, असेंहि दिसून येते. राजकीय भानगड किंवा सत्ताधाऱ्यांची लुडबूड मुळींच नव्हती असेंहि विधान करणे धोक्याचे आहे कारण ग्रामण्यांच्या सणंगातून राजकीय रेशमी धागे इतर सामाजिक आणि धार्मिक धाग्यांच्या बरोबरीने सरसहा गुंफलेले स्पष्ट दिसतात. एकूण ही ग्रामण्याची भानगड अंजिरी रंगाच्या शालूसारखी आहे असें म्हणणें प्राप्त आहे. तिच्या हालचालीच्या प्रत्येक झुकण्याबरोबर निरनिराळे तऱ्हेतऱ्हेचे रंग प्रेक्षकाच्या नजरेस येतात: अर्थात् ती अनूकच एका विवक्षित रंगाची आहे असे धाडसी विधान न करिता ती सर्वरंगपरिपूर्ण आहे, असे म्हणून आपण पुढें प्रयाण करावें हेंच बरें !
५. सांप्रत सर्व भरतखंडावर नव्या मन्वंतराचा उष:कालीन् प्रकाश पडला असून, राष्ट्र खडबडून जागे झाले आहे.
“प्रचलित मनु-संदेश ऐकुनी थरारला देश |”
“अझुनी आम्हीं कां न त्यजावा उदासीन वेष ||”
अशा प्रकारचे जागृतीचे दिव्य संदेश देशाच्या कोनाकोपऱ्यांतसुद्धा आपल्या गंभीर ध्वनींचा पडसाद उमटवीत आहेत. या अवाढव्य हिंदी द्वीप-कल्पाच्या असंख्य प्रांतांतील नानाविध जातींची मने एकाव्यापक राष्ट्रीय ध्येयाच्या बिंदूवर अगदी खिळून राहिली आहेत. हिंदु आणि मुसलमान, ख्रिस्ती आणि पारशी, जैन आणि लिंगायत अशा प्रकारची भाषा आतां पाठीमागे पडून तिचे ठाणें हिंदी देशबांधव या शब्दप्रयोगाने पटकाविलें आहे. जातिभेदाचे अभेद्य तट फोडण्यास कंबर कसून सरसावलेले पाथरवट व सुरुंग्ये तटाची क्षुल्लक कपरीहि फोडून शकल्यामुळे जरी हताशवदन झाले, तरी त्यांनीहि आतां या नवीन मन्वंतरांत जातिभेदाच्या शनिवार वाड्याचा तट राहिला तर राहो, पण निदान तटाभोंवती जातिमत्सराच्या होळ्या पेटवून आपल्या असूयेचा शिमगा करून घेऊ नका, म्हणून जाहीरनामे काढिले आहेत. ज्या ज्या समाजांनी गेल्या दोन दशकांत असूयेच्या चुडी हातांत घेऊन महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षेच्या टोलेजंग प्रासादास चोहींकडून आग लावण्याचा उपक्रम केला, तेच समाज आजच्या राष्ट्रीय उत्क्रांतीच्या महापर्वणीत सर्व राष्ट्राला वंदन करून "राष्ट्रायै स्वाहा इदंराष्ट्र इदन्न मम म्हणून आपल्या द्वैतभावाची आहुती राष्ट्रकार्याच्या कुंडांत देत आहेत.
पाश्चिमात्य राष्ट्रांत राजकीय क्रांतीचा थयथयाट सुरू असून, वातावरणाच्या लहरी त्या कालिकानृत्याचा दणदणाट हिंदुस्थानाच्या किनाऱ्यावर हरघडी आणून आदळीत असल्यामुळे, इकडील मंडळींच्या वृत्ति चैतन्यपूर्ण होऊ लागल्यास आश्चर्य तें काय ? स्वयंनिर्णयासारखी सत्ययुगांतील तत्त्वें चालू कलियुगात सुद्धा अवतरलेली पाहून ‘कली’ चें काळे करून त्याठिकाणी `सत्य` शब्द कोणी घातल्यास या अदलाबदलीचा पुसट संशयसुद्धा कोणास येणार नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे राष्ट्रीयत्वाचा खरा अर्थ हिंदुस्थानांतील यच्चावत् जनतेच्या खालच्या थरापर्यंत कोणाला समजो वा न समजो आजकाल राष्ट्रीयत्वाचा चौघडा वाटेल त्या कोपऱ्याला कान द्या तेथून ऐकू येतच आहे. शुद्रातिशुद्रांच्याहि पंक्तिस बसायला आम्ही तयार आहोत, असे शेकडो सह्यांचे जाहीरनामे उच्चवर्णातील (?) ब्राह्मणलोक आज फडकावीत आहेत. अशा परिस्थितीत हें तुमचें ग्रामण्याचे बंड कशाला उपस्थित करतां ? त्याचे आतांच काय नडलें आहे ? ही खाजवून खरूज काढण्यात काय हाशील आहे ? अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारण्यांत येत आहेत. व येतीलहि.
प्रश्न दिसण्यांत गोंडस आणि विचारक्षम दिसतात खरे आणि ते विचारणारांच्या सद्धेतूबद्दल साशंकता धरणें हें महत्पाप आहे, हे आम्हाला कळत आहे. परंतु विचारणारांनी एकंदर परिस्थितीचा करावा तितका विचार केलेला नसल्यामुळे, सद्विचारांचा झटक्यासरसे हे प्रश्न त्यांना सुचणे फारसे अस्वाभाविक नाही. एकतर ऐतिहासिक दृष्ट्या या ग्रामण्यांच्या इतिहासाचे महत्व या पृच्छकांना नाकबूल करून तर चालायचेच नाही. दिव्याच्या उजेडाच्या एतिहासाबरोबरच त्याच्या अंधाराचाहि इतिहास पुढे आला पाहिजे, हें त्यांना मान्य केल्याविना सुटकाच नाही. नाहीतर आमच्या इतिहासाचे एक अंग अर्धांगवायूने लुलें पडलेले आहे इतकें तरी उघडपणें संकोच न धरिता इतिहासाच्या शिरोभागी नमूद करून ठेवले पाहिजे ! मग असला लुलापांगळा एकांगी इतिहास असला काय आणि नसला काय सारखाचव !!
चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींच मनावर उपदेशाचा विशेष परिणाम करितात, कॉमेडीपेक्षां ट्रॅजेडीच जास्त परिणामकारक होते. आपल्या राष्ट्रीय इतिहासातील चांगला भाग अधिकाधिक उज्वल करणे जसे आपले कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे त्यातले वाईट भाग आपल्या प्रत्यक्ष वर्तनानें सुधारून त्याऐवजी चांगल्या शतकृत्यांची भर घालणे हेहि आपले अनिवार्य कर्तव्यच आहे. राष्ट्राचा किंवा समाजाचा इतिहास सर्वांगसुंदर करण्याचा हाच एक मार्ग आहे दोष लपवून सद्गुणांचाच नेहमी पाढा वाचणें हा नव्हे ! गतकालांतील सामाजिक किंवा राजकीय पातकांना चव्हाट्यावर आणण्याचे नीतिधैर्य ज्या राष्ट्राला नाही. त्यानें आजन्म इतर सुधारक राष्ट्रांच्या कोपरखळ्या खातच कोठेतरी कानाकोपऱ्यात पडून राहिलें पाहिजे.
६. वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यास कचरणारी मंडळी संस्कृतीच्या महत्वाचा मुद्दा नीटसा लक्षांत घेत नाहींत. कोणत्याहि राष्ट्राचा, त्यांतील निरनिराळ्या समाजांच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा असेल तर त्या राष्ट्राच्या गुणदोषांची समप्रमाणांत छाननी झालीच पाहिजे. काळाच्या प्रवाहामुळे राष्ट्र नवीन नवीन अनुभवानें कितीहि उन्नत झालें आणि दुसऱ्या अनेक राष्ट्रांच्या निकट परिचयामुळे त्याच्या सर्व कल्पनांत कितीही क्रांती झाली, तरी त्याच्या भवितव्यतेचा ताळा पडताळून पहाण्यास त्याच्या मूळ संस्कृतीचा सर्व इतिहास नीट अवगाहन करावा लागतो युरोप खंडांतील सुधारणेचा आणि शिक्षणाचा आशिया खंडांतील राष्ट्रांनी कितीहि पूर्णपणे स्वीकार केला, तरी त्यांचा परिणाम दोनहि खंडांतील राष्ट्रांवर सारख्याच प्रमाणावर होणें शक्य नाही. औषध जरी एकच असले, तरी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतिमानाप्रमाणेंच त्याचा परिणाम घडून यायचा. व्यक्तीची प्रकृति आणि राष्ट्राची संस्कृति ही जवळजवळ सारखीच. त्याचप्रमाणे बदललेल्या मनूप्रमाणे नव्या मन्वंतराचे संदेश जरी एकाच सांच्यांत आणि एकच स्वरांत सर्व समाजांच्या तोंडातून एकसमयावच्छेदेंकरून उमटत असले, तरी त्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायच्या वेळी प्रत्येक समाज आपापल्या बन्यावाईट पूर्व संस्कृतीच्या वळणावर गेल्याशिवाय खास रहात नाही. हा निसर्गाचा नियम असो वा नसो : इतिहासाचा अनुभव मात्र असा आहे खरा.
७. ग्रामण्याच्या इतिहासाने एक गोष्ट मात्र स्पष्ट रीतीनें सिद्ध केली जाईल, ती हीच की गतकाळच्या इतिहासांत ज्या ज्या समाजांनी या देशाच्या राजकीय क्षेत्रांत काही नांव कमाविलें, त्यांची वैयक्तिक प्रवृत्ति आणि विशेषतः संस्कृति काय होती, याची वाचकांना चांगली खात्री पटेल सध्या एकदेशीयत्वाचें वारे आसेतुहिमाचल भरारा वाहत असतांना, वरवर पहाणाराला असा भास होणें शक्य आहे की हिंदु मुसल्मान वगैरे ठळक ठळक भेद तर आज समूळ नष्ट झाले आहेत. इतकेंच नव्हे तर खुद हिंदुहिंदुमधील जातीभेदमूलक कल्पनांचाहि नव्या मन्वंतराच्या रामरगाड्यांपुढे चक्काचूर झाला आहे. परंतु ही भावना वरवर पाहणारांची झाली, आणि असे वरवरच पाहून हुरळून जाणारे लोक बहुशः बरेच असतात. वास्तविक स्थिति काय आहे, किंवा निदान कशी असावी, इतका पोंच ठेवून तारतम्याने विचार करणारी डोकी फार थोडी!
रसभरीत व्याख्याने देऊन किंवा वर्तमानपत्रांतून चुरचुरीत लेख लिहून देशभक्तीची स्वयंमान्यतेची पदवी पटकाविणारे लोक बोलतात किंवा लिहितात तसेच खरोखर वर्तन करतात काय, हा प्रश्न आमच्यातील शेंकडा ८० लोकांस सुचत नाहीं. इतकी विचारशिथिलता अझून अस्तित्वांत आहे. दिसतें तसें नसतें ही साधी गोष्ट विचारांत घेण्याइतक्या विचारक्षमतेचा आमच्या गरीब श्रद्धाळु देशबांधवांत अझून उदय व्हावयाचा आहे.
श्रद्धाळूपणा हा गुण काही वाईट नव्हे! परंतु त्याला देखीक कांही मर्यादा आहे. महाराष्ट्राच्या गतवैभवाचें आपण सिंहावलोकन केलें तर या श्रद्धाळूपणाच्या पायींच मऱ्हाठी साम्राज्याचा सत्यानाश आपला आपण कसा करून घेतला, हें चांगलें ध्यानी येईल. ज्या समाजांनी श्रद्धाळूपणापेक्षां अधिक उच्च ध्येयावर नजर टाकून, क्रोधानें किंचित् अस्तन्या वर सारल्या असत्या तर राष्ट्रक्रांतीच्या वेळींसुद्धां विजयदेवतेनें धांवत येऊन त्याला माळ घातली असती, असे चांगले चांगले प्रबुद्ध समाज ऐनवेळी श्रद्धेच्या फाजील स्तोमाच्या भरी पडून आपले आपण वैरी कसे झाले, हें सिद्ध करणारी स्थळे महाराष्ट्राच्या इतिहासांत अनेक दाखवितां येतील. चिकित्सक पाश्चिमात्यांचा आणि आमचा गेल्या शतकभर इतका निकट परिचय होऊनसुद्धां आमच्यांतील बरेच सुशिक्षित लोक असून या श्रद्धाळुपणाच्या इन्फ्ल्युएंझापासून मुक्त होऊ नयेत आणि वाटेल त्या चलाख गारुड्यांच्या भजनीं हां हां म्हणतां लागण्याइतके हुरळून जावेत हें फार शोचनीय होय. थोडक्यांत सांगावयाचे तर कोणत्याहि गोष्टींवर एकदम विश्वास टाकण्यापूर्वी त्याच्या बाह्यांगाचे व अंतरंगाचे सूक्ष्म पृथःकरण करण्याची संवय अझून पुष्कळांना लागावयाची आहे.
८. बाजू अंगावर घसरू लागली की सैतानसुद्धां बायबलाचा आधार घेतो, अशी एक इंग्रजीत म्हण आहे. सैतानाने बायबलातील वेदांताचा पाठ धडाधडा म्हणून दाखविण्यास सुरुवात केली म्हणून तो सैतानाचा साधू झाला असे मानणे बरेच धोक्याचे आहे. कदाचित् वेदपठनाच्या अनेक आवृत्त्यांमुळे त्या नैसर्गिक सैतानीपणाचे पाणी निवळण्याचा संभव असतो खरा तथापि वेदाची पोथी गुंडाळून ठेवल्यावर श्रोत्यांच्याच बोकांडी तो सैतान बसणार नाहीं कशावरून? त्याची मूळ संस्कृतीच सैतानी, ज्याच्या सैतकनी अत्याचाराचा इतिहास कित्येक शतकांच्या पृष्टांत खच्चून भरलेला आणि ज्याच्या सैतानी तांडवनृत्याच्या दणक्याखाली कित्येक साम्राज्ये चिरडून जमीनदोस्त झाली असला सैतान साधुत्वाचा मोठा आव आणून वेदांताची प्रवचने झोडू लागला म्हणून का आम्ही त्याची स्तुतिस्त्रोत्रे गाण्यास एकदम प्रवृत्त व्हावे? वेदांत आवडत नाही कोणाला? सर्वांनाच तत्वज्ञान आवडते. परंतु त्यावरून तत्वज्ञानांची पुराणें झोडणारे सर्वच पुराणिक साधु समजावयाचे की काय ? ज्याला बोलता येते तो चांगलेहि बोलतो आणि वाईटहि बोलतो. परंतु बोलणे आणि आचरण यात बराच भेद असतो, हे मात्र विसरतां कामा नये. बोलणाराच्या आचरणाचा गत इतिहास काळाकुट्ट असल्याचे प्रत्यंतर आपणाला जर धडपडीत प्रत्ययाला येत आहे. तर त्याच्या तोंडातून बाहेर कोसळणाऱ्या वेदांतप्रवचनाच्या पांढऱ्याफेक फेंसाने त्याच्या अंतस्थ कारस्थानी वृत्तीचा नैसर्गिक काळेपणा स्वच्छ धुवून काढलाच असेल, असे मानण्यास काय आधार ? ग्रामण्यांच्या इतिहासात महाराष्ट्रातील बऱ्याच प्रमुख समाजांची अंतर्बाह्य संस्कृति ठळक रीतीने चित्रित केलेली आढळते. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील या समाजांचा दर्जा काय होता, याचेंही स्पष्ट चित्र या इतिहासफलकावर मुद्देसूद रेखाटलेलें आपणांस पहावयास मिळते. अर्थात् सध्याच्या मन्वंतरांत जे जे तत्त्ववेत्ते पुराणीक राष्ट्रीय तत्वज्ञानाची पुराणे झोडण्यास पुढे सरसावलेले आहेत, त्यांची कुवत, त्यांची मूळ संस्कृति आणि त्यांच्या मनोवृत्तीची रचना काय आहे, या सर्व गोष्टींची पंचराशिकें सोडविण्याच्या कामी आणि कोठे कोणते प्रमाण व्यस्त येतें किंवा सम येतें हें बिनचूक दाखविण्याच्या कामी ग्रामण्यांचा इतिहास हाच एक गुरू होय, यांत मुळीच संशय नाहीं.
९. ग्रामण्यांचा इतिहास प्रसिद्ध झाल्यास जातिभेदाला विनाकारण चेतना येईल आणि राष्ट्रीय कामगिरीत सर्व समाजांचा मिळावा तसा एकोपा मिळणार नाही, असा दुसरा आक्षेप काढण्यात येतो. हा आक्षेप सयुक्तिकतेच्या बाळशाने जरी गोंडस दिसत असला तरी वास्तविक तो तितका सशक्त नाही. जातिभेद असणारच आणि तो असावा हे मत नवीन नसून पुष्कळ विचारवंतांनी हिंदु समाजांचे सूक्ष्मरीत्या परीक्षण करून हा सिद्धांत काढला आहे. जातिभेद-- म्हणजे चतुवर्णव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विविध व्यवसायी समाज समाजांतील सामाजिक आणि धार्मिक बंधनांची जाणीवही नष्ट होणें जवळजवळ अशक्य कोटींतील आहे, असा आज तरी सर्वसाधारण ग्रह आहे. जातिमत्सर मात्र मुळीच नसावा आणि तो अलीकडे नष्ट घेण्याच्या पंथाला लागलेला आहे, ही फार समाधानाची गोष्ट होय. जातिभेदाबरोबरच जातिमत्सरानेहि आपलें बिऱ्हाड बाजलें कायमचें ठेवावें, हें कोणीही मान्य करणार नाहीं. तथापि पुराणप्रियतेच्या फाजील अभिमानाच्या भरीं भरून जातिमत्सराच्या होळीत येन केन प्रकारेण तेल ओतणारे कित्येक राजवाडे धूमकेतूप्रमाणे मधूनमधून उपटतातच! जातिमत्सराची मुळें जातिभेदाइतकी खोलवर गेलेली नाहीत, हें तरी एक दुःखात सुख म्हटले पाहिजे.
जातिमत्सराचा इतिहास अगदी अर्वाचीन आहे. प्राचीन धातुर्वण्य व्यवस्थेत चुरस नव्हती अशांतला प्रश्न नाही. चुरस होती, स्पर्धा सारखी चालू होती आणि परस्पर समाजांत अनेक युद्धेहि झाली. परंतु ह्या स्पर्धेचा पाया "दुष्मन् चाहि है लेकिन बोभि दाना दुष्मन् चाहि है" या तत्वावरचा होता. म्हणून चारहि वर्णातील व्यक्तिनां आपापल्या वैयक्तिक संस्कृतीच्या जोरावर याटेल त्या वर्णाच्या व्यक्तिबरोबर पराक्रमाची वरचढ करून त्याचा दर्जा पटकाविण्याची संधि मिळत असे. आणि याबद्दल कोणीहि त्या बहाद्दराचा उपहास न करितां सर्व जगाकडून त्याच्या उज्वल संस्कृतीचा सकौतुक गौरवच केला जात असे. त्यावेळच्या वर्णाभिमानाची कसोटी वैयक्तिक किंवा सामुदायिक संस्कृतीच्या परिणते सिद्ध होत होती. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातील प्राचीन स्पर्धेचा इतिहास या दृष्टिने पाहिला म्हणजे सांप्रतचा जातिमत्सर हा अगदी अर्वाचीन आहे, हे सांगणे नको. कित्येक पंडित अर्वाचीन जातिमत्सर प्राचीन चतुर्वर्णस्पर्धेचे रूपांतर आहे असे म्हणतात परंतु ही त्यांची निव्वळ वकिली थाटाची विचारसरणी आहे असें म्हणावे लागते.
१०. ज्यावेळी एखादा समाज वर्णनीय राष्ट्राची कामगिरी करून तद्देशीय इतिहासाला व भाटकवींना आपल्या विविधांचे स्तुतिपाठक बनवितो आणि जेव्हा परकीय इतिहासकारसुद्धां त्या स्तुतिगायनाच्या जलशांत स्वतःच्या रसिकतेला पुनित करण्याच्या अहमहमिकेनें येऊन सामील होतात, तेव्हा सहाजीकच त्या समाजाच्या प्राचीन संस्कृतीच्या परंपरेचा शोध लावण्याची तीव्र जिज्ञासा समंजस विद्वानांत उत्पन्न होते. जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हुडकिणाऱ्या संशोधकांची संशोधन दृष्टि दस्तऐवजी दिवटीच्या अभावी भूतकालाच्या निबिड अंधःकाराला पाहून जरी बाचकून जाते. डोळस इतिहासशास्त्र्यांच्या कालपटलभेदक दुर्बिणी अज्ञात काळच्या तटबंदी भिंतींचा छेद करून जरी पलिकडे जाऊ शकल्या नाहीत आणि भूतकाळाच्या अंधाराला अधिकच संशयग्रस्त करण्यासाठी मत्सराच्या काजळीचे डोंगरच्या डोंगर जरी कोणी विश्वामित्राने मध्यंतरी आणून उभे केले, तरीसुद्धां जेव्हां त्याच अज्ञात आणि काळ्याकुट्ट कालपटलांतून एखादा समाज वर्तमानकालीन् इतर समाजांना दिपवून टाकण्याइतक्या स्वयंभू तेजाने फोफावत बाहेर पडतो, तेव्हां त्याच्या पराक्राबरोबरच त्याच्या नैसर्गिक शीलाचा आणि प्राचीन संस्कृतीचा इतिहास स्पष्ट दृग्गोचर होऊ लागतो. हा इतिहास विशेषसा दुव्वेबाज नसल्यामुळे अर्वाचीन दृष्टीला जरी किंचित् गौण भासण्याचा संभव आहे आणि आधुनिक विचक्षण पद्धतीनें जरी त्याची छाननी यथातथ्य होणें शक्य नाही आणि कोणत्याहि प्राचिन इतिहासावर हे आक्षेप आल्याशिवाय रहातच नाहींत! तथापि त्याच्या उपलब्ध विस्कळीत दुव्यांवरूनहि विवक्षित व्यक्तिच्या समाजाच्या किंवा सबंध राष्ट्राच्याही तत्कालीन शीलाबदल किंवा संस्कृतिबद्दल निश्चयात्मक निर्णय काढतां येणें शक्य नाहीं असे मात्र मुळीच नाहीं. या कामी पान्धिगात्य संस्कृतीचा आणि संशोधन-प्रवृत्तीचा पूर्ण संस्कार झालेली भारतीय शोधकबुद्धि अलिकडे बरीच कुशाग्र बनलेली आहे. यांत तिळमात्र संदेह नाही.
इतिहास संशोधन आणि संगोपन या दिव्य मंत्राचा गुरूपदेश जरी पश्चिम दिशेनें पूर्वेच्या कानात फुंकला आहे, तरी गुरूसे चेला सवाई या सार्थ म्हणीचे प्रत्यंतर पौर्वात्य इतिहास- शास्त्र्यांनी आपल्या वर्णनीय कर्तबगारीने दाखविले आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ति होईलसे आम्हांस वाटत नाही. विशेषतः महाराष्ट्रीय कित्येक इतिहास संशोधकांनी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत अलीकडे जी सेवा केली आहे ती केव्हांहि प्रशंसनीयच म्हटली पाहिजे. वास्तविक पाहिले तर महाराष्ट्राचा अर्वचीन म्हणजे १७ व्या शतकापासूनचा इतिहास जतन करण्याची कामगिरी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू बखरकारांनीच बजावलेली आहे. शिवाजीच्या स्वराज्योपक्रमाच्या अंतस्थ स्फूर्तीच्या ठिणगीवर याच जातीने आपल्या अलौकिक कर्तबगारीचे तेल ओतून ती प्रज्वलीत केली. शिवशाहीच्या भव्य प्रासादाचा पाया खणतांना याच जातीच्या अनेक नरनारींनी केवळ आत्मस्फुर्तीने आपल्या प्राणांच्या आहुती त्यांत टाळून, त्यांतील प्रत्येक धिन्याचिन्यत कायस्थप्रभू- रक्ताचे सिमेंट ठासून भरलें ‘हिंदवी स्वराज्याचा सूर्योधय होणार!’ असा आत्मविश्वासपूर्ण कर्णा शिवाजीनें फुंकतांच खडबडून जागे झालेले महाराष्ट्र तरुण शिवाजीच्या निशाणाखाली येऊन दाखल होण्याच्या आधी हाच समाज त्याच्या पाठीमागे येऊन उभा राहिला, राजपुतान्यांतील शौर्यसागर रजपुतांचे रक्त नसानसांतून खेळत असणाऱ्या मराठे क्षत्रिय वीरांच्या दणकट तलवारींच्या तिखट पात्यांना चकित करून सोडणारी तलवारबहाद्दरी स्वराज्याच्या उषःकालापासून तो त्याच्या हतभागी अस्तापर्यंत याच समाजानें गाजविली आहे. मनगटांतल्या जोरावर क्षात्रवीर्यांचा प्रमाप गाजवीत असतांनाच कलमबहाद्दरीने आणि मुत्सद्देगिरीनें बुद्धिकौशल्याची शिकस्त करणारा समाज हाच म्हणजे शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या कर्मयोगाला आपल्या निसर्गजात भक्तियोगाचे व ज्ञानयोगाचे पाठबळ देऊन, महाराष्ट्रांत मऱ्हाठी पातशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आद्यमान चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानेच मिळविला आहे, अर्थात शिव-उदयापूर्वीचा काळ दुव्वेबाज इतिहासाच्या अनुलब्धतेमुळे जरी कितीहि अंधःकारमय असा भासत असला, किंवा ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रांत कडाक्याची थंडी पडल्यामुळे उत्पन्न झालेल्या संशयाच्या धुक्यांनी दाही दिशा जरी आज कोंदाटलेल्या दिसत असल्या तरी एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होत आहे की ज्या अर्थी “आपली सेवा करण्याकरिता या घटकेला कोण तयार आहेत?” अशी राष्ट्रानें हांक मारतांच जो समाज एकदम आपल्या अज्ञात दशेचें कवच पार फेंकून देऊन, त्याच्या हांकेला हांक देऊन राष्ट्रीय निशाणाखाली धांवून आला; इतकेंच नव्हे तर त्यानें आपल्या अवर्णनीय पराक्रमानें राष्ट्राची स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा रंगारुपासहि आणली, त्याअर्थी त्या समाजाची प्राचीन संस्कृति अर्थात तितकीच बलवत्तर असली पाहिजे. अर्वाचीन डोळस इतिहासशास्त्र्यांच्या चन्यांना या प्राचीन संस्कृतीचें स्वरूप नीट अवगाहन करता येत नसेल तर तो दोष त्यांचा नसून त्यांच्या चष्म्यांचा आहे. ही गोष्ट केव्हांहि सिद्ध करून दाखविण्यास अडचण पडणार नाही.
११. शिवाजीचा अवतार होण्यापूर्वीच चां. का. प्रभू समाजाचा इतिहास पाहिला तरीहि इतके सिद्ध होत आहे की तत्कालीन मुसलमानी रियासतींत त्यांची स्मिति म्हणण्यासारखी खालावलेली नव्हती. त्यांची कलमबहाद्दरी, मुत्सद्देगिरी त्यांचें सुप्रसिद्ध इमान, त्यांची क्षात्रवृत्ति त्यांचा योग्य तो परामर्ष मुसलमानी संस्थानातले शहा ठिकठिकाणीं घेतच होते. गडावरचे गडकरी आणि किल्लांचे किल्लेदार होण्याचा मान व अधिकार विशेषतः कायस्थ प्रभूंकडेच असे. मुसलमानी रियासतीत वरिष्ठ सरदाऱ्या भोगणारे शहाजीराजे जाधवराव आदीकरून मराठे सरदारांचे सल्लामसलतगार, दळपती आणि सुभेदार कायस्थ प्रभुच असत आणि तत्कालीन मोहिमांचे डावपेंच ठरविण्याच्या कामांत याच गडकरी किल्लेदार वगैरे सरदारांच्या सल्ला मसलतींचा उपयोग मुसलमान सत्ताधारी करून घेत असत. याशिवाय जंजिरा वगैरे संस्थानांकडे पाहिले तर तेथे चा. का. प्रभू केवळ सरदारक्या, गडकरीपणा किंवा किल्लेदारी याच हुद्यांचा उपयोग घेत होते असे नव्हे, तर दिवाणगिरीच्या जागांवरहि हे लोक वंशानुवंश अधिकार गाजवित होते. परंतु नुसत्या दिवाणगिऱ्या केल्या किंवा सरदाऱ्या गाजविल्या एवढ्याच मुद्यावर हा समाज मराठी स्वराज्य स्थापनेच्या प्रत्यक्ष कार्यभागांत पडण्याइतका स्वयं स्फुर्तीनें अवचित उद्युक्त कसा झाला मराठी स्वराज्याची स्थापना प्रस्तुतच्या स्वराज्याच्या मागणी इतकीच सरळ आणि सोपी होती काय? सांप्रतच्या ‘सनदशीर मागणी’ला जेवढे म्हणून आज अडथळे आहेत. जितके प्रतिरोध करणारे संघ आहेत आणि जनतेच्या मनाची ‘सनदशीर तयारी आहे’ आहे, त्यापेक्षां सहस्त्रपट अधिक तीव्र विरोधाला तोंड देऊन, शिवाजीनें धुळीच्या कणांतून एवढे प्रचंड स्वराज्यमंदीर निर्माण केलें, ही गोष्ट प्रत्येक इतिहासाला कबूलच केली पाहिजे.
शिवाजीच्या स्वराज्योपराक्रमाचे जहाज हांकारण्यास संध्यांच्या नामदारी किंवा नामदार म्हणा वाटेल तर देशभक्तांपेक्षा अधिक कसदार नावाड्यांची आवश्यकता होती, यांत संशय नाही. सध्याहि सरदाऱ्या किंवा दिवाणगिऱ्या गाजविणारे कायस्थेतर कोणी नाहीत किंवा शिवकालई नव्हते असें नाहीं. परंतु शिवाजीच्या देशकालवर्तमानाचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर नुसत्या सरदार किंवा दिवाण-परंपरेच्या लोकांच्या हांतून तो स्वराज्यस्थापनेचा विश्वव्याप खात्रीने तडीला जाणे शक्य नव्हते. थां. का. प्रभू समाजाची प्राचीन संस्कृति शिवकालापर्यंत नुसत्या सरदारी दिवाणगिरी किंवा किल्लेदारी येवढ्याच दर्जापर्यंत उन्नत झालेली होती, यापेक्षा अधिक उंचीपर्यंत तिची भरारी गेलेलीच नव्हती. असे जर गृहीत धरलें तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांनी जी मुत्सद्देगिरी दाखविली, जीं धाडसाचीं अनेक पराक्रमी कामे केली आणि शिवाजीच्या प्रत्येक महत्त्वाकांक्षेच्या उत्साहाला प्रत्यक्ष दृश्य स्वरूप आणण्याच्या कामी त्यांनी जी कल्पनातील समयसूचक धोरणे लढविलीं तीं सारी ‘अवचित घडून आलेला चमत्कार’ तरी मानला पाहिजे एक, किंवा तो सारा इतिहासच्या इतिहास कादंबरीवजा समजला पाहिजे एक; याशिवाय या प्रश्नाचा उलगडा लागणे शक्य नाहीं. आजलाहि हिंदुस्थानाच्या चारी भागांवर दृष्टी टाकली आणि निरनिराळ्या प्रांतांतील निरनिराळ्या समाजांची आधुनिक उन्नति मनोधर्म यांचे नीट निरीक्षण केलें तर असे दिसून येईल की पाश्चात्य विद्येचा मुलामा जरी सर्व ठिकाणी सारख्याच प्रमाण घटलेला दिसत आहे. तरीसुद्धा प्रत्यक्ष कार्याचा प्रसंग येतांच जो तो आपापल्या पूर्वसंस्कृत्यनुरूप अशाच क्षेत्रांत काय तो बहादरी गाजवू शकतो. ज्या ज्या समाजांनी पूर्वी राज्ये केली किंवा प्राचीन राज्यकारभारांत ज्यांचे पूर्वज प्रत्यक्ष पडत होते, त्या त्यातील लोकांच्या राजकीय वातावरणांत टिकाव धरीत आहेत. पिढ्यानपिढ्या ज्यांनी नुसता व्यापार केला अशा समाजांतील मंडळी जरी आजकाल राजकीय उलाढालींत पडत आहेत, तरी राजकीय तलवारीच्या मुठीचा आणि त्यांच्या हाताचा यावज्जन्म कधी संयोगच घडून आल्यामुळे राजकीय क्षेत्रांत त्याचे वर्तन विशेषसें दणकट किंवा अधिकारी होत नाही. इतकंच नव्हे तर त्यांना त्या बाबतीत आत्मसंतोषाने म्हणा अथवा लोकमताच्या विरोधाने म्हणा केव्हातरी माघार घ्यावीच लागते, अशी अनुभवांची उदाहरणे शेंकडों दाखविता येतील. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे पूर्वसंस्कृतीच्या अभावी एखादी व्यक्ती अगर समाज राष्ट्रीय पुनर्घटनेसारखे जगद्वयाळ कार्य घडवून आणील हें शक्यच दिसत नाहीं. संस्कृतीचा संस्कार कितीहि मलीन झालेला असो, पण त्यालाहि अवसर मिळताच तो आपला पराक्रम गाजविल्याशिवाय कधीहि राहणार नाही. उलटपक्षी संस्कृतीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करून भलत्याच क्षेत्रांत बहाद्दरी मिळवू पाहणाऱ्यांची स्थिती किती शोकजनक होते, याची उदाहरणे आज प्रत्यही आपल्या नजरेसमोर शेकडों घडत आहेत.
शिवाजीला ही संस्कृति परिक्षणाची कला, प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाने असो अथवा निसर्गदत्त असो, फार चांगली अवगत झाली होती, यांत संशय नाही. हिच्या सहाय्यानेच त्यानें महाराष्ट्रीय इतर समाजांकडे आपली नजर फेंकण्यापूर्वी चां. का. प्रभू समाजाला तयाने पोटाशी धरले. शिवाजीच्या एकंदर चरित्रावरून ‘मनुष्याची पारख’ करण्यात त्याचा हात किती खंडा होता, हे चांगलेच व्यक्त होत आहे. अर्थात् चां. का. प्रभूंना प्रथम जवळ करण्यात त्याची रसिकता आणि दूरदृष्टी जरी व्यक्त होत असली तरी ती रसिकता निवळ काकतालीय न्यायाच्या भुसक्या पायावरची खास नसून, ती शिवाजीच्या संस्कार- परिक्षणाच्या अंतर्वेधदृष्टियरच उभारली गेली होती. पूर्वसंस्कृतीच्या बलवत्तर तेजाची साक्ष पटल्याशिवाय नसत्या भिडेसाठी किंवा कार्याची निकड म्हणून रिक्रूटांची खोगीरभरती करणारे शिवाजीमहाराज तरी खास नव्हते !
१२. चां. का. प्रभू समाजाची अशी पूर्वसंस्कृती तरी काय होती, की तिकडे शिवाजीचें लक्ष एकदम धावून गेलें? शिवाजीच्या मनांतील जन्मजात स्वराज्य स्थापनेकरिता मदतगार म्हणून त्याची दृष्टी याच विवक्षित समाजानें का वेधून घेतली? काय त्या वेळीं खुद्द शिवाजीचे नातलग आणि जातभाई मराठे शूर नव्हते? स्वतःचे जरी स्वराज्य नव्हते तरी परराज्याची यंत्रे तेच हालवित होते ना? मग घरच्यांना वगळून दारच्यांकडेच शिवाजी का वळला? ही प्रश्नमालिका नि:पक्षपणाने सोडविणारालाच चां. का. प्रभूंच्या प्राचीन इतिहासाची ओळख पटणें शक्य होईल. इतर कोणी कितीहि जाडा व्युत्पन्न असला किंवा ऐतिहासिक जुनी कागदपत्रे हुडविणारा सूक्ष्म दृष्टीचा संशोधक उंदीर असला तरी त्याच्या दृष्टीला अंधाराशिवाय आणखी कांही दिसेल, असा आम्हांस भरंवसा वाटत नाहीं.
चां. का. प्रभू समाज संख्येच्या मानानें जितका लहान आहे, त्यापेक्षां त्याच्या पराक्रमाचा इतिहास अत्यंत विस्तृत आणि मोठा आहे. अल्पसंख्यांक समाजानें राष्ट्राच्या मोठमोठ्या उलाढालीच्या इतिहासांत प्रामुख्यानें झळकत राहिल्याचें उदाहरण निदान भरतखंडाच्या इतिहासांत तरी याच समाजाचे होय.
शिवावतारापूर्वीच्या चारदोन शतकांचा इतिहास पाहिला तरी त्याच्याहि उपलब्ध विस्कळीत आणि संकीर्ण पृष्टांत चां. का. प्रभूंची राजकीय क्षेत्रांतील कर्तबगारी बिनचूक आढळून आल्याशिवाय राहत नाही. संख्येच्या प्रचंडत्वाने पूर्वी व आतांहि जगाची छाति दडपून टाकणारे असे अनेक समाज आजलाहि दाखवितां येतील कीं ज्यांच्या प्राचीन इतिहासाचें संशोधन करू लागल्यास कित्येक शतकांची पानें जरी डोळे फाडफाडून चाळली तरी त्या संबंधी एक अक्षरसुद्धा कोठे धड सापडण्याची मारमार पडते आणि या दृष्टिनें विचार केला तर चां. का. प्रभू समाज हा लोकसंख्येच्या दृष्टिने अल्पतम असतांहि त्याचा पराक्रम प्रत्येक स्वकीय किंवा परकीय " शाही " च्या इतिहासांत प्रामुख्यानें दृग्गोच्चर व्हावा. ही एकच गोष्ट त्याच्या राष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देण्यास पुरेशी आहे.
१३. चां का. प्रभूंचा प्राचीन इतिहास आजलाहि बराच उपलब्ध आहे; परंतु तो सांप्रत संकीर्णावस्थेत असल्यामुळे आणि आधुनिक इतिहासकारांनी तो अर्वाचीन पद्धतीत संकलित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न न केल्यामुळे, खुद या ज्ञातींतील एखाद्या जाड्या इतिहासशास्त्रास जर प्रश्न केला की ‘तुमचा इतिहास काय व कोठे आहे तो दाखवा पाहूं?’ तर त्याला देखिल एका विवक्षित ‘स्टैंडर्ड’ ग्रंथाकडे बोट दाखविता येत नाहीं. काही मजकूर या पुस्तकांत, त्याच्या पुढचा दुसऱ्या पुस्तकांत, आणखी राहिला तो तिसऱ्या पुस्तकांत, अशा स्थितीत तो इतिहास पांगलेला आहे. बरे, ज्यांनी स्वज्ञातीच्या इतिहासाचा ठाव पाहण्याचा कांहीं यत्न केला, त्यांना ‘मायथॉलजी’ च्या भोळसट प्रेमाने इतके काही ग्रस्त केलें की त्यांच्या विवेचनानें जी एकदा ब्रह्मदेवाच्या नाभिकमलाच्या मुळाशी दडी मारली. तेथून त्यांची धडपणे अझूनहि सुटका झाल्याचे दिसत नाही. पौराणिक काव्याकुटाच्या सांबाऱ्याचे भुरके मारण्यांत ही इतिहासकार मंडळी एकदा गुंग झाली की मग त्यांना ऐतिहासिक सृष्टीतील घडामोडीकडे दृष्टि फेंकायला फुरसदच रहात नाही आणि एकदा का ही पुराणप्रिय मंडळी शब्दांच्या व्युत्पत्यांचा कीस काढू लागली की "हैहय कुलोत्पन्न क्षत्रिय" म्हणजे ‘घोड्यांचे वंशज’ येथपर्यंतच त्यांची मजल न जातां श्रीविष्णूला एखाद्या घोड्याचा अवतार घ्यावयास भाग पाडून मातोश्री लक्ष्मीलाहि घोड़ी बनविण्यास चुकत नाहीत. इतिहास संशोधनाची धमक असूनसुद्धा आमच्यातील पुष्कळ चांगले चांगले संशोधक या पुराणप्रियतेच्या फाजील आवडीमुळे इतिहास सेवनाच्या बाबतीत कुचकामाचे ठरले आहेत, यापासून आमच्या आधुनिक विद्वनानीं पुष्कळ धडा घेण्यासारखा आहे.
१४. आजपर्यंत ऐतिहासिक संशोधनाकडे दुर्लक्ष करून पुराणांतल्या वंशावळी आणि भाकडकथांचा कीस काढण्याकडे आमच्यांतीक बऱ्याच विद्वनांची पुराणप्रियता फाजील प्रमाणांत गुंतल्यामुळे मध्यतींच्या अनेक शतकांतील इतिहासाचे दुव्वे आज निष्काळजीपणाच्या अंधारांत हुडकणे फार बिकट होऊन राहिले आहे. पाश्चिमात्य शोधक आणि मेहनती युरोपियन इतिहासकारांनी आणि फिरस्त्यांनी जर या विस्कळीत दुव्यांची नीट जोपासना केली नसती, तर आजला चां. का. प्रभूंच्या प्राचिन इतिहासाचें तोंड उजळ करण्याची कोणत्याहि महत्वाकांक्षी अर्वाचीन इतिहासकाराला धडगत नव्हती. आधुनिक चिकित्सक, संशयखोर आणि मनस्वी मार्मिक विचक्षण वृत्तीला निरुत्तर करण्याच्या कामी पौराणिक विवेचनाची पुराणांतीली वांगी कितपत उपयोगी पडतील, याचा आमच्या १९ व्या व २० व्या शतकांतील विद्वान् पुराणाभिमान्यांनी किंचित् पोक्त विचार करावयास नको होता का? या बाबतींत त्यांच्या हातून इतिहासाची जी हेळसांड झाली ती भरून यावयास त्यांची पौराणिक काथ्याकुटांची बाडे काडीमात्र उपयोगी पडत नाहीत. अर्थात् त्यांच्या साऱ्या ग्रंथलेखनाची किमत आजच्या पिढीच्या दृष्टिनें मातीमोलच ठरत आहे, याबद्दल कोणाहि सहृदयांस खचित वाईट वाटल्याशिवाय राहणार नाहीं. स्वज्ञातीच्या इतिहासाकडे असे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि प्राचीन इतिहासाचे सर्व दुव्वे इतस्ततः अनेक ग्रंथात विखरून पडल्यामुळे आज आमच्या हाडवैऱ्याना आणि हितशत्रूंना आमच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासावर वाटेल तसे घाणेरडे आरोप करण्यास बरेच फावलें आहे आणि याबद्दल जर खरोखर कोणी जबाबदार असतील तर आमचेच आधुनिक चां. का. प्रभू इतिहासकार होत, यांत मुळींच संशय नाही.
१५. शिवाजीमहाराजांच्या जगड्व्याळ कार्यव्यांपृत्वाच्या मानानें त्यांच्या कारकीर्दीतील उपलब्ध कागदपत्रांची संख्या अत्यंत क्षुल्लक आहे, असे का व्हावें? रा. राजवाड्यासारख्या एकनिष्ठ व एकमार्गी इतिहास-संशोधकाची मतिसुद्धा अगदी गुंग होऊन गेली असून, त्यांनी या बाबतीत अगदी दीर्घ निराशेचे उद्गार वेळोवेळी काढले आहेत. शिवाजीमहाराजांच्या वेळच्या महत्त्वाच्या शें सवाशें पत्राखेरीज अधिक काहींहि कागदपत्रे उपलब्ध होऊ नयेत, ही गोष्ट सर्व बाजूंनी अत्यंत शोकजनक आहे, खुद्द शिवाजीमहाराजांच्या रिकार्डाचाच जेथें समूळ बेपत्ता, तेथे ज्या चां. का. प्रभूंचाहि इतिहास खुद महाराजांच्या इतिहासांतच निगडित झालेला, त्यांच्या तरी इतिहासाचा आणखी पत्ता लागणार कसा? ही सर्व कागदपत्रे एकाकीं नाहींशी झाली कशी? काय मध्यंतरी मोठाथोरला धरणीकंप होऊन त्यांत तीं गडप झाली, की अवचित ती आपणच होऊन जळून फस्त झाली? अशा प्रकारच्या धरणीकंपाचा किंवा अग्निप्रळयाचा इतिहासांत तर कोठेहि नामनिर्देश आढळत नाही. या कोड्याचा उलगडा व्हावा म्हणून शोध करीत असताना छत्रपतीच्या चिटणीसाच्या एका पत्राची नक्कल उपलब्ध झाली. त्यांत चिटणीसांनी स्पट लिहिलें आहे की आम्हांला तुरुंगात टाकल्यावर चिंतामणराव पटवर्धनाच्या चिथावणीवरून बाळाजीपंत नातूने आमचे घरदार लुटविलें आणि अठरा उंट भरून घरांतील सर्व कागद पत्र नेऊन जाळून पोळून फस्त केले. यावरुन इतकें सिद्ध होत आहे की (१) छत्रपति प्रतापसिंहाच्या कारकीर्दीपर्यंत भोसले राजघराण्याचे सर्व कागदपत्र चिटणीसांच्या संग्रह जिवंत शाबूद होते : (२) सरकारी दप्तराचे अधिकारी चिटणीस व चिटणीसांच्या हस्ताक्षराखेरीज सरकारी फर्मानांची ‘वॅलिडिटी’ (सत्यता) अखिल भरतखंडांत कोणीहि मान्य करीत नसे. अर्थात् मराठेशाहीच्या अव्वल पासून अखेरपर्यंतचे महत्त्वाचे सर्व कागदपत्र चिटणीसांच्या संग्रही असत. (३) त्यांचीच बाळाजीपंत नातूसाहेबांनी होळी केल्यावर रा. राजवाड्यांनी काय आम्ही काय किंवा इतर कोणी काय कितीहि शंख केला तरी निष्पन्न काय होणार? राघोबादादा आणि आनंदीबाई या हतभागी जोडप्याला नाटकें कादंबऱ्यांतून राक्षसी पेहराव चढविणाऱ्यांनी पटवर्धन नातू प्रभृतीने महाराष्ट्राचा सर्वतोपरी घात करण्यात किती चिळस आणणारें निर्घृण वर्तन केले, इकडे लक्ष पुरविल्यास अस्तनींतले निखारे बरे पण झग्यांत वावरणारे हे देशद्रोही विंचू नकोत, असे त्यांस वाटल्याशिवाय राहणार नाहीं.
१६. आम्हांला स्वतः या वेदोक्त आणि पुराणोक्ताला वाजवीपेक्षा फाजील महत्त्व द्यावे असें वाटत नाहीं. कारण सध्यांचा मनूच तसा आहे. प्रचलीत कालमानाचा आणि मतस्वातंत्र्याचा विचार केला तर हे वेदोपुरातायें दंड महाराष्ट्रांत इतःपर पुनम्य जीव धरील असे वाटत नाही. आब्राह्मणचांडाळांच्या धर्मविषयक कल्पना नवीन मन्वंतराच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडत आहेत, भूतकालीन् पौराणिक धुडगुसाचा धार्मिक कल्पनांवरील शेकडो शतकांचा मळ जळून खाक होत आहे व हिन्दुधर्माचे खरे व्यापक व शुद्ध स्वरूप सर्वांना दृग्गोचर होऊ लागलें आहे, इतकेंच नव्हे, तर एकराष्ट्रीयत्वाच्या शुद्ध तत्वांचा उदय होऊन स्वराज्याच्या उषःकालाच्या साखरझोपेत विश्वबंधुत्वाची गोडगोड स्वप्ने पडत आहेत. अशा आशापूर्ण स्थितीत हें वेदोक पुराणोक्तांचे बंड पुनः उपस्थित व्हावे किंवा होईल असे वाटत नाही. आज हिंदु मुसलमान, हिंदु-पारशी, हिंदु यहुदी असे भिन्न भिन्न समाज जेथे यदृच्छेने हातांत हात घालून राष्ट्रीय सौभाग्याकरितां झगडण्यास किंवा प्रयत्न करण्यास सिद्ध झाले आहेत, तेथे हा जुनापुराणा फोलकट वाद कितपत उपस्थित होईल व यदाकदाचित् झालाच तर कितपत जीव धरील याची आम्हांस फार शंका आहे खरोखर म्हटलें तर या वादाचीच अतः पर कांही आवश्यकता नाही. हा नुसता आतां विशिष्ट हक्कांचा प्रश्न आहे. ते हक्क यथाविधि पाळण्याची किंवा नेहमी यथासांग बजावण्याची कुवत चतुर्वर्णापिकीं एकहि समाजांत उरलेली नाही. व्यवहार पहा.
ब्राह्मण सदराखाली मोडणाऱ्या समाजाची दिनचर्या पाहिली तर पौराणिक परशुरामाच्या ‘सेवा सर्वत्र कर्तारं’ या शापाप्रमाणे तेहि शूद्रवत् आचरण करू लागले आहेत. काहींनी वैश्यवृत्ति पत्करलेली आहे याचा अवलंब करीत आहेत. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे " ब्राह्मण` या नामाभिधानापेक्षां ब्राह्मण्याचे अधिक विशेष चिन्ह किंवा पुरावा त्यांच्यापाशी मुळीच उरलेला नाही अर्थात् वेदोक्त कशाशी खातात आणि पुराणोक्त विधि अळणी झाल्यास त्यांत किती मीठ घालायचे याची दख्खल त्यांना कोठली ? सध्या तर ब्राह्मण म्हणविणाऱ्या समाजाची दिनचर्या इतकी बेफाम भडकून गलेली आहे कीं शूद्रांनाहि लाज वाटेल असे कितीक तरी हलके धंदे करण्यात त्याला लवमात्र दिक्कत वाटेनाशी झाली आहे. आजपर्यंत चांभाराची दुकानें काढण्यापर्यंत, पुण्याच्या मंडईत कोंबड्या विकण्यापर्यंत मजल गेली होती. परंतु परवा मुंबईत एका ब्राह्मणाने प्रेतसंस्कारविधीचें साहित्य विकण्याचें दुकान उघडलेले पाहून मन खेदाने व आश्चर्याने थक्क झालें! आज मितीला असा एकहि बरा वाईट धंदा शिल्लक राहिलेला नाहीं कीं ज्यांत ब्राह्मणांनी हात घातलेला नाही. उच्चत्वाचा किंवा नीचत्वाचा तिळमात्र विचार न करतां वाटेल ते धंदे करणारांची संख्या ज्या समाजांत दिवसेंदिवस वाढत आहे, त्या समाजाला ब्राह्मण्याचा तोरा मिरविण्याचा अधिकार कोणत्या स्मृतींत सांपडतो? क्रियालोपामुळे जर प्राचिन शूद्रांची त्रैवर्णिकांच्या उच्च वर्गातून हकालपट्टी होऊन त्यांना निराळ्याच खालच्या वर्गात बसावे लागले तर सध्याच्या क्रियानष्ट ब्राम्हणांनी आपल्याकरिता कोणत्या वर्गाची जागा झाडून सारवून तयार केली आहे? यंदाच्या (सन १९१९) पुणे येथील वसंत व्याख्यानमालेतल्या ६ व्या व्याख्यानाच्या वेळीं एक वक्ते म्हणाले "जोशाच्या वंशपरंपरा (?) वृत्तीवर जर तुमचा डोळा तर बापजाद्यांनी कधीं तरवार गाजवली असेल पण तेवढ्यावरच पिळाच्या पगड्या घालून तुम्ही तरी का मिरवावें?" होय. आम्हीसुद्धां हेंच म्हणतों, क्षत्रियांच्या वेदोक्तावर जर तुम्ही एवढा मोठा घागरीएवढा परशुरामी डोळा वटारतां आणि त्यांना शुद्र्धम वगैरे शेलक्या शिव्यांनी नेहमी प्रहार करता, तर तुमच्या बापजाद्यांनी कधिं कोकाळांत जानव्याची ब्रह्मगांठ हातांत धरून जगतपालक श्रीविष्णूच्या छाताडांवर कोकणी पायतणाचा लत्ताप्रहार केल्याची कादंबरी जरी खरी मानली तरी तेवढ्यावरच तुम्ही ब्राह्मण्याचा कोरडा दिमाख का मिरवावा?
जोड़ेपायताणे भजीकडबोळी, तिरडीचे सामान विकण्याचे शुद्र्वत राजरोस धंदे करूनसुद्धा जर एखादा ब्राह्मण ब्राह्मण्यापासून च्युत होत नसेल, तर ब्राह्मण्यानें रेडियम धातूच्यावर सरशी केली म्हणायची! रा.रा. महादेव राजाराम बोडस म्हणतात (चित्रमयजगत जाने १९१९ - वर्णव्यवस्था) शिवाजी क्षत्रिय म्हणून मलाहि क्षत्रिय म्हणा असा एकदा नांगऱ्या हट्ट धरून बसला तर त्याला आपण काय म्हणू? बाजीप्रभू रणवीर योद्धा होता म्हणून कोर्टातील एकादा सेक्शन रायटर किंवा टायपिस्ट जर क्षात्रजातीचा डौल घालू लागला तर हास्यास्पद होणार नाहीं काय? नाहीं कोण म्हणतो ? गुणकर्मावरूनच जाती किंवा वर्ण ठरवावयाची बोडस साहेब जर एखादी राष्ट्रीय चळवळ सुरू करतील तर आम्ही त्यांना मनःपूर्वक यथामति व यथाशक्ति हातभार लावण्यास एका पायावर तयार आहोत. तथापि ही चळवळ सुरू करण्यापूर्वी त्याच्याच ब्राह्मणवर्गातील ७|||/८ बंधू गुणकर्मांचा कस लागताच शूद्राच्या वर्गात खाडकन् ‘ट्रॅन्सफर’ होतील आणि अखेरीस ज्या वर्गाला सध्या लाथांखाली तुडविण्यांत सधांच्या नामधारी ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची सार्थकथा होत आहे तो शुद्र वर्ग संख्येच्या दृष्टीनें अफाट व अवाढव्य होऊन तो ‘डिस्टिल्ड्’- गाळीव शुद्ध ब्राह्मणाचीच हाडे वरवंठ्याखाली ठेचू लागेल, याचा मात्र आमच्या बोडस साहेबांनी नीट विचार करावा. परंतु गुणकर्मविभागशः जाति ठरविण्याची निदान मानण्याची प्राचीन पद्धती जर आतां प्रचलित नाहीं आणि ब्राह्मण म्हणविणाऱ्या आईबापाचा मुलगा ब्राह्मणच असें जोपर्यंत समजण्यात येत आहे तोपर्यंत वरचे बाष्कळ प्रश्न पुढे आणणे म्हणजे आपल्या खोडसाळपणाची कमाल करणे होय.
एखाद्या चां. का. प्रभूला तो सेक्शन रायटर किंवा शॉर्टहेंन्ड टायपिस्ट आहे एवढ्यावरूनच, रा. बोडस साहेबांच्या मताप्रमाणे, त्याला जर क्षात्र जातीचा डौल घालण्याचा अधिकार पोहचत नाही, तर आज रा. बोडसांच्याच जातीची जी हजारो मंडळी सेक्शन रायटर्स, टायपिस्ट, पोस्टमन, हाटेलवाले, कोळसेवाले, जोडेबूटपायतानवाले, आचारी, भुसारी , रंगारी, धोबी वगैरे धंदे करीत आहेत त्यांना तरी ब्राह्मण्याची शेखी मिरविण्याचा अधिकार कोणत्या स्मृतींत सांपडतो? ग्रामण्यांच्या इतिहासांत जी अनेक शास्त्रग्रंथांर्गत प्रमेयें व श्रीशंकराचार्यादि धर्मगुरूंची आणि शास्त्रीपंडितांची संगतपत्रे दाखल झालेली आहेत. ती आमच्या बोडससाहेबांनी पहावी म्हणजे त्यांना समजून येईल की जोपर्यंत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणविणारा आपल्या पिढिजात लेखनवृतीपासून च्युत झाला नाही मग तें लेखन जुन्या पद्धतीप्रमाणे बोरूच्या लेगणीचे असो, फ्लाइंग डचमनच्या पोलादी टांकाचे असो किंवा सुधारलेल्या टाईप रायटींग यंत्रावरचें असो, तो क्षात्रधर्मापासून च्युत झाला किंवा त्याला क्षात्रजातीचा डौल मिरवितां यावयाचा नाहीं, असें प्रतिपादन करण्याची कोणाची मग तो महामहोपाध्याय असो अगर प्रत्यक्ष श्रीशंकराचार्य असो त्याची मुळींच छाती नाही. असिजीवि मसिजीवी हेंच चां. का. प्रभूचें खरें व्रत आहे. लेखनकृती हेंच कायस्थप्रभूंच्या क्षात्रवृत्तीचे द्योतक आहे. ते त्यांनी आजदिनतागायत अस्खलीत जतन केले आहे आणि योग्य वेळी त्यांनी असिजीवि आज्ञेप्रमाणे रणांगणांत तरवारहि गाजविली आहे.
रा. बोडस साहेबांच्या विधानप्रकृतीप्रमाणे विचार केला तर ब्राह्मण म्हणविणारांना मात्र लेखनवृत्तीचा अधिकार कोणत्या श्रुतीने दिला ते समजत नाही. कै. राजारामशास्त्री भागवत (उद्धार पृ. १०१ वर) म्हणतात. जर परबूंमध्ये कालज्ञता नसती, तर सगळे महाराष्ट्र मंडळ हिशोबाच्या संबंधानें केवळ ब्राह्मणमय होऊन जातें. पण परबु मूळचे लेखक असून कालज्ञ पडले, त्यामुळे ब्राह्मणांचा पगडा महाराष्ट्र देशांत सर्वच ठिकाणी पडला नाही पुढेहि (पृ. ११० वर) ते म्हणतात, हल्लीच्या काळी म्हणजे जो उठला तो ब्राह्मण होऊ पहातो, अशा काळीहि परबु लोकांचा मगज न फाटतां स्थिर राहिला आहे, हें विशेष अभिनंदनीय होय. आजपर्यंत एकाहि चां. का. प्रभुनें ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची नकल करण्याचा यत्न केलेला नाहीं, स्वतःस चुकूनसुद्धां कधिं ब्राह्मण उपाधिचा कलंक लावून घेतलेला नाही, फार काय पण ब्राह्मणाची मुख्य दीक्षा जी भिक्षा तिचाहि प्राणन्ती अवलंब केलेला नाहीं या गोष्टी रा. बोडसांसारख्या प्रच्छान्न विद्वानांस आम्ही सांगाव्या असे थोडेच आहे? अर्थात् का. प्रभूंनी देशकालवर्तमानानुसार आपले असिजीवी मसिजीवी क्षात्रवृत्तीचे व्रत अजूनहि कसें परिपालन केलें आहे, हें सिद्ध करण्याइतका भरपूर पुरावा त्यांचा इतिहास केव्हाही देऊ शकेल. शंकेखोरांनी तो परिशीलन करण्याची तसदी मात्र घेतली पाहिजे. चां. का. प्रभू यांचा इतिहास जोपर्यंत शाबूत आहे व तो त्यांच्या क्षात्रबीजाची साक्ष देण्याइतका खंबीर, मुद्देसूद आणि सडेतोड आहे. तोपर्यंत ते वेदोक्त कर्माबद्दल आपला जन्मसिद्ध हक्क सांगणारच-मग वेदोक्त कर्मे प्रचलित मन्वंतराच्या धांगडधिंग्यात त्यांच्या हातून होवोत वा न होवोत !
१८. पुढे रा. बोडस म्हणतात "मराठे क्षत्रिय की शूद हा वाद शिवाजीच्या वेहेपासून चालला आहे व नुकतेच तंजावरच्या कोर्टाने कोल्हापूरच्या महाराजांस शूद्र ठरविले तरी तेवढ्याने लोकांचे समाधान होत नाही." आमच्या बोडसांचें मात्र आकंठ समाधान झालें आहे. कारण काय? तर तंजावरच्या कोटाने हा निकाल दिला म्हणून बिचारा गागाभट्ट आणि आजपर्यंतचे शंकराचार्य शहाणे की मूर्ख याचा निवाडा करणारा बृहस्पति अखेरीस तंजावरला उपटला आता हिन्दुसमाजांतील निरनिराळ्या जातीनी आपली धार्मिक रडगाणी या बोडसमान्य बृहस्पतीच्या दरबारी घेऊन जाऊन त्यांचा अक्षयीचा निर्णय लावून घ्यावा. या उप्पर, शंकराचार्यांच्या मिंथा करण्याचे कांहीं कारण नाही आणि त्यांच्या पीठांचा फाजील मान राखण्याचेहि कांहि प्रयोजन नाही नव्हे या संस्थाहि जीवंत राहू देण्यांत आतां कांही पुण्यांश राहिला नाही. आतां चतुर्वणांच्या ठरवाठरवीचा मामला तंजावरच्या कोर्टाकडे गेलेला आहे; मग या जगदगुरुंच्या दिवट्यांना तेलाचे बुधले ओतून ऊगाच जळत ठेवण्यात काय अर्थ ?
तंजावरच्या कोर्टाचे हे न्यायाधीश काळे आहेत की गोरे आहेत, हें आम्हांला माहीत नाहीं, हा खटला कोणत्या स्वरूपाचा होता हैं समजण्याचें साधन अगर निवाड्याची नक्कल यापैकी काहीहि आम्ही पाहिलें नाहीं व पहाण्याची पर्वाहि नाहीं उपलब्ध इतिहासाचा धि:कार करून दिलेला निर्णय बोडसपंथी मूठभर कुत्सितांशिवाय इतर कोणाहि समंजस माणसास मान्य होणार नाही. परंतु जे व्रणार्थ पशुच्या शिरावरि वनीं उभे काकसे त्यांना त्या निकालाचेंच मोठें कौतुक वाटावें यात अश्चर्य नाहीं. वेळीअवेळी एखाद्या अविश्वसनीय उदरांच्या तुटक्या दोरीच्या आश्रयाने चितपावनेतराची निंदा करण्याचे वरिकंकरण हाती बांधणाऱ्यांना आमचा असा सवाल आहे की चातुर्वण्यवस्थेचें व महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातींच्या इतिहासाचे अकटोविकटो ज्ञान असलेल्या अर्वाचीन काळ्या किंवा गोऱ्या न्यायाधीशाचा निकाल जर तुम्हाला वेदतुल्य प्रमाण आहे तर विलायतेतल्या कोर्टाच्या लो.टिळकांच्या (लोकामान्यांबद्द्लाचा आमचा वैयक्तिक आदर {पहा आमचे ‘वक्तृत्वशास्त्र’ पृ.९७,१०२, १७२, २३१, पु,पृ.३} जरी बाजूला ठेवला तरी प्रस्तुत खटल्याच्या निकालावर सर्व समंजस जगाचा जो अभिप्राय पडला आहे, त्यांत आम्हीही वाटेकरी आहोतच. अर्थातच तंजावरच्या कोर्टाच्या निकालांवर हुरळून जाऊन रा.बोडस जसे टिऱ्यां कुटू लागले, तसे टिळक खटल्याच्या निकालाच्या बाबतींतकोणी करील तर शुद्ध अधाम्प्ना होय, असे मात्र आम्ही बोडस पंथी मंडळींना बजावून ठेवतो.) खटल्याच्या निकालावर मनगटें चावण्याचा इतका उपद्व्याप करतां कांव? का ही देखिल एक वकीली सृष्टितील मयचेष्टाच आहे ? आमचे बोडसाहेबतंजावरच्या कोर्टातल्या निकालाने हुरळून जाऊन कोल्हापुरचे महाराज शूद्र ठरल्याबद्दल मोठया समाधानाने टाळ्या वाजवितात; परंतु टाळयांच्या त्या कडकडाटांत जगदगुरूंच्या पीठावरील अर्धा डझन स्वामी आणि काशीकर्नाटक प्रांतातले असंख्य शास्त्रज्ञ पंडित अप्रत्यक्ष रीतीने गाउय ठरले जातात याची त्यांना शुद्ध राहिली नाहीसें दिसतें! यावरून इतकाच निष्कर्ष निघतो की मनुष्य कितीही जाड़ा विद्वान असला तरी त्याला एकदा मत्सरानें ग्रासलें की तोसुद्धा माथेफिरूलाहि साजणार नाहीत अशी भलभलती विधाने बरळू लागतो. सर्व राष्ट्राची एकी करण्याची घमेंड मारणारे विद्वान अतापर हा परनिंदेचा नीच मार्ग सोडून देतील तर त्यांच्या विद्वतेवर फार उपकार होतील. विद्वत्तेची आणि सत्यशोधनाची प्रदर्शने करतांना इतराची निंदा केल्याशिवाय विद्यादेवी प्रसन्न होत नाहीं सत्याचा शिपला हाती लागत नाहीं असे थोडेच आहे ? पण सुमं जळला तरी पीळ कायमच राहतो. छत्रपतीच्या राजगादीची निंदा करतांकरताच पेशवे निजधामास गेले. सातारकर छत्रपतींना शूद्र संबोधानाने जिव्हा विटाळविणारे पटवर्धन नाना नातू अॅन्ड को चे सगळे भागीदार निमकहरामीचा डिप्लोमा घेऊन परधामास गेले. आता त्याच कंपनीचे आधुनिक वंशज कोल्हापूर सरकारची हाडे चघळण्यांत धन्यता मानीत आहेत कोल्हापूचे महाराज निर्मेह शूद्र असोत नाहींतर अळणी क्षत्रिय असोत, ते आज छत्रपतीच्या क्षत्रिय सिंहासनावर विराजमान असून क्षात्रकर्मातहि त्याचा हात धरणारा मायचा पूत पुण्यास किंवा मुंबईस जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत शेंकडों बोडसांनी तंजावर कोर्टाच्या निकालाची दवंडी घरोघर पिटली तरी त्यांचा कोणीहि क्षत्रिय मराठा हात धरणारा नाही. मात्र तंजावरच्या किंवा विलायतच्या कोर्टानें निकाल देण्याच्या पूर्वी खुद्द चित्पावन जातीतले बरेच लोक उघडउघड शूद्रवत् आचार करूं लागले आहेत. त्याचा मात्र ब्राहाण्याभिमान्यांनी वेळीच बंदोबस्त करावा, इतकी मात्र कळकीची शिफारस करणें आम्हांला भाग आहे.
१९. वर्णव्यवस्थेची वाटाघाट करतांना आणि हिंदुस्थानातील निरनिराळ्या जातींच्या नावांचा इतिहास सांगतांना आमचे मित्र बोडससाहेब पुढे म्हणतात:
अमुक जातीचा इतकें म्हटल्यानें कोणाचे समाधान होत नाहीं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारपैकी कोणत्या तरी एका वर्गात आपला समावेश झाला पाहिजे असे प्रत्येकास वाटतें. अलीकडे इंग्रजी विद्येनें तर ही इच्छा अधिकच प्रबळ होत चाललेली दिसते. सोमवंशी, सूर्यवंशी, चांद्रसेनीय, देवज्ञ, त्वष्टाकासार, विश्वकर्मा वगैरे नवीन नवीन नावें प्रचारांत येत आहेत त्यांतील बीज हेंच नुसते सोनार किंवा कायस्थ म्हणून चालत नाही; तर अमुक विशेषणयुक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हटले पाहिजे. ही महत्वाकांक्षा इंग्रजी शिकलेल्यांत तर अधिकच आढळते. अहाहा, केवढा अचाट ऐतिहासिक शोध, किती दांडगी ही सूक्ष्मविवेचक दृष्टि केवढी अवाढव्य सत्यप्रियता आणि ह्यूमन सायकॉलजीचे केवढे विस्तृत ज्ञानभांडार हें।
वरील उद्गार काढताना आम्हाला असे वाटतें रा. बोडस साहेबांच्या विचार-दुर्बिणीपुढे त्यांच्या चित्पावन जातीचा गतेतिहास मूर्तिमंत उभा ठाकलेला असावा आणि ब्राहाणपणा प्राप्त करून घेण्यासाठी व चतुर्वणीच्या एक उच्चवर्गात आपली कायमची वर्णी लावून टाकण्यासाठी चित्पावनांनी ज्या हालचाली उर्फ उलाढाली केल्या त्याचेंच प्रतिबिंब वरील उद्गारांत उमटविण्याची त्यांना प्रेरणा झाली असावी, चांद्रसेनीय किंवा दैवज्ञ इ. नावे नवीन आहेत की प्राचीन आहेत हे ठरवायला रा. बोडसांची काही जरूर नाही; परंतु चित्पावन संज्ञेचा कर्मसंन्यास करून कोकणस्थ या स्थलवाचक अभिधानाचा बाप्तिस्मा १९ व्या शतकांत चित्पावनानी को घेतला (आता तर हि मंडळी तेही नामाभिधान सोडून ‘दक्षिणी ब्राम्हण’ म्हणवू लागले आहेत. काही दिवसांनी उत्तरी, पश्चिमी, ईशान्यी ब्राम्हणांचेही अवतार हिंदुस्थानावर स्वाऱ्या करणारसे दिसते.)
आणि भरतखंडांतील दशविध ब्राह्मणांच्या यादीत या जातीचें नांव कोठे व कोणत्या नंबराबर आहे, हें रा. बोडसांनी दाखविण्याचा यत्न केल्यास तो कांहीतरी लाध्य होईल. चित्पावनानी पेशवे नोकरशाहीच्या दमघाटीवर स्वतःच्या जातीस कोकणस्थ या स्थलवाचक शब्दापुढे ब्राह्मण हा नवीन शब्द जोडून संबोधण्याचा उपक्रम सुरू करताच बिचाऱ्या प्राचीन महाराष्ट्र ब्राह्मणांनाहि देवस्थ संज्ञेच्या बुरख्याची ओढणी घ्यावी लागली. चित्पावनांनी ब्राह्मण बनण्याकरिता केलेल्या घालमेलींचा इतिहास फार विस्तृत आहे. त्याची थोडीफार कल्पना परिशिष्टांत दिलेल्या त्यांच्याविषयींच्या अनेक उताऱ्यांवरून येईल. चांद्रसेनीयादि इतर जातीच्या नावांच्या अर्वाचीनत्वावर टीका करण्यापेक्षां रा.बोडसांसारखे इतिहासपंडित स्वज्ञातीच्या इतिहासाचें संशोधन करतील तर मी हांसे लोकाला आणि शेंबूड माझ्याच नाकाला असा आत्मपरिचय त्यांना आल्याशिवाय खास राहणार नाही.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हें ज्या जातींचें नांव आहे त्या जातीचा इतिहास या नांवांत आहे. हें नांव " कोंकणस्थ " संज्ञेप्रमाणे सुटसुटीत नाहीं, मालगाडीप्रमाणे लांबलचक आहे त्याला इलाज नाहीं. अगदी प्राचीन काळच्या दस्तऐवजी पुराव्यांच्या भानगडीत न पडता प्रस्तुत पुस्तकांतील चां.का.प्रभूवरील दुसऱ्या ग्रामण्याचा इतिहास पाहिला तरी त्यांतील दस्तऐवजांतसुद्धा या लांबलचक नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळून येईल. सदर्हू ग्रामण्य १५ व्या शतकांतलें आहे. या एकाच मुद्यावरून असे सिद्ध होतें कीं रा. बोडसांच्या कल्पनेप्रमाणे हे नाव इंग्रजी झाल्यावर कोणा मतलबी शहाण्याच्या टाळक्यांतून बाहेर पडलेलें नाहीं किंवा चित्पावनांप्रमाणे चां. का. प्रभूंनी कांही सामाजिक अगर राजकीय स्वार्थासाठी नवीन लावून घेतलेले नाही. वर्णाश्रमव्यवस्थेची पाळेमुळे हुडकिणारांनी व इतर ज्ञातीच्या निंदेंवर स्वज्ञातीचे स्तोम माजविणारांनी ज्या परजातींच्या इतिहासावर त्यांना टीका करावयाची असते तो इतिहास मुळीच अभ्यासून न पहाता, मनःपूतं समाचरेत् मल्लीनाथी करणे म्हणजे आपल्या विद्वत्तेला अधम ठरविण्यासारखे आहे.
बोडसंपथी अष्टपैलू विद्वान एखाद्या वादग्रस्त विषयावर लेखनपाटव गाजविण्यापूर्वी त्याचा सांगोपांग अभ्यास करण्याची तसदी घेतील, तर त्यांच्या विद्वत्तेस न शोभणारे उपरिनिर्दिष्ट वादविषयक मुद्दे लिहिण्यास त्यांची शुद्ध मनोदेवता कधीच प्रेरणा करणार नाही. चा. का. प्रभूंचा इतिहास व तद्विषयक शेकडों पौर्वात्य व पाश्चिमात्य इतिहास-शास्त्र्यांनी ठरविलेले त्यांच्या संज्ञेबद्दल एथ्नोग्राफिकल सिद्धांत रा. बोडसांनी मुद्दाम अवलोकन करून आपल्या विचारसरणीत सुधारणा करावी अशी विनंति आहे.
सरतेशेवटी रा. बोडसवर्गीय विद्वज्जनांस एक अत्यंत कळकळीची प्रार्थना आहे. त्यांच्या बहुश्रुतपणाचे, विद्याव्यासंगाचे आणि विद्वत्तेचे आम्हाला कौतुक वाटतें ते आमचे देशबंधू म्हणून आम्हाला मोठा अभिमान वाटतो. आज चित्पावन समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत सर्व हिंदु समाजाच्या अग्रेसर भागी उभा आहे हे आम्ही प्रांजळपणे कबूल करतो. परंतु या मंडळीनी वारंवार जुन्या वादाची थडगी उकरून सिद्ध झालेल्या सिद्धांताची हाडकें पुनःपुन्हा धूत बसण्याचा अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा आपल्या विद्वत्तेचा सत्करणी उपयोग केला तर या महाराष्ट्रावर फारफार उपकार होतील.
ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर किंवा वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद आजपर्यंत खोडसाळ ब्राह्मणानींच- विशेषतः चित्पावनांनीच उपस्थित केल्याची साक्ष इतिहास देत आहे. याउप्पर हा राष्ट्रविघातक व आत्मविनाशी धंदा ते सोडून देतील तर फार बरे! ब्राह्मणेतर किंवा चित्पावनेतर जातींची कुचाळी केल्याशिवाय नॅशनॅलिझमचा यज्ञ जर विधिपूर्वक झाल्यासारखे वाटत नसेल, तर मग खुशाल चालू द्या तुमचा परनिंदेचा शिमगा, परस्पर वैराच्या होळीत महाराष्ट्राचे सरपण पडतच रहावे अशी जर परशुरामाची इच्छाच असेल. तर त्याला तुम्हीं तरी काय करणार? परंतु राष्ट्रैक्याची पुराणें झोडणाऱ्या तुमच्यासारख्या पुराणिकांचा मेंदू अझूनहि मत्सराच्या डबल न्युमोनियांतून मोकळा होईल, अशी आशा प्रदर्शित करून या वादाला आम्ही येथेंच मुक्ती देतो.
२०. निरनिराळ्या जातींत फूट फाडून राष्ट्रीय स्वातंत्र्याचा नाश ब्राह्मणांनीच कसा केला, या बाबतीतले कै. प्रो. भागवत काही स्पष्टोद्गार अलीकडच्या मेंदु भडकलेल्या ब्राह्मणांना शुद्धीवर आणण्यास उपयोगी पडतील म्हणून खाली देत आहेत "ब्राम्हणांचे जातिभेद संबंध स्तोम वाढलें, खरोखर पेशवाईपासून, रस्त्यावर थुंकल्यास रस्ता बाटेल, म्हणून गळ्यांत कण्यासाठी एक मडकें बांधून अतिशूद्रांनी शहरांतून फिरा हा हुकूम पाहिल्याने फिरविला पेशव्यांनी. धर्मगुरूंच्या हाती निरंकुश धर्मसत्ता पहिल्यानें असतेंच तींत आणखी निरंकुश राजसत्ता मिळाली म्हणजे इतर लोकांस ते अगदी दुःसह होतात. जसजशी वर्षे लोटतील, तसतसा तिदान आमच्या या प्रियदेशांत ब्राह्मण व क्षत्रिय या दोहोंमधील विरोध ब्राम्हणांनी अधिक शहाणपणा न दाखविल्यास ढेंगांनी वाढत जाण्याचा संभव दिसतो.
कोल्हापूरकरांचं नुकसान सर्वस्वी केलेलें पेशव्यांनी पटवर्धनांस दक्षिण महाराष्ट्रात जहागिरी दिल्या त्याचे मुख्य कारण शिवाजीच्या वंशास डोके वर उचलू न द्यायचे हें; जी सातारची गादी क्षत्रियांनी स्थापिली, तिचा सर्व अधिकार हळूहळू बळकावून छत्रपतीस बाहुलें करून ठेविल पेशव्यांनीच; पुढे खडकीच्या लढाईत महाराष्ट्राचे व त्याच्याबरोबर मऱ्हाठ्यांचे स्वातंत्र्य सर्वस्वी घालविणारे पेशवेच; परदेशीयांस आंत पाहिल्याने आणणारे पेशवेच; शिंदे व होळकर यांच्या शहाणपणाच्या मसलतीचा तिरस्कार करून पाणिपतास मऱ्हाठ्यांचा सत्यानास करून टाकला पेशव्यांनीच, ज्या पेशव्याने शाहूच्या बायकोस गांजिलें व साक्षात् शिवाजीची सून ताराबाई हिचा पदोपदी अपमान केला, त्याच्याच चुलत बंधूनें; बडोदेकर व नागपूरकर हे दोघे खुद्द शाहू छत्रपतीने वाढविलेले, त्यामुळे पेशव्यांचा व त्यांचा प्रायः विरोधच असे; शिंद्यावर पहिल्यानें पेशव्यांचे उपकार होते, पण नाना फडणिसाने ब्रह्मणाची सत्ता वाढविण्यासाठी व क्षत्रियांची अजिबात मानहानि करून टाकण्यासाठी, शिंद्याबरोबर विरोध माजविला महादजी जर त्यावेळी नसता तर शियाचेंहि सर्वस्व नाना न चुकता; अहल्याबाईस बुडविण्याच्याही + पेशव्यांच्या मसलती चालल्याच होत्या व अखेरीस इंदुरकरास बुडविण्यासाठी पेशव्यांना कावा करून शिंद्यास आपणांकडेस ओढिले पण यशवंतरावाने पुण्याच्या लढाईची मात्रा दिली, तिच्या ठसक्याने पेशव्यांचा दुष्ट वर लागलाच नरम पडला.
जसजसा मऱ्हाठ्यांच्या इतिहासाचा फैलावा होत जाईल, तसतशा या ठळक गोष्टी महाराष्ट्र क्षत्रियांच्या मनांत विशेष वागतील, व त्यामुळे जर ते ब्राह्मणांचा द्वेश अधिक करूं लागले, तर निदान आम्ही तरी त्यांस दोष लाविणार नाहीं, ज्यांचे सर्वस्व आम्ही बुचाटून घेतले किंवा ज्यांस सर्वस्वी बुडविलें किंवा बुडविण्यासाठी यत्न केला, त्यांनी जर आमचा द्वेष करूं नये, तर करावा तरी कोणाचा? आता झाली गोष्ट झाली, हें खरें आहे. पण तशी गोष्ट पुनःन होऊ देण्याविषयी आम्हां ब्राम्हणांस फार जपले पाहिजे व शाहूस अभिषेक होईपर्यंत मऱ्हाठ्यांनी केलेल्या महापराक्रमांवर झांकण टांकून, शुद्ध जात्यभिमानाने पेशव्यांस यश आलेल्या क्षुद्र लडायांच्या फुशारक्या मारण्याचें सोडून दिलें पाहिजे. ब्राह्मणांविषयी इतर जातींची पूज्यबुद्धि असते, ती जर आम्हा धर्मगुरूमध्ये ते अलिकडेस यत्किचित् काही उणीव पहातील तर समूळ धुऊन जाईल व आमच्या पाठीमागच्या उखाळ्या पाखाळ्या निघून, आम्हांस तोंड दाखविण्यास देखील जागा रहाणार नाहीं, जितकें आम्हांस जपून वागले पाहिजे तितकें जपून इतरांनी वागण्याची गरज नाहीं. कारण बोलून चालून ते धर्मगुरु नव्हत. आजपर्यंत आम्हीं धर्मगुरूंनीच जपून वागून जर सदुदाहरण घालून दिलें नाहीं, तर ज्यांचे आम्ही धर्मगुरू त्यांनी कित्ता तरी कोणता वळवावा ?
पेशव्यांनी जे उदाहरण घालून दिलें तें तसें घालून देण्यापेक्षा जर मुळीच घालून दिलें नसतें, तर बरें झालें असतें. आता तरी ब्राह्मण चांगले उदाहरण घालून देतील, अशी आशा बाळगतो. पण अलीकडेस ज्या सर्व गोष्टी घडून आल्या व घडून येत आहेत, त्यावरून विचार करिता ब्राह्मणांचा आपण स्वतः निराळे “लोक” किंवा “जन” समजण्याचा विचार दिसतो. अशा रीतीने ब्राम्हणांनी भेद माजविणें शहाणपणाचे काम नव्हे असे म्हटल्याशिवाय आमच्याने रहावत नाहीं.
२०. लोकशिक्षणनामक मासिक पुस्तकाच्या पहिल्या वर्षांच्या १२ व्या अंकांत रा.वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्रांतील बुद्धिमान् प्रतिभावान् न कर्त्या लोकांची मोजदाद केली असून शके १७३९ ते शके १८३५ (सन १८१७-१९१२) पर्यंतच्या [लोकोत्तर?] पुरुषांची यादी दिली आहे. प्रत्येकाने समाजहित काय केलें आहे ते त्याच्या नांवापुढे दर्शविलें आहे. रा. राजवाड्यांनी प्रस्तुत यादीच्या अग्रस्थांनी चिंतामणराव आप्पा सांगलीकर यांचे नांव दाखल केलें आहे. आपल्या यादीत अग्रमान दिलेल्या या बुद्धिमान प्रतिमान प्रतिभावान व कर्त्या पुरुषानें समाजहित -काय केलें, याबद्दल आमचे राजवाडे म्हणतात :--बरा संस्थानिक, परभु ग्रामण्य. दिग्विजयीपणा व लोकोत्तरपणा प्राप्त व्हायला येवढे भांडवल पुरेसें असतें, हा एक नवीन शोधच लागला म्हणायचा! मथळ्यावर रा. राजवाडे स्वतःच म्हणतात. -
“विचार सामाजिक आहे तेव्हां कोणत्याही प्रकारें समाजाच्या हिताला ज्यांनी थोडा किंवा फार हातभार लाविला अशाच व्यक्तींचा तेवढा या मोजदादीत समावेश होतो. एखादा माणूस मोठा बुद्धिमान किंवा प्रतिभावान असला, परंतु समाजाच्या उपयोगी तो यत्किंचितही पडला नाही, तर त्याची गणना समाजहितेच्छुंच्या मोजदादीत करितां येत नाही....... तसंच कोणी बुद्धिमान माणूस एखाद्या समाजांत जन्मला व तो समाजाचें अनहित करूं लागला, तर त्याची गणना समाजहितेच्छुंत करितां येत नाही. सबब बुद्धिमान परंतु आत्मसंतुष्ट संन्याशी व समाजहितनाशक माणसें ह्यांना वगळून बाकी जेवढ्या बुद्धिमान, कर्तृत्वमान व प्रतिभाशाली व्यक्ती गेल्या शंभर वर्षांत मराठा (?) समाजांत झाल्या त्यांची याद देण्याचा प्रयत्न करितों.”
चिंतामणराव आप्पा पटवर्धनांनी ‘परभु ग्रामण्य’ यज्ञ करून त्यांत बऱ्याच चां. का. प्रभुंच्या आहुति दिल्या ही गोष्ट इतिहास नाकबूल करीत नाही. इतिहास संशोधन करण्याचें जरी कोणी नाकारले तरीहि आप्पाची ही दिग्विजयी कामगिरी कच्च्या पाऱ्याच्या रसायनाप्रमाणे महाराष्ट्रेतिहासाच्या आंगावर फुटून निघाल्याशिवाय रहाणार नाहीं, इतकी जालीम आहे. श्रीमंत सांगलीकर बुद्धिमान होते, कर्तृत्ववान होते, प्रतिभावान होते. चित्पावन होते व ब्राह्मणहि होते. परंतु या त्यांच्या सर्व भांडवलाचा व्यय सातारकर छत्रपतीच्या गादीची होळी करण्यासारख्या व ‘परभु ग्रामण्या’ सारख्या अधम कार्यात झाल्यामुळे फार वाईट वाटतें. ग्रामण्यांत पुढाकार घेणारास कोणत्याहि वेळी कोणत्याहि विचारी पुरुषानें शहाणपणाचे किंवा दिग्विजयीपणाचें सर्टिफिकीट दिलेलें नाहीं.
परभु ग्रामण्य हीच जर बुद्धिप्रभावाची कर्तृत्वसर्वस्वाची आणि प्रतिभासंपन्नतेची कसोटी मानली, तर बाळाजीपंत नातू दादंभट पेणकर इत्यादि कारस्थानी मंडळींची तरी कोणत्याबाबतीत कमतरता होती? त्यांचीहि गणना या दिग्विजयी महापुरुषांच्या यादीत झाली पाहिजे. ‘परभु ग्रामण्य’ करण्यांत अग्रेसर होणाऱ्या शहाण्यांची आजतागायत नांकठेचीच झालेली आहे व चां. का. प्रभुज्ञातीच्या बाणेदार वर्तनापुढे त्यांच्या बुद्धिप्रभावानें सपशेल हारच खाली आहे. चित्पावनांशिवाय कोणत्याहि इतर समाजानें, सातारच्या छत्रपतीनें, जगद्गुरू शंकराचार्यानें, काशीकर्नाटकांतील अग्रगण्य विद्वान पंडितांनी, कोणीही ग्रामण्यप्रकरणाकडे आजपर्यंत सहानुभूतिपूर्वक पाहिलेले नाही किंवा त्यास उत्तेजनहि दिलेले नाहीं, सारांश, ग्रामण्यांची बंडें उपस्थित करणें हें सज्जनांनी केव्हांहि निंद्यच मानलेले आहे. हें जर खरें, तर चिंतामणरावांना दिग्विजयी महापुरुषांच्या लिष्टांत अग्रभागी ठेवण्यात रा. राजवाडे यांनी काय एवढा मोठा लोकोत्तर दिग्विजय केला ?
बाकी, परभु ग्रामण्य करून किंवा त्या जातीच्या निष्कलंक इतिहासावर कुत्सित शिव्याश्रापांच्या डांबरीचे बुधले ओतून जर चित्पावन महाशयांची इतिकर्तव्यता व लोकोतरता सिद्ध होत असेल तर आजलाहि असल्या महापुरुषांची वाण चित्पावन समाजांत मुळींच पडणार नाहीं. या बाबतीत खुद्द आमच्या राजवाडयांनी पुणे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विद्यमाने ही लोकमान्यता मिळविण्याचा धडा घालून दिलाच आहे, तेव्हा त्यांची परंपरा चालवायला एकापेक्षा एक सवाई दिढी राजवाडे कितीकतरी पैदा होतील ! आधीच भा. इ. सं. मं. चा पाया सत्याच्या काँक्रीट सिमेंटावर उभारलेला आहे, तेव्हा या दिग्विजयी परंपरेचा डोला कधिकाळी कोसळून पडेल असे भाकित करण्याची आवश्यकताच नाहीं.
रा. राजवाड्यांच्या लिस्टामुळे ‘परभु ग्रामण्या’ पासून समाजाचे हित काय झालें, हा एक मोठा विचाराचा प्रश्न उद्भवतो. ब्राह्मण व चां. का. प्रभू यांच्यांत हाडवैर उत्पन्न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक हितात व वैभवात भर पडली काय ? चिंतामणरावांनी नातुप्रभृतींच्या राहाय्याने एका बाजूस ग्रामण्यांचा बाँब पेटवून दुसऱ्या बाजूनें कृष्णकारस्थानें लढवून छत्रपतीच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्या, हेंच तें समाजहित काय? क्षत्रिय मराठयांच्या वेदोक्ताबद्दल आणि ‘शूद्राधम परभूं’च्या अग्निहोत्राबद्दल तीन हजार चित्पावनांनी मालकम साहेबांच्या पुढे जाऊन बोंब मारली व कर्नल ओव्हिन्सला साथीदार बनवून भर मध्यरात्री प्रतापसिंहाला एका वस्त्रानिशी राजवाड्यांतून खेंचून काढून त्यांच्या चिटणीसाला व इतर कारभाऱ्यांना बिनचौकशीनें दोनदोन तीनतीन वर्षे तुरुंगांत कुझविलें, हेंच कां तें राजवाड्यांचे समाजहित?
तारीख १६ जुलै सन १८४१ रोजी जनरल रॉबर्टसन यानें इष्ट इंडिया कंपनीच्या प्रोप्रायटर्सध्या बोर्डापुढे जें व्याख्यान दिलें, त्यांत ते म्हणतात :-- (भावार्थ :- यावरून असे दिसून येईल कि राजाचा सर्वस्वी घात करण्याच्या कामांत ब्राम्हणांचे प्रयत्न जरी चालू होते. फार काय पण ‘हा फराज हिंदूच नव्हे’ असें प्रतिपादन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती शेजारचा ब्राम्हण जहागीरदार सांगलीकर चिंतामणराव यानें तर सगळ्या हिंदुस्थानभर एक जाहीरनामा काढून असा पुकारा केला कि हा राजा {प्रतापसिंह} राष्ट्रीय धर्माचा शत्रू आहे.) This shows that the Brahmins had been unceasing in their endeavours to injure the Raja. They had even gone so far as to declare that he was no Hindoo; and Chintamun Row of Sanghli, a neighbouring Brahmin chief, had circulated a manifesto all over Hindostan, saying that he was an enemy to the national faith. समाजहित साधण्याची हीच का ती रीत? ग्रामण्यामुळे चां. का. प्रभू व क्षत्रिय मराठे-नव्हे. सर्व चित्पावनेतर समाज- याची मनें उद्विग्न झाली, त्यांनी राज्यकारभारांतून आंगे काढली आणि यामुळे सर्वच महाराष्ट्रांत जातिभेदाचा व जातिमत्सराचा सांवळागोंधळ उडाला. त्याचेंच नांव समाजहित आहे काय ? जनरल रॉबर्टसन पुढे म्हणतात (“ब्रिटीश सरकारनें मध्यस्थी करावी म्हणून कोल्हाळ करण्याचा ब्राम्हणांचा हा काहीं पहिलाच प्रयत्न नव्हे...या खटल्यांत मी विशेष लक्ष देऊन पाहिले आणि ज्या अर्थी त्या {ब्राम्हणांचा}उद्देश राजाला अपय करणे, निदान त्याला चिडवणे हा असल्यामुळे, त्यांच्या पक्षाला सत्याची कितपत चाड आहे, तें दिसतच आहे”.) "this was not the first time that the Brahmins had made similar attempts to procure the interference of the British Government......I have been thus particular in regard to this case, as it displays how little the parties regarded truth, when the object was to injure or annoy the Raja." काय ही या चित्पावन वीरांची छत्रपतिनिष्ठा ! केवढे हें अचाट राष्ट्रप्रेम ! देशभक्तीचा केवढा महिमा ! सत्याची केवढी प्रीति आणि चिकाटी आणि समाजहिताचा केवढा मोठा वैभवपर्यंत हा ! स्वदेश बांधवांची हाडें फोडण्यासाठी परक्यांना पाट्यावरवंट्यासह आमंत्रण करणारी ही वीररन्ने हिंदमातेच्याच कुसव्यांतलीं काय ? शंका येते. मि. डनलॉप नांवाचे एक गृहस्थ ता. १२ एप्रिल १८३७ च्या आपल्या पत्रात म्हणतात : (“सातारच्या राजाची आणि चिंतामणरावांची मैत्री असेल असें अनेक कारणांवरून मुळीच संभवत नाहीं. तो {चिंतामणराव} मोठा साहसी-नव्हे मी तर म्हणतो पक्का हेकेखोर ब्राम्हण आहे; वेदोक्त कर्म करणाऱ्या प्रभू लोकांना राजाचे पाठबळ असल्यामुळे तर टो राजावर अतिशयच जळफळत असतो. प्रभूंच्या वेदोक्तावर चिंतामणरावाने आकांडतांडव करणारे बरेच लेख लिहिले आहेत.”)
“with regard to Chintamun Row`s friendly intercourse between him and the Sattara Raja, it seems to be highly improbable for several reasons. He is a zealous, I may say, bigoted Brahmin, and feels extreme enmity at the Raja for his encouragement of the Purbhoo caste in the performance of Brahminical caremonies, which he has taken up and written against in the spirit of a polemic.” आद्यछत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचें सिंहासन आपल्या स्वार्थाच्या होळीत जाळून पोळून खाक करणाऱ्या चिंतामणराव नातूप्रभूतीच्या राष्ट्रहितविध्वंसक लीला म्हणजे एका स्वतंत्र इतिहासाला पुरून उरतील इतक्या व्यापक, विस्तृत आणि भयंकर आहेत. या लीलांनी काय समाजहित साधले असेल, तें रा. राजवाड्यांनीं अगर त्यांच्या कोणत्याहि बगलबच्यानें दाखवून सिद्ध करावें, असें आम्ही आव्हान करतों. ग्रामण्यांपासून देशाचे हित काय झाले किंवा त्यांच्या उपद्यापी म्होरक्यांनी काय समाजहित साधले, त्याची भरभक्कम साक्ष सध्याची अवनत देशपरिस्थितीच देत आहे. या घाणेरड्या व मनोवृत्ति क्षुब्ध करणाऱ्या विषयाला अधिक न वाढविणें हेंच चांगले.
२१. महाराष्ट्रांत जातिभेद होता किंवा नव्हता, असल्यास मऱ्हाठेशाहीचा ऱ्हास होण्यांस तो सर्वांशी किंवा निदान अल्पांशी तरी कारणीभूत झाला की नाही, हा एक चर्चेचा प्रश्न ‘मराठे आणि इंग्रज’ पुस्तकानें अलीकडे उत्पन्न केला आहे. ठिकठिकाणचे निरनिराळे विद्वान् आपापल्या मताप्रमाणे ही चर्चा करीत आहेत. खुद्द रा. केळकर यांनीहि हा प्रश्न सोडविण्याचा त्यांच्या पुस्तकांत यत्न केलेला आहे. कै. प्रो. लिमये या निस्पृह इतिहासज्ञाने सुप्रसिद्ध " विविधज्ञानविस्तार" मासिकांतहि दोन उत्कृष्ट लेख लिहिले होते. नुकतेच पुणे येथील वसंतव्याख्यानमालेत प्रो.भानूंनी याच प्रश्नाची चर्चा केली आणि रावबहादुर चिंतामणराव वैद्य यांनीहि चित्रमयजगत् (मे १९१८ च्या अकांत) हा प्रश्न आपल्या दृष्टीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
रा. केळकरांच्या चर्चेचा विचार केला तर त्यांचा सारा झोक सदरहू प्रश्नाचे उत्तर नकारार्थी ठेवण्याचाच असल्यामुळे शक्य तितक्या सावधगिरीनें, शब्दयोजनाकौशल्याने आणि विधानपटुत्वानें त्यांनी जातिभेदाचा प्रश्न सहज लीलेनें अज्जीबात फेटाळून लावला आहे. त्यांची विधानपद्धति नेहमीच त्रयराशिकी धर्तीची असते; मग त्यांना सम किंवा व्यस्त प्रमाणाचे भानच रहात नाहीं. प्रस्तुत प्रकरणी चर्चा करतांना ‘जातीभेद’ शब्दाच्या उच्चाराबरोबर निरनिराळ्या अर्थाच्या जेवढ्या म्हणून छाया उत्पन्न होतात, तेवढ्यांचा पुरापूर आधार घेऊन रा. नरसोपंतांनी आपली विधानें वकीली धाटणीच्या भडक रंगांत रंगवून सोडली आहेत. सरतेशेवटीं आस्तिपक्ष किंवा नास्तिपक्ष यांपैकी एकाचाहि स्पष्ट आधार न धरितां, जातिभेद असलाच तर राज्यविनाशक इतर कारणांशी तुलना करता रुपयाला पै कवडी इतकाच असेल, अशा अर्थाचा त्रिशंकूवजा अभिप्राय देऊन त्यांनी या वादग्रस्त प्रश्नाची रजा घेतली आहे. रावबहादुर चिंतामणराव वैद्यांनी ‘मराठेशाही कशाने बुडाली?’ या प्रश्नाचे निदान ठरवितांना बऱ्याच वरच्या दर्जाची विचारसरणी अंगिकारिल्यामुळे त्यांच्याकडूनहि या जातिभेदाच्या प्रश्नाची व्हावी तशी मीमांसा झाली नाहीं, आणि त्यांचा लेख बाह्यात्कारी जरी केळकरांच्या विधानाचे खंडण करणारा आहे असा दिसतो, तरी सत्यशोधनाच्या गांवी जातांना त्यांच्याहि विचारसरणीला अखेर केळकरांच्याच चकारीला येऊन भिडावें लागलें.
प्रो. भानूंनीं मात्र स्पष्ट नकारार्थी ‘जातिभेदामुळेच मराठी राज्य नष्ट झालें असें म्हणणे चुकीचें आहे.’ असा रोखठोक अभिप्राय दिला. वरील विद्वान मंडळींच्या या प्रामाणिक मतांबद्दल संशय व्यक्त करणे महापाप आहे. परंतु त्यांनी या प्रश्नाचा एकतर करावा तितका विचार केलेला नसावा अगर तितकी साधनसामुग्री तरी त्यांना उपलब्ध झालेली नसावी, असे आमचे प्रामाणिक मत आहे. ज्या विद्वानांच्या अभिप्रायांची आज बहुजनसमाजांत मान्यता आहे, त्यांनीच उडवाउडवीची विधाने करणें बरें नव्हे, असे आम्हाला वाटतें. कै. न्या. रानडे हे वरील मंडळीपेक्षा कांही कमी विद्वान संशोधक नव्हते त्यांनी पेशव्यांच्या रोजनाम्याबद्दल लिहिलेल्या निबंधात असे स्पष्ट नमूद केलें आहे की “जातिमत्सराचा इतका बडेजाव माजला की जूट होणें अशक्य झालें व राष्ट्रहिताच्या ऐवजी आपलीच तुंबडी भरण्याकडे प्रत्येक प्रबळ सरदारांचं लक्ष गुंतलें. यावेळी ब्राह्मणमंडळी म्हणजे अगदी तर झालेली. खरे राज्यकर्ते आपण, आपणांस इतर जातींपेक्षां विशिष्ट हक्क व सवलती असावयास पाहिजेत असे ते समजत.” रा. व. वैद्यांच्या मताप्रमाणे यात ‘उच्च राजकीय कल्पनांचा अभाव’ कदाचित् असूं शकेल, परंतु जातिमत्सर मुळींच नव्हता हें विधान मात्र येथे सपशेल खोटे ठरत आहे. रा. ब. म्हणतात " मराठीराज्याच्या नाशास जातिभेद (जातिमत्सर?) कारणीभूत झाला नाहीं व राष्ट्रहितसंवर्धनाचे कामी जातिभेद आड येऊ शकत नाही. " ‘नाहीं’ च म्हटल्यावर कोण काय करणार? चित्पावन नोकरशाहीने रुजविलेला जातिमत्सराचा कालकूटवृक्ष राष्ट्रहितसंवर्धनाच्या बाबतीत कसा मध्येच आडवा पडला है इतिहास स्पष्टच सांगत आहे. अहो इतिहासच कशाला? पेशवाईतल्या जातिभेदाचा अमानुष छळ अझूनहि चित्पावनेतर महाराष्ट्रीयांच्या हृदयांत तिडका आणीत आहे, हा परिणाम कशाचा? राजमदाच्या धुंदीत किंवा धर्माच्या पांघरुणाखाली इतर महाराष्ट्रीय समाजांचा छळ करणारे ते चित्पावनहि गेले आणि तो छळ सोसणारेहि पंचतत्वांशी समरस होऊन नामशेष झाले, तरीसुद्धां अझूनहि चित्पावनेतर समाजांस त्या छळांच्या कळा याव्यात, हें विलक्षण नाहीं काय ? सध्यांहि जातिमत्सराच्या कळा अनुभविणारे जर विद्यमान आहेत, इंग्रजांच्या समतोल व समरुप सवाई सोट्या राजपद्धतीच्या अमदानीत त्या कळांत वारंवार अधिकाधिक भर घालणारे बृहस्पति जर खुद्द चित्पावनांत आज आपला जातिभेदाचा धडा गिरवीत आहेत, तर स्वायत्त चित्पावनी पेशवाईच्या काळात जातिभेदच नव्हता, या उडवाउडवीच्या पोटांत काय स्वार्थ असेल तो असो.
शिवाजीच्या पदरी ७०० पठाण होते, पानपतच्या मोहिमेंत इब्राहिमखान गारद्यानें शिकस्त केली. पेशव्यांच्या फौजेंत महार होते, सखाराम हरी गुप्ते-कायस्थ प्रभू - यानें चित्पावन राघोबासाठी आत्मयज्ञ केला, असल्या उदाहरणांनी जातिभेदाचा प्रश्न सुटणें शक्य नाहीं. याच त्रयराशिकी पद्धतीने जर विचार केला तर सध्या निरनिराळ्या सर्व जातींची मंडळी भेदभाव विसरून इराण्याच्या एकाच हाटेलांत चहा बिस्कुट झोडीत असतांना इंग्रजी अमदानीत जातिभेद मुळींच अस्तित्वात नसला पाहिजे आणि असलाच तर तो सांप्रतच्या होमरूल चळवळीला मुळींच बाधक होत नसला पाहिजे ! पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही. बहुतेक सर्व कामापुरतेच मामा असतात. चहा ढोसतांना, टिफीनी करतांना फंडांची शक्कल काढतांना, व्याख्याने देतांना, राष्ट्रीय पुराणें झोडतांना मात्र किंचित जातिभेदाचा ताप उतरलासा दिसतो; परंतु चहाचा पेला पालथा पडला, फंडाचा हंडा भरला की तापाची डिग्री वाढू लागते. फार दूर कशाला ? वर्तमानपत्रे पहा. राष्ट्रीयत्वाचा मोठा टेंभा मिरविणारी आणि विश्वबंधुत्वाच्या टिमक्या पिटणारी कित्येक पत्रे या जातिभेदाच्या अंमलाने तर्र झाली की कसे पोरकट आणि क्षुद्र विचार बरळू लागतात, हें आम्हीच सांगितलें पाहिजे असे नाही. नि:पक्षपणाने विचार केला तर सध्यांहि जातिमत्सर बराच आहे. अर्थात् त्याची उत्पत्ति पूर्वीच केव्हां तरी झालेली असली पाहिजे खास, इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर या मत्सराची प्राणप्रतिष्ठा झाली असें मानण्यास बिलकूल आधार नाहीं /शिवाजी महाराजांच्या वेळीं जातिमत्सर जवळजवळ नव्हताच; (“महाराष्ट्राचा अभिमान जर जात्याभिमानांत नाहींसा होऊन जाता, तर {रामचंद्रपंत, प्रल्हादपंत इ.}ब्राम्हण मंडळींच्या मुरार बाजी, बाजी प्रभू, खंडो बल्लाळ यांच्यासारख्या कायस्थ मंडळीच्या हातून जी श्लाघनीय व स्मरणीय कृत्ये घडून आलीं, तीं नि:संशय घडून आली नसती.” कै.भागवत. उद्गार पृ.१८८.) तेव्हां जातिभेद म्हणजे जातिमत्सर-याचा उत्पत्तिकाळ कोठेतरी मध्यंतरीच असला पाहिजे, हें निर्विवाद होय. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास आतां प्रसिद्ध होत आहे.
पेशवाई काळांतील राष्ट्रविनाशक जातिमत्सराच्या इतिहासाचें हें साहित्य रा. केळकरादि विद्वानांना उपलब्ध झाले नसेल; झाले असल्यास, त्यावर नजर टाकायला त्याना फुरसद झाली नसेल किंवा शतसांवत्सरिक श्राद्धाच्या धामधुमीत ते त्यांना हस्तगतहि होणे शक्य नसेल. परंतु आता जी माहिती प्रसिद्ध होत आहे त्यावरून कोणालाहि स्पष्ट स्पष्ट दिसून येईल की मराठेशाही बुडविण्याच्या कामी जातिमत्सराचा परिणाम रा.केळकर म्हणतात त्याप्रमाणे पै कवडीचा नसून, त्याची व्याप्ति खचित कांहीतरी अधिक असली पाहिजे. ग्रामण्यांच्या बंडाचा हेतू, त्याचा धिंगाणा आणि चित्पावनेतरांचा पाडाव करण्यासाठी चित्पावनांकडून वेळोवेळी झालेले अत्याचार पाहिले की जातिमत्सराच्या इतक्या असंख्य कवड्या जमा होतील की जातिभेद नव्हता जातिभेद नव्हता म्हणून नाकानें कांदे सोलणारांच्या आंगावर त्या कपड्यांची झूल दुर्गादेवीच्या भुत्याप्रमाणे खुशाल घालता येणें शक्य आहे. ज्या विद्वानांनी ऐतिहासिक सत्याचा अभिमान धरून पूर्वी घडलेल्या पातकांची जनतेला आठवण करून देऊन त्या पातकांची पुनरावृत्ति न होऊ देण्याबद्दल खटपट करायची, तेच विद्वान् जर फाजील स्वाभिमानाच्या भरीं पडून वाईट गोष्टींबद्दल कानांवर हात ठेऊ लागतील, तर त्यांच्या विद्वत्तेचा दुरुपयोग होत आहे. असे कष्टाने म्हणणे अनिवार्यच होऊन बसेल.
२२. ग्रामण्यांच्या इतिहासानें महाराष्ट्रातील पेशवे नोकरशाहीच्या वेळच्या जातिमत्सराचें जे भेसूर स्वरूप आता उघडकीस येत आहे, त्याचा राष्ट्राच्या स्वातंत्र्यनाशावर केवढा परिणाम झाला असेल हे वाचकांनीच अजमावून पहाण्याची कृपा करावी. या जातिमत्सरानें शिवाजीमहाराजांनी रक्ताचे पाणी करून स्थापलेली स्वराज्याची राजगादी धुळीस मिळवली. छत्रपतीच्या अभिमानी एकनिष्ठ समाजांचा तेजोभंग याच जातिमत्सराने केला. नवीन नवीन सरदारांची वर्णी लाऊन छत्रपतिपक्षाच्या जुन्या पिढीजाद सरदारांच्या तलवारींना याच जातिमत्सराने अक्षयीचा गंज चढवून त्या नामशेष केल्या. `आम्ही पेशव्यांचे सेवक, सातारकरांना कोण ओळखतो?’ अशा अर्थाचे निमकहरामपणाचे उद्गार नाना फडणीसाच्या तोंडून वदविणारा हाच जातिमत्सर, घरचे टाकून दारच्यांच्या गळयांत मिठ्या मारण्याची प्रवृत्ति याच जातिमत्सरानें उत्पन्न केली. जातिमत्सराने ग्रस्त होऊन पेशव्यांनी एक ब्राह्मणजातीच्या हातांत सर्व सत्तेची किल्ली ठेवण्याविषयी भगिरथ यत्न केले. म्हणून मऱ्हाठ्यांचा व त्यांच्या प्रियदेशाचा घात झाला.` महाराष्ट्रांत निमकहरामी व लुटारूपणाचा धडा याच जातिमत्सरानें घालून दिला. या लुटारूपणाचे आद्यप्रवर्तक हिंदु म्हणविणारे पहिले रावबाजी यानी लुटीच्या निमित्तानें हिंदुस्थानांत हिंदु यात्रेकऱ्यांचा अमानुष छळ केल्याचे महशूरच आहे. परशुरामभाऊंचा जवळचा नातलग कोन्हेर त्रिंबक पटवर्धन यांनी करवीर शंकराचार्यांचा मठ जाळूनपोळून फस्त केला व शंकराचार्याच्या आत्महत्येचे पुण्य जोडले, त्याच्या मुळाशी करवीरकर भोसल्याबद्दलचा जातिमत्सरच होता. याच जातिमत्सरानें चिंतामणराव पटवर्धनसारख्या तलख कर्तबगारीच्या सरदाराची सारी मर्दुमकी अधम कार्यात खर्ची पडली. याच जातिमत्सराला पेशव्याचा राजाश्रय मिळाल्यामुळे त्याचे पर्यवसान अखेर नृशंसपणा व कृतघ्नपणा यांत होऊन, हरीपंत भावे, बाळाजीपंत नातू बाळकोबा केळकर, नागो देवराय याच्यासारखी राक्षसी वृत्तीचीं माणसें या हतभागी महाराष्ट्रभूच्या कुसव्यांत पैदा होऊ लागली.
चित्पावनेतर ब्राह्मणजातींचा नूर सपशेल मावळून टाकून त्यांना नामोहरम करून टाकले याच जातिमत्सरानें. अशा या पेशव्यांच्या अमदानीतल्या जातिमत्सराच्या किंवा जातिभेदाच्या घातुक लीला कोठवर वर्णन कराव्या? या जातिभेदाचा मराठेशाहीवर कांहींच परिणाम झाला नाहीं किया जातिभेद मुळीं नव्हताच, असें ज्यांचे असूनहि प्रामाणिक मत असेल, त्यांनी अतः पर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळींच्या नावाने खडे फोडण्याचा धंदा सोडून द्यावा आणि ही चळवळ सांप्रतच्या होमरूल आकांक्षाना विरोध, करणारी आहे. असे प्रतिपादन न करण्याची तरी कृपा करावी.
सध्यांची (यांत सगळेंच ब्राम्हणेतर समाज आहेत असे मुळीच नाही, विशेषतः चां.का.प्रभू तर मुळीच नाहीत. एन ४०२०-३अ) ब्राह्मणेतरांची चळवळ त्याच्या विशिष्ट हक्कांच्या पुनरुज्जीवनार्थ आणि संरक्षणार्थ आहे, असें स्पष्ट दिसतें. पेशवाईत त्याच्या सर्व हक्कांच्या झालेल्या पायमल्लीचा कटु अनुभव त्यांना मूर्तिमंत दिसत असूनसुद्धा त्यांनी सध्यांच्या ब्रिटिश अमदानीत स्वतःच्या हक्कांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला नाही तर तो करावा तरी केव्हा? हा यत्न ते न करतील तरच त्यांचे पूर्वज त्यांना आत्मघातकी म्हणून शाप दिल्याशिवाय खचित राहणार नाहींत.
अस्पृश्यांची चळवळ तर बोलूनचालून निवळ प्राणत्राणपरायणार्थच आहे. वर वर्णन केलेली पेशवाई अंमलातील जातिमत्सराची वावटळ राष्ट्र हितसंवर्धक कार्यात आड आली नाहीं, असे कंठरवानें सांगणारांना ह्या सध्यांच्या चळवळीं राष्ट्रहितविघातक आहेत असे म्हणण्याचा बिलकूल अधिकार नाही पूर्वीच्या जातिमत्सराची तीव्रता सांप्रतच्या ब्राह्मणेतरांच्या चळवळीत खास नाहीं; शिवाय गंध लावू नका, देवपूजा करूं नका, धोतरे नेसू नका, श्वास सोडू नका, उच्छ्वास घेऊ नका. ब्राह्मणांच्या रस्त्यावर थुंकू नका इत्यादि हलकट छळ करण्याची सध्यांच्या ब्रिटिश अमदानीत ब्राह्मण्याचा सुका किंवा ओला टेंभा मिरविणारांची छाती नाहींच नाहीं. असे जर आहे तर आपापल्या विवक्षित समाजाच्या हितरक्षणार्थ ब्राह्मणेतरांनी चालविलेल्या कायदेशीर चळवळी राष्ट्रहितविनाशक कशा ठरतात हैं कोणी बृहस्पति समजाऊन सांगेल काय?
२३. राष्ट्र जागृत झाले की त्यांतील प्रत्येक समाजाच्या घटकावयवांत चळवळ सुरू होते; किंबहुना असेच खरे आहे की चळवळींच्या प्रमाणावरूनच राष्ट्रीय जागृतीचे प्रमाण ठरलें जातें. अर्थात् शहाण्या ब्राह्मणांनींच काय ती चळवळ करावी, त्याचीच चळवळ काय ती खरी " राष्ट्रीय " आणि इतरांनी मात्र आढ्याला तंगड्या लावून ब्राह्मण करतील ती पूर्वदिशा खुशाल पहात बसावी, असें म्हणणे केवळ अन्यायाचेंच नव्हे तर मूर्खपणाचे होईल. ब्राह्मणेतर ब्राह्मणांच्या चळवळींपासून अलिप्त रहातात आणि ब्राह्मणांच्या राष्ट्रीय " तंबोऱ्याच्या तारांशी आपला स्वर एकजीव करीत नाहीत हे असे का होते याचे कारण ब्राह्मणांनीच वास्तवीक शोधून पाहिलें पाहिजे. ब्राह्मणेतरांच्या सर्व बऱ्यावाईट चळवळींच्या नांवानें खडे फोडण्यापेक्षा, आज ब्राह्मणेतर ब्राह्मणांच्या खांद्याशी खांदा भिडवून उभे रहाण्यास का नाखूष आहेत, याचे मूळ राष्ट्रीयत्वाची दांभिक पुराणें झोडणारे पुराणिक नीट शोधून काढून आपल्या वर्तनांत सुधारणा करतील तर ब्राह्मणवर्णाबद्दल अझूनहि पूज्यबुद्धी बाळगिणारे ब्राह्मणेतर त्यांच्याशीं सहकारिता करण्यासाठी खात्रीने आपला हात पुढे करतील इतकंच नव्हे, तर "ब्राह्मणांस जर धर्मगुरुत्व आपले रहावें अशी खरोखरी इच्छा असली तर महाराष्ट्रांतील क्षत्रियांची निंदा करण्याचे त्यांनी पहिल्यानें सोडून द्यावे. " असे कै. प्रो. भागवत यांनी सन १८८७ मध्ये जे अत्यंत कळवळ्यानें उद्गार काढले, त्यांचे मर्म अझूनहि त्याना नीट पटेल असा भरंवसा आहे. पंढरीचा विठोबा श्रीविष्णूचा अवतार, पण तो चोखामेळ्यासारख्या अतिशूद्राच्या घरी जेवला ना? अनंत भट्टासारख्या उच्चवर्णीय महाराष्ट्र ब्राह्मणाने या अतिशूद्र चोखामेळ्यांचे अभंगलेखकाचे काम केले ना? अहो, ज्या महाराष्ट्रीय समाजांनी नब्राह्मण व यावनी साधूसंतांच्या पायांवर आपली मस्तकें मोठया प्रेमानें, उल्हासानें व भक्तीनें झिजीविण्यांत जीवितसार्थक मानलें, ते समाज तुम्हां ब्राह्मणांचा आदर करायला केव्हांहि मागेंपुढें पहाणार नाहीत, पण हे केव्हा?
जेव्हा आपल्या सद्वर्तनाने तुम्ही ब्राह्मण आहांत हें त्यांना प्रत्यक्ष पटवाल तेव्हां
न कुलेन न जात्या वा क्रियाभिर्ब्राह्मणो भवेत् । चाण्डालोपि हि व्रतस्था ब्राह्मणः स युधिष्ठिर ।
कोणीहि कुळाने किंवा जातीनें ब्राह्मण बनत नसतो, सदाचारानेच मनुष्य ब्राह्मण बनतो. चाण्डालाचे आचरण जर उत्तम असेल तर त्याला ब्राह्मण म्हणावें-- तोच खरा ब्राह्मण; असें वैशंपायनानें युधिष्ठिरास स्पष्ट सांगितले आहे. आडनांवाचे ब्राह्मण हे काही खरे ब्राह्मणच नव्हत. सदाचाराच्या माहात्म्यापुढे उत्पत्तीचा नीचपणा किंवा संकरजत्वाचा प्रसिद्धपणा कोणीहि विचारांत घेणार नाही. आमच्या चित्पावन देशबंधूंच्या उत्पत्तीचा इतिहास कसाहि असो, आम्हाला त्याच्याशी काहीएक कर्तव्य नाहीं. ब्राह्मण्यत्वाची सनद त्यांनी पेशव्यांच्या अमदानीत पटकविलेली असो, नाहींतर नोहाच्या जलप्रलयापूर्वी मिळविलेली असो, त्याचाहि वाद आम्ही घालू इच्छित नाही. फक्त स्वतःच्या ब्राह्मण्याला साजेशोनेसें कोणते शतकृत्य या समाजानें आजपर्यंत केलें आहे, ते कोणी ऐतिहासिक पुराव्यानिशी दाखवून द्यावें. ब्राह्मण उपाधीमुळे धर्मगुरुत्वाचा मान स्वतःकडे हे चित्पावन ओढून घेत असतात; ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, इतकी सतीच्या वाणाची व्याख्या जरी त्याना लागू करण्याचे सोडून दिलें, तरीसुद्धा धर्मगुरुला उचित असा मनाचा उदारपणा, वृत्तीची समता, तपश्चर्येचा सात्विकपणा यापैकी कोणता गुण कोणत्या चित्पावनाने जगाच्या नजरेस कधि पाडला आहे ? ग्रामण्यांची बंडे करून इतर समाजांचा छळ करणें हें ब्राह्मण्यांचे लक्षण काय ? स्वतःच्या मुठभर जातीला ब्राह्मण्याचा लटका मुलामा देताना इतर ब्राह्मण समाजाचाहि न भूतो न भविष्यति छळ करून त्याना पार रसातळाला नेऊन चिणणें हें ब्राह्मण्य कोणत्या वेदांत वर्णिलेले आहे? स्वतःच्या भाडोत्री ब्राह्मण्याची कायमची थप्पी लावण्यासाठी राजकीय सत्तेच्या जोरावर हाणमार, जाळपोळ, धरपकड इत्यादि राक्षसी वर्तनाने साऱ्या जनतेला त्राहि भगवन् करून सोडणें हेंच ब्राह्मण्याचे लक्षण असे कोणत्या स्मृतीत सांगितलें आहे? चित्पावन समाजाचा इतिहास व पेशवे नोकरशाहीचा इतिहास हीं एकाच वस्तूची दोन आंगें होत. हा इतिहास कसाहि उलटसुलट करून वाचला तरी चित्पावनांनी आपल्या ब्राह्मण्याच्या समर्थनार्थ आजपर्यंत एकहि सर्वमान्य सदाचारसंपन्न शतकृत्य केल्याचें आढळून येत नाही, असे फार दिलगिरीने म्हणावे लागते. नुसता ग्रामण्यांचाच इतिहास पाहिला तरी त्यातसुद्धा चित्पावन जातींतील विद्वान व पढिक शास्त्री पंडितांनी शूद्रातिशूद्र चाण्डाल किंवा बिलंदाज ठगांनाही शोभणार नाहीत अशीच नृशंस कृत्ये केल्याची साक्ष तो इतिहास देत आहे.
सध्या निवृत्तमांसतेची शेखी मिरविणारे अनेक चित्पावन विद्वान वेळीअवेळी सवड सांपडतांच चित्पावनेतरांची मनमुराद निंदा करून त्याची हाडे चघळण्यात ब्राह्मण्यत्वाचा कळस झाला असे मानीत आहेत. धाकदपटशाने किंवा बळजबरीने ब्राह्मणपणा मिळविल्याचे किंवा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उदाहरण भारतीय वर्णाश्रमधर्माच्या प्रचंड इतिहासात फक्त चित्पावनांचेच होय याच्या इतिहासांत ब्रह्मदेवानेच एक मोठी घोडचूक केली ती हीच की त्यांच्यावर वाढलेले मागासलेपणाचे कवच आस्ते आस्ते फोडून उन्नतीच्या मार्गांत त्यांना क्रमशः न आणतो, त्यांच्यावर एकदम आधिभौतिक वैभवाची अवाचित खैरात करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की आधिभौतिक वैभवाने त्याचे डोळे उरफाटून जाऊन अध्यात्मिक उन्नतीची त्याना पर्वा राहिली नाही. अर्थात् चित्पावनात आजपर्यंत कोणीहि संत निर्माण झाला नाही, नाव घेण्यासारखा राष्ट्रकवी जन्माला आला नाही आणि साऱ्या हिन्दुसमाजाच्या जगदुरूच्या पीठावर आजपर्यंत एकहि चित्पावन विराजमान झाला नाही.
अध्यात्मिक बाजू जर आधिभौतिक वैभवाच्या तोडीनेच परिणत झालेली असती तर सत्तामदाच्या धुंदीत ग्रामण्यासारखे बोल्शेविझमचे प्रकार त्यांच्या हातून खास घडले नसते, सर्वांभूती समान दृष्टी ठेवणें, धर्माविषयक आचार व विचार स्वतःच्या निष्कलंक व एकनिष्ट वर्तनाने जिवंत राखणे, इतर समाजाची धर्मपिपासा अमृततुल्य उपदेशाने तृप्त करणे आणि स्वतः निरीच्छपणानें वागून धर्माच्या बाबतीत मधुकरकमलपरागन्यायानें सर्वांची अंतः करणे शांत करून त्यांचा आपल्याविषयींचा आदर वृद्धिंगत करणे, ही जी ब्राह्मण्याची स्थूल लक्षणे त्यांनाहि चित्पावन समाज पूर्णपणे पारखा होण्याचे कारण ही आध्यात्मिक दृष्टीची उणीव हेच होय ही उणीव जोपर्यंत भरून निघणार नाही, जोपर्यंत चित्पावनसमाज इतर महाराष्ट्रीय क्षत्रिय ब्राह्मण वैश्यादि समाजांच्या निंदेच्या भांडवलावर आत्मस्तोमाच्या वखारी थाटण्याचा निंद्य उपक्रम सोडणार नाहीं, आणि जोपर्यंत खऱ्या ब्राह्मण्याला काळीमा लावणाऱ्या अहंमन्यतेच्या तोऱ्याला ते कायमची मुक्ती देणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या ब्राह्मण्याबद्दल कोणाचीहि कधीहि खात्री पटणार नाहीं, त्यांच्याशी सहकारिता करायला कोणताही समंजस समाज केव्हांहि सिद्ध होणार नाही आणि जे चित्पावन आज स्वतः स मोठे डुड्ढाचार्य समजून स्वज्ञातीचा एक स्वतंत्र " राष्ट्रीय " संघ बनवू पहात आहेत, ती त्यांची सवत्या सुभ्याची वृत्तीच अखेरीस त्यांना महाराष्ट्रीय चतुर्वर्ण समाजांच्या संघांतून कायमचा चाट देण्यास चुकणार नाहीं, हें त्यांनी पूर्ण लक्षांत ठेवावें, चित्पावनांचा गतेतिहास आणि त्याची सांप्रत सर्व प्रकारच्या व्यवहारांत पदोपदी दृष्टीस पडणारी पुनरावृत्ति पाहून, अस्सल चित्पावनाची मनोवृत्ति तरी कोणकोणत्या तत्वांची असावी, असा सहज विनोदाने आम्ही एकदां आमच्या एका चित्पावन B. Sc. मित्रास विचारिलें, त्यानें चटकन् कागद घेऊन
सत्व 0%
रज 25%
तम 75%
----------------
कंप्लीट चित्पावन 100%
असे लिहून दिले. हा विनोदच झाला. तथापि यांतहि बरेंच तथ्य आहे, असे दिसून येईल या पृथःकरणातली प्रमाणे केव्हां बदलतील ती बदलोत ! सध्या तरी चित्पावन वर्तमानपत्रे, किंवा इंदुप्रकाशासारखी चित्पावनलेली वर्तमानपत्रे, चित्पावन ऐतिहासिक संस्था, चित्पावन लेखक, चित्पावन वक्ते यांच्या चळवळीकडे पाहिलें, तर रजोगुणाच्याहि ठिकाणी लवकरच शून्य येऊन तमोगुण मात्र सबंध शेकडा हबकणार असें वाटतें महाराष्ट्राचे दुर्भाग्य दुसरे काय ?
मागला इतिहास सोडला आणि अगदी चालू काळचा इतिहास जरी पाहिला तरी हेच दिसून येते की चित्पावनांशिवाय महाराष्ट्रांतील इतर कोणत्याहि जाती केव्हांहि एकमेकांचा जातिमत्सर करीत नाहीत. आधुनिक चित्पावन राष्ट्रीयत्वाचा कितीहि डौल आणोत, त्यांची प्राचीन वरपगड्याची वृत्ति जागृत झाली की तेथे हटकून एकीची बेकी होते, असे अनेक उदाहरणांनी सिद्ध करून देता येण्यासारखे आहे. इतरांना उपदेश करण्यापूर्वी चित्पावनच जर आपले चित्त पावन करण्याचा प्रयत्न करतील तर महाराष्ट्रांत जातिमत्सर औषधालासुद्धा मिळणार नाही, एवढ़ी हमी आम्ही देतो. इतर समाजांचा तेजोभंग करून स्वतःची व स्वज्ञातियांची टिमकी पिटण्याचे दिवस आता उरले नाहीत किंवा दुसऱ्यांच्या कुचाळ्या करून स्वतःच्या स्तोमाला पॉलीश चढविण्याचेहि हे दिवस नाहीत, हे आमच्या चित्पावन देशबंधूनी अझूनहि लक्षांत आणल्यास महाराष्ट्रावर फारफार उपकार होतील. ‘तुम्ही ब्राह्मणांना का शिव्या देता?’ असा ब्राह्मणेतरांना सवाल करण्यापूर्वी ब्राह्माणच आपल्या नित्य वर्तनाचा इतिहास शुद्धीवर येऊन पहातील, तर सध्या नुसत्या शिव्यांवरच भागत आहे. याबद्दल ब्राह्मणेतरांचे ते आभारच मानतील. काहीहि विशेष कारण घडलेले नसतांहि ब्राह्मणेतरांच्या हृदयाला घरे पाडण्यासारखी निंदा, कुचेष्टा किंवा व्यंगोक्ती आजपर्यंत आम्ही कधींही केलेली नाही, असें परशुरामाच्या शपथेवर मुळामुठेच्या संगमांत उभे राहून सांगायला आज चित्पावन तयार आहेत काय ?
२४. मुत्सद्देगिरी व राजकारण या दोन गोष्टींचा चित्पावनांचा मागील इतिहास पाहिला तर त्यातहि त्यांनी नाव मिळविल्याचे दिसत नाही. सध्या राजकीय क्षेत्रांत दंड थोपटून दोन हात करण्यास सरसावलेल्या महाराष्ट्रीय वीरसैन्यात चित्पावन कॅप्टनांची, कर्नलांची व रिक्रुटांची संख्या बरीच आढळते. निश्चित ध्येयाकरितां - मग तें कांहीहि असो- सर्वस्वत्याग करणारी मंडळी अलीकडे चित्पावन समाजांत बरीच निपजू लागली आहेत, आणि चालू इतिहासाची बरीचशी पृष्ठे त्यांच्या स्वार्थत्यागांनी चित्रित झालेली पहाण्यांत येतात. भारतीय राजकीय क्षेत्रातील हक्कांबद्दलचे युद्ध सध्या चालूच आहे, तेव्हां यशापयशाचे निश्चित भाकिंत आतांच करणे, बरेंच धाडसाचे होईल. शिवाय देशाच्या सर्वच प्रकारच्या परिस्थिति क्षेत्रात अंधार पडल्यामुळे, कोणाच्या का कोंबडयाच्या आरवण्यानें होईना, पण एकदा उजाडो, असे सर्व भारतवासीयांना होऊन गेलें आहे. अर्थात् युद्धक्षेत्रावर चित्पावनांची फलटणें विक्टोरिया क्रॉसची पदकें अधिक पटकावतात की बंगालच्या चित्रगुप्त कायस्थांच्या सेना अधिक बहादरी गाजवितात, याचे भविष्य करण्याचा रिकामटेकडा धंदा करण्यांत कांही अर्थ नाही. तथापि घोड्यांच्या शर्यतीत पैजेची टिकिटे खरेदी करण्यापूर्वी शर्यतभक्त जसे प्रत्येक घोड्याच्या पूर्वेतिहासाचे काळजीपूर्वक अध्ययन करतात. त्याप्रमाणे मुत्सदेगिरी आणि राजकारण यांत चित्पावन समाजाने आजपर्यंत कोणकोणत्या शर्यती जिंकल्या आहेत, त्यांचा इतिहास पहाण्यास काही हरकत नाही.
मागील इतिहासावरून असे निश्चित सांगण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं कीं चित्पावनांत मुत्सदेगिरी फार कमी होती आणि राजकीय क्षेत्रात तर त्यांना कधीहि यश आलेले नाहीं. चित्पेवन मुत्सद्यांत जर खरोखर कांहीं मुत्सद्देगिरी असती तर त्यांना पेशवाई बुडविण्याचा त्यांच्यावर प्रसंगच आला नसता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या तो राजारामाला अभिषेक होईपर्यंतच्या क्रांतीचा आणि राष्ट्रीय संकटांचा काळ, आणि थोरल्या माधवराव पेशव्याच्या मृत्यूपासून तो शेवटच्या रावबाजीच्या यःपलायते सजीवतेपर्यंतचा काळ, या दोन काळांची आपण तुलना केली, म्हणजे वरील विधानांची सत्यता पटेल. पहिल्या काळांतले सारे मुत्सद्दी महाराष्ट्र (देशस्थ) ब्राह्मण, क्षत्रिय मराठे व चां का प्रभू. हे होत आणि दुसऱ्या काळांतलें राजकीय क्षेत्र शुद्ध चित्पावनांनी गजबजलेले होते. उगीच इखादा सखाराम बापू बोकीलासारखा देशस्थ वाटाणा मुत्सद्यांच्या आमटीत नावाला हात लागतो इतकंच. पहिल्या काळांत, संभाजीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राला अवरंगझेबासारख्या सर्वसमर्थ जबरदस्ताशी तोंड द्यायचें होते आणि दुसऱ्या काळांत नुसत्या युक्तीबाज आणि अल्पसमर्थ अशा इंग्रजी व्यापारी मंडळीशी डावपेचांचा शुद्ध बुद्धीबळाचा खेळ खेळावयाचा होता. पहिल्या प्रसंगी महाराष्ट्राची मान अवरंगझेबाच्या तलवारीच्या पाल्यावर मूर्तिमंत टेंकलेली होती. दुसऱ्या प्रसंगी महाराष्ट्र आसनमांडी - किंवा म्हणा वाटेल तर वीरासन - घालून टोपकरांशी बुद्धीबळाच्या सामन्याच्या हारजिकीवर आपल्या सोक्षमोक्षाची किमया करीत होता. पहिल्या प्रसंगांतली सतीच्या वाणाची तीव्रता दुसऱ्या प्रसंगांत मुळीच नव्हती. असे असूनसुद्धा पहिल्या प्रसंगांतल्या मुत्सद्यांनी नुकताच स्थापन झालेला व एकाकी ढासळून पडलेला हिंदवी स्वराज्याच्या टोलेजंग रायगड हां हां म्हणतां आपल्या हातांवर झेलून धरला आणि त्याची पुनश्च भक्कम पायावर उत्कृष्ट उभारणी करून अवरंगजेबासारख्या सहस्त्रबाहू व सहस्त्राक्षालासुद्धां तोबा तोबा म्हणण्यास भाग पाडावें आणि दुसनऱ्या प्रसंगांतील मुत्सद्यांना पेशवाईवर तिलांजली देण्यापलीकडे गत्यंतरच नसावें, यावरून काय सारांश निघतो तो वाचकांनींच अजमावून पहावा. रा. ब. चिंतामणराव वैद्यांचा तर्काप्रमाणे दुसऱ्या प्रसंगी राष्ट्रात खऱ्या स्वदेशाभिमानाचा दुष्काळ होता, हाणून अल्पसमर्थ टोपकरांच्या झगड्यांत सर्वसमर्थ पेशवे हटले, जसे जरी मान्य केलें तरी स्वदेशाभिमानाचा दुष्काळ उत्पन्न करण्याची पेशव्यांवरची जबाबदारी काही टळत नाही.
पहिल्या प्रसंगांत जर स्वदेशाभिमान होता तर तो नष्ट करण्याच्या पातकांतून दुसऱ्या प्रसंगातल्या मंडळींची सुटका होत नाहीं. शिवाय स्वदेशाभिमानावांचून नुसतें लष्करी सामर्थ्य किंवा मुत्सद्देगिरीचा दिमाख राष्ट्रसंरक्षणाच्या कामी उपयोगी पडत नाहीं, हें समजून उमजून राष्ट्रांतल्या स्वदेशाभिमानाचा वृक्ष स्वार्थाच्या करवतानें कांपून खच्ची करणे, यांत मुत्सद्दीपणा तो काय राहिला? पूर्वी स्वदेशाभिमान होता तर तो काय कोणी घालविल्याशिवाय गेला? अर्थात् तो पेशव्यानींच ज्याअर्थी घालविला त्याअर्थी त्यांच्या मुत्सदीपणाच्या वखारीत पुढे शेणाच्या पणत्या का लागल्या हें निराळें सांगण्याची जरूरच नाही. पहिल्या प्रसंगांतल्या मुत्सद्यांनी व लढवय्यांनी मुत्सदपणाचे व राजकारणाचे धडे वंशपरंपरेने मिळविलेले असून शिवाय त्यांत खुद्द शिवाजी महाराजांच्या खास वळणाची भर पडलेली होती. स्वदेशाभिमान व स्वराज्यभिमानाच्याच तोडीने या मंडळींनी आपली स्वामीनिष्ठा, सत्यप्रियता आणि इमान ही चोख राखल्यामुळेच शिवाजीचा मुलगा राजाराम याच्या वैयक्तिक अप्रबुद्धतेबद्दल चकार शब्द न काढता किंवा अवरंगझेबाच्या फाटाफूट करण्याच्या कारस्थानाला बळी पडण्याइतकी स्वार्थांची विकारवशता यत्किंचीतही न दाखवितां, फक्त शिवरायाच्या नांवाचा अभिमान धरून त्यांनी न भूतो न भविष्यति अशी स्वार्थत्यागाची अनेक संस्मरणीय कृत्ये केली, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याला महाबलीष्ट अवरंगझेबाच्या पशांतून खेचून बाहेर काढले आणि महाराष्ट्रीयांच्या मनगटातील अनुवंशिक पराक्रमाचा ठोसा तत्कालीत प्रतिस्पर्ध्याना सणसणीत ठणकावला. उलटपक्षी दुसऱ्या प्रसंगांतल्या राजकारणी मुत्सद्यांची व लढवय्यांची कृत्ये पहा.
ज्यावेळेला बाजीरावावर प्रसंग आला, त्यावेळेला एकट्या बापू गोखल्याशिवाय एकहि चित्पावन सरदार त्याच्या पाठीशी उभा राहिला नाही. एकाहि मुत्सद्याची अक्कल त्याच्या सहायास आली नाही. उलट श्रीमंतांचे तळपट झालें तर होवो, पण माझ्या वाट्यास आलेल्या जहागिरीला उपसर्ग न लागो, म्हणून प्रत्येक चित्पावन सरदार आपापल्या बांधरुंदी पाहू लागला. कित्येक इंग्रज रेसिदंटाच्या मंदिराचे उंबरठे झिजवून त्या नंदीच्या पृष्ठभागाला स्पर्श करून ‘त्राहि माम् पाहि माम् क्षमस्व’ म्हणून कान उपटू लागले. कित्येकांनी तर उघडउघड घरमभेद्येपणा करून श्रीमंतांची राजकारणातली बिगें चव्हाट्यावर आणल्याबद्दल अभयपत्रे मिळविली. पेशव्यांचे उच्चाटण झाल्यावर शिंदे आणि होळकर यांनी कंपनी सरकारला पाय लावण्याकरिता मागाहून जी उठावणी केली, त्यावेळी तरी कोणी चित्पावन सरदारांनी त्याना हातभार लावला काय? ज्याची त्याची स्वार्थावर नजर ! राजारामाच्या वेळच्या राजकारणी मंडळींनी जर असाच स्वार्थ पाहिला असता, तर अवरंगझेबानें त्यांच्यावर जहागिरीची नुसती खैरात केली असती आणि यावेळी महाराष्ट्र ब्राह्मणांचीं क्षत्रिय मऱ्हाठ्यांची व चां. का. प्रभूंची अनेक संस्थाने नजरेस पडली असती. पण ते बिचारे भोळे पडले. स्वामीनिष्ठ, खाल्ल्या मिठाचा अभिनाम धरून जिवाची तमा न बाळगणारे आणि खऱ्या राजकारणी मुत्सद्देगिरीत मुरलेले आज महाराष्ट्रांत जी अनेक चित्पावनांची संस्थानें हयात आहेत. त्यांचा पाया ` त्राहि माम्’ वरच उभारलेला आहे, हे आणखी विषद करून सांगण्याची आवश्यकता नाही.
खरें म्हटलें तर राजकारणाच्या पाठशाळेत चित्पावनांचा नुकताच कोठें प्रवेश झाला होता. राजकारणाची पहिली श्री सन १७१४ त त्यांनी कुठे घटवायला घेतली. पण जात्याच ते ऊर्ध्व महत्वाकांक्षी असल्यामुळे तिच्या प्रत्येक फुसक्या उसाळीबरोबर चढत चढत त्यांनी केवळ सहा वर्षाच्या अवधीतच राजकारणाच्या ‘ॐ नमः सिद्धं’ पर्यंत मजल मारल्याचे पहिल्या बाजीरावाच्याच तोंडून (थोडक्या भांडवलावर आणि पोतापुरत्या अकलेवर देश्भाक्तीची, लोकसेवेची किंवा विद्वत्तेची पदवी अलीकडे मुळामुठा युनिव्हर्सिटीतून कशी पटकन मिळते आणि अप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध उमेदवार तिच्या पचनी पडताच चटकन कसा पांढराफेंक सुप्रसिद्ध दे.भ. होऊन बाहेर पडतो, हें आता पुष्कळांच्या ध्यानांत आलेलेच आहे. त्याच प्रमाणे राजकारणाचे गड्डेही अलीकडे बरेच मॅन्युफॅक्चर होऊ लागले आहेत.) जाहीर केले.
बाजीरावानंतर तर काय राजकारणाच्या इत्यलमचाच पुंकारा अथेति होत गेला. परंतु खऱ्या अनुभवी व कसलेल्या मुत्सद्यांनी पेशवे नोकरशाहीच्या डावपेचांस कंटाळून राजकारणातून आपापली आंगे काढून घेताच पेशवाईत राजकारणाचे व मुत्सदेगिरीचे नुसतें मढेंच उभे राहिले. अर्थात पंजात सापडलेल्या उंदराला गटकावण्यापूर्वी मांजर जसें त्याच्याशी टिवल्याबाव्हल्या करीत असते, त्याप्रमाणे तो म्हणतो ताकभात ओळखणारे आणि उडत्या पांखरांची पिसें डोळे मिटून मोजणारे इष्ट इंडिया कुंफणीचे मुत्सद्दी, पेशवाई राजकारणाच्या मढ्याशी तहनाम्यांचे आणि वकीलातीचे डांव चैनीनें खेळत बसले यांत काही नवल नाही. भुसभुशीत मुत्सदेगिरीच्या भरवशावर पुण्यास स्वतःची मध्यवर्ती सत्ता स्थापन करून शिरजोर होऊ पहात असणाऱ्या शिंदे होळकरादि सुभेदारांची उचलबांगडी करून त्यांना दूरदूर लांबलांबच्या सुभ्यांवर पांगून ठेवण्याची पेशव्यानी जी हिकमत लढविली, ती देखिल मुत्सद्दीपणाच्या अभावामुळे अखेर त्यांच्याच आंगावर शेकली ना! फार काय पण या सुभेदारांचे चित्पावनेतर दिवाण कायकाय मसलती लढवीत होते किंवा आपल्या धन्याच्या अक्षयीच्या वैभव स्थैर्याकरिता कोणकोणती धोरणे अंमलात आणीत होते, याचा देखिल मागमूस ज्या मध्यवर्ती सत्तेच्या पेशव्यांना किंवा त्यांच्या चित्पावन मंत्र्यांना अजमावता आला नाही, त्यांच्या मुत्सद्दीपणाची किंवा राजकारणी धोरणाची कोणाला कींव येणार नाहीं? एवढी मोठी पानपतची मोहीम लढायला गेलेले सदाशीवराव भाऊसाहेब, पण त्यालासुद्धा गोविंदपंत बुंदेल्याचे डावपेंच उमगले नाहीत आणि सरतेशेवटी त्याच गोविंदपंतानें पानपतास भाऊचा बळी देऊन महाराष्ट्रातील तीन लाख बांगड्या फोडल्याची पुण्याई जोडली. नाना फडणीसाच्या मुत्सदेगिरीबद्दल मोठी बोलबा आहे. याबद्दल विस्तृत विवेचन करायला याठिकाणी अवकाश नाही. परंतु ज्याच्या प्रत्येक डावपेचानें श्रीमतांचा पाय अधिकाधिक खोल चिखलांत रुततच गेला, त्याच्या मुत्सद्दीपणाबद्दल कोण शहाणा तारीफ करील तो करो, या मागल्या गोष्टी सोडून दिल्या आणि अगदी अलीकडे येऊन कित्येक संस्थानांतील चित्पावन दिवाणांच्या किंवा कारभाऱ्यांच्या कर्तबगारीकडे लक्ष दिलें, तरीहि मुत्सद्देगिरी किंवा राजकारणीपणा यातहि कोणी विशेष सुधारणा दाखविल्याचे दिसत नाही. उलट कोल्हापूरच्या बरण्यांसारख्यांनी संस्थानचें नांव बद्दू केल्याची उदाहरणें मात्र बरीच दाखवितां येतील.
२५. पुण्याला कोल्हापूरचे कडकडीत वावडे आहे. ही गोष्ट आता कोणास नव्यानें सांगण्याची जरूर नाहीं. त्यांतल्या त्यांत महाराष्ट्राचे मुर्धाभिषिक्त कुळकर्णी केसरीकार आणि करवीरकर छत्रपति यांच्यांत असलेले अहिनकुलाचे नातेंहि तितकेंच लोकविश्रुत आहे. केसरीकर मधूनमधून करवीरकरांवर आपली कुळकर्णी लेखणी चालवून छत्रपतींची मोफत जाहीरात देतच असतात. त्यात अलीकडे कुळकर्णी वतनाचा प्रश्न उपस्थित झाल्यापासून तर आमच्या या पुणेकर राष्ट्रीय कुळकर्ण्यांचा बराच तडफडाट झाल्याचे वरचेवर दिसून येते; शिवाय कोल्हापूरात हा प्रश्न उपस्थित झाल्यापासून त्या तडफडाटाची डिग्री कमाल मर्यादेवर भडकलेली दिसते. आम्ही स्वतः काही कुळकर्णी नव्होत किंवा कुळकण्यांच्या वाटाघाटीत आमचे हितहि नाही व अहितहि नाही. तथापि रामनामाच्या उच्चाराबरोबर पिशाच्च जसे बेफाम भडकतें, तसे कोल्हापूर आणि कुळकर्णी हे दोनच शब्द कानी पडतांच, आमचे पोक्त विचारी केसरीकारहि कैसे अद्वातद्वा बरळू लागतात हे पहाणे अलीकडे बरेच करमणुकीचे साधन झाले आहे
सन १९१३ साली ‘मुकुंदराय’ नावाच्या एका आधुनीक कवीने ‘कुळकर्णीलीलामृत` नावानें एक छोटेखानी विनोदपुर ओवीबद्ध पुस्तक लिहिले व ते कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजाने छापून प्रसिद्ध केले. या पुस्तकाचा परामर्ष केसरीचे त्यावेळचे संपादक रा. नरसोपंत केळकर यानी ३० सप्टेंबर व ७ आक्टोबर १९१३ च्या अंकांत दोन मुख्य निबंध लिहून घेतला आहे.
वास्तवीक केसरीच्या नेहमीच्या सांप्रदायाप्रमाणे या विनोदी चोपडाची विल्हेवाट पोचट पोंच देऊन लावायला पाहिजे होती. परंतु या चोपडयाच्या मळपृष्ठावरच कोल्हापूर आणि कुळकर्णी हे दोन शब्द दिसताच, सत्यशोधक समाजाची करवीरकर छत्रपतीची आणि त्यांच्या दिवाणादि हस्तकांची यथेच्छ खोड मोडण्याची इतकी चांगली संधी आमचे केसरीकार कशी दवडतील? त्यानी पुस्तकाला उलट सुलटे करून त्याचा ग्रंथकार, प्रकाशक अर्पणपत्रिका आणि आभारप्रदर्शन इत्यादी बाबी चटचट आपल्या एडीटरी नेत्रकटाक्षानें वरवर अवगाहन करून पटदिशी निष्कर्ष काढला की "हें अमृतरूपी विष कांही तरी सैतानी विध्वंसपर कृत्य करण्यास अवतरले आहे. अशी कोणाचीहि तेव्हांच खात्री होईल" केसरीचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य ! त्याना कुळकर्णी प्रकरणावर केव्हा तरी एकदा तांडवनृत्य करायचे होतेच. इतक्यांत हें कुळकर्णीलीलामृताचे चोपडे त्यांच्या हाती पडलें, मग सारासार विचाराची विभूत फूं करून फुंकल्यावर त्यांच्या बेशुद्ध आकांडतांडवाला रंग का चढणार नाहीं? केसरीकारानी दोन मुख्य निबंध लिहून या चोपड्याची नाहक जाहीरात देण्याचा अव्यापारेषु व्यापार केला नसता, तर त्याच्या जननमरणाची वार्ताहि कोणास कळली नसती प्रस्तुत प्रसंगी कुळकर्णीलीलामृताचें परीक्षण करण्याचे हे स्थळ नव्हे, जरूर नाही किंवा त्याची पाठ थोपटण्याचे वकीलपत्रहि आम्ही घेतलेले नाही, परंतु केसरीकाराने त्याच्याबद्दल जो मोठा शिरा ताणताणून गवगवा केला तो मात्र निवळ परांचा कावळा होय, इतके मात्र येथे सांगणे जरूर आहे.
केसरीकाराचे आकांडतांडव, ते पुस्तक प्रेस आक्टाखाली जप्त करण्याबद्दल त्यांनी सरकाराला केलेली शालशिष्ट ‘राष्ट्रीय’ शिफारस आणि कोल्हापूरच्या दारूखान्यांत तयार झालेल्या ‘ब्रह्मद्वेषाच्या’ बेवडयाचा त्यांना लागलेला ठसका पाहून हे भयंकर प्रकरण काय आहे म्हणून आम्ही हें पुस्तक मुद्दाम आणवून समग्र वाचलें. सदर्हू लीलामृतावर चर्चा करून रा. केळकरांनी केसरीच्या वाचकांना तर असे भासविण्याचा प्रयत्न केला की कुळकर्णीलीलामृत पुस्तकाने महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातीचा जणुकाय सत्यानाश करण्याची वेळ आणली जातिमत्सराच्या ज्वालामुखीने पेट घेतला आणि राष्ट्रीयपणाच्या चबुतऱ्याखाली या महाग्रंथाने ज्वालाग्राही बांब गोळ्यांचा ढीग रचून ठेवला. जो कोणी हे पुस्तक वाचील त्याला असेच आढळून येईल की केसरीकार म्हणतात तसा भयंकर प्रकार त्यात कोठेहि आढळून येत नाही. तें एक नाट्यकलारुक्कुठार नाटक्याचेतारे, सुदाम्याचे पोहे इत्यादि पुस्तकांप्रमाणेच एक विनोदी पुस्तक असून त्यांत कुळकर्ण्याच्या लोकविश्रुत चेष्टा वर्णन केलेल्या आहेत. कुळकर्ण्याच्या चेष्ठा हरदाससुद्धा आपल्या कथांतून चमत्कृतीचे विनोदी तिखटमीठ लावून वर्णन करीत आले आहेत.
आणि
शोणार शिपी कुळकर्णी आप्पा ॥ याची संगत नकोरे बाप्पा ॥
ही सुप्रसिद्ध उक्ती सहानलहान पोराटोराध्यासुद्धा तोंडी असते. पण केसरीकाराप्रमाणे कुळकर्ण्याच्या कढाने उकळत असणाऱ्या कोणत्याही दीडशहाण्यानें त्या हरदासांवर किंवा पोरावर १५३-अ खाली किंवा १२४अ खाली खटला करण्याची बदसल्ला केव्हांहि दिल्याचें आमच्या ऐकीवात नाही. पण आमचे केसरीकार पडले सूक्ष्मदृष्टि आणि त्यांत पडली वकीली दृष्टीची भर त्यांनी चटदिशी शेरा ठोकला-त्यांतील निंदा इतकी उघड व बेलगामी आहे की जातिजातीत वैमनस्य उत्पन्न करणे हा परिणाम या पुस्तकापासून होण्यासारखा असल्यामुळे, ‘आंग्लनृपकृकरून निर्विघ्न न घडो असा जरी आशीर्वाद सदर ग्रंथाला ग्रंथकर्त्यानें सरकाराकडून मागितला आहे तरी सरकारच्या नजरेंतून असलें हें जातिविद्वेषकारक खोडसाळ पुस्तक कितपत सुटेल, याबद्दल शंकाच वाटते. हा शेरा झाला वर्तमानपत्री निस्पृहतेचा आणि सत्याप्रियतेचा. पण केसरीकार स्वतः पडले अट्टल प्रगमनशील आणि वाढत्या बांध्याच्या सहानुभूतीचे त्यांनी पोक्त विचार केला की हा लीलामृतकर्ता बहकला तर बहकला पण कसा झाला तरी तो आहे आपला देशबंधू म्हणून केसरीकाराने शेवटी एक कळवळ्याची पुस्ती जोडली की “पण एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरुं मारावें असे नाही. यामुळे लीलामृत १५३ खाली किंबहुना नव्या प्रेस आक्टाखाली येण्यासारखे निःसंशय आहे तरी तें प्रत्यक्ष जप्त होऊं नये."
१५३अ काय, १२४अ काय किंवा नवा जुना प्रेसआक्ट काय, या सर्वात आमचे के सरकार पुरे डुंबलेले, अर्थात् सरकारची नजर मेहनत वाचविण्याच्या काम त्यानी सरकारांस दिलेला इषारा राष्ट्रीय नव्हता असे कोणी म्हणावें? केसरीचे कोणतें कृत्य राष्ट्रीय नसते ? पण या राष्ट्रीय सेन्सारी दृष्टीच्या कक्षेत त्यांची स्वतःची, स्वज्ञातियाचीं व स्वपक्षियांची कृत्ये मात्र कधीच सापडत नाहीत. स्वज्ञातियांचे ग्रंथ-मग ते कितीहि उघड व बैलगामी निंदेने भरलेले असोत त्यावर सरकारी कायद्यानें डोळा फिरवतांच मात्र महाराष्ट्राचा अपमान होतो, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इभ्रतीवर वज्राघात पडतो, व अन्यायाचा जुलमांचा कळस होतो. केसरीकार “मवाळांनों पळू नका” अशी शिमगा करणारी पुस्तकें मोठ्या प्रेमानें मिटक्या मारमारून वाचतात, त्यावर स्तुतिपाठांचा वर्षाव करतात. का? तर तें राष्ट्रीय-प्रेम- मालेचें सुगंधित पुष्प! कुळकर्णीलीलामृतासारख्या शुद्ध विनोदी पुस्तकाबद्दल एवढी कोल्हेकुई करणारी केसरीकार केळकरांची कायदेबाज सूक्ष्म राष्ट्रीय दृष्टी, भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चतुर्थ अहवालाचे परीक्षण करतांना कोठें गेली होती ? कुळकर्णीलीलामृत जातिजातींत हटकून द्वेष उत्पन्न करणारे दिसावें आणि रा. राजवाड्यांचा शिवराज-प्रशस्ति व कायस्थ धर्मदीप हा निबंध राजस, गोंडस आणि ऐतिहासिक विद्वत्तेचा काढा वाटावा यांत त्यांच्या दृष्टीला दोष न देतां, केसरीकंपूच्या राष्ट्रीय महिम्याची खरी खुब्बी येथेंच आहे, इतकें मात्र स्पष्ट म्हणावें लागतें.
२६. द्वैतभाव आणि मत्सर यांच्या तडाख्यांतून महाराष्ट्रांची सुटका करण्याचा यत्न करण्याऐवर्जी त्याना दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलीत करण्याकडे आमच्यातील मोठमोठ्या शहाण्यासुत्य विद्वानांची अक्कल कशी झोकांड्या खाऊ लागते याची वरच्याप्रमाणें उदाहरणें आम्ही देत बसलों तर एक मोठा थोरला स्वतंत्र ग्रंथच होईल. या बाबतीत लोकधुरिणत्वाचे वीरककण हाती बांधलेल्या आणि लोकमताला राष्ट्रहितसंवर्धक वळण लावण्याचें पुण्य कृत्य आंगिकारलेल्या विद्वानांनीच आपल्या मनोवृत्तीत उदारपणाचा भाग अधिक दाखविल्यास त्यांच्या कर्तबगारीचा खराखुरा आदर बहुजनसमाजांत अधिक वाढेल. द्वैतभावाने आणि शुद्ध जातिमत्सरानें महाराष्ट्राचे केवढे अनिर्वाच्य नुकसान केलें हें या ग्रामण्यांच्या इतिहासावरून जबाबदार पुढारलेल्या समाजांनी जर अझूनहि नीट शिकण्याचा यत्न केला नाहीं, तर इतिहासाचा खरा उपयोग काय असतो हें उमजण्याची महाराष्ट्राची लायकीच नाही, असे म्हणणें नाइलाजास्तव प्राप्त होईल. आपल्या पूर्वजांच्या हातून ज्या ज्या घोडचुका घडल्या त्याचा पुनरुच्चर लौकीकी दृष्ट्या कानाला कडू व जिभेला आंबट लागणे शक्य आहे; परंतु ऐतिहासिक महत्वाच्या दृष्टीनें त्याचा कडूपणा व आंबटपणा आमच्या भावी वर्तनशोधनाच्या कामी हेमगर्भ मात्रेपेक्षाहि वरचढ गुणकारक ठरल्याशिवाय रहाणार नाही,
सध्या आपण सर्व महाराष्ट्रीयजन उत्क्रांतीच्या काळचक्रांत परिभ्रमण करीत आहोत. मागील काळातील पुण्याईचा वाजवी अभिमान बाळगितांनाच कृत पापांच्या क्षालनाचेंहि कटुकर्तव्य आपण बजाविलें पाहिजे जातिभेदाने आधीच महाराष्ट्रीय हिंदुसमाजाची घडी विस्कळीत झाली आहे आणि एकीचे चक्रहि पार खिळखिळे केलेले आहे. पायथ्याशी पडलेला बेकीचा, द्वैताचा आणि मत्सराचा केरकचरा झाडून साफ करण्यापूर्वी, उच्च वातावरणांतील उच्च कल्पनांच्या कोरणीने सामाजिक वैभवाच्या मनोऱ्याच्या वरच्या भागांवर आपण कितीहि कलाकुसरीचीं कामें केली तरी पायथ्याला भिडलेल्या केरकचऱ्यांतील झुरळे व वाळवी कधी ना कधीं तो मनोरा ढांसळून पाडल्याशिवाय खास रहाणार नाहींत. हिंदुसमाजरूपी विराट पुरुषाच्या मर्मस्थानीं झोंबलेलें जातिमत्सराचें काळकूट विष राष्ट्रीयत्वाच्या किंवा विश्वबंधुत्वाच्या कोरड्या गप्पांच्या मलमपट्ट्यांनी नाहीसे होणे शक्य नाहीं त्याचें उच्चाटण करायला काहीतरी जालीम रसायन पोटांतच घेणे भाग आहे. रोग क्रॉनिक असल्यामुळे काढ्याची बरीच सप्तकें घ्यावी लागतील हें निर्विवाद आहे. अशा प्रकारचा काहीतरी प्रयत्न करण्याची हिंदुसमाजाला प्रेरणा व्हावी व त्यांना निश्चित दिशेनें औषधोपचार करण्यास सुलभ जावें, ह्मणून आम्ही ` ग्रामण्याचा साद्यंत इतिहास` हे रोगाचे तंतोतंत निदान ठरविणारें चिकित्सापत्रक महाराष्ट्रीयांपुढे ठेवीत आहोत. याच्या परिशीलनाने जातिमत्सराचा व द्वैतभावाचा जुनाट रोग महाराष्ट्रीय हिंदुसमाजांतून सज्जीबात घालविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची प्रेरणा ती प्रतापगडची श्रीभवानी सर्वांना देवो, अशी त्या राष्ट्रदेवतेची अत्यंत कळकळीनें करुणा भाकून, लेखनीस कांहीं वेळ विराम घेण्याची परवानगी देतो
देशबांधवांचा नम्र सेवक,
केशव सीताराम ठाकरे.
****
प्रकरण १
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू
ग्रामण्य पहिलें.
तालभोपाळचें ग्रामण्य. (शालीवाहन शकापूर्वी ६५६ वर्षे.)
(इतिहासकारांनी दिलेला हा काळ वादग्रस्त आहे. आद्यशंकराचार्यापासूनचे दहावे आचार्य विद्याशकर भारती यानी या ग्रामण्यांचे निराकरण केलेले आहे. आचार्याचा निर्याणकाळ अझून निश्चित झालेला नाही. त्यांच्या उपलब्ध कुंडलीवरून तो शा. श. पूर्वी ९९१ वर्षे ठरतो. प्रत्येक परंपरेची कालमर्यादा अजमासे २० वर्षे घरल्यास विद्याशंकर भारतीचा काळ शा. श. पूर्वी ६३१ वर्षे येतो. ह्मणून बखरकारांचा वरील काळ आम्ही कायम ठेविला आहे कोणी ज्ञात्याने या काळाचा निश्चत उलगडा केल्यास त्याचा आम्ही साभार स्वीकार करू.)
मगध देशाचा प्रख्यात क्षत्रिय राजा महापद्मानंद हा मोठा धनलोभी असल्यामुळे त्यानें आपल्या प्रजेवर अत्यंत भयंकर जुलूम करून पैसा उकळविला. स्वतः क्षत्रिय असूनहि त्यानें इतर क्षत्रियांवर पैशांसाठी इतका पराकाष्ठेचा जुलूम केला की, पुराणांतरी त्याला परशुरामाची उपमा दिली आहे. त्याच्या अनन्वित जुलमाला त्रासून हजारों क्षत्रिय वीर आपल्या कुटुंबांसह देशांतरास गेले. त्यावेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूची बरीचशी स्थायिक कुटुंबे या प्रसंगी स्वदेशत्याग करून बाहेर पडली. त्यांपैकी कित्येक नेपाळांत कित्येक काश्मिरात आणि सुमारे ८० कुटुंबे तालभोपाळ येथे येऊन राहिली. या वेळी तेथे जुनाट यावनी सत्ता होती. तेथील अधिकारी यवन खरे, परंतु हिंदु लोकांवर त्यांची दयार्द्रदृष्टी होती. त्या ठिकाणच्या राजकारणी लोकांच्या सल्लामसलतीने ही ऐशी कुटुंबे तेथे वस्ती करून राहिली. ही मंडळी राजकारणात व बुद्धिमत्तेत चांगली तरबेज आढळल्यामुळे या ठिकाणी त्यांना लवकरच उत्तम प्रकारचा राजाश्रय मिळाला आणि महापद्मानंदाच्या जुलमाची स्मृति हळुहळू या नवीन राजाश्रयाच्या पडद्यामागे अंधुक अंधुक होत गेल्यामुळे या मंडळी तालभोपाळास कायमचीच वस्ती केली. परंतु किती झाले तरी गत स्वातंत्र्याचे राजकीय वैभव आणि दर्जा यांचे स्मरण या नवीन सुखावह परंतु परतंत्र स्थित्यंतरांतसुद्धा त्याच्या मनोवृत्ति अस्वस्थ केल्याशिवाय राहिलें नाहीं. गत वैभव पुनश्च कसें प्राप्त होईल ही त्यांची इच्छा केव्हांहि नष्ट झाली नव्हती आणि त्या दिशेनें त्यांचे प्रयत्न सतत चालू होते. "ठाकरे" या उपनांवाच्या कोणी एका चां. का. प्रभू वीरानें चितोडाजवळ एक लहानसें संस्थानही स्थापन केलें. यवनी राज्यकर्त्यांचा लोभ संपादन करून कोणी जहागीरदार झाले, कोणी सरदार झाले, तर कोणाला लेखनवृत्तीवरच निर्वाह करावा लागला. त्यावेळी बलदेवजी प्रभु व हरिलालजी प्रभु हे दोन गृहस्थ मोठे प्रसिद्ध असून या जातीचे पुढारी होते. राजदरबारांत त्यांचे वजन व मानमरातब मोठा होता. तथापि गतवैभवाच्या तोडीचे याहिपेक्षा उच्च असें राजकीय क्षेत्रांतील स्थान पुनरपि आपणांस प्राप्त व्हावें, याकरितां त्या देवभोळ्यांनी आपल्या कुलगुरुच्या हस्ते एक अनुष्ठान करण्यास सुरवात केली.
यावेळी कोणीएक संन्याशी बुवा तेथील कारभाऱ्याजवळ दानाध्यक्ष होते. चां. का. प्रभु जातीचे पुढारी बलदेवजी व हरिलालजी अनुष्ठान करीत आहेत हे वर्तमान त्यांना समजलें, अनुष्ठानाचा प्रयोग मैथिली होता, त्यामुळे विशेष कांक्षा येण्यास कारण झाले. जारणमारणाच्या प्रयोगाप्रमाणेच हाही एक प्रयोग असेल असे वाटल्यामुळे म्हणा किंवा तशी मुद्दाम कल्पना केल्यामुळे म्हणा, त्या संन्याशानें या प्रकरणाचा फार बारकाईने तपास चालविला. परंतु हे प्रकरण काय आहे याचा स्पष्ट व प्रत्यक्ष खुलासा खुद बलदेवजी किंवा हरिलालजी यांस भेटून करून घेण्याचा मनाचा मोकळेपणा किंवा धैर्य संन्याशीबुवानें किंवा कोणीहि दाखविले नाही. चां का प्रभू ज्ञातीची पूर्वापार कुलगुरू रामनाथ नांवाचे मैथिली ब्राह्मण होते. ते तालभोपाळच्या ८० कुटुंबांची सर्व वैदिक कर्मे चालवीत असत. ते अनुष्ठान चालवीत असताना या संन्याशी बुवानी व त्याच्या इतर हस्तकांनी "यवनराजा तुम्हांस धरून नेणार आहे" अशी भीती घातल्यामुळे अनुष्ठानाचे कार्य अर्धेच टाकून गुरूजीबाबा आपल्या संगिया गावी निघून गेलें व अनुष्ठानास बसलेले इतर ब्राह्मणही पळून गेले मात्र जाताना रामनाथ गुरुजीनी आपली पुरोहित वृत्ति व अनुष्ठान आपल्या तीन शिष्यांकडे सोपविलें, त्यात रामनारायण हा शिष्य मोठा विद्वान् असून अनुष्ठान प्रयोगांतहि मोठा हुशार होता व त्याचा प्रभुज्ञातीवर लोभही होता.. मध्यंतरी संन्याशीबुवाने कारभान्यामार्फत यवनराजास कळविलें की राज्याच्या अभिलाषानें बलदेवजी व हरिलालजी यांनी अनुष्ठान करण्यास सुरूवात केली असून स्वामीस अपाय करण्याचा त्यांचा उद्देश आहे. संन्याशी कधि खोटे बोलतो? झालें. यवनाधिपतीनें रामनारायणादि तीनही ब्राह्मण शिष्यांस ठार मारून टाकण्याचा हुकूम फर्माविला. ही गोष्ट रामनारायणास समजताच त्यानें शिखासूत्रांचा त्याग करून संन्यास घेतला व चंद्रेश्वर स्वामी हे नांव धारण केलें. तेव्हां यवनेश्वरानें हुकूम रद्द केला. त्यावर बलदेवजी व हरिलालजी हे यवनाधिपास जाऊन भेटले आणि त्याची नीट समजूत करून सागितले की, "हे अनुष्ठान यजमानांच्याच कल्याणाकरिता आम्ही करीत आहोंत भोपालेश्वराने पुष्कळच बारकाईनें तपास करून पाहिले, परंतु बलदेवजी व हरिलालजी या उभयतांचेच म्हणणे शेवटी खरे ठरले आणि संन्याशी बुवांची लुडबुड उघडकीस आली. यवनाधिपतीने बलदेवजीला "अनुष्ठान अव्याहत चालवायें" असा हुकूम सोडला. रामनारायण यांनी अधीच संन्यास घेतल्यामुळे त्याच्या शिष्यवर्गाने अनुष्ठानाची समाप्ती यथासांग केली,
बलदेवजी प्रभृतींना हाणून पाडण्याच्या कारस्थानांत स्वतःच पालथे पाडण्याचा उलटा प्रसंग आल्यामुळे, संन्याशीबुवांच्या मनाला मोठाच पीळ पडला. दिवसेंदिवस बलदेवजी व हरिलालजी यांचे वजन दरबारांत फारच वाढू लागले व ते मोठ्या हुद्यांवरहि चढले. त्यांच्यापुढे कोणाचेंच तेज पडेनासे होऊन भोपालेश्वर यवनराजा त्यांच्या सर्वस्वी अंकित झाला. सर्व बाजूंनी हताश झाल्यावर सरतेशेवटी, भटा तुझें वर्म काय तर सुताचें जानवें, या न्यायाची कास धरून संन्याशीबावानी चां. का. प्रभूंवर ग्रामण्य उभे केलें हेंच पहिले ग्रामण्य होय, राजकीय क्षेत्रांतील स्पर्धेमध्यें प्रतिपक्षाचा पाडाव करण्याच्या कामी स्वतःची कर्तबगारी व बुद्धिमत्ता कुचकामाची ठरल्यावर निदानीचा उपाय म्हणजे धार्मिक हक्कांचा प्रश्न उभा करून कायस्थ प्रभूंचा सामाजिक दर्जा कमी प्रतीचा ठरविण्यांत बुद्धिसर्वस्व खर्च करण्याच्या (म्हणजेच ग्रामण्य उभारण्याच्या) कल्पनेचा अग्रमान या संन्याशी यांचा आहे. हे ग्रामण्य शालिवाहन शकापूर्वी ६७१ या वर्षी सुरु झाले व ते सुमारे १५ वर्षे चालले होते. चां. का. प्रभु व त्यांचे पुढारी बलदेवजी व हरिलालजी हे खरे क्षत्रिय नव्हते व त्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मे करण्याचा अधिकार नाही असा आरोप करून, प्रभु ज्ञातीची धर्मकृत्ये वैदिकमंत्राने चालविणान्या रामनारायणाच्या तीन ब्राह्मण शिष्यांस त्या सन्याशीबुवानी बहिष्कृत केले. याचा निकाल लावून घेण्यासाठी बलदेवजी व हरिलालजी है काशीस गेले. तेथे यावेळी श्री विद्याशंकरभारती शंकराचार्य स्वामी यांचा मुक्काम होता. त्यांची खात्री करून देऊन त्यांना घेऊनच दोघे तालभोपाळास परत आले. शालिवाहन शकापूर्वी ६५६ व्या वर्षी श्रीमत्शंकराचार्य श्री विद्याशंकरभारती हे तालभोपाळास आले.
रामनारायणाचे तीन शिष्य अपंक्त पडताच त्यांनीही मोठी खटपट चालविली होती. श्रीशंकराचार्यांची स्वारी येतांच त्यांनी मोठी सभा भरविली. या सभेत पुष्कळच भवति न भवति झाली. परंतु दानाध्यक्ष संन्याशीबुवा यांचा दुराग्रह कांही केल्या सुटेना, श्रीमज्जगदुरुनी पुष्कळच समजूत घातली. पण बुवा ऐकेनात, तेव्हां त्या तीन अपंक्त शिष्यांस आपल्याबरोबर पंक्तीस भोजनास घेऊन स्वामीनी वाद मिटविला. खुद्द जगदुरुनींच त्यांना आपल्या पंक्तीला घेऊन भोजन केलें तेव्हा सगळा बखेडा आपोआपच मिटला गेला. याप्रमाणे या पहिल्या ग्रामण्याचा शेवट झाला.
ग्रामण्य दुसरें
जोगाईच्या आंब्याचें ग्रामण्य. (शके १३९१ इ. स. १९६९).
जोगाईचें आंबे ऊर्फ आंबेजोगाई हे गांव निजामसरकारच्या राज्यांत औरंगाबाद प्रांतांत परभणी परगण्यांत गोदावरी नदीच्या कांठीं आहे. मुसलमानीत यास “मोमीनाबाद” असे नांव होतें. यावेळी हसन गंगूच्या बाहामनी वंशांतील दुसरा सुलतान महमंदशहा (सन १४६३-८२) हा राज्यावर होता. महमंद गवान या नावांचा त्याचा वजीर मोठा कर्तबगार माणूस होता. यावेळी
अष्ट दिशा व्यापून पृथ्वीवर यवनच जाहले. त्याजवर मंडणमिश्र यांणी जैनमत स्थापून सर्व याती कर्मभ्रष्ट केल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याती ऊपयाती यांत वर्णावर्णाची रीत राहिली नाही. यवनांची सदी चालल्यावर तीन चारशे वर्षे अजमास भ्रष्टाकार जाहला. किंचित आपले धर्म चालले. नंतर श्रीशंकरावतार शंकराचार्य प्रगट होऊन जैनमत खंडण केलें. व मंडणमिश्राशीं वाद घालून त्यास जिंकोन धर्मस्थापना केली. तेव्हां ब्राह्मण इत्यादि याती आपलाले पूर्वधर्म शास्त्रयुक्त चालवू लागले. तेव्हां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु आपल्या धर्मे चालत होते. ते समयीं कोणी शास्त्रविहीन आग्रही ब्राह्मणांनी द्वेष वाढवून चांद्रसेनीय कायस्थांस वेदाधिकार नाहीं. ह्मणोन कर्ममार्गास अडथळे केले. सावित्रीपासोन मंडणगडपर्यंत तट घालोन खटले करू लागले. तेव्हा कोकणप्रांती हरी घोलकर (इतिहासप्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीस (निसवबत छत्रपति शिवाजी महाराज) यांचे हे पूर्वज होत. ) प्रभु प्रमुख आणखी प्रभुगृहस्थ व ब्राह्मण मिळोन भांडत मोगलाई अंमलदार याजवळ गेले, तो यवन अधिकारी होता. तो बोलला जे, तुमचे शास्त्रप्रकरणात आम्हांस माहितगारी नाहीं तुमचें हिंदूचें क्षेत्र श्री वाराणसी तेथे जाऊन निश्चय करून आणाल त्याप्रमाणे आम्ही चालवूं त्याजवरून कांहीं ब्राह्मण व प्रभु मंडळी श्री वाराणसी क्षेत्रास जाऊन क्षेत्रस्थानी मोठमोठे पंडित शास्त्री ब्राह्मण विद्वान महासमर्थ यांप्रति प्रार्थना केली आणि आपलाले रीतीनें ग्रंथ समजाऊन वर्तमान सांगितले, तेव्हा श्रीपाद गुरु गोंविंदभट्ट महाविद्यावंत होते, त्याणी वाराणशीत मणिमुक्त मंडपीं समस्त पंडित मंडळी मिळवून सभा केली. शास्त्रम वादप्रतिवाद भवति न भवति होता, प्रभु हे चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रियवंश खरे. याती शुद्ध यांस त्रिविध कर्म पोडश संस्कार वेदाधिकार आहेत. असा शास्त्राधार स्थापून सर्व ब्राह्मणांची समजूत जाहली. नंतर ब्राह्मण कर्ममार्ग चालवणे यास मान्य जाहले, तेव्हां सर्व शास्त्रांचीं व पुराणांतरीचीं मतें पाहून ‘गोविंदभट्टी’ ग्रंथ करून दिल्हा. नंतर ते संन्याशी जाहले. गोविंदभट्टीमध्यें तीन कर्मे, चौल उपनयन समावर्तन इत्यादि पोडश संस्कार चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांशी वेदाधिकार गायत्रीचा उपदेश करावा, असें आहे. महारुद्रादि अनुष्ठानें ब्राह्मणद्वारा करावी. वैदिकमंत्रे नानाशांति, होम हवनें, विधियुक्त श्राद्धपक्षी चरुपिंडदानें इत्यादि करावी. असे चांद्रसेनीय प्रभूस पहिले धर्म चालवून दिल्हे. त्यांत कांहीं आक्षेप न घेता चालवावे, असे सर्व ब्राह्मणांस सांगितलें व प्रभुमंडळीस सांगितले जे तुम्हांस शास्त्रमतें वेदकर्मास व पोडश संस्कारांस अधिकार आहे. त्याअन्वयें प्रस्तुत गोविंदभट्ट ( गोविंदभट्टीस " कायस्थपद्धति" असे नाव आहे. या ग्रंथांत कित्येक लबाड व कुमाडी ब्राह्मणांनी अलीकडे फेरफार व घुसडाघुसड केली असल्याचे समजते.)
हा ग्रंथ करून दिल्हा आहे, तरी रेणुका माहात्म्यांतील व्यासोक्ति श्लोक :-
सदाचारपरा नित्यं रता हरिहरार्चने देवविप्रपितणां वै अतिथीनां च पूजकाः ॥ १ ॥
यज्ञदानतपःशीला व्रततीर्थरताः सदा ।
गर्भाधानं पुंसवनं सीमंतो जातकर्म च ॥ २ ॥
येणेप्रमाणे संस्कार व यजन अध्ययन व दान एकूण तीन कर्मे करावयास अधिकार शास्त्रमतें सांगोन आचरण करावें व करवावें असें ब्राह्मणांस सांगोन खटला मोडिला तेसमयीं प्रभुमंडळी याण गुरुदक्षणा आपले ज्ञातीय गुरुत्व दिल्हे. नंतर ते संन्याशी जाहले त्यांचे शिष्ये तीघेजण होते. ते असामी :--
१ महाबलेश्वर करवे, १ वटेश्वरभट १ दिनकरभट्ट टकले. एकूण तीन ब्राह्मण देशस्थ त्याजपाशी शिष्यत्व करून होते. ते सर्वप्त प्रभु मंडळीस गुरु, आपली प्रतिमा करून देऊन सदरहूंप्रमाणें तीन कर्मे व षोडश संस्कार वेदोक्त मंत्रे चालवावयास सांमोन गोविंदभट्टी ग्रंथ समागमें देऊन वाराणशीहून दक्षिणेस प्रभुमंडळी व ब्राह्मण समुदाय गेले होते त्यांची रवानगी जाहली. त्यासी अजनारों वर्षे आठ साडेआठशे ( चां. का. प्रभूच्या इ. साधने यांत प्रसिद्ध झालेल्या "कायस्थ प्रभूंची बखर" यांतून वरील उतारा घेतला आहे. ही बखर शके १७९७ सन १९७५ त लिहिलेल्या अस्सल पत्राच्या आधाराने लिहिलेली आहे.) जाहली ते दक्षिणेस आले. यावर जागजागचे अमलदारांस व ब्राह्मणांस हे वर्तमान सांगितलें. तेव्हां त्यांणी सर्व ब्राह्मणांस सांगितलें जे. वाराणशीळून निश्चय होऊन आला त्याप्रमाणे प्रभु चांद्रसेनीय यांचे धर्म संस्कार चालविणें त्याजवरून गोविंदभट्टीचे अन्ययें चालवू लागले.
याप्रमाणे हे दुसरे ग्रामण्य निकालांत आलें. (१.पूर्वी ग्रामण्य शके १३९१ साली झाले, त्या समई टकले यांनी निराकरण केले जोगाईच्या आंब्याचे ठिकाणी. २.पूर्वी ग्रामण्य जोगैचे आंब्यास जाले.शक १३९१ ते समई नीलकंठ गुरु गोसावी यांनी काशीस जाऊन शंकराचार्य आणून समाधान केले. - रा.राजवाडे कृत म.इ.सा.खंड ६ लेखांक ४४४.
ग्रामण्य तिसरें
जुन्नर किंवा विजापुरचें ग्रामण्य (शके १५८५ इ. स. १६६३).
(ग्रामण्याच्या कोणत्याच यादीत या ग्रामण्याचे साल दिलेलें नाहीं. शके १७१७ त लिहिलेल्या बखरीत " अजमासे १३२ वर्षे झाली असे स्पष्ट लिहिले आहे. शिवाय कमळाकर भट्ट हे गागाभट्टाचे बंधु असून सन १६६८ त हयात होते. त्यावरून या ग्रामण्याचे साल शके १५८५ सन १६६३ असावें असें वाटतें व म्हणूनच ते वर दिलें आहे. *प्रभुकुलदीपिका पृ. १५३. दुसरे ग्रामण्य कोंकणांत जालें. ते समयीं काशीस जाऊन पत्र आणून निराकर्ण जालें, शक- "-रा. राजवाडे कृत म. इ. सा.खंड ६ लेखांक ४४४.)
या ग्रामण्याचें नक्की साल उपलब्ध नाहीं. रा. रामराव नारायण प्रधान यांच्या मतें "हे जें विजापुरचें ग्रामण्य म्हणवितें तें असावे यांची कांहींच हकिकत उपलब्ध नाही. कायस्थ प्रभूंच्या बखरींत जुन्नरच्या ज्या ग्रामण्याचा उल्लेख केला आहे त्यावरून पाहता जुन्नरचें ग्रामण्य तेंच विजापूरचें ग्रामण्य असावें असें वाटतें. या ग्रामण्याबद्दल प्रभुकुलदीपिकाकार म्हणतात." नुलकर काशीस जाऊन निराकरण करून शंकराचार्यांची पत्रे घेऊन आलें. बखरीत हकिकत आहे ती अशी :--
अधिराज्य यामुळे सर्व जातीचे मलिन आचार, ब्राह्मण यातीत भक्षाभक्ष करण्यांत विधिनिषेध मानीत ना, तेव्हां कोणी भटोबा दीक्षित वाराणशी क्षेत्र गेले. तेथे शास्त्रविचार पाहतां कलियुगी यज्ञाशिवाय हीन कर्मे मांसभक्षण नसावें, असें पाहुन दक्षिणदेशी ब्राह्मणांस असें सांगून वर्तवू लागले. त्यापासून दक्षिणदेशींचे ब्राह्मण नर्मदे अलिकडील चालवू लागले. नर्मदा उत्तरतीरींचे ब्राह्मण ऐकेनात. ते अद्यापी सामवेदाध्यवन व व्याकरण शास्त्राध्ययन मांसाहार करितात. दक्षिणेंत भटोबा दीक्षितांनी आचार करविला त्यापासून शुद्ध आचरणें चालवू लागले. त्यास (शके १७१७ पूर्वी चारशे वर्षे म्हणजे शके १३१७.) चारशे वर्षे अजमासें जाहली. त्या अन्वयें प्रभुमंडळीही आचरावयास लागली. मध्ये जुन्नरप्रांती कोणी ब्राह्मणांनी ग्रामण्य केलें. तेव्हां प्रतिष्ठितांनी आणि क्षेत्रस्थ पंडित शास्त्री यांहि शास्त्रविचार पाहून भौजीबंधनादि संस्कार प्रभुमंडळी चांद्रसेनीय कायस्थांस आहेत, असें] बालबोध शास्त्रोक्त पत्र लिहून शक व संवत्सर मिती घालून जुन्नरकर जोशी यांस पाठविले, त्याप्रमाणे तेथे संस्कार कर्मे चालली. त्यास वर्षे अजमासें १३२ जाहली. (शके १७१७ पूर्वी १३२ वर्षे म्हणजे शके १५८५) त्याच कारकिर्दीत कमळाकरभट्टजी याणीं काशीमध्ये शूद्रकमळाकर ग्रंथ, सर्व पुराण शास्त्रांतील सम्मतें पाहून केला. त्यांत चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रिय प्रभु यांची उत्पात्ति लिहिली आहे.
कै. ना. न्यायमूर्ती का. त्रि, तेलंग, हे " मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष" (पृ. १६०) येथे म्हणतात :
कायस्थ प्रभूंची बखर वाचली म्हणजे असे सिद्ध होते की वेळोवेळी विजापूर येथील मुसलमानी राज्याच्या हिंदुप्रजेमध्यें तंटे होत तेव्हा त्याचा निकाल करण्याकरिता राजाची मदत ते लोक घेत असत. उदाहरणार्थ कोकणामध्ये ब्राह्मण व प्रभु यांचा तंटा लागला तेव्हा दोन्ही बाजूचे लोक विजापूर येथील मुसलमान सुभेदाराकडे दाद मागण्याकरितां गेले, तेव्हा तो म्हणाला `आपण मुसलमान आहों तुमच्या शास्त्राचें आम्हांस बिलकूल ज्ञान नाहीं; उत्तम मार्ग म्हटला म्हणजे, तुम्ही आपलें मुख्य पवित्र स्थान में काशी क्षेत्र तेथे जावें, व तेथील पंडितांकडून आपल्या तंट्याचा निकाल करून घ्यावा. निकाल अंमलात आणणे आपले काम. ते आपण करूं असें त्यानें वचन दिलें. बखरींत पुढे असा मजकूर आहे की, दोन्ही बाजूंचे लोक खरोखरच काशीस गेले. तेथे पंडितांची मोठी सभा भरविली व पुष्कळ वादविवाद होऊन अखेरीस असा निर्णय झाला की प्रभूलोक मूळचे अस्सल क्षत्रिय आहेत, वेदांत सांगितलेली कर्मे करण्याचा त्यांना अधिकार आहे व गायत्री मंत्र ह्मणण्यासही ते अधिकृत आहेत. तेव्हा ब्राह्मणांचे समाधान झाले व नेहमीप्रमाणे प्रभूलोकांकरिता वेदकर्मे करण्याचे त्यांनी कबूल केले. याप्रमाणे सर्व व्यवस्था चालली." अशा रीतीनें हे तिसरे ग्रामण्य समाप्त झालें.
ग्रामण्य चौथें
रायगडचें ग्रामण्य (शके १५९१ सन १६६९ ).
शिवाजी महाराजानी मऱ्हाठी स्वराज्याचे कंकण हातांत बांधून अत्यंत अल्पावकाशांत दख्खनमधून मुसल्मानी सत्तेचें उच्चाटन करून स्वराज्याच्या जरीपटक्याबरोबरच स्वधर्माचा झेंडा उच्च फडकावला. या इतिहासप्रसिद्ध राष्ट्रीय कामगिरीत साह्य करणारी जीं जीं प्रमुख कतृत्ववान माणसे यदृच्छेने शिवाजीला लाभली त्यात बाळाजी आवजी चित्रे चिटणीस हे अग्रगण्य होत. बाळाजीच्या अचाट बुद्धिमत्तेच्या तोडीचा पुरुष फक्त तोच. त्यांचा पराक्रम जितका व्यापक तितकी त्याची स्वामीभक्तीही अभंग होती. मराठे राज्यकत्यांच्या व पेशव्यांच्या अमदानीत स्वपराक्रमानें उदयास आलेली सगळ्या महाराष्ट्रांत जितकी घराणी आहेत, त्या सर्वांत चिटणीसांच्या घराण्याचा स्वामीभक्तीमध्यें पहिला नंबर आहे. या घराण्यांतील प्रत्येक पुरुषा-प्रसंगोपात् स्त्रियानीसुद्धा आपल्या स्वामीभक्तीची कमाल करून शेवटपर्यंत मराठी राज्याची मोठया इमानदारीने सेवा केली. पिढ्यानपिढ्या एकसारखे स्वामीसेवेत एकनिष्ठेनें पाळणारे एखादे घराणें महाराष्ट्राच्या किंवा हिंदुस्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासांत तरी असें सापडेल किंवा नाहीं याची शंका आहे.
निष्कपट स्वामीभक्ती, कडकडीत निस्पृहता, अचाट बुद्धिमत्ता, टापटिपीचा कारकुनी बाणा आणि बिनचूक धोरणी दृष्टी या विशेष गुणांच्या योगानें शिवाजीमहाराजांना बाळाजी इतका प्रिय झाला होता की "बाळाजी माझा प्राण" असे त्यांनी वारंवार म्हणायें. बाळाजीच्या सल्लामसलतीवाचून महाराजांचे कोणतेही राजकारण होत नसे. मूर्ती दोन पण कृती एक; आचार विचार एक याप्रमाणे महाराज व बाळाजी यांची जोडी यद्दच्छेनें एके ठिकाणी मिळाली तिने आपल्या संयुक्त कर्तबगारीने सर्व हिंदुस्थान हालवून सोडलें. बाळाजींच्या सल्ल्यावांचून राज्यात पानही हालेना. दरबारांत बाळाजीचें वजन व वचक फार वाढला. बाळाजीपुढे अष्टप्रधान व सरदार इत्यादिकांचे तेज मुळींच पडेना! बाळाजीच्या बुद्धिमत्तेपुढे वेळोवेळी सर्वांना खाली मान घालावी लागे. अशा प्रकारें वारंवार तेजोभंग होऊ लागल्यामुळे पेशवे वगैरे ब्राह्मण सरदारांच्या मनांत बाळाजीबद्दल वैषम्य उत्पन्न झाले व ते आंतून त्याचा द्वेष करू लागले. परंतु महाराजांची बाळाजीवर विशेष कृपा असल्यामुळे व ते त्याच्या संरक्षणास सदैव तत्पर असल्यामुळे बाळाजीचा एक केंसही वांकडी करण्याचें धैर्य कोणास होईना!
एकदां तर बाळाजीला विषप्रयोगहि करण्याचा प्रयत्न या मत्सरी दरबारी मंडळीने केला. परंतु बाळाजीच्या धूर्ततेनें व महाराजांच्या दक्षतेनें तो दुष्ट बेत सिद्धीस गेला नाही. अशा प्रकारे बाळाजी व दरबारी मंडळी यांचा द्वेष दिवसानुदिवस वाढत गेला. या संबंधानें रा. ब. बा. आ. गुप्ते यांनी चां. का. प्रभूंच्या इतिहासाची साधनें नामक मासिकांतील `ग्रामण्याच्या हकिकती त उल्लेख केला आहे तो असा :--
बाळाजी आवजी चिटणीस चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांजवर महाराजांचा पूर्ण लोभ, व यांचे निष्ठेनें वागणें होतें, व राज्यकारणाचे व राज्य साधण्याचे प्रसंग हरवक्त चालू होते. तेव्हां राज्यकारणी लिहिणें चिटणीसी, त्यांत विश्वासू कल्पक, कर्तेपणा व स्वामिलोभ यामुळे सर्व राज्यकारण संस्थानिकांकडील बोज ठेवून सर्वाध्यक्षपणे वागूं लागले. यामुळे पेशवे यांचे वागणें तेज कमतर सहजी जाहलें, चिटणीसीस कारभार, गुप्तपणा व एकांत सहजी येतो तो होऊ लागल्यामुळे पेशवे व कारभारी मंडळ यांस वैषम्य वाटून द्वेषास प्रवर्तक झाले. परंतु कारभारांत वगैरे अकलेनें चिटणीस यांस माजी करावें ही आक्रमणशक्ति नाहीं, खावंद सुज्ञ जबरदस्त यामुळे न चाले.
याच सुमारास दुसरी एक अशीच महत्वाची परंतु विषादकारक गोष्ट घडून येत होती. आणि बाळाजीसारखा तडफदार दृढनिश्चयी माणूस जर त्यांत मन न घालता तर मराठी राज्यसंस्थापना ही गोष्ट स्वप्नवत् झाली असती. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी हे एक त्याकाळचे मोठे मातबर उमराव होते व त्यांना विजापूरच्या सुलतानाकडून राजा हा किताब मिळाला होता इतकेंच नव्हे तर शहाजीराजे त्या वेळचे “किंगमेकर”च होते, असा सर्व स्वदेशी विदेशी इतिहासकारांचा एकमताचा अनुवाद आहे. शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापनेचा उद्योग करीत होते हे खरें पण त्यांचे कूळ म्हणजे केवळ एका बड्या सरदाराचें असून त्याच्या तोलाची दुसरीहि पुष्कळ मराठ्यांची घराणी त्यावेळीं अस्तित्वांत होती. त्यापैकीं ज्या कांही थोड्या मराठे सरदारांनी शिवाजीस साह्य केलें होतें ते त्यास आपला पुढारी मानीत होते. आणि राजकारणप्रसंगी जेव्हां तो उच्चासनावर बसे तेव्हां ते त्याला मुजरेही करीत, परंतु शिवाजीच्या कर्तबगारीची किंवा तिच्या ऐतिहासिक महत्वाची खरीखुरी जाणीव त्यांना न झाल्यामुळे केवळ वजनदार सरदारकीच्या समानतुल्य भावनेमुळें, शिवाजीपुढे वाकून मुजरे करण्याच्या कामी त्यांची संकोचवृत्ति वारंवार आड येऊ लागली, त्यांची शुद्ध मनें दिवसेंदिवस गढूळ होत चालली आणि कित्येकांनी तर शिवाजीच्या दरबारास हजर राहण्याची टाळाटाळ चालविली. दूरदर्शी शिवाजीमहाराज व तीव्रबुद्धी भाळाजी यांनी ही गोष्ट प्रथमपासूनच ताडली होती व या गोष्टीला काय उपाय करावा याबद्दल उभयतांच्या गुप्त मसलतीही चालल्या होत्या. त्यांत बाळाजीनें महाराजांस असें समजाविलें की, "पायाशुद्ध राजगादीची स्थापना करून राज्याभिषेकानें महाराज हे पद आपण प्राप्त करून घेतल्याशिवाय या लोकांची तोंडे बंद व्हावयाची नाहीत." बाळाजीचे म्हणणे सप्रमाण अर्थात् तं महाराजांस तेव्हांच पटले आणि त्यांच्याच अनुमतीनें बाळाजीनें हा प्रश्न दरबारांत उघडउघड काढून त्यावर चर्चा केली. त्यावेळीं क्षत्रियाशिवाय इतरांस राज्याधिकाराचा हक्क नाहीं, असें म्हणून पेशवे पंडितराव वगैरे ब्राह्मणांनी व मराठे सरदारांनी त्याचा निषेध केला. शिवाजी महाराज शुद्र असतां त्यांस राज्याभिषेक करणं म्हणजे धर्मच बुडविणें होय, असे निक्षून सांगून त्यांनी बाळाजीचे म्हणणे अगदीच फेटाळून लाविलें आणि धर्माच्या पोकळ राबीखाली आपल्या अंतःकरणाचा पोकळपणाहि व्यक्त केला. बाळा आपल्या बुद्धिचातुर्याने सर्वात निरुतर करीत होता परंतु शेवटी ब्राह्मणांनी हेका धरून आपला हट्ट शेवटास नेला. या कामी महाराजांचे मुख्य प्रधान पेशवे मोरोपंत पिंगळे हे विरूद्ध पक्षाचे अध्य होते. काय वाटेल ते होवो महाराजांस विधियुक्त राज्याभिषेक करवीनच असा आपला दृढनिश्चय बाळाजीनें तर स्पष्ट बोलून दाखविला. तेव्हां पूर्वीच्या मत्सरांत अधिकच भर पडली व द्वेषाग्नीच्या ज्वाला भडकूं लागण्याची स्पष्ट चिन्हें दिसूं लागली. निश्चयी बाळाजी म्हटल्याप्रमाणे राहणार नाही हे मात्र त्याचे प्रतिस्पर्धी जाणून होते.
राजकीय वातावरणांत होत असलेल्या फेरफारांच्या योगानें ज्या मोठमोठ्या भानगडी उत्पन्न होत त्यांत बाळाजीवर वर्चस्व करण्याची ताकद व धैर्य त्याच्या प्रतिस्पर्ध्यात नसल्यामुळे शिवाजी महाराजांच्या दरबारी मंडळांत दुफळी पडली. एका बाजूला शिवाजी व बाळाजी आणि दुसऱ्या बाजूला प्रधानमंडळ व मराठे सरदार. उभयपक्षी स्पर्धा चाले. पण बाळाजीच्या प्रतिपक्षाचा द्वेष मात्र भयंकर वादूं लागला. इतक्यांत बाळाजीने स्वतःच्या मुलांच्या मुंजी करण्याचें ठरवून समारंभ शुरू केला.
तेव्हां ब्राह्मण्याचें बल काढून ग्रामण्य करण्यास प्रारंभ केला. बाळाजी चिटणीस यांचे पुत्र ज्येष्ठ आवजी बाबा म्हणोन होते, त्यांचा व्रतबंध करावयाचा त्या समयीं पिंगळे यांणी ब्राह्मणांकडून कुचेष्टा करून बोलणें घातलें. जे तुम्ही क्षत्रिय म्हणोन तीन कर्मे करीत आला. व करितां त्यास कलीत क्षत्रिय नाहींत. तेव्हां तुम्ही क्षत्रिय कंठील व ब्राह्मणही तुम्ही नव्हे त्या अर्थी मुंजी करूं नये. करू देणार नाही. त्याजवरून चिटणीस याणी सांगून पाठविलें की, कारभारासंबंधी द्वेष, त्यास कामानिमित्त सरकार कल्याणाची चाकरी करून आम्हांस माजी करून हात दाखवावा, तें सोडून ब्राह्मण्यावर येऊन सांगून पाठवितां हे आश्चर्य आहे पूर्वीपासून वेदोक्त तीन कर्मे आचरण करीत आलों आहों व ब्राह्मण करीत आले. नवीत आहे असे नसतां कलीत क्षत्रिय नाहीत म्हणतां हे, रिकामे दांत खाऊन अवलक्षण देणे चांगले दिसत नाहीं. वरकड मागे करीत आलों. पुढेही होईल, तुम्हीच एक ब्राह्मणांत अध्वर्यु आणि तुमचेच हुकुमांत सारे ब्राम्हण आहेत असे नाही. बहुत और ब्राह्मण पुष्कळ आहेत. शास्त्रग्रंथ लटके होतील असे घडणार नाही. लटिका कलह वाढवू नये.
परंतु या उत्तराने पेशवा व त्याचे पक्षपाती यांचा दुराग्रह सुटला नाही. बाळाजीनें मुंजी थांबविल्या नाहींत, तेव्हां ब्राह्मणांनी हातघाईवर येऊन दंगा करण्यास सुरवात केली. रघुनाथपंत अमात्याने घटिका विछिन्न करून घंगाळ उडवून टाकलें. मोरोपंत पेशवे व बाळंभट चितळे यांस बाळाजीने सांगितले की, “तुम्ही महाराजांच्या पट्टाभिषेकाचा विषय चित्तांत धरून निक्षेप करीत आहांत त्याअर्थी मी अशी प्रतिज्ञा करितों कीं, प्रथमतः महाराजास राज्याभिषेक करवून नंतर माझ्या मुलांच्या मुंजी करीन.” मत्सराने फुरफुरलेल्या या दांभिक धर्माभिमानी ब्राह्मणांची समजूत घालण्याचा अटोकाट यत्न करण्यांत आला. परंतु मत्सर दुराग्रह न सुटे तेव्हा त्या सालीं मुंजी तहकूब करून नंतर हे सर्व वृत्त महाराजांस श्रुत केलें व परस्परे ऐकण्यातही सरकारांत आले. तदनंतर एक-दोन रोजी महाराजांनी चिटणीस यांस एकांती बोलावून आणून या गोष्टीची चर्चा भवति न भवति फार जाहली. क्षत्रिय आहेत किंवा नाहीत हे दाखवावयाचे परंतु यास अनुकूल ब्राह्मण मंडळी होणार नाहीं. याकरितां तुम्हांसही अडवून बोलतात. वरकड त्यांचे कांही चालतच नाहीं. परंतु तुम्ही आपलें प्रकरण क्षेत्र पाठवून संगत आणवादी आणि कार्यसिद्धी करावी.
याप्रमाणे मुंजी तहकुब करून घडलेले वर्तमान बाळाजीनें महाराजांस कळविलें. बाळाजीची प्रतिज्ञा ऐकून महाराजांस मोठा संतोष वाटला. त्यांनी लागेल ती मदत देण्याचे बाळाजीला आश्वासन दिलें. त्यानंतर महाराजांबरोबर गुप्त मसलत करून बाळाजीनें काशीहून गागाभट्ट नामें महापंडित आणून त्याच्या हस्ते राज्याभिषेक करवाया असें ठरविले. तेंव्हा महाराजांच्या अनुमतीनें गागाभट्टास आणण्याकरितां त्यानें केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित व सोमनाथभट्ट कात्रे या त्रिवर्गास गागा भट्टजीस आणण्यास काशीस रवाना केलें. या त्रिवर्ग भट्टजीनी काशीस जाऊन महाराजांच्या पैशाचा मात्र फन्ना उडवला व गेले तसे हात हालवीत परत आले. येतांना शिवाजी महाराजांस छत्र सिंहासनाचा अधिकार नाहीं` अशा अर्थाचें गागाभट्टाचे पत्र मात्र घेऊन आले. त्यावरून महाराजांसहि वाईट वाटलें. आपला सर्व व्यूहच ढांसळून तडतो की काय असें त्यांना वाटलें. तेव्हां बाळाजीनें महाराजांस समजाविलें कीं, या पंडित व सर्वज्ञ ह्मणविणाऱ्या ब्राह्मणांस आपल्या पूर्वजांविषयीं असावी तितकी माहिती नसल्यामुळे त्यांना आपलें प्रकरण गागाभट्टास नीट समजावितां आलें नाहीं. तेव्हां पुन्हां दुसरा कोणी जाणता माणूस पाठविला पाहिजे. आपल्या पदरच्या ब्राह्मणमंडळीने जाणूनबुजून हा खोटप्रकार केला असला पाहिजे हे महाराजास न समजण्याइतके ते दुधखुळे खास नव्हते. म्हणून त्यांनी निळो येसाजी प्रभू पारसनीस यांस पाठविण्याविषयी सांगितले. त्यावरून निळो येसाजी काशीस गेले, त्यांनी गागाभट्टजीस सर्व मजकूर यथातथ्य समजावून सांगितला व शिवाजी राजे शुद्ध क्षत्रिय आहेत अशी त्यांची खात्री करून दिली. शिवाजी महाराजांची वंशावळ उदेपुराहून आणून, तेथील राजघराण्यांतीलच हे एक राजपुरुष आहेत असा पुरावा बाळाजीने आधींच आणून निळो येसाजीजवळ दिला होता. त्यावरून खात्री होऊन गागाभट्टजी रायगडास आले.
रायगडास आल्यावर गागाभट्टांनी आपल्या पूर्ण खात्रीकरितां पुन्हां चौकशी करून अनेक ग्रंथ पाहून शेवट असा निर्णय केला की ‘शिवाजी महाराज हे शूद्र त्यांना राजसिंहासनाचा अधिकार नाही.’ येथेंहि गागाभट्टाच्या कानाचा चावा घेण्यास मत्सरी चिलटांनी संधि साधली नसेल असें म्हणवत नाही. आमच्याजवळ असलेल्या एका अप्रकाशित बखरीत म्हटलें आहे.
श्रीमन्नंदनवन गौरी त्रिकंटक वाराणसी क्षेत्रस्थ गागाभट्ट भट्टोजी दिक्षित वंशान्वय संजात श्रीमन्ना सिहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमछीवाजी महाराज यांस पट्टाभिषेक करण्याकरिता श्री महाक्षेत्रीहून आणिल, तें समय चांद्रसेनीय प्रभु कायस्थ यांचा सिंहासनाधिकार हे क्षत्रिय आसा निर्णय करून शूद्रास अधिकार नाही असे स्पष्ट नूतन गागाभट्टी म्हणोन ग्रंथ संपूर्ण शास्त्र पौराणातर इतिहास वाक्यें आनंकूल घेऊन केला. ते समयी मोरोपंत पेशवे व निलो सोनदेव मजमदार याणी गागाभट्टास येकांती आपले घरी नेऊन नानाप्रकारें समजाविलें कीं तुम्हीं प्रभूंचा अधिकार राज्याचा स्थापित केला. शुद्राधिकार नाहीं. तेव्हां यांचे कुळांचें ठायीं कोणी उत्पन्न होईल तो आमचा अधिकारी असाच निर्णय झाला. म्हणोन आपले स्वसामर्थ्ये राज्य करतील. सिंहासनाधीश्वर होतील. परंतु महाराजांनी श्रम करून तुम्हांस आणले यांचा अधिकार तरी नाहीं उगाच ईश्वर वरप्रसादेकरून भाग्यवान होऊन ऐश्वर्यवान जाल्यामुळे तुम्ही एखादा विचार काढून यास राज्याभिनिवेश कराल हाच विचार यातील किंवा दुसरा प्रकार तो सांगावा.
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याकरिता भीम प्रयत्न करून बाळाजीनें गागाभट्टास रायगडास आणलें तेव्हांच त्याचे प्रतिपक्षी चीत होऊन गेले. पुढे जेव्हां गागाभट्टानें राज्याभिषेकाचा अधिकार बाळाजीसच आहे. शिवाजीस किंवा इतर दुसऱ्या कोणासही नाहीं असें सांगितलें तेव्हां तर या ब्राह्मण मंडळीचा धीर अगदीच सुटला व त्यांनी आपल्या पगडया लागल्याच फिरविल्या. बाळाजीला राज्याभिषेक होण्यापेक्षां तो शूद्र (?) शिवाजीस झाला तरी पत्करला. असा विचार करून मोरोपंतादि मंडळीनें गागाभट्टाजवळ तसे बोलणें चालविलें.
त्यावरून गागाभटजीनी सांगितले की हे चांद्रसेनीय क्षत्रिय यांचाच अधिकार सिंहासनाचा याणी हजारो रुपये खर्च करून आपला स्वधर्म निर्णय करण्याकरिता केले आणि त्यांचे पूर्वाधार जाणून आम्हीं मान्य करून क्षेत्री ग्रंथ करून आणिला व त्यांनी आम्हांस अगत्यांनी आणिलें त्यापेक्षां आधर्म करणें, ज्ञातीस दोष ठेवणें हे महानिन्न्द्य कर्म. आमचे हस्ती कसें होते. अशी गोष्ट तुम्हीही बोलों नये.
मशारनिल्हे उपद्व्यापी मंडळींची गागाभटजींनी याप्रमाणे संभावना करतांच शेवटचा उपाय म्हणून खुद्द शिवाजी महाराजांचे कान भरतां आले तर पहावेत म्हणून ते त्यांची भेट घेण्यास गेले, आणि-
मोरोपंतानी व निलोपंतानी सविस्तर मजकूर माहाराजास समजाविला आणि तुम्ही शुद्र, तुमचा सिंव्हासनस्थ होण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट भटजीनी आम्हाजवळ सांगितले. तेव्हा आम्ही त्यास विचारले की महाराजानी एवढा साहस करून आपल्यास आणिले कारण मिळोन संपूर्ण पृथ्वींतील सार्वभौम पदवी आपणास प्राप्त असावी करावी, त्याप्रमाणें ईश्वर अनुकूल होऊन येश येत आहे. तेव्हां गागा भटजीनी तरी आपला अधिकार काही निर्णय केला. यावरून बाळाजी बाबानी आपले साधनाकरीतां आपल्यास भरीस घालोन आपला मतलब साधून आपली शुद्धता केली.
दुसरी एक आम्हांजवळील अप्रकाशित बखर म्हणते:
गागाभट्टी (गागाभट्टी हा ग्रंथ निःपक्षपाताने लिहिला नाहीं असा गागाभट्टावर जो आरोप आहे तो खरा आहे याचें हें बलवत्तर प्रमाण आहे) केली तीसमयी कायस्थप्रभु क्षेत्रीय राजाधिकारी ठरविले. त्रयकर्माधिकारी. ते रघुनाथपंत अमात्य याणी पाहून राजास सांगितलें गागाभट्टास आणीन तुम्ही आपले घर आपले हातून बुडवून प्रभुचे हरी राज्य घातले. आज तुम्ही धणी आहांत परंतु शुद्र. तुमचा अधिकार नाही असा निर्णय साफ लिहिला.
याप्रमाणे मोरोपंत पेशवे, निळो सोनदेव व रघुनाथपंत अमात्य हे निघे राज्यभिषेकाच्या कट्टे विरूद्ध असलेले ब्राह्मण आतां राज्याभिषेकाला अनुकूल असा वेदांत सांगू लागले. त्यांच्या एकांताचा महाराजांच्या मनावर परिणामहि झाला. बखर पुढे म्हणते :
आपल्या प्रयत्नाची निर्फळता दिसोन आली. त्यावरून त्यांची बोलणी यथार्थ अंतःकर्णास वाटून गागाभटजीस महाराजांनी एकांती नेऊन हे उभयता कारभारी घेऊन ग्रंथ काढवून कल्पना घेऊन नानाप्रकारे विचारिलें. परंतु क्षत्रिय वर्ण शुद्ध यांस दोष आमचे हस्ते लाववत नाहीं असें गागाभटजीनों साफ उत्तर केलें. तेव्हां बरे बोलू म्हणत ती वेळ कचेरी मोडून भालचंद्र भट पुरोहित यास महाराजांनी सांगून धर्माधिकार तुम्हांस वंशपरंपरेनी देऊ. परंतु आमचा अधिकार राज्याचा ग्रंथ समते निर्णययुक्त करऊन प्रभूस दोष ठेऊन अधिकारापासोन च्युत करावे अस सांगितल्यानंतर भालचंद्र भटजीनी गागाभटजीस काही लोभप्रद भाषण करून दोष लावितों असे बलोन आभय घेऊन महाराजांस श्रुत केलें, नंतर चांद्रसेनीय यांस दोष ठेवून महाराजास अधिकारपरत्वें वाक्यें लाविली.
वास्तविक शिवाजी महाराजांना विधियुक्त राज्याभिषेक व्हावा ही मूळ प्रतिज्ञा बाळाजी आवजीची. अर्थात् शास्त्रसंमताने त्यांच्यावर जरी गागाभट्टाने राज्याभिषेकाची शाब्दिक बळजबरी करण्याचा घाट घातला होता, तरी बाळाजीनें त्याला मुळीच संमति दिली नाहीं. परंतु नेहमीं द्रविडी प्राणायामाच्या कसबांत मुरलेल्या त्याच्या ब्राह्मण प्रतिस्पर्ध्याना आतां मात्र बाळप्रभूला राज्याभिषेक खास होणार ही भिती पडून त्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या उलट्या कारस्थानी मंत्रांनी भारण्याचा व्यर्थ यत्न केला. असो! कोणत्या का मार्गानें होईना, अखेर बाळाजीचे प्रतिस्पर्धी बाळाजीच्याच प्रतिज्ञेचा पुरस्कार करण्यास तयार झाले. याप्रमाणे व्यवस्था होऊन राज्याभिषेकाची तयारी झाली. तरीसुद्धां गागाभट्टाचें मन तयार होईना ! पण-
शिवाजीचे भरगच्ची स्वागत अनुभवून गागाभट्ट अगदी खुष झाले. व त्यांनीच कल्पना काढीली की. मुसलमान पादशहा सिंहासनावर बसून छत्र, अबदागीर इत्यादि राजचिन्हें जर धारण करितात, तर मग इतका पराक्रम करून ज्याने एवढे राज्य स्थापिलें, त्या शिवाजीने राजचिन्हें धारण करू नयेत हे काही योग्य नव्हे. या (महाविद्वान पंडितास राज्याभिषेक)(मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष पृ.१६४) समारंभाकरिता मुद्दाम आणविलें होतें. परंतु राज्याभिषेकाच्या वेळेस लागणारे मंत्र गागाभट्ट म्हणेना. सबब राजकीय धोरण त्याजपुढे मांडावे लागलें.(कित्त पृ.१६३)
वरील हकिकतीप्रमाणे एकंदर प्रकार होऊन नंतर गागाभट्टानें शिवाजीस राज्याभिषेक करविला. राज्याभिषेक समारंभ समाप्त होतांच बाळाजीनें लागलेंच आवजी बावा यांच्या व्रतबंधाचा समारंभ मोठा करविला. सर्व शिष्ट व महाराज समारंभांत येऊन सांग केला. ग्रामण्यें बहुत वाढून उपहास कटकट कांहीं जाली नाहीं. थोडक्यांतच परिमार्जन होऊन मत्सर पाहणार त्यांची निशा जाहली.
गागाभट्टीमध्यें गागाभट्टानें आपल्या जातीला दूषण लागेल असा मजकूर मागाहून घातला हें वर्तमान बाळाजीस समजले :--
ते समय बाळाजी बाबांनी गागाभटजीस विचारलें, त्यांणी उत्तर केलें की बाबा, हा समय असाच आहे. समजेल त्यास या ग्रंथेकरून तुम्ही अधिकारी योग्य आहांत. न समजल्यास नीटच आहे, लिहिलें तें प्रमाण बोलोन व्यंगीतें गुहा होती ती समजविली.
याप्रमाणे हे ग्रामण्य निकालांत निघाले. यावेळचे एक पत्र उपलब्ध झालें आहे तें असें :---
राजमान्य राजश्री समस्त चांद्रसेनीय प्रभु लोक वर्णोचित स्वधर्मपारायण यांस :
प्रति रघुनाथ पंडित पंडितराव कृतानेक आशिर्वाद, तुम्हा लोकांचे घरीं पंचमहायज्ञ व श्रावणी व मुंजी व इष्ट पूर्तादिक सकल कर्मे यथोचित मार्गे करण्यास ब्राह्मणांचे तर्फे खळखळ होती यास्तव समस्त पंडित मंडळी श्रीमत् महाराज राजश्री राजे यानी मेळवून “ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा. त्यांत कोणी बखेडा करूं नये. धर्मस्थापनेकरिता आमचें साहस त्यांत अधर्माचा दोष न यावा” अशी आज्ञा जाली. त्यावरून यथाशास्त्रार्थ ग्रंथावलोकन करून निर्णय चांद्रसेनी शुद्ध क्षत्रियवर्ग सिद्ध जाल्यानंतर श्रीक्षेत्री सरकारांतून गोविंदभट्ट खेडकर यांस राजश्री बाळाजी आवजी चिटनीस यांनी विनंती महाराजांस केल्यावरून पाटविलें. तेथें श्रीमच्छंकराचार्यान्वय सद्गुरु अनंतदेव स्वामी व गागाभट्ट आदि क्षेत्रस्थ यांनी निर्णय करून शास्त्रमार्गे तुमचा धर्म यथोचित संगती लेहून पाठविली. चांद्रसेनी दालभ्यगोत्री प्रसिद्ध राहतील क्षत्रियवर्ण कलयुगी आहेत. त्यावरून कोकण प्रांती महालोंहाली कळविले आहे. ती पत्र कोण न दाखवितां द्वेषबुद्दीनी कर्म करण्याचालविण्यास बखेडा करतील ते देवाब्राह्मणांचे द्रोही व राजदंडास अधिकारी होतील व ज्ञातीचे अपराधी समजोन यथा शास्त्र वेदोक्त कर्म करावें. मिती शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे, मार्गशीर्ष शु॥। ११ सु. सितेन सबेन आलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद,
याच ग्रामण्याबद्दल आणखी कांही संशोधकांचे उतारे उपलब्ध आहेत, ते खालीं नमूद करून हे चतुर्थ ग्रामण्य येथे पुरे करू.
(१) " तिसरे ग्रामण्य रायगडी बाळाजी आवजी चिटणीस यांचे पुत्राचे गुंजी समयीं रघुनाथ पंत अमात्याने केले घटिका विच्छिन्न करून आरंभ केला तेसमयी शिवाजी महाराजांनी ब्राह्मण मिळवून शास्त्रार्थ करून पंडितराव यांची पत्र देऊन ग्रामण्याचे निराकरण केले. शके १५९१ (इ. स. १६६९) प्रभु कुलदीपिका पृ. १५०.
(२) " तिसरे ग्रामण्य चिटणीसांचे आवजी बल्लाळ याचे मुंजी समय रघुनाथपती केलें तें
निराकणं गणेश जोशी दिक्षित शास्त्री टलके यांनी केले शके १५९१.
-रा. राजवाडे म. इ. सा. खंड ६ लेखांक ४४४ पृ. ५२३.
(३) "बाळाजी आवजीचे चिरंजिवाचा व्रतबंध, शके १५९५ साधारण नाम संवत्सरे सन इहिदे सबैन अलफ,
ब्राह्मण यांनी ग्रामस्य घंगाळ लवंडिलें, मंत्रानुप्रचित मुलाची पाहून रजा दिली सबब शुद्रास राज्याभिषेक करणे अभिमान धरून संमत काशीचे आणले. नंतर गागाभट आले. त्यास संमत न देता ब्राह्मण तेव्हा चिटणीसासी तंटा केला. हा कलुष मनांत आणून कारभारी अनकूल जाले. मंत्रोपदेश करविला. नेम पूर्वी ठरला होता सा। चांद्रसेनीस न करणे, गागाभटजी लि॥ त्यास आणावयास गोविंद खेडकर पाठविले. निळो सोनदेव याची मुजूमी काढली. पुढे रघुनाथपंत चांदीहून आले. त्यांनी रदबदली करून वस्त्र मुगी दिली. शके १५२३ विरोधकृत संवत्सर, इसने सबैन अलफ
-रा. राजवाडेकृत म, इ. साधनें, खंड ६ लेखांक ४५९, पृ. ५४६ / ४८..
ग्रामण्य पांचवें.
कल्याणप्रांतीचें ग्रामण्य (शके १५९३ इ. स. १६७१)
हे ग्रामण्यहि श्रीशिवछत्रपतीच्या कारकीर्दितच झाले परंतु या ग्रामण्याची सविस्तर हकिकत उपलब्ध व्हावयाची आहे. रा. रामराव नारायण प्रधान म्हणतात :---
(हे) ग्रामण्य कल्याणप्रांती झाले. ते समयी रघुनाथ पंडित यांची पत्रे. कोकणप्रांती येऊन निराकरण केलें. शके १५९३. प्रभुकुलदीपिका, पृ. १५३.
-रा. राजवाडे मू इ. साधनें खंड ६ लेखांक ४४४ येथे म्हणतात :---
या ग्रामण्यासंबंधानें आम्हांस एक पत्र उपलब्ध झालें आहे ते येथे देतो :
`महाराज राजश्री शिवराज वर्णाग्रामोची व यथा शास्त्रोक्त स्वधर्मपरायण राजमान्य राजश्री समस्त प्रभु लोकासी प्रती पंडित रघुनाथ कृतानेक आशिर्वाद तुम्हा लोकांचे घरी पंचमहायज्ञ श्रावणी इष्टपुर्तादिक सकल कर्मे यथोचित मार्गे रावयाची. तुमचे तर्फेनें व ब्राह्मणाचे तर्फेनें खळखळ पडते. यास्तव कोणाचे कर्म मार्गे सांग होत नाही याबद्दल रा. बाळाजी प्रभु याणी श्री यासी विनंती करून श्री वाराणसीस वेदमूर्ति गोविंदभट खेडकर हे पाठवून सदगुरू अनंतदेवस्वामी व गागाभट भटवंशी याजकडोन सकल शास्त्रर्थं निर्णय मार्गे तुमचा धर्म चाले असा कायस्थप्रदीप म्हणवून उत्तम ग्रंथ आणिला तो देशामध्ये सकल लोकाशी संमत असे म्हणवून बाळाजी आवजी अदिकरून येणेप्रमाणे सकल धर्मकृत्य व्यवहार चालत आहे. त्यावरून आपली कर्मे करीत जाणे म्हुजे सर्वांसमते असे जो कोणी शास्त्रार्थ टाकून अन्यथा पाखांड करतील ते देवाचे व ब्राह्मणाचे व राज्याचे व जातीचे अपराधी असे दंड पावेल. यास्तव सदर्हू शास्त्रोक्ताप्रमाणे वर्तत जावे. कळावे शके १५९४ पुरधेवीनाम संवत्सरे, भाद्रपद शुद्ध ६ रविवार सु। सन सला सबैन आलफ.
चां.का.प्र.इ. साधनें यांत प्रसिद्ध झालेली बखर, ग्रामण्याची हकिकत, प्रभुरत्नमाला, एथ्नोग्राफिकल नोटस इत्यादि पुस्तकांत या ग्रामण्याचा उल्लेख नाही. म.इ. साधनें खंड ६ यांत लेखांक ४५९ मध्ये रा. राजवाडे यानी जी यादी दिली आहे, तीतही याचा उल्लेख नाही.
छत्रपती शिवाजीच्या कारकिर्दीत ग्रामण्याची सुरवात शके १५८४ इ.स. १६६२ साली झाली. असा आमच्या जवळील एका बखरीत उल्लेख आहे. चौथ्या ग्रामण्याच्या शेवटी रघुनाथ पंडिताचें जें पत्र दिलें आहे तें शके १५९१ (इ. स. १६६९) चे आहे. छत्रपती शिवाजीस राज्याभिषेक (इ. स. १६७४) शके १५६९ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥। १३ स झाला प्रस्तुतच्या पांचव्या ग्रामण्यचे साल रा. रा. ना. प्रधान, शके १५९३ (सन १६७१) हे देतात, व रा. राजवाडे यांच्या पहिल्या यादीत शके १५९७ (इ. ६. १६७५) हे साल दिले आहे. वर दिलेले पत्र शके १५९४ (इ. स. १६७२) चें आहे. या दोन्ही ग्रामण्याच्या सनांचा व हकीकतीचा विचार करितां आम्हांस असें वाटतें की हे सर्व ग्रामण्य एकच शके १५८४ पासून शके १५९७पर्यंत चालतलें होतें. छत्रपती राज्याभिषेक केल्यानंतर गागाभटजीने बाळाजीच्या मुलांच्या मुंजी लावल्या त्या शके १५२६ मध्ये. यावरूनहि हीच गोष्ट सिद्ध होते. रघुनाथपंत अमात्याची शके १५९१ व शके १९५४ ची दोन्ही पत्रे शिवाजीया आज्ञेवरून लिहिलेली आहेत हे उघडच आहे. त्यावरून असें अनुमत होतें की शिवाजी मधूनमधून ब्राह्मणांस दाबांत ठेवीत होता व "खावंद सूज्ञ जबरदस्त” यामुळेच या ग्रामण्यांत ब्राह्मणांकडून अत्याचार घडून प्रभु लोकांस विशेष त्रास झाला नाही.
ग्रामण्य सहावें.
यमाजी शिवदेव याचें ग्रामण्य. शके १६६९ इ. स. १७४७.
शाहू महाराज यांचे कारकीर्दीत यमाजी शिवदेव मुतालिक निसबत प्रतिनिधि यांणी ग्रामण्य केलें. त्यांतील मजकुराचा तपशील :--
छत्रपती शाहु महाराजांच्या कारकीदींच्या शेवटी त्यांच्या प्रकृतीस स्वास्थ्य नव्हते. त्यावेळी गोइवद खंडेराव चिटणीस व शिवाजी खंडेराव चिटणीस हे राज्याचा कारभार करीत असल्यमुळे सर्व राज्यसुत्रे त्यांच्याच हाती होती.
जीवाजी खंडेराव चिटणीस व गोविंद खंडेराव चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांजवर महाराजांचा पूर्ण लोभ व त्यांचें निष्ठेनें वागणं म्हणून यांजवर फार विश्वास त्यांत प्रतिनिधि हुजूर खासगी वगैरे कारभार पाहत होते. त्याजकडून यामाजीपंत सर्व काम चालवित होते. तरंतु मोठे राज्यकारणाचे वगैरे महाल सुभे या कामांत पंत प्रधान यांची व यमाजीपंत व जगजीवन परशराम ऊर्फ दादाबो प्रतिनिधि यांची चुरस वागू लागली. त्यात गोविंदराव व बाळाजीपंत नाना प्रधान पंत याचा अति ऋणानुबंध व नाना पेशवे यांचे बोलणे व गोविंदराव याचे बेत सरकारांत चालत असत. महादोबा बाबा पुरंदरे मुतालिक निसबत पंतप्रधान हे हुज़री हरकामात विश्वासें खावंदासीं वागत असोन यमाजीपंताचे हरवक हरएक कामात मोडते येऊन परस्परें कोणाचें करणें कोणाचे मनांत येऊ देत नसत, गोविंदराव यांची व महादोबा बाबा यांची जुगल एकदीली वागून ते यमाजीपंत यांच्या वागणुकीचा कारभार आग्रही असे याजमुळे तं चालू न देत. तेव्हा यमाजीपंत अतिद्वेष करण्यास प्रवतृला. परंतु कारभारासंबंधी महाराजाचे कृपेच्या जोरामुळे न चाले. तेव्हां ग्रामण्याचा विचार ब्राह्मणावर येऊन काही ब्राह्मणसमुदाय जमा करावें परंतु ते न चालें. तेव्हा माहुली वगैरे ठिकाण कर्मास अटकाव करावा ही योजना केली. त्यांत यमाजीपंत जातीने पढिक दोन शास्त्र अध्ययन असे होते. तेव्हां प्रभुज्ञातीवर दोष अनेक तऱ्हेचे विद्याबले आणून ग्रंथ एक केला परंतु न चालें. माहुली येथे कर्मास बखेडा केला.
याबद्दल बखरीत म्हटले आहे की :
शाहू महाराज राज्याधिकारी जाहले. त्यांचे कारकीर्दीत येथास्थित चालत असतां प्रतिनिधीचे कारभारी यमाजीपंत याणी ग्रामण्य केलें. खोट्या नूतन कवितेच्या फकीका ग्रंथांत अनन्वित लाऊन कटकटी करू लागले, तेव्हा शाहुराजा याणें कै. श्रीमंत नानासाहेब यांस साताऱ्यास बोलावून मनास आणावयास सांगितले.
तेव्हां बाळाजी बाजीरावांनी शाहू महाराजांस पत्र पाठविलें
श्रीमंत क्षत्रियकुलावतंस महाराज राजश्री छत्रपति स्वामीचे सेवेशी विनंति सेवक बाळाजी
बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना सेवकाचे वर्तमान तारीख १९ साधान महाराजाचे कृपावलोकेंकरून यथास्थित असे. विनंति प्रस्तुत सातारे यासी ब्राह्मणांनी गलबला केला आहे. त्यास काशींतील उभयतटांचे ब्राह्मण कलह करीत आहेत. त्याचे वर्तमान महाराजांनी मनास आणून समजावीस करून लावून द्यावे. प्रभूचें सुदामतप्रमाणे चालत आले आहे. त्याप्रमाणे चालवायें. त्यास अडथळा होऊ नये. [स्वदस्तूर] पूर्वापार चालत आले ते चालवावे, नवीन कज्या योग्य नाहीं. ब्राह्मणाचा निर्गमही स्पष्ट आज्ञा करून करणार महाराज समर्थ आहेत सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना,
नानासाहेब पेशव्यांचे याप्रमाणे पत्र येतांच रघुनाथ पंडित व शाहु महाराज यांनी यमाजीपंताची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु " यमाजीपंती " नांवाचा विश्वामित्री मजकुराचा एक ग्रंथ करून गागाभट्टावर चढाई करण्याच्या कोत्या आढ्यतेनें फुगून गेलेल्या यमाजीपंतावर त्याचा कांहीएक परिणाम झाला नाही.
महाराजांनी क्षेत्रास पत्र दिलें तें वर आपले हातच्या अक्षरांच्या ओळी लिहून दिलें. व पंडितराव रघुनाथ पंडित यांचे पत्र दिलें, आणि पूर्वीपासून वेदोक्त कर्मे चालत होतीं त्याप्रमाणे चालविलीं तीं पत्र.
(१) वेदशास्त्रसंपन्न समस्त ब्राह्मण क्षेत्र खंडे व क्षेत्र महाऊली उभय कृणातीर यांसी आज्ञा केली ऐशी जे, प्रभु हे पुरातन प्रांतीचे आणि तुम्हीहि याच प्रातीचे प्रभू यांची क्रियाकर्मांतरे व शुभकर्मे व उत्तरकार्ये, जे पुरातन चालत आलें तें तुम्ही जाणतच आहां ज्याप्रमाणे पूर्वीपासून चालवीत आला आहा. त्यास प्रस्तुत याच्या क्रियाकर्मांतराचा प्रसंग पडला आहे, त्यास पुरातन विजापूरचे वक्त व कैलासवासी शिवाजीमहाराज यांचे वेळेस व कैलासवासी संभाजी महाराजांचे वेळेस व कैलासवासी राजाराम महाराज साहेब मातोश्री ताराऊ साहेब यांचे वेळेस व हल्लीचे कारकीर्दीत चाल चालत आली त्याप्रमाणे उत्तरकार्ये व सर्व कर्मे चालवीत जाणे जुनें न मोडणें नये न करणे. पुरातन चालीप्रमाणे चालविणे. [खुद्द महाराजाचे दस्तूर :-] पुरातन चालवीत आला त्याप्रमाणे चालवणें नवे न करणे. जुनें न मोडणे लिहिल्याप्रमाणे वर्तणे
बहुतकाय लिहिणें हे विनंति मि।। कार्तिक शु. १५. शके १६७२
तसेंच महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंडितानीहि एक आज्ञापत्र काढिलें :--
(२) वेदशास्त्रसंपन्न राजमान्य माजश्री उभयक्षेत्र माहुली व परशुराम, स्वामी गोसावी यांसी, प्रति रघुनाथ भट पंडितराव नमस्कार विनंती उपरि, प्रभूंच्या क्रियेचा गुंता पडला यामुळे महाराज राजश्री स्वामींनी आज्ञा केली जे. पूर्ववत् कैलासवासी शिवाजी महाराज यांचे कारकीर्दीपासून क्रिया चालत असेल त्याप्रमाणे चालवावें म्हणोन महाराजानी आज्ञा केली त्याजवरून हे पत्र तुम्हांस पाठविलें आहे. तरी सुदामतप्रमाणे मनास आणेन क्रिया चालती करणे बहुत काय लिहिणें हे विनंति.
याप्रामणे शाहु महाराजांनी जरी व्यवस्था केली तरी त्याचा कांहीएक उपयोग झाला नाहीं.. प्रतिनिधी व चिटणीस यांच्यात वैमनस्य पाडावे हा जो यमाजीपंताचा उदेश तो या ग्रामण्याच्या योगानें उत्तम तडीस गेला. राज्यकारभारांत दोन तट झाले. चिटणीसांच्या पक्षाचा पूर्ण पाडाव करण्यासाठी यमाजीपंतानें कंबर बांधली. इतक्यांत बाबुराव खंडेराव चिटणीस यांनी प्रयागक्षेत्री जाऊन तेथे अतिरुद्र होम करविला. मग काय विचारता ? आगीत तेलच पडलें. ग्रामण्याचे स्वरूप उग्रतम झालें व ब्राह्मणांनी जारीने बखेडा सुरू केला.
तेव्हां नारायण दीक्षित यांनी कांहीं ब्राह्मणतेथील चित्पावन मिळवून यमाजी पंताचे लिहिणें गेल्यावरून बखेडा करणें मांडिला,
नंतर आज्ञा महाराजांनी स्पष्ट केली की, लबाड कारभार आहे, परत जावें. परत लावून दिल्हें काही चालत नाही. कर्मे वगैरे पूर्ववत यथास्थित चालली. यमाजी पंतांचे चाललें नाहीं, तेव्हा अतिशेष दीर्घद्वेष वाढला. पुढे कांहीं दिवशी महाराजांस व्यथा झाली. फार हैराण त्यांत सौभाग्यवती राणीसाहेब दादोबा प्रतिनिधि व आपण होऊन वाड्यात बंदोबस्त करून पेशवे व चिटणीस यांनी यांत जाऊ नये असे केले. आपल्या चौक्या बसविल्या. यांही आपल्या चौक्या बसवून बळेंच जावे असे होत आले. तो महाराजांचा काळ जाला. महाराजांनी बंदोबस्त करावा.. दत्तक घ्यावा प्रतिनिधिचें पारपत्य करावें, फारच याने बखेडा केला. उद्दाम झाले. त्यानंतर काळ जाला : तेच दिवशी दादोबा प्रतिनिधिस धरले व यमाजीपंत पळाले. ते कुणबीणीचें लुगडें नेसून कणगीत लपलें तेथे ठिकाण लावून तसेच बांधून आणिले उभयतास वेढा घालून कैद केलें. आणि बंदोबस्त केला. ऐसी ग्रामण्याची समाप्तनी झाली. पुढे काही दिवसांनी सोडल्यावर यमाजीपंतांनी स्वदस्तूरचें गोविंदराव यास निखालसतेनें पत्र लिहिलें तें यमाजीपंताचें पत्र- राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव गोसावी यांशी स्नेहपूर्वक यमाजी शीपदेय विनंती येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष काल छ २५ सावानी श्रीमंत, राजश्री प्रतिनिधि यांचे व श्रीमंत मातुश्रीचे दर्शन घेऊन वाड्यांतयेऊन राहिले. आम्हीही समागम होतो. आम्हास आपले वाड्यांत राहणें म्हणोन आज्ञा केली त्याजवरुन वाड्यांत येऊन राहिलो. आपल्यास वर्तमान कळावे म्हणोन लिहिलें आहे. तुम्ही पत्र पाठविले तें पावोन परम समाधान झालें तें पत्र लिहता येत नाही, भेट व्हावी हा हेतू चित्तांत उत्पन्न होऊन आपल्या मनांत. पत्र लिहिला पाहिजे. सारांश गोष्टीनें . बंधूत विपर्यास येता तोच प्रकार घडोन आला नाहीं, तरी तुमच्या आमच्या स्नेहांत प्रीतिअंतर पडावें असे नव्हतें. झाल्या गोष्टी त्या कालानुरूप घडोन आल्या. त्यांचे स्मरणहि करू नये. पुढे पूर्ववत प्रमाण प्रतीची वृद्धि करणें विहित आहे लोभ असोंदीजे हे विनति.
वरील हरिकतीखेरीज करून या ग्रामण्यांसंबंधी आमच्या जवळच्या कागदपत्रांत खाली दिल्याप्रमाणे आणखी माहिती सांपडते :
बखर १ ली :
" यमाजीपंतांनी ग्रामण्य उभे केलें. ते समयीं चिंतामण भट टकले यांस सुंदरबा पोतनिसीकडील कारकून याण आणून दिलों, चिंतामणवाया काशीस जाऊन चार हजार ब्राह्मण कासी वगैरे जमा करून विवाद केला. यमाजीपंताचे म्हणणे एक गोत्रत्रय कर्माधिकारी नीट आहे. बापूजी खंडेराव यांचे म्हणणे गोत्रे लाऊन द्यावी. त्यामुळे निर्णय न जाला. नानासाहेब पेशवे याणी समारोप करून ग्रामण्य मोडले.
बखर २ री :
“प्रतिनिधीकडून यमाजी शिमदेव वगैरे लहानथोर कारभार यांचे आईसाहेबांनी आपल्यास मिळोन अधिकारी करून आईसाहेब गोविंदरायास आनकूळ नाही हे बरे आहे. आईसाहेबास गोविंदराव अनकुळ नाहीत हे चांगले आहे. सबब व पुर्वी शूद्रास अधिकार नसता वेदकर्माधिकारी राजास केले. आता पाठिराखे महाराज नाहीत आणि ब्राह्मण धर्मास बाळाजीपंत नाना याकडे जाणार नाहीत, जाणून दाहावीस हजार ब्राह्मण गोळा करून ग्रामण्य सजले. त्यामुळे गोविंदरावानींही ब्राह्मण कांही मेळविले. सभा झाल्या त्यांत त्रयकर्माधिकारी चांद्रसेनीय दाल्य चतुष्ट्य नामाधिकारी चिटनीस खरे ठरले.”
एका पत्रांतील मजकूर
पूर्वी श्रीमंत छत्रपती महाराज शाहुराज यांचे कारकिर्दित पंत प्रतिनिधी यांचे कारभारी येमाजी सिवदेव याणी त्रिकर्माचा अधिकार नाही म्हणोन कलह वाढविला त्याजविशीं माहाराज याही सिष्टांची सभा करऊन ग्रंथांतरी शोध पाहून च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु त्रिकर्माचे अधिकारी हे खरे ठरविल्यानंतर येमाजी सिवदेव याणी आग्रह सोडला..
म. इ. साधनें, खंड ६ लेखांक ४४४ :
`ग्रामण्य यमाजी शिवदेव यांनी केले. ते समयीं काशीहून ब्राह्मण व चिंतामण गुरुजींनी निराकरण केलें.
म. इ. साधनें, खंड ६, लेखांक ४५९ :
`यमाजीपंत १६७१ ज्येष्ठ शुक्ल नाम सन खम सैन मया अलफ यानी द्वेष उत्पन्न केला. आईसाहेबास मिळोन, गोविंदराव चिटणीस व पेशवे यास कारभार करूं न देणें विचार, सबब पेशवे याजला कैद करून कासाईचे किल्ल्यावर ठेविले, वर्षभर होते.
या ग्रामण्यासंबंधाने आणखी जी पत्रे आम्हांस उपलब्ध झाली आहेत ती येणेप्रमाणे :
पत्र १ लें
श्री.
श्री मन्माहाराज छत्रपती स्वामीचे शेवेसी विनंती शेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील वर्तमान त छ १२बीलावल पर्यंत स्वामीचे कृपायलकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असो वि ॥ प्रभु चांद्रसेनीय कायस्थ यांचे ज्ञाती विषयी राजश्री यमाजीपंत आण्णा यांणी ग्रामण्य केले त्यास पूर्वीप्रमाणे ज्ञातिधर्म चालत आल्याप्रमाणे चालतात त्यास नवीन खटले वाढले त्यास चालत आल्याप्रमाणे चालविणार स्वामी समर्थ आहेत. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
पत्र २ रें
श्री.
* वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री उभय क्षेत्र माहुली व परशराम स्वामी गोसावी यांसी,
प्रति रघुनाथभट पंडितराय नमस्कार विनंती उपरी प्रभु जातीकडे कर्मे चालावी न घालावी याबद्दल कासी क्षेत्रस्थ वगैरे ब्राह्मण या उभयतांचे भोलण्यावरून गुंता पडला होता परंतु बहुत शास्त्रसंमती ग्रंथावरून निरमत्सर शास्त्री पंडिताचे विचार करु पाहता जे धर्म चालत आले आहेत त्याप्रमाणे पुढे चालावे. प्रभुचें अनादि पहातां क्षेत्रियांत तर प्रभुझाती आहे. केवळ नवी म्हणावी वादविवाद करावा हें योग्य नाहीं. म्हणौन क्षत्रिय कुळावतंस राजश्री स्वामीनी उभयताचे ब्राह्मणांस स्पष्ट सांगून समस्त ब्राह्मण क्षेत्रादि यांस पत्रे लिहिण्याची आज्ञा जाहाली त्याजवरुन हे पत्र तुम्हास लिहून पाठविले आहे. तरी पूर्वीप्रमाणे प्रमुडातीकडे कर्म व्रतबंधादि गर्भादान व क्रियादि सर्व परंपरागत चालत आली आहेत त्याप्रमाणे निरवेध स्वामीचे आज्ञेप्रमाणे चालवीत जावी. पुन्हा बोभाट न पडे ते करणे मि।। कार्तिक ।। १५ शालिवाहन शके १६७५ बहुत काय लिहिर्णे हे विनंती.
जस्टिस रानडेकृत म.रा. उत्कर्ष पृ. १५५-१५६.
... शाहूराजाच्या कारकीर्दीत बाळाजी बाजीराव पेशवे असताना, ब्राह्मण व प्रभु यांच्यामध्यें फार दिवसांपासून चाललेला तंटा मिटविण्याचे काम सरकारकडे आले हा तंटा पूर्वीपासून म्हणजे शिवाजीच्या वेळेपासून चाललेला होता असें दिसतें व त्या वेळेस तंटा मिटवून जो समेट केला होता. त्याप्रमाणे संभाजी, राजाराम यांच्या संबंध कारकिर्दीत व शाहू राजाच्या अर्ध्या कारकीदींभर व्यवस्था चालली होती. पण शाहूच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या हप्त्यास प्रारंभ झाला, या कलहाग्नीनें पुनः पेट घेतला. त्यावेळेस शिवाजीप्रमाणे शाहूचीहि प्रभूलोकांवर बहाल मर्जी असे. प्रभूलोकांचा जो इतिहास आहे, त्यांत त्या वेळेच्या ब्राह्मणांवर असा एक आरोप आणिला आहे की प्रभूज्ञातीची नालस्ती करून त्याला दर्जा कमी करण्याच्या हेतूनें प्राचीन पौराणिक व सह्याद्रीखंडासारख्या इतर ग्रंथात काही नवीन श्लोक ब्राम्हणांनी मुद्दाम (ही गोष्ट काही निव्वळ कल्पना नाही किंवा सांगण्यात येते " पैकी दंतकथा नाही. अगदी अलीकडे अलीकडे पेशव्यांच्या नोकरशाहीचा अंत होण्याच्या सुमारास खुद्द सांगलीस चिंतामणराव पटवर्धनाच्या आश्रयाखाली खोडसाळ मजकूर घुसडलेले ग्रंथ तयार करण्याची एक गिरणच काढण्यात आलेली होती. या गिरणीत तयार झालेले मालाचे नमुने आता बरेच उपलब्ध झाले आहेत. शिवाय प्रसिद्ध ग्रंथांचा नायनाट (confiscate) करण्याबद्दल पाश्चात्यांनाच कांही हंसायला नको. अँट डफची जबानी पहा, “ They (Chitpawuns) carefully suppress or destroy all copies of the Syadree kind, where their origin is mentioned, and a respectable Bramin of waee was, a few years ago, disgraced by Baji Rao for having a copy of it," (Vol. I p. 8-9, Cambray Ed :) घुसडून दिले आहेत. बाळाजी बाजीराव पेशवे यांचेकडे हा कज्जा आला, तेव्हा पेशव्यांनी शाहूराजाकडे एक खलिता पाठविला. आणि प्राचीन वहिवाट सोडूं नये. ब्राह्मणांनी उपस्थित केलेले नवीन कज्जे तात्काळ मोडून टाकावेत, व या बाबतीत ब्राह्मण लोकांना कायमचें व स्पष्ट असे एकसहा हुकूम सोडावेत, अशी त्या खालित्यांत शिफारस केली, तेव्हां लागलीच शाहूनें कृष्णानदीच्या तीरावरील खंदे व माहुली येथील समस्त ब्राह्मणवृंदास असे हुकूम सोडिले की, विजापूर येथील बादशाही अमदानीत, तसेंच शिवाजी, संभाजी, राजाराम व ताराबाई ह्यांच्या कारकिर्दीत त्याचप्रमाणे चालू (शाहूच्या राजाच्या पूर्वभागांत, ज्याप्रमाणे और्ध्वदेहिक व इतर धर्मकृत्यें ब्राह्मण करीत आले तशीच त्यांनी पुढेही करावीत. कोणतीही नवीन गोष्ट न करितां पूर्वापार वहिवाट तशीच चालू ठेवावी. तीत बदल करूं नये. महाराजसरकारचें हें आज्ञापत्र ब्राह्मणांस आले त्याच वेळेस पंडितराव रघुनाथ यांनी सदरहू ब्राह्मणास एक विनंती पत्र पाठविलें, त्यांत शाहूमहाराजांची आज्ञा काय आहे हे थोडक्यांत लिहून प्राचीन वहिवाट बंद झाली आहे ती पुनः सुरू करावी अशी त्यांना विज्ञाप्ति केली होती. येणेप्रमाणे हुकूम सुटले होते, तरी या दोन ज्ञातींमध्ये चाललेल्या भांडणाची खरोखर इतिश्री काही झाली नाही. कारण कीं, प्रतिनिधी जगजीवनराव पंडीत व त्यांचे गुमासते यमाजी, हे दोघे गृहस्थ सातारा येथे शाहूतर्फे सर्व कामांची व्यवस्था पहात होते. ते शाहू राजे यांचा अंत:काळ जवळ येऊन ठेपला होता म्हणून आज्ञापत्रांत लिहिलेली व्यवस्था मान्य करीनात. पुढे शाहूराजे वारले तेव्हा बाळाजी बाजीरावानें प्रतिनिधि व त्यांचे गुगाराते यगाजी या दोघांनाही अटकेत ठेवले व प्रभूजातीतील घराण्यामध्ये धर्मकृत्यासंबंधी पुर्वापार जी वहिवाट होती तीच चालू ठेवण्याबद्दल हुकूम सोडिले, "
टीप :- खाली दिलेल्या एका अस्सल आज्ञापत्रावरून असे सिद्ध होते की शाहुमहाराजांच्या कारकीर्दीत राज्याभिषेक शक २९ म्ह० शां० शक १६२५ ३० नं० १७०३ मध्ये वरील मोठ्या ग्रामण्याशिवाय आणखी एक बखेडा झाला होता आणि त्यांचे या आज्ञापत्रानें निराकरण केलें. या बखेड्याचे विशेष कागदपत्र अझून उपलब्ध व्हावयाचे आहेत.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक २९ सर्वजितनाम संवत्सरे कार्तिक बहुल चतुर्दशी क्षत्रिय कुलावंतस श्रीराजा शाहू छत्रपती स्वामी यांनी समस्त प्रभु क्षत्रि श्री यांस आज्ञा केली ऐसीजे. पूर्वी परशुराम रामचंद्र व रामचंद्र महादेव मांडवगडकर कायस्थ ज्ञाति है उभयतां श्रीक्षेत्रस्य येऊन समस्त क्षेत्रस्य ब्राह्मणांची सभा गंधाक्षतेची करून आपले ज्ञातींत कर्मलोप जाहला आहे तो कर्माधिकार चालत असावा या हेतूनीं सर्व ब्राह्मणास विनंति केली. नंतर सर्व ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे ग्रंथ पाहून यांचे परंपरेची कुळाची व्यवस्थेवरून गागाभट्टकृत पद्धती अन्वयें मूळ पाहतां चांद्रसेनी क्षत्रिय यांपासून यांची संगत लागली, तेव्हां क्षत्रिय धर्मास अर्ह आहेत असे शिष्ट संगतें ठरून कळविल्यावरून तुमचें ठायीं क्षत्रियत्व संभवते. तुम्ही उभयतां मांडवगडचे राहणार. तुम्हांस आचारास निर्णययुक्त सांगितल्यावरून तुम्हांस ब्राह्मण भोजन करावे अशी इच्छा होऊन विनंति केल्यावरून समस्त ब्राह्मणांनी विचार केला कीं तुमचे ठाय क्षत्रियत्व नव्हे म्हणून आरोप आला, यास्तव कर्मे बंद केली. त्याची व्यवस्था सर्व समजून घेतली. कर्म लोपास्तवकर्म चालविणें विषयी सर्वाठायीं राजाज्ञा असावी म्हणून ब्राह्मणांनी विचार करून हुजूर समजाविलें. त्यावरून ब्राह्मणांची नावनीसीवार संगतयुक्त पत्र जहालें तें स्वामीस निवेदन केलें. तें पत्र पाहुन येथेही शिष्ट आहेत त्यांस मिळवून ग्रंथाघारें शिष्टमुखे क्षत्रिय मार्गाचा निश्चय सर्वमुखें ऐकून घेऊन पत्र देण्याविषय आहे. तरी तुम्ही मांडवगडकरी उभयतां क्षत्रियान्वय यांजकडे कर्म क्षत्रियांचे चालत आहे त्याप्रमाणे यथाशास्त्र चालत आहे त्याप्रमाणे चालवीत जाणें आणि तुम्ही यांसी अन्नव्यवहार चालत आल्याप्रमाणें चालवीत जाणें जाणिजे, चंद्र २१ माहे सफर सुमसाम मयाव आलफ बहुत काय लिहिणें, मोर्तब. "
प्रभुरत्नमाला परिशिष्टांक ५.
ग्रामण्य सातवें.
सदाशिव चिमणाजी ऊर्फ भाऊसाहेब यांचें ग्रामण्य.
(शके १६८१ इ. स. १७५९).
ग्रामण्यांचा इतिहासाच्या बाबतीत वाचकांनी एक गोष्ट नीट लक्षांत ठेवली पाहिजे की उपलब्ध कागदपत्रांवरुन जीं जीं सालें प्रत्येक ग्रामण्याला दिलेली आहेत, त्याच विवक्षित साली तें ग्रामण्य झालें असें कांही निश्चित म्हणतां येणार नाही; म्हणजे कित्येकांत ग्रामण्याच्या सुरवातीचे साल दिलेले आढळते, तर कित्येकांत त्यांच्या निराकरणाचे साल नमूद केलेले आढळते. त्याचप्रमाणे एकाच्या निराकरणाचा काळ आणि दुसऱ्याच्या पुनरुज्जीवनाचा काळ यांच्या दरम्यान हे ग्रामण्याचे बंड अगदी थंड पडलें असेल, असेंहि मानण्यास जागा नाही. कायस्थ प्रभू ज्ञातिविषयीं मत्सरांनी पछाडलेल्या ब्राह्मणांची घुसफुस ही कधि गुप्त तरी कधि उघड रीतीनें सतत चालूंच असे. एखाद्या जबरदस्ताचें आज्ञापत्र निघाले की या मत्सरी दिवाभितांनी आपल्या ढोलीत तोंड खुपसून लपावें; परंतु एखादा प्रभुद्वेष्टा भाऊसाहेब म्होरक्या पुढे आला की या दिवाभितांनी भरभर त्याच्या निशाणाखाली जमा वहावें. कल्याणकर लिखिते यांज कडून आलेल्या ग्रामण्याच्या हकिकतीच्या कागदपत्रंतील खाली दिलेली दोन अस्सल पत्रे पाहिली म्हणजे या विचारसरणीस पुष्कळ पाठबळ मिळते. त्यांतल्या त्यांत विशेष आश्चर्याची गोष्ट हीच की ६ व्या ग्रमण्याच्या वेळीं जो नानासाहेब पेशवा प्रभूंच्या ग्रामण्याचा बंदोबस्त करण्याकरितां शाहूमहाराजांच्या आज्ञापत्राची याचना करतो, तोच नानासाहेब (खालील उतारा नं० ६ पहा) शाहूच्या निधनानंतर स्वतःच ग्रामण्याच्या आगीत तेल ओतण्यास पुढाकार घेतो. यावरुन पुण्याचे राजे या ग्रामण्य बंडाचे खास आश्रयदाते होते हैं सिद्धच होत आहे शिवाय राजाश्रयाशिवाय नुसत्या कोरड्या ब्राह्मण्याच्या जोरावर कोणालाहि इतका बंडावा करतां येणें केव्हांहि शक्यच दिसत नाही.
(१) " राजश्री दाजी त्रिंबक गोसावी यांसी. सुरुसन इसने तिसेन मया व अलफ सरकारांतून परभु ज्ञातीच्या ठराव करून पत्रे सादर केली असता तुम्ही भोरास चंपा शष्टीचे उत्साहांत ब्राह्मण भोजन व होमपत्राखेरीज जास्ती कर्मे केली सबब तुम्हांपासून गुन्हेगारीचे ऐवजी ब्रम्हदंड सु सरकारांत घ्यावयाचा करार केला तो ॥ देणे तो राघो विश्वनाथ गोडबोले याजकडे गाडदी दि। सैद अबदल्ला वगैरे यास आकार पैकी रु. २५ पंचवीस हजार देवीले असते तरी पावते करून पावलीयाचे कबज घेणे, जाणिजे छ २१ मोहरम बार
(२) राजश्री मैराळ विक गोसावी यांसी । इसने तिसैन मया व अलफ सरकारांतून परजातीचा ठराव करून पत्रे सादर केली असता तुम्ही भोरास चंपा राष्टीचे उत्साहांत ब्राह्मण भोजन व चरुहोमपत्राखेरीज जाजती कर्मे केली सबब तुम्हापासून गुन्हेगारीचा ऐवज ब्रह्मदंड सु॥ सरकारांत करार केला वे व देणें तो राम्रो विश्वनाथ गोडबोले याजकडे गाडदी दिमत सैद अबदला वगैरे यास आकार रु. २,००० (दोन हजार) देविले असते तरी पावते करून पावली याचे कबजा घेणें जाणीजे छ. २१ मोहरम बार. .
इ. स. १७५१ सालच्या एका पत्रावरूनही हीच हकिकत खरी ठरते. तें पत्र असे :
(३) १५ मे १७५१.
पी. श्रावण शु. १० सोमवार शके १६७३ प्रजापति नाम.
तीर्थरूप दादा वडिलांचे शेवेसी
अपत्ये बाळकृष्ण दिक्षित पाटणकर यांचे शिरसाष्टांग नमस्कार विनंती उपरि येथील क्षेम : ज्येष्ठ वदि २ देशाचा जाणोन वडिलांच्या आशिर्वादें मस्त सुखरूप असो विशेष. .कृष्णराव धनुर्धारी याचे पुतणीस २५ हा ऐवज आणिक पाहिजे, व परभूकडे बाह्मण होते त्याणी प्रायश्चित्तें केली त्याचे रुपये जमा होते ते सर्वस दिल्हे.
म. इ. साधनें, खंड ३ रा पत्रक ३८४ पृ. ३५८१५९ इ. स. १७५२ च्या एका पत्रांत उल्लेख सांपडला तो :
परभूंनी प्रयश्चित्तें घेतली त्याचे रुपये राजश्री बाबा आले म्हणजे देऊन कबजे पाठवितों.
म. वि. साधनें, खंड ३, लेखांक ४१७, पृ. ३८३
रा. वि. का. राजवाडे यांच्या यादीत म्हटलें आहे तें असें :--
(५) ग्रामण्य सदोबा भाऊ साहेबी उल्लेख केला, तें नानासाहेब पेशव यांनी मना केलें. भाउसाहेब पानपतांत गत झालें.
म. इ. साधनें खंड ६, ले. ४१४.
प्रस्तुत ग्रामण्यांत पुढारपणाचा मान सदाशिवराव भाऊंनी आपल्याकडे घेतला होता. या ग्रामण्याची हकिकत उपलब्ध नाही. परंतु इतकें मात्र खास की या ग्रामण्याच्या योगानें प्रभुज्ञातीचा छळ बराच झालेला होता. नाही तर सर्व कायस्थ प्रभूसरदारमंडळाला याच वेळीं एकदम पुण्याच्या चित्पावन बजबजपुरीला रामराम ठोकून बडोदें, ग्वालेर, नागपूर, इंदूर, धार, देवास वगैरे संस्थानांत प्रयाण करण्याचे आणखी एखादें कारण असेलसें वाटत नाही. कित्येक प्रभुमंडळी पुण्यांत राहिली खरी, परंतु त्यांनीं उदासीन वृत्ति पत्करून राजकारणांतून आपलें अंग काढून घेतले. यावेळी पुण्यांत चित्पावन नोकरशाहीच्या वैभवाचा अगदी कळस झाला होता आणि या कळसावर आणखी मखमलाशी करायला करवीरकरांची औट घटकेची पेशवाई भंगणारे सदाशिवराव भाऊसाहेब हे आपल्या एका हातांत क्षात्रवृत्तीच्या घमेंडीची तरवार आणि दुसऱ्या हातांत भाडोत्री ब्राह्मण्याच्या अभिमानाची ग्रामण्याची चूड घेऊन पुढे सरसावलेले. सदाशिवराव भाऊंच्या उद्दाम स्वभावामुळे प्रभु मंडळी सहसा त्याच्या कोणत्याही भानगडीत पडत नसत. प्रभु समाजाबद्दल ज्वलजहाल द्वेषामुळें आणि ग्रामण्यानें त्यांची मनें बेसुमार दुखावल्यामुळे प्रभु सरदारांपैकी एकही सरदार भाऊबरोबर पानपतास गेला नाहीं सखाराम हरीस बरोबर द्या म्हणजे पानपताची मोहीम फत्ते करून येतो असे भाऊंचे नानासाहेबाजवळ आग्रहाचें मागणें होतें. परंतु दादासाहेबांनी तें साफ नाकारलें व स्वतः सखाराम हरीचीहि त्यास संमति नव्हती. तेंव्हां भाऊची कांहींतरी समजूत पटावी म्हणून नानासाहेबानें विश्वासराव यास बरोबर दिलें. पानपतच्या स्वारीवर निघतांना सदाशिवराव भाऊंनी सखाराम हरीदास दम भरून सांगितलें कीं, " ठीक आहे, हिंदुस्थानांतून परत आल्यावर पाहून घेईन. सान्या कायस्थांचीं डोचकी मेखखाली फोडून टाकीन. याद राखवून ठेवा. " यावर सखाराम हरीनें एवढेच उत्तर दिलें “ हिंदुस्थानांतून श्रीमंतांनी आधी सुखरूप परत यावें; मग आमची डोचक आणि आपलें मेखसूं आहेच. " यावरून असे वाटतें की भाऊसाहेब पानपतास जाऊन काय धार मागणार होतें याची या अनुभवी मुत्सद्यानें चांगलीच अटकळ केली होती. ग्रामण्याचे म्होरके भाऊसाहेब हिंदुस्थानच्या दौऱ्यावर गेल्यामुळे प्रामण्याच्या चळवळयांच्या नावचा आंखडल्या आणि तें जवळजवळ थंडावलें.
या ग्रामण्याच्या संबंधाने विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की प्रत्यक्ष नानासाहेब पेशव्याच्या या ग्रामण्यास पाठिंबा मिळतो. यमाजी शिवदेवाच्या ग्रामण्याच्या वेळीं याच नानासाहेबानें शाहूमहाराजांना प्रभूंच्या तर्फे पत्र लिहिलें होतें व तडजोडीने काम होईना तेव्हा त्याने ग्रामण्याचे पुढारी जगजीवनराव प्रतिनिधि व त्याच्या वेदशास्त्रसंपन्न मुतालीक यमाजी शिवदेव या दोघांनाही कैदेत टाकून ग्रामण्य मोडले. तोच नानासाहेब पेशवा यावेळी प्रामण्यास रुकार देतो, ही आश्चर्याची गोष्ट नव्हे काय ? परंतु आश्चर्य कसलें ? छत्रपतीचे राज्य घशांत उतरण्यासाठी जे नानातऱ्हेचे डावपेंच या पाशव्यानें लढविलें त्यापैकींच हा एक डाव होता. सुरवातीलाच ग्रामण्याचा पुरस्कार करून प्रभूंच्या विरूद्ध तो जातां, तर त्यास पेशवाईची वस्त्रे मिळाली नसती. रघोजी भोसले, बाबुजी नाईक बारामतीकर इत्यादिकांवर मात करून पेशवाईबरोबर नकळत मराठेशाही पशांत उतरविण्यास नानासाहेबाला चिटणीसांच्याच सुषमजाची जरूर होती आणि चिटणीस पडले कायस्थ प्रभु तेव्हां नानासाहेबानें ग्रामण्याच्या भानगडीतून त्यावेळी अंग कां काढलें होतें याचा उलगडा सहज होतो.
या आमच्या विधानाच्या पुष्टीकरितां वर जी एक दोन पत्रे दिली आहेत त्यावरून कदाचित कोणाचें समाधान व्हावयाचें नाहीं. म्हणून खुद्द नानासाहेब पेशव्यांचें एक पत्र उपलब्ध झालें आहें तें येथें देतो :--
(६) [५००]
श्री.
पौ. ॥ आषाढ वद्य १४ शनवार शके १६८१ प्रमाधीनाम संवत्सरें. वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :--
१४ जुलै १७५९.
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष, पूर्वी परभु याणी आपणांस गोत्रे लावावी याविशीं पत्रे काशीस पाठविली होती. त्यांस ती पत्र कैलासवासी दीक्षित बाबा यांचे हातास आली होती म्हणून ऐकिलें होतें. त्यावरून आपणांस तेथून तीं पत्रे आणावावी म्हणून सांगितलें होतें आपण श्रीस पत्र लेहून तीं पत्रे आणवर्ती म्हणोन सांगितले. त्यास श्रीचे पत्राचे उत्तरही आले असेल, पत्रे आली असली तर तीच पत्रे पाठवावी, अथवा पत्र दीक्षितबाबाजवळ आली नसली तरी उत्तर आले असेल ते लिहावे. त्यासारखें येणें परमां जवळ पत्राचा शोध केला जाईल, पत्रे परमाजवळ न राहावी या करितां शोध करून जाईल. पत्र परभांजवळ न राहावी या करितां शोध करून आणावी लागतात. इ. ॥ आषाढ वद्य ५ बहुत काय लिहिणे, हे विनंती. "
मराठयांच्या इ. साधनें, खंड ३ रा. पृ. ४५८/५९.
सदाशिवराव भाऊ पानपतास गेल्यामुळे हें ग्रामण्य निकालांत आलें असें म्हणतां येत नाहीं :--
(७) [५२४)
श्री.
१२ ऑगष्ट १७६१.
ग्रामण्य आहे तैसेंच
`वेदशास्त्र संपन्न राजश्री दीक्षितस्वामीचे शेवेसी :
चरणरज बापुजी महादेव सा नमस्कार विनंती येथील क्षेत्र आहे. < कळलें पाहिजें. "
कित्ता. पृ. ४७६-७७.
परंतु पानपतचा एळकोट उडाल्यावर भाऊसाहेब परत येण्याची आशा समूळ नष्ट झाली तेव्हांच हे ग्रामण्यं निकालांत निघालें.
ग्रामण्य आठवें.
नारायणराव पेशवे यांचें ग्रामण्य (शके १६८१ इ. स. १७७३).
रामराजे महाराज व माधवराव बल्लाळ पेशवे यांचे कारकीर्दीत यथास्थित चाललें. ग्रामण्य झालें नाहीं. पुढे नारायणराव बल्लाळ पेशवे झाले. त्यांणी ग्रामण्य केलें त्यांतील हांशील :--
मागे झालेल्या कोणत्याही ग्रामण्यापेक्षां हैं ग्रामण्य फारच जोराचें होतें. याचे कारण खुद्द राजसत्ताधारी पुरुषानें हे ग्रामण्य उभे केलें होतें. सातारची राजगादी चित्पावन नोकरशाहीच्या वाळवीनें आधीच पोखरून ठेविली होती आणि आतां तर खुद्द सातारच्या राजांच्या हाती कितिहि सत्ता नसून ते राजकीय कैदखान्यांत टेविले गेले होते. तरीसुद्धां पेशवाईची वस्त्रे सातारच्या महाराजांकडूनच पेशवे घेत असत, म्हणून त्यांच्या शालीनतेबद्दल ‘मराठे आणि इंग्रज’ कर्ते त्यांचे कौतुक करतात.
नारायणराव पेशवा हा फार उद्दाम व मगरूर होता. यानें आपल्या थोडयाच महिन्यांच्या कारकीर्दीत ज्या कांही गोष्टी केल्या त्यांचें सूक्ष्म निरीक्षण करणारास असे दिसून येईल की त्याच्या अंगीं मुत्सद्दीपणाचा पूर्ण अभाव होता. तो स्वभावानें फार उतावळा, हेकेखोर व हलक्या कानाचा होता. परिणामाकडे लक्ष न देतां वाटेल में करण्यास हा बिलकूल मार्गेपुढे पहात नसे. थोरल्या माधवरावाच्या लक्षांत आपल्या बंधूंचे हे गुण लक्षात आले होते व याच्या कपाळी राज्य नाहीं असे भाकीतहि त्यांनी केलें होतें.
नारायणराव बल्लाळ वस्त्रे घेण्याकरितां साताऱ्यास आले. वस्त्रासमयीं मनोदयानुरूप कांहीं मतलब महाराजांचें करून द्यावे असे ठरावांत असतां, नारायणरावाचा जातीनें शरीर सामर्थ्य व तारुण्यमद प्रकृत ही उद्दाम असा गर्विष्ठ स्वभाव होता त्यायोगें वस्त्रांचे समयीं कांहीं एक व्हावयाचें नाहीं म्हणौन उरुबुरु बोलले. यावरून महाराजांची मर्जी जाऊन शिव्या देऊन वस्त्रे दत नाहीं बोलले, तक्तास लावून घेऊ असें यांणी उत्तर केलें. यावरून महाराजांच्या मुखातून शब्द निघालेजे, माजोऱ्या निसंतान होऊन मरशील. तुझे वाटोळें होईल. हा श्राप झाला. आणखीहि फार श्राप करून बोलले. नारायणराव याणी वस्त्रे तशीच घेतली. शके १६९४ नंदन नाम संवत्सरे सन सल्ला सबैन मार्गशीर्ष मास. वस्त्रे घेऊन दरवाज्याजवळ निघतांच मशालेची झग्यास बत्ती लागून झगा पेटला. आणखी अपशकून. पुढे हत्तीजवळ गेले जरीपटका हत्तीवर होता. जरीपटक्याची काठी मोडून तो खाली पडला. दोन अपशकून झाले. नंतर पुण्यास आले. फारच अविचारी वागणें उन्मादपणा राज्यमदेही वागू लागला. लोकांच्या स्त्रिया चांगल्या त्यावर बलात्कार हळदकुंकवास नेऊन करावा. अगर बातमी लागल्यास पालखी पाठवून जबरी करावी. सातार संस्थानची निंदा करावी. असा फार अविचारपणा आरंभिला. व प्रभु ज्ञातीवर ग्रामण्याचा प्रारंभ केला. या ज्ञातीचा तिरस्कार करावा, प्रभु म्हणून संज्ञा चालत आली. राज्यपत्रे व पेशवे प्रतिनिधि इनामपत्रे वगैरे प्रभु अशीं चालत आलीं तीं यांणी मोडून परभू म्हणावें असा प्रारंभ केला. प्रणाम न म्हणता दंडवत म्हणत जावें, स्नान संध्यादि कर्मे करू नयेत. दुहेरी धोत्रे नेसावी. गंध आडवें लावू नये. घरी ब्राह्मण येऊ नये. अशा अनेक तन्हा काढून छलकपणा करण्यास आरंभ केला. यामुळे नारायणराव यांस पर्याय बहुत तन्हेनी बहुतांकडून बोलविले. परंतु दुराग्रहच्छ मोठा धरिला. आपली मंडळीही मोठमोठी प्रसिद्ध दरबारी वागणार भीडही त्यांचें वडिलांनी फार बाळगिली. परंतु नारायणराव यांणी काही मर्यादाच ठेविली नाहीं. तेव्हां दरबार सोडून मंडळी आपले घरी बसली. या उपर या राज्यांत आमची राहण्याची शोभा नाहीं. ज्या गोष्टी कधींच घडल्या नाहींत, त्या आमच्या वास्तु कशा घडतील. आम्हास निरोप द्यावा.
जिकडे मार्ग फुटेल तिकडे सर्व ज्ञाति जाईल. म्हणत असता है घडावयाचें नाहीं म्हणोन अडचणी बहुतच पाडिल्या. रामशास्त्री बावापाशीं शास्त्रार्थ पाहून आपण आज्ञा करावी म्हणल्यावरून शास्त्रावर काय आहे शास्त्र पाहतो कोण. तुम्हांस [वेदोक्त कर्मे करण्याचा ] अधिकार आहे. परंतु प्रभुत्व याजपाशी आहे. ते सांगतील तसें वर्तणे प्राप्त. असें इकडे म्हणत त्यांसहि (पेशव्यांस) या ज्ञातीचें ग्रामण्य करू नये. ते कांहीं सामान्य अधिकारी नव्हत. विचार पाहून सांगावें असें बोलले. परंतु स्यामित्यापुढे उपाय नाही. ब्राह्मण कोंकणांत वगैरे ठिकाण पुण्यातील मजकूर ऐकून मनस्वी दंगे करू लागले...
वाड्यांत (प्रभु) मंडळीस बोलावून नेलें. नारायणराव साहेब देवघरात होते रामशास्त्री बावा व आणखी मंडळी तेथे एकीकडे बसून आपली मंडळी गेल्यास आपले जवळ बोलाविलें आणि सांगितलें कीं, तुम्हास दोन चार वेळ सरकारांतून ताकीद झाली असता तुम्ही आचरण करिता राहत नाही. हल्ली सरकारची आज्ञा आहे. हे न केल्यास सरकारमर्जी राहणार नाहीं व मान्यता घातल्याखेरीज तुमचे वाड्यांतून बाहेर जाणें होणार नाहीं, त्याजवर आपले मंडळीनें निर्भीडपणे उत्तरे केलें की, यापाठीमागें असें कोणीच म्हटलें नाहीं, व कोणी केलें नाहीं. आपण सांगता यांस कांहीं शास्त्रप्रमाण आहे किंवा नाहीं जबरीने सांगणे तेव्हा जुलूमच म्हणावा. शास्त्रीबावास विनंति केली की, आपण साक्षांत धर्ममूर्ति सर्वास मार्गांनी चालवणार. आम्हाविशी सर्व शास्त्र आपले कोठे गेलें. अनन्वित झालें असतां आपण पहावे, कोही बोलू नये हा धर्म कोढील, त्यावर शास्त्री बावानी उत्तर केलें जे " बाबाहो तुम्ही म्हणतो ते प्रमाण, परंतु प्रभू कोपला आहे. त्याची मर्जी, ते आज्ञा करतील तीच मान्य म्हणेन वर्तावें हेच बरें, सांप्रतचा समयच असा आहे. पुढे कृपाही तेच करतील.
प्रत्यक्ष न्यायमुर्ती रामशास्त्र्यांनीच याप्रमाणे उत्तर देतांच प्रभुमंडळींचा अगदी नाईलाज झाला. यादीवर संमतीच्या सह्या घातल्याशिवाय वाडांतून जाऊं देखना. तेव्हां प्रभुमंडळीनी नाइलाजास्तव नारायणरावाच्या नऊ कलमी कतब्यावर (सत्तेपुढे शहाणपण कसें चालत नाही आणि नाईलाजास्तव वाटेल त्या प्रकारच्या कतव्यावर मान्यतेची सही कशी द्यावी लागते याचा अनुभव आमचे परम मित्र संशोधक रा. रा. पां. नं. पटवर्धन यांना अझून यावयाचा आहे. परंतु तो अनुभव कसा असतो या बद्दलचा प्रत्यज्ञ परिचय त्यांना रा. रा. नरसिंह चिंतामण केळकर हे खात्रीने नीट पटवून देतील आणि असल्या बळजबरीने लिहून घेतलेल्या पत्राची किंमत व्यावहारिक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या किती कवडीमोल असते, याचा ते स्पष्ट खुलासा करतील. कारण स्वदेशी चळवळीच्या धामधुमीत त्यांना ठाण्याच्या तुरुंगात असल्याच एका माफीच्या कतब्यावर मान्यतेची सही करून मुक्त व्हावे लागले. `तुम्ही खुशाल सही करा, त्यानें तुमच्या शीलाला यत्किंचित्हि अपाय होणार नाही, अशी आम्ही हमी घेतो` अशा अर्थाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करणारी केसरी हिंदुपंचासारखी पत्रे जशीं रा. केळकरांच्या वेळी होती. तशीं वरील कायस्थ प्रभूंच्या अमदानीत असती, तर त्यांनींहि कदाचित या नोटीसवजा आगाऊ प्रायश्चित्ताचा किंवा जाहीर आश्वासनाचा मार्ग खातरीने स्वीकारला असता.) मान्यतेच्या सह्या दिल्या. तो कतबा असा :--
१-- वैदिकमंत्रे करून कांहींच कर्म करणार नाहीं.
२-- वैदिकमंत्रे येत असतील त्यांचा उच्चार करणार नाहीं.
३-- भाताचे पिंड करणार नाही.
४-- देवपूजादिक विहित कर्मे पुराणोक्त मंत्र करूनच करूं व ब्राह्मणभोजन आपले घरीं करणार नाहीं.
५-- शालिग्रामपूजा करणार नाही.
६-- ज्या देवास शूद्र जातात त्या देवास जाऊं.
७-- ब्राह्मणांना दंडवत मोठ्यानें ह्मणत जाऊं व आपले जातींतही दंडवत ह्मणत जाऊं.
८-- वैदिकब्राह्मण व आचारी व पाणके व शागीर्द ब्राह्मण बायका चाकरीला ठेवणार नाहीं व आपले घरीही ठेवणार नाहीं.
९-- आमच्या जातीमध्यें संतोष पाट लावतील त्यांना आम्ही अडथळा करणार नाही.
याप्रमाणे जुलमानें सह्या घेतल्यावर वाड्यांत बोलावून नेलेल्या प्रमुख प्रभुमंडळींची सुटका झाली. हे वर्तमान प्रभुमंडळास कळतांच त्यांना अत्यंत उद्वेग होऊन संताप आला असल्यास नवल ते काय ?
याच वेळी नारायणरावानें दादासाहेब व आनंदीबाई यांचाही मनस्वी छळ चालविला होता. सुर्यदर्शनाशिवाय अन्नग्रहण करावयाचें नाहीं असा दादासाहेबांचा नेम होता आणि प्रतिबंध तर इतका की त्यांना कित्येक दिवस सुर्याचे दर्शन होऊ नये. त्यामुळे तीन तीन दिवस उपोषणे पडत असत. आनंदीबाईस तर अत्यंत नीचपणानें वागविलें होतें. तिला धड नेसावयासही न देतां नग्नच ठेवण्यांत येई ; कारण कदाचित् लुगड्यामध्ये कागदपत्र लपवून ठेवील ! इतकेंच नव्हे तर लिहिण्यास संकोच वाटतो गुप्त भागांत कागदपत्र ठेवले असतील की काय या शंकेनें वारंवार तपास करण्यांत येत असे, असें म्हणतात. हा छळ अमानुष नव्हे असें म्हणणारा मनुष्य सांपडणे कठीण! (मग दादासाहेबांचा बंदोबस्त करून ठेविले देवपूजा करूं देऊं नये; कीं या योगानें माझा भाऊ मारला असें म्हणोन लींत ठेविले. दादासाहेब अर्ध्यप्रदान सूर्यदर्शन घेतल्याविना अन्न भक्षू नये. हा नेम होता. खोलींत राहिल्यामुळें पांच पोषण जाहली व दादासाहेबांचे स्त्रियेस लुगड्यांत फंदाचे कागद लपविले या निमित्यानें लुगडे फेडून छळणा करावी. - रा.ब. साने संशोधित नागपूरकर भोसल्यांची बखर.)
... दादासाहेब यांस फार प्रतिबंध व साताऱ्यासही अडचण व या ज्ञातिप्रकरणी निकर्ष असे चाललें, तो भाद्रपद मास आला. तेव्हां दादासाहेबांकडील राजकारण उभे राहिलें, यांत व्यंकटराव काशी प्रभू यांनी सखाराम हरी प्रभू यांचे संमतें आनंदीबाई दादासाहेबांची बायको यांजकडे संधान करून सुमेरसिंग, खरगसिंग, महंमद ईसफ जमादार, व गाद्यचे दिवाण रामचंद्र दाजी प्रभू होते त्यांची चौकी बंदोबस्त वाड्यांत असे. तिथे फितुरी झाली. व्यंकटराव काशींनी दादासाहेबांची हरयुक्तीनें नारायणरावास कैद करून धरावें अशी चिटी सुमेरसिंग वगैरे गार्दी जमादारास घेतली. ती आनंदीबाईस दिली. गार्दी यांची खात्री न होय. घरलेले सुटल्यावर आमचा बचाव होणार नाही, तेव्हा धरावें ते ध चा मा आनंदीबाईनें करून मारावें असें करून देऊन चिटी पाठविली ती सुमेरसिंगास दिली. नंतर गर्दी झाली. नारायणराव मारले गेले.
शके १६९५ विजयनाम संवत्सरे सन अब शितेन मया व अल्लफ भाद्रपद शुद्ध १३. फारच गलबा शहरांत व वाड्यांत झाला. तेव्हां सखाराम हरी बक्षी व चिंतो विठ्ठल वगैरे दादासाहेब प्रकरणी मंडळ वाड्यांत जमा झालें. दादासाहेब यांची द्वाही फिरविली. बाहेरील कारभारी नाना, व हरिपंत, वगैरे यांणी काय बातमी फौजेची तयारी वगैरे करून कशी खबर, दोघे खासे, राज्यास गर्दी, आंत कायम तरी कोणी आहे नाही. याकरितां पाहून येण्यास पाठविले. भवानराव प्रतिनिधि व बजाबा पुरंदरे, त्रिबंकराव विश्वनाथ पेठे असे गेले तो नारायणराव मारले गेले. दादासाहेब कायम कचेरी झाली. नजरा चालल्या पाहून आपल्या जातीची खात्री करून बाहेर येऊन वर्तमान कळविल्यावर फौजा वगैरे सर्व जाग्यावर जाऊन दादासाहेब द्वाही शहरांत फिरली. नंतर दहन शवांचे होणे. तयार झाली. तेव्हां सखाराम हरीनीं विनंती केली की आमची ज्ञाती प्रकरणी याद नारायणराव यांनी लिहून घेतली ती आणवून फाडल्याविना शव नेऊ नये. तेव्हां नानाकडे चोपदार पाठवून यादी आणविरी. नानांनी उत्तर केलें कीं, यादी रूमालात आहे. स्नान केल्यावर काढून देतो. तो निरोप परत आला. त्यावरून पुनः चोपदार दादासाहेबांनी पाठविला की, आतांच याद रूमाल शिवून काढून देणें तेव्हां नानांनी रुमाल आणून काढून दिली. ती याद सखाराम हरीस दिली. यांनी विनंती केली कीं, आपले हाते फाडून द्यावी. तेव्हां दादासाहेबांनी श्रीकार फाडून दिली. ती व्यंकटराव काशीचे हाती सखाराम हरीनें दिली. व्यंकटराव काशीनेंती याद फाडून पूरजे करून शवावर टाकीले. नंतर शव उचलून पुढील विधि झाला. असा ग्रामण्याचा परिणाम झाला.
येथवर या ग्रामण्याची हकिकत दिली. आता इतर प्रसिद्ध पुस्तकांतून व अप्रकाशित बखरींतून माहिती मिळाली ती देतों :--
(१) रा. वि. का. राजवाडे :-- ग्रामण्य नारायणराव बल्लाळ यांनी केलें. आठवे महिन्यांत मारले गेले. दादासाहेबी याद घेतली ती देविली. सखाराम हरीस -
म.इ.साधने खंड ६ ते ४४४
(२) ग्रामण्याची अप्रकाशित बखर,
नारायण बल्लाळ यांनी चिटणीस पोतनीस यांस बसवून तुमचे मंडळीत पाट लागत होते आतां तुम्ही त्या चालीप्रमाणं चालावे म्हणून नऊ कलमे लेहून घेतली. न द्यावी तरी उठण्याची रजा नाही. जबरदस्तीच केली. निरुपाय जाणून लेहून दिल्हे. पुढे राघोबादादानीं सुमेरसिंगास लेहून दिल्हे की नारायणरायास घरून दिल्हे असता तुजला तीन लाख बक्षिस, तलबेशिवाय देऊ, त्यावरून कबूल करून चिटी लेहून घेतली. नंतर आपसांत जाऊन विचार करिता न सापडले तरी आपली बायकामुले ठाणकास देतील याजकरिता सापडेल तर घरून देऊ नाहीं तरी मारू, कबूल असेल तरी लेहून द्या. नाही तरी आम्ही कबूल करीत नाहीं. त्यासमयी आनंदीबाईनी सदाशिवपंत (कांहीं कागदपत्रांतून " सखारामपंत सोहनी असा स्पष्ट उल्लेख सापडतो.) सोनी कारभारी याजपासोन धरावे लिहिले होते त्या ध चा मा करविला. ती चिठी घेऊन नारायणराव यास सुमेरसिगानी मारिले. ते प्रेत सन्निध असता सखाराम हरीस दादासाहेबांचा करार होता की नारायणराव हस्तगत जाला म्हणजे तुमची चिटी त्यासमय देऊ. त्याप्रमाणे सखाराम हरीनी विनंती केली. चिटी देवावी. दादासाहेबी तत्काल परवानगी देऊन चिटी परत देविली.
(३) का. प्र. इ. साधनें यांतील " कायस्थ प्रभूंची बखर`
पुढे माधवरावसाहेब समाप्त होऊन नारायणसाहेब अधिकारी जाहले. पूर्व वय त्यांत यमाजीपंत यांचे ग्रामण्यापैकी द्वेषबुद्ध (कांही लोक होते, त्यांणी पूर्वजांचा मनोदय सिद्धीस न गेल्याचा द्वेष ध्यानांत आणोन नारायणयावसाहेब यासीं अनन्वित फकिका कलेल्या समजवून देऊन ग्रामण्य केलें. आणि प्रभुमंडळीपैकीं (कांही लोकांस) वाड्यांत बोलावून नेऊन जबरदस्तीने (त्यांची) धोत्रे फाडून जानवी तोडातोड करून लिहून घेतले. नंतर नारायणरावसाहेब थोडकेच दिवशी परधामास गेले. उपरांतिक दादासाहेब यांजकडे अधिकार प्राप्त जाहला. ते स्वतः सूज्ञ वेदशास्त्रनिपुण त्याणी सर्व गोष्ट समजून घेऊन ग्रामण्यांतील मनुष्यांची बहुत निर्भत्सना करून सर्व प्रभुमंडळीस आपआपले कामावर येण्याविषयीं सांगोन पाठविल्यावरून. अगोदर श्रुत होते व प्रभुनी ही हकिकत समजवून दिल्ही. नंतर ते बोलिले जे अन्नाहुति केली. त्यासारिखे फळ प्राप्त जाहले. आतां मागील जाहले गोष्टीचा विधिनिषेध न मानिता स्वस्थ चित्तें आपापली काजकामें करित जाणे असें अश्वासन देवून नारायणराव यांणी जबरदस्तीने पत्र घेतलें होतें ते समयी आशीयांत आणवून सर्वादेखत फाडून टाकले.
ग्रामण्य नववें.
हरिपंत फडके व आपा बळवंत यांचें ग्रामण्य
(शके १७११ इ. स. १७८९).
कारकिर्द शाहू महाराज धाकटे पेशवे सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत सन तिस्स मया व अल्लफ शके १७११ सौम्यवान संवत्सरे. ग्रामण्यें झाली तो मजकूर
चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या इतिहासाची साधने यांत प्रसिद्ध झालेल्या कायस्थ प्रभूंच्या बखरीत या ग्रामण्याची हकिकत अशी दिली आहे,
नारायणरावसाहेबांची पत्नीगंगाबाई यांचे उदरी सवाईमाधवरावसाहेब जन्मले. त्यासंनिध बाळाजी जनार्दन फडणवीस द्वितीय सृष्टी उत्पन्न करणार महा बुद्धिमान कारभारांत वागत असतां, पूर्वील नारायणरावसाहेब यांणी जे ग्रामण्य केलें, त्याचा मजकूर वास्तविक किंवा गैर वास्तविक यांतील आशय कसा, हा समजून घेण्यास्तव श्रीवाराणशीक्षेत्रस्थ ब्राह्मणांस पत्र पाठविले. त्यातील संशयनिवारणार्थं उत्तरप्रत्युत्तवासह बालबोध अक्षराचे पत्र लिहून आलें, त्यांवरून त्यांची खातरजमा जाहली तेंच पत्र बार केले. विपतशील.
(कल्यायाणकारक, सुशोभित अशा दंडकारण्यनामक देशांतील भीमानदीच्या नाभि आणि हृदय यांच्या संगत्याने उपलक्षित` भीमानदीच्या काठी असून तिचाच पोट भाग अशा ?) पुणे नामक ग्रामात राहणाऱ्या दक्षिणदेशीय राजर्षि, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण प्रांत पुणे याप्रति)
*स्वस्ति श्रीमदंडकारण्यांतर्गत भीमरथीनाभिहृदयसंगत्योपलक्षित पुण्यारण्यग्रामस्थ दाक्षिणात्य राजर्षि धर्माधिकारी प्रांत पुणे व समस्त ब्राह्मणांप्रति
(आर्यावर्तनामक देशामध्यें आनंदवन आणि त्रिकंटक या नावाच्या दोन अतिपवित्र स्थलांनी सुशोभित अशा अविमुक्त क्षेत्र (काशी) राहणाऱ्या भट, धर्माधिकारी आणि शेत्र इत्यादि उपनामानी युक्त ब्राह्मणांचे अनेक नमस्कार विलसित होयत माघ शुद्ध सप्तमीपर्यंत येथे राहणारांचे क्षेत्र असे आपले क्षेम उत्तरोत्तर प्रतिदिवशी वृद्धिंगत असावे अशी आम्ही आशा करितो विशेष :-)
आर्यावर्तदेश आनंदवनत्रिकंटकविराजिताविमुक्तक्षेत्रस्थभटधर्माधिकारिशेषप्रभृती नामनेका नतयो विलसंतु । माघशुक्लसप्तम्यावधि अत्रत्यक्षेममस्ति भावत्कर्म तदनुदिनमध्यधिकमाशास्महे । विशेषस्तुभाषया.
राजश्री बाळाजी जनार्दन फडणवीस यांणी पुण्याहून मार्गशीर्ष शुद्ध दशमीची पत्रे पाठविलींती पावली तिथे लिहिलें कीं प्रभूचे ग्रामण्य येथे पडले आहे. त्यास प्रभूचेंआचरणाचा प्रथाधार कसा आहे ? त्याजवरून आह्मीं सर्वांनीं गागाभट्टकृत `गागाभट्टी कायस्थप्रदीप, गोविंदभट्टकृत गोविंदगडी. स्कंदपुराणांतर्गत रेणुकामाहात्म्य कमळाकरभट्टकृत `शूद्रकमलाकर जातिविवेक इत्यादि निबंधग्रंथ पाहून तुह्यांस लिहिलें आहे, हे पाहिल्यावरून आपले ध्यानांत येईल,
(कायस्थ तीन प्रकारचे सांगितले आहेत. एक- -चित्रगुप्त कायस्थ, दुसरा क्षत्रज चंद्रसेन राजा जो क्षत्रिय त्यापासून झालेला, ज्यास दात्म्य ऋषीने उपदेश केला म्हणून दात्म्यगोत्री म्हणतात. तो चांद्रसेनीय कायस्थ आणि तिसरा-लकरजातीपासून झालेला संकरज कायस्थ त्यांपैकी चित्रगुप्तादिकांची उत्पत्ति पद्मपुराणांत सांगितली आहे ती अशी की. - सृष्टीचे आरंभी ब्रम्हदेव प्राणिमात्राचें पुण्यकर्म व पापकर्म कसे कळेल याचे क्षणभर चिंतन करीत राहिला तेव्हा त्याच्या देहापासून दिव्यरूपधारी, हातांत दौत व लेखणी धारण करणारा, ज्याला चित्रगुप्त असे म्हणतात तो पुरुष उत्पन्न झाला. तेव्हां त्याला ब्रह्मदेवानें, तूं यमराजाजवळ राहून प्राणिमात्राचें पुण्यकर्म व पापकर्म ल्याहावें असें सांगितलें. तो अतींद्रयज्ञानी ब्राम्हण आणि यज्ञांत नित्य हविर्भाव घेणारा देवरूपीही होय. ज्याला ब्राह्मणादि `द्विज` भोजनाचे आरभी नित्य चित्रगुप्ताय स्वाहा अशी अन्नाहुति देतात. तो ब्रह्मकायापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या देहापासून उत्पन्न झाला म्हणून त्याला कायस्थ असें म्हणतात. या भूमीवर त्यांचे वंशांतील अनेक गोत्रायें कायस्थ आहेत.)
कायस्थास्त्रिविधाः प्रोक्तत्रगुप्तस्थथापर | दालभ्यगोत्रःक्षत्रजस्तु तृतीय संकरात्मजः ॥ तत्र चित्रगुप्ताद्युत्पत्तिः ॥ पद्मपुराणे ॥ सृष्ट्यादौ सदसत्कर्मये प्राणिनां विधिः ॥ क्षणं ध्याने स्थितस्तस्य ब्रह्मकायाद्विनिर्गतः ||१|| दिव्यरूपः पुमान् हस्ते मषीपात्रं च लेखनीम् ॥ चित्रगुप्त इतिख्यातो धर्मराजसमीपतः ॥ २॥ प्राणिनां सदसत्कर्मलेख्याय स नियोजितः ॥ ब्राह्मणोऽतींद्रियज्ञानी देवाख्यो यज्ञमुक सदा ||३|| भोजनादौ सदा तस्मा आहुतिर्दीयते द्विजेः ॥ ब्रह्मकायोद्भवो यस्मातकायस्थो ज्ञातिच्यते ||४|| नानांगोत्राश्च तद्वश्याः कायस्था भुवि संति वै । यावरून कऱ्हाडप्रांतीं व खानदेश संगमनेरप्रांतीं कायस्थ ब्राह्मण ह्मणून आहेत हे ब्रह्मकायस्थ होत.
अथ चांद्रसेनीयक्षत्रियकायस्थोत्पत्तिः ॥ स्कंदपुराणे रेणुकामाहात्म्ये || स्कंद उवाच ॥ एवं हत्वाऽर्जुनं रामः संधाय निशितान् शरान् ॥ अन्वधावत्स तान् हंतु सर्वानवाऽसुरान् नृपान् ||१|| केचिग्दगनमाश्रित्य केचित्पातालमाविशन् । जटां कृत्यात्मनः केचित्हावेषधारयन् ||२|| बभूवुस्तापसाः केचिद्वनमाश्रित्य तद्भयात् ॥ तत्रैवावस्थिताः । केचिद्वभूवुर्नटनर्तकाः ||३|| केचिद्वैतालिकाः शूरा राजानस्तद्भयार्दिताः ||५|| सगर्भा चंद्रसेनस्य भार्या दाम्याश्रमं गता ॥४॥ ततो रामः समायातो दाल्भ्याश्रममनुत्तमम् ॥ पूजितो मुनिना रामो हर्घ्यपाद्यासनादिभिः ||५|| ददौसध्यान्हसमये तस्मै भोजनमादरात् ॥ ददौ दाम्यो मुनिश्रेष्टो भार्गवाय महात्मने ॥६॥ भोजनावसरे तत्र गृहीत्वाऽपोशन करे । रामस्तु याचयामास हृदिस्थं स्वमनोरथम् ll७|| तस्मै प्रादादषिः कार्म भार्गवाय माहात्मने || याचयामास रामाद्वै कामं दाल्भ्यो महामुनिः ॥८॥ ततो द्वौ परमप्रीती भोजन चक्रतुर्मदा । भोजनांते महाभागायासने उपविश्य च ॥९॥ तांबूलानंतर दात्म्यः पप्रच्छ भार्गव प्रति ॥ यत्त्वया प्रार्थितं देव तत्त्वं शंसितुमर्हसि ||१०|| श्री राम उवाच तवाश्रमे महाभाग सगर्भा स्त्री समागता || चंद्रसेनस्य राजर्षेः क्षत्रियस्य महात्मनः ||११|| तन्मे त्वं प्रार्थितं देहि स्त्री सगर्भां महामुने । ततो दाल्भ्यः प्रत्यवाच ददामि तव वांछितम् ॥१२॥ यन्मया प्रार्थिम देव तन्मे दातुं त्वमर्हसि ॥ ततः स्त्रियं समाहुय चंद्रसेनस्य वै मुनिः ||१३|| भीता सा चपलापांगी कंपनामा समागता । रामाय प्रददौ भीतां रामः प्रीतमना अभूत् ||१४|| श्रीराम उवाच ॥ यत्त्वया प्रार्थितं विप्र भोजनावसरे पुरा ॥ तन्मे शंस महाभाग ददानि तव वांछितम् ।।१५। दाल्भ्य उवाच ॥ प्रार्थितं छन्मया पूर्व राम देव जगग्दुरो ॥ स्त्रियो गर्भममुं बालं तन्मे दातुं त्वमर्हसि। ||१६|| ततो रामोऽब्रवीदात्म्यं यदर्थमहमागतः ॥ क्षत्रियातकर वाहं तं त्वं याचितवानसि ||१७|| प्रार्थितश्च त्वया विप्र कायस्थं गर्भमुत्तमम् । तस्मात्कायस्थ इत्याख्या भविष्यति शिशोः शुभा ||१८|| (परशुरामाचें भाषण ऐकून हर्षित झालेला दाल्भ्य ऋषि बोलिला का, हे रामा-नी हा राजपुत्र मागितला म्हणून तुम्ही निःक्षत्रिय पृथिवी करण्याचा आपला हेतु पूर्ण झाला नाह असे मनात आणू नये. हा दुर्बुद्धि होणार नाही. यावरून परशुरामाची क्षत्रिय नाहीसे करण्याची "पॉलिसी" क्रूरकर्म केल्याशिवाय सिद्धीस नेण्याची युक्ति दात्म्य ऋषीने काढिली असें दिसतें.) जायमानो यदा बालः क्षत्रधर्मा भविष्यति ॥ ततो दाल्भ्यः प्रत्युवाच भार्गवंप्रति हर्षितः ||१९|| माकुरुष्यात्र संदेहं दुर्बुद्धिर्न भविष्यति । एवं रामो महाबाहो हित्वा तं गर्भमुत्तमम् ||२०|| निर्जगामाश्रमात्तस्मात्क्षत्रियांतकरः प्रभुः । ततः प्रकुपितो रामो ननावषधरावृपान् ॥२१॥ ज्ञात्वा नारदवाक्येन अजनानपि चावधीत् ॥ धारयंतो मुर्खेऽगुष्टान् प्रार्थयतोऽभयं नृपाः ||२२|| स्थितास्तरेषां बली रामो दत्तवानभयं तदा || हत्याऽदी हैहयान कोपात्पितुर्यधमनुस्मरन् ॥२३॥ स्कंद उवाच ॥ कायस्थ एष उत्पन्नः क्षत्रियां क्षत्रियात्ततः ॥ रामाज्ञया स दात्म्येन क्षत्रधर्मादहिषकृतः ||२४|| दत्तः कायस्थधर्मोऽस्मै चित्रगुप्तस्य यः स्मृतः ॥ प्राप्तकायस्थनामत्वाह्नेख्यावृत्तिश्व भूगृताम् ||२५||(हा मजकूर गोविंदभट्टानें व गागाभट्टानें मागाहून ढकललेला आहे. मूळ ग्रंथांत नाहीं.) [तस्य भार्या कृता चित्रगुप्तकायस्थवंशजा || तद्रराजाश्च कायस्था दात्म्यगोत्रास्ततोऽभवन् ] ॥२६॥ दाल्भ्योपदेशतस्ते वै धर्मिष्ठाः सत्यवादिनः ॥ सदापचारपरा नित्यं रता हरिहरार्चने ||२७|| क्षत्रियाणामयं धर्मः कृतं माँजीनिबंधनम् ॥ यत्किचिद्वैदिक जाप्यं नवग्रहमखादिकम् ||२९|| नानाशाँति च विधिवदृत्विग्भिरेव कारयेत् ॥ षण्णां च कर्मणां मध्ये त्रीणि कर्माणि जीविका ॥२९॥ एवं या प्रकारेंकरून प्रभु क्षत्रिय चांद्रसेनीय कायस्थ दाल्भ्यगोत्री यांची उत्पत्ति आहे.
मोठ्यांचे आग्रह बहुत पहले तेव्हा शास्त्र राखून त्यांची समजावीस करणें प्राप्त होन क्षत्रियत्यनिराकरणार्थ एक भागवतवाक्य लिहिले. ते कोणें ? तर, (नंदराजापर्यतच क्षत्रियांचे कुळ राजधर्म पावेल.)"नंदांत क्षत्रियकुलं क्षत्र्यित्वमनीनयदितिः " || याचे उत्तर- ह्या वाक्येंकरून सर्व क्षत्रिय मेले ऐसी गोष्ट कैसी घडेल. वाक्यार्थ काय म्हणाल तर नंदराजापर्यंत क्षत्रियव्यवहार (राजधर्म), अनंतर क्षत्रिव्यवहार (राजधर्म) जाईल. शरीरस्थ गर्भ मागितला ह्मणोन कायस्थ व्यवहार. क्षत्रियपर्याय प्रभुव्यवहारी जाहल म्हणोन ज्ञाती नष्ट न जाहली. तसीच दुराग्रही पुरुषांचे समाजविशीकरितां, वैदिकक्रम निषिद्ध पाराशरस्मृतीचा एक चतुर्थ चरण भलताच करून गागाभट्टी लिहिली. तो कोणता ? तर,
(कपिला गाईच्या दुधाचे प्राशनानें, ब्राह्मणाच्या स्त्रीचेठाई गमन केल्याने, आणि वेदाक्षरांचा विचार (अध्ययनादिक) केल्याने कायस्थ, पतित (जातिभ्रष्ट) होतो. श्रीवेंकटेश्वर प्रेसनें छापलेल्या पाराशरस्मृतीत (पृ. ९) कपिलाक्षीरपानेन ब्राह्मणीगमनेन च ॥ वेदाक्षरचारेण शूद्रस्य ध्रुवम" असा चरण आढळतो.) कपिलाक्षीरपानेन ब्राह्मणीगमनेन च ॥ वेदाक्षरविचारेण कायस्थः पतितो भवेत् ||१|| याचे उत्तर अशीच जर स्मृति आहे तर सामान्यतः कायस्थत्रयासही निषिद्ध जाहलें. तेव्हां ब्रह्मकायस्थांसह निषिद्ध होईल, आणि मूळचा पाराशरस्मृतिग्रंथ काढून पाहिला, तेथें या स्मृतीचा चतुर्थ चरण (शूद्र चांडालत्व पावेल.)"शूद्रश्चाडालतां व्रजेत्" असा आहे. "कायस्थ पतितो भवेत्" असा नाहीं वैदिककर्मनिषेधक स्मृतिवचन एकच लाविलें, आणखी निषेधक वाक्यच नाहीं. स्मृतितात्पर्यात, वर्णत्रयास वैदिककर्माचा विधि सिद्धच आहे. शूद्रास मात्र निषेध, अन्य संकरजातीयांचा शूद्रांत अंतर्भाव करून या तिहींचा निषेध होतो. चतुर्थ चरण तसा कल्पिला तर शूद्रादिकांस वैदिककर्मनिषेध नाही, असे होईल. हाणून कल्पितांच नये. अत एव गागाभट्टांनीही त्यांचे पद्धतीत विशेष वैदिक मंत्र स्पष्ट लिहिलेच आहेत. पूर्वी स्वजातीमध्ये लहानमोठे अनाचार होते त्यामुळे ज्ञातिविहित कर्माधिकारें जातीहानि जली. याचे उत्तर हे कलियुगपरत्वें सर्व ज्ञातीमध्यें अनाचार असतच आहेत. ते कोणते हाणाल तर कर्नाटक प्रांती ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण चांगले आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष बहीणीची कन्या (भाची) इचा भासासमागमें विवाह होऊन संतति होत्ये हे लोकविरुद्ध, शास्त्रविरुद्ध, अनाचार, मिश्रमैथिल याचे ज्ञातिमध्ये प्रथम पंचवीस वर्षाची कुमारी, नंतर विवाह होऊन संतति होत्ये हाहि मोठाच लोकविरुद्ध शास्त्रविरुद्ध अनाचार आहे. असे असता त्यांचे षट्कर्माधिकार व ज्ञातीची हानि जाहली नाहीं. तेव्हां प्रभूंचीच कैसी होईल ?
एकच दाल्भ्यगोत्र असोन गोत्रींच सर्व विवाहादिक कर्मे होतात हाणून ज्ञातिकर्महानि जाहली. याचे उत्तर ज्या ऋषींचा जो वंश तो ऋषीं त्या वंशाचें गोत्रक्षत्रियवर्णच मित्र, क्षत्रियांस गुरुगोत्र प्रसिद्ध आहे. दुयी पालन करून उपदेश केला ह्मणून दाल्भ्यगोत्र लागलें एतावता बाध नाहीं. पूर्वीहि सुर्यवंशी व सोमवंशी इत्यादि व्यवहार चालतच असोन सांप्रतही अमुक कुळींच इत्यादि व्यवहार चालतो. कुल वंश शब्दमात्र, अर्थभेद नाही. (हा मजकूर खरा नाही असें वर दाखविलेंच आहे.)
[चंद्रसेन राजा याचा पुत्र सोमराज याने चित्रगुप्त ब्रह्मकायस्थ याच्या वंशजाची कन्या विवाहिली; तेव्हां त्या जायेपासून संतति जाहली ते प्रतिलोम ] याचे उत्तर-- ( क्षत्रियापासून ब्राह्मणीचे ठाई होतो तो सूत.) “ब्राह्मण्यां क्षत्रित्सूत:” “इत्यादि वाक्ये करून सुतज्ञात प्रतिलोमापेक्षा उत्तम.” (हे, सूत हा प्रतिलोमच आहे असा पक्ष घेऊनही आम्ही बोललो तरी) प्रतिलोम इदमंगीकृत्यापि ब्रूम इति न्यायेन." वस्तुतः ब्रह्मदेवशरीरापासून जाहला हाणून तो ब्रह्मकायस्थ, परंतु तो चतुर्वर्णावेगळा देव, देवगंधर्वजाति.
पूर्वी क्षत्रिय राजे याही देवगंधर्व यांच्या कन्या बळात्कारें अथवा संतोषें विवाहिल्या असे पुराणांतरी बहुत स्थळी आढळते. शुक्राचार्यांनी आपुली कन्या देवयानी ययाति राजास दिल्ही. तेव्हां या क्षत्रिय कायस्थास प्रतिलोमताही नाहीं उत्तमप्रति सूत, त्याचा क्षत्रियांतच अंतर्भाव त्यासही सर्व क्षत्रियकर्माधिकार आहे. चांद्रसेनीय क्षत्रिय कायस्थ कोणते ? याचें उत्तर - दात्म्य गोत्र कायस्थ प्रभु ऐशी आबालवृद्धपर्यंत ज्याची प्रसिद्धता असेल, तो चांद्रसेनीय कायस्थ तर यास प्रभु ह्मणण्याचा प्रघात कसा पडला, याचें उत्तर- (सोमराजाचे विश्वनाथ, महादेव, भानु आणि लक्ष्मीधर असे प्रख्यात चार पुत्र होते. त्यांत विश्वनाथ हा महापंडित, असंख्य गुणांनी युक्त, लक्ष्मी आणि सरस्वती यांचें अधिष्ठान आणि रूप, औदार्य व कला यांचा आश्रय असा महाप्रभु (महा-समर्थ) झाला. असे स्कंदपुराणी रेणुकामाहात्म्यांत सांगितलें आहे.) “चत्वारस्तनया आसन्सोमराजस्य विश्रुताः ॥ विश्वनाथो महादेवो भानुर्लक्ष्मीधरस्तथा ||१|| संख्यावानप्यसंख्योऽभूद्विश्वनाथो महाप्रभुः । निवासः श्रीसरस्वत्यो रूपौदार्यकलाश्रयः ॥२॥ स्कांदे रेणुकातात्म्ये एत्थमुक्तं" यावरून महासमर्थ होतो त्यास प्रभु ह्मणतात, विश्वनाथ यास सर्वहि प्रभु ह्मणूं लागले, ह्मणून प्रभु व्यवहार रूढ पडला. सांप्रताहि ज्याणें जो रोजगार उदीम धंदा केला त्या व्यवहाराचे उपनाम पडते व तेच परंपरागत चालते. त्याचा मूळपुरुष चंद्रसेनपुत्र सोमराज एकच, तेव्हां विवाहादिक कर्मे कोणाशी जाहली ? याचे उत्तर-पूर्वी दोनच क्षत्रियांचे वंश, एक सूर्यवंश व एक सोमवंश यांचे परस्परे विवाह होतच असतां यदु कुरु, पंद्दु एकाचीच संतति, यादवाची कन्या सत्यभामा कृष्णास दिल्ही असे पुराणांतरी बहुतस्थळी आढळते. सर्व सृष्टिक्रम असाच आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचें शरीरापासून चतुर्वर्ण उत्पन्न जाहले तेव्हां मुळ पुरुषाची रचना अनादिसिद्ध, व्यवहार चालत आला आहे तो खरा ब्रह्मदेवाचे दिवसांत दश अवतार होतात. त्यास पन्नास वर्षे जाहली आहेत. हा कोणत्या दिवसात परशुरामावतार जाहला हे परमेश्वर जाणें, तेव्हां अनादि व्यवहारच प्रमाण आणखी स्कंद वाक्य (तेव्हां आपल्या मुखात अंगुष्ठ धारण करणारे, अभय मिळण्याची इच्छा करणारे असे कितीएक राजे शरण आले असतां त्यांसऊ महाबली तो राम, अभय देता झाला.)
“धारयंतो मुखेऽगुष्ठान् प्रार्थयंतोऽभयं नपाः ॥ स्थितास्तेषां बली रामो दत्तवानभयं तदा” तेव्हां आणखी क्षत्रिय राहिलेच होते ते हे एकच मिळाले. सारांश भगवदिच्छेकरून सृष्टि निर्माण जाहली. अनादिसिद्ध व्यवहार भगत्सते चालिला तो प्रमाण. ऋषीकुळ नदीमूळ पाहू नये. उत्पत्ति पाहतां (हरिणीच्या गर्भापासून झालेला महामुनि ऋष्यशृंगी केवळ तपश्चर्येनेच ब्राह्मण झाला. तेव्हा मूळच्या जातीचें कारणत्व काय करावयाचे आहे? कोळ्याच्या स्त्रीचे गर्भापासून झालेला मुनि द्वैपायन व्यास तपश्चर्येनेंच ब्राह्मण झाला. तेव्हा मूळच्या जातीचें कारणत्व काय करावयाचे आहे? तसाच अर्वशीच्या गर्भापासून झालेला महामुनि वसिष्ठ तपश्चर्येनेच ब्राह्मण झाला. तेव्हां मूळच्या जातींचे कारणत्व काय करावयाचे आहे ?)
"हरिणी गर्भसंभूतो ऋष्यशृंगो महामुनिः । तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कारणम् ||१|| धीवरीगर्भसंभूतो व्यासो द्वैपायनो मुनिः । तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कारणम् ||२|| उर्वशीगर्भसंभूतो वसिष्ठश्च महामुनिः ॥ तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कारणम् ||३||” ऐसेच पृथ्वीचे ठाई कित्येक निर्माण जाहले, त्यांचे वर्णन किती कोठवर करावें. विश्वामित्र क्षत्रिय होत्साता ऋषीत मिसळला. तसाच वाल्मीकही. कोकणस्थांचा सप्रवरसंबंध होतो. उत्पत्ति पाहता प्रकारांतर. तस्मात, (कोणाचे कुळांत अगदीं दोष नाहीं? कोण व्याधीने पीडित होत नाहीं? तर सर्वांचे कुळांत काहींना काहीतरी लहानमोठा दोष असतो व सर्वांस लहानमोठा कांहीतरी व्याधि होतच असतो.)"कस्यदोषः कुलेनास्ति व्याधिना को न पीड्यते" असे आहे. भगवतकृत मोडोन आपण नूतन स्थापूं गेल्यास भगवंतास कसे मानेल ! मानावयाचे नाही दृष्टोत्पत्तीस येत आहे. विषाची परीक्षा पाहाणारांनी पाहू नये. पंडु व धृतराष्ट्र यांची उत्पत्ति व्यासापासून, पांडव यांची उत्पत्ति एकापासून एकेक ऐसें जगप्रसिद्ध ग्रंथातरी वर्णन, त्यांनी अश्वमेधादिक यज्ञ केले. त्यांचे घरी लक्षावधि ब्राह्मण जेविले, स्वर्गी घंटारव जाहलें द्रौपदीस पंच भ्रतार, तिणें स्वहस्ते लक्षावधि ब्राह्मणांस अन्ने वाढिली. महासती होय दोष ठेवितां रौरवप्राप्ति तात्पर्य (केवळ इश्वराची इच्छाच बलवत्तर आहे.)“बलीयसी केवलमीश्वरेच्छा|” शके १७०१ विकारीनाम संवत्सरे. माहे आश्विन शुद्ध ८ मी रविवासरे इत्यलम् श्री शुभभवतु ` येणेंप्रमाणे समजून घेऊन माधवराव साहेब पंधरा वर्षांचे होईपर्यंत कधी कांहीं कटकट न होता यथास्थित चालत आले. सवाईमाधवराव यांची विनाशकाळी विपरीत बुद्धि` होण्याचें कारण पेणकर ब्राह्मणांचा व प्रभु याचे उपाध्ये टकले यांचा आपाजी यशवंत प्रभु यांचे घरी पेणेंत प्रयोजन होत असतां तेथे कलह वाढून पेणकर ब्राह्मण यांणी खटला केला. त्यांसही कोलटकर मामलेदार यांणी पुण्यास आणोन समजून सांगावयाचें तसें सांगितले परंतु न ऐकतां दुराग्रहस प्रवर्तक होऊन श्रीमंतांकडे जाऊन फिर्याद केली. आणि नारायणराव साहेब यांचे अनन्वित हेतु पूर्णतेस न गेले. यांचे वृत्त समजून घेऊन ग्रामण्य उभे करण्याची वीरश्री घातली. आणि पुणे मुक्कामी बहुतेक ब्राह्मण जाऊन प्रभुलोकांचा उपहास करण्यास प्रवर्तले ते समयी श्रीमंतांनी शास्त्री व पंचाईत मिळवून शास्त्र मते पाहता चालत आलें तसें चालवावें असे समजून नाना फडणीस यांचे समक्ष पंचाईत मनास आणावी हाणोन आज्ञा होऊन असामीनी केलें त्यांची
नांवनिशि
१ यज्ञेश्वर शास्त्री.
१ भास्कर दीक्षित. .
१ सदाशिवमट दात्ये.
१ गोविंदराव पिंगळे,
-------
४
-------
१ आनंदराव जुनरकर
१ दिनकरपंत भडभडे
१ मोरबा भावे.
-------
३
-------
सदरहू असामींस आज्ञा जाहली. त्याणीही समजून घेऊन पेणकर ब्राह्मण यांसी खटला न करणें विषयीं समजून सांगों लागलें. न ऐकतां दुराग्रहास प्रवतॉन जुने कोटांत चिटणीस यांचे वाड्यावर खटला करावयाकरितां दोन वेळा गेले. ते समयीं आयाशास्त्री द्रवीड न्यायाधिशीच "कामावर होते ते ब्राह्मणांस अनुकूल या बळावर बेगुमान देणें आयाशास्त्री यांचा जमात व दांडगे ब्राह्मण, मजुरीचे चार चार पैसे द्यावयाचे करार करून समागमें घेऊन बहुत समुदाय मिळोन प्रभूवर चालून गेले. ते वेळेस ब्राह्मणांची व प्रभुची मारामार जाहली. आणि ब्राह्मण कित्येक जखमी जाहले, व आयाशास्त्री यांचा जामात जखमी जहाला. व प्रभुलोकही जखमी जाहले. नंतर ब्राह्मणांनी पळ काढून नाना फडणीस यांजकडे फिर्यादीस गेले, आणि बहुत प्रकारें कागाळी सांगों लागलें. ते समयीं नाना फडणीस याणें ब्राह्मणाचा बहुतच निषेध केला, की सास्त्रसमतें समजून असतां दुराग्रहाने त्यांजवर चालून जाऊन दुलौकिक केला. हैं नीट नव्हे तुझीच आजपर्यंत वडीलार्जित परंपरागत प्रभुचे कार्य व वेदोक्त कर्म करीत आला आणि हल्ली त्यांचा आश्रय गेल्यामुळे द्वेषबुद्धि करून खटला करतां हा सिद्धिस जाणार नाहीं. याप्रमाणे सांगितले. तें न ऐकतां बळें जाऊन खटला करणे याचें कारण काय? या उपर यांसी खटला केला असतां मुलाजा होणार नाहीं. प्रतिष्ठेस हानी होईल, अशी ताकीद देऊन ब्राह्मण घालविले. नंतर थोरथोर शास्त्री श्रीमंतांनी बोलावून शास्त्रार्थ विचारिला, तेव्हां शास्त्री यांनी उत्तर केले की प्रभ चांद्रसेनीय यांसीं सर्व कर्मोंस अधिकार आहे.
सभा करून शास्त्रार्थ सांगावयाची मर्जी असल्यास जो शास्त्रार्थ ग्रंथांतरीं वास्तविक आहे तो सांगणें, पेणकर ब्राह्मण व्यर्थ दुराग्रहास प्रवर्तले याचें कारण नाहीं. पहिला दाखला पाहतां मुक्तक्षेत्र काशी तेथे शिष्ट ब्राह्मणांनी निर्णय ठरविला तोच प्रमाण आहे. त्यास दोष ठेऊन दुसरा प्रकार करी असा कोण समर्थ आहे? प्रभु ज्ञातीचे गुरु आबा टकले हे सर्व शास्त्रीं निपुण आहेत ते शास्त्र विरुद्ध आचरणार नाहीत. सभा करून सांगितले असतां टकले यांचे बोलणे प्रमाण ठरेल. शास्त्रनुमतें वेदाधिकारी आहेत अशी खातरजमा आहे त्यापेक्षा आतां युक्ति करावी जे समेमध्ये अमृत भाषण करीता येत नाहीं याजकरितां तूर्त सभा करूं नये. मोघम पूर्ववत चालत आलेप्रमाणे हें सांगावें असें ठरवून ब्राह्मणांस अतः पर गटला करणें याचें कारण नाही. याप्रमाणें ताकीद केली. खटल्यास प्रारंभ शके १७१७ श्रावण शुद्ध ७ ते नाहे आश्विन मासपर्यंत प्रभुमंडळी जात नव्हती. आपला घरीच होते. आश्विनमासी माधवराव साहेब कैलासवासी जहाले. नंतर नाना फडणीस याणें प्रभुमंडळीस बोलावून समक्ष सांगितलें जे.
इतःपर ब्राह्मणानें तुमंसी खटला करू नये अशी निक्षून ताकीद केली. तुह्मीं सरकार कानें बंद न करितां स्वस्थचित्तें आपले कामकाजावर येऊन पूर्ववत् कामे बालवादी येविशीं समजुतीचे अन्वये बहुतेक सांगोन खटला मोडिला पुढे श्रीमंत बाजीराव साहेब राज्याधिकारी राज्याचे कामावर आले ते समयी चिटणीस सर्व प्रभुमंडळी यांणी विनंति केली की, विनाकारण पेणकर ब्राह्मण यांणी खटला करून कर्मातर चालवणे यासी आडाआड केली. त्याजवरून बाजीवार साहेबांनी चौकशी मनास आणून प्रांतोप्रांती शिक्यानिशी सनदा करून दिलेल्या असोन ‘पूर्वीपासोन कर्मातर चालत आलेप्रमाणे चालवीत जाणें, दिकत न घेणें.’ या प्रमाण स्वदस्तुर लेखन होऊन चालू लागले.
‘रायबहादुर बाळकृष्ण आत्माराम गुप्ते यांनी जी ग्रामण्याची हकिकत प्रसिद्ध केली आहे त्यांत त्यांनी प्रख्यात बखरनवीस मल्हार रामराव चिटणीस यांची पत्रें नमूद केली आहेत ती येणेंप्रमाणे : :--
पत्र नंबर १.
पौ छ ९ जिलका श्रावण रोज वर्दी पुण्याहून लक्ष्मणराव गोविंद व मल्हार रामराव चिटणीस यांणी रामराव चिटणीस यांस पाठविली. रोजचें वर्तमान. बार.
नारायणराव यांची यादी घेऊन फाडली. हा आकस हरिपंत फडके व आपा बळवंत यांनी धरून सूड घ्यावयाचा म्हणून पेणकर ब्राह्मण पुढे करून प्रारंभ केला. तो ऐसाजे, पेणेंस ग्रामण्यें ब्राह्मणंनी गर्भादानास होमास चरु करणार नाहीं म्हणोन कोणी गृहस्थाचे घरी आग्रह केला. त्यावरून कोलटकर सुभेदार अनुकूल होऊन कज्या पाडिला आणि दहापाच कलमें चरू क नये, व चार दिवस मुंजीचा अग्नि ठेवू नये. (शवा) सह गमन करू नये. पिंडास चरु होतो तो करू नये, असें दोनशे ब्राह्मणांचे संमतें पत्र करून याप्रमाणे प्रभू मान्य होतील तरी त्यांचे घरी जायें, नाहीं तर जाऊ नये. असे केल्यामुळे वर्षभर कर्मे व हव्ये राहिली. अगत्ये करणेच त्यांनी लग्न-विवाह इत्यादि दुसरे महालांत जाऊन करावी असें झालें. तेव्हां तेथील गृहस्थ पुष्कळ येऊन ज्ञातीस कळविलें. त्यावरून गणपतराव कोलटकर मामलेदार यांस मजकूर कळविला की, तुमचे बंधू महाली बाबूराव आग्रहास पडून [असीं कामे] करितात याजवरून गणपतराव यांनीही लिहिलें. परंतु त्याचीं उत्तरें ब्राह्मण ऐकत नाहींत ऐसी येत गेली.......नंतर बाबूराव कोलटकर गणपतराव यांजकडे पुण्यास आले. तेव्हा गणपतराव यांनी बहुत निषेध केला. त्यावरून (प्रभुलोक) यांचे ग्रंथांतर कसें आहे तें आम्ही समजू तेव्हां करणें ते करू असे म्हणून लागले, वेदशास्त्रसंपन्न राजश्री आबा गुरूबावा व थोरले गुरुबावा जाऊन त्यांची खात्री केली कीं, पालते हे कांहींच नाहीं. यांस अधिकार विशेष आहे. तेव्हां ते बोलिले की ब्राह्मण आग्रही, तेथील शिष्ट दहा पांच आणवितों, आमची खातरजमा केली तशी त्यांची करावी. नंतर ते ब्राह्मण त्यांनी आणविलें, यावर त्यांही सारे ग्रंथ दाखविल्यावर गागाभट्टी गौण आहे त्यास संगत पत्र केलें तें फाडावें. याप्रमाणें ब्राह्मण मान्य होऊन कोलटकरांची पत्रे व या ब्राह्मणांची पत्रे रवाना झाल्यावरून पूर्वीप्रमाणे सहा चार महीनें चालिलें. पुनः कोणी कोणी दिकत करू लागले. कोलटकरांचे ही न मानीत. तेव्हा गुरुबाबांचे दोन ब्राह्मण कोलटकरांचे स्वाधीन केले. आणि हे सरकारचे ब्राह्मण म्हणोन कार्ये चालावी अशी केली त्यांनी सहा चार महिने चाविले असता एके दिवशी कोलटकरांकडे कथा झाली त्यांत सारे ब्राह्मण मिळाले. तेथें त्या दोघा ब्राह्मणांस बुका, प्रसाद, खिरापत आम्हांबरोबर द्याल तर आम्ही घेणार नाहीं म्हणून आग्रह करून उठून चालल.
सुभेदार यांनी विचारीलें यांजकडे काय दोष ? तरी प्रभूंकडे है मनस्वी कर्म करितात असे म्हणून निघोन गेले. दुसरे दिवशी सारे एकत्र होऊन प.र्वी संमत पत्रे पाडली तसेच आणखी केले. त्याजवरून कोलटकर यांनी नेऊन विचारिलें तुमचे पद्धतीप्रमाणे पूर्वील चालींपेक्षा विशेष कुणी केलें ? तुमच्याच पोथ्या यांस दिल्या, तेव्हा बोलू लागल की, आम्ही पूर्वी करीत होती तेंच ठीक नाहीं. हल्ली ठरवूं तसें करावे, त्याजवरून कोलटकर बोलले. गागाभट्टानी पद्धती केली तशी तुम्ही नवी कशी ती करावी. चाललें ते कोणत्या आधारारून न करावें म्हणतां ते समजवायें, पुढील पद्धति कोणत्या आधारावरून करणार तें लिहून यायें त्याजवरून कागद लिहून दिला जे म्हणतों यापमाणे समजून देऊ नंतर सर्व आपले ठायी विचारास बसले, निषेध कशावरून व पुढे काय कथायें ते कांहीं सिद्ध न होय. तेव्हा दांडगावे आरंभून जो संमत न करील घरी जाऊ नये हैं अरंभिले. ते समयी कोलटकर सुभेदार सुद्धा सत्राघरांनी संतम न केले म्हणून तितकी घरे वर्ज्य केली आणि मनास एक झाले. ते समय कोलटकर यांनी सदरहू झाले वर्तमान सविस्तर पुण्यास श्रीमंतांस लिहिलें तें पत्र नाना फडणवीसांनी वाचून शास्त्रीबाबाकडे पाठविलें. शास्त्रीबाबांनी पाहिलें, नंतर ब्राह्मण दांडगावे करितात ते मसाले करून आणावे ऐशी नानाची परवानगी सरसुभे यास झाली, आणि त्यांपैकी पंचवीस तीस ब्राह्मण मुख्य मुख्य यांजवर दहादहा वीसवीस असे मसाले रुपये एकशें साठ करून गादी पाठविले. तेव्हा जितक्यांनी समतें केली तितकें एक होऊन मसाला देऊन शंभर ब्राह्मण पुण्यास आले. सरसुभ्यांकडे व शस्त्रीबाबांकडे न जाता प्रभूसाठी आम्हांवर जुलूम होऊन गादी मसाले करून अप्रतिष्ठा केली वगैरे मनस्वी वल्गना करीत गावात हिंडू लागले. नंतर सरसुभे यांनी माणसे लावून आणून बसवून पंचवीस तीस असामी बोलाविले असतां इतके का आलांब? प्रथम संमतें केलीं तीं कां फाडिली व पुनः का आणखी केलें? आजपर्यंत कसें करीत आला? आतां कां नाहीं म्हणतां? व पुढे कोणते संगतें कसें करणार? हें लिहून द्या म्हणून तसदी केली. तेव्हां सर्व ब्राह्मण पेणेस जाऊन दहावीस असामी राहिले आणि लिहून देता ठीक न पडे. तेव्हा इतकी दिवस करीत आलों] ते चुकलों पुढे आम्हांस करूं तसें वाटतें.
मागे केलें त्याचें प्रायश्चित घेऊ ऐसी लिहीणी बाहेर पडली. बाहेर ही चार घरे फिरौ लागले. नानापाशी एकदोन वेळ उभे राहिले. त्यांनी सरसुभ्यांकडे जा. ते समजावतील, गम उत्तर सांगू हेंच उत्तर केलें. त्यांजवर आपा बळवंराव यांनी त्या ब्राह्मणांस आश्वासन देऊन आम्हीं तुमची दाद लावितों मसाला देववतों प्रभूंचे पारिपत्य करणे आहेच. यांद माघारी घेतली. ते पूर्वील वैर मनांत धरून नानापाशी जाऊन बोलिले, हे काय ? शिष्ट ब्राह्मणाची प्रशंसाठी अप्रतिष्ठा होते. प्रभू मनस्वी कर्मे करितात हैं काय ? असे बोलिले. तेव्हां नानांनी उत्तर केलें जे आम्हीं सर्व समजलों आहोत. तुमचे बोलणे मांडाळपणाचे पूर्व समजलाच नाहीं सरसुभा मनास आणून आम्हांस समजवतील तें करूं, नंतर आप्पा बळवंत अय्या शास्त्र्यांचे घरी आले, व यांस आपले घरीं आणिले. आणि पेणकरांचा अभिमान धरावा असें करून शास्त्रीबुवांकडून नानास एकदोन वेळा बोलाविलें. नानांनी उत्तरें साफ केली. शास्त्री बावा म्हणू लागले जे ब्राम्हण ही बहुत एक विचार करितात. हेही मनस्वी कर्मे करितात याचा विचार करावा. असें बहुत आग्रह करून विचारितां नानांनी उत्तर केलें कीं, आम्हांस यांत पडावयाचे नाही व काही करावयाचे नाही. ब्राम्हण व प्रभू चित्तस येईल तसें करोत. तितल्यावर आप्पा बळवंत व शास्त्री व ब्रह्मण विचार करून सिद्धांत केला जे, वाद कशास सांगावा. सारे ब्राह्मण एक संमत करून दहा पाच हजार संमतें त्याजवर करून नानास दाखवावीं. मग सहजच ते बहुतात येतील. पडल्या फळाची परवानगी ब्रह्मण व प्रभू कांहीं करोत अशी झालीच आहे. म्हणोन एक संमताची यादी करून वरती नारायणराव साहेबांचे वेळची कलमें लिहून, यमाजीपंताची पद्धति पंचसंस्कारी ती काढून, अय्या शास्त्री यांजकडे नित्य पेणकर वगैरे ब्राह्मणानी मिळावे, तेथे आपले गुरूबाबा नित्य जात. तेथें नित्य भवति न भवति व्हावी. त्यात आबा गुरुजींनी ग्रंथाधारे करून सर्वांस कुंठित करावे पूर्वील ग्रंथाधारे हे शुद्ध लोक चतूरनाम्ना (?) प्रसिद्ध असे आहेत. हे व `सुवर्णाश्व स्वरूपाढया (?) इत्यादि लक्षणे लिहिली त्यानी युक्त त्या ज्ञातीस जे धर्म ग्रंथी . असतील ते यांनी करावे, व करीत आहेत. मध्यें गागाभट्टांनीच या ज्ञातीचे घर बुडविलें, त्याशींच यांचा वाद हि. ग्रंथ कसा केला.
नवीन फकिकामंत्र का केले, कोणते संस्कारी वैदिक मंत्र कोणते संस्कार अमंत्रक से का लिहिलें, अधिकारी नाहीत तरी कोठेच नसावे. तेव्हा ग्रंथ खोटा, परंतु काल देश वर्तमान जेथें जसें चालेल तसें चालतात. आणि तुम्हीं गागामहींनी केले तेंच करूं नये म्हणणार, तेव्हां आज तरी तसा श्रेष्ठ नवीन पद्धति कोण कशी करितो, व कोणत्या आधारे ती करावी असें त्या ज्ञातीचें म्हणणे. मध्ये यमाजीपंती झाली, ती तुम्हीं काढितां त्यांचा यांचा राज्यकरणीं द्वेष म्हणून ग्रामण्य केलें तें चाललें नाहीं. हे करितच आहेत. पंचसंस्कारी तुम्हीं म्हणतां तरी मुंजी तर त्यांच्या येथें अस्खलित चालतात. यमाजीपंती पंचसंस्कारी लग्नादारभ्य असें लिहिलें तरी तेव्हांपासून व्रतबंध रहावे ते तुम्हींच करता, व वाडवडील करीत आले. याचें प्रायश्चित्त काय ?
असे बोलणे झाल्यावर सर्व सभा कुंठित झाली. गुरुबायांनी उत्तर प्रत्युत्तर समेत करण्याची बाकी ठेवीली नाहीं, असें झालें. पेणकर संमतपत्रे घेवू घरोघर हिंदू लागले, परंतु सर्व समेत मंडळी होतीच. ग्रंथ गुरुबावांनी दाखविले. यामुळे संमत होण्यास विचार त्रिमंतकाचार्य (?) शास्त्री ही शास्त्राधार इकडील समतें बोलत होते. व आयाशास्त्री यांजकडे ही दोन चार वेळ जाऊन तुम्हीं करितां हैं अयुक्त, आम्हांस हैं शुद्ध ठाऊक आहे. ते बोलले श्रीगिरीकर शंकराचार्यही येथे आले आहेत, त्यांजकडे संमताची यादी नेली. त्यांनी उत्तर केलें. आम्ही धर्मसंस्थापक, उच्छेद करणें तें संमत घालावयाचें नाहीं. असे बोलले.
पंडितांच्या घरोघर आपा बळवंताचा प्यादा घेवून हिंडूं लागले. तेव्हा पंडित मंडळीनें उत्तर कालें कीं, एका बाजूस रामशास्त्रीवादांचे संगत व एका बाजूस श्रीमंतार्थे संमत असे होईल तेव्हा आम्ही संमतें चालू आम्ही कोणी ग्रामणिक नव्हेत. संमतपत्रे कशास पाहिजेत. की राजधानी येथे सभा करून पंडितांस विचारावें. त्याप्रमाणे श्रीमंतांनी आज्ञा करावी लबाड आहोत. आयाशास्त्र्याचा व आपाचा निरोप सांगतां त्यास त्यांचे संमत याजवर अगोदर कां नाहीं, त्यांचे संमत करून आणावें. यादींत पंचसंस्कार लिहिले त्यास आबचे बाप आजे वडील त्या ज्ञातीचे व्रतबंध करीत आले. आम्हींही केले. त्यांच्या अस्थि शुद्ध करून वडिलांस प्रायश्चित द्यावें, व आम्हीं घ्यावें तेव्हां असंमत होईल असे बोलून पंडितांची समते न झाली. मग चहूंकडे संमत होत नाहीत असे वाजले तेव्हा किरकोळ करणारही सरले. गंगाधर दीक्षितांकडे आप्पा बळवंताचा प्यादा गेलाजे, आपानी विनंती केली आहे. तेव्हा दीक्षितांनी उत्तर केलें. तुम्हीं प्यादे लावून करणार, आम्ही आपाचे चाकर नाही. आपा कोण ? आम्ही करीत नाहीं म्हणून सांग जा. असे झाल्यावर आम्ही शास्त्रीबाबांकडे चिटी पाठविली की. ब्राह्मण दांडगावा करून मध्येच ज्ञातीचा उच्छेद करणार आपण अधिकारी सर्वज्ञ. आम्ही कसे चालायें पूर्वीपासून आश्रय आपला अशी चिटी पाठविली. त्याचे उत्तर आले जे आम्ही यांत नाहीं कोणी शिष्टही मिळणार नाहींत अशुद्ध गोष्ट परंतु सरकारकडे व नानाकडे तुम्ही सर्व ज्ञातींनी उभे राहून बोलावें. सरकार नाहीं व शास्त्रीबाबा नाहीत. आणि मध्येच ग्रामण्य होतें. आम्हास कोणी त्रता नाहीं कीं काय ? हे विचारावे असा निरोप आला. संमताची यादी चालावयाची राहिली. नंतर आयाशास्त्री यांनी नानांचे कानावर घातले, ब्राह्मण असा विचार करीत होते. परंतु शिष्ट कोणी समतें घालीत नाहींत ? सरकारचे नेट व अज्ञा कारकून असावा त्याजवरून नानांनी सांगितले जे आम्हांस यति पडावयाचे नाही. म्हणून पवच सांगितले हे सिद्धीस जाचयाचें नाहीं.
पूर्वी यमाजीपंत आदिकरून कोणी केले तें सिद्धीस न गेलें. रिकामें अनर्थास कारण तुम्ही कराल ते सिद्धीस जाणार नाही. हें मात्र ते दिवशी सांगितलें नाहीं, यमाजपिती पंचसंस्कारी केले आहे तरी मुंजी का राहिल्या नाहीत. तुम्हीच करिता. तेव्हां सहजच त्याचे केलेले मोडले गेले. चालें नाहीं, हे सिद्ध जालें. परंतु याचा विचार तुम्ही काही पाहिला आहे की काय ? आणि त्यांचा एक उपाध्या पोथ्या घेऊन ( रेणूकामाहात्म्य व एक दोन ग्रंथ घेऊन) हिंडतो. त्यात कांहीं कांही आधार आहे तेव्हां त्यास मोडावयाजोगे तुम्हापाशी काही आहे की नाही, म्हटले. तेव्हा शास्त्री यांनी उत्तर केलें की, पोथ्या पुराणांतरच्या खन्या परंतु अनाचार आरोप ज्ञातीवर आहेत. पूर्वीचे, परंतु आलीकडे नाहीं. याजवर नानांनी उत्तर केलें आम्ही लहानपणीं पलांडुभक्षण करीत होतों. पलांदुभक्षणी पुनरुपनयन हे कळल्यावर टाकीलें. म्हणून पूर्वी करिता होता तें करा, असे सांगून तुम्ही आम्हांस भ्रष्ट करावें कीं काय, चांगले केल्यास वाईट करा का म्हणावें, अधिक केल्याचेच फळ पावखतील. आम्ही यांत नाही. सर सुभ्यांकडे ब्राह्मणांनी जावें तें समजावतील तें करू, असे झाल्यावर शास्त्री सई (फत्ते) होऊन आले.
पत्र नंबर २ पो छ १९ जिलकाद श्रावणमास.
यापुढें आयाशास्त्री व दादाशास्त्री लिमये व आपा बळवंत प्रमुख होऊन ग्रामण्य चालविलें, तो श्रावणीची संधी आली. गुरूबबांस पेणकर ब्राह्मणांनी जाऊन शपथ घातली कीं, प्रभुचे घरी जाऊ नये, त्याजवरून नानांचे कानावर घातलें. तेव्हां सरसुभ्यानें जनोबास आणून ताकीद केली की, ब्राह्मणांस निक्षून ताकद करणें, श्रावण्य चालू देणें, त्याप्रमाणें त्यांनी ब्रह्मणांस ताकीद केली. परंतु आम्हीं ऐकत नाहीं, उत्तर केले.
गुरुबाबांस ओंकारेश्वराचे देवळापाशी चतुर्दशीस नेऊन जाजम टाकून बसविलें. भोंवते ब्रह्मण बसले. मनस्वी बडबड करणे चाललें तेव्हां पुनः नानांचे कानावर घातलें, जनोबास नाना बोलले की, काम तुम्हांस रेंटत नाहीं हें काय म्हणून ? वरील दिवाणखान्यांत श्रीमंत बसले तेथे दादोपंत शास्त्री बोलावून जाऊन हा विषय तुमचा, यांचे ऊपाध्ये आणून ब्राह्मणांस सांगून उद्यांचे कर्म चालतें करणें, म्हणून सांगितले. त्यंनी शास्त्रीबाबास कळविलें, शास्त्रबाबा तेच सवयी पालखीत बसून वाड्यांत आले. तेथून ब्रह्मणांस बोलावू पाठविलें जे चौघे जण जाबसलास येण, दादाशास्त्री व आयाशास्त्री देवास म्हणून जाऊन तेथेंबसलेहोते. तेव्हां दादाशास्त्री यांनी उत्तर केलें जे चौघे येत नाही. येथे शास्त्रीबाबांनी याव अगर आम्ही सारेच येऊ. इतकें म्हणून उभयतां उठून गेले. पुनः शास्त्रीबाबांनी दोन ढालाईत एक चोपदार व एक कारकून पाठविला. सरकार आज्ञा आहे. जाबासलास चौघानी यावें, नाहीं तर आह्मी नेऊ तेव्हां पेणकर चौघे आले. नंतर दुसरा चोपदार व कारकून पाठविला जे आबागुरुजीस पाठवून देणें.
कारकून व ढालाईत व चोपदार गुरूजीस घेऊन येत असतां नारायण जोशी पेणकर धावून जाऊन आबाचे पायस मिठी घातली. ब्राह्मांवर आला तेव्हां कारकून बोलला की, याउपर तोंडान मारून जाऊ म्हणून बालाईतास सांगून त्यास ओढून आबास घेऊन आले. शास्त्रीबाबा यांनी आबास विचारिलें जे तुम्हीं श्रावणी करूं नये म्णतां हे कोणत्या आधारावरून कोणी शास्त्र पाहिलें आहे कीं काय ? तेव्हां आम्हीं पाहिल नाहीं. म्हणून उत्तर केलें. यांस अधिकार नाहीं, महणून म्हणतां आणखी तुमचा बोलणार कोण याहून समजलेला आहे कीं काय ? म्हणून विचारीलें. तेव्हा नाहीं, म्हणोन जबाब दिला, याजवर शास्त्रीबाबा बोलले तुम्ही करीता हे परिणामाचें नव्हे. मागे यमाजीपंती केलें तें शेवटास गेलें नाहीं व नारायणराव साहेबांनीं केलें तेहीं शेवटास गेलें नाहीं.
तुम्ही काय पदार्थ यांजवर ब्राह्मण बोलू लागले आपण शास्त्रसंमतें विचार करून ठरविलीत ते आम्हीं ऐकूं तोंपर्यंत श्रावणी करूं लागल्यास दंगा करूं, डोंचकी फोडूं अनर्थ करूं, त्याजवर गुरुजीस शास्त्रिबाबांनी विचारिलें जे तुम्ही कसे करीत आला सांगणे यांनी उत्तर केलें यथाविधि होम चरू करून याज्ञिक करीत आलों. याप्रमाणे चतुर्दशीस झालें. पौर्णिमा श्रावणी ब्राह्मण दंगा करणार याजवरून नाना श्रावणीस बसले. त्याजकडे चिटी पाठविली. सर्व गृहस्थ आम्ही मिहोन बसलो. नानांनी जनोबास आणून बलले, तुम्हास काम सांगितल्याप्रमाणे करण्याचा ऐवज नाहीं. म्हणोन दादोपतासही आणून रागे भरले जे तुम्हांस श्रायणी चालविणविशीं सांगितले असता हे काय? आतां चालवाव्या असें सांगितलें. दिवस विचारिला तो तीन घटका राहिला. तेवहां आतां श्रावणी आटोपणार नाहीं तेव्हा क्सें करावें हें शास्त्रबाबांस विचारून येणें तो अस्तमात झाला. म्हणोन दादोपंतास तुमहीं जाऊन प्रभू ज्ञातीस सांगावें घोळाखाली हा समय झाला. त्यास भोजनास उठावें. श्रावणी हस्ताक्षर अगर श्रावणावर यथास्थित करवूं आपण संशय न धरावा. भंजनास उठावें. याप्रमाणें नानाकडे जाऊन येऊन येथे बोलले. आम्ही उत्तर केलें जे. या मंडळीस आणिलें सरकारांतून पाठवून समजूत करणें पडली. बरे असो.
सरकारांतून अथवा शास्त्रीबाबांकडून अडथळा झाला नाहीं. ब्राह्मणांचे आग्रहास्तव होता होता समय झाला. असें रुसव्याचे अर्थ बहुत बोललो. आमचें ज्ञातीस कोणीच त्रता नाहीं, असें झालें. श्रावणी राहिली. सारीच कर्मे बंद झाली. याचा मार्ग काय म्हणोन बोलल्यावर फिरून नानाकडे व शास्त्रीवायांकडे गेले. उबयतांचा निरोप घेऊन दहा घटिका रात्रीस आले जे ऊदईक वरकड कर्मे चालण्याचा बंदोबस्त करून देऊ म्हणोन आज झाली ही गोस्ट आम्हांस देऊन भोजनास उठवें, असें बोलले. नंतर आम्हीं सर्वत्र भोजनास उठलों प्रतिपदेस तृतीय प्रहरी सभा करून पेणकर नेऊन निषेध केले जे तुम्हीं केलें हैं ठीक नाही चालते तसे चालवावे. परिणाम शुद्ध नव्हे तुमचें बोलणे गंगाधर दीक्षित त्रिंबकशास्त्री यांस समजावणे त्यांचे गुरुजीही उदयतांकडे जातील असे बोलण्यास प्रारंभ झाला आहे.
पत्र नंबर ३ पो ॥ छ ३० जिलकाद भाद्रपद मास.
आपा बळवंत सर्वाध्यक्ष होऊन पूर्वी नारायणराव साहेब केला संकल्प सिद्धीस न्यावासा करून पेणकर वगैरे ब्राह्मणसुद्धां दंग्यास प्रारंभ केला. तात्या चिटणीसांचे घरी जाऊन से पन्नास ब्राह्मण दरवाज्यांत बसून सायंकाळपर्यंत उपोषण केलें, आच्यारी पाणके, हात यावे. तुमचे हात द्यावयाचे नाहींत. सरकारांतून मागतील तेव्हा देऊ असे प्रभूनी उत्तर केलें व नाना व शास्त्रीबाबांचे कानावर घालविलें, तेथे उत्तर झाले जे ब्राह्मण म्हणतील ते ऐकावें. त्यावरून पेणकरांस सांगितलें जे ब्राह्मण आमचे वाड्यांतील गेले. आम्हीं घालविले, तर त्यांची नावे लिहून था. त्याचें उत्तर केलें जे सरकार मागतील तेव्हां देऊ, नंतर शास्त्रीवायांकडून कारकून व प्यादे येऊन ब्राह्मणांस बोलले जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी कबूल केले. मग दुराग्रह का करितां, म्हणून उठवून नेले. अशा मजलीस आले आहे.
पत्र नंबर ४ पो ॥ छ ३० जिलकाद भाद्रपद.
तात्या चिटणीसांचे वाड्यांत ब्राह्मण येऊन दंगा करावा जानवी घ्यावी, धोत्रें दुहेरी करावीं, हा बेत झाला. तेव्हां आम्ही सर्व हुशार होतों, यामुळे परतोन गेले. आपा बळवंताचें म्हणणें नानापाशी पडलें कीं, नारायणराव साहेबांची याद परत घेतली. त्यांचा सूड मला घेणेच. नाना बोलले इतका आग्रह कशास करिता, तात्या व आम्हीं एक होऊन ठरविलें तें करावें. तेव्हां तुमचें ऐकणें नाहीं. म्हणून बोलून गेले. ब्राह्मण पुढे करून दुराग्रहे हा अविचार करावा. हीच शेवटची | मजल आणली आहे. बरें ईश्वर त्राता घडेल ते लिहू तीर्थविधि एकंदर तिकडील राहिल्या असतील त्या पत्र पावतांच व्हाव्या. इकडील व कोकणातील करविल्या. श्राद्धपक्ष ब्राह्मणभोजन करणें त्याऐवजी दहावीस गाई मिळवून त्यांस अन्न घालावें. असा इकडे बेत केला आहे. त्यांस सदरहू अन्वयेंच तिकडे असावें. नीलकंठराव यांचे येथें उत्साह त्यास ब्राह्मण हरदास उभा करू नये. तो उभा राहतो तुम्हीं बसतां हें नीट नाहीं हाही घोळ घातला आहे. येणेंप्रमाणे जिलकाद महिन्यांतील वर्तमान, जिवबाचा मात्र दुराग्रह आहे. गुरुबावांनी सर्व पंडित मंडळींची खातरजमा यथास्थित केली आहे. आयाशास्त्रीही पल्यावर आहेत. परंतु सरकार आज्ञा व पुढे काय निकाल करतील पहावें, शास्त्रीबाबांनी सरकारच्या वतीनें बोलायें, आणि सर्व पंडितांनी इकडील बोलायें असा घाट आहे. श्री कोणते थरास नेईल तें नेवो. हे तरी पूर्व उसने उगवण्यावर आले आहेत. हरीपंत तात्यांनी गंगाधर दीक्षित यांस एकांतीं विचारिलें जे तुम्हांकडे मनास आणणेचे आध्वर्यव आलें त्यांत काय ध्यानांत आलें ? तेव्हां उत्तर केलें जे प्रभूंच्या उपाध्यांनी दोन चार ग्रंथ आणून दाखविले. पेणकरांस दाखवा म्हटले. त्याजपाशीं ग्रंथ नाही. यमाजीपंताचे पत्र घेऊन हिंडतात, तेव्हां काय मनास आणावें. तेव्हां तात्यांनी खंबीर काढला जे, आपाबळवंत केवळ करितात असें आम्हांस करणें नाहीं.
पत्र नंबर ५ पो छ १४ जिलकाद मिति भाद्रपद शुद्ध ११.
पंडित मंडळीचा प्रकार तो चांगलाच झाला आहे. तात्या आल्यावर घरोघर ब्राह्मणांनी दंगा करणें राहिला. ब्राह्मणभोजन हव्यें कव्यें ही राहिलीच तेव्हां नाना, तात्या व आपा बळवंत बसून विचार झाला. तेव्हां दुराग्रह विशेष करणे ठीक नाही. जेव्हा तेही दुराग्रहास पडतील तेव्हा तुमचा दाब राहणार नाहीं. काय बंदोबस्त करणें तो शास्त्रीबावांकडून करवावा. प्रभूंनी एका केला आहे यजमेतही होत आहे. तेव्हां हे ठीक नव्हे, त्याजवरून आपा बळवंत विचारांत पडून सरकारांतून पन्नास बारगीर मागून घेतले, ते नेहमी चौकीस त्यांनी आपल्या वाड्यांत बसविले.
बाहेर जाणे तेही बहुत खबरदारीने जात. नानांचे म्हणणे आम्हांस प्रभूंचाही पक्ष करणें नाही, व ब्राह्मणांचाही करणें नाही. शास्त्री करतील ते करोत. तात्यांचा खंबीर उणे होईल तेच करावयाचे. आपा बळवंत बोलले, मी त्यांस युक्तीनें राजी करून उणें करितो अशी प्रतिज्ञा केली. त्याजवरून त्रिंबकरावानें तात्या चिटणीसांशी बहुत साफीची हितशत्रुत्यपणाची बोलणी फार केली, उत्तरें ही निर्मिडपणे सडकून शेवटचे मजलीची केली. याजवरून यत्न धकून राहिले.
पत्र नंबर ६ पो ॥ छ २२ जिल्हेज.
आयाशास्त्री यांनी एक दोन वेळ नानांचे कानावर घातलें जे शास्त्रार्थ पाहता यांचे ज्ञातीचे ठीक आहे. त्याजवरून उत्तर केले वाजवी असेल तसेंच पाहून करावयाचे. याजवरून ग्रंथ मिळवावे, दाखले पहावे, हेच चालले आहे. दंगा करणें तर तूर्त तहकूब आहे. तात्याचा खंबीर, आहे तोच आहे. श्रावणी, पक्ष, श्राद्धे, सर्वांची राहिली. आम्हांस काहींच करणें नाहीं. म्हणून बसलों आहों. तूर्त पुस्तकाचा प्रसंग पडला आहे. मिती भाद्रपद वद्य पंचमी बुधवार
तात्या व आपा नानापाशी बोलले जे आज आमचे घरीं ब्राह्मण उपोषित बसलें असें विहू करून बोलतांच नानांनी उत्तरास प्रारंभ करून बोलू लागले की, मागें बहुतांनी केलें तें शेवटास गेलें नाहीं. नारायणराव यांनी कागदपत्र घेतले ते प्रसंगोचित त्यांनी काढून घेतले. पुढे ही त्यांचे दिवस असेच राहतील असे नाही कोणी तरी दैववान होऊन तो प्रभूस अनुकूळ झाल्याने त्यांचा वेळ पडल्यास, हे शल्य त्यांचे मनांतून जाणार नाही, तेव्हां या गोष्टीचा उद्योग करणे प्राप्त कार्याअंती प्रभूसही देणें प्राप्त येईल. तेव्हां पत्र घेतल्याचे सार्थक काय ? दुसरें, ते अतिभाग्यवान तुम्हीं कधींचे, त्यांशी स्पर्धा करणे उचित नाही. तुम्ही सत्ताबळें केलें तरी, त्याजवर जबरदस्ती करण्याचें कारण काय ? त्यांजकडून कोणते आग्रहांचे बोलणें पडलें आहे. सर्व सोडून बसले आहेत. पुढे बोलत देखील नाहींत. ओढाओढ कराल तर मरावयास टेंकले आहेत. एकी करून जमाल तरी किती जणास माराल? लौकीक काय होईल ? ते काय वांकडें बोलतात. याचा विचार करा. शास्त्राधार पाहतां ते वावगे चालत नाहींत, चालतात त्याहून त्यांनी अधिक करावें परंतु त्यांचे करणें सर्व तुमचे स्वाधीन. तुम्हीं करितां तेंच ते करितात. त्यांचे जातींत ब्राह्मण नाहीत. तुम्हांसच ब्राह्मण्याचे अगत्य आणि उपाध्येपणा करितो. त्यांचं असे नाही. मग रिकामी कटकट वाढावी यांत जीव नाहीं तुम्हीं कांहीं बोल बोलता व ऐकतां म्हणून ब्राह्मण तुमचें दारी बसतात. आमचे दारी का बसत नाहींत. स्पष्ट तुम्हीं का बोलत नाहीं.
ब्राह्मणांजवळ बोलण्याचे कारणाचा ऐवज तरी काय आहे. प्रभूंचे उपाध्यांनी चार पुस्तकें काढून मोठ्या हंगामाचे सभेत पंडित ब्राह्मणांस कायम केलें, तेव्हां तोंडे काढून कोणीच का न बोललेत. दबून घरांत करितात इतकंच चांगलें. दाब ठेवून त्यांनी वागावें आणि गंगार दीक्षित यांस हा सर्व इतिहास नानाचे बोलण्याचा बोलून पुढें विचार काय करावा ? नाना मनावर घेत नाहींत. तेव्हां आपणास बोलता येत नाहीं. परंतु हे ठीक नाहीं. ब्राह्मणांस काय सांगावें ? त्यावरून दीक्षितांनी उत्तर केलें कीं, सर्भेत अथवा त्यांचे शास्त्र पाहू जातां काही ठीक नाहीं. त्यापेक्षा चालते ते चालावे हे चांगलें. असें करण्याचें नसल्यास तुम्हांकडे स्वामित्व आहे. मर्जीस येईल तें सांगावें. आम्हांस विचारिलें तरी शास्त्राधारे सांगणे पडेल.
प्रभूंचा उपाध्या समजून घेईल तें मान्य. असे प्रभूंस असतां त्यांचीच समाजाविशी येथील मंडळीकडीन होणे कठीण आहे. पुस्तकेंही नवीन नव्हेत.. गागाभट्टी व यमाजीपंती झाली असता त्या अन्वये चालले नाही. त्यातही वावगे नाही.ते नवीनच. उपाध्या प्राधान्य म्हणून बोलतो. त्याचे उत्तर होत नाहीं. तेव्हां शास्त्र लटकें करू कोणी म्हणावें. त्यांचा अनाचार चित्तांत आणून म्हणावे तरी सारे सारखेच, आम्हांस ते तरी कसे काय आहे ? अन्योन्य नवीन आहे असें नाहीं. बहुत समुदायामुळे लोपलें जातें, इतकाच अर्थ, वरकड जेथे ब्राह्मण समजोन आहेत तेथें वावगे त्यांजकडेही नाहीं, असें नाहीं. म्हणोन अनाचार ही म्हणतां येत नाहीं असें ही बोलले. आपण गंगेस (?) केलें तसें चालावें मान डोलवून द्यावी हे नीट.
पत्र नंबर २० पो ॥ छ २८ रबिलाखर पौष मास.
हरीपंत तात्यांचे पोटांत दुखत आहे. आमचा सर्वांचा निश्चय झाला आहे जे पंडितांची सभा करून गंगाजळी सर्भेत ठेवून मागील ग्रंथ पाहून सांगावे. मागील ग्रंथ दूषित असल्यास फाडून टाकावे. तुम्ही करून द्याल तो श्रीकाशीस नेऊन तेथे मान्य झाला म्हणजे तसेंच चालवू नाहींतर आम्ही कांहींच करीत नाहीं. मग बलात्कार करितां हेंच निष्ठुर बोलावें, याप्रमाणें गुरूंबावाचे संगत आहे. जमादिलावल
पत्र २१ पो । छ २ जमादिलावल.
पेणकर ब्राह्मण कज्या करीत बसले आहेत, त्यांणी पौष वद्य १० रविवार प्रातः काळी तोफेबरोबर वेदशास्त्र गुरुबायांचे घरी दोन ब्राह्मण बातमीस पाठविले. घरी आहेत नाहीत म्हणून चौकशी केली, तो दार उघडून बाहेर येतात तो हे बसले आहेत, गांठ पडल्यावर चार तैलंग मिजवून त्रिंबकराव तात्या चिटणीस यांजकडे सांगून पाठविलें, त्याणी चार माणसे पाठवून आबा तैलंगासमवेत घेऊन कोटांत आले. हें वर्तमान पेणकरांस समजतांच पन्नास पाऊणशें ब्राह्मण दरवाज्यांत गल्ली रोखून बसले. आबा कोटांत तुमचे घरी आला. त्यास हवाली करा म्हणो लागले. तुमचे स्वाधीन करीत नाहीं, असें उत्तर केलें. याजवर ब्राह्मणांनी जमाव केला. आम्हांकडीलही स्वकीय गृहस्थ दोन चारशे मिळाले. गल्लीतून कोणास येऊ फिस देईनात. नारो महादेव राजश्री बाजीराव भाऊकडेस होता. त्यास गल्लीतून येतांना धरून बसवून धोत्र सोडिलें व जानवें तोडिलें तो तसाच त्यांजवळ बसला राहिला. वो आया शास्त्री याणी राजश्री नाना व तात्या यांजकडे आपले मतलबाप्रमाणे सांगितलें. बोलले परंतु ते दिवशी मनावर घेतलें नाही. ती ॥ राजश्री भाऊसाहेब प्रातःकाळीच तात्यांचे वाड्यांत बातमी लागतांच गेले.
आम्ही गृहस्थ जमा करून भोजनोत्तर जिवबाचे घरी जाऊन त्यांस घेऊन गेलो. कारभारी यांस दोन तीन चिटया पाठविल्या. ब्राह्मण दंगा करितात हे आपल्या राज्यांत ठीक नाहीं. सभा करून धर्माधारे सांगाल त्यास मान्य आहो. त्याचें उत्तर ते दिवशीं आलें नाहींच ते दिवशी प्रहर-रात्रपर्यंत वाट पाहिली, नंतर गृहस्य दरवाज्यांतून आपले घरोघर गेले. एकादशी इंदुवारी ब्राह्मण जमा झाले. आपले गृहस्थ दहा-वीस पन्नास पाऊणशे जमा होऊन दरवाज्याने वाड्यांत येत गेले. जमाव पुरा होतो हे पाहून ब्राह्मणांनी दाटी करून वाड्यांत येऊ लागले. असें होत होतें.
ब्राह्मणांनी निकर्ष करून मराठी माणसें दरवाज्यांत उभी होती त्यांची वस्त्रे व काठ्या घेऊन मारू लागले. इतक्यांत आयाशास्त्री यांचे जावई, दहा वीस तैलंग द्रावीड घेऊन येऊन लगट करून दरवाज्याचे उंबऱ्यावर येऊन बसले, आणि तुम्ही असे का करितां तुम्हाशी कांहीं बोलावयाचें आहे, म्हणून फळीस हात लावून वरकड ब्राह्मणांस इशारत करून दरवाज्याची फळी ढकलली. वाड्यांत जबरदस्ती करून येतात हे पाहून दरवाजा लाविला. त्या घालमेलीत जावई व एक शागीर्द ब्राह्मण आंत आला. दरवाजा लावितां मोठा हुमाव झाला. आंतून शंभर दोनशे माणसें व बाहेरून शेंदोनों ब्राह्मण रेटारेंट करिता मोठा दरवाजा मोडून ते आंत आल्यावर दहावीस ब्राह्मण मरतात. ब्राह्मण मेल्यावर आम्हीही राहतों हे घडत नाहीं. असें समजोन आम्हीं, आपले ज्ञातीचा पांचचारशें जमाव झाला यासह, दरवाज्याजवळ आंतील अंगे उभे राहून दरवाज्याचे नितीवर उभे राहून कबलें मारावयास प्रारंभ केला. चुकावून कवलें मारिली. तेव्हां ब्राह्मण दरवाजा सोडून मारुतीजवळ गल्लीत व पाटणकर यांचे वाड्याजवळ जाऊन उभे राहून हाका मारू लागले. कवलांचे मारापुढे येऊ न पावत, तेव्हां आम्ही दरवाज्यात येत नाहीं पुढे गल्लीत उगेच बसतो मारू नका असें म्हणों लागलें. उत्तम आहे म्हणोन मना केले.
सोमवार एकादशीस जलस्पर्श नाहीं, मग अन्न कोठील जाहले वर्तमानाच्या तात्यांस व नानास तीन वेळा चिट्या पाठविल्या. तेव्हां कारकून पाठवून द्यावा म्हणोन उत्तर जासूद आला. याजवरून जिवबा व रावजी आपाजी यांस पाठविलें, ते तात्यांकडे गेले. दादोपंत व आयाशास्त्री तेथेच होते. त्यांची व यांची बोलणी बहुतच झाली. त्यातील सारांश तुमचा जो आया गुरुबाबा तो स्वाधीन करा. नाहीतर ब्राह्मण ऐकत नाहीत. अग्रहास पडू नका. पडल्यास पेचांत याल, गुन्हेगाऱ्या थाल, माझें बोलणें नव्हे. सरकार आज्ञा समजोन करावी. तात्याही बोलू लागले. उत्तर केलें जे आबा आमचे घरीं नाहींत. कोठे दंग्यांत गेले ते समजले. नाहीं. दोन दिवस अन्न पाणी बंद. ब्राह्मण उठवावेत. आबांचा शोध करून येऊन सांगतील ती विनंती करूं तुम्हीं सरकारांतून काय सांगणे ते सांगा. पेणकर यांचे ऐकणार नाही. असे म्हटल्यावर आयाशास्त्री यांस व पेणकर यांस उठून जायें म्हणून निक्षून सांगितलें, तो सोफ झाली. परवानगीचे प्यादे दिले असतां ब्राह्मण उठले नाहीत. तिसरे दिवशी त्रयोदशीस जिपमा व रावबा तात्यांकडे गेले. तात्या बोलले आवास का हवाली करीत नाहीं.
लबाड कारभार, परिणाम लागणार नाही. म्हणून दाटून बोलू लागले. तेव्हा यांनी उत्तर केलें जे सोंड आटपून बोला. तुमचें सोसणार नाही. न्यायेंकरून सांगा. अगर सरकारांतून सांगा. त्यास राजी म्हणत असतां दापती तरी आम्ही जिवावर उदार मरतों. मग धंदा रोजगाराची काळजी कोणास श्रीमंतांचे राज्य सोडून जावयाचें नाहीं, मरून राहू, डोंचकी मारा. अशी निकडीची उत्तरे केली. नंतर दोन प्रहरी दादोपंत येऊन ब्राह्मणांपाशी बोलून वाक्यांत आले. त्यांनी उपोषित गृहस्थ मंडळी बसली तें पाहिलें, निकडीची उत्तरे ही समजोन घेतली, आबास हावाली करा म्हणजे ब्राह्मण उठवितों असें म्हणू लागले. आबा आम्हांजवळ नाहींत व हे घडावयाचें नाहीं म्हणोन सांगितले तेव्हा ते निघोन गेले. नंतर आमचे प्राण जातात पाणी पाहिजे. शेंपन्नास बाहेर पढोन नदीस जाऊन पाणी आणितों. यांत ब्राह्मणांच्या हत्या होतील.
आम्हांकडे शब्द नाहीं. असे नानास लिहून पाठविलें. त्यांणी दादोपंतास नेऊन त्यांस तात्यांकडेस पाठविलें. आया शास्त्री व बाबा फडके व दादोपंत- यांस पाठवून दिले. ते दरवाज्याजवळ ब्राह्मणापाशी येऊन आम्हांस बोलाविल्यावरून दरवाजा उघडून आम्ही गेलों, आंत ब्राह्मण आले. त्यांणी अतिशयेंकरून पागोटें जाळलें त्यांस नेऊ द्यावें. (?) म्हणोन शास्त्री यांणी सांगितलें. त्यावरून पागोटें दिलें. झाले तें उत्तम झालें. तुम्ही व ब्राह्मणांनी कांहीं मनांत आणूं नये. उठोन जावें. असें सांगीन ब्राह्मणांस नमस्कार करावा. त्यावरून बोलणें पडोन आमचा गृहस्थ तीन दिवस उपोषित जानवें धोत्र विरहित आहे यांसी काय आज्ञा. त्यावरून धोत्र व जानवें द्यावें. उत्तम म्हणोन निरोप दिले. ते ब्राह्मण घेऊन गेले.
पत्र २२ पो । छ ९ जमादिलावल माघ मास.
पेणकरांच्या कण्याचा मजकूर पेशजी लिहून पाठविला आहेच. त्या आलिकडे वद्य चतुर्दशीस सायंकाळी थे। गुरुबावा वे || गंगाधर दिक्षित यांजकडे जाऊन शास्त्रीबावांनी मनास आणायास सांगितलें त्यापासून आम्ही तुम्हाजवळ आहो. पेणकरांनी दंगा केला म्हणून एकीकडे राहिलो. आतां तुम्हाजवळ आलो. ` राजश्री तात्यांकडे घेऊन चला, म्हटलें, त्याजवरून ते दिवशी आबा आम्हांकडे आले. उदईक आज्ञा होईल तरी भेटीस घेऊन येतो, म्हणोन कारणाबरोबर सांगून पाठविलें, उत्तम आहे. तुम्हांजवळ असों द्या आणवू तेव्हां घेऊन या, असें उत्तर आलें. दुसरे दिवशीं अमावस्येस गुरुजीस् दीक्षित घेऊन "तात्यांची भेट केली. भेटल्यावर " हे आमचे ओळखीचे नित्य पंडितांत येत असतात. पळाला कां" म्हणून विचारिलें. पेणकरांनी दंगा केला विशोभा करतील म्हणोन एकीकडे राहिलों परंतु सरकारांत गंगाधर शास्त्री व त्रिंबक शास्त्री यांजवळ हजीर आहों आम्हांकरिता यजमानाकडे चौकी बसली ते उठवावी असे बोलले. नानांशी बोलून उठवूं परंतु श्रावणी पासोन कोणकडे काहीं कुरूं नये, असे सांगितलें असतां यजमानाकडे कार्ये केली आहेत, म्हणोन पेणकर म्हणतात. असें रागें भरून बोलूं लागले. पेणकर म्हणतात, हे मुद्यानिशी आंगीं लावावें, म्हणजे अवज्ञा झाली ती कबूल करूं, नाहीं तरी सरकार आज्ञेप्रमाणे चाललों आहों. पुढे सांगाल तसे करूं असें उत्तर करून निरोप घेतला.
गंगाधरशास्त्री यांस तुमच्या जिम्मेस असो द्यावे. म्हणोन निरोप दिला. ते दिवशीं गार्दी नानास विनंती करून उठवावे म्हणौन दादोपतास त्यांनी सांगितलें. तो दिवस त्यांची गांठ न पडली म्हणून तसाच गेला. दुसरे दिवश परवानगी घेऊन गार्दी उठवून नेले. याजवर जिवबा तात्यांकडे गेले. तुमचे गुरुबाबा येऊन भेटले. मग चौकी उठविण्याविशीं रदबदली कां केली नाहीं, तेव्हां तात्या बोलले गुरुबाया केव्हां भेटले, कोठे होते हे समजलें नाहीं व चौकी परक्यांची नव्हती चौकीदार जाणारांस जाऊं देतो व येणारास येऊ देतो, मग दिकत ती कोणती ? तेव्हां मर्जीस येईल तेव्हां उठवाल म्हणोन आला नाहीं असें बोलिले, ते ऐकून भोजनास गेले.
दादोपंत बसले होते. ते बोलूं लागले जे, गोविंदराव बावा रामाजीबाबा वेडे नव्हते. नारायणराव साहेबाजवळ लिहून दिलें तें समजूनच लिहून दिलें, त्याप्रमाणंच वर्तावें. आग्रह करूं नका. यांत नऊ कलमें म्हणत नाहीं. एक मंत्र व सीक (?) खेरीज करून करावें असें सांगू लागले. लिहून घेणार व देणार गेले. त्या मागें तात्या आहेत. त्यांचे विचारास येऊन सरकारांतून सांगतील त्याप्रमाणे करू उत्तर कां करितां ? तात्यावर निमित्त कां ठेवितां ? यजमानास जाऊन सांगतों. सांगतील तसें येऊन बोलूं असें म्हटलें. चार घटका बसा, तात्या भोजनोत्तर तुम्हांशी बोलतील. तुम्ही सांगितले च सांगणे होय. असे उत्तर करून निघून आले. त्याजवर द्वितीयेस शास्त्री यास सांगून पाठवून गुरुजीस नेले.
पेणकर ब्राह्मणांशी पंचमीपर्यंत तुमचा फडशा करून निरोप देऊ म्हणून करार केला होता. ती मुदत झाल्यावरून त्यांची गडबड आहे. फिरोन दंगाही करणार असे ऐकतो. तात्याकडे जाऊन आमची मुदत सरली पुढे आज्ञा काय ? म्हणोन विचारलें. त्यावरून एका दों दिवशी सांगू म्हणोन उत्तर केलें असतां, आजच पेणकर मंडळी दादोपंताचे घरी जाऊन बसली म्हणोन कळले. त्याजवरून शोधास पाठविलें त्यांस दादोपंतच नानाचे वाडयात भेटले.. त्यांचेही ऐकिलें आहे. खरे आहे. पुढे काय होईल ते समजेल तसे लिहू
पत्र नंबर २४ पो छ २७ जमादिलावल
नाना मैराळ व सज्याबरोबरील पत्रे पावली, वडगांवचीही पत्रे पावली. ग्रामण्याचा मजकूर पेशजी लिहिला. त्याजवर तात्यांनी जीवबास नानापाशी नेऊन त्याजपासून पूर्वी नारायणराव साहेब समजोन केलें आहे. तुमचेही गोविंदराव बावा व रामजी बावा सर्व जात होते. त्यांणी समजोनच पत्र लिहून दिलें, त्यास तुम्ही रिकामे ओढितां तेही तसेंच चालावें असे बोलले. याणी जाऊन सांगतों असें उत्तर केलें. नंतर तात्यापाशी निरोप पाठविला, जें हें सांगणें व करणें पडते. त्यास आमचें म्हणणे वावगे नाहीं. सर्व ज्ञातीचें म्हणणें सभा करून आमची ज्ञात कोण हे ठरवून द्यावें. नंतर सरकार आज्ञा कर्मे सांगाल तशी करणें प्राप्त. परंतु सरकारांतून सांगणे ते विचारें सांगावें असें म्हणून आले. त्याजवर आणखी जिवबास नेऊन सांगितल्याप्रमाणें पत्र परिच्छिन्न द्यावे. वाढू नये असे असता त्यांनी सांगितले. याणी उत्तर केलें हा विचार सर्वांचे मुख्य रामराव बाबा चिटणीस ते तेथें नाहींत व नीळकंठराव गंगेस गेले आहेत, त्यांस लिहून आणवू नंतर सांगणें तें सांगू म्हणोन आले. तेव्हां पत्र देत नाहींत हें समजलेंच. त्याजवर ब्राह्मण येऊन दंगा करावा असा घाट आहे.
आया शास्त्री यांजकडे एके दिवशी ब्राह्मण बसले. असे चालले आहे. आपा सासवडास गेले होते. तेही आल्यावर शेवट काय होतो हैं समजेल, नेट सोडिल्यास प्रासतात. जाणोन नेट सर्वांचा चांगलाच आहे. या प्रवाहामुळे काहीच सुचत नाहीसे झाले आहे. वडिलांचा आशिर्वाद काय शेवटास लावील तें खरें भार एक श्रीवर आहे. वरकड कोणी • बोलावयास जागा किंवा आश्रय नाहीं हें समजलेंच आहे. आबालवृद्ध दगडमार करितात तितके सोसून होईल तसे शेवटपर्यंत पहातां निर्वाह करणार श्री समर्थ. वरकड यातना कोणतीही सोसणें बाकी राहिली नाही. झालें वर्तमान कळावे होईल तें मागाहून लिहूं, मोठा दुराग्रह नारायणराव यांणी लिहून घेतलेली यादी त्याप्रमाणें मान्यतेची करून द्यावी. याबद्दल हरत-हेनी ज्ञातीस कर्माची अडचण व राजश्री हें प्रकरण फंद फितूर वगैरे तुफान आदावती उपमर्द करणें हे सत्तांबळें व ब्राह्मणवाद आणि राजेपणाचे स्वामित्व, त्यांचे घरी अधिकार जबरीमुळे आला. त्याच ज्ञातीस त्राता नाही. शास्त्र व विचार न पाहतां उपहास चालला. तेव्हां सर्वांनी विचार केला की, जे ते जबरदस्ती जुलूम करतील ते सोसावे. जसा प्राण वांचेल तसा वांचो मरेल तो मरो. ईश्वरेच्छा. ईश्वराने डोळे झाकले. जे दिवशी उघडून पाहील ते दिवशी सुदिन परंतु एकवेळ नारायणरावाचे कारकीर्दीत लिहून घेतले, तसे आणखी देणें हें तरी याउपरी परिच्छिन्न घडावयाचें नाहीं, प्राण गेले तरी जावोत. असा निश्चय होऊन उत्तरें साफ केल्यावरून महालोमहाली सरकारी पत्रे नारायणराव यांचे कारकीर्दीस नऊ कलमें यादी अन्ययें पत्रे घातली.
याप्रमाणे उपहास मांडला, बडबड झाली. असा सहा वर्षे काल काढला, त्या त्या तऱ्हेनें निर्वाह कळेल तसा केला, परंतु कबूल किंवा टांकास गुंतणें हे केलें नाहीं, नंतर शके १७१७ राक्षसनामसंवत्सरे सन खमस तिसैन मया व अलफ आश्विन शुद्ध १३ त्रयोदशीस माधवराव नारायण प्रधान गणपतीचे दिवाणखान्यातील खिडकीत उभे होते. भाद्रपदापासून अभिष्ठ होतेच, खिडकीतून उडी टाकली. पाय मोडून मांडीचे हाड मोडले. आश्विन शुद्ध पौर्णिमेस काळ झाला, ग्रामण्य उपद्रव वगैरे समाप्त झाला. राज्यक्रांतीची फिकीरच प्राप्त झाली. नंतर बाजीराव रघुनाथ आले. त्यास वस्त्रे झाली. आपले ज्ञातिमंडळींनी बाजीराव यांस विनंती केली की, सात वर्षे ग्रामण्य पडले, त्यावरून त्याणी आपले हाते विनंतीविटीवर तीन ओळी स्वदस्तूर लिहून दिल्या, मिटी नीळकंठराव रामचंद्र पागे यांचे हातची आहे ती.
चिटी नीळकंठराव रामचंद्र याणें बाजीराव रघुनाथ पेशवे यांस विनंती लिहिली ती
शेवेसीं विज्ञापना, आमचे ज्ञातीचे ग्रामण्य सात वर्षे पडले आहे. त्यास कैलासवासी श्रीमंत नानासाहेब व श्रीमंत दादासाहेब व श्रीमंत थोरले माधवरावसाहेब यांचे कारकीर्दीत मुंजी व श्रावण्या वगैरे संस्कार चालत आले त्याप्रमाणे पुढे चालवावे.
बाजीराव रघुनाथ प्रधान याचीं चिटीवर स्वदस्तूरची अक्षरें. पूर्वीपासून चालत आले त्याप्रमाणे चालावयास येईल. नवीन आक्षेप पडला आहे तो मजकडून पडणार नाहीं
या ग्रामण्यासंबंधाने आणखी जे कागद उपलब्ध झाले आहेत ते खाली दिले आहेत :--
(१) बाजीराव रघुनाथ पेशवे याचें पत्र
वेदशास्त्रसंपन्न समस्त ब्राह्मण धर्माधिकारी ज्योतिषी क्षेत्र प्रयाग स्वामी गोसावी यासी सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार सु॥ तिसेन मया तैन व आलफ समस्त दालभ्य कायस्थ प्रभु चांद्रसेनीय याचा व पेणकर ब्राह्मण याचा प्रमुचे आचरणाविषयी कजिया पडून आठ नऊ वर्ष ग्रामण्य वाढले. पेणकर ब्राह्मण याणी सरकारची पत्रे घेऊन प्रांतात पाठवून प्रभुकडील कर्मे बंद केली. सबब प्रभु व ब्राह्मण सरकारांत फिर्याद आले. त्याजवरुन उभयतांचे सरकारांत लेहून घेऊन शिष्टसमते मनास आणता पूर्वीपासून प्रभु घरी चालत आहेत त्याप्रमाणे पुढेही चालवावी असे ठरले. त्याजवरून हे पत्र सादर केले असे, तरी त्या प्रमाणे पूर्वापार गागाभट्टीप्रमाणे प्रभू याजकडे करें चालत आली त्याप्रमाणे पुढेही चालवीत जाणे, दिकत न करणे, जाणिजे छ. २९ जिल्काद, बहुत काय लिहिणे मोर्तब सु ॥
(२) पुण्याच्या ब्राह्मणांचें पेणकर ब्राह्मण यांस पत्र
स्वस्ती श्रीमत सर्वोपयायोग्य वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण यांसी प्रती नारायण जोशी प्रमुख समस्त पेणकर मुकाम पुणे याचा कृतानेक शिर सा, नमस्कार विशेष. आपण पत्र पाठविले ते पावले. प्रभुमंडळीकडे कार्य प्रयोजन चालविण्याचा अडथळा आहे त्यास श्रीमंत रा. लक्ष्मणराव तात्या याणी आम्हास लिहिले होते. त्याचे उत्तर येथून पाठविले आहे. त्याची नक्कल तुम्हाकडे पाठविली आहे. त्याजबद्दल दरबारी गृहस्थाचा जाबसाल पडेल तो आपण करून निभावणी करावी. गागाभट्टीची पोथी साद्यंत प्रयत्न करून आणविली म्हणोन लिहिले त्यास तुमचे लिहिल्यावरून गागाभट्टीचे पुस्तक संपूर्ण पाहिले. त्याप्रमाणे चाल चालत आली आहे. त्या पुस्तकाअन्वये यथास्थीत आहे. त्याप्रमाणे चालवावे, कोणते गोष्टीविषयी दिकत घेऊ नये. तूर्त सरकारातून सरकार ब्राह्मण चालवावयास देतील त्याचे हातून यथापूर्वक चालत आले त्याप्रमाणे पुढेही चालवावे. कोणेविषयी अडथळा पडू देऊ नये. पूर्वापार चाल चालत आली आहे त्याविषयी संशय कोणास असल्यास त्याणी संशयनिवृत्ती करण्यास पुण्यास यावे. संशयनिवृत्ती होईल. कळावे बहुत काय लिहिणे. कार्तिक शु। ९ रविवार हे विनंती. शके १७०९ प्लवंग नाम सं.
(३) पेशवे श्रीमंत माधवराव नारायण यांचे आज्ञापत्र
वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त ब्राह्मण व धर्माधिकारी उपाध्ये जोतिषी प्रां कऱ्हाड स्वामी गोसावी यांस.
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु॥ तिसैन मया व अलफ को पेण पो। साकसे येथील समस्त ब्राह्मण याणी हुजूर येऊन निवेदन केले की श्रीमंत कैलासवासी नारायणराव साहेब यांचे कारकिर्दीत परभूचे कर्माचरणाविशई सरकारातून ठराव करून दिल्हा त्याप्रमाणें त्याणी वर्तावें तें न करितां आपला धर्म सोडून मनश्वी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकमै करितात येविसी त्यास ताकीद होऊन बंदोबस्त जाला पाहिजे म्हणोन त्याजवरून मनास आणितां पेशजी कैलासवासी तीर्थरूप रावसाहेब यांचे वेलेस चौकशी होऊन परभूचे वर्तणुकेविसी कलमांचा ठराव जाला त्या प्रे॥ त्याणी सरकारांत कतबा लेहून दिल्हा त्यांतील कलमें बितपसील.
या ठिकाणी आधुनिक पुणेकर संशोधकांना आनंदाच्या गुदगुल्या उत्पन्न करणारा व नारायणराव पेशव्याच्या चितेवर पावन झालेला पृ. ३९ वर नमूद केलेला नऊ कलमी कतबा दिलेला आहे.
--येणे प्रमाणे नवकलमें लेहून दिल्ही असतां परभू आपले घरी चोरून ब्रह्मकर्म करितात यामुलें पेणकर ब्राह्मणाचा व त्यांचा कजिया वाढोन परभूचे घरची सर्व करें बंद जाली त्यास येयसीचा हालीहि विचार करितां परभूचे कर्माचरणाविशई पेशजी चौकसी होऊन कलमें ठरावून दिल्ही आहेत त्याप्रमाणें त्यांणीं वर्तावे ते न करितां आपला धर्म सोडून चोरून मनश्वी वर्तणूक करितात हे आनुचित. पेशजी कलमे ठरावून दिल्ही आहेत तीच योग्य ऐसे शिष्ट संमते ठरोन पुण्यांत परमूची घरे आहेत त्यास हुजूर ताकीद करून हैं पत्र तुम्हास सादर केले असे. तरी प्री महार येथे परभूची घरे असतील त्यांस निक्षूण ताकीद करून सदरहू कलमाप्रमाणे वर्तवीत जाणे. जाणिजे छ. २३ जमादिलाखर आज्ञाप्रमाण.
लेखनसीमा.
बार.
ग्रामण्यांच्या बखरींतला मजकूर वरवर पाहून आपले मत बनविणारांना सकृद्दर्शनी असे वाटण्याचा संभव आहे की नाना फडणीस ग्रामण्याच्या भानगडीत स्वतः मुळीच पडला नाहीं, उलट त्यानें बंडखोर ब्राह्मणांना वेळोंवेळी समज देऊन ग्रामण्याचे बखेडे करण्यापासून परावृत्तच केले. परंतु कायस्थ प्रभूंच्या धार्मिक हक्कांबद्दल त्याचे स्वतःचे मत काय होतें, कायस्थ प्रभूंवर होत असलेला छळ व जुलूम हे वाजवी होते की अन्यायाचे होते, हैं मात्र स्पष्ट व्यक्त न होऊ देण्याइतकी आपल्या वर्तनाची सफाई त्याने ठेवली होती खास. तथापि बखरीतील पत्रव्यवहाराच्या त्रोटक विवेचनांतून दृष्टी काढून, इतिहासाच्या विस्तृत क्षेत्रांत प्रत्यक्ष प्रवेश करून चोहोंकडे दृष्टी फेंकली तर मात्र असेंच प्रत्ययाला येईल की, ग्रामण्याच्या रंगभूमीवर स्वतः तटस्थपणाचा मुखवटा घालून देवपार्टी आणि राक्षसपार्टी यांची तोंडमिळवणी करण्याचा नाना फडणीसाने जो पार्ट केला तो निवळ पार्टच होय आणि नाटकांतल्या सर्व प्रमुख प्रमुख पात्रांची सूत्रे तोच स्वतः अलिप्त राहून गुप्तपणानें हालवीत असावा.
श्रीशिवछत्रपति वंशज सातारकर यांच्या वेदोक्ताचा प्रश्न इतका हडसून खडसून सिद्ध झालेला असतांनाहि, ज्या अर्ध्या शहाण्या नानानें त्यांच्या घराण्यांतली चालूं वैदिक कमें बंद पाडवून तेथें मुद्दाम पुराणोक्ताचा प्रघात पाडला, तोच नाना चां. का. प्रभूंच्या ग्रामण्यांत अगदी साधूप्रमाणे वागला असेल असें म्हणणें किंचित् धारिष्टाचे होईल. काशीच्या ब्राह्मणांस नाना फडणीसानें जें पत्र लिहिलें त्याचें आलेलें उत्तर वर दिलेंच आहे. हा इतका उपद्व्याप नानासारख्या चतुर मुत्सद्यास करण्याचें कारणच नव्हतें. गागाभट्टासारख्या अग्रगण्य पंडितानें ज्या गोष्टीचा निकाल कधींच कायमचा लावून टाकला होता, त्याच प्रकरणी पुन्हां काशीच्या पंडितांचे मत घेण्याचे कांहींएक प्रयोजन नव्हतें, ही गोष्ट नानासारख्या साडेतीन शहाण्यांत मोडणाऱ्या मुत्सद्याच्या ध्यानांत येऊं नये हे विलक्षण होय ! पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीं. नारायणरावाच्या कारकिर्दीत सखाराम हरीच्या व निळकंठराव पाग्यांच्या तलखपणानें भेदरून जाऊन, नारायणरावाला धरण्याच्या कटाची कुणकुण कळली असतांनाहि खुनाच्या आदल्याच रात्री नाना पुण्याहून सासवडाला पळून गेला. या त्याच्या पलायनाच्या मुळाशी ग्रामण्याच्या भानगडीचा संबंध असावा असा तर्क आहे. इतिहाससंशोधन जसजसे होईल उससे काहि मुद्याचे स्पष्टीकरण केव्हा तरी होईल असा भरंवसा वाटतो. परंतु सवाईमाधवरावाच्या वेळचें जें आज्ञापत्र वर दिलें आहे तें आमच्या या तकांस पुष्कळच बळकटी आणणारें आहे.
सवाईमाधवराव ता. १८ एप्रिल सन १७७४ मध्ये जन्मला. वरील पत्राची तारीख फाल्गुन वा १० शके १७११ सन १७८९ आहे. अर्थातच त्यावेळी सवाई माधवरावाचें वय अवघें १५ वर्षांचें होतें. त्याला मरेपर्यंत नानाचा प्रतिबंध व कांच भयंकर होता. त्याला कोणतीही गोष्ट मुखत्यारीनें करितां येत नव्हती, हे महशूरच आहे. तेव्हां वरील आज्ञापत्र नाना फडणीसाचेंच होय यांत शंका नाही. शिवाय असल्या भानगडीच्या प्रकरणांत स्वतंत्र बुद्धीने आज्ञापत्र काढण्याइतकें सवाईमाधवरावाचें वयही नव्हतें.
सातारच्या महाराजाच्या घराण्यात वेदोक्त कर्मे बंद करून ती पुराणोक्त विधीनें नानानें चालू केली या संबंधानें एक पत्र उपलब्ध झालें आहें ते असे :
नाना फडणविसाचें पत्र.
श्री.
राजश्री बाबुराव स्वामीचे शेवेसी
विनंती उपरी तुम्ही पत्रे पाठविली ती पावली राजश्री स्वामी यांची मुख्य वैशाख वद्य पंचमीस आठ घटकाचे मुहूर्तावर समारंभेकरून जाहली पुढे लग्नाचा समारंभ उत्तम जाहाला पाहिजे पाच-सात दिवस अवकाश असावा याजकरिता जेष्ठ शुद्ध द्वीतीयेस लग्नाचा तीथीनिश्चय केला आहे. पुराणोक्त विधीनें मुंज्य जाहाली वेर्णेकरून बाईसाहेब आदिकरोन सर्वांस संतोष वाटला. किल्याखाली उतरावयाचा मुहुर्त द्वादसीस योजिला आहे त्यास दोनसे स्वार चांगलें समागमें येक कारकून प्रामाणिक असे मुहुर्तापूर्वी येथे लौकर पाठवावे आज्ञेचे लक्ष धरून पंधरा हजार पावेतों कार्य उरकून घेतो म्हणोन लिहिले. तें सविस्तर कलले. ऐसीयास श्रीमंत माहाराजाची मुज्य वद्य पंचमीस पुराणोक्त विधिकरून बाईसाहेबांस संतोष वाटून जाहाली ही गोष्ट तुम्ही फारच उत्तम केली. हेच समजले आहे.. . जेणेकरून चांगले दिसे ते तुम्ही कराल छ. २३ ।खर हे विनंती ।। छ. २४ साखर
(प्रो. डोंगरेकृत सिद्धांतविजय, परि. पृ. १०६.)
आमच्या जवळील एका अप्रकाशित बखरींत खालील मजकूर आहे
माधवराव नारायण पेशवे यांचे कारकिर्दीत काशिनाथ आबा गुरुबोचा याणी नाना फडणीस व हरिपंत फडके याणी चांद्रसेनीविसी दुराग्रह करू नका तुम्हास पाच हजार रुपयेचा गाव इनाम करून देतो बोलले. ते न ऐकता व्रत्तीचा लोभ धरून पंडितास कुंठीत केले. तेव्हां बाजीराव पेशवे याणी धर्म चालवण्याविसी पत्रे दिल्ही.
दुसऱ्या एका अप्रकाशित बखरीत माहिती आहे ती
(नारायणरावाची चिठी दादासाहेबानी सखाराम हरीस परत दिली) हे हरीपंतास माहीत होते. त्याणी व आपा बळवत याणी एकविचार करून नाना फडणवीस याजला समजाविलें कीं ब्राह्मणांचा आणि प्रभुंचा कांहींच भेद समजुती येत नाहीं. याजकरितां त्याजला आचाराविषयीं शिक्षा जाली पाहिजे. येविषयों यमाजी शिवदेव याचे कारकिर्दीत ग्रामण्य जाले. ब्राह्मण बहुत मिळाले परंतु ज्ञातनिर्णय जाला नाही. भाऊसाहेब पाणपतास जाता या लोकांस बोलाविले असतां । बराबर गेले नाहीत, असे उन्मत्त, यास्तव परत आल्यावरी समाचार घेऊ बोलले ते बहुतेकांचे श्रवणी आहे. आज्ञा जाली असता त्यांचे शब्दापासून व धर्मसंस्थापनेपासून मुक्त होऊ, असे बोलता नानानी उत्तर केलें की या गोष्टीचा साहस ज्याणी केला त्याचे कल्याण जाले नाहीं.. भाऊसाहेब परत कोठे आले तेव्हां तुम्ही आग्रह धरू नये. त्यासमयी हरीपंतानी पुन्हां उत्तर केले की ती गर्दी जाली त्यांत आपण होता. केवळ प्रभुमुळे नाश जाला. सर्वांचा एकवेळ समाचार घ्यावा असे मनात येते. आज्ञा जाली पाहिजे, नाना भिडेमुळे उगेच राहिले. हरिपंतानी पडते फळाची परवानगी घेऊन प्रांतांत कागद पाठवून ब्राह्मण पुण्यास जमा करून ग्रामण्य केले. पुढे त्रिंबकराव तात्या चिटनिवीस याचे वाड्यावरी ब्राह्मण चालोन जाऊन कलागत केली.. मारामार होऊन ब्राह्मण श्रीमंताकडे रुबरू फिर्यादीस गेले.
सवाईमाधवराव पेशवे याणी तुम्ही परभारे जाऊन कलागत करून मार खाता आणि फिर्यादीस येता. आम्ही त्याजवर जुलुम कसा करावा तुम्ही दांडगाई करून त्यांचे घरी का गेला. आम्हास विचारू नका. तुम्ही ते मरा असे बोलल्यावरून त्याणी तीच रजा जाली मानून पुन्हा जाऊन दगड नल्ये घरावर फेकू लागले. घरांत वागण्यास अडचण धोंडा बसण्याचे भय होऊन त्याचे वाड्यांत सात आठसे स्वज्ञात होती त्याणी सोडगी जळाऊ लाकडे आणिली. त्यातील एक एक उचलीन धावले. आणि मारीत गणपतीचे दरवाजापर्यंत काढून लाविले. मोठा दंगा माजला. सरकारांत जाहीर जाले. चिटणीस, पोतनीस, निलकंटराव, हैबतराव, शंकर नारोलकर खंडेराव दौलत वगैरे बोलावून नेऊन विचारले. याणी सांगितले प्राणच घेण्यास ब्राह्मण आल्यावर साप जंगलात राहतो परंतु सेपुट उडवले म्हणजे चावतो. तसे आम्हास मारू लागल्यावर त्यांचे तोडाकडे पाहणे कसे घडेल ? या करितां मारले. आता घणी आहात पाहिजे तसे करावे. ऐकून घेऊन तुम्ही पंचाइतिस राजी शास्त्रार्थास आहा की नाहीं. याणी उत्तर केले की गीता गंगा ठेवून पंडित सांगतील त्यास कबूल आहो. बरे म्हणून उत्तर जाले. विचार करितां रामशास्त्री याणी उत्तर नानास दिल्हे की त्यांचे स्त्रियानी पाक केला असतो आपण जाऊन जेवावे त्याणी वाढावे त्यांत भेद नाहीं. ते आपण एकरूप असे सांगता सभा करणें राहिले. पुढे माधवराव नारायण हवेली वरून पडले, वारले. नंतर बाजीराव रघुनाथ आले त्याणी सनदा माहालोमाहाली देऊन मोकलीक केली.
रा. वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६ यांत ज्या दोन जुन्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यातील मजकूर --
(१) लेखांक ४४४.
ग्रामण्य माधवराव नारायण शके १७१४ ता ।। १७१८ काशीहून पत्रे सरकार श्रीमंतास आली. नंतर (आपाशास्त्री) पंचाईत झाली. सोडचिट्टीची पत्रे बाजीराव रघुनाथ यांची झाली. एकवेळ याद जाली राहिली. दुसऱ्याने पत्रे जाली
(२) लेखांक ४५९.
पेशव्यास राजधानी प्राप्त झाल्यावर संपूर्ण ब्राह्मणमंडळी वेदविद्या अधीत. क्षत्रिय चांद्रसेनीय लेखन विद्येत प्रवीण उदरनिर्वाह करून होते. सबब बराबरीनें वागले. चांद्रसेनीय थोडे, ब्राह्मण फार म्हणून द्वेष वाढला. परंतु कर्मलोप जाहला नाहीं. आपाजी यशवंत बिरवाडी ता रायगड, पेणचा मामला सरकार अमलांत ब्राम्हणांनी दंगा केला म्हणून सरकार हुकूम मार्गाचा सांगता दुराग्रहावर येऊन गैरसमजूत हरी बल्लाळ फडके यास समजाऊन ग्रामण्य केले. तेव्हां रामशास्त्री प्रभुणे माहुलीकर यास नानाफडणीसानी चिठी पा|| याचा शास्त्रार्थ कसा ? त्याचे उत्तर त्यांनी पाठविले या करण्यानी फार मेले यश आले नाहीं. आपण कजियात पडूं नये. तेव्हां याची प्रचीत पाहणे, हरीपंत बोलोन, शके १७०९ प्लवंग संवत्सर, सनसमान समानीन मया व अलफ, उत्पन्न केले.
शास्त्री वर्तमान तावत्काल ग्रामण्य जालें नाहीं. बंद होते नंतर शके १७११ कार्तिक शु॥ ३ रामशास्त्री वारले. आपाशास्त्री अधिकारी जाले न्यायाधिशीत. तेव्हां सनदा पाठवून कर्म बंद केलें. अग्रहास हरीपंत पडले. आपाशास्त्री यास आरोप आणला. त्यानीं सन्यास घेतला. शके १७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥। ७. नंतर माघमासी मोंगलावर श्रीमंताची स्वारी तयारी झाली. खडर्यावर फत्ते झाली. आश्विन शु १२ श्रीमंतानी उडी टाकली. पुढे चिटणीस व निळकंठराव व रावजी आपाजी यांनी बाजीराव प्रधान यांची रजा घेऊन पत्रे सरकारची माहालोमहाली घेऊन कर्म मोकळे केलें. त्या शास्त्र्यांत पंडित यांची नांवें
१ बाळशास्त्री टोकेकर १ त्रिंबकशास्त्री.
१ नरसिंहशास्त्री गुर्जर १. सूर्य नारायणशास्त्री.
१ परशरामशास्त्री १ बाळशास्त्री चंदावरकर.
१ रामचंद्र दिक्षित बाम १ त्रिमलाचार्य.
यानी सनदा चांद्रसेनीस शके १७१९ पिंगलनाम संवत्सरे समान तिसैन मया अलफ वैशाख मासी पुढे आपाशास्त्री काशीस गेले. काशीकरांनी पत्र पाठविलें त्याचें उत्तर इकडून गेले. पुढे शके १७३९ इंग्रजी झाली.
ग्रामण्य दहावें
चिंतामणराव पटवर्धन व नीळकंठशास्त्री थत्ते यांचें ग्रामण्य.
शके १७४९ इ. स. १८२७
प्रतापसिंह महाराज कारकीर्द नीळकंठशास्त्री थत्ते व बाळाजीपंत नातू
व चिंतामणराव आपा पटवर्धन सांगलीकर हे प्रमुख होऊन
ग्रामण्य केलें यांतील हांशील.
नीळकंठ शास्त्री थत्ते याणी उद्योग मनांत आणिला जे, बडोद्यास विठ्ठलराव देवाजी प्रभू गायकवाड यांचे दिवाण यांजकडील जीवनराव मल्हार प्रभू वकील निसबत गायकवाड यांशी बोलणे घातले जे विठ्ठलराव दिवाणजी हे देववान निघाले. बहुत धर्म करीत आहेत. आपले झाली कुलदीपक झाले आहेत. त्यांस ज्ञातीविषयी पेशजी ग्रामण्य बहुत झाली. परंतु निर्णय खास ठरून झालें नाहीं, त्यास मी अनुकूल आहे. सर्वत्र अनुकूळ करून घेऊन शास्त्रग्रंथ मिळवून व तुमचे ज्ञातीपाशी असतील तेही आणवावे. आणि निर्मळ कर्म, धर्म, चांद्रसेनी ज्ञातीचे जे तुमचे आहेत ते ठरवून सर्व सम्मतानी करून देतों कांहीं धर्म, खर्च असा जो करितात तो माझे विद्यमानें, या निमित्तें केलें असतां ज्ञातीचा उद्देश सत्पात्री धर्म यथायोग्य होईल व मलाही काशीस जाण आहे. त्या मार्गे येईन माझा सत्कार होऊन काशीयात्रा परिपूर्ण होई अशी संभावना व्हावी. बहुत कांहीं म्हणणे आहे असें नाहीं. पांचपंचवीस हजार आपण केले असता सहज होईल. याप्रमाणें सफाईची बोलणी केली. यावरून यांणी उत्तर केले की, मी सर्व कच्चा आपला मनोदय लिहितों परंतू आपलें आशीर्वाद पत्र असावें. म्हणजे माझे लिहिण्यास नीट पडेल. त्याजवरून नीळकंठ शास्त्री यांनी पत्र लिहून दिले ते विठ्ठलराव देवाजी यांचे नांव त्यात चिरंजीव म्हणोन पिता पुत्रवत् मजकूर कोकणांत काही खटले पडले आहेत तो मजकूर चिरंजीव राजश्री अमृतराव बाबा व राजश्री जीवनराव दिवाणजी यांस विदित केला, त्याविशीं ग्रंथ शोध करीत आहों. त्या प्रांती याचा शोध आपलाही असेलच शोध करून इकडे रवाना करावा. त्या ग्रंथांवरून विचार करून ठेविला असतां उपयोगी फार होईल येविशीं लिहून काय कळवायें. म्हणोन नीळकंठ शास्त्री यांचे पत्र.....
नंतर सखाराम हरीचे पुत्र रामराव आण्णा देशी आले होते. ते परत बडोद्यास जातो ते विठ्ठलराव दिवाणजींचे व्याही त्यांस अमंत्रण करून भोजनास नेऊन पोशाख दिला. आणि या ज्ञातीप्रकरणी विठ्ठलराव दिवाणजीस बोलणेंचे पर्याय सर्व मजकूर लिहून बडोद्यास रवाना केले आहेत. त्यावरून दिवाणजीस बहुत संतोष व आवड होतीच. शास्त्रीबावांशी बोलणं केलें. शास्त्रीबाबांचे बोलणे पडले जे सर्व अनुकूल समाधान करून जे अनुकूल होतील त्यांची संगतें करून घ्यावी, असें सांगितले. त्याजवरून राघवाचार्य रामानुज आदि करून यांचे शास्त्रांची विवक्षा होऊन अनुकूलता झाली आणि संगताची याद शास्त्रनिर्णय शास्त्रार्थ चांद्रसेनीय ज्ञातीचे ठरावून लिहून दिले याजवर नीळकंठ शास्त्री पत्ते यांस हे सर्व वर्तमान कळल्यावर त्यांचें बुद्धीस अंस झाला की, आपणांस लाभ मनाजोगा होत नाही व आपण आपले हात राखून दाब ठेवून उपकार दाखविणे, जरब देणें हें कांहीं राहिलें नाहीं. झालें हे नीट न झालें. याजवरून जीवनराव वगैरे यांस बोलावून नेऊन बोलणें केलें जे तुम्हीं राघवाचार्य प्रमुख मंडळीच्या संमतांची याद केली. याजवरून कांहीं शास्त्री मंडळी वगैरे `आमचे ज्ञातीचे यांणीं फाट खाल्ला आहे की, ते सर्व मंडळीस अनुकूळ करून शास्त्रार्थ वगैरे करण्याचें कारण काय ? आम्हीं पांच सात मंडली व आपण मिळून याद ठरवून दिली असती. याजवर आम्हांशी व आपल्यासारिखे महापंडितांशी बोलावयाचें सामर्थ्य पृथ्वींत दुसरें कोणास आहे ? त्यास असें करणें केलेत, यामुळे फाटाफूट होती असे दिसते.
मला या मंडळींत बसणें प्राप्त येईल उपाय नाही. असे बोलल्यावर यांणी उत्तर केले की, सर्व आमची मदार तुम्हांवर तुम्हीं हे सर्व उपस्थित करुन हल्ली हें सांगतो याजवरून आश्चर्य वाटतें, आपले मनांत काय आहे तें सांगावें. त्याजवरून उत्तर केलें कीं, असें तुम्हीं म्हणतां त्यास मी काही तुम्हांस सांगितलें नाहीं. व बोललों नाहीं. तुमचा लबाड कारभार माझा मला विचार पाहणें प्राप्त. तुम्हीं मजकडे येऊ नये. माझे गळां पडूं नये. या उपर तुम्हीं बोलणी बोलू लागल्यास मला कळेल ती रचना आतां करणें प्राप्त आहे. असे अंती संतापून नीतिमानावर जाऊन यांस निरोप दिला. नंतर यांणी राघवाचार्य आदि शास्त्रीमंडळ यास हा मजकूर श्रुत केला. शास्त्रीबाबा अनुकूळ होऊन इतका ग्रंथ करवून हल्ली नांश करावयास प्रवृत्त होतात, याजवरून हे या सर्व मंडळींनी निश्चय करून सांगितले की, शास्त्री याचे बडोद्यांस जिन्नस दस्तऐवज असतां आपणच उद्भव करून असे मत्सरपणास प्रवर्ततां त्यास आम्ही सर्वत्र अविद्वान आहोत आणि ते विद्वान आहेत असे नाही व आम्हीं जें केलें तें शास्त्र पाहून विचक्षणा करूनच केलें आहे. काय आम्हांशी बोलतील त्याचे उत्तरास आम्ही हजर आहोत. नीळकंठ शास्त्री यांचे व्याही बाळाजीपंत नातू हे इंग्रेजी सरकारांत पेशवे दरबारी यामुळे पटवर्धन रास्ते ढमढेरे आदिकरून मुत्सदी मातबर व कोकणस्थ ज्ञाती, शास्त्री पंडित हा तट, व राघवाचार्य रामानुज व वज्रटंक शास्त्री आदि पंचद्रविड मोठे विद्वान त्यांत राघवाचार्य इंग्रेजी सरकारांत शाळेच्या कामावर मुखत्यार व चिंतामण दीक्षित व वजक शास्त्री व सखाराम शास्त्री व नारायण शास्त्री प्रभृति मंडळीचा हा येक तट होऊन दुफळी झाली. ते आपल्या मंडळीच्या संमताच्या यादी करूं लागले.
करवीर स्वामी पुण्यास जाण्याचे बेतानें नगरानजीक किल्ले सातारा या मार्गे जाण्याचे अशा बेतानें क्षेत्र माहुली मुक्कामी आले. तेथें श्रीमन्महाराज राजश्री छत्रपति स्वामीची स्वारी शके १७४७ ज्येष्ठ व ॥ एकादशीस श्रीकृष्णास्वारा गेली तेथे श्रीस्वामीचे दर्शन घेतले. स्वामींनी पोषाख तीवट टुपेटा जवाहीर कंठी शिरपेंच प्रसाद दिला. साताऱ्यास येण्याविशी आमंत्रण केले. सरकारस्वारी आली. दुसरे दिवशीं मुत्सद्दी मंडळी पंडितराव व शास्त्री सारे सामोरे जाऊन आणिले ठकार दीक्षित यांचे वाड्यांत जागा देऊन ठेविले. सामान सरंजाम सरकारांतून दिला. दुसरे दिवशी स्वामींनी मुत्सद्दी मंडळी यांचे घरी जावें. पादपूजा घ्यावी, असे ठरल्यावरून पंडितराव यांचे घरी गेले. बळवंतराव चिटणवीस यांणी ही विनंती केली. तो स्वामींनी सांगितले की कोठे जाऊ नये, असे महाराजांनी सांगितले तेव्हां कसे करावे? आम्ही बोरगांव जैतापुरी गेलो आहो. भिक्षा घेतली. भोजन झाले आहे. त्याजवरून महाराजांस विनंती केली. तेव्हा आज्ञा झाली की. सांगितले होते खरें परंतु सर्वाचेच घरी जावें असें सांगतों म्हणोन त्यांजकडील कारकून गोविंदराव हणमंतराव यांस बोलावून सांगितलें त्याजकरून अमात्यर्पत गोविंदराव दिवाण यांचे पुत्र, दाजी उपाध्ये, केशवराव अगटे, नाना अगटे, बळवंतराव बक्षी यांचे घरी स्वामींची स्वारी जाऊन पादपूजा झाली.
पुनः बळवंतराव चिटणीस यांणी विनंती केली की, स्वारी घरी यावी, मंडळींचें भोजन व्हावें. पूजा घ्यावी, यास दिवस मुकरर करून सांगावें. त्यास काका दीक्षित व्यास ही तेथे होते. त्यावरून उदईक शुक्रवारी आषाढ शुद्ध १ प्रतिपदेस सरकारास मेजवानी आहे. द्वितीयेस ब्राह्मणमंडळीस भोजन आहे. तृतीयेस रविवारी येतों अशी आज्ञा झाली. त्यावरून तरतुदीस लागले. आणि शुक्रवारी पुनः जाऊन अमंत्रण केलें. दीक्षित ही होते. ते बोलले कीं, जागा स्थल पहायें. चार पाणके येथील येतील त्यांस जागा पहावी. आच्यारी गांवांतील करावे तेहे आल्यास उत्तमच आहे. तेव्हा काकास सांगितले की तुम्हीं जाऊन पहावें व करावें. तेव्हां काका दीक्षित घरी येऊन जागा पाहून सोप्यांत स्वयंपाक करावा मागील दुजोडी व माजघर भोजनास जागा करावी. पूजेस जागा पुढील सोप्यांत करावी, असें ठरवून गेले. नंतर तूप शालजोडी धोतरजोडा स्वयंपाकाचे साहित्य होऊन सडासंमार्जन केलें. तेव्हा क्षेत्रमाहुली येथील शिष्ट दहापांच यांस आमंत्रण केलें. गांवांतही कोणाकोणास आमंत्रण केलें. आपल्या सर्व ज्ञातीस स्वामींची पूजा होती. प्रसादास यावे म्हणोन आमंत्रणे केली. सरकारास वर्तमान कळविलें. शनवारी संध्याकाळी आच्यारी पाणके येणार ते यावे म्हणोन निरोप पाठविला. तेव्हां स्वामींनी बाबाजीपेत सरकारचे कारकून तेथे कामावर ठेविले होते, त्यांस सांगितले की, तुम्हीं कारखाना अध्यारी पाणके भांडी घेऊन जाऊन तरतूद करावी. त्याजकरून बाबाजीपंत घरी आले.
जागा पाहून सामान भाजीपाला पाहिला. भांडी पाठवून देतों आणि दहा घटिका रात्रीस येतो म्हणोन गेले. भांड्यांस माणसे पाठविली. त्याणी ठकाराच्या वाड्यांतून भांडी पाठविली. नंतर दोन घटकांनी बाबाजीपंतांनी चिट्टी पाठविली कीं, उद्या रविवारी सरकार मंडळीस मेजवानी आहे आपण तरतूद करूं नये, भांडी परत पाठवावी अशी आली, तेच समयीं चिट्टी घेऊन दहा घटिका रात्रीस बळवंतराव व बाबाजी सरकारवाड्यात गेले. सरकारास झालें वर्तमान काका दीक्षित सुद्धा समजाविलें. आमंत्रण करून स्वयंपाक चालीस लावण्यापर्यंत येऊन अशी चिट्टी आली, तों चिंतोपंत भाटे व विसाजीपंत शेवडचे खाली होते त्यांस बोलाविलें दीक्षितांस विचारिलें कीं, ब्राह्मण यांचे घरी जेवतात की नाहीं, आजपावेतों कसें केले तेव्हां दीक्षित व चिंतोपंत व विसाजीपंत यांणी उत्तर केले की, उत्साह महोत्साह होतात, हजारो ब्राह्मण जेवितात. आम्ही जेवितों हैं वर्षोनवर्ष चालत आले आहे, असें असतां स्वामींनी कबूल करून असे का सांगावें. दीक्षितांनी सांगितले की, हा कालपर्यंत काहीं दिक्कत नव्हती. चार घटिका रात्रीस कसें निर्माण झाले नक असे म्हटल्यावरून स्वामीकडील कारकुनास बोलावू पाठविले. नागी देवराव य हणमंतराव आले, त्यांस बसवून वरकड मंडळीस बाहेर बसविलें, आणि त्यांचे समक्षच बोलणें झाले की, बळवंतराव यांचे आमंत्रण घेऊन स्वयंपाकाची तरतूद होऊन शेवटीं असें फसविलें. यांचे कारण काय ? तसेंच करणें तरी अगोदर सूचना करावयाची होती. हे ठीक न केलें. तेव्हां नागो देवराव व हणमंतराव याणी उतर केलें की हैं सरकारापर्यंत कशास आणिलें, स्वामीपाशींच यावे तेच कृपा करतील. सरकारांनी उत्तर केलें की हैं झालें हें नीट न झाले. बळवंतराव यांचा बखेडा झाला याची वाट काय ? त्यांणी अदालतीत अर्जी दिल्यास तुम्हांस जाबसालास यावें लागेल. या कामाचा फैसला झाल्याखेरीज स्वामींचें जाणें कसें होईल. इंग्रेज बहादूर तरी मनास आणतील. वर्षोनवर्षे वहिवाट चालली ती कशी मोडतील. आमचे राज्यांत तरी होणारच नाहीं. पुण्यातील दाबास आम्ही भ्यावयाचे नाही. अशी स्पष्ट उत्तरे झाली. त्यास इतक्याचे कारण नाहीं. बळवंतराव तेथे आले असतां स्वामी कृपाच करतील. फार चांगले आहे. आपसांत समजले असता आम्हांस गरज नाहीं. बळवंतराव यास जावें अशी आशा केली. त्याजवर काका दीक्षितांस घेऊन स्वामीकडे गेले. दर्शन घेतलें, वचन दिलें त्याप्रमाणे शेवटास नेलें, पेशजी तरतूद सर्व झाली. म्हणून विनंती केली. त्यास बागेत भोजन करावे. येतों बोलले. तेव्हां स्वयंपाक डोईवर घेऊन जावयाचे कारण नाहीं म्हटल्याप्रमाणें येणें व्हावें किंवा कसें ? आज्ञा व्हावी. त्यावर काका दीक्षित सांगतील तसे करू. आमचा गुंता नाहीं म्हटलें. कारभारी यांणी दीक्षित आपणाशी बोलतों, म्हणोन बाहेर बोलाविले. आम्हीं विनंती करतो. घडेल असे बोलले. दीक्षितांनी उत्तरे करणें तीं साफ केली. तुम्हीं ठीक न केले. आम्हास यांत बोलावयाचें नाहीं. घडेल तसें घडो. त्याजवर कारभारी स्वामीकडे गेले स्वामींनी विचारिलें की, तुम्हारा राजांनी का बोलाविलें होतें ? तरी यासाठीच बोलाविलें होतें, चिठ्ठी कोणी पाठविली ? ती आम्ही पाठविली. तुम्हांस कारण काय पडलें होतें? लबाड कारभार का करावा ? आता मजला का विचारिता? कळेल तसें तुम्हीच सांगा, म्हणोन निंदा केली.
कारभारी बाहेर आले आणि सांगितलें कीं, आतां निद्रा करावी. काही चिंता करूं नये. चार घटिका अधिकउण्या लागल्यास लागू द्याव्या. रात्र दोन प्रहर होईल. स्वामी पहाटेस तीन घटका रात्री उठतात, तेव्हां बोलून आम्ही आज्ञा घेऊ. स्वयंपाक चालू करण्याची आज्ञा घेऊन सांगून पाठवितों. आतां आपण घरास जावें. दीक्षित चलायें बोलले, त्यावरून तीन प्रहर रात्रीस शनिवारी घरी आले. याप्रमाणे वर्तमान झालें हे सर्वत्र मंडळीस बोलावून आणून सांगितलें. आणि सदरहू मजकूर लिहिला. तो पहाटची तोफ झाली. नंतर हरभट अकले यांस दीक्षितांकडे पाठविलें कीं, पहाटेस निरोप यावयाचा तो अद्याप आला नाही, याचे कसें व श्रीमन्महाराजांकडे विठ्ठल अमृत यास पाठविलें की, आज्ञेप्रमाणे स्वामीकडे जाऊन तीन प्रहर रात्रीस आलो. असें वर्तमान झालें म्हणोन विनंती करावी ती केली. हरभट काका दीक्षितांस घेऊन स्वामीकडे गेले. दोन तीन घटिका दिवस आला. बळवंतराव यांजकडे अद्यापि निरोप गेला नाहीं. उशीर झाला म्हणोन बोलले. तेव्हां स्वामीनीं उत्तर केले की, तुम्हीं गांवांतील चार शिष्ट बोलवा. इकडील मंडळीही येईल. आम्हीं येतों. असें संगितल्यावरून काका दीक्षित वाड्यात आले.
महाराजांस विनंती स्वामींनी याप्रमाणें सांगितले म्हणोन केली. त्यावरून सरकारचें बोलावणें बळवंतराव यांस आले. बळवंतराव वाड्यांत आले. सरकारनें दीक्षितांस सांगितलें कीं, तुम्हीं येथील शिष्ट कोण सांगणें ते सांगावें, आणि स्वामीस नेऊन पूजेचा समारंभ करावा. बळवंतराव यांस आज्ञा केली की, स्वामी येतात, मंडळी येतील, प्रहर दिवस आला. जलदी करून अटोपावें. बाबाजीपंत सरकारचे कारकून यांस जाऊन तरतूद करावी, अशी आज्ञा केल्यावरून बळवंतराव घरी आले, स्वयंपाक आध्यारी, पाणके, कारकून लावून तयारी झाली. दोन प्रहरी स्वामीस बोलवावयास बाबाजी चिटणीस व काका दीक्षित गेले. स्वामीची स्वारी मंडळीसुद्धा निघोन आली. वरकड मंडळी गृहस्थ व शिष्ट आले. देवापुढे सोप्यांत स्वामीस जागा रांगोळी कणे घालोन केली. तेथें स्वामी बसले. पूजा बळवंतराव यांनी केली. येणें प्रमाणे स्वामीची पूजा होऊन ब्राह्मण मंडळीची पात्रे मागील दुजोडी सोपा व माजघर व पुढील मागील चौकांत मंडप दिले तेथे ठेविली.
कित्ता मंडळी | कित्ता मंडळी |
७५ स्वामीकडील मंडळी स्वामी सहवर्तमान | १ तात्या उपाध्ये. |
२ रंगोपंत दादा संस्थान चाफळ | १.उपाध्ये |
१ भाऊ पंडितराव, | ७ क्षेत्र माहुली. |
१ दाजीबा उपाध्ये | ५ क्षेत्र माहुली संगम |
२ नरसिंगराव लेले.. | २ नागेश भट्ट अगल व हरभट अकले. |
१ माधवराव मुनशी | १ राघोपंत वैद्य. |
२५ गावांतील मंडळी. | १ महागांवकर. |
_______________ |
_______________ |
_______________ १२५ |
प्रथम पंक्तीस सवाशें पात्र झालें. यांस विडे दक्षणा शिष्टसंभावना अत्तर गुलाब दिलें. नंतर बळवंतराव यांस स्वामींनी प्रसाद पैठणी पागोटें व ज्वाहानाबादी दुपेटा दिला. प्रभू ज्ञातीची मंडळी प्रसादास बोलाविली होती त्यांणी स्वामीपुढे नारळ ठेविलें. सर्वांस स्वामींनी प्रसाद नारळ दिलें. नंतर स्वामींची स्वारी पालखीत बसून दरवाज्याबाहेर गेली. तेथे निरोप घेऊन माघारे आले. नंतर आगंतुक ब्राह्मण व प्रभू मंडळी वगैरे यांची पात्रें मांडिलीं २०० आगंतुक ब्राह्मण, १०० गृहस्थ मंडळी गांवांतील, मिळोन सुमारे ३००.
सदरहू मंडळीसी व ब्राह्मणांची भोजने झाली. विडे देऊन सर्वांस निरोप दिले. मिती आषाढ शुद्ध ३ रविवार शके १७४७ पार्थिवनाम संवत्सरे सुरुसन सीत अशरीन मयातेन व अल्लफ, मुकाम सातारा
स्वामीची स्वारी सातत्यांतून जाऊ लागली तेवेळेस पत्र द्यावे म्हणोन विनंती केली त्याजवरून पत्र दिलें तें :
श्री. शंकर
शिक्का
श्रीमच्छंकराचार्यन्यय संजाताभिनव श्री विद्याशंकरभारतीस्वामी करकंजोद्भव
श्रीविद्यानरसिंह भारतीस्वामीकृत नारायण स्मरणानि
वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृंदे क्षेत्रस्थ वगैरे वास्तव्य प्रभृति प्रांत यांसी आज्ञा केली ऐसी जे. राजश्री बळवंतराव चिटणवीस संस्थान सातारा यांणी हूजूर विनंती केली की, आमची चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही ज्ञाती यांचा ज्ञातिधर्म पूर्वीपासून आजपर्यंत वहिवाट जी चालत आली त्याप्रमाणे वागत असता नवीन हह्रीं ब्राह्मण तटा करितात त्यास आजपर्यंत जसें चालत आलें तसें चालवायें. नवीन तंटा न होई असा बंदोबस्त करून देणार स्वामी समर्थ आहेत. म्हणोन श्रुत केलें. याजवरून हैं आज्ञापत्र सादर केलें असे. तरी पूर्वीपासून आजपर्यंत जसा ज्ञातिधर्म चालत आला असेल त्याप्रमाणे चालविणें नवीन तंटा करूं नये. विशेष लिहिणें तें काय. शके १७४७ पार्थिव नाम संवत्सरे आषाढ मास.
याउपरी करवीरकर शंकराचार्य करवीरकराच्या उपद्रवामुळे बंदोबस्त करून घेण्याकरितां पुण्यास गेले. ते पर्वतीस होते, त्यांजकडे नीळकंठ शास्त्री आपले तटाचे ब्राह्मण घेऊन एक यादी, प्रभूज्ञातीवर नानापरीचे दोष देऊन चांद्रसेनीय ज्ञातीचे शास्त्रार्थ राघवाचार्य प्रभृतीनी लिहून दिला तो खोटा अशा संमताची जाऊन समजाविली. राघवाचार्य प्रभृतींची मंडळी जाऊन बोलली की, शास्त्रार्थ खोटा आम्ही म्हणणार नाहीं. निर्णय सिद्ध आहे. आणि वज्रटंक शास्त्री यांणी कलबा वैशाख शुद्ध ४ शनिवारी दिला, त्यांतील मजकूर या ज्ञातीकडे वेदोक्त कर्मे व्हावीं विषय आपण अनुकूल अशा साधनायें पत्र नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे स्वदस्तुर दाखवून देवू तरी येविषय बाद सांगणार नाही. व आज्ञेप्रमाणे प्रायश्चित घेऊ. दस्तूर खुद म्हणोन दिलें. त्याजवर थत्ते शास्त्री यांस सांगितलें कीं, तुम्हीं याप्रमाणे कतबा देऊन निर्वाह करून घेणें. त्यावरुन वैशाख शुद्ध ७ स थत्ते यांणी कतबा दिला. त्यांतील मजकूर आमचा लेख निघाल्यास स्वदस्तूर आमचा अशी स्वामीची व राजश्री चिंतामणराव आपा पटवर्धन यांची खातरी झाल्यास स्वामी आज्ञा करतील त्यास मान्य, म्हणोन उभयतांचे निर्णयास थत्ते यांचे हातचे अस्सल पत्र पाहिजे तें राजश्री विठ्ठलराव दिवाणजी यांजपाशी बडोद्यास, तें येण्यास दिवसगत लागली, यामुळे वेदशास्त्रसंपन्न राजश्री नीळकंठ शास्त्री यांणी मध्ये येऊन विनंती केली की, वज्रटंक यांणी कतबा दिला परंतु आमचें पत्र नाहीं, असतें तरी रुजुवातीस येते. उगेच आम्हांवर कतबा टाकून आमची अबरू मलीन केली. याजकरितां स्वामींनी पत्र करून दिले पाहिजे. त्याजवरून रुजुवातीस पत्र येत नाही त्यापेक्षा ब्राह्मणावर निमित्त आले त्यावरून त्यांस पत्र करून दिले. त्यांत मजकूर बजटंक तुमचे पत्र असा स्वदस्तूर काढून दाखवा म्हणोन दोन महिने बोलत आले. परंतु बोलण्याप्रमाणे दस्ताऐवज निघाला नाहीं. यास्तव तुमचा मुचलका तुम्हांस परत दिला असे वज्रटंक याणी तुम्हीं पत्र दिलें म्हणोन सांगितलें तें मृषा वज्रटक यांचे पत्रादिश बोलणें उपयोगी नाही. असे ध्यानी आणून तुम्हांस हे पत्र करून दिले असे तरी परस्पर सर्व विरोध टाकून ब्राह्मणांनी स्वस्थ असावें. मिती वैशाख वद्य १० शके १७४८
येणेंप्रमाणे पत्र लिहून वेदशास्त्र सं. राजेश्री मल्हार श्रोत्री यांजपाशी तिराईत अमानत ठेऊन श्रोत्री यांस राजश्री चिंतामणराव पांडुरंग मिरजकर यांचे विद्यमाने ताकीद केली की, यांचे हातचें अस्सल पत्र रुजुवातीस आलें असतां हे पत्र तुम्हांपाशी अमानत ठेऊन आम्हांस माघारें द्यावें. अथवा पत्र नच आलें तरी उभयतां एक होतील तेव्हां नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे हवाली करावे. म्हणोन श्रोत्री याजपाशी ठेविलें असतां इतक्यांत यत्ते शास्त्री यांचे हातचे अस्सल पत्र रुजुवातीस प्रविष्ट झाले तेंव्हा यजक शास्त्री प्रमृति ब्राह्मण येऊन उपोषित बसले की बसे यांणी रुजुवातीस यावे. आणि श्रोत्री यांजपाशी अमानत लेख आहे तो आणवावा. त्याजवरून श्रोत्री यांजकडे ब्राह्मण बसविले की, पत्र कराराप्रमाणे माघारे द्यावे. त्याणी येऊन विनंती केली की, सायंकाळी पत्र आणून देतों. येविशीं दरम्यान चिंतामणराव आपा मिरजकर यांस देऊन श्रोत्री घरी गेले. आणि नीळकंठ शास्त्री यांस मिळोन पत्र न देता घटाईच्या गोष्टी सांगून पुण्यांत तुळशीबागेत ब्राह्मणांचा जमाव करू लागले. तेथे निरोप सांगून पाठवितांच ब्राह्मण जिकडील तिकडे गेले. ते दुसरे दिवशी पांडुरंग रामचंद्र ढमढेरे यांचे वाड्यांत मिळोन आपले जागी विचार करून रुजुवातीस येतो.
राजेश्री चिंतामणराव आपा मिरजकर व आनंदराव ढाकफलकर वकील निसबत आगरे प्रभृति यत्ते व नातू याचे सपनें तिराईत आले. त्यांचे विचारें पत्र पाहिले. त चिरंजीव म्हणोन पितापुत्रवत् त्यांत मजकूर कोकणांत कांहीं खटले पडले आहेत तो मजकूर चिरंजीव राजेश्री अमृतराव बाबा व राजेश्री जीवनराव दिवाणजी यास विदित केला. म्हणोन पत्र आले होते ते दिवाणजीस दाखविलें त्याविशी ग्रंथशोध करीत आहो. त्या प्रांतीयाविशी आपलाहि शोध असेलच. शोध करून इकडे रवाना करावा त्या ग्रंथावरून विचार करून ठेविला असता उपयोग फार होईल. येविशी लिहून काय कळवावें म्हणोन नीळकंठ शास्त्री याचे हातचे निखालस पत्र खरे असे ठरले. ते तिराईत गेले, तेव्हां बजटक शास्त्री याणी कतबा टाकिला त्याप्रमाणे पुरवणी होऊन वादास खरे आले. व नीळकंठ शास्त्री चिरंजीव म्हणोन पत्र लिहून अगत्यवाद लिहितात, व पेणकर ब्राह्मणांचे पत्रही दाखवतात व ग्रंथ पाठवावा म्हणजे फार उपयोगी पडेल. म्हणोन थत्ते लिहितात, तेव्हां थते शास्त्री अनुकूल होतात.
जर करिता हे चांद्रसेनीय नाहीं तरी हे ज्ञाति त्यांस अनुकूल कशी होईल. यावरन त्यांशीही खातरीच व त्यावरून वेदशास्त्रसंपन्न राजश्री राघवाचार्य प्रभृति जे त्रिविध त्यांसच कायस्थांचा शास्त्रार्थ निवडून दिला. त्या अर्थी चांद्रसेनीय ज्ञाति हीच असें निश्वयें केलें हेच खरे याप्रमाणे झाल्यावर शंकराचार्य यांणी आपले ज्ञातीस पत्र करून दिलें.
श्रीशंकराचार्यस्वामीचें पत्र.
शिक्का.
श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य पदवाक्यप्रमाणपारावारपारीण यमनियमासनप्राणायाम प्रत्याहरध्यानधारणा समाप्यष्टांगयोगानुष्ठाननिष्ठ तपवनाद्यनिच्छिन्नगुरुपरंपराप्राप्त पदर्शनसंस्थापनाचार्य व्हीलनिगम वैदिकमप्रवर्तक सर्वतंत्रस्वतंत्र श्रीमहाराजधानीपंचगंगातीरवासकमलानिकेतन करवीरसिंव्हासनाधीश्वर श्रीमच्छंकर भगत्पादजान्हवीजनित श्रीविद्याशंकरपादपद्याराधक श्रीविद्यानृसिंहभारतीस्वामि श्रीभासकपरिवाराणामनुदिनमेधमानभव्यप्रदनारायणस्मरणानि
स्वस्ति श्रीमत्पद्मसेवोत्तम वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त क्षेत्रस्थ प्रांत प्रभृति ब्राह्मणान्प्रति मंगलं दिशतु विशेषस्तु अत्रत्यक्षेमपरिज्ञानपूर्वक कुशलज्ञापनेन भवद्भिः पत्रद्वारा संतोषः प्रापणीयः ततस्तदनंतर आज्ञा होती जे. शके १७४७ पार्थिवनाम सवत्सरांत संस्थान देवतेचें आगमन पुण्यासंनिध पर्वती येथे झालें तों पुण्यग्रामस्त ब्राह्मणांत तट पड़ोन दुफळी राजेश्री बळवंतराव मल्हार चिटणीस घोलकर व भिवराव विठ्ठल व भगवंतराव मल्हार खासनिवीस नाडकर संस्थान सातारा व नारायणराव सीताराम व विठ्ठल बाबाजी फणसे व विठ्ठलराव देवाजी दिघे व आनंदराव रावजी तासकर प्रभृति समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभूज्ञातीचे धर्म वादानें झाली. त्यांत वेदशास्त्रसंपन्न राजश्री राघवाचार्य प्रभूति मंडळी गृहस्था यांचे शास्त्रानु प्रतिपाद्य की चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांस वैदिक कर्मत्रयाधिकार आहे व वेदशास्त्रसंपन्न राजेश्री नीळकंठ शास्त्री प्रभृति अशेष गृहस्थ मंडळी यांचे प्रतिपादन करणें की चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांस वैदिक कर्मत्रयाचा अधिकार नाही, येविशीं उभय तटांस आज्ञा केली की, ज्ञातिधर्म जे जे पूर्वापार चालत आले आहेत त्याप्रमाणे चालतील तुम्ही ब्राह्मणांनी एकरूप असावें त्यावरून राघवाचार्य प्रभृति मान्य झाले. नीळकंठशास्त्री प्रभृति यांचे म्हणणे की, आम्ही यादी लिहून देतों. त्या यादीवर श्रीनीं रुजू करून त्याप्रमाणे सर्वांची संमते व्हावी. म्हणजे आम्ही मान्य आहों. यांतील चौकशी पाहतां शके १७४६ चे साली नीळकंठ शास्त्री यांणी राजश्री विठ्ठलराव दिवाणजी यांस पत्र देऊन कोकणांत कांही खटले उत्पन्न झाले आहेत. त्याविशी आम्ही ग्रंथशोध करीत आहों. तुम्हीं तिकडे शोध करून ग्रंथ पाठवावे म्हणोन लिहिल्यावरून येथें चार शास्त्रज्ञ होते. त्यापासून शास्त्राधार संमताचा पट करून त्याकारणास्तव घेतला. नंतर नीळकंठ शास्त्री यांणी बुद्धीस विपर्यास आणून आम्हीं यांत नाहीं अर्सी अक्षरें श्री ओंकारेश्वरी नंदिकेश्वराचे पाठीवर हात मारुन बोलिले. पुढे तुळशीबागेत जमाव करून प्रभूस कर्मत्रयाचा अधिकार नाहीं. व चांद्रसेनीय कायस्थांची उपलब्धी नाहीं असे आम्ही म्हणणार नाही, असे ब्राह्मणांचे म्हणणे पडलें. प्रभूस कर्मत्रयाचा अधिकार नाही. अशी सर्वांची संगतें झाली. कलह मिटला असतां त्या संगतीपटापैकी दोनचार ब्राह्मणांस पूर्वाग उत्तरांग प्रायम्यिते यते शास्त्री यांणी दिली. बाकी तट झाला. तेव्हां उपाय नाहीं म्हणोन हल्ली यादी करून राघवाचार्य यांचे तटांतील ब्राह्मणास प्रायश्चित्ती ठरवून एकी करावी असा पर्याय दिसोन आला. तो वेदशास्त्रसंपन्न राजश्री वज्रटंक शास्त्री याणी कतबा श्रीसन्निघ टाकिला. त्यांतील मजकूर वेदशास्त्रसंपन्न राजश्री नीळकंठ शास्त्रीबाबा थत्ते याचे प्रभूंचे घरी वेदोक्त कर्म व्हायें येविषई अनुकूल अशा साधनाचे स्वदस्तुरचे पत्र प्रभू यास लिहून दिले ते श्रीस दाखविल्यास श्रीची आज्ञा होईल त्याप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन आज्ञेप्रमाणे राहु येविषयी बाद सांगणार नाहीं.
मिती वैशाख शुद्ध ४ गुरी शके १७४८ व्ययनाम संवत्सरे हे विज्ञापना हस्ताक्षर खुद्द म्हणोन त्यावरून नीळकंठ शास्त्री थत्ते याशी आज्ञा केली की. तुम्ही या कर्तव्यावर कतबा देऊन पुरवणीस उमें राहणें त्यावरून थते शास्त्री याणी कतबा दिला. त्यांतील मजकूर प्रभूचे घरी वेदोक्त कर्म व्हावे अशा साधनाचे आमच्या स्वदस्तुरचे पत्र आणून आपलेस दाखवू म्हणोन वज्रटंक या लिहून दिल्हे आहे त्याप्रमाणे आमचे स्वदस्तुर पत्र प्रभूंच्या येथे वेदोक्त कर्म व्हावे येविषयी आणोन दाखवायें, त्याची चौकशी माझे हातचे खरें किंवा खोटें याची होऊन श्री स्वामीची व राजेश्री चिंतामणराव आपा यांची खातरी झाली म्हणजे स्वामी आज्ञा करतील त्याप्रमाणे ऐकू मिती वैशाख शुद्ध ७ शके १७४८ व्ययनाम संवत्सरे है विज्ञापना म्हणोन त्यावरून सदरहू पत्र नीळकंठ शास्त्री यांचे हातचे विठ्ठलराव दिवाणजी याजपाशी बडोद्यास त्यास येण्यास दिवसगत लागली. तेव्हा निळकंठ शास्त्री थत्ते याणी मध्ये येऊन विनंती केली की, पत्र आमचे हातचे असते तरी राजुवातीस येते. पत्र आमचे हातचे नसता बज्रटंक यांणी कतबा टाकून आमची अबरू मलीन केली.
त्यास श्रीनी त्यास कृपा करून येविशी मजला पत्र करून दिलें पाहिजे, त्यावरून त्यास पत्र लिहून तिराईतीत ठेविले ते असे. वजटंक शास्त्री याणी. तुम्ही प्रभूंस वेदोक्त कर्म व्हावे, असे साधनपत्र स्वदस्तुरचें दिलें तें काढोन दाखवितों, म्हणोन ते दोन महिने बोलत आले. परंतु बोलल्याप्रमाणे दस्ताऐवज निघाला नाहीं. यास्तव तुमचा मुचलका तुम्हास परत दिला. असें वजटंक शास्त्री याणी तुम्हीं प्रभूस पत्र दिलें म्हणोन सांगितलें तें मृषा, वजटक यांचे पत्राविषयी बोलणे उपयोगी नाही. असे ध्यानी आणोन तुम्हांस हे पत्र करून दिलें असे. तर परस्परे सर्व विरोध टाळून ब्राह्मणांनी स्वस्थ असावें. विशेष लिहिणें तें काय ? वैशाख वद्य १० शके १७४८ म्हणोन याप्रमाणे लिहून वे || राजेश्री मल्हार श्रोती यांजपाशीं तिराईत ठेविलें. आणि श्रोती यांस ताकीद केली की, नीळकंठशास्त्री याचें हातचें अस्सल पत्र बडोद्याहून रुजुवातीस आल्यास हे पत्र आमचे तुम्हांपाशी अमानत आहे तें परत मार्गे द्यावें. पत्र नच आलें तरी उभय ब्राह्मणाचे ऐक्य होईल तेव्हां नीळकंठशास्त्री यांचे हवाली करावें. नंतर बडोद्याहून नीळकंठशास्त्री थत्ते यांचे हातचे अस्सल पत्र रुजुवातीस आलें. तेव्हां यजक शास्त्री प्रभृति ब्राह्मण येऊन उपोषित बसले की ते शास्त्री यांणी रुजुवातीस यायें आणि मल्हार श्रोती यांजपाशी अमानत पत्र आहे ते परत आणवावें. त्यावरून श्रोती यास कराराप्रमाणे पत्र मागें द्यावें म्हणोन सांगून पाठविलें असतां पत्र न येई. तेव्हा पांच आसामी ब्राह्मण तगाद्यास बसविले. नंतर श्रोती याणी राजश्री चिंतामणराव पांडुरंग मिरजकर यांचे विद्यमाने येऊन विनंती केली कीं, पत्र सायंकाळी आणून देतों म्हणोन कबूल करून मिरजकर यांचे दरम्यान गतीनें घरी गेले. आणि पुण्यांत नीळकंठ शास्त्री यांस मिळोन फळी बांधोन बसले तदनंतर दुसरे दिवशी तुळशीबागेत सभेचे बोलावणें केलें. तेथे ब्राह्मण जमा झाले.
हे वर्तमान कळतांच राजश्री खंडो सीताराम वकील निसबत आंग्रे व बाबा ठोंसर यांजबरोबर ब्राह्मणांस सांगून पाठविलें की मी शास्त्री पत्राचे रुवातीस न येतां पुण्यांत बसले. तुम्ही तेथे काय म्हणोन जमा झाला. इतके ऐकताच ब्राह्मण जिकडील तिकडे गेले. दुसरे दिवशी राजेश्री पांडुरंग रामचंद्र ढमढेरे यांचे वाड्यांत सभा करून पुण्याचे तट बांधून बसले. पुनः नीळकंठ शास्त्री यांस तुमचे हात दस्ताऐवज पत्र आलें. जुवातीस येणें म्हणोन आज्ञा सांगून पाठविली असता, आपण न येतां थते शास्त्री याणी राजेश्री बाळाजीपंत नातू यांचे विचारे दहा गृहस्थ तिराईत चिंतामणराव आपा मिरजकर व आनंदराव ढाकेफलकर वकील निसबत राजश्री चिमाजी आपा व खंडो सीताराम वकील निसबत आंग्रे इत्यादिक चाणाक्ष दहा गृहस्थ मंडळी, पिशाच लिपीचें पत्र होते म्हणून परीक्षेस पाठविली.
त्यांचे विचारास सदरहू पत्र नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे हातचे खरें, थते शास्त्री पिशाच लिपी व बाळबोध दोन्ही लिपी लिहितात. असें ठरलें, ते पन तपशीलवार :
“सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव राजश्री विठ्ठलराव दिवाणजी यांसी प्रती नीळकंठ शास्त्री कृतानेक आशिर्वाद येथील कूशल तागाईत आश्विन शुद्ध त्रयोदशी पावेतों जाणोन स्वकीये लेखन आनंदवीत जावें. विशेष आपलेकडील वर्तमान तेथोन विद्वान येतात त्यांचे मुखे श्रवण होऊन परम समाधान होतें तें किती लिहावे. कोकणांत कांही खटला पडला आहे, तो मजकूर चिरंजीव राजश्री अमृतराव बाबा व राजेश्री जीवनराव दिवाणजी यांस विदित केला. ब्राह्मणाकडील पत्र आलें होतें. तें दिवाणजींस दाखविलें त्याविषयी ग्रंथशोध करीत आहों. त्या प्रांती याविषयीं शोध आपलाहि असेलच. आणखीही शोध करून इकडे रवाना व्हावा. म्हणजे ते ग्रंथ वाईकडील सांपडतील. त्या ग्रंथांवरून पक्का विचार करून ठेविला असता समयीं फार उपयोग होईल. याविषयीं फार लिहून काय कळवावें.
इकडील वर्तमान राजेश्री रामराव याणी. विदित केलेच असेल. ईश्वरचरणी आपली निष्ठा आहे. तदनुरूप ईश्वर कृपा करीतच आहे. पुढेही करील. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे आशिर्वाद." म्हणोन हे पत्र चतुष्टाईनें दहाजणांच्या विचारे नीळकंठ शास्त्री यांचें हातचें खरें असें ठरलें. तत्राप चित्तांतील द्वैत सुटून ब्राह्मणांतील कलह मिटावा हे चित्तांत न वागे. नंतर वे। राजश्री धोंडभट्ट खरे प्रभृति द्रविड ब्राह्मण मंडळी असामी ४० चाळीस यांणी नीळकंठ शास्त्री थत्ते यांस बहिष्कार घातला. कारण पूर्वी शास्त्रानुमतें आपला अनुसर असोन पत्रास नाकबूल जाऊन पांच चार ब्राह्मणांस वृथा प्रायश्चित दिली. तदुत्तर दुसरे दिवशी बहिष्कारामुळे आपले तटात असे चित्तांत आणून राहातेकर यांचे वाड्यांत आपलेच फळीचे ब्राह्मण जमा करून नीळकंठ शास्त्री दर ब्राह्मणास वसंतपूजेनिमित्त एक आंबा व अर्धा रुपया देऊन आपणांस गंधाक्षत करूं लागले. तेथेही खरे यांनी जाऊन बहिष्कार सांगितला. त्यावरून बाळाजीपंत नातू यानी चौकीचे प्यादे आणून धोंडभट्ट यांस कंपनी सरकारच्या फरासखान्यात पाठवून नीळकंठ शास्त्री यांस गंधाक्षत केली. नंतर धोंडभट्ट खरे यांनी कंपिनी सरकारांत गारपिरावर आपल्या अबरूबद्दल नातू यांजवर फिर्याद केल्यावरून नातू यांस सरकारांत बोलावून उत्तरे निरुतरें परस्परे समक्ष होऊन चौकशीअंती बहिष्कार खरा असें ठरलें.
राहातेकर यांचे वाड्यांतून ब्राह्मणांस खुद श्रीसंनिध आले व राघवाचार्य प्रभृति ही जमा होऊन उभय तटांनी मान्यता लिहून दिल्या की, श्रीची आज्ञा होईल त्याप्रमाणे मानणे, परंतु नीळकंठ शास्त्री यांचा दुराग्रह की चांदनीय कायस्थ यांचा शास्त्रार्थ खोटा म्हणोन संगति [व्हाव्या तेव्हा राशास्त्र असता खोर्ट संमत देणे है अनुचित यामुळे तट ते काळी तसेच राहिले. तो इतक्यांत भगवंतराव मल्हार खासनिवीस व आनंदराव रावजी तासकर, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु हे दर्शनास येऊन त्यांनी समक्ष वृत्त निवेदन केलें कीं, ब्राह्मण आपसांत कलह करून आमच्या ज्ञातीस वैदिक कर्मत्रयाधिकार नाहीं म्हणोन यादी करितात असे परमारा ऐकिलों, परंतु आमचे घरी परंपरागत वैदिक मंत्रेकरून संस्कार चालत आहेत.
पूर्वीपासून शास्त्रज्ञ व शास्त्र नव्हती. आतांच नवीन झाली असें नाहीं. मागे ही ब्राह्मणांनी एक दोन खटला उपस्थित केला होता, त्याचा निर्णय शास्त्रानुमते त्यावेळीचयाची वहिवाट चालू असतां आतां आपसात तंटा करून उगीच यादी करणार त्यांस श्रीसाक्षाच्छंकर धर्मसंस्थापक आहेत, तेथे आणिकांसारखे कावयाचे नाही. त्यावरून त्यांस आज्ञा केली की, पूर्वी खटला झाला ते काळी शास्त्रानुमतें निर्वाह झाल्याचे साधन तुम्हांपाशी आहे किंवा कसे ?
त्यावरून त्यांणी दहावीस साधने आणून प्रत्यक्ष दाखविली. ती बितपशील.
१. बाळाजी बाजीराव प्रधान यांचे पत्र छत्रपति सातारकर यांचे नांयें, त्यांत मजकूर प्रभूंचे सुदामत चालत आहे त्याप्रमाणे चालवावें त्यास अडथळा होऊ न द्यावा. पूर्वापार चालत आलें तें चालवोन नवीन कज़िया उपयोगी नाही. ब्राह्मणाचा निर्गम स्पष्ट आज्ञा करून करणार महाराज समर्थ आहेत. शेवेशीं श्रुत होय हे विज्ञापना म्हणोन पत्र.
पेणकर यांणी ग्रामण्य केलें, त्याचा निर्णय शास्त्रसंमत झाला, ते काळची पत्रे
(१) पूर्ववत चालत आल्याप्रमाणे चालवायें म्हणोन पेशवे सरकारची परवानगी होऊन यादी
झाली ती बितपशील --
(१) यादी प्रभूचें ग्रामण्य पांच सात वर्षे पडून कर्मे बंद झाली, त्यास स्वामींनी कृपा करून पूर्वीपासून कर्मे वगैरे चालत आली आहेत त्याप्रमाणे चालविली पाहिजेत, म्हणोन ज्या ठिकाणी प्रभूंची घरे असतील तेथील मामलेदारास लागतील ती पत्रे.
(१) सदर्हू अन्वयें जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण यांचे नांवें पत्र
पूर्वीपासून कर्मे मुंजी वगैरे चालत आली आहेत त्याप्रमाणे चालवणें म्हणोन सदरहू अन्ययें मामलेदार तालुके निहाय यांस व ब्राह्मणांस लागतील ती पत्रे देवावी देणें-लिहिणे, छ. ६ रमजान सन सबा तिसेन फाल्गुन मास सदहू यादीवर- "देवावे" बाळाजी जनार्दन फडणीस व "देणें" बाजीराव रघुनाथ प्रधान व मखलाशी रामचंद्र हरी फडके. १ ते साली सनदा होणें राहिल्यावरून दुसरे सालीं याद झाली ती बितपशील
यादी समस्त दालभ्य कायस्थ प्रभु यांचा व पेणकर ब्राह्मण यांचा प्रभूंच्या आचरणाविसी कज्या पडून आठ नऊ वर्षे ग्रामण्य वाढले. पेणकर ब्राह्मण यांणी सरकारची पत्रे घेऊन प्रांतांत पाठवून कर्मे बंद केली सबब प्रभु व ब्राह्मण सरकारांत फिर्याद आले. त्यावरून उभयतांचे सरकारात लेहून घेऊन शिष्टसंमेंट मनारा आणितां पेशजींपासून गागाभट्टीप्रमाणे प्रभूंचे घरी कर्मे चालतात त्याअन्वयें पुढे ही चालवावी असे ठरून हे पत्र तुम्हास सादर केलें असें तरी गागाभट्टीप्रमाणे चालत आहे त्याप्रमाणे पुर्वे ही चालवीत जाणे, दिकत न करणे म्हणोन सुरुसन समान तिसैन मया व अल्लफ लागतील ती पत्रे.
(१) जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी समस्त ब्राह्मण महालनिहाय यांस,
(१) महालनिहायचे मामलेदार, सरदार व संस्थानी यास
सदद्दू अन्वये जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण महालनिहायचे- कमावीसदार सरदार व संस्थानी यांस लागतील ती पत्र देणें
सदरहूं यादीवर देणें बाजीराव रघुनाथ प्रधान, संगत बाळशास्त्री, मखलाशी तात्या गुरुजी, याप्रमाणे शिक्क्यांनिशी सनदा प्रांतोप्रांती गेल्या त्यांपैकी एक वार केली ती बितपशील.. वेदमूर्ति समस्त ब्राह्मण धर्माधिकारी उपाध्ये व ज्योतिषी क्षेत्र प्रयाग गोसावी याशी येथें बाजीराव रघुनाथ प्रधान यांच्या वरील पत्राची नकल पुन्हां दिलेली आहे.
(१) चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे कुलोपाध्याय के आबाशास्त्री टकले तळेकर यांजवर पेणकर यांनी श्री अविमुक्त क्षेत्री दुर्भाषणे वाजविल्यावरून (2) आबा यांणी क्षेत्रस्थ ब्राह्मण यांचे पत्र बाजीराव रघुनाथ प्रधान यांस श्री काशीहून पाठविलें तें बितपशील
स्वस्ति श्री. श्रीमत बाजीराव प्रभुवमुख्यानेषु आश्रित नारायणभट्ट तथा लालभट्ट तथा गोपीनाथभट्ट रामपंत शेष तथा हरिराम दीक्षित काळे तथा सोमनाथपंत पुणतांबेकर एतत्प्रभृति समस्त काशीस्थब्राह्मणकृतानेकाशिर्वादाः वरीवर्ततां विशेषस्तु भाषया भाद्रपद शुद्ध त्रयोदशीपर्यंत समस्त सुखरूप असो विशेष वेदशास्त्रसंपन्न आबा शास्त्री टकले त्रिस्थळी यात्रेस श्रीक्षेत्रीं आले. तीर्थविधि कालाष्टक ब्राह्मण भोजनादि सर्व केलें. नंतर गोविंदभट्ट वर्तक पेणकर येथे पूर्वीच आले होते त्याणी घरोघर सांगितलें की, आबाभट्टजी हे प्रभूंचे उपाध्ये प्रभूंकडे हव्यकव्यें कार्यप्रयोजने चालवितात. त्यास प्रभूचें ग्रामण्य झालें आहे याजमुळे हे अपांक्त आहेत, त्याजवरून आम्ही सर्व ब्राह्मण मिळोन आबाभटजीस विचारिलें कीं, तुमचे वृत्त कसे आहे तें सांगावें, आबाभटजींनी उत्तर केलें की, आम्ही पांच साहा वर्षे नागपूर प्राती होतों.
श्रीमंत बाजीरावसाहेब पुण्यास तेव्हा आम्ही पुण्यास आलों आम्हांस अपांक्त व्यवहार ठावकाच नाहीं. श्रीमंत महाराजानीं कृपाळू होऊन वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री बाबा यांजकडे प्रभूंचे ग्रामण्याची पंचाईत नेमून दिली. शास्त्रीवायांनी पेणकर ब्राह्मणार्थी व प्रभू या उभयतांची मान्यता पत्र लिहून घेऊन सर्व शिष्टमतें ठराव केला की पूर्वीपासून प्रभूचे घरी गागाभट्टीप्रमाणे कर्म चालत आहे त्याप्रमाणे पुढे ही बिनदिकत चालवायें. याप्रमाणे ठराव होऊन श्रीमंत महाराजांची पत्रे प्रांतोप्रांतीं गेली. ग्रामण्य मोडलें. प्रभूंकडे हव्यकव्ये कर्मप्रयोजने चालती झाली. आमचा व्यवहार हा काळपर्यंत पंचद्राविडांत अनुस्यूत चालत आहे. आमचे घरी चिरंजीवाचें लग्न जाहलें पुण्यातच केलें. वे जगन्नाथभट्ट उपाध्ये आठघरे यांची कन्या केली.
लग्नामध्ये पंचद्राविड ग्रामस्त शिष्ट सर्व आले होते. गंधाक्षता भोजनादि व्यवहार सर्व झाले असे उत्तर केले. याचे दाखले येथे ही दोनधार पुरले. परंतु कितेक ब्राह्मणांनी आपले आपल्यांत संशय घेऊन तड केले. विवाद बहुत होऊ लागले तेव्हा आम्ही सर्व एकत्र मिळोन विचार केला की. श्रीमंत महाराजांस पत्र ल्याहावे. पत्राचें उत्तर येईल त्याप्रमाणे सर्वांगी वर्तणूक करावी. याप्रमाणे निश्चय करून स्वामींस विनंतिपत्र लिहिलें आहे. त्याचे उत्तर सत्वर पाठवावें म्हणजे सर्व ब्राह्मणांचे क्लेश दूर होतील. ब्राह्मणांचे क्लेश दूर करणे अतिश्रेयस्कर आहे, स्वामी जाणतच आहेत. यास्तव उत्तर अतिसत्वर पाठवावे.
सदरहू अविमुक्तक्षेत्रस्थांचे पत्र पुणे मुक्कामी येऊन राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांणी वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळशास्त्री यांस या पत्राचें उत्तर द्यावे म्हणोन सांगितलेंवरून बाळशास्त्री व ग्रामस्त पुणेकर यांची पत्रे श्री काशिक्षेत्र गेल्यावरून तेथे क्षेत्रस्थांनी चौकसी शास्त्रानुमतें करून पत्र दिल्हीं त्यांपैकी ग्रामस्त पुणेकर यांचे नांवें पत्र आलें तें बितपशील
स्वस्ति श्रीमदंडकारण्यांतर्गत भीमरथीनाडियसंगत्योपलशीत पुण्याय ग्रामस् दाक्षिणात्यराजर्षि धर्माधीकारि प्रांत पुणे व आठघरें व समस्त ब्राह्मणान्प्रति-
आर्यावर्तकदेश आनंदवनत्रिकंटकविराजित आविमुक्तक्षेत्रस्छ भट्टधर्माधिकारिशेष प्रभृतिनामनेकानतयो विलयं चैत्रशुक्लपचम्यवधि अत्रत्यक्षेणमस्ति भावत्वं तदनुदिनमेधमन माशारमे विशेषस्तु भाषया --
आपण माघकृष्ण दशमीची पत्रे पाठविली ती पावली लिहिलें कीं, वे आबाशास्त्री टकले अपंक्त नाहीत त्याचा व्यवहार पंचद्राविडांत हा काळपर्यंत चालत आहे. त्यांचे चिरंजीवास वेदमूर्ति जंगनाथभट उपाध्ये ग्रामस्त पुणेकर याणी आपली कन्या सर्व ग्रामस्ताचे विचारे दिल्ही. लगन शके १७१९ माघमासी झाले. लग्नात सर्व पुण्यांतील शिष्ट ब्राह्मण व ग्रामस्थ गेले होते. अन्नव्यवहार त्यांचे घरी अनुभ्यूत चालत आहे. दिकत नाहीं. आपण भटजी विषई संषय धरू नये, तशी वेदशास्त्रसंपन्न राजेश्री बाळशास्त्री बाबा प्रभृति पंडित मंडळीची पत्रही असीच आली आहेत. त्यात लिहिलें की श्रीमंतांचे आज्ञेकरून सर्व शिष्ट मंडळ पांचचार वेळां मिळोन गागाभट सूचित मार्गावलंबेकरून प्रभु यांणी चालावें हें संमतपत्र झाले आहे. पूर्वीहि त्याप्रमाणेंच अनुष्ठान प्रभूंकडे चालत आहे. प्रभू यांचेकडे कर्मे गागाभटीवरून चालवावी याप्रमाणें पत्र श्रीमंताची प्रतिति गेली आहेत. दिकत नाही, असें लिहिलें, त्याजवरून वे। आबाशास्त्री टकले यांसी आम्हीं विचारिलें की, तुम्ही प्रभूंचे कुलोपाध्याय, प्रभूंचा ज्ञातिविषय कसा आहे ? यास आधार काय? पुण्यास निश्चय कोणते ग्रंथावरून झाला? तेव्हां आवाशास्त्री याही उत्तर केलें की गागाभट्टकृत कायस्थप्रदीप, गोविंदभट्टकृत गोविंदभट्टी, स्कंदपुराणांतर्गत रेणुकामाहात्म्य, कमळाकरभट्टकृत शूद्रकमळाकर, ज्ञातिविवेक इत्यादि निबंध ग्रंथ पहावे म्हणजे आपले ध्यानात येईल. त्याजवरून आम्ही हे सर्व ग्रंथ पाहिले तो हे क्षत्रियान्वय चांद्रसेनीय प्रभु कायस्थ दाल्भ्यऋषीने क्षत्रियांतकर भार्गवरामाचे आग्रहास्तव शस्त्र धारणरूप क्षात्रधर्म टाकवून कायस्थ धर्म लेखनवृत्ति यांस दिली. ऋषीने पालन करून उपनयनादि संस्कार केले. यास्तव दाल्भ्यगोत्र असा निर्णय पूर्वोक्त ग्रंथ पाहता होतो. आपण ठराव केला तोहि देशकालानुरूप यथायुक्तच केला असेल. सांप्रत थे। आयाशास्त्री टकले त्रिस्थळी यात्रा संपादून पुण्यास गेले आहेत येथे काहीएक करुणस्थांनी व्यर्थ अत्याग्रह करून तड केला आहे यास्तव आम्ही सर्वांनी लिहिलें आहे. तपशीलवार
संमतोऽयमर्थ (महाराष्ट्रानांना) ४० सह्या
संमतोऽयमर्थ (चितपावनाना) २१ सह्या
संमतोऽयमर्थ (वाजसनेयिनां ) ४ सह्या
संमतोऽयमर्थ (करहाटकानां) ९ सह्या
संमतोऽयमर्थः (करनाटकानां) ७ सह्या
एतत्प्रभृति अविमुक्तक्षेत्रस्थ दोन अडीच सहस्त्रपर्यंत ब्राह्मण आबा शास्त्री टकले यांचा संग्रह केला असे. कळायें सुज्ञान्प्रत्यलं पल्लवित्येनेत्यनैकानतयो विलसंतु शके १७२३ दुर्मतिनाम संवत्सरे संवत् १८५८.
येणेप्रमाणे असा कागद व दोनशे वर्षाचे पलीकडील लिपींचे जीणं रेणुकामाहात्म्य सबंध आणून दाखविले आणि उभयतानी विनंती केली की, पूर्वापार वहिवाट मौजीबंधनादि प्रतिवर्षी श्रावणी वैदिकमंत्रेकरून चालत असतां उगाच आपसांत ब्राह्मण कलह करून अमर्याद भाषणें करितात, येविशींची वहिवाट व कागदपत्र पाहून आज्ञा करणार श्रीसमर्थ आहेत. त्यावरून पाहाता ब्राह्मण आपल्यात कलह करून भांडतात. त्यांत राघवाचार्य व वज्रटकशास्त्री यांचे तटाचे म्हणणे की, चांद्रसेनीय कायस्थ यांस कर्मत्रयाधिकार आहे आणि निळकंठशास्त्री थत्ते याचे तटाचे चांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार नाहीं. असे परस्परे वादविवाद होत असतां, उभय तटानी मान्यता दिल्या की, श्रीची आज्ञा होईल त्यास आम्ही मान्य. त्यांत राघवाचार्य प्रभृतीचे म्हणणे की, चार शिष्ट पंडितास मध्यस्थ नेमून श्रीसंनिध सभा व्हावी. त्यांचे विचारें शास्त्रानुमतें ठरेल त्यास मान्य अथवा प्रतिपक्षी यांणी तुळशी गंगोदक घेऊन अगर देवालयी शिरून चांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार नाही म्हणोन सांगावें. त्यास मान्य किंवा श्रीकाशीक्षेत्री व म्हैसुरादि प्रातांत मोठी मोठी क्षेत्र आहेत तेथे उभयतांनी आपलाले प्रतिपाद्य पक्ष लिहून पाठवावे. तेथे ठरोन येईल त्यास ही आम्ही मान्य. परंतु यातून कोणत्याही पक्षास श्रीसन्नीच नीळकंठ शास्त्री यांणी ग्रहण करून मान्य केलें नाही. तेव्हा तट तसेच राहिले.
नंतर मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीस व पंचमीस राजेश्री भाऊ दातार यांचे वाड्यांत नीळकंठशास्त्री थत्ते प्रभृतींनी आपल्याच मिळाफातील चार मध्यस्थ नेमून राघवाचार्य याचे तटापैकी एक राघवाचार्य यांस मात्र बोलावणें करून मठास न कळवितां गावांतच सभा केली. तेथें पूर्वपक्ष उत्तरपक्ष दिनशेष च्यार घटिकांपासून चौदा घटिका रात्रपावेतों झाला. तेव्हां राघवाचार्य यांणी मध्यस्थांस सांगितलें कीं. तुम्ही तुळशी गंगोदक घेऊन बोलावें. ते अमान्य करून तदुतर निखालस वेव्हारिकावर शास्त्र सोडून आले. तेव्हां तुम्हांस काय सांगावे, गोपाळराव रामचंद्र पटवर्धन जमखंडीकर व बळवंतराव महादेव रास्ते प्रभृति यांणी तर राघवाचार्य यांस पदर पसरून मागून आम्ही सांगतों तें ऐकावें असा आग्रह केल्यावरून शास्त्रानुमत सोडून चौघांचे विचारे अशी यादी झाली ती बितपशील
यादी प्रभू यांस वैदिक कर्माचा अधिकार नाहीं परंतु चांद्रसेनीय कायस्थ यांस वैदिक कर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं याचा निर्णय व्हावयाकरितां राजश्री भाऊ दातार याचे वाड्यात पुणे कसबे येथे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीसह पंचमी शके १७४८ व्ययनाम संवत्सरे या मितीस सभा होऊन तेथे निर्णय ठरला की, चांद्रसेनीय कायस्थास वैदिक कर्माचा अधिकार नाहीं असे सर्वांचेमतें ठरल्याविषयी संमते म्हणोन लिहून त्या यादीवर त्याच बैठकीस राघवाचार्य यांचे संमत घेऊन राघवाचार्य यांजबरोबर त्याच बैठकीस घोडभट्ट खरे प्रभृति द्रवीड याचा आक्षेप अपशब्दांचा. चित्तात आणून नीळकंठ शास्त्री यांणी गंधाक्षता केली. नंतर दुसरे दिवशी श्रीसन्निध नीळकंठ शास्त्री प्रभृति येऊन विनंती केली की, आम्ही आपसांत समजलों, त्यास सर्वांची गंधाक्षता व्हावी. त्यावरून त्यास आज्ञा झाली जे, स्वारी पुणेसन्निध पर्वती मुक्कामी असता तुम्ही परभारे गावात सभा करून समजला त्यापक्षी आमचे समक्ष गंधाक्षतेचे प्रयोजन काय आहे? असें सांगोन स्वारी करवीरास जाण्यास प्रस्थानें निघोन मोतीबागेत गेली. तेथेंही दुसरे दिवशीं मिळोन आले आणि विनंती केली की, आम्ही समजलों आणि श्रीस शरण आलों.
तरी श्रींनी गंधाक्षता सर्वांची करून शहरांत चलायें व चार दिवस राहून नंतर जाणें व्हावें. त्यावरून सर्वांस गंधाक्षता करून दुसरे। दिवशी गोखल्याच्या वाड्यांत येऊन सात आठ मुक्काम करून स्वारी करवीरास निघोन गेली. यावरून विचार पहातां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची वहिवाट पूर्वापार जातककर्मादारभ्य मौजीबंधनादि संस्कार व प्रतिवर्षी श्रावण्या वेदकर्मे करून होतच आहेत. त्यांत मुंजीबंधन व श्रावण्या वैदिक कर्माशिवाय होत नाहीत असे शिलशिले त्यांचे असोन कोणी तंटा करितात तो व्यर्थ आग्रह, असे आर्थीच होतें. व पेणकराचे ग्रामण्या अंती यादी व सनदा यात प्रत्यक्ष दालभ्य कायस्थ म्हणोन लिहितात तेव्हां दालभ्य तेच चांद्रसेनीय आणी पेशवाई कारकीर्द ब्राह्मणांची जबरी आग्रह करून कोणतीही गोष्ट करण्यास शक्य, परंतु यांची रूढी व शास्त्र बलवतर जाणून `पूर्वयत` म्हणोन सनदा प्रांतांत देतात आणि त्या सनदात लिहितात की, प्रभु यांचा व पेणकर यांचा आचरणावरून तंटा पडून पेणकर यांणी सरकारची पत्रे प्रांतांत पाठवून प्रभूंकडील कर्म बंद केली. नंतर उभयता सरकारांत फिर्याद आले, त्यावरून उभयतांचें लिहून घेऊन शिष्टसंमते मनात आणितां गागाभट्टी अन्यये पूर्ववतप्रमाणे कर्मे प्रभु यांजकडे चालवावी असे ठरले त्याप्रमाणे चालवीत जाणे विकत न करणे. अशी संदिग्ध पत्रे लिहितात तेव्हां पूर्वी यांजकडील पत्रे सरकारची पाठवून कर्मे बंद केलीं तीं पुराणोक्त असती तरी बंद करण्याचे प्रयोजनच नव्हते. वैदिक कर्मे चालत होती म्हणूनच कलह करून पत्र पाठवून बंद करितात. त्याची चौकसी शिष्ट संमत होऊन पूर्ववत प्रमाणें ठरलें म्हणून लिहितात शिष्टानुमते शास्त्रमतें मागील आचरणांत न्यूनाधिक्य नाही. पूर्ववत् निर्णय होतो. तेव्हां पेणकर ब्राह्मणवादास खोटे जाहले. वांद्रसेनीय प्रभु खरे जाले. हा एक पक्ष व पूर्वापार वैदिकमंत्रे करूनच याजकडे कर्मे चालत आली हा एक पक्ष एकूण दोन पक्ष सनदा व यादींवरून सिद्ध होतात व श्री अविमुक्तक्षेत्री चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे कुलोपाध्याय यांजवर मिथ्यापवाद दुःशब्द थे। गोविंदभट्ट वर्तक यांणी क्षेत्री वाजविल्यावरून श्री क्षेत्रींचे क्षेत्रस्थ यांनी बाजीराव पंडीत प्रधान यांस पत्र पाठविल्यावरून येथील शास्त्रनिर्णय ठरल्याप्रमाणे दे बाळशास्त्री प्रभुति पंडित मंडळीस लिहिण्याविशी सांगितले. त्यांची पत्रे क्षेत्रस्थांस गेल्यावरून क्षेत्रस्थ यांणी | आवाशास्त्री टकले यांसी विचारिलें कीं, तुम्ही प्रभूंचे कुलोपाध्याय यांचा ज्ञातिविशय कसा आहे ? पुण्यास कोणत्या ग्रंथावरून निश्चय जाला ? ते ग्रंथ क्षेत्रस्थ यांणी टकले यांस विचारून ते प्रत्यक्ष पाहून निश्चय करून लिहितात की हे क्षत्रियान्वये चांद्रसेनीय कायस्थ प्रभू दाम्यपी भार्गवरामाच्या आग्रहास्तव शस्त्रधारणरूप क्षात्रधर्म टाकवून कायस्थधर्म लेखन वृत्ति यांस देऊन ऋषीनें पालन करून यांचे उपनयनादि संस्कार केले. म्हणोन मोठमोठे विद्वज्जन पंडित स्वदस्तुरसंमते आपलाली पृथक पत्रावर करून समस्त ब्राह्मणांस लिहितात तेंव्हा ते दालभ्य कायस्थच चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची परंपरागत रूढी व त्याप्रमाणेच शास्त्रानुमतें शिष्टसमतें सनदा आहेत आणि ते काळी पुणेमुक्कामी शास्त्रनिर्णयास कोण कोण पंडित होते ?
याची चौकशी पाहतां शके १७४६ चे साली विठ्ठलराव दिवाणजी यांणी वेदशास्त्रसंपन्न राजश्री त्रियकशास्त्री रामदुर्गेकर यांस पत्र पाठविलें की, उगीच कोणी ब्राह्मणानी येथे खटला उपस्थित केला आहे त्यास आपले येणें जाल्यास उत्तम. त्याचे उत्तर आलें त्यांत मजकूर तूर्त म्हैसूरकर राजे याणी आम्हांस स्वास्थ करून देऊन राहवून घेतले आहे. तुमचा निर्णय बाजीराव साहेब यांचे कारकीर्दीत रामचंद्र दीक्षित वोक व त्रिमंगलाचार्य व नरसिंह शास्त्री गुर्जर व परशुराम शास्त्री बोक में बाळशास्त्री चंदावरकर व बाळशास्त्री न्यायाधीश व आम्ही मिळोन शास्त्रार्थ निवडला आहे यावरून पहाता हे मोठमोठे पंडित शास्त्रविषयात श्रेष्ठ व तदान्वये श्री काशिक्षेत्रस्थांचे शास्त्रनिर्णयाचे पत्र व त्या पत्रात जे ग्रंथ लिहिले आहेत
ते सांप्रत प्रत्यक्ष पाहता हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु क्षत्रिय व कर्मत्रयाधिकारी असे सिद्ध होते व हली दोन वर्षे पुण्यांत कांही ब्राह्मणांनी तड करून खटला केला असता शास्त्रार्थ कुंठित न होता राघवाचार्य यास पदर पसरून मागोन घेतात तेव्हां शास्त्रार्थ खोटा म्हणण्यास कक्षा चालत नाही म्हणोन से दोनसे ब्राह्मणांत आचार्य यांस पदर पसरून मागतात असे सिद्धच त्यांत पदर पसरून जी यादी ठरावीतात त्यात लिहीतात की प्रमुख वैदिक कर्माचा आधीकार नाहीं परंतु याचाही अर्थ पाहाता आधीकार नाही असे लिहून परंतु शब्दे आपणच संशयात पडतात. नाहीं असे स्पष्ट झाल्यावर संशयपर परंतु शब्दाचे प्रयोजन नाहीं तस्मात त्यास वैदिक कर्माचा आधीकार नाही असी च्यांद्रसेनीयविद्वेषी यांची खात्री होत नाही. व पुढे लिहीतात की व्यांद्रसेनीय यांस वैदिक कर्माचा आधीकार आहे किंवा नाहीं, याचा विचार पाहातां सर्वाच मते नाही असे ठरले. तेव्हा वैदिक कर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं याची पुर्वी खात्री नाही हाणोन निश्चयाकरिता जमा जाले असे असोन शास्त्रमतें न म्हणतां सर्वांचे मतें म्हणोन यादी लिहून समति करितात ते पक्षी पूर्वी खात्री नाही म्हणोन संशय आहे किंवा नाही त्याचा नीर्णय शास्त्रमतें न होता सर्वांच मते हा शुद्ध आग्रह शास्त्रविचार जाला नाही असे त्या यादीवरून होते. तेव्हां दोन वर्षे निलकंठ शास्त्री प्रभृतिनी तड माजवीला हा वृथा. पूर्वी निलकंठ शास्त्री याणी पत्र दिल्हे चिरंजीव म्हणोन आगत्यवादे लिहीतात. ग्रंथ शोध आम्ही करित आहो तुम्हीही तिकडे करून इकडे पाठवावे.
पक्का विचार करून ठेविला असता फार उपयोग होईल म्हणोन लिहितात तेव्हा हे महापंडित, कांही विचार करूनच पत्र लिहिले, पक्का मात्र विचार करणे राहिला. तेव्हा ते पत्र पूर्वी निष्कपट बुद्धिनें लिहिले ते शास्त्रमते खरे, ते काली `क्षात्रधर्मात् बहिष्कृतः या वचने करून येक शस्त्रधारणरूप अशी बुद्धि शास्त्रज्यन्यस्थत होती. पुढे कांहीं चित्तात विपर्यास द्वेष बुद्धिचा जाल्यावरून त्याच वचने सर्व धर्म गेले असा त्याच वाक्याचा उलट अर्थ करून वृथैव वाद वाढविला. वज्रटंकशास्त्री याणी कदवा दिल्याप्रमाणे पुरवणी जाली. निळकंठशास्त्री येथे याजकडून कतव्याप्रमाणे पुरवणीचा सेवट लागला नाही. पूर्वी पत्र दिल्हे ते शास्त्र हाशील आपणच पत्र राजश्री विठलराव दिवाणजीस देऊन पुढे आपणच त्यास नाही म्हणोन वाज्रतक यांचे तडांतील ब्राह्मणास पूर्वांग उतरांग प्रायश्वीते दिल्ही आणि हाल्ली गंधाक्षत होते समई त्यांत जे प्रमुख वजटकासह यास प्रायश्वितरहित गंधाक्षतेस घेतले.
यावरून पाहता चांद्रसेनिय यांस सशास्त्र वैदिक कर्मत्रयाधिकार आहे. तेव्हा दोष तो कोणाकडेच नाही. असे असोन निळकंठशास्त्री याणी पुर्वाग उतरांग ब्राह्मणास प्रायश्चित दिल्ही याचा अपवाद मात्र त्याचे माया आला. हे कर्म निळकंठशास्त्री याजकडून अनुचित जाले. येथे शास्त्री याणी विठलराव याचे नावे पत्र लिहलें ते सदरी बार आहे. त्यावरून विचार पाहाता है ज्ञाती चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांस वैदिक कर्मत्रयाधिकार, हे निलकंठशास्त्री याची खात्री ह्मणोनहे शास्त्रज्ञ ज्ञाते असे पत्र लिहितात. नंतर विपर्यास बुद्धीस जाल्यावर आह्मी पत्रच दिल्हे नाही असें कुमांड करून प्रभुचा अनादर पर्याय माहाराष्ट्र शुद्ध भाषणे परमु हेच रुढित आणून परभूस कर्मत्रयाधिकार नाही अशी तुळशीबागेत गुदस्ता सर्व ब्राह्मणांची समती करून घेतली. चांद्रसेनीय यांची उपलब्धीच नाही असेही निळकंठशास्त्री याचे म्हणणे. परंतु त्यास सर्व ब्राह्मणानी समत दिलें नाही की च्यांद्रचेनिय प्रत्यक्ष हे असोन नाही कसे म्हणावे ? यावरून पाहता हे ज्ञाती चांद्रसेनिय कायस्थ प्रभू कर्मत्रयाधिकारी अशी थथे शास्त्री यांची खात्री पुढे देशबुद्धी जाल्यावर परभु है। अन्य ज्ञाती कल्पून यास आधीकार नाही ह्मणतात आणि चांद्रसेनिय याची उपलब्धीच नाही असे ह्मणतात. तव्हां चांद्रसेनियास शास्त्रअधिकार यास नाहीं ह्मणे यास लाक्षा चालणार नाहीं ह्मणोन उपलब्धीच नाहीं हेच यातील कारणहासील या ज्ञातीचा कर्म लोप करावा हेच दृढ मानस, च्यांद्रसेनिय यास वैदिक कर्मत्रयाधिकार आहे म्हणोन पर है ज्ञाती भिन्न पाडून घ्यांद्रसेनिय यांची उपलब्धी नाही हाणोन वाजवितात. पुढे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु हेच ज्ञाती शुद्र भाषा भेद परभु असे सिद्ध जाले. तेव्हां च्यांद्रसेनिय यासच कर्मत्रयाधिकार नाही हाणीन वाद प्रतिवाद करू लागले. त्याची समाप्ति शास्त्र आधार सोडून पदर पसरून करितात. तेव्हा राघवाचार्य याणी शास्त्रार्थविषई प्रतिज्ञा केली ते खरी.
निळकंठ शास्त्री याचा व्यवहार येविसीचा शास्त्रजन्य नव्हे. शुद्धआग्रही. कारण पुर्वी अश्विन मासी परभारे तात्या काकिर्डे याजपासून कांही ब्राह्मणास द्रव्यलोभास्तव देकार करून च्यांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार नाही म्हणोन यादी करून त्यावर समती घेऊ लागले ते काळी राघवाच्यार्य याचे तडातील ब्राह्मणास काही द्रव्य लोभ दाखऊन तिनच्यार ब्राह्मण फिताउन नेले. त्यांस काकिडे याणी सांगितले की, निळकंठशास्त्री व राघवाच्यार्य परभारे कलह करित आहेत तो कलह आपल्यास कशास पाहिजे. तुम्ही यादीवर समत करून आमच्या तडांत यावे. त्यावरून ते ब्राह्मण लोगें मान्य जाले, परंतु त्या ब्राह्मणांचे ह्मणणे की, निळकंठशास्त्री यासी तुम्ही गंधाक्षतेस बोलाऊ नये. कारण घोडमट खरे प्रभृती द्रवीड मंडळीने त्यास बहिष्कार घातला आहे. तेव्हां काकीर्डे मान्य न करित याजमुळे ते ब्राह्मण उठोन आले. यातील आर्य पाहातां च्यान्द्रसेनीय यांचा कर्मलोप करण्याविषई द्रव्यही खर्च करून परभारें साधन करितात व मार्गशीर्ष मासी पुढे सर्वांचे बिच्चारे शास्त्रार्थ न होता यादी ठरवितात, त्यापुर्वीच कृत्रीम करून समतें करून ठेवितात असे सिध्ध होतें. वस्तुतः विचार पाहातां वर्ण मात्रांस गुरू ब्राह्मण शास्त्राधारे सर्वांस वागवावे हा आधिकार असता च्यांद्रसेनीय याचा शास्त्रार्थ सोडून त्यांस आधिकार नाहीं म्हणोन कुभांड केले तेव्हां ब्राह्मणच त्या ज्ञातीस वादी जाले. ते पक्षी वादी दानधर्मे करून आगर कसाही वस्य करून त्याणी पुर्वी समती पट दस्तवज साध्य केला त्यास द्रव्य खर्च करून साधन करून घेतलें हाणोन म्हणतात आणि आपण अशास्त्रास द्रव्य परभारें देवऊन लोभविष्ट ब्राह्मण करून समती घेतात तेव्हां च्याद्रसेनीय याजबरोबर कलह शुद्ध आग्रही. वास्तविक विच्यार पाहाता स्कंदपुराणी सह्याद्री खंडांतरगत रेणुका माहात्मी व्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु याचा निर्णय लिहीला आहे. तेथे स्पष्ट वैदिक कर्मत्रयाधिकारी म्हणोन पण्णांच कर्मणामधे त्रिणि कर्माणिजीविका असे प्रसिद्ध आहे. त्यांत क्षात्र धर्मातृ बहिष्कृतः या वचनावर सर्व कर्मापासून त्यक्त होते तरी त्याच ग्रंथी पुढे साहा कर्मापैकी तीन कर्मे करून निर्वाह करावा हाणोन सांगण्याचे प्रयोजन नवते. ते पक्षी एक शस्त्रधारणरूप क्षात्रधर्म टाकऊन बाकी धर्म त्यास आहेत असे सिध्यच तत्राप दुसरा आर्थ पाहाता श्रीमार्गदानें प्रतिज्ञा केली ती संपुर्ण क्षात्रधर्म त्यागाचिना वध प्रतिज्ञेधी फलोप्ती येणार नाहीं असाही भाव धरावा तरी तो संभव होत नाही. कारण भार्गव राम परमज्ञाता. त्यांत ब्राह्मण आणि संपूर्ण क्षेत्रीय द्वेषबुध्धीच होते असेही नाहीं. कांहीं औदासीन व कांही दुष्ठ तेव्हां औदासीनाचा वध करावा तरी त्यात पातकच निर्माण होईल. ते पक्षी औदासीनाचा वध तो भार्गवानें केलाच नाहीं. दुष्ट होते त्याजविसी प्रतिज्ञा औदासीनाचे हत्येने पातकमात्र होईल छाणोन वध न केला. यास प्रमाण पाहाता जनकादीक यासी विरोध अगर वध केला नाही तेव्हां संपुर्ण क्षत्रीय याचा नाष केला असा भाव नाही. जसे ओदासीन राहिले त्यांचे सर्व धर्म राहिले. तेणेकरून वधप्रतिज्ञेसबाध न आला. तसेच गर्भरक्षणार्थ दालभ्य ऋषीनें भार्गवाचें वचन घेऊन रक्षण केले. तेव्हां त्या गर्भाचे ठाई भार्गवाचे वधप्रतिज्ञेचा लेश राहिलाच नाही. तत्राप रेणूकामाहात्मी वचन रामौवाच ॥ जायमानो भवेदबालः क्षात्र धर्मा भविष्यति || या वरून पूर्वे वाक्यें करुनच सर्व धर्मापासुन व्यक्त होता तरी पुढे रामच म्हणतो की हा पुढे क्षात्रधर्मा होईल. ते पक्षी त्याच वचने करून तो धर्म गेलेच नाहीं. नंतर दाल्भ्यौवाच ॥ भाकुरुध्यात्र संदेहो दुर्बुद्धिन भविष्यति यावरून पाहता भार्गवाची वधप्रतिज्ञा दुर्बुध्धीचे ठाई त्या दुधीपासून ऋषीच करून गर्मीय मुक्त झाला च काली परहित दुष्टकर्मी औदासीन त्यांचे सर्व कर्म राहिलें तेथें भार्गवाची वध प्रतिज्ञा राहिलीच नाही. याचे एक शस्त्रविद्येसिवाय बाकी धर्म राहिले त्याणे वधप्रतिज्ञेस बाध आला नाही. प्रत्यक्ष त्रीणी कर्माणी जिवीका म्हणोन वचन आहे ते न पहातां एकाच वचनाचा आर्थ वैपरीत्यभावे सर्व धर्म गेले ह्मणोन कक्षा घेणें हे अशास्त्र. इत्यादि अन्वयावरून पाहातां पुणे मुकामी निळकंठ शास्त्री प्रभृति ब्राह्मणांनी आग्रही तंटा करून दोन वर्षे तड पाडून ब्राह्मणांत दुफली केली होती हैं खोटे, असे शास्त्रानुमतें व यादी व सनदा पत्रे व श्रीअवीमुक्त क्षेत्रीचें समत पत्र व च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे पारंपर्य आचरणावरून सिद्ध होतें.
यावरुन आज्ञा होती जें राजश्री बळवंतराव मल्हार चिटणीस घोलकर य भिवराय विठ्ठल व भगवंतराव मल्हार खासनिवीस नाडकर संस्थान सातारा व नारायणराव सिताराम व विठलराव बाबाजी फणसे व विठलराव देवाजी दिघे व रावरावजी तासकर प्रभृती समस्त क्षेत्रियान्ययध्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची वहिवाट पुर्वापार वैदिक कर्मत्रयधिकारे करून परंपरागत चालत आल्याप्रमाणें अव्याहत पुढेही चालवित जाणे, विशेष लिहीणे तें काय. शके १७४८ व्यय नाम संवत्सरे माघ मास महानुशासनं परिवर्ति
इत्यल
आतांपर्यंत उद्धृत केलेल्या वरील हकीकतीवरून वाचकांना हे कळून आलेंच असेल की चित्पावन नोकरशाहीच्या श्रीमंत आश्रयाखाली वावरणारे जवानमर्द ब्राह्मण (?) वीर मराठी साम्राज्याच्या चिरस्थाइत्वापेक्षां स्वतःच्या ब्राह्मण्याचे डोले नाचविण्यांतच गर्क होऊन गेले होते. मुंबईचे टोपीकर, म्हैसूरचे वाघ किंवा हैदराबादचे लांडगे यांना पायबंद लावून छत्रपतीच्या भगव्या झेंड्याची इभ्रत वाढविण्याचा यत्न करण्याऐवजी, स्वतःच्या भाडोत्री ब्राह्मण्याची महति वृद्धिंगत करण्यासाठी, खुद्द मराठी रियासतीच्या पिढीजात चित्पावनेतर स्वदेशबांधवांच्याच तंगड्या छाटण्याचा उपक्रम करण्यांत ते अगदीं गढून गेले होते. सातारकर धन्याला धतुरा दाखवून विश्वासघाताच्या फोडणीने खमंग बनविलेला नोकरशाहीचा मलीदा खाऊन खाऊन परान्नपुष्ट झालेले मुळामुठासंगमनिवासी चित्पावन तरवारबहाद्दर आतां तरवारीकडे न पाहतां स्वतःच्या गळयांतील जानव्याची गांठ कुरवाळू लागले. प्रस्तुत ग्रामण्याच्या वेळी बाळाजीपंत नातू.
चिंतामणराव पटवर्धन आणि निळकंठशास्त्री थत्ते या दिग्विजयी त्रयीनें अनंत अत्याचार केले. त्या सर्वांची संभावना अगदी बारक्यांतल्या बारक्या टायपांत केली तरी मराठे आणि इंग्रज पुस्तकासारखी तब्बल दोन पुस्तकें भरुन निघतील. या ग्रामण्यासंबंधी बरेचसे कागदपत्र रावबहादुर डोंगरे यांनी शोधून काढले आहेत जय ते त्यांनी आपल्या " सिद्धांतविजय" नामक ग्रंथातहि प्रसिद्ध केले आहेत. या त्यांच्या कामगिरीबद्दल चां. का. प्रभु समाजानें रावबहादुरांचे कृतज्ञतापूर्वक आभारच मानिले पाहिजेत. यापुढील हकीकत रा. ब. डोंगरे यांच्याच शब्दात खाली देतों :---
`चांद्रसेनीय कायस्थ प्रभु व ब्राह्मण ह्या जातींमध्ये पेशवाईत बरीच ग्रामण्ये झाली होती. हे मागें सांगितलेच आहे. अशा प्रकारचे आणखी एक ग्रामण्य पेशवाई बुडाल्यानंतर श्री. चिंतामण पांडुरंग पटवर्धन सांगलीकर यानी पुढाकार घेऊन बाळाजीपंत नातू पुणेकर व निळकंठ शास्त्री थत्ते याच्या मदतीनें आपणांस पाहिजेत तसे नवे ग्रंथ सांगलीस तयार (अ) करून घेऊन सन १८२५ च्या सुमारास साताराप्रांती ऊभे केलें होतें. त्यांवेळी बळवंतराव मल्हार चिटणीस सुमंत चां. का. प्रभु यांनी करवीर मठाधीश्वर श्रीमत् शंकराचार्यांस विनंती केली होती की. ब्राह्मण आमच्या कर्मास विनाकारण अडथळा करून तंटा करीत आहेत ह्याचा बंदोबस्त व्हावा.` त्यावरून स्वामींनी सर्व ब्रह्मवृंदास आज्ञा केली की " पूर्वीपासून जसे चालत आले आहे तसे चालवावें; तंटा कोणी करूं नये." परंतु आम्ही म्हणतो तसा ठराव स्वामी करतील तर तो आम्हास मान्य आहे.` असे म्हणणारा ब्रह्मवृंद ह्या वरील ठरावास थोडाच जुमानणार होता!
माहुली वगैरे क्षेत्राच्या ब्राह्मणानी चिंतामणराव सांगलीकरास श्रीमंतांचे (पेशव्याचे) ठिकाणी स्थापून चां. का. प्रभूंस शूद्र बनविण्याच्या राष्ट्रीय कामावर (ब) त्याची नेमणूक केली. सांगलीकरानी पाहिलें की शंकराचार्यास सामील करून घेतलें असता आपले काम श्रीगणपतीच्या कृपेकरन निर्विघ्नपणे पार पडेल पण आपल्या अधिकाराचा बोज राहावा असें स्वामीस वाटत असल्यामुळे ते सांगलीकरांच्या कटांत येईनात. तेव्हां स्वामीस बागुलबोवा दाखवून त्यांस आपल्या मुठीत आणून त्यांच्याकडून आपणांस पाहिजे त्या मतलबाची प्रभूविरुद्ध यादी सहीशिक्यानिशी शके १७४७ साली पर्वती मुक्कामी करून घेतली. व पुढे दोन वर्षांनी (शके १७४९) त्या यादीच्या नकला सर्वदेशभर ७५ ठिकाणी पाठवून प्रभू लोकांस शूद्र बनविण्याचे कामास (क) चांगलीच सुरवात केली.
(अ) रोवेसी सा. नमस्कार विज्ञापना ता. छ २ ॥ कर पार्वती यथास्थित आसे विशेष आलिकडील वर्तमान तर सांगलीस ग्रंथ जाला तो दुतर्फा स्वामीचे पत्री जाहल्यामुळे मनोदयानुरुप शेवटास गेला नाही त्यास हाली मुंबईचे मुख्य सातान्यास येणार तेथे मु॥ किती दिवस होईल नकळे त्यासंधीत बाई वगैरे समस्त ब्राह्मण हजार दोन हजार जमाव होऊन साहेबाजवळ फिरयाद करावी जे या ज्ञातीप्रकर्णी यामागे शंभर वर्षात चार पाच ग्रामण्ये जाली त्यात या ज्ञातीचे कबूल करावे वगैरे सरकारात येऊन याचे वागणुकीचा ठराव जाला त्याप्रे ॥ याणी वागावे ते दांडगाईन वागणूक जाहली हालीही दांडगावा करून जी गोष्ट इ॥ ता या ज्ञातीत आचरण जाहले नाही ते हाली महाराजाचे पुस्तपन्यामुळे आचरतात याचा बंदोबस्त सरकारांतून आपण केल्याविना होत नाही यास्तव महाराजास निखालस स्पष्ट सांगून याचा पुस्तपना न होय आणि डाली सांगलीस ठराव होऊन पत्रे क्षेत्रो क्षेत्री गेली आहेत त्याप्रे॥ हे वागणूक करीत असे जाहले प॥ हा येक बेत दुसरा मनसुबा ब्राह्मणानी जमाव होऊन सदरी लिहिल्या प्रे|
वागणुकेचे साहेबांचे जाहिरण्यात आणून आपले वाड्यावर चालून घेऊन मारामारी करून आवरू घ्यावी त्यात जे जाया होतील ते होतील असाही निग्रह करावा याच तटास आल्यास चल आणावे असे आहे सारांष साहेब तेथे आल्यावर या गोष्टीचा उपक्रम सर्व मिळोन करावा यांत जे घडेल ते घडो असा बहुत निकर्श होऊन करण्याचा बेत आहे अकिले वर्तमान लिहिले आहे यासंधीत आपण केले ते सेवटास न्यावे असी योजना याची जाहली आहे त्यास आपला सांभाळ आजपर्यंत ज्यांही केला त्यानी या समई कृपा करुन अभिमान घरून संरक्षण केल्यास पार पडेल इकडील येत आपण केले ते सेवटास नेण्याविसी बहुत आग्रहाचे बोलावे । असे आहे अद्यांत अकिले ते श्रुत व्हावे या करिता लिहिले आहे. सेवेसी श्रुत होय हे वि
सिद्धांतविजय पृ. ११३-१४.
(ब) श्री गणपतीजंयति.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मवृंद उभय क्षेत्र माहुली स्वामीचे सेवेसी.
विद्यार्थी चिंतामणराव पांडुरंग साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता। अधिक आषाढ शु।। १३ पावेतो यथास्थित असे विशेष. परंतु हे चाद्रसेनी नव्हेत संकर कायस्थ ज्यात्योद्भव शूद्राधम यास वेदकर्माचा अधिकार नाही व च्यांद्रसेनासहि अधिकार वेदकर्माचा नाही व त्या ज्ञातीची उपलब्धीही नाही. असें असतां परमु हे आलिकडे चांद्रसेनी म्हणवू लागले व आपले ज्ञातीत वेदोक्त कर्म व्हावी येविसी आपले साधनाकरितां म्हणोन पुण्यांतील कांही ब्राह्मणास परभूनी लोभाविष्ट केले. त्या ब्राह्मणांनी चांद्रसेनी कायस्थ यास वेदकर्माचा अधिकार नसता अधिकार आहे म्हणोन परभुजवंत शास्त्रार्थ लिहून दिल्हा, याजमुले ग्रामण्ये होऊन ब्राह्मणांत तट जाहले. गंधाक्षता दर्ज जाहली. व सोनार हे रथकार यास वेदकर्माचा अधिकार आहे असे कांहीं ब्राह्मणांचे म्हणणे व जीनगर हे चर्मकतुल्य चर्मी काम करतात त्यास गल्यात जानवीं घालण्यास आधिकार नाहीं असे असता गल्यांत जानवी घालतात व अलिकडे पुण्यांत ब्राह्मणांचे व शुद्रांचे हावदांत पाणी भरतात. म्हणौन श्री गोदा यात्रोदेशे शके १७४७ पार्थीव नामसंवत्सरात श्री स्वामी जगग्दुरु यांची स्वारी पुण्याचे सांनिध्य पर्वतीचे मुक्कामास गेली. तेथे समजले व आम्हीही पुण्यास गेलो.
पुण्यांतील ब्राह्मण व ग्रहस्य श्रीचे दर्शनास आले व आम्हीही दर्शनास गेलो. ते समयी ब्राह्मणांचे म्हणणे पडले त्यांतील भाव, स्वामीचे आगमन जाहले व आपलीही स्वारी आली आहे. श्रीमंतांचे ठिकाणी आपण विद्यमानी आम्हास ब्राह्मणप्रमु ब्राह्मण्याचा कारभार हा खटला मनास आणून तोडावा. सर्वांची गंधाक्षता करावी. म्हणोन त्याजवरून श्रीमंत कैलासवासी माहाराज छत्रपती संस्थान सातारा व श्रीमंत कैलासवासी पंतप्रधान यांच्या कारकीर्दीत परभु यांची ज्ञाती कसी व त्यास वेदकर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं व त्यांचे आचरणाचा पाठ कसा याची चौकसी जाहली त्यांत कसकसे ठरले व परभुजवळ चांद्रसेनीय कायस्थास वैदिक तीन कर्माचा अधिकार आहे असा शास्त्रार्थ लिहून दिल्हा तो युक्त किंवा अयुक्त हे पाहावे.
याकरिता कायस्थाची उत्पती चित्रगुप्त व चांद्रसेनादी कायस्थ यांची कसी व त्यास वेदकर्माचा अधिकार आहे की नाही याचा व दुसरा प्रकार सोनार हे रथकार होत किंवा नव्हेत व त्यांस वेदकर्माचा अधिकार आहे किवा नाही याची चौकसी ग्रंथावरून सिष्टानुमतें व तिसरा प्रकार जीनगर यास गल्यांत जानवी घालण्यास अधिकार नाहीं असे असता गल्यांत जानवी घालतात त्यास यांचा पूर्वापाठ कसा याचीही चौकसी पाहून सारांश करून श्री स्वामीस समजाविला आणि विनंती केली त्यातील भाव चौकसी केली ती अयुक्त किंवा सप्रमाण याचा विचार स्वामीनी करून सदरहू सारांशाअन्वये चालणेंविसी श्री काशीक्षेत्रादी क्षेत्रस्थ व पुण्यग्रामादि ग्रामस्त ब्राह्मण वगैरे यास पत्र द्यावयास आज्ञा व्हावी म्हणोन त्याजवरून सदरहूचा विचार श्री स्वामीनी करून सदरहू सारांशात चौकशी केल्याचे प्रकार कसकसे लिहिले, ते वगैरे सर्वास कलावे. सारांशाअन्वये सर्वांनीं चालावे याजकरितां सारांश वार करून निर्णयाची याद व पत्र लिहून दिल्ही आणि जिकडील तिकडे पाठविण्याविसी आज्ञा जाहली, त्याजवरून आपले नांवचे पत्र व याद पाठविली आहे. पोहोचल्याचे उत्तर श्रीचे नावे पाठवावे. बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती.
(क) श्री विद्या नरसिव्ह भारती स्वामी संकेश्वर याणी वेदशास्त्रसपन्न परम सिषोतम राघवाचार्य यास पत्र सही सिक्यानसी कार्तिक शु। १० शके १७४८ व्येय नाम सवत्सेरी लि पौ थोडे हसील मार फालगुनमासी आम्ही श्री गोदावरी यात्रेस जाग्या भो पुण्यानजीक पर्वतीचे मु॥ जाऊन राहिलो त्यासमयी च्यांद्रसेनीय ज्ञातीचे शास्त्रार्थ था। ब्राह्मणांत तंटा पडला होता तेव्हां उभयपक्षीचे ब्राह्मण दर्शनास येऊन मार समजाविला त्यासभेत तुम्ही बोलला की स्वामीनी गंगोदक व तुल (सी) घेऊन श्रीदेवासनिघ बसून निरमछरपणे च्याद्रसेनिये ज्ञातीस वेदकर्म अधिकार आहे किंवा नाही हे सत्ये सांगावे अथवा निरमर शास्त्री पंडित माही बसवून शास्त्र समते निरणय करून सांगावे परंतु त्यावेली च्यांद्रसेनीय शास्त्रार्थ विषयखंडन मंडन करून पत्र दिल्ही कारण चिंतामणराव याचे मनी च्यांद्रसेनीय याचा द्वेष कोपिपक्षो आणखी च्यांद्रसेनिये शालीचे द्वेषाचे आग्रगण्य बालाजीपंत नातु विपरित बोधिता नातु आमचे संस्थानास उपद्रव करतील या भितीस्तव नातूचे मनोधारणार्थ मुद्रापूर्वक पत्रे दिल्ही परंतु ती पत्रे मिथ्या साहनी रद करून घ्यांद्रसेनीय ज्ञातीविसी शास्त्र ग्रंथ ग्रंथ समती पाहता च्यांद्रसेनाना वैदिक कर्म अधिकार सत्ये आहे त्याजवरून हे पत्र तुम्हांस लिहिले आहे.
"या यादीच्या प्रत्येक नकलेबरोबर श्रीशंकराचार्य स्वामीच्या नांवचे एकेक पत्र जोडलें होते.
(ड) निळकंठ शास्त्र्यानी देखील पुण्यास प्रभू विरुद्ध झालेल्या दोन सभांचा ठराव व श्रीशंकराचार्यांच्या यादीची माहिती माहुलीच्या समस्त ब्रम्हवृंदास देऊन सांगलीकरापेक्षां आपण कमी नाहीं (इ) असें दाखविलें. बाळाजीपंत नातुमात्र ब्रम्हवृंदास पत्रे याचा वगैरे लिहिण्याच्या भानगडीत न पडतां फक्त श्रीशंकराचार्यास पकडीत धरून बसले होते."
(ड) (श्री विद्यानरसिंहभारतीशंकाराचार्यांचे पत्र ब्रम्हवृंद क्षेत्र माहुली यास) परमु है चांद्रसेनीय नसून संकरज आहेत. त्यास वेदकर्माचा अधिकार नाहीं त्याजकडे कोणी वेदोक्त चालवू नये. चालविल्यास तो ब्राह्मण भ्रष्ट समजला जाईल. तसेच सोनारास वेदाचा अधिकार नाही. जिनगर लोकांस जानवी देऊ नये चिंतामणराव पटवर्धन यानी ह्या गोष्टीचा निर्णय करून आम्हास समजाविला तो आम्हास पसंत आहे वगैरे. आश्विन शु १० शके १७४९.
श्री
सिद्धांतविजय, पृ. १०७.
(इ) वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र परशराममाहुली यासी
निलक(ठ) शास्त्री येते व मल्हार श्रोती व दाजी दिक्षीत चौक व कुपाशास्त्री व गोविंदाचार्य आष्टपुत्रे व वामनशास्त्री साठे प्रमुख समस्त ब्राह्मण मुकाम पुणे साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल तागाईत चैत्र शुद्ध द्वादसी पावेतो जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे विशेष पूर्वी शके १७४५ फालगुण शु || १३ शके १७४७ चैत्र येकादशी अशा दोन सभा तुलसीबागेत जाहल्या तेथे सर्वाचे मतें परभूस येदकर्माचा आधिकार नाहीं असे ठरोन सर्वांची संमते जाहली. नंतर ज्याणी परभूपासून द्रव्य घेतले होते त्यापैकी कितेक ब्राह्मणास आनुताप होऊन ज्ञातीस शरण येऊन प्रायश्चित घेऊन लेहून दिल्हे की परभूनी द्रव्य देहून चांद्रसेनीय कार्यस्थास वेदकर्माचा आधिकार आहे आसा शास्त्रार्थ ब्राह्मणापासून लेहून घेतले व चाद्रसेनी कार्यस्थ प्रभु यास वैदिक तीन कर्मचा आधिकार आहे आसा पट करून त्यावर समंते करून घेतली असी समज्यावरून विचार करिता ब्रहदज्याती विवेक हेमाद्री माधव प्रभृति सकल ग्रंथी च्यान्द्रसेनी ज्यात काय लिहिली नाही शुद्रकमलाकर ग्रंथी पद्मपुराणातील म्हणोन वचन लेहून च्यांद्रसेनी कार्यस्थ ज्याती वेगळी लेहून पद्मपुराणातील वचन लेहून त्या जातीस शुद्र साधारण धर्म लिहिले व परभूनी गागाभट याजकडून कायस्थधर्म प्रदीप ग्रंथ करविला त्यात च्यांद्रसेनी कायस्थ प्रभु सोक दक्षण देशात आहेत असे लिहून त्याच ग्रंथी यांद्रसेनीयास पद्मपुराणांतील वचन लेहून वेदोक्त कर्माचा आधिकार नाहीं असें स्पष्ट लिहिले व कल्पीत श्लोक संस्कार करण्यास लिहिले व हरीवंशात व त्याचे टीकेत व विष्णुपुराणांत व त्याचे टीकेत व विष्णु स्मृतीत लिहिले आहे त्यास क्षेत्रिय शत्रु वध्य प्रतिज्ञेची सिद्धी बंध अथवा वध्य क्षेत्रीय ज्यातीस वेदोक्त कर्मापासून चुत केल्याशिवाय होत नाही असे स्पष्ट लिहिले आहे.
त्याजवरून श्री भार्गवराम याची क्षत्रियप्रतिज्ञेची सिधी वध न करिता वेदोक्त कर्मछदावाचून होत नाही इत्यादिप्रमाणे करून चांद्रसेनास वेदोक्त कर्माचा आधिकार नाहीं असे शके १७४८ मार्गसिर्षमासी राजश्री भाऊ दातार याचे वाडयात व मोतीबागेत तेथे दोन सभा होऊन ज्याणी परभूजवळच्यांद्रसेनीयास वेदोक्त तीन कर्माचा अधिकार आहे असे लिहून दिल्हे त्यास हे वर्तमान शास्त्रीय विच्यारणा होऊन सर्वांचे मते ठरोन ज्यानी परभूस लेहून दिल्हे होते त्याचे सर्वाचे समंते प्रभु च्यांद्रसेनियास वेदोक्त कर्माचा आधिकार नाही असे जाले व जगदुरु श्री शंकराचार्य याणी याच आन्वये समस्त ब्राह्मणाची नावे पत्रे करून दिल्ही असे हा म। आपणास कळावा सर्वांनी आपआपले धर्मात शरण असावे व जो आमार्गे चालेल त्यास सिक्षा आसावी परभु प्रकरणी जागोजाग क्षेत्रस्थाची वगैरे समते व कागद पत्र सकल वेदशास्त्रसंपन्न राजश्री दाजी दिक्षीत वोक याजवळ समस्ताचे विच्यारे आहेत तेथे ज्यास प्रयोजन लागेल त्याणी पाहावे हे विनंती.
स. विजय प. शि. ६ पत्र ४.
सुप्रसिद्ध चित्पावन आयागो राजमान्य बाळाजीपंत नातू यांनी जगदुरु श्रीशंकराचार्य यांचा जो अश्रुतपूर्व सन्मान आणि न भूतो न भविष्यति अशी बरदास्त ठेविली होती. त्याचें वर्णन आम्ही पामरानें कायट करावें ? तें खुद्द श्रीशंकराचार्यांच्याच शब्दांनी वाचकांपुढें ठेवलेले बरे. ईस्ट इंडिया कुंकणीच्या धारवाडच्या सुभ्यानें, म्हणजे कलेक्टरानें, जगदुरूंच्या मार्गे लागलेल्या नातूरूप बहिरीससाण्याच्या शक्तीला पायबंद लावल्यावर हातांत गीता घेऊन श्रींनी जे खऱ्या कबुलीजबाबाचें पत्र लिहून दिलें त्याची नकल ता. ९ माहे नवंबर सन १९०३ च्या `सुधारक` पत्रांत प्रसिद्ध झाली होती. त्याबद्दल संपादकानें खालीलप्रमाणे उदार काढले होते :--
श्री शंकराचार्याची तारांबळ
सातारचे छत्रपती राजे प्रतापसिंह महाराज राज्यपदभ्रष्ट झाल्यानंतर त्यांची दाद लावण्यासाठी म्हणून रा. रंगो (रोहिडेश्वरासमक्ष, दादोजी कोंडदेवाला साक्ष ठेवून आद्य श्री शिवछत्रपति महाराजांनी ज्या कायस्थ प्रभूशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्या दादजी नरस प्रभूचे रंगो बापूजी हे पांचवे खास वंशज होत. ज्या दादजी नरस प्रभूने शिवाजीशी स्वराज्यस्थापनेची आणभाक वाहिली, त्याच्याच खास वंशजावर छत्रपतीच्या गादीच्या चिरस्थाईत्वाकरिता म्हणजे हिंदवी स्वराज्याकरिता विलायतेच्या पार्लमेंटपुढे झगडण्याचा आलेला योग कितीहि खेदकारक असला तरी त्याहि योगांत कुतुहल उत्पन्न करण्याचे सामर्थ्य खास आहे. रंगो बापूजीचे चरित्र आणि त्यानें विलायतेंत सतत सात आठ वर्षे छत्रपतीचे प्रतिनिधी व वकील या नात्याने बजावलेली स्वार्थत्यागपरिपूर्ण अद्भूत कामगिरी यांचा इतिहास अत्यंत मनोरम, उपदेशपूर्ण आणि महाराष्ट्राच्या निसर्गजात राष्ट्रीय तडफीचा द्योतक असा आहे. विलायतेतल्या पार्लमेंटपुढे या कायस्थ प्रभुवीराने जी व्याख्याने दिली व स्वतः एक छोटेखानी इंग्रजी वर्तमानपत्र चालवून छत्रपतींच्या पदच्युततेच्या अन्यायाबद्दल तेथील जें लोकमत जागृत केलें, त्याबद्दलची पुस्तकें व इतर लेख पाहिलें की मन आश्चर्याने थक्क होऊन जाते, या वक्त्याच्या स्पष्टोक्तीपूर्ण वक्तृत्वाने वाचकांचे हृदय हादरूं लागतें आणि त्याने पार्लमेंटपुढे मांडलेल्या अस्सल लेखी दांडगा पुरावा पाहून रंगो बापूजीच्या विद्वत्तेबद्दल, कळकळीबद्दल व छत्रपतींच्या ठायी असलेला अनन्य भक्तीबद्दल त्याचे धन्यवाद गावे तितके थोडे असे वाटू लागतें. आम्ही यथावकाश या प्रभूवीरांचे साग्र चरित्र प्रसिद्ध करणार आहोत; त्यावरून हिंदवी स्वराज्याचे डेप्यूटेशन विलायतेंत नेण्याचा आद्यमान चां. का. प्रभू समाजाचा आहे, हे ठसठशीत रीतीनें सिद्ध होईल.)
बापुजी नांवाचे एक गृहस्थ विलायतेस गेले होते. तेथे त्यांनी आपल्या धन्याची गादी त्यास परत मिळावी म्हणून पराकाष्ठेचे प्रयत्न केले आणि सरकार दरबारी केलेली मेहनत फुकट गेल्यावर निराश न होता इंग्रजी भाषा शिकून विलायतेंत लोकमत जागृत करण्याकरितां व्याख्याने देण्याचा क्रमही यांनी सुरू केला होता. विलायतेंत आपण कोणती कामे केली याबद्दलची सविस्तर हकिकत आपल्या देशांत आपल्या धन्यास कळावी म्हणून या स्वामीनिष्ठ व उद्योगी गृहस्थाने आपल्या प्रयत्नांची कच्ची हकिकत स्वहस्तें मराठी भाषेत मोडी लिपीत विलायतेंतच शिळाछापाने छापून त्याची पुस्तकें बांधवून इकडे रवाना केली. पुण्यातील कित्येक जबरदस्त व दुराग्रही ब्राह्मणांच्या हट्टामुळे जगद्गुरुस आपला अधिकार आपले मत व सत्यनिष्ठा कशी गुंडाळून बाजूस ठेवावी लागली से दृष्टोत्पत्तीस येणार आहे. या ब्राह्मणांचे वंशज हल्ली पुण्यांत हयात आहेत. त्याना आपल्या पूर्वजांनी धर्मगुरूंशी केलेली दंडेली व त्याची इतर कृष्णकृत्ये लोकांच्या आज नजरेस यावी हे आवडणार नाहीं. इतका स्पष्टोक्तीचा प्रस्ताव करून सुधारकाच्या संपादकाने जगदुरूंचें आज्ञापत्र त्यांतील कित्येक महत्वाच्या विशेष नामांच्या ठिकाणी .. .." अशी टिंबे देऊन प्रसिद्ध केलें, याबद्दल या पुस्तकांत इतक्या उशीरानेंच का होईना, पण त्या संपादकाचे आम्हीं जाहीर रीतीनें आभार मानतो.
स्थानिक संपादकीय जबाबदारी व साप्ताहिक पत्रांत नेहमीच भासणारी जागेची उणीव, या दोन गोष्टी लक्षांत घेतां, सदहूं पत्र शब्द सोडलेल्या धड्याप्रमाणे छापण्यांतहि संपादकानें चां. का. प्रभू ज्ञातीवर एक उपकारच केला, असें म्हटलें पाहिजे. परंतु पुण्यास " Ethnographical Notes " च्या चां. का. प्रभू संपादकानें याच पत्राचा उतारा आपल्या महत्वाच्या पुस्तकांत पुनर्मुद्रीत करतांना स्वतः जवळ या पत्राची समग्र नकल रंगो बापुजीच्या मोडी पुस्तकांत असतांनाहि टिंबांच्या पुरख्याखाली लपून बसलेल्या महत्वाच्या शब्दांना आणि वाक्यसमुच्यांना मुळींच वर डोके न काढू देण्याची इतकी काळजी कां घ्यावी याचा आम्हांला उलगडा होत नाहीं. असली अत्यंत महत्वाची आज्ञापत्रेसुद्धां `समग्र` न छापण्यांत ज्यांच्या विनयाचा अतिरेक होतो, त्यांच्या हातून इतिहासाची सेवा काय होणार हैं दिसतच आहे. असो. ऐतिहासिक सत्यनिरूपणाच्या दृष्टीने आम्हांला मात्र त्या विशेष नामांचा तिळमात्र मुलाजा राखतां येत नाहीं किंवा टिंबांच्या आड लपलेल्या बन्याच महत्वाच्या मजकुराला अतःपर तसेंच अंधारांत दडवून ठेवतां येत नाही याबद्दल फार फार दिलगिरी वाटते. सदहू पत्र येणें प्रमाणे :--
श्रीशंकर
मठाचा शिक्का
श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमच्छंकराचार्यान्दय संजाताभिनव श्री विद्याशंकर भारती स्वामी करकंजोद्भव श्री विद्यानरसिंह भारतीकृत नारायेण स्मरणानि
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृंद क्षेत्रस्थ वगैरे वास्तव्य प्रभृति प्रांतानिहाय यांस आज्ञा केली ऐसीजे - चांद्रसेनीय कायस्थ प्रभु या ज्ञातीचे मंडलीशी आति दीर्घद्वेषी रा. चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन व बाळाजीपंत नातु व निळकंठशास्त्री थते वगैरे ब्राह्मण यांनी शास्त्र व ग्रंथसंमतीखेरीज ग्रामण्य करून पुणे मुक्कामी आम्हांपासून चांद्रसेनीय प्रभु मंडळीचे धर्म व कर्म उच्छेदाविसी पत्रे घेतली. तेवेळी आम्ही मठाचे संस्थानास स्वास्थ्य आहे त्यास उपद्रव होईल या भीतिस्तव दिल्ही. परंतु ते समयी परस्परे उभय पक्षीचे ब्राह्मणात तड पडून शास्त्रसंमति ग्रंथानुधारें निर्मतारपण श्रीनारायणस्मरोन वास्तविक पाहतो चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांस अनादि वेदकर्मे करण्यास अधिकार आहे. त्याप्रमाणेच वेदशास्त्रसंपन्न रा. राघवाचार्य यास आम्ही पत्र कार्तिक शु। १० शके १७४८ व्ययनाम संवत्सरी लिहिले व प्रभुमंडळीत रा. बळवंतराव चिटणीस व विठ्ठलराव देवाजी वगैरे यांचे नावेही पत्र दिल्हे वगैरे मजकुर चिंतामणराव पटवर्धन थ बाळाजीपंत मानुस कळवून या उभयतांची मर्जी आम्हावर फार रुष्ट होऊन बोलणे घातले आणि आम्हांस पेचात आणण्याबद्दल नानाप्रकारची तुफानें उत्पन्न करून जर घालू लागले. तेव्हां आम्ही लाच्यार होऊन संस्थानचे संरक्षणाबद्दल आशा धरून उभयतांचे बोलणे कबूल करून म्हणती तें करावें किया देह समाप्त करावा असेंच प्राप्त जाहलें. ते समयी चितामणराव यांनी मनास आलें तसें कल्पित शास्त्रविरहित चांद्रसेनीय प्रमुज्ञातीस वेदकर्मे उच्छद आणि बाधक सारांशाच्या यादी य पत्रे आम्हांपासून आश्विन शु || १० शके १७४९ सर्वजित नामसंवत्सरात आमचे सिके मोर्तब व स्वदस्तुरचं निशाणानिशी पुरी करून घेतली, त्यांतील हांसील भाव चिंतामणराव याणी विनती केली की ही चौकसी केली ती युक्त किंवा सप्रमाण याचा विचार स्वामीनी करून सदर्तु सारांशान्वये चालण्याविसी श्रीकासी क्षेत्रादि क्षेत्रस्थ व पुण्य ग्रामादि ग्रामस्थ ब्राह्मण वगैरे यांसी पत्र द्यावयाविसी आज्ञा व्हावी. म्हणोन त्याजवरून सदहुंचा विचार पाहता चिंतामणराव याणी चौकशी ग्रंथावरून मागील पाठाची केली ते यथायोग्य सप्रमाण असे जाहले. सदहुं सारांशांत चौकशी केल्याचा प्रकार कसकसे लिहिले ते वगैरे सर्वांस कळावे सारांशा अन्वये सर्व ब्राह्मणांनी चालावे याजकरिता सारांश बार करून निर्णयाची याद केली त्यातील हांसील. चांद्रसेनीय यास वेदकर्माचा अधिकार नाही व त्या ज्ञातीची उपलब्धीही नाही. परमु हे चांद्रसेनी नव्हेत. संकर कायस्थ जात्योद्भव यांसहि वेदकर्माचा अधिकार नाही म्हणोन ज्या यास आथवा चांद्रसेनी म्हणोन त्यांस वेदोक्तकर्मे करण्यादिसी सर्वथा अनुमोदन देऊ नये. जर करिता कोणी अनुमोदन देईल किंवा त्यांचे घरी वेदोक्त कर्मे करील किंवा करवील तो वेदबाह्य श्रीदेवाचा व मठाचा व ब्राह्मणांचा अपराधी दंडास योग्य वगैरे कुच्द्ये तर्कटी अनन्वित मजकुराची पत्रे चिंतामणराव याणें आपली प्रौढी मोठेपणा जनांत दिसण्यास निमित्यास जागा करून आमचें नांवांनी त्यांनीच लिहून जागोजागी पाठविली. त्या सारांशाचे यादींत छत्रपति यांची आमर्यादा करून याचा मगदूर नसता मगरूरीनें भोसलेवंशावतंस श्रीशंभूराजाचा पुत्र श्री शाहूराजा सातारा राजधानी. परंतु अनादी सांप्रदाय पाहतां छत्रपति सरकारास क्षेत्रीयकुलावतंस श्रीराजा म्हणोन क्षेत्रादि ब्राह्मण शास्त्री पंडीत व अष्टप्रधान वगैरे सुद्धा पूर्वीपासून हल्लीपर्यंत लिहीत आले. चिंतामणराव याचे मनी क्षेत्री बुढाले. परंतु शास्त्रग्रंथ पाहता क्षेत्रिय ज्ञाति आहे.
दुसरे पत्रांत पहा. श्रीमंताचे ठिकाणी आपण विद्यमानी आहों हे अविचारी चितामणरावच लिहितात. परंतु छत्रपतीस असें गैरशिस्त लिहिणें पेशवे यांचा देखील मगदूर नहुता व पेशवे याची योग्यता जनजाहीर आहे. या मतिमंदास कशी शोभेल? हा केवळ अज्ञपणा व हे गृहस्थ शास्त्री अथवा पंडितही नव्हेत. पटवर्धन यांचे तांतील निळकंठ शास्त्री थत्ते यांस आम्ही श्रीची शफत घालून पुणे मुकामीच मनोभाव सफाबद्दल विचारले, तेव्हां त्यानी सांगितलें । कीं चांद्रसेनीय प्रभुज्ञातीस वेदकर्म अधिकार ग्रंथग्रंथ पाहता आहे. परंतु बाळाजीपंत दादा नातू व चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांचा आग्रह, सबब ते म्हणतील त्याप्रमाणे मला करणे प्राप्त व स्वामीनींही उभयतांचे मनसमजुतीप्रमाणे तूर्त करावें यांत चांगलें आहे. परंतु आम्ही थत्ते यांस विचारिलें की तुम्ही चांद्रसेनीय प्रभुकडे शास्त्रार्थ पूर्वी लिहून दिले हे खरे किंवा खोटें हेंच सत्य सांगावें, तेव्हा घशास्त्री यांणी उत्तर केलें की है बजिन्नस चांद्रसेनीयप्रभु यांस वेदकर्म अधिकार ग्रंथानरूप आहे म्हणोन मी पत्र लिहिलें तें खरें आहे. नंतर आम्ही उत्तर केले की प्रभुज्ञातीस वेदकर्माचा अधिकार आहे याप्रमाणेच आम्हीही जाणतो. तेव्हां आम्ही या ज्ञातीचे वेदकर्माचा उच्छेद कसा करावा? नंतर वार केले की प्रभुज्ञातीचे जाजती धर्म चाढवून शेर होऊ देऊ नयेत अशी उभयतांची म्हणणी वगेरे कारण तूर्त अनेक प्रकारची आहेत. सबब गानरूप चालावे. आपण व आम्ही आज प्रभुझाती बुडाली म्हणाले म्हणून ही ज्ञाति उच्छेद होऊन बुडती असें तर कधीच होत नाही. परंतु आज उभयतांचे न ऐकावें तरी स्वामीस व मला फार अडचणी येतील सबब त्यांचे म्हणण्याप्रमाणे जरब ठेवून तूर्त लोटालोट करावी. मग पुढे पाहतां येईल. अर्शी उत्तरं प्रत्योत्तरे निलकंठशास्त्री यांसी आमची श्रीचे पुजेसंन्निध शपथ प्रमाणांनी गुप्त बोलणी जाहली. हे शास्त्री नातू व पटवर्धन यांचे तडांतील असता गुप्त आम्हांकडे बोलतात. प्रभूस वेदकर्म अधिकार नाहीं आणि हेच शास्त्री त्याजकडे सांगतात चांद्रसेनी प्रभूस वैदकमें अधिकार आहे आणि हेच शास्त्री त्याजकडे सांगतात चांद्रसेनी प्रभूस वेदकर्म अधिकार नाहीं आणि थत्ते याजपासून हा कलह निर्माण जाहला. हे दुलग बोलून भितात व आम्हांसही भयंकर प्रकार सांगतात. त्याजमुळे आम्हीही भयाभीत होऊन स्तब्ध जाहलों. त्यासमयी आम्हापासून पत्रे घेऊन चांद्रसेनीय प्रभुज्ञातीकडील वेदकर्मे उच्छेदक पत्र घेऊन धर्मशास्त्र ग्रंथास बाध आणून आम्हांस ज्ञातिउच्छेदाचे दोषांत घातले. दुसरे ग्रंथात नवीन कल्पित श्लोक कोटि रचून लिहून कालांतरी त्या ग्रंथासही खोटेपणा आणिला. असे प्रकारे यादी सारांश व पत्रे लिहिली. हे कागद ब्राह्मण शास्त्री पंडित विद्वान क्षेत्रक्षेत्राचे ठायी पाहून ही स्वामीची पत्रे म्हणोन हसतील हादुरलौकिक संस्थानचा केला. परंतु हे सारांष व पत्र ही जे पाहतील ते साफ समजतील संस्थानचे लिहिण्याचे सांप्रदायाप्रमाणें नाहींत. असे अनेक प्रकारचे पेचांत घातलें. त्याजवरून चित्तास त्रास उत्पन्न जाहला की हा देह विसर्जन करावा, या दिलगिरींत होतो. तो इतक्यांत आणखी अनाहूत संकट प्राप्त जाहलें. प्रथम ज्यावेळी आम्ही नातू व पटवर्धन यांचे म्हणण्याप्रमाणे प्रभु ज्ञातीचे धर्म वैदिककर्मउच्छेदक तर्कटी साराष व पत्रे देण्याचे कबूल केले नहुते त्यासंधीत ब्राह्मणापासून गोव्याचें तुफान आम्हांस पेचात आणण्याबद्दल उभे करून चिंतामणरावच आम्हास खबर देतात. परंतु हा मजकूर आम्हांस माहीत नाहीं म्हणोन सांगितले. परंतु आम्ही बहुत भयाभीत होऊन बालाजीपंत मातु व चिंतामणराव पटवर्धन यांचे बोलणे कबूल करून सारांशाच्या यादी व पत्रे स्थान जी लिहिली ती गैरशिस्त असतां कांही न बोलता पुरी करून दिल्ही, परंतु आम्हांस प्रथम जरब पसून या उभयतांचे म्हणण्याप्रमाणे आम्ही करण्यास आम्ही अनकूल राहून करावे म्हणोन हे तरकट उमे बोले होते. तो मजकूर कोण धारवाड सुभ्याचे साहेबास कळवून त्यांणी आमची चौकशी केली. त्यास्तव आम्हास गुप्त येकट्यास साहेबांनी नेऊन श्रीची शफथ व गीता हातां म्हणोन सत्ये खरे असेल ते सांगावें की गोव्यास तुमचे तर्फेनी सातारचे राज्य कोणी वगैरे गेली व आली किंवा कसा मजकूर आहे तो खरा सांगावा, तुम्ही वेदवा गोसावी आहा. खरे तेंच बोलावे, तेंव्हा आम्ही श्रीगीतेची पोथी हातांत घेऊन श्रीनारायणाचे शफतफुरसर सांगितले की हे सारे खोटे तुफान आम्हावर उभे केले.
साहेब बोलले तुम्ही ब्राम्हणांचे गुरु तुम्हांवर तुफान उभे करण्याची सबब काय ती सांगावी. तेव्हां आम्ही उत्तर केले की पुणे वगैरे ठिकाणचे ब्राम्हणांनी बळवंतराव चिटणीस सातारकर व विठ्ठलराव देवाजी बडोदेकर यांचा द्वेष करून प्रभु ज्ञातीचे धर्माकर्मात तंटा उत्पन्न करून ग्रामण्य केले. त्यांत मुख्य चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातू यांच्या म्हणण्यात प्रभू ज्ञातीची कर्मे बंद करावी. परंतु या उभयतांचे द्वेषाचे बोलणे सबब आम्ही प्रथम कबूल केलें नाहीं. तेव्हां आम्हावर असी तुफानें उभी केली.
ते वेळी आम्ही लाचार होऊन संस्थानमठास इनामगांव वगैरे आहे हे जप्त होईल या भयामुळे पटवर्धन नातूनी जे सांगितले त्याप्रमाणे कबूल करून पत्रे व यादी दिल्या. त्या गैरशिस्त असतां आम्ही काही न बोलता दिल्या. असा मजकूर जाहला असता साहेब गोवा आणि सातारचे वगैरे मजकुराची सबब विचारितात. परंतु हा तुफानाचा मजकूर आम्हास काही माहीत नाही आणि येविसी साहेबानी पुरी चौकशी करावी मी सन्यासी गोसावी. मला या कामाची गरज काय याप्रमाणे श्रीची शफथ करून सांगितले, नंतर साहेबांनी सांगितलें प्रभूचे जातीचे खटल्याचा मजकूर आम्ही ऐकत आहो आणि तुम्हीहि कोणास भेऊ नये. पेशजीप्रमाणे तुमचे मठाकडे गांवखेडी चालतील. तुम्ही सारे ब्राम्हणांचे गुरु असत तुम्हांस बुडवण्याबद्दल है काम उभे केले येविसी आम्ही चौकशी केली. व तुम्हीही साफ सांगितली. परंतु या कामांत एक दोन खोटे तरकटी माणसे आहेत यांजवर स्वामीनी भरंसा ठेऊ नये. आम्ही उत्तर केले की खोट्याचा सहवास आम्ही करणार नाही. साहेंबानी उत्तर केले की ठीक सांगून आम्हांस निरोप दिला. हे ही अरिष्ट ईश्वरानी दूर केलें. तो क्षेत्रस्थ ब्राम्हण व शास्त्री पंडीत कितेक दर्शनास येऊन विनंती केली की चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन सांगलीकर यांनी स्वामीचे नांवें पत्रे व सारांषाच्या यादीवर स्वामीचे निशाण व सिकेमोर्तबानसी करून घेऊन जागोजाग पाठविली त्यांत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे धर्मकर्माविसी वगैरे फार दूषणें ठेऊन विथर (?) विस्तारे शास्त्रसंमतीवितरिक्त मनमानसे लिहिलें आहे त्यास हे प्रकार खरे किंवा खोटे हें स्वामीनी पुरा विचार करून न पाहता हे कागद दिल्हे. परंतु स्वामीचे नांव व मठाचे नांवाचा दुरलौकीक फार पटवर्धन याच्या लिहिण्यानी जाहला हे सत्य किंवा असत्य वाटत असल्यास स्वामीनी श्रीमान् बसून गीता गंगाजळीसह बिल्वपत्रे व तुळसीपत्रे घेऊन निर्भारपणे निर्बंध ग्रंथ पाहून सांगावे अथवा निर्भत्र पापमीती जाणणारे शास्त्रीपंडित यांस बसवून निबंध ग्रंथपाहून जे शास्त्रनुमते ठरले त्याप्रमाणे उलट पत्रे ल्याहावी.
त्याजवरून स्वामी कृपाळू होऊन निर्भारपणे श्रीसन्निध्य बसून गागाभटी व गोविंदमटी व कमलाकरकृत शूद्रकमलाकर, शीतीविवेक व स्कंदपुराणांतरंगत शयद्रिखंडात्मक रेणुकामहात्म वगैरे निबंधग्रंथ सत्य स्मरीन पाहतां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यास वैदिककर्माधिकार सत्य आहे. क्षेत्रीयान्वय चांद्रसेनीय प्रभु यांस दालभ्य ऋषीने क्षेत्रियांतकर भार्गवरामाचे दुराग्रहास्तव शस्त्रधारणरूप क्षेत्रधर्म टांकऊन दालभ्य ऋषीनी पालण करून वैदिक कर्मेकरून उपनयनादि संस्कार करून पुढे परंपरागत चालत आले. प्रभुज्ञातीचे संरक्षण दालभ्य ऋषिनी केले सबब प्रभुज्ञातीस दालभ्य गोत्रउच्चार चालत आहे. परंतु ग्रंथ ग्रंथावरून पुरा विचार करून पाहता प्रभुज्ञातीत गोत्रे निरनिराली आहेत. असे असता चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन याणी आती द्वेषबुद्धीने कुबुधे करून या तरकटी सारांशाचे यादीत लिहिले की परपुरुषापासून उत्पन्न जाहला जो पुत्र तो परभु कायस्थ ते दालभ्य गोत्रेकरून परस्परे विवाह करितात येक गोत्र म्हणोन लिहिले हैं सर्वथा खोटे हे शास्त्र व ग्रंथसंमतीखेरीज विचार न करिता असे जे विपरीत जागोजागी खोटे लिहून विद्यमान चिंतामणराव याणी आपले घालून आमचे नांवे जी पत्रे व यादी चांद्रसेनीय प्रभुज्ञातीचे धमवेर्दकर्म उच्छेदाविसी आम्हापासून घेऊन जागोजागी जी पाठविली ती दरोबस्त रद्द करून हे पत्र लिहिले आहे. तरी समस्त ब्राम्हण शास्त्री पंडीत व धर्माधिकारी व जोसी उपाध्ये क्षेत्र क्षेत्रस्थानी व ग्रहस्थांनी व चांद्रसेनीय समस्त ज्ञातीनी व राज्यअधिकारी असतील त्यानी वगैरे हरकोणी त्या यादी व पत्रे येकंदर मजुर न धरितां चांद्रसेनीय प्रभुज्ञातीतील वेद कर्माधिकार आहे हे त्रिवाच्य राज्ये श्री देवी वसून पत्र लिहून सर्वास कलावयाकरितां पाठविले आहे. तरी प्रत वैदिक कर्मे परंपरागत चालवीत जाणे, दिकत न करणे, विशेष काय लिहिणे रा. मिती कार्तिक शु।। ९ शके १७५२ विकृतिनाम संवत्सरे महानुशासनं वरिवर्ति. इत्यलं.
चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातु यांच्या ह्या प्रकारच्या लीला चालल्या असल्यामुळे विणीप्रभृती प्रभुमंडळीची खात्री होऊन चुकली की आतां श्रीशंकराचार्य किंवा ब्राह्मण यांच्यावर भरंवसा ठेऊन बसवण्यांत कांही अर्थ नाहीं. आपले संस्कार वेदमत्रांनी स्वतःच करूं लागल्याशिवाय निभाव नाही. असे निश्चित करून त्या बाबतीत छत्रपति सरकारकडे चिटणीसांनी अर्ज दिला, त्याचें आलेले उत्तर येणेप्रमाणे :--
यादी सरकार श्रीमन्माहाराज राजश्री छत्रपति राजमंडळ हूजूर सातारा सो समान अशरीन मयातन व आलफ राजश्री बळवंतराव मल्हार प्रमुख समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभु याणी हूजूर आजी दिल्ही की ब्राह्मणाने पुण्यांत वगैरे ग्रामण्य करून पूर्वीपासोन वेदोक्त कर्मे आजपर्यंत करीत आले त्याअन्वयें न करितां कोणी ब्राम्हणांनी आमचे ज्ञातीत येऊ नये व कांही कर्मे करू नये असा तट केला आहे. तेव्हां आम्हास गर्भादानापासून आमरणांत कर्मे सारी करणे येतात. ब्राम्हण आले असता आम्हाकडून मनाई नाही परंतु न आल्यास आम्हास सारी वेदोक्त कर्मकर्मे चालवणे येतात.
येविसी काय आज्ञा ती जाहली पाहिजे. म्हणोन ऐसी यास पुर्ववतप्रो ब्राह्मण येऊन न करीत तरी ज्ञातिधर्मात ज्याचे ते मुख्त्यार, सरकार दखल करीत नाहीत. त्यांस तुम्ही ब्राह्मणाशिवाय आपले ज्ञातीचा बंदोबस्त कर्माविसी ठेऊन चालविले असतां मनाई व मदत नाहीं. कुंपणी सरकारांतूनहि या सरकारांत सदरहू प्रो जबाब आला आहे. छ०३० मोहरम मु।। तारीख २४ आगष्ट सन १८२७ इसवी. मोर्तब असे.
महाराजांयें हैं आश्वासन गिळतां प्रभु-मंडळीने शके १७४९ साली सातान्यास सभा भरवून ठराव मोठा महत्त्वाचा आहे. तो साताराच्या प्रभुमंडळीने ठिकठिकाणच्या पाठविला होता. त्याची साग्र नकल येणेंप्रमाणे :--
यादी समस्त चांद्रसेनीय कायस्थप्रभु शके १७४९ सर्वजितनामसंवत्सरे-आमचे प्रातीत ब्राह्मण आजपर्यंत वेदोक्तकर्म शोडस संस्कारयुक्त हस्त श्रायादि वगैरे त्रयकर्माधिकारपणे करीत आले असे असून वारंवार तंटेबखेडे करावे आणि दुरभाषणे मानहानी उपहास कराबी आपणच येऊन कर्मे करावी गोड बोलावे आर्जव कराये पुन्हा त्यांनी तंट्यात सिरोन तट करोन वल्गना करावा जयकर्मास अधिकार आहे म्हणावे सवेच नाही हे तंट्यास आल्यावर म्हणाये जैसी तऱ्हा करावी पेशवे बालाजी बाजीराव यांची पत्रे व राजपत्रे वगैरे प्रभु म्हणेज पुरवीधी असोन परमु हे चालविले हाली परभ्यापरयंत यादीत लिहिले आहे. परंतु कासी क्षेत्राची पत्रे जैसी (८०) आसामी ब्राह्मण मंडळीचे समताचे व पुढेही बाजीराव कारकिदींपरयंत पूर्वापार चालवावे हे सिक्यानिसी सनदा असे असून पुन्हां पुण्यात आलिकडे बखेडा करून विणा उपहास व मनस्वी दूरभाषणे करून सभा तुलसी बागेत वगैरे ठिकाणी केल्या. यात आम्ही मनुष आवरु आहे की नाही हा विचार न करिता जावरचा जीव सतका (२) आहे हे मनात न आणता हाजारोनी बडबड करून क्षेत्रोक्षेत्री पत्रे पाठविली आणि कर्म चालण्यास आडचणी पाडली. श्रीशंकराचार्य ब्राह्मणांचे स्वामी त्याणी ही यादी व राघवाचार्य यास पत्र सिकेमोर्तबानसी दिले. त्यात निखालस क्रुम बखेडा केला हे उध्धार आणीन तीन कर्माचा वगैरे अधिकार लिहून दिला असता समेट करून पोटांसं धरोन समारोप करतील हा मार्ग बहुत पाहिला, सेवट महाबळेश्वरी बखेड़ा तीर्थविधी आध्यास पाडला. आपणास चालवून करणे प्राप्त आले व निसीक कळले. दिवसेदिवस उपमर्द करितात. व सेवटावर द्वेषबुद्धीनें निकर्ष करून ज्ञातच बुडवावी हे आरंभिले त्याअर्थी आपले तीन कर्मा पोरच गर्भाधान आष्टमांगल्यादि अग्नी सिद्ध करितात तोच अग्नि स्मार्थ हा पुढे चालावा परंतु खटपट होत नाही यामुळे करीत न आले परंतु हाली करावा व श्राधी आपण आपले बसावे म्हणजे तरी पोटासी धरतील तह करून चालते तीन कर्म वेदोक्त शोडषसंस्कार हास्तश्राध्यादि बसून करितात ते करतील कटकटीचा समारोप करतील
परंतु ते न करिता हाली सभा करून इकडे ब्राह्मण आले व्यास मारहाण करून बहिष्कार घातला व पुढे कोणी ब्राह्मणांनी अनुष्ठानादि जाऊन करू नये करतील त्यास बहिष्कार पडेल वगैरे आन्योन्य भाषणे वगैरे केली त्यास ब्राह्मण आपलेहून येणे बंद केले असता आमची कर्म बंद होतात ती आम्हास मुखत्यारपणे आपले ज्ञातीचा बंदोबस्त ब्राह्मणाशिवाय येऊन करणे आले ते तीन कर्मे आहेत ती तजवीज तीन कर्मे मिळतात व देतात यात तोटा नाही व पुण्यात य हाली ब्राह्मणांची वागणेच फजेती व विटंबणा करितात आमचे काय जाते हे समजोन आहोत पुरवी पासोन कर्मे वेदोक्त शोडप संस्कार आध्यादि करीत आलो असे चालू करून बखेडा कोणीही करणार नाही करील तो बहिष्कृत म्हणोन क्षेत्रो क्षेत्राची समते महाराज व कुंपनी सरकार पेट्यासुद्धां व पुण्यांत तंटे करणार याचे संमताने सिकादि होऊन वर महाराजाचा सिका करून दिला म्हणजे आम्ही नवीन ज्याजती आरंभिले काय असेल ते समारोप करावा ते न करिता ते करीत आहेतच, व आमची गरज सोडोन आमचीच फजिती आरंभून दिकार करितात त्या अर्थी आम्हांसही त्याची गरज नाही केले हे व आणखी पाहिजे ते ब्राह्मणासिवाय आपले ज्ञातीत मुख्त्यारपणे पाहिजे ते चालवू व कर्म ज्ञातीची चालवणे तेव्हा सहजात साहा कर्मे करणे येतात ती करू आमचे ज्ञातीत ब्राह्मणानी दखल करणे गरज नाही. आम्हास मात्र म्हणतात हे नवीन करतात ब्राह्मण आपले कर्म सोडून दुसरियाचे करितात परंतु ब्राह्मण ज्ञाती सर्वास मान्य व मायपोट सर्वांचे समाधान ठेवून वाजवी चालवावे ते न करिता आपण सर्वांची कर्म करितात तीन वर्णाची कर्मे सारी आपण आपला धर्म सोडून करितात क्षत्रियांचे कर्म शस्त्रधारण वगैरे `करितात व आम्हास लेखनवृत्ती भार्गव रामानी शस्त्र सोडवून उपजीविकेस दिले ते आपण चालवून आमची उपजीविका बुडवीत चालले.
वैशाची कमे सेतकी उदीम याणीपणाची दुकानें ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास हेच घालून व व्याज बटा वगैरे ते आपण करितात व शुद्रांचे कर्मसुद्धा करून सिपायत शुद्रासारखी पागोटी बांधून प्यादेगिरी वगैरे नीच कर्मे पतकरून करावयाची कोणास उपजीविकेस कुटुंब संरक्षणास जागा न ठेविता आपण करावे व जमीन वगैरे इनाम घेतेसमई भट म्हणवून दानपत्र वंशपरंपरेचे करून घ्यावे रोजगार व्यापाराचा करावा भट म्हटले असता रागास यावे पंत व दरखदार म्हणविले पाहिजे तीन ज्ञाती व इतर सुद्धा भिकेस लावून अतिनीच कसविणीस लावण्या सिकवून मागे सारंग्या वाजवाव्या गावे अशा अनेक तन्हा काय म्हणून उचाराव्या असे करण्याचा आक व बहिष्कार करून ब्राह्मणांनी कर्म जे शास्त्रांत आहे ते सोडून कोणी करू नये हे न करिता म्हणतात जे ब्राह्मणांनी आग्नि सिद्ध केला तो माघारी घ्यावा मग तुम्हांस पाहिजे तरी आठा दिवसांनी करावे म्हणजे त्यास मुंजीत यज्ञोपवीत व लग्ने करून स्त्रिया करून ब्राह्मणानीच याज्ञिक करून दिल्या असे अनेक काय म्हणून परत यावे आम्ही तरी ब्राह्मणांचे उतीर्ण काय व्हावे व हे याजवर उत्तरास लाच्यारहे मनात न आणता गरीब आम्हासारखे अनेक सर्व ज्ञातीस हरतऱ्हेने दाबावे येकामागे येक लब्यांड लावून उपहास करून आपण सर्व करावे ते बाहेर येऊ नये आमची पाठच घ्यावी असे होते.
लहान तोंडी थोर घास घेउ नये ते फारच बरे वाईट कैले असता त्यास दोष कोणी ठेवावा परंतु मनांत समजोन कराये ते न होता फक्त द्वेषबुद्धीने होते की नाही हे मनापूर्त निर्मछरपणे पाहिले असता दिलात येईल कर्मे बंद जाहली असता ज्याचे ते कसे चालवितील म्हणतात त्यास हा मार्ग काही ज्ञातीत त्याणीच दाखविला आहे की पुणतांब्यास नाहाव्याचे तटानी कसे केले हे विदितच आहे आम्हास मात्र दाबल्यास उपाय काय ज्ञातीतील सदरी सारा मजकूर लिहिला आहे परंतु तो मनात काहीच न आणिता ब्राह्मणानी केले हे फारच आनुचित हे मनात न वागविता दुराग्रह बुद्धीनें विचार न करिता तटच माजवून ब्राह्मणांनी आपल्यास सोडिल्यास आपली कर्मे आपण यथामतीने जसे चालले तसे ब्राह्मणाची गरज न ठेविता चालवावी लागतील त्यास ब्राह्मण जो ब्राह्मणाचा बहिष्कार बेआबाचा दरकार न ठेविता आपली गरज बाळगतील आमच्या बच्याव करु असे न म्हणता निसीकपणे जो घरी येऊन कार्य वगैरे वेदोक्त कर्मे यथासांग चालविल्यास मनाई न करिता येऊ द्यावे परंतु त्याचे हातून कर्म चालवावे.
परंतु ब्राह्मणास भुलथाप देऊन आपले हाते त्याचे कुटुंबघात करून ब्राह्मणास बोलावून आणून त्याचे हाते कर्म करूं नये. आपण आपले कर्म यथा ज्ञाने जसी होतील तसी चालवावी. येविसी सरकारास स्वज्ञातीने विनंती करून आज्ञा घेऊन ब्राह्मणाचा आटक न धरिता पट्कर्मांतील यजन आध्यायन दान ही तीन कर्मे पुरवीपासोन वेदोक्त आपली चालत आली आहेत ती व हाली ब्राह्मण न येण्यामुळे याजन आध्यापन प्रतिग्रह ही तीन कर्मे नवीन करणे प्राप्त जाहली येथून पट् कर्म आपली स्वज्ञातीतच करीत जावी दुसरे अन्य ज्ञातीत जाऊन त्याचे कर्म स्पष्ट चालवू नये व त्याचा प्रतिग्रह घेऊ नये. ही यादी सर्वानुमते ठरली असे. या प्रो जो न वर्तेल तो ज्ञातिबाह्य मि। ज्येष्ठ शु॥। १० इंदुयासर मु॥ शाहुनगर नजिक किले सातारा छ. ९ जिल्काद सु॥ सवा आशरीन गया तैन व आलफ.
असला महत्वाचा ठराव नुसता पसार करूनच चिटणीसप्रमुख सातारकर प्रभु मंडळी स्वस्थ बसली नाहीत. त्यांनी एकेक यादी प्रत्यक्ष आचारणाकरितां ठिकठिकाणच्या ज्ञातिबांधवांस पाठविली. ही यादी येणेंप्रमाणे :--
श्री
राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री समस्त व्याद्रसेनीय कायस्थ प्रभु मंडळी वास्तव्य
तासगाव व मिरज व करवीर शाहापुर बेळगांव स्वामीचे शेवेसी
पोष्य बलवंतराव मल्हार चिटणीस साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल त छ २१ रजब पावेतो येथास्थित जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाये विशेष पेशजी ज्ञातीप्रकरणी महार लिहिलाच आहे त्यास ब्राह्मण मंडळी येक होऊन तट आला आहे त्यास स्वच्छ वेदोग्त कर्मे म्हणून यादी लिहून चालत आल्याप्रमाणे चालऊ जैसी समतांची यादी करून करितात असे होते नाही तर मोडत नाही कोणी ममतेतील वगैरे जेथे येथील स्वामीत्वाची जरब वगैरे तेथे चालत आले तसे चालले उगेच का वाढविता जैसे म्हणून लेपट मारून चालते ते चालवितात परंतु चहूंकडे बखेडा मोडतो जैसे नाही हूल करणे तंटे करणे व ज्याचा जोर जसा जेथे पडेल तेथे तसे दंगा वगैरे तंटे करणार त्यास हाली तट आहेच व पडला आहे त्यास सरकार आनकूल आहे कंपनी सरकारची यादी आली तिची नकल पाठविली आहे. सरकारची यादी तपसीलवार तटा आमुकः कारणेच पडला व वारंवार पडत आला व पडतो त्यास सदरहू कंपनीची यादीचा मार जमेस धरून तुमचे तुम्ही कार्ये वगैरे याज्ञिक विषय करावा चालवावे ब्राह्मणाची गरज ठेऊ नये. मुख्तियारपणे करावे पैसे सिक्यानिशी करून घ्यावे व प्राप्त होणे हा समय आहे. तीन कर्मेस अधिकार आहेच व तीन कर्म आणखी तीही या करण्यानी प्राप्त होऊन शटकर्मे करणे मिळतात व होतात तयास दान देणे व घेणे आपले आपणात करणे येईल वगैरे तुटक जाल्यावरी करावे लागेल त्यास मग त्यास विचार वगैरे नाही हा आपले ज्ञातीचा समाजला पाहिजे. गरज न ठेवता `चालले पाहिजे पुढे ब्राह्मण उमजून वृत्ती व डू लागले सबब चालत आले तसे आम्ही चालवितो असे जाल्यास समताची यादी करून घेऊन त्यावर सरकारचा सिका करून घेऊन करावे परंतु वारंवार झाकून हारवक्त तंटे व लाथा घेणे व लजीत होऊन आडून वागणे नीट नाही आसे वाटते. व सरकार आनुकूल वगैरे प्रसंग वारंवार प्राप्त होतात असे नाही याचा सर्वानी विचार करून सर्वांनी येकसारखे वागले पाहिजे ज्ञातीचे काम येकांनी येक चोदणे करणे न व्हावे जैसे जाले पाहिजे येविसी सर्वांचा विचार पोक्त करून जलद उत्तर यावे ते संमत याद करून उत्तर यावे परंतु फाट घेऊन तुटक करून यासमई साधून ब्राह्मणावाचून आडत नाही याची कर्म करितात आसे होऊन पुढे ते ब्राह्मण आनकुल होऊन जाल्यास पुढे वारंवार तंटा नाही नीट चालले नाहीपेक्षा, त्यांची गरज नाही ये कर्म ब्राम्हणाप्रमाणे आपले ज्ञाती चालतात चालवितात येविसी सरकार हुकमानी जाले असे होऊन होते येकवेल तुटक व्हाये हे फार चांगले आसे इकडील सर्वांचे विचारे ठरते लिहिले आहे. निरंतर पत्र पाठवून संतोषवीत जावे, बहुत काय लिहीणे लोभ कीजे हे विनंती.
आधुनिक बोलघेवड्या कायस्थ प्रभू कॉन्फरन्सवाल्यांप्रमाणे यादी काढूनच चिटणीस स्वस्थ राहिले नाहीत. यादीप्रमाणे व सातारकर मंडळीच्या ठरावाप्रमाणे वागण्यास इतरत्र लोकांना धीर यावा म्हणून त्यांनी स्वतः अग्नीहोत्र घेतलें. चिटणीसांनी (परमूने) अग्नीहोत्र घेतलेले पाहून व ऐकून महाराष्ट्रांतील ब्राह्मणांत हाहाकार उडाला. हिंदुधर्म बुडाला, प्रळयाची वेळ आली असें ब्राह्मण्याभिमान्यांस वाटून त्यांनी महाराजांस अर्जी केली :
चिटणीस यानी अग्नी सिद्ध केला आहे तो काढून टाकावा, असी त्यांची वहिवाट नाही, शिवाजीमहाराज शाहुमहाराज व पेशवे यांचे कारकीर्दीत असी चाल नव्हती. चिटणीस नवी पाडू पाडतात तर त्याचा बंदोबस्त व्हावा. (कार्तिक ।। २ शके १७५०)
त्यावर चिटणीस यांनी महाराजांस कळविलें कीं :--
ब्राह्मण आमचे गर्भादिनादि संस्कार पूर्ववत वेदोक्त चालवीत नाहींत व चालू देत नाहींत नवीन ग्रंथरचना करितात आम्ही नेहमीप्रमाणे जो अग्नी सिद्ध केला आहे तोच ठेविला आहे यांत कांही नवीन प्रकार नाही तेव्हां स्वामींनी चौकसी करून निकाल लावावा. (कार्तिक शु॥ १ शके १७५० सर्वधारी नाम संवत्सरे)
ब्राह्मणांनी महाराजांस आधी देखील एक यादी पाठविली होती :
अलीकडे परभु आपला ज्ञातीधर्म सोडून वेदकर्म करण्याविसी ब्राम्हणास लोभाविष्ट करितात तेव्हा त्यास सिक्षा करून बंदोबस्त व्हावा जे ब्राम्हण त्यांचे घरी वेदोक्तकर्म करतील त्यास बहिष्कृत करावे तंटे होऊन मारामान्या होतात त्याचा बंदोबस्त व्हावा नाहीतर काही ब्राम्हण मरतील बंदोबस्त जाला म्हणजे आम्ही जयजयकार करू ते महाराजास श्रेयस्कर (आश्वीन शु॥ १ शके १७४९)
यापुढील हकिकत प्रो. डोंगरे यांच्याच शब्दांत येथें देतों :-- वर सांगितल्याप्रमाणे प्रभू व ब्राम्हण जातीत ग्रामण्य चालू असताच, सांगलीकरांनी प्रभूविरुद्ध
१७४७ साली श्रीशंकराचार्याकडून मिळविलेल्या यादीत कलीत क्षत्रिय नाहीत, क. शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज व शाहूमहाराज यांनी क्षत्रिय मुळींच नाहींत असे ठरविल्याचे दाखले महाराजांच्या दप्तरांत बार झालेले आहेत.` असा सर्वथैव खोटा मजकूर घुसडून दिला होता. म्हणून क्षत्रिय मराठे मंडळीने ता. २७ जुलई सन १८२७ रोजी राजमंडळास अर्ज केला की, `यादी परत आणवून किंवा दुसन्या रीतीने ब्राम्हणांनी खोटी विधाने करून लोकांचा मुदाम गैरसमज केला आहे तो घालवावा; नाहींतर आम्हास आपला विचार करणें भाग पडेल वगैरे पण समोर असलेल्या कागदपत्रांवरून राजमंडळाने ह्या बाबतीत मन घातलें असें दिसत नाही....... पुढे सन १८३० साली महाराजांस पूर्ण मुखत्यारी मिळाली. त्यानंतर महाराजांनी क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्ताच्या हक्कासंबंधाचा विषय हाती घेऊन ७१८ वर्षे अव्याहत श्रम करून सर्व वादग्रस्त मुद्यांचा पंडितांकडून निकाल करवून, आपले व आपल्या आप्तस्वकीयांचें क्षत्रियत्व सर्वमान्य रीतीनें स्थापित केलें.
`कलीत क्षत्रिय मुळीच नाहीत म्हणून ब्राम्हणांखेरीज इतरांस वेदोक्ताचा अधिकार नाही` हा वादाचा मुख्य मुद्दा असल्यामुळे क्षत्रिय मराठे व चां. का. प्रभू ह्या जातीचे लोक पंडितांच्या समेत याद करून आपल्या जातीचे क्षत्रियत्व सिद्ध करण्याकरितां एकत्र झाले हैं अगदी स्वाभाविकच आहे. श्रीमन्महाराजांनी वे. शा. विठ्ठल सखाराम उर्फ आबा पारसनीस, चां. का. प्रभू ह्या विद्वान गृहस्थास क्षत्रियांच्या तर्फे वकीलपत्र दिले होते. व विरुद्ध पक्षानें ये शा राघवाचार्य गजेंद्रगडकर ह्या अत्यंत विद्वान पंडितास आपल्या तर्फे बाद करण्याकरिता नेमिलें होते, आबा पारसनीस जसे फारशीत निपूण होते तसेच संस्कृतांतही असून त्याचे दोन शास्त्राचे अध्ययन झाले होते. सातान्यास हल्ली ज्या वाडयात शहरफौजदार कचेरी आहे त्या ठिकाणी त्या वेळी संस्कृत पाठशाळा असून ही जागा वादाकरितां पसंत केली होती. ह्या पाठशाळेत उभयपक्षांचा वाद कित्येक दिवस लेखी पूर्वपक्ष उत्तर-पक्ष- पद्धतीने चालला होता, ज्या दिवशी पंचांचा ठराव व्हावयाचा ते दिवशी पुण्याहून बेळगाव पर्यंतच्या प्रातांतील हजारों ब्राम्हण सातान्यास निकाल ऐकण्याकरिता पाठशाळेपुढे जमले होते. आपल्याविरुद्ध निकाल देणारांची साधल्यास डोकी फोडून सूड घेण्याची विद्या भिक्षुक वर्गास चांगली अवगत असल्यामुळे. निकालाच्या दिवशी कदाचित क्षत्रियपक्षाभिमानी पंडितांचा अपमान होईल ह्या भीतीनें महाराज स्वतः नागव्या तरवारीने पाठशाळेपुढे बंदोबस्त करीत होते.
-- सिद्धांतविजय प्रस्तावना, पृ. ९१०
क्षत्रियांचे क्षत्रियत्व प्रस्थापित करून यशस्वी झाल्यावर आबा पारसनीसाचा महाराजांनी फार मोठा गौरव केला. महाराजांचा राज्याभिषेक समारंभ निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर आवा पारनीसांच्या विनंतीवरून महाराजांनी त्यांस अप्रतीम कामगिरीचा उल्लेख करून आपल्या शिक्यामोर्तबानिशी आज्ञापत्र स. १८३८ त करून दिलें.
श्रीमंत चिंतामणराव आप्पा पटवर्धन आणि `तरकटाचे शिरोमणी बाळाजीपंत नातू या राष्ट्रपुरुषांनी सातारकर छत्रपति महाराज यांच्या उच्चाटणाबद्दल जे जे अनन्वित अत्याचार केले त्याची साधारण कल्पना उपोद्घातात दिलेली आहे. येथे फक्त श्रीमंतांनी नीळकंठशास्त्री थत्त्यासारख्या विवेकभ्रष्टाला हाती धरून छत्रपतीचे अभिमानी जे चां. का. प्रभू यांचा नायनाट करण्यासाठी आणि त्यांचा राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक दर्जा कवडीमोल ठरविण्यासाठीच केवळ नव्हे, तर त्यांना लोकदृष्टीनेहि पाण्यापेक्षांपातळ बनविण्यासाठी जी जी कारस्थाने केली त्यांचाच उल्लेख करावयाचा आहे. चांद्रसेनीयांना शूद्राधम ठरविण्याकरिता श्रीमंत आप्पासाहेबांनी आपल्या विवेकशून्य शास्त्रीहस्तकाच्या हस्ते चां. का. प्रभूच्या उत्पत्तीबद्दल जो नवीन पाचवा वेद निर्माण केला त्याची एक नकल आम्हांस उपलब्ध झाली आहे. ती आम्ही जशाच्या तशी खाली मुद्रित करीत आहोत. त्यावरून इतकें सिद्ध होते की श्रीमंत आप्पासाहेब जसे तरवारबहादर होते तसे वेदशास्त्रपारंगतहि होते आणि सुप्रसिद्ध शाहीर अनंतफंदीने आपल्या कटावांत त्यांच्यासंबंधानें " कर्ममार्गामाजी सुलक्षणी ज्याला जितुके पाजतील पाणी, त्याला पि प्राप्त मुक्यांनी वगैरे जे स्तुतिपाठ गायले आहेत. ते अस्थानी होते असे कोण म्हणेल? श्रीमंत आप्पासाहेबांच्या खास आश्रयाखालच्या `धी सांगली न्यू (या वेळी दरोबस्त शास्त्राच्या प्रथांतूनहि नवीन श्लोक घुसडून देणे किवा त्यातील काही मजकूर गाळणे अथवा व्यगाथ करून ठेवणे अशा प्रकारचाहि यत्न झाला असावा, असा आम्हांला जबरदस्त संशय येतो. कारण छापखान्यांचा व वर्तमानपत्रांचा प्रसार झाल्यावरसुद्धा संस्कृत प्रभात घालघुसड करण्यास ज्या समाजातील मडळीची छाती असूनहि कचरत नाही. त्यांनी निव्वळ हस्तलिखित पोथ्याच्या काळात काय काय अत्याचार केले असतील ते ईश्वराला व त्यांनाच माहीत सन १८६४ साली श्रीपर शिवलाल मारवाडी याच्या ज्ञानसागर छापखान्यात बृहत्पाराशर स्मृति नावाचा ग्रंथ छापत होता. या छापखान्यातले पुफरीवर कृष्णशास्त्री साठे यांनी त्यातल्या १२ व्या अध्यायात ब्रह्मनिरूपणाच्या मजकुरांत खालील ३ बनावट श्लोक खुशाल दडपून दिले --
इत्येतत्यानातु वदति रुपयो दिजाः ॥
कोकणाश्चिपूर्णास्ते चित्तपावन संज्ञकाः ॥ ४२ ॥ ब्राह्मणेषुच सर्वेषु यतस्ते उत्तमामताः ॥ एतेषां वंशजाः सर्वे विज्ञेया ब्राह्मणाः खलः ॥ ४३ ॥ माध्यदिनाश्य देशस्था गोड द्राविड गुर्जराः ॥ काटालगाय विचपूर्णस्य वंशजाः ४४ अतः चितस्य पूर्ण यो निद्यातस्य शयी भवेत् ॥
ही बनावट गोष्ट प्रथम इंदुप्रकाचे संपादक के विष्णुशास्त्री पंडीत पानी उघडकीस आणली म्हणून ज्या मूळ ग्रंथावरून छापील प्रत तयार झाली होती ती बारा फाटकाची जुनी हस्तलिखित प्रत मागवून शोध केला त्यांतहि कृष्णभट या आधी है नवीन भोक पुराहून त्या अथपासून इतिपर्यंत क्रमांक खोडून बदलून ठेवले होते हे प्रकरण पुढे कोर्टापर्यंत गेले होते. अशाच प्रकारचा दुसरा एक प्रयत्न घाटे आणि भाटे या नावांच्या गृहस्थांनी केल्याचे आमच्या ऐकिवात आहे. मेसर्स साठे माटे पाटे खटपटेको या हा खोडसाळपणा जर इंदुप्रकाश चव्हाट्यावर आणला नसता, तर आमच्या राजवाडयाची क्षितिपावन व्युत्पति ज्ञानकोशांतहि बिनदिक्कत जाऊन बसली असती असूनहि बसणार नाही असे नाही. मा. इ. स. म. सारखी राष्ट्रीय संस्था तरी पुढेमागे हा शितिपावन बाप्तिस्याचा विधि सफाईत खास उरकून घेईल, अशी अपेक्षा करण्यास पुष्कळ जागा आहे. (पहा:-इंदुप्रकाश ता. १६ जून १८०३) शास्त्र मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी` तल्या स्वदेशी मालाचा एक मासला तर पहा -
"संकर ज्याति परमु कायस्छो उत्पत्ति ॥ शयाद्रिखंडेपि कमलाकरेण चितः माहिष्य वनिता सुनु वैदेहाय प्रसूयते ॥ सकारछ इति प्रोक्त तस्य कर्म विधीयते || १ || लिपिनां देशज्यातिनां लेखन ससमाचरेत् गणकत्वं विचित्रच बिजपाटि प्रमेद ता.... न सुद्र जातिभ्या पंच संस्कार वानसौ चतुरवर्ण श शेवाहि लिपि लेखन साधनं ॥ सिखा यज्ञोपवितंच वस्त्र प्रारक मंभसा स्पर्शन देवता नाच कायस्छोयं विवर्जत क्षेत्रादशायाममाहिष्य || विप्रोहि प्राजो वैदेहा इति ॥ अथ नृसिव्ह पाराशर निळकंठ भटेन ॥ राम उवाच ॥ माहिष्य वनिता सुनं वैदेहाय प्रसूयते । स कायस्छ इति प्रोक्तः सिंदुतिर निवासकः दालभ्याश्रमं प्राप्तः कायस्छो लिपिलेखकः । तन्ममाचक्ष्व भगवान्माया मानुष विग्रह ॥ राम उवाच ॥ पुरा रामेण निहतः कार्तिवियों महबलः तदा माहिष्मति लोका: पलायन पराभवन् । माहिष यस्य कन्या तु सरूपा तनुमध्यमा । दालभ्याश्रम मनुप्राप्ता त्राहि त्राहिति वादिनि । तदा दाल्भ्यो महातेजः लपथा क्लिन्न मानसः ॥ एहि वाले ममवने तत्र त्राणं भविष्यति । तदा प्रभूति सा तंत्र वास चक्रे चिरं मुदा कन्या त्वे रछापयो मास दाम्यो वेद विदावरः कदाचिद्दैवयोगेन वैदेहा रन्यस्य संगति । वेदवृत उवाच ॥ कौ सौ वैदेह कस्तत्र कथंत स्याश्च संगति तन्ममाच स्वेदवश राम राजिव लोचन ॥ राम उवाच ॥ ब्राह्मण्या वैश्यतो जातो ॥ वैदेहो नामतः किला ॥ तिथार्थि पर्यटन्पृथ्वि तिर्थस्ना (ना)र्थमागतः । मार्गे द्रवा श्रमं पुण्यं नाना दुम समाकुलं ॥ नाना पक्षि समाकिर्णमत् कोकिलनादितं ॥ सुछाय सुतलं रम्यं नाना पुष्पे सुवासितं । श्रमापनोदक द्रवा वासं चक्रेति हर्षितः । कदाचित्कल पुष्पार्थं समायाता सुकन्यका || साद्य तेन सश्रोणि नवयौवन शालिनी (या एकंदर वर्णनशैलीवरून श्रीमंत सांगलीकर मोठे प्रतिमासंपन्न कवि केसरीहि होते असे दिसते.) । सुकेशि चंद्रवदना वृत्तपिनद्यतस्तनि ॥ सुनासाकुंददशना सुधरा पद्मलोचना || बिबोष्टी तनुमध्याच मतद्दिरदगामिनी । मुखपद्मसुगंधन पुष्पोचालिन परदा । कर पल्लव काव्याहि जित पल्लव कोमला | चित्रवस्त्रपरितांगि पुष्पहार विभूषिता ॥ कर्णावतंस विन्यास जिस हेम विभुषण || एकाकि निवने दृष्ट्या मदविन्डल मानसा || सापित चारू सर्वांगं दृष्टवा कामेन पिडिता । एवं ती सगती तत्र कामलिला विमोहिती | तस्मा तस्यां तदा जातः कायरछो परनामकः ॥ सदा दाल्भ्यो नसा पृष्ट्वा कस्मात यसूतो भवेत् । तन्ममा चक्ष्य कल्याणि यथातथ्य मगागतः ॥ कन्योचाच कश्चिदेदेहको नाम तथाश्रमपदें गुरी । आगतो मुनिरूपेण सिंदुस्नानार्थ मादरात । तत्संगाज्जनितः पुत्री रूपोदार्य गुणान्वितः ॥ पालनीयः प्रयत्नेन पुत्रवत् तद्मुने ॥ तदा प्रोवाच समुनिः परक्षेत्रोद्भव सूतः ॥ परभूरिति संज्ञाच लोके ख्यातिर्भविष्यति । प्रोक्तोपजिविका तेन कर्मे तस्य विधायते ॥ लिपिनां देशजाताना लेखन स समाचरेत गणकत्वं विचित्रत्वं बिजपाठि प्रभदेतः ॥ आपन शुद्र जातिभ्यः पंचसंस्कार वानसी अष्टमांग लयमाय स्यातंन्नामकरणं तथा अन्नप्राशनं चौलंच विवाह: पंचमस्मृतः ॥ चातुर्वर्ण सेवादि (येथे मात्र चिंतामणराव सपशेल घसरले. कायस्थ प्रभूना शूद्राधम ठरविण्याच्या या धामधूमीत त्यांनी चतुर्वर्णांच्या अस्तित्वाबद्दल चुकून साक्ष दिली आहे. एन ४०२०-९) लिपि लेखन साधनं । व्यवसायः शिल्पीकर्म सज्जीवन मुदाहृत ॥ शिखा यज्ञोपवितंच वस्त्रमास्तु ममसा || स्पर्शनं देवतानांच कायरछोयो विवर्जयत् ॥ इति निलकंट कृत निबंध ग्रंथेषु निहितं । अनेवि कायरछ भार्याया परेण व्यभिचारिताः उत्पादितः स परभु कायस्छ परिकिर्तितः ॥ शुद्रधर्मो धर्महिनो लिपिलेखन वृत्तिमान` ईति शयाद्रि खंडे | चिंतामणराय कृत सारांष निबंधेषु लिखितं ।
"प्रस्तुत राष्ट्रीय महाकाव्य आम्हांला जसे मिळाले तरों अक्षरशः छापले आहे. यांतील नकलकाराच्या शेंकडा शंभर चुका जरी बाद केल्या, तरी काव्यकर्त्यांच्या अगाध पांडित्याचा व संस्कृत भाषापारंगतत्वाचा पराक्रम त्यांत किती उज्वल रीतीनें झळकत आहे, हें आंधळ्यासह दिसेल. सदहूं महाकाव्य सांगलीकर श्रीमंतांचे आधुनिक अवतार इतिहास संशोधनेश्वर विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांच्या तडाक्यांत कसें सांपडलें नाहीं कोण जाणें ! नाहीतर त्यांनी शिवराज प्रशस्ति व कायस्थधर्मदीप" या आपल्या निबंधाला अशी कांहीं चुरचुरीत फोडणी दिली असती की ज्याचें नांव तें! असो. प्रस्तुत महाकाव्यांतील प्रलाप किती निरर्गल आहेत हे कोणास सांगण्याची अवश्यकता नाहीच; तेव्हां त्याबद्दल अधिक विवेचन करून आम्ही आमची लेखणी विटाळविण्याचे साफ नाकारतों, तथापि, सदहू काव्याचा कर्ता आणि त्याची जात यांच्या दर्जाला, शीलाला व ऐतिहासिक लौकिकाला न शोभण्यासारखें एक अक्षरही त्यांत नाहीं, इतकी मात्र शिफारस केल्याशिवाय पुढे जाणें बरें नाहीं.
सदाशिवराव भाऊ आणि नारायणराव पेशवा यांच्या अपुन्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी श्रीमंत चिंतामणरावासारखा नेता कंबर कसून सज्ज झाल्यावर ग्रामण्याच्या नाटकास रंग कां चढणार नाही? हां हां म्हणतां सांगली फॅक्टरीतला शास्त्रांचा माल चहूंकडे प्रसार पावला आणि चां. का. प्रभूंना ठिकठिकाणी जेथें सांपडतील तेथें वेदोक्ताच्या वरवंट्याखाली चण्याच्या राष्ट्रीय चळवळींना ऊत आला. निःक्षत्रीय पृथ्वी करणाऱ्या परशुरामाची कथा अझून जरी कल्पित कादंबरीच मानली जाते; तरी त्याच्या नांवाच्या अभिमानी श्रीमंतांनी निःकायस्थ पृथिवी करण्याचा जणूं काय संकल्पच सोडला होता. पण क्षत्रिय बेटे पडले लुच्चे त्यांनी एक नाही दोन नाहीं एकवीस वेळां परशुरामाला चकवून पुन्हां उरले ते उरलेच तेव्हां आमच्या आप्पांना तरी यश कसें येणार? त्यांनी सोडलेल्या नवीन स्वकृत शास्त्राचे फर्मान देशोदेशी व गांवोगावी पाठवून क्षत्रिय कायस्थ प्रभूंना शूद्राधम ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या फर्मानांपैकी एकाची नकल आम्हाला मिळाली असून तिच्यांतील मजकुरावरून चिंतामणरावांनी सुर श्रीमंत पेशव्यावरहि तिप्पट सरशी केली असे आढळून आलें. बिचारा उल्लू नारायणराव पेशवा कायस्थ प्रभूंना फक्त नऊ कलमीच कतबा मान्य करावयास सांगत होता; पण या वेळच्या ठिकठिकाणच्या फर्मानांत चार कम नऊ त्रिक सत्ताविस कलमांचा कतवा कायस्थ प्रभूंच्या छाताडावर भिरकावून देण्यांत आला होता. हा तेवीस कलमी कतबा येणेंप्रमाणे :--
१ एकेरी धोत्रे नेसू नये.
२ दुहेरी धोत्रे नेसावी.
३ उभे आडवे गंध लावू नये.
४ गंधाचा टिळा लावावा.
५ ब्राम्हणासारखे आसन घालून बसूं नये.
६ सोवळी नेसू नये.
७ पक्षास अथवा श्राद्धास भाताचे पिंड देऊ नये.
८ शालीग्राम व बाण व मृत्तिकेचे पार्थिव करून पुजा करू नये.
९ रुद्राक्षधारण करू नये.
१० याचे घरी जातिजेवण जाले तरी साखळीनें गंध लावू नये.
११ ब्राह्मणभोजन कर्णे तरी ब्राह्मणाचे घरी सिधा देऊन ब्राह्मणाचे घरी जेवावयास जावे.
१२ ब्राह्मण शागीर्द अथवा स्वैपाकी ठेवू नये.
१३ याचे घरी रात्रीस कोणी जाऊ नये.
१४ कोणी ब्राह्मणाचे घरी व रस्त्यांत ब्राह्मणदर्शन जाले असता दीर्घ दंडवत घालावे.
१५ याचे घरी नवरा मरेल तिचे केस काढू नये गंधर्व पाट लावावा..
१६ याचे घरी दही व दुध सर्व प्रजातीनें घेऊ नये.
१७ ब्राह्मण सोवळे नेसून देवाची पुजा करतील त्या देवाची पुजा करू नये.
१८ तुळसीबेल खोडू नये.
१९ नवरात्रांत होम व सप्तसतीचा पाठ करू नये.
२० ब्राह्मणाचे हाताने रुद्राभिषक करू नये.
२१ देव ब्राह्मण व गाय यांची पुजा करावी..
२२ देव ब्राह्मणाची अवकृपा करू नये. मन्याचा अभिशक करावा,
२३ याचे घरी अठरा जाती व चिलम जाती सकरज्याती कोणी याच घरी जिवनपाणी घेत असल्यास आजपासून घेऊ नये.
ह्या तेवीस कलमी कतव्यावर कायस्थ प्रभूंच्या सह्या घेण्याचा उपद्व्याप या खेपेस न करितां त्या सर्व---
देशांत व राज्यांत हे परमु जेथे राहतील ते स्थळी वर लिहिले अन्वय तुम्ही सर्वत्र जातीने वर्तावे याप्रमाणे देशोदेशी आज्ञा रवाना केली आहे. जोसी उपाध्ये धर्माधिकारी राज्याधिकारी देशपांडे व कारभारी व कुळकर्णी व पाटील व सेटे महाजन मुकादम याणे आज्ञाप्रमाणे ताकीद प्रजातीस एक एक पत्राची नकल देऊन गांवोगांवी नकल रवाना करून जेथे देवस्थान नाक्यावर असेल त्या देवळांचे खांबावर नकल करून खांब्यास चिकटऊन ठेवावी. ही आज्ञा आमान्य केल्यास दश पुरवज व दश परमपरा नरक.
अशी ग्रामण्यप्रचारकांची आज्ञा होती. इतके सगळें झालें तरी क्षत्रिय कायस्थ प्रभू आपल्या प्राचीन परंपरेच्या इतिहासाची जणूं काय पुनरावृत्ति करण्यासाठी शिल्लक उरले ते उरलेच! ज्यांनी परशुरामाला दाद दिली नाही ते चिंतामणराव आप्पांना कसची देतात ?
या ग्रामण्याची बहुतेक सर्व उपलब्ध माहिती येथवर दिली. आतां शेवटी श्रीशंकराचार्यांची
कांहीं उपलब्ध आज्ञापत्रे येथें नमूद करून या ग्रामण्याची रजा घेऊ.
शिक्का
श्रीमत् परमहंस परिव्राजकार्य, शंकर भारति स्वामिभिः । .. श्रीशृंगेरी श्रीविद्या शंकर पादपद्माराधक श्री शृंगेरी
अस्मदत्यंत प्रियशिष्य गुरुभक्तिपरायण राजमान्य राजेश्री देश व कोकण राहणार चांद्रसेनीय कायस्थप्रभु रात्रिय यांसी आशिर्वादपूर्वक श्री नारायण स्मरणानी तुंगभद्रातीर कुंडलिस्थानि सिवपुजातत्पर आहो. तुम्ही पत्र राजश्री अमृतराव कृष्ण प्रभु क्षेत्रि देशपांडे प्रांत चेऊल याजबरोबर पाठविले ते संस्थानी ज्येष्ठ वद्य पंचमी प्रविष्ठ जाहाले. त्यांतील अर्थ आपले स्वज्ञातींत तीन कर्माचा अधिकार आहे त्यास ब्राह्मण बखेडे करतात येविसी पुरवी श्रीमंत छत्रपति महाराज शाहूराजे यांचे कारकीर्दीत पंत प्रतिनिधी यांचे कारभारी दमाजी सिवदेव यानी "त्रिकर्माचा अधिकार नाही म्हणोन कलह वाढविला त्याजविसी छत्रपती महाराज याणी सिष्टाचार सभा करून ग्रंथातरीये शोध पाहून चांद्रसेनीय कायस्थ प्रभु क्षेत्रिय कर्माचे आधिकारी हे खरे असे ठरल्यानंतर येणाजी शिवदेव यानी आग्रह सोडिला पुढे पेशवाईत श्रीमंत माधवराव नारायण प्रधान यांचे कारभारी नाना फडणवीस व हरीपंत फडके यांचे आश्रयाने कोकणस्थ ब्राह्मणांनी ग्रामण्य करून पुणे मुकामी रामशास्त्री प्रभृती सिष्टाचार सभा होऊन ग्रंथातरी निर्णय पहातां स्पष्ट न सांगवे कारण सरकारचे लक्ष समजोन श्री क्षेत्र वाराणसी येथे लिहून पाठविले तेथे निश्चय उरोन येईल त्याप्रमाणे चालावे नंतर श्री क्षेत्रीहून पत्रे आली. त्यात निश्चय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु क्षेत्री त्रिकर्माचे अधिकारी हे समाजोन कलह बाबू दिला नाही, नंतर वेदशास्त्रसंपन्न रा. रा. निळकंठ शास्त्री थथे यांस बडोद्याहून राजश्री विठ्ठलराव देवाजी निसबत नाईकवाड याणी पत्र पाठविले की आमचे ज्ञातीस त्रिकर्माचा अधिकार असता ब्राह्मण तंटे करितात येविसी ज्ञातीचा निर्णय कसा आहे तो लेहून पाठवावा. त्यावरून येथे याणी लिहिले की मी काही ग्रंथ पाहिले त्यांत तुमचे ज्ञातीस तीन कर्माचा अधिकार आहे. आणखीही ग्रंथ अवलोकन करितों असे उत्तर पाठविले. हे वर्तमान ब्राह्मणास समजले त्यावरून त्याणी ग्रामण्य केले तेव्हा पुण्यांत कोल्हापुरकर स्वामी पर्वतीचे मुकामी आले होते त्याचे समक्ष सिष्टाचार सभा करून ये. सं. रा. रा. राघवाचार्य व वजटक शास्त्री याणी ग्रंथाचे निर्णयावरून हे चां. का. प्रभु क्षेत्रीय त्रिकर्माचे अधिकारी असी खातरजमा करून देऊन स्वामीजवळोन याद ठरावोन घेतली त्यावर कन्यागती वाई क्षेत्री कृष्णातिरी रा. बळवंतराव मल्हार चिटणीस पंडित सुमंत हे तीर्थ विधि करणे याकरिता आले होते.
क्षेत्रस्थ ब्राह्मणानी यांस वेदोक्त कर्माचा अधिकार नाही. म्हणोन ग्रामण्य करोन हागामा केला पुढे चिटणीस सातारा मुकामी जाऊन श्री. छत्रपती माहाराज यास समजाऊन तेथे सिष्टाच्या सभा केल्या त्यांत ग्रंथांतरीच्या पुरवण्या करून दिल्या त्याजवरून ब्राह्मणसमुदाय याची खातरजमा जाहली की हे त्रिकर्माचे अधिकारी हे समजोन चिटणीस यास स्मार्त अग्नी सिद्ध करावयास सांगोन चालता केला. असे असतां ब्राह्मण अनावर त्यास स्वामींनी ग्रंथातरीचा शोध पाहून ज्ञातीस्वधर्मास कर्म ते करून देण्यास स्वामी समर्थ आहेत. म्हणोन लिहिले आहे ते अवगत जाहाले ऐसीयास तुमचे ज्ञातीविसी आम्ही येथे ग्रंथातरी शोध पाहिला ते ग्रंथ :
१ कालीपुराण
१ पद्मपुराण १ भविष्योत्तरपुराण १ शूद्रकमलाकर
१ शयाद्रिखंड १ परशराम स्मृती १ नारदपुराण
१ स्कंदपुराण १ गोविंदभट्टी १ गागाभट्टी
१ जातिविवेक १ परशरामप्रताप १ कात्यायनी तंत्र
_______
१४
इत्यादि ग्रंथ पाहिले निर्णय केले व पूर्वी स्वामीनी वर्णाश्रम धर्म स्थापन केले तेही पाहता तुम्ही चां. का. प्रभु क्षेत्रीय त्रिकर्माचे अधिकारी येविसीचे निर्णय श्रीक्षेत्र वाराणसी येथे सिष्ट समुदायाच्या सभा होऊन पत्रे लिहिली. श्रीपरशरामाने निक्षत्री पृथ्वी केली तत्रापि त्रेतायुगापासोन द्वापार कलयुगाचे आदी परयंत क्षेत्रीय राजे राज्य करीत होते. तेव्हा नक्षत्री पृथ्वी जाली असा संभव होत नाहीं. कारण कलीयुगांत जन्मजय राज क्षत्रीय याणी सर्पसत्र केले हा इतिहास भारती प्रसिद्धच आहे पुढे कलीयुगाचे प्रारंभापासून माहानंद राजापर्यंत वर्षे ३१४७ पावेतों क्षेत्री व पुढे दिलस राजे व रजपुत राजे व यवन जाहाले त्याचा तपशील शके १६१९ ईश्वर नाम संवत्सरे पर्यंत :
(येथे तपशील दिला आहे तो वगळला आहे)
याप्रमाणे ग्रंथांचे आवलोकन करून व श्रीवाराणसी येथील सिष्टांची पत्रे व गोत्रे व हास्तनापुर राज्याची परिनालिका व स्वामीनें वर्णाश्रम धर्म स्थापन केले त्यांतही अवलोकन करिता नोंद राजा क्षेत्री कलयुगांचे ३१४७ वर्षे बंगालीयातून जैसिंग रजपुत येऊन पदच्युत केला ते रजपुत क्षेत्री राजे याजपासून अन्यक्षेत्री उत्पन्न जाहले ते बलोतर फार होऊन उत्तर दिसेस राज्य करू लागले तेव्हा क्षेत्री पराभव होऊन पळोन माळवदेसी मांडवगडास आले तेथेही रजपुताने उपद्रव केला त्याकाली तेथूनही पळोन दक्षिण देसी आले क्षत्र धर्मानी वागावे तरी रजपुतापुढे उपाय न चाले उदार निर्वाहा चालला पाहिजे तेव्हा कलीमध्ये माहालय वीरभोग्य वसुंधरा याचे मनन करून क्षेत्र धर्म सोडून प्राणरक्षणास्तव पुरवी परशरामाने चांद्रसेनाचे पुत्रास कायेत गर्भरक्षण केला म्हणोन कायस्थ म्हणतात व दालभ्य ऋषीने रक्षण केले म्हणोन दालभ्य गोत्र व लेखन विद्येचा अधिकार लावून दिल्हा आहे त्यांचे कुल राजे यांचा अमात्य मंत्रीपणा करीत होते त्यास प्रभु म्हणत होते असे ग्रंथातरी प्रसिद्ध आहे हे समजोन तोच धर्म चालवून उपजीविका चालवीत आले त्यातील काही क्षेत्रीय कर्नाटक ("तीन अनभ्यस्त लेखकानी पौराणिक धाटणीवर एक बखरवजा लिहिलेलें भारूड ठाणे येथील मराठी दप्तरातील १ ला रूमाल म्हणून सन १९१७ साली प्रसिद्ध झाले आहे. संशोधकानें व प्रकाशकाने या भारूडाचे महत्व प्रस्थापित करण्यासठी सर्टिफिकीटांच वगैरे बराच फार्स केला आहे. परंतु हे भारूड म्हणजे निवळ ऐकीव ऐतिहासिक गप्पाचे एक अव्यवस्थित व अविश्वनीय पोळे आहे. यांत ऐतिहासिक सत्यापेक्षा हरदासी गप्याचा भरणाचे रंगड आहे. अशा चोपडाच्या अभिमानी संशोधकाने रा. रा. पांडुरंग नरसिंह पटवर्धनांनी त्यातल्याच चारदोन ओळींच्या दिमाखावर प्रभू वीरांगना सावित्रीबाई ठाणेदारणीचा इतिहास कादंबरी ठरविण्याचा उपद्व्याप केला आहे. रा. पटवर्धनाचा सारा भर इतक्याच मुद्यावर की (१) एक दोन बखरीशिवाय सावित्रीबाईची माहिती इतरत्र छापलेली नाही व (२) कर्नाटकात कायस्थ प्रभू कधि त्या काळापूर्वी गेल्याचे या खंद्या संशोधकमहाराजांस विदीत नाहीं, आणि म्हणून त्यांच्या मते हा इतिहास खोटा. या आज्ञापत्रात खुर श्रीशंकराचार्य चा. का. प्रभूंचा इतिहास थोडक्यात देऊन असे स्पष्ट नमूद करीत आहेत की त्यातील काही क्षेत्री कर्नाटक प्रांती गेले " या शेऱ्याचा रा. पटवर्धनांच्या संशोधन दृष्टीवर काही उजेड पडेल असा भरवसा आहे. रा. पटवर्धनाच्या डोळ्यापुढे पडलेला अंधार घालविण्याचे हे स्थळ नव्हे.
पटवर्धनांनी हा वाद उपस्थित करताच मुंबईचे कोणी शहाणे वाळींब यांनी तर ज्ञानप्रकाशात सावित्रीबाई ही चित्तपावन वीरांगना म्हणून कर्णा फुकला आणि सातारा जिल्ह्यात भोसे गावी मिकमट अग्निहोत्र्याच्या घरी यासंबधानें कागदपत्र आहेत असे प्रसिद्ध केले. म्हणून आम्ही प्रत्यक्ष तपास करता रा. वाळीब्यानी ही नुसती लोणकढी गप्प मारली असे उघडकीस आले. तेथे कोणीहि त्या नावाचा अग्निहोत्री नव्हता व नाहीं. अशा प्रकारचा हलकटपणा करून इतिहासाची साधनें तयार होत नसतात हे रा. वाळींब्यासारख्या उपद्व्याप्यानी खूप लक्षांत ठेवावे.)
प्रांती गेले त्याची व या प्रांतातील क्षेत्रिय राजे आहेत त्यांचे व यांचे कर्म ग्रंथाचे आधाराप्रमाणे आहे. काही क्षेत्री कोकणप्राती आले ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभु क्षेत्रीय म्हणून तुम्ही हाली वेदोक्त त्रिकर्माचे अधिकारी लेखन विद्येनें निरवहा करिता हे विदितच आहे. व दुसरे कोकणप्रांती समुद्रतीरी परमु म्हणोन म्हणतात त्यास तिकडे असी चाल आहे की जो कोणी इंग्रजी लिहितो त्यास कोणतेही जातीचा असो त्यास परभु म्हणतात, परंतु चांद्रसेनीय कायस्त प्रभु दालभ्य गोत्री क्षेत्री म्हणतात, या भावे ते परमु होत नाही. तुमचा क्षत्रधर्म सुटला म्हणोन वेदोक्त त्रिकर्माच्या अधिकाराचा लोप जाहला नाही याप्रमाणे मठात सिद्धांत ठरला याप्रमाणे प्रांतांत वेदशास्त्रसंपन्न धर्माधिकारी व जोतिषी व उपाध्ये व समस्त ब्राह्मण यांस आलाहिदा पत्र दिले आहे तुमचे क्षेत्रीय धर्माचे अहनिकाचे पुस्तक आच्यार्याने केले ते पाठविले आहे त्याधर्माने चालावे हे सर्वांस मान्य करणे. शके १७५२ विकृति संवच्छरे आषाढ ।। १०.
[२] ।। श्री ।।
श्री नारायणस्मरणानि
शिक्का
श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रृंगेरी श्री विद्याशंकर देवदिव्य श्री करकमल संजात पादपद्माराधक श्रीशंकराचार्यान्वित श्री बाळकृष्ण भारथी स्वामिभिः
श्री मदुमारमण चरणसेवाधुरिण दानधर्म परोपकार समाराधनादिकत विख्यात प्रसिद्ध हरि गुरु भक्ति सेवा तत्पर सकल नीतशास्त्र प्रविण गौब्राह्मण प्रतिपालक लक्ष्मी निवासविलाससंपन्न नित्य अन्नदानकीर्तिप्रसिद्ध अस्मदत्यंत प्रेमप्रिय श्री गुरु भक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभू विषईकृत संप्रीति विनयार्थ आशीर्वादपूर्व कृत आधीक वैशाख वद्य ७ सप्तमी तद्नंतर समस्त जोशी व उपाध्ये यांचा व तुमचे ज्ञातीचा वेदोक्त कर्मावरून तंटा पडिला ह्मणोन तुम्ही आपले कुळ उपाध्ये टकले यांस आणोन आपलेकडील कर्मे चालउन जोशी उपाध्ये यांजकडील वृत्ती बंद जाहाली. मेहनत माहाडकर जोशी उपाध्ये याणी आपला मजकुर माहाङ मुकामी समजाविला येविशी चौकशीपाहातां चांद्रसेनीय कायस्त प्रभु यांची वहिवाट पूर्वापार चालत आली त्या प्रमाणे चालत आहेत.
दरम्यान पेशवे श्रीमंताचे कारकीर्दीत येक दोन वेळां ब्राह्मणानी व्यर्थ तंटा केला त्याचा नीर्णय तें काळीच सरकारातुन शीष्ट समतें होऊन निर्वाह जाल्याचे दाखले व श्री वाराणशी क्षत्रीचें पत्र इत्यादि अन्वये वहिवाट असोन हाल्ली ब्राह्मण आपल्यात तट करुन त्या ज्ञातीवर दोषांदोष पाहातात याचा विचार पाहातां त्या ज्ञातीकडे वेदोक्त कर्मे व्झवी येविशी आपण अनुकुल अशा साधनाचे नीळकंठ शास्त्री थथे यांचे स्वस्तुर पुणियाहुन राजश्री विठलराव देवाजी यांस बडोद्यास पत्र गेले हे दाखउन दाख (डॉक?) उत्तर येविशी वाद सांगणार नाही व अज्ञेप्रमाणे प्रायश्चित घेउ दस्तुर खुद म्हणोन करवीरकर स्वामीकडे कतबा वजटकशास्त्री याणी दिल्हा त्याजवर थथे शास्त्री यास आज्ञा केली की तुम्ही या प्रमाणे कतबा देउन निर्वाह करून घेणे यावरून वैशाख शुद्ध ७ शके १७४८ याणीहि कतबा दिल्हा त्यांतील मजकूर आमचा लेख निघाल्यास स्वस्तुर आमचा असी स्वामीची व राजश्री चिंतामणराव आपा यांची खातरी जाहाल्यास स्वामी आज्ञा करितील, त्यास मान्य म्हणोन त्याजवरुन उभयतांचे नीर्णयास थथे यांचे हातचे असल पत्र पाहिजे तें राजश्री विठलराव देवाजी यांजपाशी बडोद्यास आहे ते येण्यास दिवस गत लागली.
कांही दिवसांनी थथे शास्त्री याचे हातचे असल पत्र रुजुवातीस प्रविष्ट जाहालें. तें राजश्री चिंतामणराव मिरजकर व आनंदराव टोके फळकर वकील निसबत चिमणाजी आपा व खंडो शीताराम वकील निसबत आंगरे प्रभृती थथे व नातु यांचे सर्फेने तिराईत आले ह्यांचे विचारें पत्र पाहिलें तो चिरंजीव म्हणोन पितापुत्रवत त्यांत मजकूर चिरंजीव राजश्री आमृतराव बाबा राजश्री जीवनराव दिवाणजी याशी विदित केला ब्राह्मणाकडील पत्र आले होते. ते दिवाणजीस दाखविलें त्याविशी ग्रंथ शोध करीत आहो. त्या प्रांति यादिशी ग्रंथ शोध करीत आहो त्याप्रांति याविशी शोध आपला असेलच शोध करून इकडे रवानगी करावी त्या ग्रंथावरून विचार करुन ठेविला असतां उपयोग फार होइल. येविशी लेहून काय कळवावें म्हणोन निळकंठ शास्त्री यांचे हातचे निखालस पत्र खरे असे ठरोन ते तिरायित गेले निळकंठ शास्त्री तो चिरंजीव हाणोन पत्र लेहोन अगत्यवादे लिहितात व पणवेलकर ब्राह्मणाचे पत्र दाखवितात व ग्रंथ पाठवावे म्हणोन लिहितात. तेव्हा थथे शास्त्री अनकुळ होतात जर करीता हे चांद्रसेनीय नाहींत तरी हे झाते त्यास अनकुल कसे होतील त्याजवरून वेदशास्त्र संपन्न राजश्री राघवाचार्य प्रभृतीनें त्रिविध कायरताचा शास्त्रार्थ त्यासच निवडुन दिल्हा. त्या अर्थी चांद्रसेनीय ज्ञाती हीच असे निश्चयात आले तत्रापि या ज्ञातीची परंपरा आचार पाहाता जातकर्मादारम्य मुंजीबधनसह संस्कार चालतच आहेत. तेव्हा चांद्रसेनीय हेच ज्ञाती म्हणवितात ते खरें परंतु पूर्वी एकदोन वेळा ब्राम्हणानी तंटे काय समजोन केले ते काळी काय ठरले याचा नीर्णय पाहाता जा काळी ब्राम्हणांनी तंटा निर्माण केला त्या काळी शास्त्रसमतें निर्वाह करून है ज्ञाती आपले आचरणानी चालत आहेत त्यात पेणकर याणी आठ नऊ वर्षे ग्रामण्य पेशवाई अमलात केलें त्याचा निर्वाह कसा जाहाला त्याचा दाखला पाहातां पुणे मुकामी शिष्ट समतें पाचच्या सभा होऊन पूर्वापार चालत आल्याप्रमाणे चालवावें असें ठरून बाळाजी ज्यनार्दन फडणीस याची देवावयाची यादी त्याप्रमाणे दुसरे शके १७१९ साथै साली राजश्री बाजीराव रघुनाथ प्रधान याचे देण्याची यादि होऊन त्या प्रमाणे शिक्यानशी सनदा प्रांतोप्राति मामलेदार व ज्योतिषी व धर्माधिकारी याशि गेल्या कि समस्त दालभ्य कायस्थ प्रभु यांजकडील कर्मे पेणकर याणी खटला करून सरकारची पत्रे पाठउन बंद केली. त्याज वरून प्रभु व ब्राम्हण हे सरकारात फिर्याद आले त्याजवरून उभयतांचे लेहून घेऊन शिष्टसमतें मनास आणितां पूर्वि चालत आले याप्रमाणे चालवावें त्यापेक्षा पूर्ववत् ठरलें तेव्हा वादासहि ज्ञाती खरी जाहाली याजकडील करें। बंद केली ती वेदोक्त चालत होती म्हणोन बंद केली पुढे चौकशी अंती पूर्वापार वहिवादी अन्वयें। सनदा यांशि होतात तेव्हां दालभ्य कायस्त म्हणजे चांद्रसेनीय प्रभुची अपरंपर्याय रकारभिन्नत्वे परभुमात्र लोकोपवाद असें त्याहि सनदेवरून सिद्ध होते यास प्रमाण पाहातां कीं वाराणशी क्षेत्रीचें समतपत्र प्रमुख भट प्रभृति त्र्यााशि पंडित मंडळी याचे ज्याचे त्याचे सहींचें स्वदस्तुर पत्र असल धर्माधिकारी व आठघरे याचे नावे त्यांत लिहिलें की तुझीं पत्र पाठविलें तें पावलें वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री बाबाप्रभृति पंडीत मंडळींची पत्रे आली ती पावली तेथे लिहिले की पांच चार वेळा श्रीमंताचे आज्ञेवरून मिळोन गागाभट्टीकृत्मार्गावलंबे प्रभु याजकडे कर्मे चालवावी असे ठरलें. प्रांतात सनदाहि गेल्या त्याजवरून वेदमूर्ती आबाशास्त्री टकले यांशि आम्ही विचारिलें की या ज्ञातीचे कुळ उपाध्ये तुम्हीं याचा विषय कसा आहे पुण्यात ठराव कोणत्या ग्रंथावरून केला त्याणी उत्तर केलें की गागाभट्टकृत कायस्तप्रदीप गोंदभटकृत गोविंदभट्टीस्कंद पुराणांतर रेणुकामाहात्मकमळाकरभट्टकृत शूद्रकमळाकर ज्ञातीविवेक इत्यादि निबंध ग्रंथ पाहावे, म्हणजे आपले ध्यानास येईल त्याजवरून आम्ही हे सर्व ग्रंथ पाहिले.
तो हे क्षेत्रीय अन्वय चांद्रशेनीय कायस्त प्रभु दालभ्य ऋषिनें पालन करून उपनयनादि संस्कार केले भार्गवरामाचे आग्रहास्तव शस्त्रधारणरूप शस्त्रविद्या टाकून कायस्त धर्मलेखनवृत्ती यांस दिल्ही दालभ्य गोत्र असा निर्णय पूर्वोक्त ग्रंथ पाहात होतो म्हणोन याप्रमाणे श्रीक्षेत्रीचे पंडीत मंडळीचे असल पत्र ज्याचे त्याचे सींचें प्रत्यक्ष पाहिलें तेव्हा या ज्ञातीची पूर्वापार वहिवाट समकम षोडश संस्कार चालत आले त्यावरून हे चांद्रसेनीय कायस्त प्रभु खरे व त्याप्रमाणे पूर्वे पेणकराचे ग्रामण्य अंती निर्णय होऊन दालभ्य कायस्त हाणोन प्रत्यक्ष सनदा व येथे जा ग्रंथावरून नीर्णय केले ते ग्रंथ प्रत्येयास श्री काशीक्षेत्रस्थ याणी पाहुण चान्द्रसेनीय कायस्त प्रभु ह्मणोन लिहितात व प्राचीन दाख पाहाता राजपत्री व बाळाजी बाजीराव प्रधान यांचे पत्रात प्रभु असेच आहे. तेव्हा हे चांद्रसेनीय प्रभु कर्मत्रयाधिकारी असे सिधच आहे त्याप्रमाणे अनकुल ते विशी नीलकंठ शास्त्री पत्र लेहून स्वदस्दुर देतात त्याप्रमाणे राघवाचार्य प्रभृतीनेहि शास्त्रार्थ पाहुन निवडून दिल्हा. त्याची पुरवणी त्यात ज्ञातीचे पारंपर्य आवरणावरून व सनदापत्रे व क्षेत्रीवी समतें त्यांत जे ग्रंथ लिहिले त्यावरून पाहाता हे ज्ञाती क्षेत्री चान्द्रसेनीय कायस्त प्रभु कर्मत्रयाधिकारी खरे व बजटक शास्त्री बादास खरे जाहाले व निळकंठ शास्त्रीचाहि पूर्वीचा लेख खरा पुढे उगेच विपर्यास बुध्धीनें ब्राह्मणास प्रायश्चितें दिल्ही ते खोटे असे ठरले असे म्हणोन. श्रीमत्परमहंस श्रीविद्यानृसिंहमारथी संस्थान मठ करवीर याही पुण्यासन्निध पर्वतीचे मुकामी सारांश करून राज्यश्री विठलराव देवाजी यांस दिल्हा. तो हाल्ली आह्मास दाखविला त्या अन्यये आम्ही ग्रंथ शोधुन पाहिलें तो हे क्षेत्री चांद्रसेनीय कायस्त प्रभु कर्मत्रयाधिकारी खरे याचा शास्त्रार्थ पारंपर्य वहिवाट पाहाता, वेदोक्त कर्म यांजकडे चालत आल्याप्रमाणे करावी उगाच आग्रह बुद्धीने ब्राम्हण कोण्ही तंटा खोटा करितात तो करू नये. सर्वा ब्राम्हणानी वेदोक्त कर्मे यांजकडे चालवावी म्हणोन हे पत्र तुम्हास दिल्हे असे, शके १७५३ खरनाम संवछरे सेवा धुरीण विषई विशेष की लेखन इत्यल.
[३] शिक्का
श्री मत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री विद्या शंकर देवदिव्य श्रीपादपद्माराधक श्रृंगेरी श्रीनृसिंहभारती स्वामिभिः ॥ श्री श्री •••
सांप्रत श्रीमटाहून श्रीमुखसाद केले जातोजे. विशेष पूर्वी चनपटण येथून लाटसाहेबबाधूर याणे श्री श्रृंगेरी मठास पत्र पाठविले आहे. कोंकणस्थ ब्राम्हणा व चांद्रसेनी कायस्थ प्रभु या उभयथाचा जातीविषई तटा पार दिवस आहे. ब्राह्मण पाराधुखी (?) होउन अम्हथे घरात दाह यत्र (वर्षे ?) पर्यंत सहस्त्रा...प्य परम प्रयासे करितात म्हणहून राजेश्री चिंतामणिराव पटवर्धन याणी धवलतनदार कुंफणी सरकारत् परस्परा अर्ज केले की सदरी दोन जातीचा तंटा कुंफणी सरकाराकडून पैसल करून घ्यावी. या विशई कुंफणी सरकारा... होत नाहीं कायदेस विरुत्व मणहून श्रीमतांकराचार्यस्वामी मठास ज्यातीचा तंटा पैसल करून उत्रे पाठवावे .महून कुंजी सरकाराथून लिहिले आले नंतर सर्व वेदशस्त्र पुराण ब्राम्हण महान राजे याचे संम्मत घेऊन सर्व ब्राम्हणास आज्ञा श्री माहून केले तो जे आसेतुहिमाचल परिर्यंत संपूर्ण ब्राम्हणानी वेदोक्त कर्म चांद्रसेनी कायस्थ प्रभु यांचे घरी तीन कर्म चलवावे त्यास राजे सुभे राज निक्षेत्रपट प्रात परगणे कसबे मौजे विद्वान महान् ब्राम्हण राजाधिका मामलेधार जमीधार व ईतर अशे व जातीवाले यागे श्रीमुखाजाप्रमाणे भूयो भूयो कितानः सन्मानियः कलुधर्म संस्थापनायां साभिमानी विशेष कि लेकन ईतोप्याधिक श्रेयः इति नाराणस्मृतिः श्रीशालीनृपपराक्रमी सेके १७६१ चैत्र शुक्ल प्रतिपदा श्री.
ग्रामण्य अकरावें.
ब्रह्मनाळकर बुवांचें ग्रामण्य. शके १८२५ सन १९०४.
पेशव्यांच्या नोकरशाही बंडाच्या मृत्युबरोबर ग्रामण्य-प्रकरणही ओंकारेश्वरावर गेलें असेल आणि इंग्रेजांच्या एकछत्री राज्यांत महाराष्ट्रांतील ब्राह्मण म्हणविणारा सर्व पूर्वीच्या राष्ट्रविनाशक संकुचित कल्पना पार विसरून गेला असेल, अशा कल्पनेचा उदय विसाव्या शतकाच्या उदयाबरोबर होतो न होतो तोच कायस्थ प्रभूंच्या हितशत्रूंनी आपल्या पेशवाई राजवटीचा घडा पुन्हा घोटाळण्यास सुरुवात केली. हिंग तर गेलाच पण गौणत्याचा वास कांही जात नाही. आतांपर्यंतच्या ग्रामण्यांत कोणीतरी अलबत्या गलबत्या पुढारी असे, परंतु निःकायस्थ पृथिवी करण्याचा चित्पावनांचा जो परशुरामी बाणा तो ते अनून विसरले नाहीत आणि म्हणूनच यावेळेस ग्रामण्याच्या चळवळयांनी स्वतःच्या तोंडांवर अज्ञातपणाचा बुरखा घेऊन खुद्द शंकराचार्याच्या हस्ते हा निःकायस्थ-विधि उरकविण्याचा उपद्व्याप केला !!
संकेश्वर मठाधिष्टित श्रीशंकराचार्य (पूर्वाश्रमीचे ब्रह्मनाळकर हरदास) हे सन १९०४ साली संचारार्थ निघाले असतां त्यांचा मुकाम महाड येथे झाला. त्यावेळी महाडकर चां. का. प्रभु मंडळीने श्रीची पाद्यपूजा करावयाचे ठरवून, रा. द्वारकानाथ गणेश देशमूख वकील यांचे मार्फत श्रीस विनंती केली असतां पुराणोक्त पूजा करीत असल्यास पूजा ग्रहण करू असा श्रीकडून जबाब मिळाला. महाड येथे ज्ञातिबांधवांची जी सभा झाली तिचे अध्यक्षांनी समस्त ज्ञातीबांधवांस विनंतिपत्र काढले होते तेच येथे देतो:
श्री.
राजश्रीयादिरजित राजमान्य राजश्री समस्त चां. का. प्रभुमंडळी वास्तव्य यांचे सेवेसी माहाड येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मंडळीचा कृतानेक सिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष श्रीमत् शंकराचार्य स्वामी मठ संकेश्वर याची स्वारी माहाड येथे आली असता मिती माघ व ॥ १४ सोमवार शके १८२५ ता. १५ फेब्रुवारी १९०४ इसवी रोजी श्रीस रा. रा. द्वारकानाथ गणेश देशमुख वकील याही पाय पुजेरितां निमंत्रण केलें. ते श्रीनी मान्य करून पुजेची तयारी होऊन मंडळी जमा झाली असता स्वामीनी पुराणोक्त पूजा कराल तर पुजेस येऊ असा पूर्वापार वहिवाटीविरुद्ध आणि पूर्वीच्या स्वामीच्या आज्ञापत्रास अमान्य असा जबाब दिला. त्यावरून त्या पुजेचा विचार रहित करून सदर तारखेस येथील ज्ञातिबांधवांची सभा भरवून त्यात ठराव जाहला की :
`सभेपुढे जाहलेल्या जबान्या व एकंदर घडलेली हकीकत पाहता असे स्पष्ट होत आहे की प्रत्येक ज्ञातीस कायकाय अधिकार आहेत याची माहिती स्वामीस असली पाहिजे. आपल्या ज्ञातीस पूर्ण अधिकार कायकाय आहेत त्याबद्दल फार वर्षापासून जुने ग्रंथाच्या आधारें शास्त्रीपंडित वगैरे यांच्या अभिप्रायानें स्वामींकडून निर्णय होऊन त्याप्रमाणे फार वर्षे वेदोक्तकर्म करण्याची आपले ज्ञातीत वहिवाट चालत असोन पुरा तपास न करितां अगदी अन्यायाने स्वामीनी पुराणोक्त पुजा कराल तर येऊ असे सांगितले. हे स्वामीचे करणे ज्यांजकडून योग्य न्याय व्हायचा त्यांजकडून अदूरदर्शीपणाचे व अन्यायाचे व जुलमाचे जाले आहे"
असा ठराव करण्यात आला आहे. यासाठी आपल्यास विनंती करण्यांत येते की आज कित्येक शतकें आपल्या ज्ञातीकडे वेदोक्त कर्म होत असतां कांहीं उपद्व्यापी मंडळीच्या आग्रहावरून स्वामीनी ज्याअर्थी आपल्या अधिकारास न शोभण्यासारखा जबाब दिला आहे त्याअर्थी या कामाचा निर्णय श्रीकडून पूर्वापार पद्धतीस अनुसरून असा मिळेपर्यंत येथील मंडळीनी त्यांस धर्मगुरू या दृष्टीने जे मान द्यावयाचे ते देण्याचे रहित केले आहेत. तरी सदर्हू ठराव पाहून श्रीची स्वारी आपले तिकडे गेल्यास ज्ञातीच्या अपमानाची वरील गोष्ट लक्षांत घेऊन श्रीशी आपले वर्तन राहील अशी उमेद आहे.
पूर्वीच्या आज्ञापत्राविरुद्ध हाली स्वामीकडून का सांगत आले याबद्दल स्वामीकडे खुलासा विचारावा असे आमचे मत आहे. याबद्दल आपला अभिप्राय लिहून यावा. कळावे हे विनंती.
सिताराम वासुदेव कारखानीस, सभेचे प्रेसिडेंट.
याप्रमाणे विनंतीपत्रे ठिकठिकाणी रवाना झाली असता इकडे वर्तमान पत्रांतून याप्रकरणासंबंधानें चर्चा सुरू झाली. त्यांतून एकदोन उतारे येथे घेत :--
(१) हल्ली संकेश्वर पीठाधिष्ठित श्रीशंकराचार्य पूर्वाश्रमीचे ब्रम्हनाळकर हरिदास-संचारासाठी कोकणात गेले आहेत. श्रीने शिखासूत्राचा त्याग केला, परंतु त्याबरोबर पूर्वाश्रमीच्या मायापाशांचा त्याग केलेला दिसत नाहीं. स्वारीबरोबर त्यांचे गोत कधी घोड्यावर तर कधीं हत्तीवर मिरवत जात असते. त्यांच्या कथेकरी वृत्तीचाही त्यांस अद्यापि विसर पडला नाही. कारण आपल्या भाषणांत शृंगारादि रसांनी व कोटिक्रमांनी शोभा आणण्यात ते कमीपणा मानीत नाहीत आणि मठाच्या परंपरेविरुद्ध उपदेश करण्यासही कमी करीत नाहीं. स्वामींना दोष देण्यास एवढी एकच जागा असती तर त्याबद्दल लेख लिहिण्याचे कारण नव्हतें. परंतु स्वामीनी आपल्या वर्तनांत नवीन स्थितीस अनुलक्षून थोडा साळढाळपणा धरावयाचा तो न धरितां जुन्याकाळी मान्य ठरलेल्या वहिवाटीसही हरताळ लावण्याचा क्रम ठेविला आहे हें पाहून फार वाईट वाटतें. महाड येथे रा. द्वारकानाथ गणेश देशमुख वकील (हे कायस्थ प्रभु ज्ञातीचे आहेत) यांनी स्वामीस पाद्यपूजेस पाचारण केलें होतें. पाद्यपूजेची सर्व तयारी झाल्यानंतर कित्येक दुराग्रही लोकांच्या सल्याने स्वामीनी हट्ट धरिला की पुराणोक्त मंत्राने पूजा कराल तर येऊ.
रा. देशमुख यांनी नानाप्रकारें समजून सांगितले की कायस्थांस वेदोक्ताचा अधिकार आहे त्याबद्दल हवा तितका पुरावा देतों व वहिवाट दाखवितों. पण स्वामीनी त्याकडे लक्ष दिलें नाहीं. उलट शिवाजी महाराज क्षत्रिय नसतां गागाभट्टास लांच देऊन त्याकडून क्षत्रिय म्हणवून घेतलें यामुळे त्याच्या वंशाचा अधःपात झाला असे अपवित्र उद्वार काढून स्वामीनी आपल्या श्रोत्यांस दुखविलें. त्याशिवाय कायस्थ प्रभूंचे आपण गुरू म्हणून म्हणवीत असत. त्यांच्या ज्ञातीबद्दल अगदी अक्षम्य अज्ञान दाखविलें. अशा रीतीनें स्वामी आपल्या संचारात जेथे जातील तेथें तेथें कलीचा संचार करीत चालले आहेत.
सुधारक, सोमवार, मि।। फाल्गुन शु।। ६ शके १८२५
(२) करवीर सकेश्वर मठाधीश श्रीशंकराचार्य सारख्यानी आपला मठ सोडून देशसंचार करू लागणे यांत जरी काही विशेष नाही तरी हा संचार होत असता श्रींनी व्याख्यानें देणें ही गोष्ट विशेष आहे. याबद्दल श्रीचे अभिनंदन करणें अवश्य आहे. परंतु एकार्थी श्री ही व्याख्यानें देण्याचा नाद सोडून देतील तर बरे कारण नुकतेच त्यांनी महाडास जे व्याख्यान दिलें तें वाचून पाहता त्यावरून त्यांचा दुराग्रही स्वभाव इतर धर्म व मतें यांविषयी अनुदार वृत्ती, इतिहास ज्ञानाचा अभाव, प्रस्तुत धर्मविषयक चळवळी विषयीं अक्षम्य अज्ञान इत्याद्यनेक गोष्टी दिसून येतात. दुसरे असे की श्रीची स्वारी वैदिक पौराणिकांच्या लक्षांत मन घालून आपल्या अनुयायांस दुखदीत असल्याचे प्रसिद्ध झालें आहे. श्रीशंकराचार्याची गादी आपण चालविणारे असे सांगणारांनीसुद्धा एका उच्च वर्णाच्या गृहस्थाच्या येथे जावयाच्या वेळी वैदिक पौराणिकांचे घोडे पुढे आणावें ही किती शोचनीय गोष्ट आहे ।
सुबोधपत्रिका, ता. २८/२/१९०४
(३) स्वामीमहाराज हे आपल्या लवाजम्यानिशी व पूर्वाश्रमीची मुलेबाळें, जामातादि करून सर्व गोतावळा बरोबर घेऊन फिरतात हे काही अंशी गैर आहे हें स्वामींच्या लक्षांत आलें पाहिजे. तसेच नुसत्या पुड्या मिळविण्याकरितां किंवा दक्षिणा मिळविण्याकरितां देशोदेशी हिंडावयाचे नाही तर जातीजातीतील तंटे मिटविण्याकरिता तसेंच खऱ्या धर्मतत्वाची माहिती देण्याकरितां व हल्लींच्या काळी आर्यधर्माचे पालन कशा रीतीनें करिता येईल हे लोकांस शिकविण्याकरितां फेरी करावयाची हेंहि स्वामीनी विसरता कामा नये. आमच्या विश्वसनीय बातमीदाराकडून असे कळते की स्वामीनी आपल्या वर्तनाने एका जातीला विनाकारण दाखविलें आहे. कायस्थ प्रभु यांना वेदाधिकार आहे किंवा नाही याचा निकाल पेशवाईत ठरून गेला आहे. कायस्थ प्रभु जात क्षत्रियापासून झालेली आहे असा ऐतिहासिक पुरावा त्यानी जमविलेला आहे. त्याची धर्मकृत्यें वेदोक्त रीतीनें चाललेली आपण पाहतों. प्रभुज्ञातीची धर्मकृत्ये चालविणारे ब्राम्हणच आहेत हे सर्वविश्रुत आहे. अशा स्थितीमध्ये स्वामीमहाराजानी त्या जातीचा अपमान करावा व त्यांना ‘पुराणोक्त’ पूजेचा फक्त अधिकार आहे असा आग्रह धरून एका प्रभूचे येथील आयते वेळी निमंत्रण नाकारावें हें आमचे मते फार गैर आहे. आम्हांस वेदोक्ताचा अधिकार आहे असे त्या जातीचे लोक सिद्ध करावयास तयार असतां स्वामीनी आपलाच आग्रह चालवावा हे स्वामींच्या समबुद्धीला गैर दिसतें. स्वामीनी आपण सर्वजातीचे गुरू आहोत हे विसरता कामा नये........... गागाभट्टानें चोवीस लाख रुपये लांच खाऊन छत्रपती शिवाजीमहाराजांना शुद्ध `मराठे असतांना क्षत्रिय बनविलें व म्हणूनच शिवाजीच्या वंशाचा नायनाट झाला अशा प्रकारचा अव्यापारेषु व्यापार स्वामीनी करणे गैर आहे. या योगानें ते आपल्यास हास्यास्पद करून घेतील.
सुबोधपत्रिका, ता. २७/३/१९०४.
(४) आचार्यास प्रश्न "
रा. रा. सुधारककर्ते यांस :--
वि.वि: नुकतेच संकेश्वरचे श्रीशंकराचार्य महाद्वारा गेले होते त्यावेळी त्यांनी कायस्थ प्रभु ज्ञातीतील लोकांना वेदोका (कर्म) करण्याचा अधिकार नाही असे आपले मत दिले, त्यावर माझे खालील प्रश्न आहेत. (१) जी गोत्रे ब्राम्हण व क्षत्रिय याना समान आहेत ती कायस्थ प्रभूंचीही आहेत असें जर आहे, तर ते ब्राह्मण की क्षत्रिय ? (२) वेदोक्ताचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णाना आहे. या तिन्ही वर्णापैकी कायस्थ प्रभु नव्हेत हे श्रीशंकराचार्य कोणत्या आधारावर ठरवू शकतात ? (३) कायस्थप्रभूंच्या घरी हल्ली वेदोक्त चालविणारे ब्राह्मण आहेत त्यांच्या मतास काहीच मान नाही काय? (४) श्रीशंकराचायांची गादी ही ब्राह्मणांतल्या काही विशिष्ट मताच्या लोकांकरिता जर असेल तर गादीचें जगद्गुरुत्व करों राहते ?
आन्ग्र्याची वाडी,
गिरगाव, मुंबई.
आपला,
दामोदर रामचंद्र चिपळूणकर,
(कोंकणस्थ ब्राह्मण). सुधारक, ता. ९ मे सन १९०४.
याप्रमाणे महाडास ग्रामण्याचे बीज पेरून श्रीजगद्गुरूची स्वारी संचारार्थ पुढे निघाली असता ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी त्यानी हे प्रकरण उपस्थित केले. त्यामुळे सर्व चां का. प्रभु समाज अगदी बेदील होऊन गेला. ठिकठिकाणी या प्रकरणाची चळवळ चालू असता श्रीची स्वारी भिवंडी येथे गेली. त्या वेळी तेथील चां. का. प्रभू ज्ञातीचे पुढारी वकील रा. महादेव बाळकृष्ण ताम्हणे यांनी श्रीना पाद्यपूजेचे आमंत्रण केलें आणि स्वामींनीही त्याचा स्वीकार केला. परंतु महाड येथे जो प्रकार झाला त्याचीच पुनरावृत्ति याहि ठिकाणी झाली.
`वेदोक्ताचा तुम्हांस अधिकार नाही तेव्हां पुराणोक्त पूजा कराल तर येऊ` असा जबाब श्रीनीं दिला, तेव्हा पाद्यपूजेचा बेत रहित करून महाडकरांप्रमाणेच भिवंडीकरांनी श्रीस जगद्गुरू समजावयाचें नाहीं असें ठरविले. या वेळी स्वामीनी जातीचा अपमान करून पूर्वापार वहिवाट व आज्ञापत्रे याविरुद्ध वर्तन केल्याबद्दल स्वामीवर कायदेशीर तजवीज करावी असा भिवंडी येथील प्रभु मंडळीचा विचार होता. परंतु एकानें मूर्खपणानें गाय मारली म्हणून दुसऱ्याने वांसरूं मारूं नये आणि जगद्गुरूच्या गादीवर असलेल्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग कायस्थ प्रभूंनी आणला हा निष्कारण अपवाद आपणावर येऊ नये, म्हणून उदार मनाने हा विचार यानी सोडून दिला. इतक्या अवधीत श्रीची स्वारी ठाण्यास आली. ठाणे याथील प्रभु मंडळीने त्यांच्याबद्दल तीव्र उदासीनता दाखविली व श्रीच्या स्वारीची गावांत मिरवणूक येत असतां प्रभुमंडळीनी आपापल्या घरांची दारे बंद ठेवून त्याचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर स्वामींची स्वारी मुंबईस येऊन परत गेली व हे ग्रामण्य-प्रकरण तसेंच राहिलें.
परंतु कायस्थ प्रभुसमाज स्वस्थ मात्र बसला नाहीं. श्रीजगद्गुरुस्वामी विद्याशंकर भारती यांची स्वारी मुंबईस सन १९१३ साली आली असता ठाणे येथील मंडळीने पुढाकार घेऊन श्रींची मुलाखत घेतली व त्यांना हे सर्व प्रकरण समजाऊन दिलें. त्यावरून स्वामींची खात्री झाली की कायस्थप्रभूचे म्हणणे रास्त आहे. त्यावरून त्यांनी आज्ञापत्र दिलें तें खाली दिलें आहे
॥ श्री ॥
यादी रावबहादूर प्रभाकरराव गुप्ते वास्तव्य ठाणे यांजकडे सर्वाधिकारी नि। श्रीजगद्गुरू संस्थान पीठ करवीर (मठ करवीर, संकेश्वर, पैठण इ.) यांजकडून सुमारे १० वर्षांपूर्वी श्रीगुरूस्वामी विद्या नरसिंह भारती जगदगुरू शंकराचार्य याची स्वारी माहाडास गेल्या वेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीयांकडून वेदोक्त पाय घेण्याचे ठरले असता सदरहु वर्गाविरूद्ध असलेल्या लोकांनी अनेक अडचणीं श्री पुढे आणिल्यामुळे त्यावेळी वेदोक्त पाद्यपूज्या जाहाली नाहीं यामुळे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीवर्गाचा जो अपमान जाहला व त्यामुळे तो वर्ग उदासीन जाहला ही गोष्ट सांप्रतचे करवीर पीठाधिष्ठित जगत्गुरू श्री विद्याशंकर भारती स्वामी शंकराचार्य महाराजांना चांगली वाटली नाही. यामुळे सदरहू हकीकती संबंधानें संस्थानाकडूनच खुलासा होणे इष्ट वाटल्यामुळे श्री जगद्गुरू स्वामी महाराजांनी सकळ १७ शिष्यवृंदास जाहीर आज्ञापत्र बार अंक च काढले आहे त्याची अस्सल प्रत आपलेकडे १८३५ दाखल्यास पाठविली आहे. ती समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभु वर्गातील मंडळींत प्रसिद्ध करण्याची तजविज मेहेरबानीने करावी. आपण संस्थानचे पूर्ण साभिमानी अगत्यवादी आहांत विस्तारे ल्याहावे असे नाही. २०१७/१३. (सही इंग्रजी) जी. एस. पिशवीकर,
सर्वाधिकारी नि। जगदगुरू.
-आज्ञापत्र
श्रीमत्करवीर धर्मपीठाच्या चातुर्वण्यं शिष्यवृन्दातील चान्द्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातिवर्ग क्षत्रियवर्णाचा असून या ज्ञातिवर्गात वैदिक कर्माधिकार पूर्वापार चालत आलेला आहे. मध्यंतरी शके १७४७ चे सुमारास वस्तुस्थितीचा विपर्यास करून चान्द्रसेनीय कायस्थ प्रभूनां वेदाधिकार नाही म्हणून ग्रामण्य माजले होते. तत्कालीन करवीर पीठाधिष्ठित जगद्गुरू श्री विद्यानृसिंह भारती (मत करवीर, संकेश्वर, खिद्रापूर, पैठण इत्यादि) यांची स्वारी पुण्यास पर्वतीच्या मुकामी झाल्यावेळी त्या वेळच्या कांही राजकीय पुढाऱ्यांच्या दुराग्रहामुळे श्री संस्थानास अपाय होऊ नये ह्मणून चान्द्रसेनीय वर्गाविरुद्ध आसलेल्या मंडळींचा शास्त्रार्थ मान्य करून तदनुरोधानें श्रीसंस्थानांतून आज्ञापत्र दिलें गेलें होतें.
पुढें चान्द्रसेनीय वर्गातील लोकांकडून त्या संबंधानें श्रीसंस्थानाकडे विनंति करण्यात आल्यावरून त्यांच्या ज्ञातिविषयी सर्व प्रकारचा शास्त्रार्थ योग्य प्रकारे पाहून चान्द्रसेनीयांना वेदाधिकार नाहीं छाणून दिलेले आज्ञापत्र रद्द करून ते वैदिक धर्माधिकारी असल्याचा निर्णय श्रीविद्यानृसिंह भारती स्वामिपादानी करून आज्ञापत्रे पाठविली त्यांतील मुख्यतः मजकूर असा आहे :
वेदशास्त्रसंपन्न राघवाचार्य यांना श्री संस्थानाकडून आज्ञापत्र गेलें त्यांत या ग्रामण्यासंबंधाने चान्द्रसेनियाना वेदाधिकार असल्याबद्दल राघवाचार्यांनी शास्त्रार्थ दिला होता पण त्याचा विचार न होता तत्कालीन राजकीय पुढाऱ्याकडून श्रीसंस्थानास अपाय होईल, या भीतीनें चान्द्रसेनियांच्या वैदिक कर्मास बाधक असे आज्ञापत्र कसें दिलें गेलें याची सायन्त हकीकत लिहून पत्राच्या शेवटी आज्ञापिलें आहे की, "यदग्रंथानुरोधेन चान्द्रसेनीय कायस्थानां वैदिककर्माधिकारी बाधक पत्रं प्रतिपक्षी अस्मत्सकाशात गृहीतवान् तादृश्यग्रंथीयवचनैरेव चान्द्रसेनीयाना वैदिककर्माधिकार धनात् भवदीयशास्त्रार्थः सत्यः चान्द्रसेनीय विहरिणान्तु संस्थानोपद्रव भीत्यादत्तंशासनपत्रं वंचनार्थ पर्यालोचनेन मिथ्यैव`
श्रीविद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांचे समस्त ब्राह्मणास पत्र शके १७५२ सालाचें यांत "जी पत्रे व सारांशाच्या यादी चान्द्रसेनीय प्रभूज्ञातीकडील वैदिक कर्म उच्छेदाविसी आम्हापासून घेऊन जागोजागी पाठविली ती दरोबस्त खोटी, सबब रद्द करून हल्ली हे पत्र लिहिले आहे. तरी चान्द्रसेनीय कायस्थ प्रभूज्ञातीस शास्त्रग्रंथानुमते वेदकर्माधिकार आहे हें त्रिवाच्य सत्ये श्रीदेवागृही बसून हे पत्र लिहून सर्वांस कळावयाकरिता पाठविलें आहे, तरी प्रभुज्ञातीकडे वैदिककर्म परंपरागत चालवीत जाणे.
याप्रमाणे वरील ग्रामण्यसंबंधाने श्रीविद्यानृसिंह भारती स्वामी जगद्गुरू यांनी योग्यप्रकारें निकाल केला होता. अर्थातच चांद्रसेनीयांचे प्रतिपक्षी ब्राह्मणांना तो शेवटचा निर्णय बरा वाटला नाही तरी इतर ब्राह्मणास तो निर्णय मान्य होऊन चांद्रसेनीय कायस्थ प्रभुज्ञातीतील वैदीक परंपरा कायम राहिली ही समाधानाची गोष्ट आहे.
सुमारे १० वर्षांपूर्वी इकडील श्री गुरुस्वामिपादाचे संचारोदेशें महाडास जाणे झाल्या वेळी तेथील चन्द्रसेनीय कायस्थ प्रभु मंडळीनी मोठ्या प्रेमभावाने श्रीची पाद्यपूजा करण्याचे ठरवून श्रीस विनंति केली व श्रीगुरुपादांनाही विनंतीस मान देऊन वेदोक्त पाद्यपूजा घेण्याचे मान्य केले. पण चान्द्रसेनीयांच्या विरूद्ध पक्षातील लोकांनी श्रीपुढे अनेक प्रकारच्या अडचणी हट्टानें आणिल्यामुळे व त्यास श्रीबरोबर असलेल्या कार्यकारी मंडळीचेही अनुकूल मत पडल्यामुळे श्रीगुरुच्या मनांतून चान्द्रसेनीयांची वेदोक्त पायपूजा घेण्याचे असताही ती वेदोक्त पाद्यपूजा झाली नाही. त्यामुळे चान्द्रसेनीय कायस्थ प्रभू वर्गाचा संस्थानाकडून अपमान झाला व तो वर्ग श्रीसंस्थानाविषयी उदास झाला ही गोष्ट चांगली झाली नाही. त्यावेळी श्रीगुरुमहाराजाबरोबर संस्थानातील कागदपत्राचा पुरावा असता तर प्रतिपक्षीयांच्या व संस्थानचे कार्यकारी मंडळीच्या आग्रही सल्याचा काही उपयोग न होतां प्रभु मंडळीकडून वेदोक्त पायपूजा श्रीगुरुमहाराजांनी घेतली असती यांत तिलप्राय शंका नाहीं.
अलीकडे इकडील संस्थानचे सर्वाधिकारी रा. रा. गुडो सखाराम पिशवीकर यांनी संस्थानच्या दप्तरांतील अवशिष्ट राहिलेली कागदपत्र शोधून काढून ते व इतर पुरावा संस्थानदेवतेपुढे मांडला. तो अवलोकन करून आणि शास्त्रीय ग्रंथ पाहिल्यावरून इकडील पूर्ण खात्री झाली की, चान्द्रसेनीय कायस्थ प्रभुज्ञातीस वेदाधिकार आहे इतकेंच नव्हे तर विरुद्धपक्षीयांनी इतकी खटपट केली तरी त्याच्यांत वैदिक कर्माची परंपरा आजवर अबाधितपणें चालू राहिली आहे. आता महाड येथे चान्द्रसेनीय कायस्थ प्रभुज्ञातीचा जो अपमान झाला व त्या ज्ञातीत श्रीसंस्थानाबद्दल जी उदासीनता उत्पन्न झाली ती दूर होण्याकरिता श्री संस्थानाकडूनच खन्या हकीगतीचा खुलासा होणे इष्ट आहे असें संस्थानदेवतेस बाटल्यावरून या पीठाच्या चातुर्वर्ण्य शिष्यवृंदास अशी आज्ञा करण्यात येते की :
"भान्द्रसेनीय कायस्थ प्रभुज्ञातिवर्ग या पीठाच्या चातुर्वर्ण्य शिष्यवृंदातीतील क्षत्रिय वर्णाचा असून त्यांस वैदिक कर्माचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्यांत वैदिक कर्मपरंपरा चालत आलेली आहे व ती तशीच अबाधितपणे चालवीत जावी अशी संस्थानदेवतेची आज्ञा आहे. `
ब्रह्मशत्रदिशः शूद्राः सर्ववर्णाः परस्परम्।
प्रीतिमंतो धर्मरतानन्दन्तुमुखशालिनः ॥ १ ॥
इति शिवम्
मिति आषाढ वद्य २ शके १८३५ प्रमादिनाम संवत्सरे ता. २० माहे जुलई सन १९१३ इ. मुक्काम शहर मुंबई, महानुशासनंवरीवर्ति.
बारअंक
१७
___
१८३५
****
प्रकरण २
क्षत्रिय मराठे
"जर महाराष्ट्र ब्राह्मण खोटा ब्राह्मणत्वाचा हट्ट धरून क्षत्रियास लोळविण्यास पहातील. तर जी आमची महाराष्ट्रभूमी आजपर्यंत कधींच तदभिमत दुराग्रही जातिभेदाचे माहेर झाली नाही, ती तशी पुढे होण्याचा संभव नाहीं. तेव्हा क्षत्रियच त्यास उलट लोळवून टाकतील."
कै. भागवतांचे मऱ्हाठ्यांच्या संबंधानें चार उद्गार पृ. १८४. मराठे क्षत्रिय आहेत की नाहीत, असल्यास त्यांना वेदोक्त कर्मे करण्याचा अधिकार कां नसावा, हा वाद अगदीं अर्वाचीन आहे. महाराष्ट्रांतील हिंदू राजघराण्यांचा इतिहास पाहिला तर त्यांत एकच गोष्ट अगदी ठळकपणाने दिसून येते की क्षात्रधर्माचे परिपालन पूर्वापार तों आजपर्यंत जर कोणी एकनिष्ठेनें केलें असेल तर तें क्षत्रिय मराठ्यांनीच. महाराष्ट्रांतील प्राचीन जुने मराठ्यांचे राजघराणे म्हटले म्हणजे जाधवचें. जाधव म्हणजेच यादव. राजसत्ताधारी यादव हे श्रीकृष्ण परमात्म्याच्या थोर कुळांतले. श्रीकृष्ण हा सर्वसंमत क्षत्रिय होता. तेव्हां अर्थातच यादव व त्यांपासून उत्पन्न झालेले जाधव हेही क्षत्रियच होत. जाधवांच्या काळीं क्षत्रिय मराठे खास होते. खुद्द ज्ञानेश्वरानी देवगिरीच्या रामदेवरावाला "क्षत्रिय कुलावतंस" म्हटले आहे. जाधवांच्या राजकीय सत्तेचा अस्त झाल्यावर मुसलमानांची सत्ता महाराष्ट्रांत अप्रतिबंध चालू झाली. मुसलमानांच्या अव्वलीपासून तो श्रीशिवाजीमहाराजांची सत्ता दृढमूल होईपर्यंत दक्षिण हिंदुस्थानांतील साया हिंदूसमाजाला परधर्मीयांसी टक्कर देण्यांत गुंतल्यामुळे आपापल्या धार्मिक आचारांचें यथाशास्त्र पालन करणें केव्हांही शक्य नव्हते. त्यामुळे हिंदुधर्मानुयायी लोकांना प्रसंग पडेल त्याप्रमाणे वारा वाहील तशी पाठ फिरवून धर्मजागृतीपुरता आधार व विचार जिवंत राखण्यांपलीकडे अधिक कांही करता येत नसे व ते त्यांनी प्राणैः कंठेर्गतेरपि केलें हेंच अधिक स्तुत्य केलें. मुसलमानी अमदानीत क्षत्रिय हिंदूंपैकी अग्रेसरत्वानें पुढे आलेल्या जाती कायत्या दोन, एक चां. का. प्रभु व दुसरे मराठे. पैकी चां. का. प्रभूंची संख्याच मुर्ती अल्प असल्यामुळे त्या काळच्या इतिहासांत त्यांचा उल्लेख व्हावा तितका झालेला नाहीं; कदाचित् थोडाफार झाला असल्यास तो तुरळक तुरळक नामनिर्देशापलीकडे अधिक उपलब्ध तरी नाही. संख्येने व ऐतिहासिक महत्वानें मराठे अधिक यामुळे त्यांचा निर्देश इतिहासांत पुष्कळ आढळून येतो. श्रीकृष्णदेवाच्या अवताराने पुनित झालेल्या देवगिरीच्या जाधवाच्या कुळांत उत्पन्न झालेली जीजाबाई आणि श्रीरामावतारनें अलंकृत झालेल्या मेवाडच्या भोंसले घराण्यांतील शहाजी या जगद्वंद्य मातापित्याच्या उदरीं श्रीशिवाजीमहाराजांचा जन्म झाला.त्यांनी अविश्रांत परिश्रम करून खरोखरच शून्यापासून ब्रह्म उत्पन्न करावें त्याप्रमाणे स्वराज्यस्थापना करून मराठयांचा क्षात्रधर्म अधिक उज्वल केला व स्वपराक्रमाचा चौखंडी धौशा गाजविला. हा काळ उत्क्रांतीचा होता. हिंदूधर्म आणि हिंदूसाम्राज्य यांच्या उन्नतीचा होता.
प्रतापसूर्य श्रीशिवाजीमहाराज यांचा महाराष्ट्रीय क्षितिजावर उदय होतांच क्षात्रवृत्तीची स्तवने गात गात त्याचे स्वागत करायला जे दोन चंडोल आत्मस्फूर्तीनें पुढे सरसावले ते मराठे (मावळे) आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज हे होत. एकदील झालेल्या या दोन समाजांच्या एकीनें शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या महत्वाकांक्षेला न भूतो न भविष्यति असें चैतन्य प्राप्त होऊन हां हां ह्मणतां मयाच्या नगरीप्रमाणे सह्याद्रीच्या धुळीच्या कणांतून स्वराज्याचा टोलेजंग प्रासाद निर्माण झाला. हृदयांत सदैव खेळत असलेली स्वराज्यस्थापनेची गुजगोष्ट श्रीशिवाजीमहाराजांनीं प्रथम दादजी नरस प्रभू देशपांडे या चांद्रसेनीय कायस्थ प्रभूच्या कानांत सांगितली आणि दादोजी कोंडदेवाच्या विद्यमानें रोहीडेश्वराच्या स्वयंभू पिंडीसमक्ष शिवाजी व दादजी प्रभू यांच्या परस्पर आणाभाका झाल्या, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. कायस्थ प्रभूंच्या अनुवंशिक मुत्सद्देगिरीचा धनुर्धारी मराठयांच्या तलवारीशी संयोग होतांच, यक्षिणीच्या कांडीप्रमाणें साऱ्या महाराष्ट्राचा नूर बदलून गेला. एकसमयावच्छेदेंकरून स्वराज्यांचा चौघडा सर्व हिंदूंच्या हृदयांत रात्रंदिवस झडूं लागला. डोईजड झालेलें गुलामगिरीचें कवच धाडकन् कोसळून पडल्यामुळे, त्याच्या दणक्याखालीच स्वार्थी भावनांचा चुराडा उडून, सर्व महाराष्ट्रीय हिंदू समाजांत स्वार्थत्यागाची कल्पना विद्युत्वेगानें सनसनाट करूं लागली. मुसल्मानी सत्तेच्या गुळचट मानपानाची तोंडास मिठ्ठी बसल्यामुळे, कडूच को होईना पण स्वयंनिर्णय-तत्त्वाचा अक्कलकाढा चोखण्यास राष्ट्राची जिभली वळवळ करूं लागली आणि सन १६४६ त तोरणगडावर शिवबाने स्वराज्याचे तोरण बांधून महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे निशाण उंच फडकवितांच, त्याच जिभल्यांनी श्रीशिवाजीमहाराजांचा विजय असो अशा गगनकटाहभेदी आरोळ्या ठोकल्या. या आरोळयांचा प्रतिध्वनि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आपला स्फूर्तिदायक पडसाद उमटवूं लागतांच सर्व दर्जाचे व सर्व जातीचे हिंदू लोक भराभर शिवाजीच्या निशाणाखालीं जमा झाले आणि त्यांनी आपल्या संघटित शक्तीनें शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेच्या कल्पनेला व्यापक स्वरूप आणलें.
मराठी राज्याचा अंमल चोहींकडे बसून हिंदूंच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा वचक केवळ हिंदुस्थानांतच नव्हे, तर रुमशामच्या यवनी सिंहासनाच्या पायथ्याशी जाऊन भिडतांच शिवाजीमहाराज व त्यांचे मुत्सद्दी यांना यवनी अंमलाखाली मलीन झालेले हिंदूंचे धार्मिक आचारविचार पुनरुजीवन करण्याची इच्छा सहाजीकच झाली. शिवाय, महाराष्ट्रीय हिंदूंचा ओढा निसर्गतःच धर्मप्रवृत्तीकडे असल्यामुळे, राजकीय स्वातंत्र्याची इमारत चिरंजीव करण्याकरितां धर्मस्थापनेच्या उद्देशाची कोनशिळा तिच्या पायांत प्रथम बसविणें हेंच आपलें आद्यकर्तव्य आहे, असें शिवाजीसारख्या चाणाक्ष राष्ट्रपुरुषानें ताडलें, यांत त्यांची दूरदृष्टीच विशेष दिसून येते. महाराष्ट्राच्या धर्मप्रेमाच्या मर्मालाच याप्रमाणें चेतना देतांच शिवाजीमहाराज हे अवतारी पुरुष आहेत. ही पवित्र भावना चारी वर्णाच्या आबालवृद्धांत जागृत झाली आणि शिवाजीनें तारुण्याच्या पूर्वरंगांत हृदयावर कोरून ठेवलेल्या
प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता । शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।
या उदेशमुद्रेप्रमाणे "हिंदुधर्म प्रतिपालक" ही कीर्ती प्रतिपच्चंद्ररेखेव वृद्धिंगत होऊ लागली. शहाजी राजांची मुत्सद्देगिरी व शौर्य ही जितकी शिवाजीमहाराजांत प्रतिबिंबित झाली होती, तितकीच किंबहुना त्याच्या शतपट त्यांच्या मातोश्रीची धार्मिक प्रवृत्तीहि त्यांच्यांत रसरसलेली होती; म्हणजे राजकीय क्षेत्रांत महाराज जरी सवाई सिंह होते तरी धार्मिक क्षेत्रांत त्यांच्याइतके मनाचे मवाळ तेच होते. धार्मिक प्रवृत्तीकडे जात्याच ओढा असल्यामुळे आणि तो ओढा शंभर नंबरी कसाचा असल्यामुळेच समर्थ रामदासासारख्या निस्पृही वैरागी आणि सत्यप्रिय महापुरुषाने त्यांना पट्टशिष्यत्वाचा अग्रमान दिला व तुकारामासारख्या सिद्धानें त्यांना "निश्चयाचा महामेरू" अशी संज्ञा दिली. अर्थात् "हिंदुधर्मसंस्थापन" व “गोब्राह्मण प्रतिपालन" या उद्देशाविषयीं जनतेला लवमात्रहि संशय न येण्याइतकें महाराजांचे अंतर्बाह्य वर्तन शुद्ध होतें.
स्वराज्याचा पाया शिवाजीसारख्या महापुरुषाच्या हातून ठाकठीक बसल्यावर हिंदूधर्माचाही पाया पुनः ठाकठीक बसवून धर्म व राजकरण यांची अभेद्य जोडी एकत्र करण्याचा विचार निघाला आणि त्याचें पर्यवसान शिवाजीमहाराजांना शास्त्रोक्त राज्यभिषेक करावा या बेतांत झाले. हा राज्याभिषेकाचा प्रश्न त्या काळच्या परिस्थितीचा विचार करता इतका महत्वाचा व अत्यावश्यक होता की, त्याला विरोध करण्याची नुसती कल्पना करणारे मस्तक महाराजांनी जरी तत्काळ छाटून टाकलें असतें तरी त्यांनी अफझुलखानाच्या वधाइतकेंच महत्वाचें राष्ट्रीय कार्य केले, असा इतिहासकारांचा शेरा खात्रीने पडला असता. परंतु शेवटीं त्या महत्वाच्या कार्यात “भटच पडला”. राज्याभिषेक फक्त क्षत्रियाला होतो, इतरांस नाहीं, असें पडलें शस्त्र आणि शिवाजी पडला ‘मराठा’ मराठा म्हणजे कोण ? लागली शास्त्र्यांची डोकी एकमेकांवर फुटायला. झालें. ठरलें. मराठा ह्मणजे शूद्र. शूद्राला राज्याभिषेक व्हावयाचा नाही. मराठा म्हणजे शूद्र? बरोबर. मुळी, सध्याच्या युगांत ब्राह्मण व शूद्र हे ( नंदात क्षत्रियकुल हे हवे असल्यास मगध देशास लागू होईल. पण आमच्या महाराष्ट्र मंडळास कदापि लागू होणार नाही. आमचे पूर्वज कांही आम्हापेक्षा कमी ब्राह्मण होते असे नाही. एका प्रकाराने त्यांचे ब्राह्मण्य निःसंशय आमच्यापेक्षा अधिक जाज्वल्य होतें. तरी ते सर्व ही कुळे अस्सल क्षत्रिय समजत गागाभट्टानें शिवाजीची मुंज केली, ती असला विचार केल्याशिवाय नव्हे. असे असता दुराग्रहानें त्यांस ‘कुळंबट’ किया ‘कुळंबी’ किंवा ‘शूद्र’ म्हणणे, वरील ब्राह्मण मंडळीचे जर आम्ही अस्सल वंशज खरे तर आम्हांस बिलकूल शोभत नाही." - कै. प्रो. भागवत म. सं. चा. उद्गार पृ. १९३.) दोनच वर्ण कायते शिल्लक, बाकीचे कधीच गेले विलायतेच्या सफरीला निघून. ही धडधडीत शास्त्रप्रणित मल्लीनाथी. जर शिवाजी ब्राह्मण नाही तर तो (“शिवाजीसारख्या अवतारी पुरुषाने ज्या जातीत जन्म घेतला, ती जात जरी चाडाळांपेक्षाही हलकी असली, तरी ब्राह्मणांस वंद्य झाली, असें आम्ही समजतों. पण शिवाजीची आई जाधव कुळांतली व जाधव हे यादव, अर्थात् अस्सल क्षत्रिय, ज्या कुळाचा व यादवांचा संबंध झाला तेंहि अस्सल क्षत्रिय कुळ असले पाहिजे.` तेव्हा भोसले वगैरे सर्व ‘मऱ्हाठे’ म्हणविणारी जात अस्सल क्षत्रिय होय. त्यांस शूद्र म्हणून किंवा कुळंबट म्हणून जर अविचाराने आमचे ब्राह्मणबंधू गालिप्रदान करतील, तर फुकट मोठ्या वाग्दोषास पात्र होतील व देवाच्या घरी निःसंशय अपराधी ठरतील."कित्ता- पृ. १८७.
विद्वान देशभक्त महादेवराव राजाराम बोडस, एम.ए. एलेल्बी यांना चित्रमय जगत् (जाने. १९१९) च्या अंकांतील त्यांच्या ‘वर्णाश्रम व्यवस्था’ लेखाप्रीत्यर्थ प्रस्तुत टीपपेंतील कै. भागवतांचे विचार आम्ही मोठ्या नम्रपणाने आहेर करतो.) शूद्राशिवाय आणखी कोणत्या वर्णांचा असेल? अर्थात् ब्राह्मणांनी व पिंगळ्यासारख्या स्वामिनिष्ट ब्राह्मण मुत्सद्यांनीसुद्धा राज्याभिषेकाची कल्पना समूळ हाणून पाडण्यासाठी कांस मारली. परंतु महाराष्ट्राचे भाग्य म्हणून म्हणा किंवा त्याला स्वतंत्र राज्यस्थापनेचा ऐतिहासिक सुखसोहळा याच जन्मी याच डोळा पहावयाचा होता हाणून हाणा, या लेखाच्या शिरोभागी उद्धृत केलेले क. भागवतांचे स्पष्टोद्गारच अखेरीस खरे झाले तत्कालीन् ब्राह्मणांच्या दुराभिमानाला लोळवून सपशेल चीत करायला अखेर एक क्षत्रिय वीरच पुढे सरसावला !!
श्रीशिवजयंति किंवा श्रीशिवराज्याभिषेकोत्सव करणाऱ्या आधुनिक पुणेकर देशभक्तांना शिवकालीन चां. कायस्थ प्रभु वीर व धीरांगना यांची जरी किंमत वाटत नसली आणि इतिहासविषयक नवीन ग्रंथांतून त्यांना सफाई चाट देण्याचा त्यांचा मनोदय पेशव्यांच्या पायांच्या पुण्याईनें तडीस गेला, तरी खरा इतिहास ज्यावेळी श्रीछत्रपतीचा जयजयकार करतो त्यावेळी बाळाजी आवजी चिटणीसाचाहि जयजयकार करतो, प्रभू बाळाजी आवजी चिटणीस हा दुसरा शिवाजीच होता असे म्हणण्यांत लवमात्र अतिशयोक्ति व्हावयाची नाहीं. शिवाजीमहाराजांना शास्त्रोक्त राज्याभिषेक करण्याची प्रतिज्ञा पार पाडतांना त्यानें दुराग्रही ब्राह्मणांचा छळ कसा सोसला आणि सरतेशेवटी आपल्या निश्चयी व ओजस्वी बुद्धिप्रभावानें ती प्रतिज्ञा कशी पार पाडली, त्याचा इत्यंभूत मजकूर चां. का. प्रभूंवरील चवथ्या ग्रामण्यांच्या इतिहासांत दिलेला असल्यामुळे त्याचा पुनरुच्चार येथें करीत नाहीं. स्वतःच्या कोरड्या ब्राह्मण्याच्या अभिमानापुढे प्रत्यक्ष राष्ट्रहिताचा आणि कृतज्ञतेचाहि बळी देण्यास त्या वेळच्या ब्राह्मण म्हणविणारांनी मागेंपुढे कसें पाहिलें नाही. आणि कांही काळपर्यंत जरी त्यांनी राष्ट्रेक्याचे पोवाडे इतर महाराष्ट्रीयांबरोबर गाण्यास कां केलें नाहीं तरी परोत्कर्षाची वेळ येतांच त्यांच्या कपाळाच्या शिरा कशा ठणकूं लागल्या, हे वाचकांस त्या मजकुरावरून स्पष्ट दिसून येईल.
ज्या शिवाजीमहाराजांनी केवळ सार्वजनिक राष्ट्रीय भावनेनें स्वराज्य स्थापनेचा जगड्व्याळ उपक्रम केला, चारहि वर्णाना महाराष्ट्रीय या एकाच सूत्रांत ओंवण्याचा उदात्त प्रयत्न केला, त्याच शिवाजीवर आणि त्याच्या निस्सीम पक्षपाती चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मुत्सद्यांवर ग्रामण्यांचा हल्ला चढवून ब्राह्मण म्हणविणाऱ्यांनी अशा रीतीनें स्वराज्याच्या जरीपटक्याशेजारीच जातीभेदाचा उलटा खराटा बांधण्याचा नीच उपव्याप केला.
शिवावतारापूर्वीच्या देशकालपरिस्थितीचा विचार केला असतां, त्यावेळी महाराष्ट्रांत छोटेखानी राज्यक्रांत्यांच्या लाटांवर लाटा इतक्या त्वरेनें एकीतएक मिसळून उसळत येत होत्या की खुद्द ब्राह्मण म्हणविणारांनाहि आपल्या ब्राह्मण्याची दाद नव्हती मग नेहमींच हातांत शस्त्र धारण करून शाहूपासून देशाचा बचाव करण्यांत पिढ्यानपिढया गुंतलेल्या क्षत्रिय मराठे वीरांना क्षत्रियांच्या धर्मकर्माचरणाविषयी विसर पडला असल्यास यांत काय नवल? चारी वर्गाच्या धर्माचरणावर कालगतीने पडलेला विस्मृतीचा उकीरडा साफ झाडून महाराष्ट्रांत त्याचा जीर्णोद्धार करण्यास वैदिक सनातन धर्माच्या खजिन्याच्या किल्ल्यांचा जुडगा कडोसरीस बाळगिणारा (पेशवाई होण्याच्या पूर्वी एकट्या ब्राम्हण जातीने म्हणून महाराष्ट्रात काही केलेले नाही. -कै. प्रो भागवत, उद्गार) ब्राह्मणबच्चा कोणीच पुढें येईना. हें कार्य करण्यास भगवद्दिच्छेनें शिवाजी हा क्षत्रिय मराठा पुढे आला, त्यानें धर्म व राजकरण ही अभेद्य जोडी पुनरुज्जीवित व निगडित केली आणि क्षत्रियांच्या पूर्वापार प्राचीन वहिवाटीप्रमाणे स्वतःस राज्याभिषेक करून घेण्याचा निश्चय केला असतां, ब्राह्मणांनी पुनश्च त्याच विस्मृतीच्या उकीरड्यांत लोळावे व शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषावरहि तो उकीरडा उधळण्याची दिक्कत बाळगू नये, इतकें नीच कृतघ्नतेचे उदाहरण जगाच्या इतिहासांत हेंच! मराठे जात्याच क्षत्रिय असल्यामुळे त्यांना वेदविहित कर्मे आचरण्याचा अधिकार निःसंशय होताच; परंतु त्यांना त्यांची जाणीव मात्र उरली नव्हती. मराठे क्षत्रिय असल्यामुळे वेदाधिकारीच आहेत. व शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक वेदोक्तच झाला पाहिजे असे प्रतिपादन करून बाळप्रभूनें आपल्या सर्व प्रतिपक्षियांस निरुत्तर केलें. विरुद्ध पक्षियांच्या दुराग्रहामुळे बाळाजीचे सर्व प्रयत्न फुकट जातात की काय असा सुमार वाटू लागला. परंतु संकटाची परंपरा जसजशी जास्त येईल तसतशी अंगीकृत कार्य पार पाडण्याची श्रीमंताची उमेद वाढतच जाते. त्याप्रमाणे बाळाजीनें शिवाजी महाराजांच्या वंशावळीचा पत्ता लावला. त्यांचे मूळ मेवाडच्या राजघराण्यांतून श्रीरामचंद्रापर्यंत अस्खलीत सिद्ध केलें. गागाभट्टासारख्या बृहस्पतीला अनुकूल करून घेऊन आपले क्षत्रियत्व व त्याबरोबर दरोबस्त मराठ्यांचे क्षत्रियत्व बाळाजी आवजीनें पुनश्व प्रस्थापित केलें. अशा रीतीनें मराठ्यांच्या वेदोक्त कर्माधिकारांची व क्षत्रियत्वाची प्रस्थापना करण्याच्या कामी एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू वीराचाच स्वार्थत्याग खर्ची पडलेला आहे.
जातिभेदाचे बीजारोपण करण्याचा मान ब्राह्मणांकडे जातो. खुद्द शिवाजी विरुद्धच वेदोक्ताचे बंड उभारून जातिभेदाच्या जोडीनेंच कृतघ्नतेचेहि पातक तत्कालीन ब्राह्मणवर्गाकडून घडलें, हे नमूद करायला आमच्या लेखणीस फार कष्ट होत आहेत. शिवाजी महाराजांच्या व्यापक राष्ट्रीय भावनेचा उदात्त विचारसरणीचा व कनवाळूपणाचा गैरफायदा घेऊन, ही वेदोक्ताची बंडाळी ब्राह्मणांनी ठिकठिकाणी या नाही त्या रूपानें चालूच ठेवली होती, असें इतिहासावरून दिसते. या बंडाळीमुळे महाराष्ट्रांतील एकदील झालेल्या जातीजातीत फूट पडेल आणि एवढ्या दुर्घट परिश्रमानें हजारों वीर-कलिजांचे बळी देऊन स्थापन केलेली मराठेशाही हां हां म्हणतां पुनश्च परक्या लांडग्यांच्या भक्षस्थानी पडेल, ही विवंचना शिवाजी महाराजांना रात्रंदिवस त्रस्त करीत होती, असें त्यांच्या खाली दिलेल्या फर्मानावरून उघड होत आहे.
प्रतीपच्चन्द्र रेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥ शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ॥
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नलनाम संवत्सरे माघ शुक्ल ५ क्षेत्रीये कुलावतंस श्री राजा सिवाजी छत्रपती स्वामी याणी समस्त ब्राह्मणवेदपाटी व ग्रहस्थान व क्षेत्रीय मंडली तथा प्रभु ग्रहस्थान व वैश्य ज्ञाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व ज्ञाती हिंदु महाराष्ट्रान तथा महालानि देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यांस आज्ञा केली जैसिजे. हिंदु ज्ञातीत आनादि परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत अले असता अलीकडे काही दिवसात येवनी आमल जाहल्यामुळे काही ज्ञातीतील लोकास बलात्कारे धरून भष्ट केले व कितेक जागीची दैवते जबरीने छिन्नभिन्न केली. हिंदु ज्ञातीत आहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उत्छद होण्याचा समये प्राप्त जाहला. त्याजवरून श्री ईश्वरी कृपेने आमचे हाते श्रीसांबजीने यवन वगैरे दुष्टास शासन करऊन पराभवाते गेले व राहिले ते शत्रू पादाक्रात होतील. परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारांत राज्याभिषेक समई क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादि सर्व जमा करून धर्मस्थापना जाहली त्यांत श्री कासी क्षत्रस्थ सिष्ट ब्राह्मणांत काही तड पडून हानी ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत जाहली आहे. ठरले त्याजवरून हाली पुन्हा शास्त्री पंडित व मुदसदी व कारकून यांस आज्ञा होऊन ज्ञातिविवेक व स्कंद पुराणांतरगत श्याद्रीखंड अदी माहन ग्रंथी निरणय सर्व ज्ञातीविसी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणं निरवेध चालावे अगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकांचा अधिकार असून वनी जाहल्यामुले आथवा ब्राह्मणानी काही द्वेषबुध्धीने शास्त्रांनरूप कर्मे न चालविता मलीन जाहली असतील ती त्या ज्ञातीचे मंडलीनी पुरी पाहून ज्याची त्याणी नीट वहिवाट आचरणे. ज्या ज्ञातीत जसी परंपरा चालत आली त्याप्र चालवावी. जो कोणी द्वेषबुध्धीने द्रव्येलोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहीत नवीन तंटे करून खलेल करील येविसी त्या ज्ञातीवाले यानी सरकारांत अर्ज करावा. म्हणजे शास्त्राचे समते व रुढीपरंपरा व ग्रंथ पाहून सरकारांतून निरंतर निरमत्छ्पणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरीता परनिष्ट जेव्हा तेव्हांच त्वरीत बंदोबस्त होत जाईल. हली येवन उत्तर देसीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातीने यक दिल राहून कस्त मेहनत करून सरकारची सेवा करून शत्रू पराभवाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणिजे मर्यादेयं विराजते.
यावरून स्वराज्याइतकीच स्वधर्माची काळजी करणारे शिवाजीमहाराज होते हैं जरी सिद्ध होत असले तरी राज्यभिषेकप्रसंगी ब्राह्मणांनी रुजत घातलेल्या जातिभेदाची जाळी पुढेपुढे राजकारणांतहि अडथळा आणूं लागलीं होतीं, हेंहि विशेष स्पष्ट होत आहे. तरीदेखील आमचे * ‘मराठे आणि इंग्रज` कर्ते दडपून सांगायला तयारच आहेत की, " शिवाजीनें ज्यावेळीं महाराष्ट्रमंडळांत एकी करून मुसलमानांपासून देशाचे संरक्षण करावयाचे योजिलें त्यावेळी त्यानें जातिभेदाविरुद्ध व्याख्याने दिलेली आढळत नाहींत." बिचारा शिवाजी! त्याच्या नशिबावर अक्षरशत्रुत्वाचा मारलेला शिक्का अझून निघतां निघत नाहीं, तर त्याला अलिकडच्या मनुंतील बोलघेवडया शिवाजीसारखी व्याख्याने देण्याची कला कसली अवगत असणार ? असो.
गागाभट्टासारख्या पंडीतानें दरोबस्त महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या समक्ष शिवाजीची मुंज वेदोक्त मंत्रांनी लावली आणि राज्यभिषेकहि वेदोक्त मंत्रांनीच केला. या ऐतिहासिक सुप्रसंगानें मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचा आणि वेदोक्त कर्माधिकाराचा पाया ठाम बसविला आणि तसें ब्राह्मण म्हणविणारांना कबूलहि करावयास लावले. ही वेदोक्त कर्माची परंपरा संभाजीमहाराज, राजाराम व शाहू यांच्या कारकीदींपर्यंत अबाधित चालली होती. परंतु शाहूच्या अमदानीत चित्पावन भटाचें पाऊल राजकारणाच्या क्षेत्रांत पडतांच त्या परंपरेला पुन्हा ग्रामण्याच्या बंडाळीचा शह लागला. एकवार हडसून खडसून सिद्ध झालेल्या परंपरेचें वास्तविक उच्चाटन करून ब्राह्मणांना काय लभ्यांश मिळणार होता? त्यांनीं जर क्षत्रिय मराठ्यांच्या क्षत्रियत्याबद्दल आणि वेदोक्त कर्माबद्दल विरोध केला असेल तर तो खालीलपैकी एखाद्या कारणामुळे केला असेल :
(१) मराठ्यांना आपले क्षत्रियत्व व कर्माधिकार नीटसे सिद्ध करता आले नसतील;
(२) त्यांच्या पुराव्यांचा पाया ब्राह्मणांचा Bonafide विश्वास बसण्याइतका भक्कम नसेल;
(३) ब्राह्मणांना हिंदुधर्माच्या संरक्षणाची विशेष काळजी असल्यामुळे धर्मसंकर किंवा वर्णसंकर न होऊ देण्याबद्दल त्यांनी शुद्ध प्रामाणिकपणाने मराठ्यांच्या धार्मिक व वार्णिक आचाराविचारांबद्दल without prejudice आक्षेप घेतला असेल; त्यांत त्यांना दोष ठेवतां येत नाहीं :
अशा प्रकारची वकिली करणारे विद्वान आजलाहि पुण्यामुंबईच्या फडांत आढळतात. प्रत्येक गोष्ट परिस्थितीचा आणि ऐतिहांसिक परंपरेचा नीटसा विचार न करीतां त्रयराशिकाच्या प्रमाणांत जर ठरविण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या इतिहासाचें रूप कसें सफाई पालटून जातें आणि वकिली वाण्याच्या भाषाशैलीच्या झोतामुळे भलभलत्या अनैतिहासिक विधानांची कालावा कालव विचाऱ्या वाचकांना कशी भुरळ पाडते, यांचे प्रत्यंतर रा. रा. केळकर विरचित " मराठे व इंग्रज " हे पुस्तक किंचित् काळजीपूर्वक वाचल्यास खात्रीनें सांपडेल. शिवाजीच्या घराण्याच्या किंबहुना यच्चावत् मराठ्यांच्या क्षत्रियत्वाबद्दल व वेदकर्माबद्दल आक्षेप घेणाऱ्या तीन कलमांपैकी एकीचाही आश्रय ब्राह्मण म्हणविणाऱ्यांना घेतां येणें शक्य दिसत नाही. बाळाजी आवजी चिटणीसानें राज्यभिषेकोपक्रमाची प्रतिज्ञा पार पाडण्यासाठी व शिवाजीचं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी जे पुरावे गोळा करून तत्कालीन ब्राह्मणांच्या तोंडावर फेंकले आणि ज्यांनी गागाभट्टासारख्या बृहस्पतीलाही संशय छिन्न करून सोडलें, त्यांच्यापुढे कलमें १ व २ ही तेव्हाच वितळून नष्ट झाली. बाकी राहिलें कलम तिसरें. त्यांतला वकिली विधानांचा नाटकी भूस झाडला तर नुसतें ब्राह्मण हें नांवच शिल्लक राहतें. ब्राह्मण म्हणविणारे आपल्या ब्राह्मण्यांत किती पारंगत होते आणि अनुवंशिक ब्रह्मकर्माचा "निदान प्रामाणिक तरी अभिमान जागृत रहाण्याइतकें त्यांचे स्वतःचे वर्तन, अभ्यास व अंतर्बुद्धि किती जागृतावस्थेत होती, हें धुंडायला इतिहास-संशोधक मंडळाचे लोखंडी पिंजरेच हुडकायला नकोत. चित्पावनांचे राज्य सर्वत्र होऊन जिकडेतिकडे ब्राह्मणाला एवढा ऊत आला होता तरी पेशवाईच्या अखेरअखेरसुद्धां बिचाऱ्या (पेशवाईसारखें ब्राह्मणी राज्य असताना नेहमी लागणारे धर्मकृत्यातील मंत्रतंत्र म्हणावयाला येत नाहीत असे ब्राह्मण असावेत हें बरेंच चमत्कारीक दिसते. परशुरामभाऊ पटवर्धनाच्या अंतकाळाचा इतिहास आहे. हकिकत आहे. ह्या जवानमर्द लढवय्या ब्राह्मणवीराचे प्रेत दहन करण्याकरीतां चिता वगैरे सर्व तयारी करण्यात आली व .... त्यात खालील जवळच्या खेड्यातून कांहीं ब्राह्मणाहि आणविले. पटवर्धनाने कारकूर नारो हरि करंदीकर याचे मनात आले की, यथाविधि मत्रोच्चार होऊन नंतर चितेस अग्नि द्यावा, पण त्यावेळेस सर्व मंत्रविधि अवगत असणारा ब्राह्मण पैदा होईना. त्या गांवचे जोशी म्हणजे पक्के ढ. त्यांना एक मंत्र म्हणता येईल तर शपथ. अखेरीस अग्नि मंत्रसिद्ध न होता प्रेत दहन करण्यांत आले. -म. स. उत्कर्ष पृ. १७०) परशरामभाऊ पटवर्धनाला वेदोक्त मंत्र म्हणणाऱ्या भटांच्या दुष्काळामुळे भडाग्नीवरच स्वर्गाचा रस्ता सुधारावा लागला ना? त्याचप्रमाणे तत्कालीन संत महासाधु श्रीधावडशीकर महाराज यांच्या समाधीच्या वेळी तर खेडेगांव नव्हते ना? शाहू महाराजांच्या समक्ष स्वामींची उत्तर क्रिया होणार म्हणून हजारों शास्त्री विद्वत्तेच्या शालजोडया पांघरून तेथे जमा झाले होते; पण स्वामींचे मस्तक शंखाने फोडण्याचा विधि अखेर एकाही शंखाला सुचला नाही तो नाहींच. असल्या अकटोविकटो ब्राह्मणांच्या पदरी धर्मसंकराच्या आणि वर्णसंकराच्या फाजील काळजींचे गांठोडे बाधणें किंवा त्यांच्या Bonafide ची व withouit prejudice ची सबब पुढे आणणें निवळ बाष्पळपणाचे ठरेल.
शिवाजीच्या वेळी गागाभट्टा निर्णय लावल्यामुळे तत्कालीन ब्राह्मणांची तोंडें बंद झाली. श्री महाराष्ट्रीय राजकारणांत चित्पावनांचा प्रवेश होतांच पुन्हा उघडण्याची कारणे वरील तीन कलमांतली नसून, त्यांचें मूळ चित्पावनांच्या परोत्कर्षासहिष्णुतेंत बिनचूक सांपडलें. चित्पावनांच्या ब्राह्मण्यांचा वादविवाद करण्याचे हे स्थळ नव्हें खरें, तथापि त्यांच्या वैभव-नाटकाच्या नांदीला अब्राह्मणत्वाचे भेसूर स्वर कांही काळ तरी बेसूर करीत होते यांत संशय नाहीं. कांहीं कां असेना लवकरच ते राजवैभवाच्या प्रत्येक अंकाच्या प्रगतिबरोबर ब्राह्मण बनत गेले, आणि इतर महाराष्ट्रीय ब्राह्मण्यांच्या हातांत हात घालून त्यांनी क्षत्रिय मराठ्यांचा व क्षत्रिय कायस्थ प्रभूंचा तेजोभंग करण्यांचा विडा उचलला. ही परशुरामी प्रतिज्ञा पार पाडण्याच्या कामी कोदंडाचा टणत्कार करून भरसमरांगणांत क्षत्रियाची टक्कर देणें तर शक्य नव्हतेच नव्हते; पण परशुरामी आख्यायिकेची परंपरा तर पुनरूज्जीवित करण्याची महत्वाकांक्षा फार. अशा परिस्थितीत त्यांनी ग्रामण्याची चळवळ फार दूरद्दष्टीने हाती घेतली.
याची मिमांसा करतांना प्रो. रा.ब. डोंगरे म्हणतात, प्रथम ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च जातींमध्ये वैमनस्य पडून, ब्राह्मण क्षत्रियांचा पाडाव करण्याच्या उद्योगास लागले. एखाद्या जातीचे नायनाट करण्याचे दोन वर्ग आहेत -- (१) शरीरवध, किंवा (२) नीचतर जातींत समावेश. ह्यापैकी पहिल्या मार्गाने क्षत्रिय जातीचा नाश करणें ब्राह्मण जातीस शक्य नसल्यामुळे ह्यांनी दुसच्या मार्गाचा अवलंब करून, क्षत्रियांचे वैदिककर्म हिरावून घेऊन. त्यांस शूद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामण्यांची ही सर्वमान्य मिमांसा होय. अर्थात् मिमांसेच्या स्पष्टीकरणार्थ आपण किंचित् धर्मचर्चेचा प्रदेश सोडून प्रत्यक्ष राजकारणांतील घडामोडीकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे ब्राह्मणेत्तर जातींचा नायनाट करून स्वतःचें स्तोम माजविण्याकरितां त्यांच्यावर ग्रामण्यांचा हल्ला वारंवार चढविण्यांत चित्पावन नोकरशाहीचा हेतू काय होता त्याची स्पष्टता अधिक खुलासेवार होईल.
चित्पावनांच्या इतिहासाचे धागे कितीहि प्राचीन काळापर्यंत भिडलेले असले किंवा मुद्दाम नेऊन भिडविलेले असले तरी, त्यांच्या जागरूक इतिहासाची खरीखुरी सुरुवात बाळाजी विश्वनाथापासून होते. हा गृहस्थ मूळचा श्रीवर्धन येथील कायस्थ प्रभू कुळकर्ण्याचा कारकून. यो आपले वैभव कसोटीस लावण्याकरितां कोकण सोडून घोटावर आला. हरयत्नानें त्यानें प्रथम धनाजी जाधवाची सेवावृत्ति पत्करून थोड्याच वेळांत त्यांने सातारच्या राजकारणी पुरुषांशी आपली जानपछान करून घेतली; इतकेच नव्हें, तर शाहूमहाराजांच्या नाटकशाळा गुलबाई आणि विरुबाई त्यांच्यापर्यंतही त्यानें आपल्या ओळखीचे क्षेत्र वृद्धिंगत केलें. प्रसंगाचा सोळा आणें फायदा करून कसा घ्यावा आणि उद्दिष्ट हेतूंपुढे कसल्याहि उच्च तत्त्वाला कोंपरखळी देऊन पुढं कसे सरकायें, यात आधींच चित्पावन समाज चांगला प्रख्या पावलेला आहे. त्या बाळकडूप्रमाणे शिकारीच्या शुल्लक कारणावरून बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधवावर उलटला आणि अन्नदात्या धन्याशी बेइमानी करणें हें महापाप आहे किंवा नाहीं वगैरे वेदांत गुंडाळून ठेवून, त्याने चिटणीसाच्या शिफारशीच्या व विरुबाईच्या वशिल्याच्या जोरावर शाहूमहाराजापासून पेशवाईची वस्त्रे पटकावली. बहिरोपंत पिंगळ्याला कान्होजी आंग्र्याकडून रक्ताचा थेंबहि न गमावतां केवळ युक्तीनें सोडवून आणल्याबद्दल पेशवाईची वस्त्रे बाळाजी विश्वनाथास शाहूने दिली असे म्हणण्यांत खरी (बाळाजी विश्वनाथानें पेशवाई मिळविली ती आपल्या कारकुनीच्या बळावर, पराक्रमाच्या किंवा शौर्याच्या बळावर नव्हे. "म. चा. उ. पृ. ५१) परिस्थिती व्यक्त न होतां उलट लिलावांत ठेवलेल्या टेबलाखुर्ची इतकीच पेशवाईच्या पदाची किंमत होती, असे म्हणावें लागेल. या बाळंभटांचे विशेष गुण म्हटले म्हणजे आर्जवी स्वभाव व कापट्यपटुता हेच होत. याच्या मागें याचा शूर व पराक्रमी पुत्र बाजीराव यानें क्षात्रवृत्तीची परमावधि करून मराठेशाहीचा दरारा बराच वाढविला व मराठामंडळाची कल्पना अस्तित्वांत आणून हिंदवी स्वराज्याच्या शामियाना भक्कम पायावर उभा राहण्याकरितां हिंदुस्थानाच्या चारी कोपऱ्यांत जबाबदार सुभेदारांच्या ठाण्यांच्या मेखा मारण्याचा अभिनंदनीय उद्योग केला. परंतु त्याच्या चरित्राचें सूक्ष्म अवलोकन करणाराला मात्र कबूल करणे भाग पडतें की त्याच्या सर्व पराक्रमाच्या मुळाशी राष्ट्रीय भावनेपेक्षां स्वार्थाचा चिखलच फार सांचल्यामुळे त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल उत्पन्न होणारा पूज्यभाव ऐतिहासिक दृष्टीच्या भट्टीत शून्यवत् ठरतो. हा पेशवा मोठा (बाजीरावानें अरेतुरेची लढाई काय ती दाभाड्याबरोबर मारली ती. बाकी त्यानें निझामास कोंडलें त्यांत त्याचे सैनापत्य दिसून येते. यात कांही संशय नाहीं. तरी मऱ्हाठ्या शिपायांनी खरोखर अभिमान बाळगण्यासारख्या लढाया बाजीरावांनें किया त्याच्या वंशजानी फारशा मारल्या नाहीत, इतकें येथे म्हटल्याशिवाय रहावत नाही. लढाया मारल्या प्रतापराव गुजराने, हंबीराव मोहित्याने व संताजी घोरपड्यानें त्या अवरंगझेबाच्या वेळच्या दांडग्या लढाया कोठें, व निझामासारख्या जेव्हा तेव्हां लढाई टाळणाऱ्या सरदारांबरोबर झालेल्या बाजीरावाच्या चकमकी कोठे !!!"
कै. प्रो. भागवतकृत उद्गार) शूर, ओजस्वी वक्ता, धाडसी मुत्सद्दी आणि अत्यंत भग्यवानही होता. याने थोडयाच काळाच्या अवधीत मुख्य प्रधान व मुख्य सेनापती हे अधिकार शाहू पासून हस्तगत केले आणि पुणे ही स्वतःची स्वतंत्र राजधानी करून तेथून तो राज्यकारभार पाहू लागला. कै. प्रो. भागवत यांनी या पेशव्याच्या कारकीर्दीबद्दल जे संशोधन केलें आहे त्यांतील काही मुख्यमुख्य कलमें येथे देतों :--
(१) पेशव्यांस स्वतंत्र रीतीनें पुण्यास राहू दिलें, ही शाहूची मोठी चूक, छत्रपतीच्या अष्टप्रधानांनी राजधानीतच असावें. साताऱ्यास पेशव्यांस ठेविलें असतें. म्हणजे त्यांस इतकें स्वातंत्र्य मिळाले नसते, पण शाहू पडला ऐषआरामी व बाळाजी विश्वनाथ मोठा कारकून. पहिला बाजीराव बाळाजीचाच मुलगा. त्यास महाराष्ट्र मंडळांत जितकी अव्यवस्था होईल तितकी इष्ट होती. व्यवस्था लागली, म्हणजे सातारकराकडे लागलाच लोकांचा व फौजेचाहि ओघ वळायचा तो तसा न वळावा व सर्व लगाम आपल्या हातांत रहावी म्हणून बाजीरावाचा मऱ्हाठ्यांस जिकडेतिकडे पसरविण्याविषयी भगीरथ प्रयत्न.
(२) बाजीरावानें मऱ्हाठ्यांचा देशाभिमान किंवा धर्माभिमान तरी जागरुक करावा होता. पण तेंहि त्याच्या हांतून झालें नाहीं. निझामाच्या पदरी जाऊन राहू नये म्हणून शिलेदारांचा पगार वाढवून बाजीरावास मऱ्हाठ्यांच्या लुटारूपणास भर घालावी लागली. (३) मऱ्हाठ्यांचा लुटारूपणा नाहीसा करणे, हें ( प्रो. भागवत पहिल्या बाजीरावालासुद्धा रावबाजी च म्हणत असत.)
`रावबाजीचे पहिले कर्तव्य होते, पण तसे न करितां उलट मऱ्हाठ्यांचा लुटारूपणा वाढविला, म्हणून ग्रांटडफ बाजीरावाची, तारीफ करितो । स्वार्थपर होऊन मऱ्हाठ्यांचा लुटारूपणा वाढविला, ही बाजीरावाची मोठी चूक निदान आम्ही समजतो. हा लुटारूपणा वाढविल्यामुळे सर्वत्र अव्यवस्था झाली, व अव्यवस्थेने सर्व लुटून फन्ना करण्याचे दुर्निवार व्यसन लागल्यामुळे महाराष्ट्र मंडळाचा अखेरीस घात झाला. (४) बाजीरावाची व त्याच्या बंधूची (चिमाजी आप्पाची) स्वामीभक्तीहि तितपतच होती. दोनदा तीनदा शाहूचा चिमणाजी आप्पाने उपमर्द केला. (५) ज्या खाणीतून रामचंद्रपंत, पुरंदरी नावाजलेला मुरारबाजी व चाकणास नावाजलेला फिरंगोजी नरसाळा असली अमोलिक रत्न निघाली ती खाण निराळी व `रावबाजीची खाण निराळी. (६) उभय बंधूमध्ये स्वामिभक्ती मुळींच नव्हती व ते परार्थतेच्या गांवी स्वप्नीहि गेलेले नव्हते.
अनेक उद्गारांपैकी वरील सहा उद्गारांवरून वाचकांस बाजीरावाच्या कारकीर्दीची बरीच कल्पना होईल, असा भरवसा वाटतो. शाहू महाराजसुद्धा बाजीरावाच्या चित्पावनी काव्याला उमगून नव्हते असे नव्हे, किंवा शाहूला देवळांतला नुसता महादेव करून हे पेशवे नंदी सारा राज्यकारभार आपल्याच शिंगावर घेऊन स्वतंत्र बनण्याचा उपद्याप करीत आहेत अशी बित्तंबातमी टोपकरादि शेजान्यापाजाऱ्यांना माहीतच नव्हती, अशांतलाहि प्रश्न नव्हे. म्हणूनच सन १७४० मध्ये बाजीरावचा मृत्यू होतांच पेशवाईची झूल ताबडतोब नानासाहेबांच्या आंगावर न चढता, प्रधानकीच्या पदाचा वारसा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे काही काळ इतस्ततः हेलकावे खात होता. परंतु महाराष्ट्राच्या व त्याबरोबरच अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा नाश भवितव्यतेनेच ठरवून ठेवलेला असल्यामुळे पुढे सरकविलेलें बाबूजी नाईक बारामतीकराचे प्यादे रघुजी भोसल्याला मागे घेणे भाग पडून शाहूराजाच्या मर्जीला बाळाजी बाजीरावाचाच शह लागला आणि पेशवाईची वस्त्रं पटकावून त्याने अखेर सर्वांवर मात केली.
कै. भागवत म्हणतात " पहिल्या रावबाजीने बाहेरून सर्व व्यवस्था नीट ठेवून आंतून शाहू छत्रपतीस ("From the best intelligence procurable there appears no reason to doubt of Bajirao`s disregard of any subjection to the Shahu Raja, whom he acknowledges only for form`s sake whilst his views tend apparently to fortify himself in a state of independence on him of which the Shahu Raja himself does not seem ignorant." - p. 83 Forrest `s Selections.) कसपटासारखे गणण्यास आरंभ केला. नानासाहेबांच्या कारकीर्दीच्या आरंभीच शाहू वारला, तेव्हा तर पेशव्यांनी सगळीच सत्ता बळकावली व सातारकरांस बाहूलें करून ठेविले. (उद्गार पृ. ५१) नानासाहेबाच्या कारकीदींच्या बाह्य भपक्यावरून त्यांच्या अमदानीत महाराष्ट्रीयाची विशेष भरभराट झाली असे भासतें खरें, परंतु वस्तुस्थिती मात्र त्यांच्या अगदी उलट होती. क्षत्रिय मराठ्यांना नामोहरम करून ब्राह्मणांना उर्जीतावस्थेला किंबहुना आयुष्य वैभवाच्या कळवाला नेऊन पोहचविण्याची स्वतःची वंशपरंपरागत अंतस्थ महत्वाकांक्षा सिद्धीला नेण्यासाठी या पेशव्याने स्वतःच्या धोरणांची गति मंदविषाप्रमाणे (slow poison) ठेवण्यांत खरोखरच मोठे चातुर्य दाखविले. संधिसाधून त्यानें आसन्नमरण शाहूपासून सर्व मराठी साम्राज्याच्या कुलमुखत्यारीची सनद पटकविण्यांत तर लोकोत्तर कपटपाटव गाजविलें. शाहूची पट्टराणी सकवारबाई ही शिवाजीच्या भोंसले राजघराण्याला शोभेसी राजकारणी मुत्सद्दीण होती. शाहूच्या मार्गे ती पेशव्याच्या कारस्थानाला बळी पडली नसती तर मराठ्यांच्या इतिहासाला कांही निराळेंच रूप येण्याचा फार संभव होता. परंतु तो संभव कधि संभवूच नये म्हणून ज्याची रात्रं-दिवस धडपड तो नानासाहेब पेशवा थोडाच स्वस्थ बसणार ? त्यानें शास्त्रपुराणांचा आधार दाखवून, राणीच्या भावाला नरकप्राप्तीच्या पवित्र भीतीनें वश करून घेऊन, त्याच्याच हातानें सकवारबाईला शाहूराजाच्या पादुकांच्या सरणावर जिवंत जाळविली.(नानासाहेबाने राजपत्नीशी केलेला कावा खरोखरीच आम्हा ब्राह्मणाना खाली पहायास लाविणारा आहे. प्रो.भागवत , The wily Brahman-the Peshva by these arts secured his victim. Sir James Campbell.) ग्रँट डफनें या पेशव्याच्या कारकीर्दीबद्दल जे उद्गार काढले आहेत (Vol. II. p. 158) ते जशाचे तसे येथेंच नमूद करणे श्रेयस्कर आहे. "His measures are marked by an excessive cunning. which Bramins, in general, mistake for wisdom; he practised all the arts of dissimulation, and was a perfect adept in every species of intrigue. A strong example of the worst species of Bramin character is shown in the manner by which he compassed the destruction of Suckwar Bye Sirkay. *** On the whole, he may be regarded as rather a favourable specimen of a Bramin in power." पुण्याचे हे श्रीमंत पेशवे स्वतःस ‘मऱ्हाठे’ (हल्लीसुद्धा मराठा या शब्दाच्या अर्थाच्या लवचिकपणाचा पूरा फायदा घेऊन त्याचा निरनिराळ्या लपंडावाने कसा उपयोग करता येणे शक्य आहे, याचा उकृष्ट मासला मराठे व इंग्रज या पुस्तकात पाह्यला मिळेल. कोठे मराठे म्हणजे क्षत्रिय मराठे, तर लगेच पुढच्याच वाक्यार्थात मराठे म्हणजे महाराष्ट्रातले किंवा सरसकट महाराष्ट्रीय हिंदू अशा निरनिराळ्या अर्थसंभवाच्या पडद्यामागे बसून रा. केळकरांनी मराठे शब्दाला सर्कशीतल्या घोड्याप्रमाणे वाटेल तसा नाचविला आहे. पेशव्याच्या किंवा ब्राह्मणांच्या अंगावर बाजू शेकते असे वाटतांच एक सर्वसामान्य मराठे शब्द तोंडावर फेंकून मोकळे होण्यात ग्रंथकार मोठे वाकबगार आहेत. शब्दावर कोटया लडवून साध्या सरळ विधानाना सुद्धा इंद्रधनुष्याप्रमाणे निरनिराळे रंग कसे देता येतात, निदान देता येणे शक्य आहे, हे मराठे आणि इंग्रज पुस्तक नीट बारकाईने वाचल्यास समजेल.) म्हणवीत, पण सातारच्या मन्हाठा छत्रपतीचा पदोपदी अपमान करण्यास मात्र कधीहि मागेंपुढे पहात नसत. कुलीन व जातिवंत मराठ्यांस व मावळ्यांस पेशवे आपल्या नोकरीत मुळीच ठेवीत नसत.
(पानपतच्या मोहिमेवर निघालेल्या सरदार मंडळीची यादी पाहिली तर त्यांत बहुतेक ब्राह्मण सरदारच प्रामुख्याने दिसतात. मराठे नव्हते अशातला प्रश्न नाही. होते, परंतु ते सारे पेशव्यानींच उद्यास आणलेले नवीन मराठे सरदार होते. खास छत्रपतींच्या आश्रयाखालच्या मराठे सरदारांना पेशव्यांच्या अमदानीत विशेषसे प्रामणख्य नव्हते. The old Mahratta families were now but secondary personages in the Deccan, owing the power of the Peishwas, and the consequent ascendency of the Bramins. ` Grant Duff Vol. II. p. 140.)
उद्देश हाच कीं न जाणो, त्यांचा ओढा सातारकरांकडे मूळरक्ताच्या वळणावर गेला तर ? फार काय पण खुद्द पेशव्यांनी शिंदे होळकरासारखे जे नवीन मराठे सरदार उदयास आणले, ते पुढें शिरजोर होऊन आपल्याच डोक्यावर नाचू लागतील आणि वेळी रक्ताचा ओढा रक्ताकडे खेचला जाऊन सातारकर छत्रपतीला सामील होतील या भीतीनें त्यांना निरनिराळ्या दूरदूरच्या सुभेदाऱ्या देऊन पांगून पांगून ठेवले. कोल्हापूरकर भोसल्यांच्या उरावर पेशव्यांच्या सत्तेचा वरवंटा कायमचा रहावा म्हणून कोल्हापूरच्या मुलखास लागून असणारा मिरजचा मोठा मुलूख पटवर्धनांच्या घराण्यास जहागीर देण्याचा मतलब हाच की अस्सल क्षत्रिय मराठ्यांना कधीच डोके वरती काढतां येऊ नये. अशा अनेक धोरणांनी सातारकर छत्रपति आणि त्यांच्या सिंहासनाचा अभिमान बाळगणाऱ्या क्षत्रिय मराठ्यांचा पेशव्यांनी तेजोभंग करण्याचा निंद्य आणि चिळस आणण्यासारखा यत्न केला. याबद्दल के प्री. भागवतांनी जे उद्गार काढले आहेत ते लपंडावी विधानाची चटक लागलेल्या पुणेकर संशोधकांनी अवश्य मनन करण्यासारखे आहेत. प्रो. भागवत म्हणतात:- क्षत्रिय गादीची सगळी सत्ता बळकावून गादीच्या मालकास कसपटासारखे लेखण्याचा पाया अशा रीतीने पेशव्यासारख्या आमच्या जातिबंधूनी महाराष्ट्र मंडळात पहिल्याने घातला. हे कबूल करण्यास आमच्या लेखणीस फार कष्ट होत आहेत. अशा रीतीने ब्राह्मण व क्षत्रिय या दोन फळ्या महाराष्ट्र मंडळामध्ये करून, घरफूट म्हणजे काय तें मऱ्हाठ्यांच्या या काळी पेशव्यांनी स्पष्ट करून दाखविलें. या काळाच्या पूर्वी या प्रकारचा जातिभेद किंवा आपमतलब महाराष्ट्र मंडळांत तरी निःसंशय नव्हता. म्हणूनच शाहुछत्रपतीस अभिषेक होईपर्यंत महाराष्ट्र मंडळाचे स्वातंत्र्य कायम राहिले होते. असो. कान्होजी आंगऱ्यांच्या नेतृत्वाखाली युरोपीयन राष्ट्रांनाही भारी झालेल्या मराठ्यांच्या आरमाराचा नानासाहेब पेशव्यानें मुंबईच्या टोपीवाल्यांची मदत घेऊन नाश केला आणि इंग्रेजाची टोपी मराठ्यांना डोईजड करून ठेविली. कोल्हापुरकर छत्रपती सातारच्या छत्रपतींचे अगदी निकट संबंधी असतां या दोन घराण्यांत नानासाहेबानें शक्य तितका बेबनाव उत्पन्न केला आणि आपल्या चित्पावन सरदारांना मिरजेच्या देवडीवर कायमचे स्थापन करून कोल्हापुरकरांच्या सत्तेला कायमचा पायबंद लावला. मराठे सरदारांना घरी बसवून स्वतःच्या आप्तेष्ट चित्पावनांना सरदार बनविले. रघोजी भोसले इत्यादि क्षत्रिय मराठे सरदारांना मोठमोठी वचनें व मुलूख देऊन गार केले व मराठेशाहींतून त्यांचे नकळत उच्चाटन केलें. सारांश, मराठे सरदारांची जूट फोडून त्यांना अलग करण्यात व त्यांची सत्ता कमी करून आपल्या जातभाईची सत्ता व वैभव वाढविण्यात नानासाहेबानें शक्य ते प्रयत्न केले. शाहूच्या मृत्यूनंतर छत्रपतीच्या गादीवर तलख स्वभावाचा राजा कधींही बसणार नाहीं, अशी अंतस्थ व्यवस्था व त्याला अनुलक्षून चालविलेली नानासाहेबाची कारस्थान पाहिली की निरनिराळे डावपेंचाचे फासे टाकून छत्रपतींच्या साम्राज्यशक्तीला संपूर्ण हस्तगत करण्यांत त्याने शकुनीमामाच्याहि वर ताण केली यांत संशय नाही. तथापि चटकन तोडांत टाकलेली साम्राज्यसत्तेची गोळी पटकन् पचविणें लहानसहान काम नव्हते! या बाबतीत नानासाहेबाला अत्यंत परिश्रम करावे लागले. अर्थातच त्याला माहाराजांच्या किंवा त्यांच्या जातीच्या धार्मिक आचारांत लक्ष घालण्यास सवड नव्हती. का. प्रभूंकर ग्रामण्याच्या उभारणीस फूस आपल्या जातीचें श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी देशस्थ व चित्पावन यात रोटी बेटी व्यवहार सुरू व्हावा म्हणून त्याने स्वतःच देशस्थादि ब्राह्मणांच्या मुलीशी केलेली लग्ने, पाताणे प्रभूंवरील ग्रामण्य व नानासाहेबाचे इतर जातींबरोबर झालेलें वर्तन ही लक्षांत घेता, नानासाहेबाने सातारकर महाराजांच्या धार्मिक हक्कांकडे आपली वक्रदृष्टी फिरविण्यास दुर्लक्ष केले असेल असे म्हणता येत नाही. परंतु घशात उतरलेलें राज्य त्याला पचनी पाडावयाचे होते म्हणून आणि इतर अनेक राजकारणी व्यत्ययांमुळे तिकडे लक्ष देतां आलें नाही. लवकरच छत्रपतींच्या नशिबी पेशव्यांचा कैदखाना लागला आणि ते पानपतला फुटलेल्या ` तीन लाख बांगडी ` ची हैवत खाऊन छाती फुटून नानासाहेब मरण पावल्यामुळे सर्वच गोष्टींना निराळें वळण लागण्याची वेळ जवळ आली. थोरला माधवराव अल्पायू होऊन अकाली न मरता, तर महाराष्ट्राच्या इतिहासाला काहीं निराळें स्वरूप येण्याचा बराच संभव होता. त्याने चित्पावन व इतर शिरजोर झालेल्या ब्राह्मण सरदारांस दाबांत ठेवून क्षत्रिय मराठे मंडळाची प्रीति संपादन करण्याचा यत्न केला; परंतु आजानें आणि बापानें करून ठेवलेल्या पातकांचा साठा धुतां धुतांच विचान्याच्या कंठीं प्राण आले.
इतकें झालें तरी सातारच्या महाराजांचा कैदखाना कांही सुटला नाहीं. धन्याच्या संपत्तीचा अपहार केल्यामुळे व साध्वी ताराबाईच्या शापानेंच जणूं काय निर्वंश होण्याच्या पंथाला लागलेल्या पेशव्यांच्या घराण्याला कीड (पेशवाईच्या बाहेरून विस्तीर्ण दिसणाऱ्या वृक्षाची स्थिती आतून भोंवर लागलेल्या माडाप्रमाणे झाली होती, हे माधवराव पेशव्याच्या देखील लक्षात येऊन चुकलें होतें अंतकाळाच्या समयी पश्चाताप होऊन त्यानी विद्वान शास्त्री व पंडित यास विचारिलें की पेशव्याचे राज्यात धमोत्कर्ष होत आहे. दौलतीतील सर्व लोक सुखी आहेत. प्रजापालन चांगले होत आहे. असे असता पेशव्याचे वंशास क्षय लागला व पानपती फौज गार होऊन दौलत बुडाली याचे कारण काय? तेव्हा काशीकर शास्त्री यानी स्पष्ट उत्तर केले की, स्वामीद्रोहापेक्षा थोर पातक नाही धन्यास् प्रधान प्रतिबंधात ठेवून राज्याच्या उपभोग करू इच्छितात याच कारणाने वंशक्षय व अपकीर्ति होत चालली आहे (पृ. ६३ उत्तरार्ध, भाग १ कोल्हापूर राज्याचा इतिहास रा. रा. बाळाजी प्रभाकर मोडक यांनी केलेला.) तेव्हा शास्त्रांमध्ये व पंडितामध्ये अर्थात् विद्वान ब्राह्मणामध्ये पेशव्याची कृति अनन्वित समजणारे पूर्वीही पुष्कळ होते. हे आम्हा ब्राह्मणांस एक मोठे भूषणच आहे. हे विद्वानांचे म्हणणे ऐकून माधवरावांनी आपले कनिष्ट बधू नारायणराव यास बोलावून सांगितले की, सातारकर महाराजाकडे पाच लक्षांचा नवीन तालुका साताऱ्याजवळ नेमून देऊन त्यास सुप्रसन्न ठेवावे येणे करून संतोष न झाल्यास आणखी दोन लक्षांचा प्रांत जास्ती देऊन मर्जी सुप्रसन्न करून घ्यावी. स्वामी द्रोहाच्या पापाची निष्कृती करण्याची जी ही तोड माधवरावांनी काढली, तीवरुन माधवरावास मनाचे थोर म्हणता येईल काय? जी सर्व सत्ता सातरकरांची पेशव्यांनी बळकाविली तिचा मोबदला काय पाच लक्षाचा किंवा फार झाल्यास सात लक्षांचा मुलुख उदार व निष्कपट धन्याची सर्व दौलत सवड सापडताच चाकराने बळकावून, धन्यास पहिल्याने जेम तेम जाड्या भरड्या भाकरीची सोई करून ठेवावी व पुढे पाप नडुं लागेल तेव्हा पूर्वीच्या धन्यास दोन शेर दाणे मिळत होते ते तीन शेर का हवे असल्यास चार शेर दाणे देण्यास हुकूम करावा व इतके उदारपणाचें काम केल्याने पापाची निष्कृती होऊन पूर्वीच्या धन्याची मर्जी आपणावर सुप्रसन्न राहील, अशी जो चाकर आशा बाळगतो, त्यास आपण काय बरे म्हणू? सारांश स्वामीद्रोहाचा व आत्यंतिक स्वार्थपरतेचा, असे जे दोन आरोप आम्ही आमच्या पेशवे आणिले आहेत. ते काही स्वकपोलकल्पित किंवा आजचे नव्हते. दरोबस्त कृती लक्षात घेऊन हे आरोप पूर्वी पेशवे मंडळीवर आमच्याच पूर्वजांनी आणिले होते. इतकं म्हणणे येथे पुरे आहे. के. भागवतकृतं म. रा.चा.उ. पू. ५६५७) लागली. म्हणून या शहाण्या पेशव्यानें महाराजांना आणखी ५ लाखांचा मुलूख तैनातीला दिला! नारायणराव पेशव्यानें तर सातारच्या महाराजांजवळून धमकीनें पेशवाईची वस्त्रे घेतली आणि ताराबाईच्या शापांत ‘माजोऱ्या निसंतान होऊन मरशील.’ हा छत्रचामरधारी राजपुरुषाचा शाप भरीस घातला. ही शापवणी लवकरच खरी झाली व नारायणराव मारला गेला. त्यानंतर प्रतिसृष्टी उत्पन्न करणार म्हणून चित्पावनांनी ज्याला अगदी ब्रह्मदेवाच्या तोंडीला बसविलें आहे, त्या नाना फडणीसाची कृपादृष्टी सातारच्या महाराजांवर फिरली. नानाने सातारच्या महाराजांवर बाबुराव कृष्णाजीला जेलर नेमला होता. नानाच्या सूचनांप्रमाणें जुलूम जबरदस्तीनें त्यानें महाराजांच्या घराण्यांतील पूर्वापार वेदोक्तकर्मे बंद करून पुराणोक्त चालू केली. राजकीय हक्कांची आधीच वाट लागली होती; आतां धार्मिक हक्कही संपुष्टांत आणले! यासंबंधांत नानाफडणीसाचे आपल्या जेलरला गेलेले पत्र (चां. का. प्र. ग्रा० पृ० ७३) वर दिलेलेंच आहे. सवाई माधवरावाच्या कारकीर्दीतले [मि. फाल्गुन शु० ७ शके १६९९ ता. ६ मार्च १७७८ चें] एक पत्र उपलब्ध झाले आहे. तें पाहीलें म्हणजे नानाला अर्धाशहाणासुद्धां मानण्याची पंचाइतच पडते. पत्र जरी सवाई माधवरावांचे आहे तरी ते नानानेंच `डिक्टेट्` केलें असले पाहिजे:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री बाबूराव कृष्ण गोसावी यांसी सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु। समान सबैन मया व अलफ राजश्रीस राज्याभिषक आगोधर होऊन उपरांत मुंजी होती किंवा अगोधर मुंजी होऊन राज्याभिषेक होतो याची पुर्वील पधत कसी आहे व राज्याभिषकास व मुंजीस साहीत्य कापड अदीकरून काय लागते याचा तपशिलवार लिहून लौकर पाठविणें, येविसी राजश्री कृष्णराव आनंत यासही पत्र लिहिले आहे. तरी तुम्ही ते मिलोन सदरहू लिहिल्याप्रो करणे. जाणिजे..
हरहर ! ज्या नानानें सारी पेशवाई अवलपासून अखेरपर्यंत पाहिली त्याला मराठे छत्रपतीची मुंज आधी लागते की राज्याभिषेक होतो हे सुद्धां माहीत नसावें काय? पुढे, नानानें सवाई माधवरावाचा अप्रत्यक्ष रीतीनें खून केल्यानंतर रावबाजी पेशवे झाले. या पेशव्याने जरी का प्रभूंच्या धार्मिक हक्कांच्या मान्यतेबद्दल व रक्षणाबद्दल फर्मान दिलें तरी सातारच्या महाराजांविषयीं मात्र त्यानें अत्यंत नीच वर्तन केलें.
१. सातारेयाचे राजे यांस राज्याभिषेक करावयाच्या पूर्वी मुंज करून मग राज्याभिषेक व्हावा अशी शिवाजी महाराजांची पासून चाल होती ती श्रीमंतानी यावेळेस मना करून मुंज्य केल्याशिवाय राज्याभिषेक केला.
(शके १७३० सन १८०८-०९. पेशवाईची अखेर पृ. १४४. इ. आणि ऐ.) नाना फडणीसाने वेदोक्ताऐवजी पुराणोक्त मंत्रांनी तरी मुंजी राहू दिल्या पण रावबाजीनें तर मुंजीच बंद केल्या! आणि हे पेशवे बहादूर महाराजांचे सनदशीर नोकर! सातारचे महाराज जर त्यांच्या मतें शूद्र होते तर त्या शूद्राचे नोकर म्हणून पेशवाईच्या सनदा घेण्यास या वेदोनारायण ब्राह्मणवीरांना लाज कशी वाटली नाहीं हें कळत नाही. आणि शूद्र धन्याची नोकरी करणाऱ्या ब्राह्मणाचें ब्राह्मण्य तरी कोणत्या स्मृतीनें वा श्रुतीनें मान्य केलेलें आहे याचा खुलासा एखादा आधुनिक इतिहासपडिंत करील काय? असो. रावबाजींची कारकीर्द लवकरच समाप्त होऊन इंग्रेज बहादुरांनी जिकडे तिकडे स्थिरस्थावर केलें आणि शाहूच्या मृत्यूपासून म्हणजे सन १७४९ से १८१८ पर्यंत सुमारे ६९ वर्षे हाल अपेष्टा भोगीत पडलेल्या सातारच्या राजघराण्याला पुन्हा एकदां चांगले दिवस आले.
सातारकर छत्रपति आणि त्यांचे जात भाई क्षत्रिय मराठे यांचा तेजोभंग करण्याकरितां पेशव्यांनी कसाकसा उपक्रम केला, याची रूपरेषा वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत येईल अशी आशा आहे. वरील त्रोटक विवेचनांचा यथास्थित विकास करण्याचें हें स्थल नव्हे; तरीपण कोणी ग्रंथकार हें कार्य हाती घेईल, तर महाराष्ट्राच्या इतिहासांतील कित्येक गुंतागुंतीची प्रमेये सोडविण्याचे श्रेय त्याला खास मिळेल. असो. शत्रूचा नाश करण्याच्या ज्या दोन रूढ पद्धति आम्ही वर दिल्या, त्यापैकी पहिली म्हणजे शरीरनाश ही तर पेशव्यांना शक्यच नव्हती. म्हणून त्यांनी दुसरीचा म्हणजे नीचत्वांत समावेश हिचा अंगीकार केला आणि ई. ई. कंपनीने पेशवाईला रावबाजीच्या हांतून भडाग्नी देववून सातारच्या महाराजांना आपल्या खांकेत मारीपर्यंत, क्षत्रिय मराठे सर्वतोपरी हीनावस्थेला पोहोचले होते. यावरून चित्पावनांची परशुरामी तपश्चर्या-थोड्या प्रमाणांतच का होईना !-फलद्रुप झाली, यांत संशय नाहीं. यानंतर श्रीमच्छत्रपति प्रतापसिंह महाराज यांची कारकिर्द सुरू झाली. कंपनी सरकारनें त्यांना प्रथम राज्यकारभाराची कुलमुखत्यारी न देतां सर्व कारभार कौंसिल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन या मंडळाच्या मार्फत चालविला. खाजगीकडील सर्व व्यवस्था व कारभार मात्र महाराजांच्या हाती ठेवला होता. याप्रमाणे किंचित् स्वस्थता व स्वातंत्र्य मिळतांच क्षत्रिय मिळतांच मराठ्यांच्या धार्मिक हक्कांबद्दल महाराजांना कळकळ वाटून, त्यांचें पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. खरोखर, प्रतापसिंह महाराजांनी हा पुनरुज्जीवनाचा प्रश्न जर त्यावेळी हाती घेतला नसता तर क्षत्रिय मराठ्यांच्या धर्मकर्माबद्दलच्या इतिहासाचे धागे सध्यांच्या विपर्यासी संशोधन बंडाच्या धुमधुमीत संकलीत करण्याचे काम फार कठीण होते, यांत मुळीच संशय नाही. त्यांनी चतुरसिंग भोंसले व बापू कान्होबा फडणीस यांना सातारच्या रेसिडेंटाचें पत्र देऊन सन १८१९ त उदेपुरास पाठविलें. या दोघांनी उदेपूर, जयपूर, जोधपूर वगैरे ठिकाणच्या राणाजींची भेट घेऊन खुलासा विचारला आणि
“सातारीयाचे माहाराज सिसोदे हे आपले घराण्यांतील असे ते समजूनच आहेत” असे छत्रपतीस कळविले. पुढे शके १७४४ (सन १८२२) साली उदेपूरचा सुप्रसिद्ध भाट दीपविजय साताऱ्यास आला. महाराजांच्या विनंतीवरून त्यानें सर्व वंशावळीची माहिती देऊन, साताराच्या राजघराण्याचा मेवाडच्या शिसोदे राजवंशाशीं निकट संबंध पुनश्च सिद्ध करून दाखविला. राजपुतान्यांत जेवढी म्हणून क्षत्रिय राजघराणी आहेत, त्यांत मेवाडचें राजघराणे पहिल्या प्रतीचे अझूनहि मानण्यांत येते. एक तर हें उदेपूरचें सिंहासन अयोध्याधीश श्रीरामचंद्रांचे ज्येष्ठ युवराज लवराज यांच्या वंशजानें राजपुतान्यांत मिळविलेलें आहे. शिवाय मुसलमानी अमदानीत बादशहांची मर्जी संपादन करण्यांतच जीवितसाफल्य समजणाऱ्या कित्येक जोधपूर, जयपूर वगैरे रजपूत क्षत्रियांनी आपल्या मुली मुसलमान बादशहाला राण्या करून दिल्या, तरी सुद्धां ज्या मानी उदेपुराधिपतीनें बादशहाच्या रोषाची पर्वा न करितां आपले राजकूळ निष्कलंक राखिलें त्यानें शिवाजी महाराजांचे कुळ खरोखरच शिसोदेवंशाची अस्सल शाखा आहे अशी खात्री पटल्याशिवाय त्यांची वंशावळ आपल्या वंशावळीत सामील करूं दिली असेल काय?
यानंतर सन १८२५ साली सांगलीचे चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांच्या अंगांत नारायणराव पेशव्यांचा संचार होऊन त्यांनी चां. का. प्रभूंवर ग्रामण्याची तरवार उपसली. त्यावेळी त्यांनी कायस्थ प्रभूंच्या विरुद्ध, जगद्रु श्रीशंकराचार्यांना दमदाटी दाखवून जी यादी लिहवून घेतली त्यांत “कलींत क्षत्रिय नाहींत” इत्यादि खोटा मजकूर घुसडून दिला. परंतु क्षत्रिय मराठे यावेळी तरी निजलेले नव्हते. त्यांनी ताबडतोब सातारच्या राजमंडळाकडे खालील अर्ज रवाना केला :--
यादी १.
यादी सरकार श्रीमन्महाराज राजश्री सातारा राजमंडळ हुजूर सातारा सु । तीसा आशरीन मयातैन आलफ क्षत्रिय मराठा मंडळी याणी आम्ही क्षत्रिय व महाराज क्षत्रियकुलावतंस आसले तरी बंदोबस्त करावा नाही तरी हे आसे लिहितात ते लिहिणे चांगले नाही कलमें बी तपशील,
(१) ब्राह्मणाचा व चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचा खटला दोन तीन वर्षे पडला आहे. उभयतानी परस्पर लिहिणे असले ते लिहावे परंतु पुण्याहून ब्राह्मणानी पत्रे पाठविली त्यांत क्षत्रिय नाहीत असे भाव तेव्हांच येविसी बोलावे तरी सामीलता दिसेल सबब न बोललो या पत्रांत चांद्रसेनीय व आपला मजकूर ल्याहावा से मोघम क्षत्रिय नाहीत आसे लिहीले ती पत्रे सारी माघारी आणऊन त्यांतील ही अक्षरे काढून टाकावी.
(२) हाली चिंतामणराव पटवर्धन याणी शंकराचार्य करवीरकर याचे समते यादी करून यादी व पत्रे केली त्याचे मनांत येकंदर क्षत्रियच नाहीत असे समजानी केले नाहीसे वाटते सबब मोघम क्षत्रिय नाहीत हे लिहीले परंतु सर्व समजदार असतात आसे सर्व ठिकाणी देशोदेसी आहे आसे नाहीं व हालीचे यादीत कैलासवासी शिवाजीमहाराज व संभाजीमहाराज व शाहूमहाराज पत्रे व निर्णय ठरविला आसे जमेस धरून लिहितात त्यास सरकारी दप्तरी कोणतेही ज्ञातीविषयी निर्णय ठरून बार जाले हे नाही कोणतेही ज्ञातीत आपली कमी आहे. तरी सावरून नीट दाखविणे असी चाल आहे तेव्हा ज्याणी निर्णय केले ते आपली जात नाही आसे कसे लिहितील तेव्हा पत्र खोटी असतील असे वाटते. यद्यपि असले तरी ज्ञातीप्रकर्णात सरकार पाहणे नाही तेव्हा ह्या पत्राचे समत लिहीणे गरज नाही दक्षण हिंदुस्थानांत चाल इकडील सहीची पत्र मानतात त्याअर्थी लिहू नये लिहिली गेली असतील तरी दुसरी पत्रे तितके जागी पाठवावी की हा मजकूर चांद्रसेनीय प्रभूचा व ब्राह्मणाचा आहे क्षत्रिय आहेत त्याचा नाहीं किंवा सारांष यादी येकंदर सारे आणवून कैलासवासी महाराजाचे निर्णय ठरले व पत्र बार केले हे व क्षत्रिय नाहीत हे काढून पाहिजे तरी रवाना करावी येविसी कसे ठरले ते ठरून उत्तर यावे हें कंपनीसरकाराकडे करणे आहे.
(३) सदरहुप्रमाणे न झाले तरी ज्ञातीवाले आपले ज्ञातीविसी मुखत्यार आहेत तेव्हां खटला नसता जो काढील त्यास पुसणे ज्ञातीविशयाने होईल सबब हे व्हावे हे चांगले आहे हा विचार कंपनीसरकारास कळवाया आसे नाही सबब लिहिले आहे व सरकारही ज्ञातीप्रकर्णात पाहत नाही त्यास चांद्रसेनीय प्रभुविसीही सरकारी कागदांत सड लिहिली आहे हे नसावे परस्परें आपले ज्ञातीत मुखत्यार आहेत सड राहिली असता सरकारी मदत ब्राह्मणाकडे आहे आसे दिसते व मुखत्यार म्हणण्यास दोष सरकारास येतो व आमचे ज्ञातीचा मार्ग पुसणे तो ब्राम्हणास पुसू किंवा आम्ही पाहू परंतु हे काही नसता लिहिणे गरज नाही सबब लिहिले आहे लिहिल्याप्रो ठरवून व्हावे......
येकूण कलमे चार ४ लिहिली आहेत पकेपणे ठरवून पुन्हा न होय आसे व्हावे वगैरे तारीख २७ जुलाई सन १८२८ इ.
प्रो. डोंगरे कृत सि. वि. परिशिष्ट ५ (पृ. १०२, १०३)
या पत्राचा विचार राजमंडळांने काय केला ते समजण्यासारखे कागद पत्र उपलब्ध नाहीत. इ. स. १८३० मध्ये प्रतापसिंह महाराजांस पूर्ण मुखत्यारी मिळाली. याच सुमारास कायस्थ प्रभूवरील ग्रामण्याचे स्वरुप अत्यंत उग्र झालेलें होतें. तेव्हां महाराजांनीं क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्ताचा प्रश्न हाती घेऊन ७/८ वर्षे अव्याहत परिश्रम करून आपले व आपल्या आप्त स्वकीयांचे क्षत्रियत्व पुनश्च प्रस्थापित केलें. ते कसें केलें याची हकीकत विशेष लक्षांत ठेवण्यासारखी असल्यामुळे ती खाली देतो.
"कलींत क्षत्रिय मुळीच नाही म्हणून ब्राह्मणांखेरीज इतरांस वेदोक्ताचा अधिकार नाहीं" हा वादाचा मुख्य प्रश्न (हा वाद उपस्थित करणार कोण? तर ज्यांच्या चित्पावन जातीला आपलें ब्राम्हणत्व अझुनही धडपणे सिद्ध करता आलें नाहीं, ते चिंतामणराव आप्पा पटवर्धन) उद्भवल्यामुळे क्षत्रिय मराठे व चां. का. प्रभू या दोघांना आपले अनादिसिद्ध क्षत्रियत्व सिद्ध करण्याकरितां पूर्वापार वहिवाटीप्रमाणेच एकत्र व्हावे लागले. क्षत्रिय मराठे हे शौर्यात जसे श्रेष्ठ तसे चां. का. प्रभू हे शौर्यात आणि विशेषतः बुद्धिगतहि श्रेष्ठ, याकरितां जेव्हां जेव्हां म्हणून क्षत्रिय मराठ्यांच्या धार्मिक हक्कांवर हल्ले होत गेले तेव्हा ते का. प्रभूंनीच से सर्व आपल्या बुद्धिमत्तेच्या ढालीवर वरचेवर झेलून अक्कलहुशारीच्या समशेरीने त्यांचा फडशा पाडलेला आहे. या वादांत क्षत्रियांच्या तर्फे लढण्याकरितां विठ्ठल सखाराम ऊर्फ आबासाहेब पारसनीस या विद्वान चां. का. प्रभू शास्त्र्याची निवडणूक महाराजांनी केली व विरुद्ध पक्षानें ये शा. राघवाचार्य गजेंद्रगडकर या अत्यंत विद्वान पंडितास आपल्या तर्फे वाद करण्याकरितां वकीलपत्र दिलें होतें. आबा पारसनीस हे जसे फारशीत निपूण होते तसेच संस्कृतांतहि पारंगत होते; इतकेंच नव्हे, तर त्यांचं दोन शास्त्रांचे अध्ययनहि झालेलें होतें. साताऱ्यांस हल्लीं ज्या वाड्यांत शहरफौजदार कचेरी आहे त्या ठिकाणी त्यावेळी संस्कृत पाठशाळा होतीं. ही जागा वादाकरितां पसंत केली होती. ह्या पाठशाळेंत उभय पक्षांचा वाद कित्येक दिवस पूर्वपक्ष उत्तरपक्ष लेखी पद्धतीनें चालला होता. ज्या दिवशी पंच निकाल देणार त्यादिवशी पुण्यापासून बेळगावपर्यंतच्या प्रांतांतील हजारों ब्राह्मण साताऱ्यांस निकाल ऐकण्याकरितां पाठशाळेपुढे जमले होते. आपल्या विरुद्ध निकाल देणारांची साधल्यास डोकी फोडून सूड घेण्याची विद्या भिक्षुकवर्गास चांगली अवगत असल्यामुळे निकालाच्या दिवशी कदाचित् रक्तपाताचाहि प्रसंग येईल, म्हणून महाराज स्वतः नागव्या तरवारीने पाठशाळेच्या पुढे बंदोबस्ताकरितां फिरत होते. सरतेशेवटी पंचांनी क्षत्रियांच्या तर्फे निकाल देऊन आबा पारसनीस यांच्या विद्वतेची मोठी वहावा केली. त्यावेळी क्षत्रियांच्या अस्तित्वाबद्दल एकंदर २४ सिद्धांत पंचांनी मान्य केले त्यापैकी थोडे खाली नमूद करतों :--
(१) श्रीपरशुरामानें एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा प्रयत्न केला, तरी केव्हाह क्षत्रियांचा अभाव झाला नाहीं. (२) ज्या क्षत्रियांचा परशुरामानें वध केला नाहीं त्यांचे वैदिक कर्म त्याने सोडविलें नाहीं. (३) नंदानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होतें. (४) सुमित्रानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होते. (५) राज्यकर्ता जो राजा त्यास वैदिक मंत्रांनी राज्याभिषेक होतो, सदय त्याने तेवढे वैदिक कर्म करावें व इतर क्षत्रियांनी करू नये, असे नाही, तर कोणत्याही क्षत्रियास वैदिक कर्म विहित आहे. (६) सातारा, चंदी (तंजावर) नागपूर व करवीर येथील राजघराण्यांचे मूळ एकच असून यांचेकडे ऋग्वेदावरून कर्म चालते. चंदीस अग्निसिद्ध असून, स्वतः राजे (शिवाजीमहाराज) ब्राह्मणांस अग्नौकरण देतात व शास्त्राध्ययन करितात. करवीरींहि वेदोक्त कर्म चालत आहे. (इ. स. १८३०) (७) नर्मदेपलीकडे क्षत्रियांकडे यजुर्वेदावरून कर्म चालते. उदेपुरास अशीच वहिवाट आहे. साताऱ्यांस यजुर्वेदी कर्म महाराजांनी सुरू करावें, (८) क्षत्रियांस मातुलकन्याविवाह वर्ज्य नाही (९) क्षत्रियांत स्वज्ञातीत एकपात्री भोजन करण्याची चाल आहे, तरी वैदिक कर्मास बाध येत नाहीं.
याप्रमाणे मराठे क्षत्रिय व चां. का. प्रभु यांच्या क्षत्रियत्वाचा वाद उघडपणे जिंकून विजयी होतांच रा. आबा पारसनीस यांनी त्याप्रसंगी काढलेले सर्व सिद्धांत व त्यांचे आधार यावरून " सिद्धांत विजय" नामें एक उत्कृष्ट संस्कृत ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ व आबा पारसनिसांचे दुसरे काही ग्रंथ महाराजांनी रेसिडेटांच्या पत्रासह उदेपुरास पाठविले. तेथील सर्व मोठमोठया व्युत्पन्न शास्त्र्यांनी पारसनीसांच्या विद्वत्तेबद्दल व शास्त्रपारंगततेबद्दल वाहवा करून त्या सर्व ग्रंथांवर आपापल्या मान्यतेचे शिक्के मारले व सातारच्या महाराजांची वंशावळी उदेपूरच्या वंशावळींत दाखल करून तिची एक प्रत कंपनी सरकारच्या शिक्क्यानिशीं साताऱ्यांस पाठविली. उदेपुरच्या पंडितांनी राणाजींच्या आज्ञेवरून महाराजांस पत्र दिलें कीं, आपल्याकडील शास्त्रार्थाचा राणाजीनी ब्राह्मणपंडितांकडून निर्णय करवून शिवानंदापाशीं दिला आहे. राणाजी व आपण पूर्वीपासून एकच वंशांतील असून व्यवहारात काहीएक भेद नाहीं यास्तव आम्ही आपले शुभचिंतन करीत असतो. इकडे वैदिक कर्मांधिकारी क्षत्रिय पुष्कळ असताही दक्षिणी ब्राह्मण क्षत्रियांचा अभाव म्हणतात, ह्यावरून त्यांचे ठिकाणी मत्सरबुद्धी वास करीत आहे असे म्हटले पाहिजे. या प्रमाणें उदेपुराहून पत्र येतांच महाराजांनी सन १८३२ मध्ये सर्व मराठे क्षत्रियांस यादी पाठवून क्षत्रियांचे धार्मिक हक्क कोणते, व कसे हें खुलासेवार कळविलें. हें पत्र फारच मोठे व विस्तृत असून तें रावबहादुर प्रो. डोंगरे यांनी छापिलेल्या सिद्धांतविजय ग्रंथाच्या परिशिष्ठांत (पृ. १-१६) समग्र दिलेले आहे.
त्यानंतर महाराजांनी आबा पारसनीसांचे सर्व ग्रंथ कर्नाटक प्रांतीं रवाना केले. तिकडील विद्वान् पंडितांनी त्यांवर आपापल्या मान्यतेचें मोर्तब केलें व क्षत्रिय मराठ्यांच्या धार्मिक हक्कांबद्दल आणि ग्रंथकारांच्या विद्वत्तेबद्दल प्रशंसापूर्ण पत्र महाराजांकडे रवाना केली.
मान्यतेच्या याद्या आलेली ठिकाणें
(१) तंजावर संस्थान, (२) आनेगोंदी संस्थान, (३) कोच्ची संस्थान, आणि (४) म्हैसूर संस्थान
मान्यतेची पत्रे देणारे प्रमुख पंडीत
नांव - ठिकाण
(१) पांडुरंगाचार्य भागवत - अंकलुज
(२) कट्टी गोविंदाचार्य - कुरुंदवाड
(३) नरसिंहाचार्य - आनेगोंदी
(४) रघुपत्याचार्य - अरणी संस्थान
(५) पांडुरंगाचार्य - चांद्रायणपट्टण
(६) आणाशास्त्री राजपुरोहीत - म्हैसूर
(७) व्यंकट रमणाचार्य - म्हैसूर
(८) बाबाचार्य - तंजावर
(९) श्रीनिवासाचार्य - म्हैसूर
(१०) बाल्लाळ नारायणाचार्य - तौळव देश
(११) तमंणशास्त्री - चरकल संस्थान
(१२) भीमाचार्य - आनेगोंदी
(१३) दासाचार्य - म्हैसूर
(१४) रामाचार्य - कोच्ची
(१५) माधवाचार्य - कोच्ची
(१६) माधवमताच्या तीर्थाच्या मठांचे - बेंकीपूर
श्रीमदाचार्याचे शिष्यस्वामी – म्हैसूर संस्थान
(१७) श्रृंगेरी शंकराचार्य - शेडबाळ मुक्कामाहून.
(१८) उडपी संस्थानांतील आठ – कोच्ची राज्य
मठांचे स्वादीकर स्वामी
(१९) लक्ष्मीकांत स्वामी - विद्यानगर.
याशिवाय क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्त कर्माच्या प्राचीन परिपाठाबद्दल विजयानगर, तंजावर, म्हैसूर, आनेगोंदी व कोच्ची येथील शास्त्र्यांच्या रिवाजपट्ट्याहि आल्या.
याप्रमाणे सातारचे ग्रंथ सर्वत्र मान्य झाले, तरीसुद्धां ब्राह्मणांकडून वारंवार अडथळे उत्पन्न होत. तेव्हां सन १८३५ सालीं क्षत्रिय मराठे मंडळींच्या सभा होऊन सर्वानुमतें ठरलें की दक्षिणीब्राह्मण वेदोक्तकर्मास अडथळे आणतात त्याअर्थी त्यांची गरज न ठेवतां उत्तर हिंदुस्थानांतून ब्राह्मण आणून कर्म चालवावी. त्याचप्रमाणे दक्षिणी व हिंदुस्थानी क्षत्रियांचा शरीरसंबंधहि सुरू करावा. ह्याप्रमाणे वागण्यास पुष्कळ क्षत्रिय मराठे कबूल झाले त्यांजकडून त्याप्रमाणे कबुलायतीही लिहून घेतल्या. परंतु या ठरावाची अम्मलबजावणी झालेली दिसत नाही. क्षत्रिय मराठयांचे क्षत्रियत्व याप्रमाणे पुनः प्रस्थापित करूनच प्रतापसिंह महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वतः आपल्या धार्मिक हक्कांप्रमाणे वागण्यास सुरुवात केली. सन १८३६ साली त्यांनी पंडितराव व राजोपाध्ये यांचा तंटा लागला असतां, मागील वहिवाटीची चौकशी करून उभयतांच्या कामाचे पंचामार्फत जाबते पाडून दिले, स्वतः महाराज व त्याचे बंधु शहाजी राजे हे उभयतां स्नानसंध्यादि कर्मे नित्य करीत असत.
राजघराण्यांतील गृह्यकृत्याची याप्रमाणे व्यवस्था लागल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्याभिषेक यथाविधी करून घेण्याचा विचार प्रतापसिंह महाराजांनी केला. अभिषेक प्रयोगाची नवी पोथी तयार करवून हा समारंभ यथाशास्त्र व यथाविधी साजरा करण्यांत आला. राज्याभिषेकानंतर महाराजांनी रा. आबा पारसनीस यांस सन १८३८ त त्यांच्या अप्रतीम कामगिरीबद्दल प्रशंसापर आज्ञापत्र दिले.
यावेळी प्रतापसिंह महाराजांच्या मेहनतीने क्षत्रिय मराठ्यांचे क्षत्रियत्व प्रस्थापित झालें हें खरे, पण त्या योगानें सारा ब्राह्मण समाज महाराजांच्या विरुद्ध झाला. क्षत्रिय मराठयांना सर्वस्वी चिरडून काढण्याचा ब्राह्मणांचा इतका हातातोंडाशी आलेला यत्न फुकट गेला. मग का नाही त्यांची तडफडाट उडणार? छत्रपतीला बुडवितां बुडवितां पेशव्यानांच राम म्हणावें लागले आणि कोल्हापूरकर भोसल्यांचा नायनाट करताकरताच परशुरामभाऊ पटवर्धनास परलोकचा रस्ता सुधारावा लागला. तरीहि निराश न होतां शेवटचें परशुरामास्त्र सोडण्याचा चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातू यांनी उपक्रम केला आणि तो मात्र परशुरामाच्या कृपेनें सणसणीत फळास आला. चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातु यांनी अनेक उलटीसुलटी कारस्थाने उभी करून महाराजांवर कंपनी सरकाराविरुद्ध फितूर केल्याचा आरोप आणला त्या भानगडीत प्रतापसिंह महाराज पदच्युत होऊन पुढे लवकरच सातारची गादीहि खालसा झाली. यावेळी बाळाजीपंताने आणि चिंतामणरावानें जे जे अत्याचार केले त्यांचा इतिहास वाचला तर आंगावर शहारे येतात, आणि स्वार्थाकरितां मनुष्य किती नीचपणाचीहि कृत्ये करण्यास भीत नाही, याच्या प्रत्यंतराने मन क्षुब्ध होते. बाळाजीपंत नातु यांचे नांव मराठ्यांच्या इतिहासात काळ्याकुट्ट बॉर्डरीमध्येच लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण पेशवाई बुडविण्याच्या कामी अग्रेसर होऊन स्वराज्य बुडविण्याचें श्रेय त्यानें घेतलें व तेवढ्याने या प्राण्याची तृप्ती न होऊन स्वतःच्या तीव्र द्वेषाला व ज्वलज्जहाल स्वार्थाला सातारच्या संस्थानाचाहि बळी घेतला राष्ट्रीय चित्पावनांनी या महापुरुषाच्या चरित्राचें जरूर अध्ययन करावें.
सातारचे राज्यच खलास झाले तेव्हां क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्ताधिकाराचा प्रश्नहि निकालांत निघाला. परंतु कोल्हापूर येथे मात्र सर्व कर्मे वेदोक्त मंत्रांनीच चालू होती. ही पद्धत कै. बाबासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीपर्यंत अव्याहत चालू होती. त्यांच्या कारकिर्दीत (सन १८३७-६६) वे. शा. रघुनाथ शास्त्री पर्वते यांनी महाराजांस (बद) सल्ला दिला की वेदोक्त मंत्रांचा उपयोग इतर आचरणांशीं विरुद्ध असल्यानें श्रेयस्कर नाहीं. त्यावरून वाडयांत वेदोक्त कर्मविधी बंद होऊन सर्व कर्मे पुराणोक्त मंत्रांनी चालू झाली. तीं विद्यमान श्रीमन्महाराज शाहू छत्रपती यांच्या कारकिर्दीपर्यंत तशीच चालत होती. महाराज शाहूमहाराजांच्या मनांत आपली सर्व कर्मे आपल्या क्षत्रिय धर्माप्रमाणें वेदप्रणित मंत्रांनी व्हावीं असे आले व त्याप्रमाणे त्यांनी हुकूम फर्माविलें. परंतु राजोपाध्ये यांनी त्या हुकुमाप्रमाणे वागण्याचे साफ नाकारतांच महाराजांनी एक कमिटी नेमून तिला राजवाड्यांत पूर्वी कर्म कोणत्या पद्धतीने होत होती त्याबद्दल रिपोर्ट करावयास आज्ञा केली. या कमिटीत आपासाहेब राजोपाध्ये, रा. वा. कृष्णाजी नारायण पंडितराव सर न्यायाधीश, व रा. सा. वि. ब. गोखले हे गृहस्थ होतें. या कमिटीने सुमारें २० इसमांच्या जबान्या घेतल्या व इतर रीतीनें तपास करून, वे.शा.पर्वतेबुवांच्या उपद्व्यापापूर्वी सर्व कर्मे वेदोक्त पद्धतीनेंच करण्यांत येत असत, असा रिपोर्ट हुजूर सादर केला. राजोपाध्ये यांनी आपला रिपोर्ट दिला नाहीं..
या कमिटीच्या अभिप्रायाप्रमाणे वागण्याचे राजोपाध्ये यांनी नाकारतांच त्यांस कामावरून दूर करून त्यांना राजोपाध्येपणाबद्दल दिलेली जहागीर महाराजांनी जप्त केली. यावेळी मराठे क्षत्रियांवर ब्राह्मणांनी ग्रामण्यच उभे केलेलें होतें. महाराजांच्या वाड्यांत वेदोक्त कर्मे केल्यास समाज बहिष्कृत करतो व न केल्यास महाराजांकडून उत्पन्नाची जप्ती होते अशा पेचांत राजोपाध्ये व त्यांचे आश्रित होते. यावर सन १९०५ मध्ये करवीर मठाधिपति श्रीशंकराचार्य स्वामीनीं पुन्हा सर्व कागदपत्रे व मठांतील आधार पाहून आज्ञापत्र काढलें. त्यांतील कांही महत्त्वाचे उद्गार खाली दिले आहेत :--
(१) श्रीछत्रपति शिवाजी महाराज हे क्षत्रिय वंशांतील असल्याबद्दल वंशवृक्षावरून पूर्णपणे सिद्ध होत आहे व त्यास वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट पंडित यांणीं क्षत्रिय कुलोचित वेदमार्गानें राज्याभिषेक केल्यासंबंधाची माहिती इतिहासप्रसिद्धच आहे. शिवाय राज्याभिषेक झाले वेळचें वर्णन केल्याची यादी पाहिली त्यावरून क्षत्रिय कुलास योग्य असा वेदमार्गविहित राज्याभिषेक केल्याचे पूर्णपणे सिद्ध होत आहे. यावरून श्रीशिवछत्रपति महाराज यांचे घराणें क्षत्रिय असून, वेदोक्तकर्माचा त्यास पूर्ण अधिकार आहे यांत शंका नाहीं. हा अधिकार शिवाजी महाराज यांचे वंशासही असल्याची माहिती मिळते. (२) श्रीमन्महाराज छत्रपति कोल्हापूर यांचे घराणें (तंजावरच्या कोर्टाने कोल्हापूरच्या महाराजांना शुद्र म्हटल्याबद्दल श्रीयुत महादेव राजाराम बोडस यांना जो ब्रम्हानंद झाला त्याच्याशी करविरकर मठाधीपतीचे हे उद्गार ताडल्यास शहाणपणाचा वाटा रा.बोड्सांनाद्यावा कि तंजावरच्या जज्जाला द्यावा हें एक मोठे कोडेच पडते. एन ४०२०-११ अ) क्षत्रिय असोन, त्यांचे घराण्यांत वेदोक्त कर्म करण्यांस कांहीं हरकत नाहीं असें इकडून ठरविण्यांत येत आहे.
श्रीमत्शंकराचार्याचा याप्रमाणे ठराव होतांच कोल्हापुरास बऱ्याच ब्राह्मणांची संशयनिवृत्ती होऊन त्यांनी सभा भरविली आणि ठराव पास केला की : क्षेत्रस्थ ब्रह्मवृंदांकडून असा निर्णय करणेंत येत आहे की, श्रीजगद्गुरु मठ करवीर व
संकेश्वर यांनी या प्रकरणाचा केलेला निर्णय क्षेत्रस्थांस पूर्ण संगत असून करवीर ब्रह्मवृंदाचीही याविषयी अशी आज्ञा आहे की : श्रीशाहू छत्रपति महाराज सरकार करवीर हे क्षत्रिय आहेत.. या राजघराण्यातील नित्यनैमित्तिक व व्यादि धर्मकृत्यं मन्यादिस्मृतिप्रतिपादित पूर्वापार वहिवाटीस अनुसरून क्षत्रियोचित वेदोक्त पद्धतीने होत जावींत. याविषयीं कोणीहीं संदेह पेचा नाहीं ॥ मार्गशीर्ष कृ. ९ शके १८२७ विश्वावसुनाम संवत्सरे,
याच सुमारास श्री काशी क्षेत्राचे प्रसिद्ध पंडित श्री कृष्णानंदसरस्वती स्वामी कोल्हापुरास आले. त्यानीहि करवीरकर शंकराचार्यांचा ठराव बरोबर आहे अशा मान्यतेचें पत्र लिहून दिलें. याप्रमाणे हकिकत होऊन कोल्हापुरच्या मराठे क्षत्रियांवरील ग्रामण्य निकालांत आलें.
सत्यप्रतिपादनाच्या बाबतीत सगळेच चित्पावन काही मत्सरग्रस्त नसतात. आजलाहि चित्पावन समाजांत शुद्ध सत्याचा अभिमान धरून आपल्या मत्सरग्रस्त जातभाईंचे कान उपटणारे लोकहितवादि मुळीच नाहीत असे नाही. सुप्रसिद्ध निस्पृह आणि भारदस्त विविधज्ञानविस्तार मासिकांत (एप्रिल १९१९) ग्वालेरचे स्पष्टवक्ते रा. रा. माधवरावजी लेलेसाहेब यांनी नंदान्तं क्षत्रियकुल बदल विवेचन करताना जे उद्गार काढले आहेत, ते येथेंच समाविष्ट करण्यासारखे आहेत. "शिवाजी महाराजांची शास्त्रोक्त विधीनें मुंज वगैरे करवून त्यांना क्षत्रियकुलावतंस असें म्हणून त्याचें क्षत्रियत्व सिद्ध करून घेऊन, नंतर त्यांचा यथाशास्त्र राज्याभिषेक करविला गेला. त्यावेळी किंवा त्यानंतरही या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊन गागाभट्टाला किंवा तत्पक्षीय दाक्षिणात्य ब्राह्मणांना बहिष्कृत करण्याचा उपक्रमही कोणी केल्याचें दिसत नाही. अशा स्थितीत कायस्थ प्रभूंच्याच क्षत्रियत्वासंबंधानें हा आक्षेप पुढे आणणें, आणि त्याला चित्पावनासारख्या संशयित वादग्रस्त उत्पत्ति असलेल्या, आणि त्यामुळेच यांची राजकीय उन्नति होईपर्यंत इतर ब्राह्मणवर्गांनी कमी दर्जाच्या मानलेल्या पोटब्राह्मण जातीने महत्त्व देणें, बरेच चमत्कारिक दिसतें. कोणच्याही पीठांचे शंकराचार्य चित्पावन जातीचे कधीही झालेले नाहीत. पेशव्यांच्या वेळींसुद्धा त्यांच्याशी रोटीबेटीव्यवहार करण्यांत देशस्थ ब्राह्मणमंडळी अनमान करीत असे. शिवाय प्रत्यक्ष बाजीराव पेशव्यांना नाशिकांतील परंपरांगत ब्राह्मणघाटावर गोदास्नानास जाण्याला आक्षेप घेण्यात आला होता. या गोष्टींचे योग्य निराकरण होईपर्यंत निदान चित्पावन ब्राह्मणांनी तरी या बाबतीत पुढाकार घेऊन दुसऱ्यांना नांवे ठेवणे योग्य नाहीं.
क्षत्रिय मराठ्यांवरील ठळक ग्रामण्यांचा इतिहास येथपर्यंत दिला. याशिवाय ठिकठिकाणी जेथें जेथें त्यांची वस्ती आहे तेथे तेथे त्यांना धार्मिक बाबतीत अडथळे आणून त्रास देण्याचें राष्ट्रीय कर्म ब्राह्मण म्हणविणारे हल्लीहि प्रामाणिकपणानें बजावीत असतातच. याचे अगदी ताजे उदाहरण म्हटले म्हणजे क्षत्रिय मराठ्यांच्या उमरावती येथील श्रावणीचें होय. उमरावती येथें गुदरत साल (सन १९१८) तेथील `सुबोधमाला` नामक मासिक पुस्तकाच्या कचेरीत क्षत्रिय मराठयांनी श्रावणीचा विधि शुरू केला. ही बातमी स्वतःस ब्राह्मण समजणाऱ्या कित्येक प्राण्यांस समजताच ते जूट करून श्रावणीच्या ठिकाणाला वेढा घालण्याकरितां धांवून आले आणि हत्यारांच्या कायद्यामुळे त्यांना तलवार बंदुकीची चढाई करता येणे शक्य नसल्यामुळे, मनोभावे श्रावणी करण्यांत तल्लीन झालेल्या श्रीशिवाजी महाराजांच्या जातभाईवर या महाब्राह्मणांनी धोंड्यांचा वर्षाव करण्याची सुरुवात केली. कित्येक समंजस मराठ्यांनी या महाब्राह्मणांच्या भडकलेल्या मेंदूला चार समजुतीच्या मात्रेचे वळसे देऊन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला; परंतु पेशवाई नोकरशाहीच्या या अभिमानी प्रवर्तकांचा क्रोध कांही केल्या आंवरेना ! अखेरीस मराठ्यांनी आपल्या अस्तन्या वर सारतांच ही ब्राह्मणसेना पळून गेली आणि क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्त श्रावणीचा समारंभ यथासांग पार पडला. सुबोध मालेचे संपादक रा. के. बी. देशमुख यांनी " आमची श्रावणी हिन्दुधर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे असे धर्मांच्या आधारे निर्विवाद कोणीहि ठरवून द्यावें. आम्ही त्यांच्या सशास्त्र निर्णयाचा सामार स्वीकार करूं." असे आव्हाहन केलें. परंतु नेहमीच उलट्या पावलांनी चालण्याची खोड आंगीमांसी खिळलेले ब्राह्मण सरळ प्रश्नांना सरळ उत्तर थोडेच देणार! वेशासंपन्न पुरुषोत्तम, शौचे, पोंक्षे वगैरे शिखंडी लेखकांनी `कर्तव्य` नांवाच्या एका स्थानिक पत्रांतून क्षत्रिय मराठ्यांना शिव्यांची आणि अपशब्दांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. त्या लाखोलीत शूद्र, ध्यान, डोमकावळे, अशुद्ध बीजाचे वगैरे शेलकी ब्राह्मणी बिल्वपत्रे चमकत होती. पुढें हें प्रकरण कोर्टापर्यंत गेलें होतें. परंतु प्रतिपक्षानें माफी मागितल्यावरुन तें निकालांत निघालें. सुबोधमाला मासिक नसतें तर हा खोडसाळपणा ठिकच्या ठिकाणीच जिरला असता आणि या स्थानिक जुलमाचा इतिहास बहुजनसमाजाच्या नजरेस न पडतां स्थानिक स्मशानांतच त्यास मूठमाती मिळाली असती. यावरून नियतकालिक वृत्तपत्रांची आवश्यकता किती असते हें वाचकांस नीट पटेल. असे छोटेखानी दंगेधोपे ठिकठिकाणी किती तरी होत असतील !!! असो.
क्षत्रिय मराठ्यांच्या ग्रामण्यांत एक विशेष गोष्ट वाचकांच्या नजरेस आणण्याची आम्ही अत्यंत नम्रतेनें परवानगी घेतो. आद्य छत्रपति श्रीशिवाजी महाराज यांच्या अंमदानींत क्षत्रिय मराठ्यांच्या धार्मिक हक्कांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामी बाळाजी आवजी चिटणीस या चां. का. प्रभूचे भगिरथ यत्न खर्ची पडले आणि प्रतापसिंह महाराजांच्या वेळी तोच प्रश्न पुनश्च हडसून खडसून कायमचा करण्यात आबा पारसनीस या शास्त्रपटु चां. का. प्रभूची विद्वत्ता छत्रपतींच्या चरणसेवेंत खर्ची पडली. अलीकडच्या कोल्हापूर प्रकरणांतहि चां का. प्रभू मंडळीनींच छत्रपतींची सेवा एकनिष्ठपणाने बजावलेली आहे. राजकीय बाबतीतसुद्धा ही गोष्ट अशीच दिसून येते. श्रीशिवाजी महाराजांनी ज्या दादजी नरसप्रभू देशपांडवांजवळ स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच खास पांचव्या वंशजानें रंगो बापूजी प्रभूने शेवटच्या प्रतापसिंह छत्रपतीच्या स्वराज्याकरितां खुद विलायतेंत जाऊन पार्लमेटाशी छातिठोक झगडा द्यावा, हा आश्यर्योत्पादक योगायोग फार विचार करण्यासारखा आहे. अशा रीतीनें क्षत्रिय मराठे आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांची ही जोडी गेल्या अडीचशे वर्षे हातांत हात घालून वागत आली आहे. हें ऐक्य असेंच चिरकाल टिको आणि उभयतांच्या निर्विकार व निःसीम ‘बिरादरकी’ चें पर्यवसान या भरतखंडाच्या विपुल सौभाग्यप्रापत होवो, अशी सद्गतित अंतःकरणानें त्या जगच्चालक परमेश्वराची अनन्यभावानें प्रार्थना करून हें प्रकरण पुरें करतों.
श्री शिवाजी महाराजकी जय !
****
प्रकरण ३
पंचाल (दैवज्ञ) ब्राह्मण
दैवज्ञ ब्राह्मण ही जात सांप्रत लोकव्यवहारांत सोनार या सर्वसामान्य संज्ञेनें ओळखिली जाते. या वर्गातील बहुतेक लोक सोने, चांदी व जडजवाहीर यांचा धंदा करीत असते, परंतु वास्तवीक यांचा समावेश पंचाल ब्राह्मण या मुख्य ब्राह्मणवर्गातच होतो. धंद्यामुळे जरी यांना सोनार म्हणतात, तरी सुवर्णकाराचे काम करणारे सर्वच सोनार कांहीं दैवज्ञ ब्राह्मण नसतात. मात्र पंचाल ब्राह्मण म्हणून यांच्यातील जो मुख्य ब्राह्मणवर्ग घांटावर आहे. त्यांचे अंतर्बाह्य वर्तन शुद्ध ब्राह्मणांप्रमाणेच असतें. त्यांतीलहि बरेच लोक असून आपला प्राचीन पूर्वपरंपरेचा सुवर्णकाराचा धंदा करीत असून ब्राह्मणकर्मामध्येसुद्धा ते फार निष्णात असल्याचे आढळते. कोंकण व मुंबई लत्त्याकडील देवज्ञाची ही ब्राह्मणकर्माची परंपरा सांप्रत अवनत होत चालली आहे आणि याला कारण सांप्रतची परिस्थितीच होय. तथापि त्यांची नित्यनैमित्तिक धर्मकृत्यें त्यांचेच दैवज्ञ ब्राह्मण
(केवळ पोपटपंची मूढ मिक्षुकांच्या अज्ञानाबद्दल सर्वत्र तक्रार सुरू झालेली आहे धर्मकृत्यें यथासांग व्हावीत व ती चांगल्या सुशिक्षित धर्मपारंगतानीच करावी, अशा कल्पनेचा प्रादुर्भाव होत आहे. आज दैवज्ञातहि धर्माभिमानी सुशिक्षित व पदवीधर विद्वान् बरेच निपजत आहेत. त्यांनी ही ब्राह्मणवृत्तीची प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे मनात आणल्यास दैवज्ञातहि पुनश्च मोठमोठे पंडित निर्माण होतील व जातीच्या लौकिकाची उज्वल परंपरा चिरजीव होईल, अशी आशा आहे.) चालवीत असतात.
शैवागम ग्रंथावरून पंचालांची उत्पति प्रत्यक्ष विश्वकर्म्यापासून झाल्याचे सिद्ध होत आहे. मनु, मय, त्वष्टा, दैवज्ञ आणि शिल्पी हे विश्वकपचे पांच पुत्र होत. याच पांच पुत्रांच्या संततीस पंचाल म्हणतात. या पंचालांत विश्वकर्मा संततीय लोहार, सुतार, व कासार यांचाहि समावेश होतो. या विश्वकर्मा कुलांत उत्पन्न झालेले ब्राह्मण शुद्ध असल्याबद्दल दैवज्ञ ब्राह्मण फार अभिमान बाळगतात.
सध्यांप्रमाणे पूर्वकाली ब्राह्मण्य हे जातिविशिष्ट नव्हते, गुणकर्मावर अवलंबून होतें म्हणून पुष्कळ हीनोत्पत्तीय व्यक्ती व समाज ब्राह्मणपणाला पोहचले. मूळचे जे ब्राह्मण किंवा ज्यांनी प्रथमतः ब्राह्मण्य मिळविलें त्यांच्यामागून इतरही लोक जेव्हां ब्राह्मण होऊ लागले तेव्हां अर्थातच त्या उभयपक्षांत स्पर्धा उत्पन्न झाली. या स्पर्धेची हकिकत विश्वकर्मपुराण अध्याय ३ मध्ये दिलेली आहे. ही जी स्पर्धा पौराणिक काळीं उत्पन्न झाली ती अद्यापपर्यंत चालूच आहे. या स्पर्धेचा जो इतिहास तोच ग्रामण्यांचा इतिहास असें म्हणावयास हरकत नाहीं.
बौद्धधर्माचा उदय प्रसार व उत्कर्ष होऊन सनातन हिंदूधर्माचा बहुतेक लोप झाला असतां, पंचाल ब्राह्मणांनी गंगेत उभें राहून श्रीशंकराची आराधना केली. तेव्हां धर्माच्या रक्षणार्थ शंकराचा अवतार श्रीशंकराचार्य उत्पन्न होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा पाडाव करून सनातन धर्म पुन्हा प्रस्थापित केला. यावेळी पांचालांचें बरेंच वर्चस्व झाल्याचें दिसतें. श्रीमदाचार्यांनी विश्वकर्मा जगद्गुरु आहे असें जाणून त्याच्या स्तुतीचें एक स्तोत्रही केलेलें आहे. परंतु पंचालांना यापुढें राजाश्रय मिळाला नाहीं व दिवसेंदिवस त्यांची अधोगतीच होत गेली. यानंतर यवनी अंमल होऊन एकंदर हिंदुधर्माची फार दुर्दशा उडाली. त्यांत इतरांप्रमाणेंच दैवज्ञहि निराश्रित व विपन्नावस्थेत काळ कंठू लागले.
पेशव्यांचा अमल महाराष्ट्रावर बसेपर्यंत चाल देवज्ञांच्या ब्राह्मणवृत्तिबद्दल किंवा वेदोक्ताबद्दल कोणी आक्षेप घेतल्याचे आढळत नाही. आद्यछत्रपति शिवाजी महाराजापासून तो शाहू महाराजांच्या अंतापर्यंत ते आपल्या ज्ञातीतीलच वृत्ति चालवून आपापले व्यवसाय करीत सुखासमाधानें कालक्रमणा करीत होते. शाहूच्या मृत्यूनंतर चित्पावन नोकरशाहीला उच्चीचे ग्रह आले आणि त्यांनी ग्रामण्याच्या बोल्शेविझमच्या घरटांत या जातीलाही भरडून काढण्यास कमी केले नाही. वास्तवीक देवज्ञ ब्राह्मण राजकीय क्षेत्रांत कमीच पडले नाहीत किंवा चित्पावन नोकरशाहीच्या राजकीय खात्याच्या कानखिळा काढण्याचाहि त्यांनी कधि उपचार केला नाही ते आपला सुवर्णकाराचा आणि याज्ञिकी व्यवसाय करीत स्वस्थ बसले होते. परंतु ब्राह्मणपणाचा काय बाप्तिस्मा पटकविण्यासाठी धाधावलेल्या तत्कालीन चित्पावनांना या दैवज्ञांचे ब्राह्मण्यहि फुकाचे पहावले नाही. सर्व जगांत ब्राह्मण काय ते आम्ही. बाकीचे सारे शूद्र हें ठरविण्यासाठी चित्पावन नोकरशाहीने ग्रामण्याच्या बुरख्याखाली जे जे अत्याचार केले, त्यातील देवज्ञांवर केलेले फारच राक्षसी व भयंकर होते. चां. का. प्रभू आणि क्षत्रिय मराठे हे दोन समाज जात्याच तरवारबहाद्दर आणि राजकारणी असल्यामुळे त्यांतल्या लोकांना पकडणे, हाणमार करणे, उपाशीतापाशी फरासखान्यांत कोंडून ठेवणे, घरांची जप्ती करणे, बायकामुलांची अब्रू घेणे वगैरे प्रकार करण्याची खुद नोकरशाहीचे दंडधारक पेशवे यांची छाती नव्हती, मग त्यांच्या नावाखाली वाटेल तो सावळागोंधळ घालणाऱ्या भुत्यांची ती कथा काय? पण बिचारे दैवज्ञ पडले गरीब आणि एकमार्गी! आणि गरीबाचे काळ सगळेच असतात !! देवज्ञांवर चित्पावनांनी पेशवे नोकरशाहीत कायकाय अत्याचार केले त्यांचा इतिहास कोणत्याहि समंजस मनुष्याचे हृदय विदारण करण्याइतकाच तीव्र आहे, म्हणून तो होईल तितक्या सौम्य भाषेत येथे प्रथित करण्याचा यत्न केला आहे.
ग्रामण्य पहिलें.
हें ग्रामण्य दुसरे पेशवे बाजीराव बल्लाळ पेशवे यांच्या कारकीर्दीत झालेले आहे. याची समग्र तपशीलवार हकिकत उपलब्ध नाहीं व या ग्रामण्याचा सुगावाहि सन १८२५ सालच्या दैवज्ञांवरील एका खटल्यांत आलेल्या पुराव्यांच्या कागदांवरून लागला. त्यांत वेव्हारे जोशी यानी चंद्र २७ रबिलाखर सन इहिदे सल्लासिन मयातैन व अल्लफ सन ११४० फसलीची बाजीराव बल्लाळची एक सनद दाखल केली होती, तींत अतः पर सोनारांनी आपल्या सोनारभटाकडून उपाध्यायिक कर्मे करू नयेत, वेव्हारे जोशी यांचे हातून काम घेत जावें. वेदोक्त ब्रह्मकर्म सोडून देऊन पुराणोक्त कर्मे चालवीत जावीं. भाताचे पिंड करण्याची वहिवाट बंद करून कणकीचे पिंड करीत जावे" वगैरे मजकूर होता. या कतब्यावर सोनार पंचालांच्या सह्या घेण्याची खूप खटपट झाली, परंतु त्यांनी सह्या केल्या नाहीत आणि याचा परिणाम त्यांना पेशवाई अमदानीत उत्तरोत्तर फार छळ सोसावा लागला. या ग्रामण्यांत दैवज्ञ पंचालांवर फार अमानुष अत्याचार करण्यात आले होते असे म्हणतात.
ग्रामण्य दुसरें
शके १७१७ भाद्रपद वद्य नवमीच्या दिवशी पुण्यांतील प्रमुखप्रमुख दैवज्ञांच्या घरांवर एकदम पेशव्यांच्या गारद्यांची धाड आली. त्यांनी ठिकठिकाणी घरांना वेढे दिले व सरकारी कारकुनांनी दैवज्ञांना खडाखड बेड्या ठोकून गारद्यांच्या पहाऱ्यांत दिवसाढवळ्या भर बाजारांतून अय्या शास्त्र्याकडे रवाना केले. घरांची झडती घेऊन पोथ्या, देव्हाऱ्यांतील देव व इतर धार्मिक विधीच्या चीज वस्तु जप्त करून नेल्या. अय्याशास्त्र्याने मध्य रात्रीच्या सुमारास कैद्यांची भेट घेतली व जातीतील धर्मकर्मे कशी चालवितात याबद्दल त्यांच्या लेखी जबान्या घेतल्या. आपण स्नान, संध्या, तर्पण, वैश्वदेव, गर्भादानादि सर्व संस्कार वेदोक्त मंत्रांनी करतो असे त्यांनी जबाब दिले. नंतर त्यांस गारद्यांच्या ताब्यात देऊन कोठड्यांत कोंडून ठेवलें, दुसऱ्या दिवशी आणखी काही दैवज्ञांस पकडून आणले. प्रथम त्यांस खरपूस हाणमार करून गारद्यांच्या पहाऱ्यांत नाना फडणीसाचे दिवाण राघोपंत यांच्या वाड्यांत रवाना केले अय्याशास्त्र्याच्या कारकुनानें आरोपींच्या आरोपाची कानसुनावणी केल्यावर राघोपंतानेंहि आरोपीस चौदाव्या रत्नाचा प्रताप दाखवून आपल्या हाताला भाग्यवान् केलें. धर्मकर्मादि प्रघाताची लेखी जबानी घेतल्यावर त्या हतभागी आणि हतबल दैवज्ञांची रवानगी मुसक्या बांधून निरनिराळ्या चौक्यांवर करण्यांत आली. बिचाऱ्यांना दोन दोन दिवस अन्नोदकसुद्धां मिळाले नाही. या भयंकर शिक्षेचें कारण काय तर दैवज्ञ आपणांस "ब्राह्मण" म्हणवीत आणि वेदोक्त पद्धतीनें स्वज्ञातियांच्या वृत्ति चालवीत !
पाचव्या दिवशी पुन्हा राघोपंताकडचे आमंत्रण आले. तेथें अरोपींच्या धर्मकर्माविषयी पुन्हा लेखी जबान्या घेण्यांत आल्या. नंतर सर्वांच्या जेवणाखाणाची व्यवस्था लावण्याबद्दल सरकारी हुकूम झाला. रविवार पेठेत जप्तीचें घर होते तेथे चौकीवरून एकेका आरोपीस आणीत, त्यानें स्वयंपाक करून जेवल्यावर, दुसऱ्याला आणावयाचें, आरोपीपैकी कोणाचीहि परस्पर नजरभेट होऊ नये, हा यांतील मुख्य कटाक्ष होता.
पुढे कांहीं दिवसानी नाना फडणीसाकडे अय्या शास्त्र्यांची स्वारी गेली असतांना, त्यांनी दैवज्ञ प्रकरणाचा मजकूर नानांच्या कानावर घातला. सर्व बंदिवान दैवज्ञांस मुसक्या बांधून नानांच्या पुढे उभे करण्याचा हुकुम सुटला. नानांनी सर्व आरोपीपासून त्यांच्या धार्मिक हक्कांबद्दलच्या जबान्या पुन्हा एकदा लिहून घेतल्या. व त्यासंबंधी तुमचे काय शास्त्राधार आहेत ते दाखवा म्हणून आज्ञा केली. आम्हाला जामिनावर मोकळे केल्यास सर्व शास्त्रार्थ दाखवू असें दैवज्ञ ब्राह्मणांनी विनविलें. परंतु ही त्यांची विनवणी नोकरशाहीनें अमान्य करून, त्यांना पुनश्च तुरूंगात रवाना केले. ही झोटिंगपाच्छाई पाहून दैवज्ञ समाज फार घाबरून गेला. शहरांत जिकडे तिकडे गडबड सुरु झाली. कित्येक पळून गेले, कित्येक लपून बसले आणि कित्येकांच्या घरांवर तर चौक्याच बसल्या. नंतर एका प्रतिष्ठित मातबर गृहस्थाच्या मध्यस्तीनें आय्याशास्त्र्याने आश्विन व. १३स कांही आरोपींस जामिनावर सोडण्याची मेहेरबानी केली. तथापि इतकें होईपर्यंत बिचाऱ्यांची रोजची हाणमार कांही चुकली नव्हती. बंधमुक्त होतांच प्रत्येक आरोपीच्या घरावर दुसरे दिवशी पोलीसच्या चौक्या बसल्या. मोरभट महामुनी, धर्माचार्यबुवा, बाळंभट नाना पंडीत, सदाशिव पंडीत, जानोजी नसरापुरकर, बाळा क्षीरसागर, बाळा जीतकर वगैरे प्रमुख प्रमुख दैवज्ञ मंडळी अझून कैदेतच होती. त्यांना मोरोबादादा फडणीसांच्या वाड्यांत रोज रात्री हाणमार करण्यांत येत असे. या बिचाऱ्यांना कोणाचाच वशिला नव्हता, त्यामुळे श्रीमंतापर्यंत त्यांची दाद कशी लागणार ? आमची श्रीमंताकडे दाद लागावी. आमच्या धर्मकर्माची वाजवी चौकशी व्हावी, आम्ही शास्त्रार्थ दाखविण्यास तयार आहोत; पण अय्याशात्री यांजकडून रोज रोज होणारी प्राणांतिक मारहाण आम्हाला आता सहन होत नाहीं. वगैरे मजकुराची त्यांनी नाना फडणीसांकडे फिर्याद करविली. ही गोष्ट आय्याशास्त्री यांस समजताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मला न विचारता परस्पर नानाकडे फिर्याद केली. या गोष्टीनें खवळून जाऊन अय्याशास्त्र्यानें सदर्हू देवज्ञांस इतक्या अमानुष व अनिर्वाच्य तऱ्हेने मारहाण केली की त्यापैकी धर्माचार्यबुवा मार खातांखातांच मरण पावला आणि बाळंभट अत्यवस्थ आजारी पडला. नानाकडे फिर्याद जातांच त्यांनी दैवज्ञांच्या जबान्या घेऊन त्यांस जामिनावर मोकळे केले. मात्र ही अट घातली की, फिर्यादीचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी रोज सकाळी अय्याशास्त्र्यास मुजरा ( नमस्कार नव्हे!) करण्यास आलें पाहिजे.
दैवज्ञांनी ठिकठिकाणांहून शास्त्राचे ग्रंथ मागविले. मार्गशीर्ष वद्य नवमीस श्रीमंतांच्या वाड्यांत सभा झाली. त्यावेळी गारदी पाठवून एकूणएक दैवज्ञास बोलावून आणून दरवाज्याकडे बसविले समेत वादाची भवति न भवति होऊन अखेर निर्णय झाला की सोनार पंचाल जातीस ब्रह्मकर्म करावयास अधिकार आहे. सर्व शिष्ठशिष्ठ विद्वान पंडीतांनी एकमताने हा निर्णय दिला खरा, परंतु त्यानें अय्याशास्त्र्याचें मात्र समाधान झाले नाही. भलभलता वितंडवाद करून रागारागानें तो सभा सोडून जळफळत घरी निघून गेला.
पुढे दहाबारा दिवसांनी अय्याशास्त्राने आपल्या मताचे चौघे शास्त्री बोलावून आणून आपल्या वाड्यातच एक सभा केली आणि गारदी व कारकून पाठवून सर्व दैवज्ञांस तेथें बोलावून आणलें. तेथेंहि अय्याशास्त्र्याचा पक्ष व दैवज्ञ यांत बराच वादविवाद झाला. परंतु कांहीं महत्वाची वचनें गाळून स्वतः तयार केलेल्या जातिविवेकग्रंथ व शूद्रकमलाकर ग्रंथाधारें अय्याशास्त्र्यानें निर्णय दिला की सोनार ह्यांना कर्मधर्माचा अधिकार ते म्हणतात किंवा सध्या आचरतात तसा नाहीं. ताबडतोब गारदी यांजकडून दैवज्ञांची जानवीं तोडविलीं व कांहींची काढून घेतली. धोतरें फाडून त्यांचे पंथे करवून नेसविले व गंधे पुसून टाकविली. ही गोष्ट पौष शुद्ध एकादशीस घडली. नंतर सर्वत्रांस गारदी यांचे ताब्यांत देऊन घरी फक्त जेवणास जाण्याची परवानगी दिली. असा क्रम चालला असतां एके दिवशीं कांहीं दैवज्ञ मंडळी हट्टानें घरींच राहिली. त्यांना पुन्हा पकडून नेऊन पिचोडे बांधून तोंडावर मारले व पुन्हां कोठडीत कोंडून ठेवले. पुढे काही दिवसांनी सर्वानी मिळून श्रीमंताकडे या कहराचा अर्ज केला. त्यावर अय्याशास्त्र्याचा जबाब मागितला असतां शास्त्रीबोवानें प्रतिज्ञेचें उत्तर दिलें की, सोनारांस जर वेदाधिकार निघाला तर मी यज्ञोपविताचा त्याग करीन. पुढे एक महिन्याने देवज्ञांनी पैठणाहून विद्वानांचे संमतिपत्र व परांधाहून श्रीशंकराचार्याचे संमतिपत्र आणिलें. मोरभट महामुनि यानें तैत्तिरीय ब्रह्मणभाष्य आपस्तंब सूत्र आणि गोविंदार्णव वगैरे ग्रंथ आणून कचेरींत हजर केले. अय्याशास्त्री हा आपला दुराग्रह सोडीत नाहीं असें पाहून व दैवज्ञांनी दिलेल्या पुराव्यानें खात्री झाल्यामुळे नाईलाज होऊन, नाना फडणीसानें अय्याशात्री यांस एकच उत्तर केलें की, या श्रुतिस्मृतिसंगत श्रीचे पत्रावर आणि शुद्रकमलाकर ग्रंथातील वचनांवर शाईचा बोळा पुसावा किंवा आपण प्रतिज्ञेप्रमाणें यज्ञोपविताचा त्याग करावा. तेव्हां अय्याशास्त्री याचा उपाय हरला व त्यांनी संन्यास घेतला आणि दैवज्ञ ब्राह्मणांची या जाचातून अखेर मुक्तता झाली.
ग्रामण्य तिसरें.
मार्गे झालेल्या ग्रामण्याच्या वेळी स्वतःची लंगडी व कुझकी धार्मिक बाजू सांवरून भरभक्कम - करण्याकरितां आणि इतर समाजांच्या धर्मकर्माबद्दलचा शास्त्रीय आधार पोकळ करून टांकण्याकरिता, नव्हे. अज्जीबात नष्ट करण्यासाठी प्राचीन शास्त्र धर्मग्रंथांत चित्पावनांनी बरांच खोडाखोड मोडामोड व झोडाझोड करून ठेवली. मार्गे पृ. १२५ वर सांगितल्याप्रमाणे, आजलाहि मनुस्मृतीची किंवा कोणत्याहि धर्मग्रंथाची शुद्ध प्रत मिळण्याची पंचाईत पडते. चित्पावन नोकरशाहीने चित्पावनांची उत्पत्ति लपविण्यासाठी व ब्राह्मण्याचे स्तोम प्राचीन ठरविण्यासाठी सह्याद्रीखंडाचा नाश करण्याची जी शक्कल काढली त्यामुळे इतरहि अनेक निरपराधी व बहुमोल हस्तलेखांचा सत्यानाश (पहा इंग्रजी उतारा नं.११ परिशिष्ट {चित्पावन}) झाला. निरनिराळ्या धर्मग्रंथांतून जी बरीच उपटसुंभ शास्त्रवचनांनी घालघुसड झाली त्यांत दैवज्ञाबद्दलचे एक चित्पावनसूत्र मासल्याकरितां देतों :
सर्वकंटक पापिष्टं हेमकारन्तु पार्थिवः ॥
प्रवर्तमानमन्याये छेदयेल्लवशः सुरैः ॥ २९२ ॥ मनुस्मृति.
याशिवाय दैवज्ञ सोनारांनी वेदोच्चार करूं नये, देवळांत शिरू नये, वेदोच्चार केल्यास जिव्हा छेदून टाकावी. संध्या केल्यास शेंडी कापावी. यज्ञोपवीत घालू नये. घातल्यास रेड्याच्या पाठीवर मळवून घालावें. उभी निरी काढू नये, आडवें उभें गंध लावू नये. मौंजीबंधन करू नये, केल्यास हद्दपार करावें. पुराण सांगू नये, कथा करूं नये. वृत्ति चालवू नये. वरात मिरवू नये, याची वरात पाहील त्यास ६ महिने दरिद्र येईल, ज्या गांवांत वरात मिरवेल तेथे महामारीची साथ येईल. अवर्षण पडेल. अशी एक का दोन अनेक क्षेपक धर्मग्रंथांत घुसडलेली आहेत. ही सर्व क्षेपकें पुराव्यास घेऊन वेळोवेळी पंचाल ब्राह्मणांच्या ब्राह्मण्यावर चित्पावनांनी हल्ले चढविले. परंतु त्यांच्या हाती अलोट राजकीय सत्ता असतांही त्यांत त्यांना केव्हांच जय आलेला नाहीं, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. अय्याशास्त्री यांची विल्हेवाट लागतांच मागील ग्रामण्य विझालें खरें, परंतु चित्पावनांच्या मनांतील तेढ मात्र कायम होती. अनेक कारणांमुळे बाजीरावाच्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत दैवज्ञांना धार्मिक बाबतींत पूर्ण शांतता लाभली असेल असे वाटत नाहीं. या कालावधींतहि एक बखेडा झालाच, पण सर्वसाधारण दैवज्ञ ज्ञातीचा त्यांत समावेश करण्यांत आला नव्हता. तो प्रकार असा :--
आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावण्यासाठी धर्मशास्त्रे व धर्मगुरु यांची संमती मिळविण्यासाठी धडपड करणारे तत्कालिन महाधार्मिक वेदोनारायण परशुरामभाऊ पटवर्धन यांची स्वारी एकदां तासगांवाजवळ भिलवडी येथे गेली होती. तेथें कृष्णेच्या तीरावर एक देऊळ आहे त्यांत देवब्राह्मणांपैकी काहीजण अनुष्ठानास बसले होते. भाऊ देवळात गेले व त्यांनी त्यांस नमस्कार केला असतां या दैवज्ञ ब्राह्मणांनी त्यांना उलट नमस्कार केला नाहीं. तेव्हां परशुरामभाऊंस मोठा राग येऊन त्यांनी तुम्ही कोण असे त्या ब्राह्मणांस विचारले. आम्हीं देव सोनार ब्राह्मण असे त्यांनी उत्तर देतांच भाऊंनी आपल्या सैनिकांकडून त्यांना मरेगरेतों मारविलें. मारहाणीमुळे प्राण कसावीस होतांच त्या दैवज्ञ ब्राह्मणांनी पाणी प्यावयास मागितले. भाऊंनी पाणी आणून दिलें पण ते त्यांनी घेतलें नाहीं. दैवज्ञ ब्राह्मणाच्या हातचे पाणी आणविल्यास पिऊं इतरांच्या हातचें पिणार नाही असे त्यांनी म्हणतांच भाऊंचा क्रोध भडकला. आम्हां ब्राह्मणांच्या हातचें पाणी पीत नाहीं आणि सोनारांच्या हातचें पाणी पिणार म्हणतात ! श्रेष्ठ चित्पावन ब्राह्मणांचा केवढा तरी अपमान! भाऊ तरवारबहाद्दरच पडले. त्यांनी त्या दैवज्ञांस ताबडतोब ठार मारावें असा हुकूम फर्माविला. त्या सर्व इसमास ठार मारण्यांत आलें व आजूबाजूच्या गावांतील सोनारांच्या जिभा कापून टाकण्यात आल्या. पुढे या जवानमर्द पटवर्धन ब्राह्मणवीराची शास्त्रीमंडळीने चांगलीच कानउघाडणी केली व त्यांची खात्री करून दिली कीं सोनार हे खरे ब्राह्मण होत. तेव्हां ब्राह्मणहत्येच्या पातकाचे क्षालन व्हावें म्हणून भाऊंनी सोनारांवर मेहेरनजर करून त्यांना वेदोक्तकर्म करण्याचे आज्ञापत्र दिलें! हा प्रकार झाला तेव्हां पेशवे, त्यांचे अधिकारी व त्यांचे मुत्सद्दी जातभाई हे काय करीत होते व त्यांनी भाऊंच्या या अत्याचाराबद्दल गुन्हेगारास काय शिक्षा दिल्या याचा तपास करून कोणी चित्पावन संशोधक जगापुढे ठेविल काय?
सवाई माधवरावाच्या जन्मानंतर पुण्यास दैवज्ञ मंडळीस नोकरशाही दरबाराचा कांहीं उपसर्ग लागल्याचे इतिहासात नमूद नाहीं; उलट सवाई माधवरावाचा जन्म झाल्यापासून त्यांची पुण्यांत बरीच चलती झाली व पुष्कळशा सवलतीहि मिळाल्या. उत्सवमूर्ती नारायणराव पेशव्याचा खून झाल्यावर त्याची विधवा पत्नी गंगाबाई प्रसूत होण्याच्या वेळी जें राजकारस्थान रचलें, त्यांत बऱ्याच निरनिराळ्या जातींच्या समान मुदतीच्या गरोदर स्त्रिया गंगाबाईबरोबर पुरंदरास पाठविण्याचे कलम मुख्य (बाई ही दोन महिनेची गरोदर आहे.तीस पुत्र जाहला तर मालकच होईल. जर करिता कन्या जाहाली तर त्या मुलीस मेणाचे ........लाऊन राज्यकारभार चालउं.”) होते. या स्त्रियांच्या घोळक्यांत रावजीभाई दिवेकर नांवाच्या दैवज्ञ सोनाराची बायको होती. देवाची करणी आणि नारळांत पाणी म्हणून कर्म, धर्म, वर्म,मर्म संयोगानें दिवेकराची बायको व गंगाबाई या दोघी एकाच वेळीं प्रसूत होऊन दिवेकराच्या बायकोला मुलगा व गंगाबाईला मुलगी झाली.
नाना फडणीसाचें राजकारण पार पाडण्याकरिता दाते अडनांवाची एक भटीण नेमलेली होती. तिने मुलांची आदलाबदल करताच सोनाराच्या पोटी जन्माला आलेला मुलगा निमिषार्धात चित्पावन वेदोनारायणाचा पुत्र झाला व पेशव्यांच्या राजगादीचा मालक ठरला आणि खुद्द पेशव्यांच्या पोटी जन्मलेली मुलगी खाडकन् सोनाराची गरीब मुलगी झाली. राजकारण काय करणार नाहीं? हल्ली या राजकारणी घडामोडींवर पांघरूण घालण्यासाठी अलीकडील विद्वान बरेच परीश्रम करीत आहेत. परंतु या गोष्टी नेहमीच राजकारणी वातारणात घडून येत असतात नाहीं असें नाहीं. तेव्हां ऐतिहासिक सत्याचा निखारा कादंबरीच्या किंवा नाटकाच्या रेशमी रुमालांत सफाईनें लपविण्याचा यत्न करण्याची वास्तविक कांहीं अवश्यकता नाही. लहिरी मुकुंदा नांवाच्या एका शाहीरानें नारायणराव पेशव्याच्या मृत्यूबद्दल जो पोवाडा रचला आहे. त्यांतला एक चौक असा आहे :--
दिस मास उदास झाला मग चिंता पडली गंगाबाईला || रंगमहाली करमेना जाये पुरंदराला | दाहा बाळंतिणी झाल्या खबर नाहीं कळली गंगाबाईला | | काय नालख्या पालख्या चालल्या पुरंदराला | शुद्ध सोमवार दिवशी वेळ घटका आली तिला ॥ दाई म्हणे नाना फडनवीसाला गंगाबाईचा प्रसूत व्हायचा वखत आला | एक (हा शब्द ‘सोनारीण’ असाच असला पाहिजे. मुळची हस्तलिखित प्रत वाचतांना चूक झाली असावी असे वाटते.) सोबतीण मिळाली तिला ॥ दोघींची वेळ घटका कळली भगवंताला | नाना फडनवीस बोले त्या दाईला || सोन्याच्या वेळा चढवीन बाई तुला । तुझें माझें इमान ठावें भगवानाला || काढा वस्त्र डोळे दोघींचे बांधा या समयाला । कन्या झाली गंगाबाईला पुत्र झाला दुसरे बाईला | ही अदलाबदल कळली नाना फडनवीसाला । दाई म्हणे नानासाहेबाला || गंगाबाईला पुत्र झाला । सवाई माधवराव नांव शोभे त्याला ॥ सोळा वर्षे राज्य भोगलें पुणे शहराला सत्रावें वर्षी कलिप्रहर आला || शिलंघन खेळोनि माधवराव घराला आला तेथें नाना फडनवीस त्याला उणा शब्द बोलिला । कारंज्यावरी उडी टाकिली प्राण त्याचा गेला तेथून ब्राह्मणांचा आचारधर्म लोपला ||१४|| `अॅक्कर्थ ` शालीग्राम पोवाडे. आवृत्ती १ ली सन १८९१.(प्रस्तुत पुस्तकाच्या २ऱ्या आवृत्तीत {सन १९१२}या कडव्याला रा.शाळीग्राम यांनी अज्जीबात चाट दिला आहे. तरिही प्रस्तावनेत हि दुसरी आवृत्ती ‘काहीं फरक न करिता’ छापल्याचे सांगायला मात्र ते मुळीच विसरले नाहीत.)
गंगाबाईला झालेली मुलगी दुर्गाबाई नांवानें रावजीभाई दिवेकराच्या घरी वाढली. पुढे तिचें लग्न एका गरीब स्थितीतल्या सोनाराबरोबर लागले व थोड्याच दिवसांत ती मूलबाळ वगैरें कांहीं न होता स्वर्गवासी झाली. दुर्गाबाईला आपल्या राजकारणामुळे भोगाव्या लागलेल्या आपत्तींचा थोडाबहुत तरी परामर्ष घ्यावा म्हणून नाना फडणीसानें तिच्या स्मारकासाठी नारायणपेठेत दुर्गादेवीचे एक देऊळ बांधविलें. त्याचा वार्षिक खर्च ४०-१०-० असूनहि पर्वति संस्थानांतून चालू असून, हें देवालय व त्याच्या आसपासची जागा तेथील स्थानिक दैवज्ञ ब्राह्मणांच्याच ताब्यांत आहे.
पेशव्यांच्या अमदानींत दैवज्ञ ब्राह्मणांवर झालेल्या धर्मसंबंधीं छलाचा इतिहास येथवर दिला. आणखीहि बरीच लहान मोठी ग्रामण्ये झाली नाहीतच असे कांहीं निश्चित सांगता येणार नाहीं, या बाबतीत अझूनहि इतिहास संशोधन झालें पाहिजे. विश्वबह्मकुलोत्साह पुस्तकाच्या तिसऱ्या संग्रहांत श्रीशंकराचार्यांनी दैवज्ञ ब्राह्मणांस आज्ञापत्रे दिलेली प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निरनिराळ्या वेळच्या तारखा पाहिल्या म्हणजे सबंध पेशवाईभर या नाहीं त्या सबबीखाली दैवज्ञांवर ग्रामण्यांचा स्टीमरोल फिरतच असावा असें स्थूल मानानें मानण्यास काही हरकत नाहीं.
मागें वर्णन केलेल्या परशरामभाऊ पटवर्धनांच्या पराक्रमानंतर पेशवाईचा लय झाला व पेशव्यांच्या श्रीमंत पदवीचा मान आपणच घेऊन धर्मरक्षणार्थ स्वयंसिद्ध तयार झालेल्या चिंतामणराव आपा पटवर्धनांनी सोनारांवर ग्रामण्य केलें. सोनारांविषयींचा उल्लेख त्यांनी शंकराचार्याकडून बळजबरीने घेतलेल्या आज्ञापत्रांत केलेला आहे. तेव्हां त्यांचा वरप्रसाद दैवज्ञांना लाभला नसेलच असे म्हणता येत नाही. परंतु या ग्रामण्याची सविस्तर हकिकत उपलब्ध नाहीं. कदाचित कायस्थप्रभु व क्षत्रिय मराठे यांच्यावरील ग्रामण्यांच्या झगड्यांत दैवज्ञांकडे लक्ष पोंचविण्यास वेदमुर्तीत्रय नातु, पटवर्धन व थत्ते यांना फावलें नसेल व त्यामुळेंच दैवज्ञब्राह्मणांचे हें ग्रामण्य तसेंच राहिलें असावें.
ग्रामण्य चवथें. (पंढरपूरचें)
पंचालांनीं वेदोक्त कर्म करूं नये म्हणून पुण्याच्या चित्पावनांचा आग्रह पाहून पंढरपूर, सातारा वगैरे ठिकाणी त्यांच्याशी इतर ब्राह्मण मोठमोठे तंटे करीत असत, शके १७०० पासून पंढरपूर येथील पंचालांमधील व्रतबंध व विवाह ब्राह्मणांच्या अनन्वित त्रासामुळे शहराबाहेर होत असत. पुढे शके १७४२ साली आश्विन महिन्यांत पंढरपुरच्या कज्जेदलाल ब्राह्मणांनी पंचालांविरुद्ध ग्रामण्य उभारून तेथील प्रमुख पंचालांस पकडून सातारच्या महाराजाकडे निर्णयासाठी नेलें. महाराजांनी ह्या तंट्याचा निर्णय लावण्याचे काम एका विद्वान् शास्त्र्याकडे सोपविलें, परंतु असूयेची कावीळ झालेल्या शास्त्र्यांना प्राचीन ग्रंथांतील आधार व वचनें ही काय होत? त्यानी पंचालांच्या विरुद्ध निकाल दिला व सोनार ब्राह्मण म्हणवितात म्हणून त्यांची गाढवावर बसवून धिंड काढावी व हत्तीच्या पायांशी बांधून त्यांस ठार मारवावे अशी सौम्य शिक्षा देण्यास शिफारस केली. परंतु पंचालांनी योग्य न्याय मिळण्याविषयीं महाराजांकडे स्वतः अर्ज केल्यावरून न्यायदानाच्या बाबतीत कांहीं तरी कपट झालें असावें असा महाराजांस संशय आला व आपल्यासमक्ष ग्रंथांचा पुरावा व्हावा असा महाराजांनी हुकुम केला. तेव्हां शास्त्रीबुवांनी आपला चष्मा साफ करून पुरावे पाहिले व राधवाचार्य यांच्या मदतीनें पंचालप्रमुख मंडळींचें व शामशास्ती द्रविड वगैरे विद्वानांचे पुरावे व अभिप्राय घेतले व फेर निकाल दिला की “विश्व कर्मसंततीय ब्रम्हपंचालांस वेदादि प्राचीन ग्रंथांवरून ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार असून ते पूर्वीपासून चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणें ब्रह्मकर्म करीत आहेत. त्यास कोणीही प्रतिबंध करुं नये.”
या निर्णयपत्रावरून सातारा व क्षेत्र पंढरपूर येथील उपद्व्यापी लोकांस खालील ताकीदपत्रांचे फर्मान देण्यात आले :--
शिक्का सातारचे
महाराजांचा
राजश्री रंगू नरसिंह मामलेदार पेटा पंढरपूर,
आपल्या स्वकर्माविषययीं सोनार व्यंकाजी नाइक अरणगांवकर व सोनार भट्टजी वगैरे पंढरपूर वेदार्थ हुजूर निर्णयपत्र महाराजांची आज्ञा - सोनार कानडे पांचाल विश्वकर्मसंततीय यांसी ब्रह्मकर्म करण्याची अर्हता आहे. त्यास कोणी दूषण ठेवण्यास गरज नाही. आपले सत्य स्मरून दूषण ठेवल्यास वतनास जप्त केली जाईल. जाणिजे चंद्र १५ जमादिलावल सुरूसन अशरीन मयातैन व अलफ मुरजत ता. १ मार्च सन १८२० इसवी,
मोर्तबसुद्धा हस्ताक्षर बाळाराव चिटणीस.
यानंतर दैवज्ञ ब्रह्मणांवर ठिकठिकाणी काही त्रोटक व स्थानिक प्रमाण्ये झाली. त्या त्या वेळी श्रीशंकराचार्यांनी दैवज्ञांच्या तर्फे संमतपत्रे देऊन त्यांचे निराकरण केले. ही सर्व संमतीपत्र स्थलसंकोचास्तव येथे समाविष्ट करता येत नाहींत, जिज्ञासूंनी ती वे.शा.सं. बाळशास्त्री रावजीशास्त्री क्षीरसागर यांच्या विश्वब्रह्मकुलोत्साह (संग्रह तिसरा) येथे पहावी. या सर्व संमतीपत्रांवर दैवज्ञांच्या वेदोक्त कर्माधिकाराबद्दल पूर्ण मान्यता दिलेली आहे इतकें सांगितलें म्हणजे पुरे श्रृंगेरी मठाच्या शंकराचार्याच्या सन १८२३ च्या आक्षापत्रांत आणि काशी येथील पंडितांच्या सन १७८८ च्या संमतपत्रात दैवज्ञ-हे पंचाल अर्थात ब्राम्हण आहेत असाच उल्लेख आहे.
इंग्रजी झाल्यावर सुद्धा दैवज्ञांस धार्मिक बाबतींत थोडाबहुत त्रास झाल्याचे दिसतें. अव्वल इंग्रजीमध्ये वेदोक्ताचा तंटा नगर मुक्कामी प्रथम उपस्थित झाला. तो निकालासाठी पुण्यास आला त्यावेळेस चित्पावन व कऱ्हाडे ब्राह्मणांच्या सभा झाल्या. दैवज्ञ पक्षाकडचे शास्त्री त्रिमलाचार्य होते. त्यांनी सोनार हे ब्राह्मण आहेत तेव्हां येथे वेदोक्त कर्म करण्यास शास्त्राची परवानगी आहे व इतर प्रांती वेदोक्त करण्याची चाल आहे. ज्या अर्थी ते ब्राह्मण आहेत, त्या अर्थी वेदोक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे सांगितले. त्या वादाचा निकाल त्या सभेंत लागणे अशक्य होते. कारण जे ब्राह्मण अहंकार आणि स्वार्थी या दोन पिशाच्चांनी पछाडले गेलेले तेथे विवेक आणि सत्य कसे जागृत राहणार? ज्यानां घरातील अन्याय किंवा जुलूम दिसत नाहीत ते इतरास न्याय देतील काय अथवा आपण जुलुम करित आहो हे त्यांच्या लक्षांत येईल काय? तो वाद अखेरीस डि. ज. मेहेरबान राबिनसनसाहेब यांच्या पुढे गेला. त्यांनी देशांचा पुरावा घेतला. त्या पुराव्यामध्ये काशीतील शास्त्री व पंडितलोकांची संगति नाना शंकरशेट यांनी मिळविली होती. त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रांतील पंडित व शास्त्री यांची संमति आणविली होती. त्रिमलाचार्यशास्त्री व कै. बाबाजी आण्णा पावसकर यांच्याकून ग्रंथांचा पुरावा घेऊन साहेबानीं दैवज्ञांच्या तर्फे निकाल दिला की, सोनारांनी आपली धर्मकृत्ये वेदोक्त करावी; इतर ब्राह्मण लोक जर अडथळा करतील तर त्यास कायद्याप्रमाणे शिक्षा होईल. या कामासाठी जगन्नाथ शंकरशेट यांनी निरनिराळ्या ठिकाणी मंडळी पाठविली आणि शास्त्री लोकांकडून वाद करविले.
मुंबईचे सुप्रसिद्ध दैवज्ञ नागरिक श्रीमंत जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट हे कृष्णेच्या स्नानाकरितां वाईस गेले असतांना तेथच्या भटांनी त्यांना शूद्र शूद्र म्हणून त्यांचा फार उपमर्द केला तुम्हांला कृष्णानदींत उतरून देणार नाही असा दम भरला. नानांनी स्वतःच मंत्र म्हणून स्नानविधि यथासांग उरकला . ता. १९ डिसेंबर सन १८२६ रोजी सातारचे महाराज प्रतापसिंह याकडे फिर्याद दाखल केली महाराजांनी या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून आरोपींना शिक्षा ठोठावल्या. नंतर मोठा दरबार भरवून महाराजांनी नानाशंकरशेटचा मोठा गौरव केला व एक बहुमोल भरजरी शाल त्यांना नजर केली. या संबंधाने सातारा केस प्रकरणाच्या विलायतेतील प्रोसिडिंगांत (पृ. २७८) खालीलप्रमाणे उद्गार आहेत :
“In this manner did they (Brahmins) annoy other persons when in the performance of their religious rites and ceremonies, enjoined by their respective castes."
यानंतर नाशीक येथेंहि नानाशंकरशेटवर असाच प्रसंग आला. किती झाले तरी नाशीककर भट वाईकर भटजीपेक्षा अधिक जहाल आणि सवाई राष्ट्रीय असतात. त्यानी नानांशी जेव्हा दोन हात करण्यासाठी आपल्या धाबळ्या कंबरेला कसल्या. तेव्हां नानांनाहि तेथच्या कलेक्टराला चिठ्ठी पाठवून हत्यारी पोलीसची पार्टी बोलावून आणून या गंगापुत्र कारट्यांचा बंदोबस्त करावा लागला. इ.स. १८७८ मध्ये हैद्राबाद (दक्षिण) रेसीडेन्सीच्या शिक्यानिशी सोनारांस ब्राह्मणत्वाचे संमति पत्र मिळालेले आहे. याप्रसंगी सन १७५६ मधील विजयानगरच्या विजय रामराजाचे अस्सल संमतिपत्र दाखल करण्यात आलेलें होते. इ. स. १८७४ मध्ये मद्रास इलाख्यात वृंदावन येथे वाद उत्पन्न होऊन पंचालांस संमति पत्र मिळाले व अग्निहोत्र चालू राहिले. सन १८५३ मध्ये मिरज येथे सरकारवाड्यांत जे दत्ताचें देऊळ बांधिलें त्यांतील मूर्तीची स्थापना पंचाल ब्राह्मणांच्या हाती करविण्यांत आली. म्हैसूरसरकारच्या राजगृही सर्व धार्मिक कामे करणारे उपाध्याय पंचाल आहेत. याशिवाय ब्रिटिश अमदानीत न्यायकोर्टात फिर्यादी होऊन दैवज्ञांच्या तर्फे निवाडे झालेले आहेत. त्यापैकी मुख्य येणेंप्रमाणे : इ. स. १८१८ साली चितूर जिल्हा अदालत कोर्टाचा हुकुमनामा पंचालांचे तर्फे झाला असून तो मद्रास हायकोर्टानें कायम केलेला आहे. इ. स. १८७१ मध्ये जुन्नर येथील कोर्टांत असाच एक खटला उपस्थित झाला होता. यावेळीही त्यांच्याच तर्फे निकाल झाला. पुणे येथील कोर्टांत या निकालावर अपील झाले पण तेथेही हा निकाल कायम झाला. सन १८८३ मध्ये पाटण जिल्हा सातारा येथील कोर्टात एक खटला झाला. याही वेळीं सोनारांचीच फत्ते झाली. याहि निकालावर सातारा जिल्हा कोर्टात अपील झाले; पण निकाल कायमच झाला..
प्रस्तुत विषयासंबंधानें आणखीही पुष्कळच माहिती देतां येण्यासारखी आहे. परंतु स्थलाभावामुळे तसें करितां येत नाहीं. तथापि प्रस्तुत विषयाची रजा घेण्यापूर्वी दैवज्ञांच्या वादप्राविण्याबद्दल थोडी माहिती दिली पाहिजे. ज्या ज्या वेळी दैवज्ञांना वाद करण्याची संधि मिळाली त्या त्या त्यांच्यातील पंडितांपुढे मोठमोठ्या आचार्यांनीहि हात टेकल्याचे दाखले त्यांच्या इतिहासांत पदोपदी आढळतात. सन १८७५ मध्ये दैवज्ञांनी शंकराचार्यास खंडणी देण्याचें नाकारले. तेव्हा शंकराचार्यांनी असे करण्याचे कारण विचारतांच, "आम्ही स्वतः शुद्ध बीज ब्राह्मण असून आम्हांस वेदोक्त कर्माचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून तुम्हास खंडणी देण्याचे कारण नाहीं. उलट आम्ही विश्वकर्मा कुलोत्पन्न असल्यामुळे तुम्हीच आम्हां आद्यब्राह्मणांना खंडणी दिली पाहिजे." असा खडखडीत जाब दिला. यावर प्रत्यक्ष श्रीशंकराचार्याशी मार्गसहाचार्य या दैवज्ञ पंडितानें वाद करून त्यांना वादात जिंकले. हा वाद मोठा वाचनीय असून ब्राह्मण्याचा सुका डौल मारणाऱ्या मंडळींना माननीय असा आहे. त्यांनी तो “विश्वब्रह्मकुलोत्साह” संग्रह ४ पृ. १० येथें अवश्य पहावा, इतकी शिफारस करून हे प्रकरण येथें समाप्त करतों.
****
प्रकरण ४
देशस्थ शुक्लयजुर्वेदी माध्यंदिन वाजसनेय ब्राह्मण
देशस्थ शुक्लयजुर्वेदीय ब्राह्मणांना नुसते शुक्लयजुर्वेदी किंवा वाजसनेय ब्राह्मण असेंही म्हणतात व पेशवे नोकरशाहीच्या अंमलामुळे तर झालेल्या चित्पावनांच्या द्वेषाचा वरवंटा या जातीवर फिरेपर्यंत हीच नावे लोकप्रचारांत आणि सरकार दरबारात रूढ होती. परंतु त्यानंतर ज्यांना पळशीकर, पळशे व सरतेशेवटी पळश्या अशा कुत्सित शब्दप्रयोगाचा प्रसाद चित्पावनांकडून अलीकडे मिळत असतो. आणि या महाप्रसादाच्या पुष्टीकरणार्थ त्यांनी बऱ्याच काल्पनिक दंतकथा निर्माण केल्या आहेत, स्मृत्यादि ग्रंथातून खोडसाळ वचनांची घुसडाघुसड करण्यात आली आहे आणि या जातीसंबंधी गैरसमज उत्पन्न करणारे लेख अझूनहि नियतकालिकांतून वारंवार लिहिण्याचा मोह चित्पावन विद्वानांस आवरत नाहीं. यांच्यावरील ग्रामण्यांचा इतिहास मागील प्रकरणाइतकाच चित्पावनांच्या असूयेच्या द्योतक असून, त्यांत एकच गोष्ट प्रथम लक्षात ठेवणे अवश्य आहे. या एकाच गोष्टीला जर शु.यजुर्वेद्यांनी ‘हूं’ म्हटले असते, तर त्यांच्यांत व चित्पावनांत कोणत्याहि प्रकारची ते उत्पन्न झाली नसती व यावेळी कदाचित् एकतर शु यजुर्वेद्याची चित्पावनांच्या दरबारांत मोठी मान्यमान्यता तरी असती किंवा ते चित्पावनांव समरस तरी होऊन गेले असते. ती गोष्ट म्हटली म्हणजे हीच की राजकीय सत्तेच्या वाढत्या जोरावर ज्यावेळी चित्पावन पेशव्यांनी इतर प्राचीन महाराष्ट्रीय ब्राह्मणांत आपला समावेश करून घेण्यासाठी रोटीबेटीव्यवहाराचे बळजबरीचे कलम पुढे आणले त्यावेळी इतर ब्राह्मणाप्रमाणे शु.यजुर्वेदी पेशव्यांच्या दमधाटीला किंवा आर्जवाला न वंगतां त्यांनी त्या कलमास कस्सून विरोध केला. शु.यजुर्वेदांना चित्पावनांचे ब्राह्मण्य मान्य होईना किंवा पेशव्यांच्या शुद्ध आधिभौतिक वैभवाला बळी पडून स्वतःचे शुद्ध ब्राह्मण्य गमाऊन बसण्याची इच्छा होईना! अर्थात् राजकीय सत्तेशी विरोध करणारांना जे छळ व जे ताप सहन करावे लागतात, ते सर्व त्यांना सहन करणे भागच पडले, यांत आश्चर्य नाहीं. असो. शु. यजुर्वेद्यांच्या ग्रामण्यांच्या इतिहासाकडे वळण्यापूर्वी त्यांच्या प्राचीन इतिहासाचे त्रोटक सिंहावलोकन याच्या सोयीसाठी कसे, या सिंहावलोकनाच्या कामी विशेषतः वेदशास्त्रसंपन्न पंडित यज्ञेश्वर दिक्षित भिंगारकर यांनी शके १८०७ (सन १८८५) खाली प्रसिद्ध केलेल्या इतिहासाचा आधार घेतलेला आहे.
श्रीयाज्ञवल्क्यानें पुण्यस्तंभ, जनस्थान वगैरे गोदातटाकींच्या क्षेत्रस्थानी यज्ञ केले. त्यावेळी त्याच्याबरोबर कित्येक अन्तर्वेदनिवासी शुक्लयजुर्वेदी ब्राह्मण आले, ते तेथेंच स्थाईक झाले. पुढे १३ व्या शतकाच्या प्रारंभास मुसलमानांची सत्ता कुरुक्षेत्रादि ठिकाणी उत्तरोत्तर वाढत जाऊन त्यांच्या स्वाच्या गोदावरीच्या कांठच्या प्रदेशावरहि होऊ लागल्या आणि त्यांनी अखेरीस पैठणावर हल्ला करून ते काबीज केलें. इ.स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनें रामदेवराव जाधवांचा पराभव करून त्याला ठार मारिलें. रामदेवरावाचा मुलगा बिंबदेव ही बातमी कळताच देवगिरीस आला. परंतु पैठण हे देखील जेव्हा अल्लाउद्दीनच्या ताब्यांत गेलें, तेव्हां आपला इलाज चालणार नाही असे समजून बिंबदेव आन्हिलवाड्यास आला. लवकरच तेंही ठाणे अल्लाउद्दीनाच्या स्वाधीन झाले. तेव्हां बिंबदेव समुद्रमार्गाने उत्तरकोकणात पळून गेला. कोकणांत उतरताच बिंबदेवाने प्रथमतः डभोई काबीज केली. पुढे दमण, चिंचणी, तारापूर इत्यादि शहरे एकामागून एक हस्तगत करून घेऊन, त्यानें महिमाहिम किंवा हल्लीचें मुंबई माहिम काबीज केलें. लवकरच बिंबदेवाने ठाणें, साष्टी, चेऊल इत्यादि शहरें हस्तगत करून घेतली व सारा अष्टागर प्रांत सर केला. त्यानें मालाड येथे आपली राजधानी करून राज्यकारभार सुरळीत चालविला. त्याने आपल्या राज्याचे एकंदर ११ भाग करून बरोबर अकरा उमराव आले होते त्याना एकेक भाग देऊन कारभार चालविला.
बिंबराजाबरोबर जे ११ उमराव आले त्यांत पुरुषोत्तमपंत कावळे हे शुक्लयजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ प्रमुख होते. पुरुषोत्तम कावळे हा बिंबराजाचा बाळाजी आवजी होता. बिंबराजाच्या सर्व मोहिमा फत्ते करण्याच्या कामी पुरुषोत्तम कावळ्यांचीच बुद्धिमत्ता व शौर्य फार कामी आलें, पुरुषोत्तमपंताची ही कामगिरी लक्षांत घेऊन बिंबदेवाने त्यांला १४ महालांची वृत्ती वंशपरंपरा दान दिली. त्यांत सरदेसाई सरदेशपांडेपणा आणि अष्टाधिकार (जलाधीकारश्च स्थलाधीकारो ग्रामाधिकार: कुललेखनं च | ब्रम्हासनं दण्डविघेर्नियोगं पौराहितं ज्योतिषमष्टमेवं ||) त्यांस प्राप्त झाले. त्यावरून त्यांना व त्यांच्या वंशजांना नाईकराव असे नामाभिधान पडले, ही दान दिलेली वृत्ती प्रथम गोविंद मिटकरी गोळक याची होती. तो निर्वतल्यावर त्याची बायको चांगुणा हिनें चोवीस हजार होन घेऊन ती आत्मसंतोष बिंबराजास विकत दिली. राजाने १ वर्ष तीन महिने त्या वृत्तीचा उपभोग घेऊन सन १२९९ मध्ये पुरुषोत्तमपंतास दान दिली. याप्रमाणे बिंबराजाबरोबर उत्तर कोंकणांत शुक्लयजुर्वेदीयांची वसाहत झाली. बिंबाबरोबर एकंदर ११ वाजसनेयी ब्राह्मण होते. त्यांची बिंबानें उत्तम व्यवस्था लावून दिली तेव्हां ते तेथेच स्थाईक झाले. पुढे त्यांचे नातलग वगैरे मंडळी येता येता उत्तर कोकणांत त्यांची वस्ति वाढली.
या जातीत पूर्वी मोठमोठे चिरस्मरणीय असे नामांकित पुरुष होऊन गेले. सूर्यवंशी विक्रमादित्याचा वंशज शूरसेन याचे पाठक नांवाचे जे शुक्लयजुर्वेदी राजगुरू होते त्यांच्याच पोटीं सुप्रसिद्ध विज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले. याच शूरसेनाच्या आग्रहावरून विज्ञानेश्वरा याज्ञवल्क्यस्मृतीवर मिताक्षरा नामक सुबोध टीका लिहिली. जगविख्यात निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हीं कोहीनूररत्ने महाराष्ट्राला याच शुक्लयजुर्वेद्यांच्या खाणीत लागली. आद्य श्रीशंकराचार्यांशी पैठणास वाद करणारा हस्तमलक उपासने हा शु. य. ब्राह्मण होता. श्री शिवाजी महाराजांचे वंशपरंपरेचे राजगुरू व मंत्री हे गंगातीरस्थ शुक्लयजुर्वेदीय ब्राह्मणच होते, असे इतिहासावरून दिसतें. यापैकीच मोरोपंत पिंगळे हे होत, ते शिवाजी महाराजांचे पेशवे होते, व या पिंगळ्यांचा पाडाव पुढे बाळाजी विश्वनाथानें केला हें इतिहासप्रसिद्धच आहे. सख्या देवा विठ्ठला या सुप्रसिद्ध साडेतीन शहाण्यांतले विठ्ठल सुंदर हे शु. य. होते. आजलाहि या ज्ञातीत श्रीमंत दादासाहेब खापडे, रा. ब. वासुदेवराव पंडीत, श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी औंध, श्रीमंत आबाजीराव पंडीत पं. प्र. विशाळगड, रा. बा. पी. बी. जोशी. जे. पी. नागपूरचे डॉ. मुंजे, राजगुरू हरेश्वर महादेव पंडीत, मुंबईचे डॉ. पुरंदरें, डॉ. दीनानाथ बाळकृष्ण नाईक दांडेकर, इत्यादि बरीच विद्वद्रत्ने आहेत आणि नामांकित पुरुषांची परंपरा अस्खलीत कायम आहे याबद्दल कोणीहि या समाजाची पाठच थोपटील.
या शु. य. ब्राह्मणांची कोंकणांत वस्ती झाल्यावर त्यांना सामवेदी, किरवंत, पाठारे प्रभू इ. अनेक जातींच्या वृत्त्या मिळाल्या. त्याबद्दलच्या प्राचीन सनदा व लेख अनेक आहेत, त्याशिवाय अनेक मुसलमान बादशहांनी वेळोवेळी त्यांना वतनें व अभयपत्रहि दिलेली आहेत. त्यांची त्रोटक त्रोटक माहितीसुद्धा सहज १५|१६ पृष्ठांची जागा पटकावील इतकी ती विस्तृत आहे. तेव्हां थोडक्यात एवढे सांगितले म्हणजे पुरे की यांचा राजोपाध्येपणा व वृत्तीचा अधिकार पेशवे नोकरशाहीचा उपसर्ग लागेपर्यंत सर्वत्र मान्य केला जात असे.
याप्रमाणे आपापले व्यवसाय व वृत्त्या संभाळून हे लोक सुखासमाधानाने कालक्रमणा करीत असता उत्तर कोकणांत पोर्च्यूगीजांचा अंमल बसून हिंदुधर्मावर हल्ले होऊ लागले. घर हिंदु की कर बाटवून ख्रिस्ती, असा सर्वत्र हलकल्लोळ उडाला. जेथें हिंदुधर्माची मानव फासांवर चढली तेथे या वृत्तिवान ब्राह्मणांची काय दुर्दशा उडाली असेल, याची कल्पानाच करावी हें चांगले. या प्रसंगी सुप्रसिद्ध पुरुषोत्तमपंत कावळे यांचे वंशज अंताजी रघुनाथ व त्यांचे बंधू रामचंद्रपंत यांनी पुण्यास जाऊन श्रीमंत पेशव्यांची भेट घेतली व वसईचें राजकारण उभें केलें. पुढे सन १७३९ त चिमाजी आप्पाने वसईचा किल्ला सर केला. या मोहिमेंत कावळे बंधूनी आपल्या प्रयत्नांची फार शिकस्त केली. पेशव्यांचा अंमल वसई प्रांतावर बसतांच हिंदुधर्माच्या मानेवरची तरवार दूर झाली. पण थोड्याच काळांत पेशव्यांच्या चित्पावनी वर्चस्वाचा वरवंटा सगळ्यांचाच छातीवर आदळू लागल्याची प्रचिती आली.
वसई व साष्टी प्रांतांत चित्पावन पेशव्यांचा अंमल बसतांच हजारों चित्पावन त्या प्रांती येऊन कोसळले व तेथे स्थायिक झाले. त्यांना राजकीय सत्तेचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांनी सर्वच ठिकाणी आपापले हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि या शु. यजुर्वेद्यांच्या वृत्त्या बळकविण्यास प्रारंभ केला. बळी तो कान पिळी ! बिचाऱ्या शु. यजुर्वेद्यांना दे माय धरणी ठाय होऊन गेलें. या वेळी चित्पावन जरी सत्ताधारी होते तरी त्यांचा ब्राह्मणपणा कोणी मान्य करीत नसे आणि इतर ठिकाणी जरी त्यांनी दंडुकेशाहीच्या जोरावर इतर महाराष्ट्रीय ब्राह्मणांबरोबर रोटीबेटी व्यवहाराचा उपक्रम सुरू केला होता, तरी तेवढ्यानें या शु.य.चें समाधान होईना. त्यांनी त्यांचा ब्राह्मणपणा तर केव्हांच मान्य केला नाहीं आणि रोटीबेटीव्यवहाराला तर कस्सून विरोध केला. साम्राज्यसत्ताधाऱ्यांच्या क्षातिबांधवांशी विरोध? आणि तो शु.य.सारख्या अल्पसंख्यांक समाजाने? मग त्यांचे पीठ का होणार नाहीं? ठिकठिकाणी उपऱ्या चित्पावनांनी त्यांच्या कृत्या बळजबरीनें हिसकावून घेण्याचा धूमधडाका चालू केला व स्वतःचे ब्राह्मण्य हिणकस असताहीं ‘हे शुक्लयजुर्वेदी ब्राह्मणच नव्हत’ असा उलटा शंख फुंकण्यास सुरुवात केली. अर्थात् पेशवे नोकरशाहीनें ठिकठिकाणी ग्रामण्यांचा जो वणवा पेटविला होता. त्यांत या शु.यजुर्वेद्यांचीहि आहुती पडली व त्यांचा अतोनात छळ झाला.
इ.स. १७४२ मध्ये अशीच एक फिर्याद पेशव्यांकडे गेली. त्यांत पळशीकर तुकंभट धर्मभेट जावळे यांनी नमूद केलें आहे की जोगळेकर व फडणीस वगैरे वसई येथील चित्पावन ब्राह्मणांनी अग्निहोत्र उच्छेद करून श्रौताग्नी कुडाचा उच्छेद केला. त्यावरून पळशीकरांनी श्रीक्षेत्र नासिक व त्र्यंबक येथील ब्राह्मणांचे संमति पत्र आणून आपला श्रौताग्नी साधन करण्याचा अधिकार प्रस्थापित केला. त्यावरून त्यांचे अग्निहोत्र पुन्हां चालू झाले. यावेळी श्रीमंत पेशव्यांनी दिलेल्या आज्ञापत्रात खालील खुलासा केलेला आहे :--` `तुम्ही यजुःशास्त्रीय ब्राह्मण, तुमचा श्रौताग्नि गोविंदभट जोगळेकर व महादजीपंत फडणीस यांनी विच्छिन्न करून तुम्हास अग्निहोत्राचा अधिकार नाही हे त्यांचे म्हणणे निराधार आहे. तुम्ही पूर्वापार प्रमाणे अग्निहोत्रादि सर्व कर्मे चालू करावी व वसईकर ब्राह्मणांनी तुम्हांस उपसर्ग करू नये म्हणून त्यांस ताकीद केली आहे जाणिजे, आज्ञा प्रमाण.`
इ.स. १७४८ ते पेशव्यांनी करार करून ठाणे येथील वृत्ती शु. य. वा. ब्राह्मणांस दिल्याचा दाखला आहे. त्याच वर्षी वसई बेलापूर वगैरे ठिकाणची वृत्ती त्यांना पेशव्यांनी करार करून दिली व मालाडच्या वृत्तीविषयीहि अभय पत्र दिलें, इस. १७५४ मध्ये कोहरें येथील वृत्ती चालण्याविषयी पेशव्यांची आज्ञापत्रिका मिळाली. इ.स. १७६४ मध्ये मालाड येथील श्रीहनुमंताच्या देवालयाची प्राणप्रतिष्ठा पेशव्यांनी हुकूम देऊन तेथील शु. य वाजसनेयी उपाध्यायांकडूनच करविली. इतर ब्राह्मणांस त्यांनी मनाई केली होती. इ.स. १७६५ साली चित्पावनांनी अग्निहोत्राचा दुसरा खटला उपस्थित केला. वसई येथील अनंत जोशी भास्कर यांजकडे कोणी एक नारायण जोशी नांवाचा चित्पावन राहावयास जागा मागू लागला. परंतु स्थलसंकोचास्तव त्याचे म्हणणे अनंत जोशी याने कबूल केलें नाहीं. तेव्हां नारायण जोशानें घरात शिरून दांडगाई करून अनंत जोशाच होत्राग्नीकुंडे विच्छिन्न केली. तेव्हां पेशव्यांकडे फिर्याद गेली असतां अनंत जोशास होत्रस्थापन पुन्हा करण्याचा पेशव्यांनी हुकूम दिला. परंतु नारायण जोशी जातभाई पडला, तेव्हा त्यास कोणत्याही प्रकारें त्यांनीं शिक्षा केली नाहीं, हें सरळच झाले. इ.स. १७७५ साली श्री त्र्यंबकेश्वराचे देवालय बांधून पूर्ण झालें.
प्रासादप्रतिष्ठेत दक्षिणद्वार शु. य. वाजसनेयांस द्यावयाचें तें चित्पावनांस देण्याचा पेशव्यांचा मानस होता. त्यावरून मोठा कलह माजून राहिला. वाजसनेय पेशव्यांच्या म्हणण्यास कबूल होईनात. तेव्हां सुमारे शंसवाशें शु यजुर्वेद्यांस कैद करून कर्नाटकात रवाना केले. याविषयी एक आर्या प्रसिद्ध आहे ती अशी :--
कर्नाटकांत नेले क्षेत्रींचे द्विज धरूनिया तेरा।
यवनादि शत्रु म्हणती बाजीराया नहीं धरम तेरा ||
या प्रकरणांत सरकारी उल्लेख असा आहे:
It seems that Bajirao ordered a Temple at Trimbak to be consecrated by Konkanasths Black Yajurvedis and not by the local White Yajurvedis. The White Yajurvedis gathered in a mob to stop the consecration and were dispersed by Bajirao`s orders, several of them being sent to prison; for this the community cursed him and at Nasik the Yajurvedis` curse is believed to have been one of the chief causes of Bajirao`s mistakes and ruin..
Bombay Gazetteer Nasik. Vol.
XVI. PP. 40
इतकी दंडेली करून पेशवे व त्यांचे जातभाई यानी आपली इच्छा तृप्त करून घेतली खरी. पण श्री त्र्यंबकेश्वराच्या पुढील नंदीस प्रतिष्ठासंस्कार न झाल्यामुळे त्यांस यांत गुंडाळून कुलुपात ठेविलेला आहे व ती आजपर्यंत आहे तसाच तुरंगांत आहे. केव्हा बेट्याची कैद सुटेल ती सुटो !
इ.स. १७७७ त सामवेद्यांस पेशव्यांनीनी जे अभयपत्र दिले आहे त्यांत त्याची वृत्ती शु. य. वाजसनेय ब्राह्मणांनीच चालविण्याबद्दल स्पष्ट अनुज्ञा नमूद केलेली आहे. इ.स. १७९७ साली राघोबादादा पेशव्यांचा मुक्काम मुंबईस असतो शु. य. वाजसनेय ब्राह्मणांची पूजा करून त्यांस ते दक्षिणा देत असत व त्याचा वेदोक्त आशिर्वाद घेत असत. शेवटले बाजीराव पेशवे वैतरणासंगमी स्नानास गेले असता त्यांना स्नानसंकल्प सांगण्यास शु. य. वाजसनेय ब्राह्मणच होते.
याप्रमाणे खुद पेशव्यानी वेळोवेळी सनदा, आज्ञापत्रे, अभयपत्रे दिली असताहि वेळोवेळी त्याच्या जातभाईनी शु. यजुर्वेद्यांना छळण्याचे आपले पवित्र काम चालूच ठेवले होते. पण या प्रकारच्या बखेड्यात चित्पावनांचा दुराग्रह व अन्याय असताना व त्यानी पेशव्यांच्या जोरावर अत्याचार केले असताना एकाहि प्रकरणांत कोणा चित्पावनास पेशव्यांनी शिक्षा दिल्याचा दाखला नमूद नाहीं, ही गोष्ट विशेषेकरून लक्षात ठेविली पाहिजे. इ.स. १८०० च्या सुमारास यादव नाईक शु य. यांची सून रमाबाई हिने शिरगांवास श्री सिद्धेश्वराची लिंगस्थापना पंचायतन सुद्धा केली होती व त्या देवाची पूजाअर्चा यजुर्वेदी व चित्पावन हे उभयतां एकत्र करीत असता सन १८०८ मध्ये वसई येथील एकोणीस चित्पावन उपव्याप्यांनी एके दिवशी पहाटेस देवालयांत शिरून ते पंचायतन लिंगासुद्धा पहारानी खणूं लागले. तेव्हा त्यांना श्रीमंत पेशव्यांच्या व गाई ब्राह्मणांच्या शपथा घालून हें कर्म न करण्यास शु. य. ब्राह्मणांनी विनविले असताही त्यांनी लिंगासुद्धा शाळुंकेसहित पंचायतन पहारांनी खणून काढून निर्मळास नेले. तेव्हा पेशव्यांकडे फिर्याद गेली. त्यावेळी पेशव्यांनी चौकशीचा मोठाच डौल घालून दोन्ही पक्षांकडून पुष्कळ साक्षीदारांच्या जबान्या वगैरे घेतल्या.त्यांत शेवटी असे निष्पन्न झाले की शु.य. ब्राह्मणांस अधिकार संपूर्ण असून त्यांना विनाकारण यासाठी हा सारा प्रकार चित्पावन उपद्व्याप्यांनी केला. त्यावरून पेशव्यांनी आज्ञापत्रे देऊन श्रीसिद्धेश्वराची पुन्हा प्रस्थापना करण्यास सांगितले. या खटल्यांत बाजीराव रघुनाथ पेशवे यांनी वे. रा. गंवा नाईक जावळे वगैरे शु. य. मंडळीना निवाडपत्र दिले त्यांतील उद्गार येणे प्रमाणे आहेत :-
"तुम्ही वृत्यंशी पेशजीपासून वृत्ती अनुभवीत आलां, ब्राह्मण तुम्हांस विडा दक्षिणा देतात व तुम्ही ब्राह्मणांस देतां व तुम्ही जागजागी देवालये बांधोन श्रीची स्थापना करीत आलां याची चौकशी करितां पूर्वी बिम्बराजे यांनी वतनें तुम्हांस दान देऊन शिलालेख करून ठेविले ते व सड, साक्ष, भोगवटा व वसईकर ब्राह्मण तुम्हांस कागदोपत्री ‘वेदमूर्ती; म्हणोन नमस्कार लिहितात. याप्रमाणें कैलासवासी चिमणाजी बल्लाळ व भाऊसाहेब यांचे पत्र नमस्कार लिहिण्यांत व ग्रंथातरीचा आशय पाहता तेथेही पळशे ज्ञाती भिन्न आहे असें लागत नाही. सदर्हू अन्वये ब्राह्मण कर्माची पुरवणी दिसण्यांत येते."
असे छळांचे प्रकार शु. य. ब्राह्मणांवर ठिकठिकाणी कितीक तरी झाले, त्यांची उपलब्ध असलेली साग्र माहिती येथे छापणे शक्य नाहीं, तथापि ती वाचून मन खिन्न होते, आणि असें वाटू लागते की धर्माच्या नांवाखाली असले अत्याचार करणाऱ्या त्या पूर्वजांपेक्षा सध्याची धर्मलंड पिढी बरी, कारण ती एकमेकांचा सध्या तसा छळ करण्यास तरी प्रवृत्त होत नाहीं. असो. त्या काळ्याकुट्ट आणि पेशव्यांच्या खऱ्याखुऱ्या कलीयुगांत चित्पावनांनी शु. यजुर्वेद्यांस राजसत्तेच्या धमकीने माजी करण्याकरिता ज्या अनेक खटपटी केल्या, त्यांच्या बुडांशी शु. यजुर्वेद्यानी चित्पावनांशी रोटीबेटीव्यवहार करावा व त्यांनी आपल्या वृत्त्या निमूटपणें चित्पावनांच्या हवाली कराव्या, हा मुख्य हेतू होता. हें पुन्हा सांगण्याचे कारण नाही. शु. यजुर्वेद्यांनी चित्पावनांचा हा डांव प्रथमपासूनच ओळखला होता आणि त्यांनी अनंत हालअपेष्टा, अपमान व नुकसान सोसूनहि त्या डांवाला आपली मान मुळीच वांकविली नाही. यावरून या समाजाच्या मनोनिग्रहाची व चिकाटीची कोण तारीफ करणार नाही? पेशव्यांच्या अंमदानींत शु यजुर्वेद्यांवर जेवढी म्हणून ग्रामण्ये झाली, त्यांत एक विशेष गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे, ती हीच की स्वतः पेशव्यांनी या भानगडींत आपलें आंग आहेसें कधींहि दाखविलें नाहीं आणि वेळोवेळी त्यांनी जरी शु.यजुर्वेद्यांना अभयपत्रे, करारपत्रे व आज्ञापत्रे देण्यात कसूर केली नाहीं, तरीपण त्यांचा छळ करणाऱ्या चित्पावन आरोपींस त्यांनीं कधींहि शिक्षा केल्या नाहींत. या मासल्याची एकदोन ठळकठळक उदाहरणें येथें नमूद करून या प्रकरणाची रजा घेऊ.
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत गोदावरीच्या तीरीं टोकें येथें पेशव्यांनी व चित्पावनांनी मोठमोठे इमारती वाडे बांधून वस्ती वाढविली व तेथील सिद्धेश्वराचे देवालयाचा जीर्णोद्धार करावयाचे ठरविले. यावेळी देवाची पुन्हां स्थापना करावी व त्यांत शुक्ल यजुर्वेद्यांस वृत्यंश देऊ नये आणि ते कार्य उरकण्यासही त्यांना बोलाऊ नये असे त्यानी ठरविले. ही बातमी प्रवरा संगमावर राहणारे ये शा. सं. शिवराम दिक्षित यांना समजली तेव्हां दिक्षित मजकूर हे नाना फडणवीसांचे भेटीस पुण्यास गेले. त्यावेळी नानांच्या जवळ असलेल्या चित्पावनांनी दिक्षितांचा उघड उपमर्द करून त्यांस म्हटलें कीं तुम्हांस यजमानांचें पाचारण असल्यास या. तेव्हां दिक्षित हे नानांचा सत्कार न घेताच उठून गेले व त्यांनी नानास सांगून पाठविलें कीं प्रतिष्ठेचे कर्म आग्रहानें करूं नये. मर्जी असल्यास शास्त्रार्थ करा, नाहीतर अनर्थास पात्र व्हाल. तेव्हां नानाने उलट सांगून पाठविलें कीं तुह्मांपाशी काय पुरावा असेल तो दाखवावा. त्यावरून दिक्षितांनी सनदा कागदपत्रे नानाकडे पाहण्यास पाठविली. तेव्हा आपला पक्ष बुडतो असे पाहून चित्पावन फारच चिडले. खुद्द नानाफडणीसाचा सासरा हिरण्यकेशी शास्त्री चवताळून शु. य. च्या प्रतिनिधींस म्हणाला " ह्या सनदा व कागदपत्रांच्या बळकुट्या करून ......ठेवा." अशा प्रकारे कोलाहल करून कागदपत्र आणणाऱ्या गृहस्थांची हेटाळणी करताच ते बिचारे परत निघून गेले. सवाई माधवरावांस हें वर्तमान कळवावे तर ते पेशवे खरे, पण नानाच्या हातातले बाहुले तेव्हां दिक्षितांनी नानाधीच पुन्हा एकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मानाने चित्पावनांची समजूत घालण्याचा वरवर प्रयत्न केला. हा प्रयत्न वरवर आहे हे ओळखण्याइतकी चाणाक्ष बुद्धी चित्पावन ब्राह्मणांत असल्यामुळे त्यांनी नानालाच उलटा दम भरला आणि स्वज्ञातीच्या हिताहिताचा तो प्रश्न पडल्यामुळे, नानांनीहि त्यावर विशेष डोके खाजविले नाही.
दुसरे दिवशी टोके येथे प्रतिष्ठासमारंभ सुरू झाला. देवांशु यजुर्वेद्यांची खात्री झाली की शु आपली वृत्ती आतां कांही रहात नाही. तेव्हा त्यांनी चित्पावनांकडे जाऊन त्यांची प्रार्थना केली की "हे भूदेवहो, तुम्ही सर्वसमर्थ आहात. सत्ताधीश आहात, तेव्हा तुम्ही जे कराल ते होईलच परंतु आम्हांस गंध लावावे व आमचा सत्कार करावा." या विनवणीने उलट अधिक खवळून जाऊन वेदोनारायण चित्पावनांनी जवळच्या यवन व शूद्र शिपायांस हुकुम करून साऱ्या शुक्ल यजुर्वेद्यास तेथून धक्के मारून बाहेर घालविलें.
ही कागाळी शिवराम भट्ट दिक्षितांस त्यांनी सर्व यजुर्वेद्यांस सांगितले की, बाबानों शास्त्रार्थाचा प्रश्न असल्यास मी एकटा सगळ्यांस पुरा पडेन. परंतु या ठिकाणी मी काय करावें? तुमची तयारी असल्यास प्रतिष्ठा समारंभात जाऊन दक्षयज्ञासारखा सत्कार करावा. त्यावरून सर्व शु. यजुर्वेदी समारंभाच्या मंडपांत शिरले. चित्पावन व त्याचे अनुयायी यांजवर त्यांनी यथेष्ट हस्तप्रहार चालविले. "कोणाचे भोजनपात्रांची दुर्दशा, कोणाची शेंडी, कोणाचें धोत्र, कोणाचे यज्ञोपवीत इत्यादि धरून ते भिडे, फडके, शास्त्री इत्यादि कोंकणस्थांस चापटपोळ्या मुष्टोमोदकांचे देहधर्म पुरीषोत्सर्जन धोत्रांत होईपर्यंत यथास्थित भोजन दिले व त्यांनी कुंडात पात्रप्रक्षेप केला. पळून जाऊ लागल्या कारणाने कित्यंकास गणेशटोपी घालून सर्व गात्रांचें कदन हस्त स्वरानें केले कित्येक नागवे उघडे होऊन बसले. तेव्हां ग्रामस्थ स्त्रिया व मुलांची जी हांशी झाली ती लिहिता पुरवत नाही."
हा ठोकाठोकीचा प्रकार झाल्यावर चित्पावन अगदी दीनवदन करून म्हणू लागले की बाबानों आम्हांला मारू नका, असे आम्ही पुन्हां केव्हांहि करणार नाही. तेव्हां क्षेत्रस्थ शु. य. नी समिधाहोमद्रव्यादि त्या कुंडांत घालून अग्नि प्रज्वलित करून ते घरोघर गेले. तेव्हां लज्जित झालेले चित्पावन मुकाट्याने आपापल्या घरी चालते झाले. यावेळी श्रीमंत सवाईमाधवराव पेशवे आपल्या महालांत स्वस्थ बसले होते, पण चित्पावन बसले रुसून. तेव्हां श्रीमंतांनी शिवराम दिक्षितास पालखी पाठवून बोलावून नेलें व उभयपक्षांचा समेट करून देऊन सिद्धेश्वराची प्रतिष्ठा केली.
वरील प्रकारामुळे चित्पावन जरी हतवीर्य झाले तरी त्यानीं शु. यजुर्वेद्यांशी वरवर गोड वर्तन ठेवून, त्यांच्या सूडाचा निराळाच एक पंथ शोधून काढला. ते त्यांचा जेथे तेथे मोठा आदरसत्कार करूं लागले, मेजवान्या देऊ लागले. परंतु अंदरकी बात रामालासुद्धां न कळण्याइतकी गुप्त ठेवली. शु.यजुर्वेदी हे जसे मनानें खंबीर व शास्त्राध्ययनांत वरचढ होते, तसं श्रीमंतीच्या बाबतीत से चित्पावनापेक्षा सवाई खंबीर आणि वरचढ होते, यांच्या बायका व मुली ज्या वेळीं गोदातटाकी पाणी भरण्यास किंवा कपडे धुण्यास जात असत, त्यावेळी त्या आपल्या अंगावर भरगच्च सोन्यामोत्याचे दागदागिने घालून जात असत. अझूनहि ही पद्धत त्याच्यात आहे. अर्थात् त्यांच्या श्रीमंतीचा अजमास वाटेल त्याला घरबसल्या करण्यास अडचण पडत नसे. शु. य. पैशाच्या बाबतीत धनत्तर असल्यामुळे ते कोणाचीच फारशी पर्वा करीत नसत. ही त्याची संपत्ति लुटवून त्यांना भिकेस लावल्याशिवाय ते वठणीला येणार नाहीत, असा चित्पावनांनी बेत केला. पुढे लवकरच संधान बांधून हरीबा होळकराच्या पेंढार सैन्याकडून गोदातटाकीची सारी क्षेत्र लुटविली. शु. यजुर्वेद्यांस राखेचे व मिरचांचे तोबरे देऊन त्यांजकडून पैसाअडका व सोने पिळून काढले. त्यांच्या बायकांच्या आंगावरील दागिने लुटले, असा एकच हाहाकार उडाला. पुढे शु यजुर्वेदी जेव्हा पेशव्यांकडे फिर्याद घेऊन गेले, तेव्हां त्यानी व सर्व चित्पावनानी मोठा खेद प्रदर्शित केला. "हरहर ! काय हो हा अनर्थ या धनगराने केला आमच्या राज्यांत ब्राह्मणांस त्रास? मग आम्ही कशाचे ब्राह्मण!" इत्यादि बोलून शु. यजुर्वेद्यांचे समाधान केलें व त्याचा मोठा सत्कार केला, पण हे सारे पुण्यांतल्या पुण्यांत बाहेर गंगथडीची लुटालूट चाललीच होती. या लुटालुटीत शु.यजुर्वेद्याचे कागद सनदा वगैरेचा नाश फार झाला आणि गंगातीर उजाड होऊन शु.य. दशादिशांस निघून गेले.
शुक्ल यजुर्वेदी वाजसनेय ब्राह्मणांमध्ये पोटभेद नाहीत, तथापि उत्तर कोंकणांतील वसाहतवाल्या शु.य.श्री चित्पावनांचा द्वेष असूनहि कडकडीत असल्यामुळे ते `पळश्यां `ना मूळजातीपासून भिन्न किंबहुना अभ्रष्ट भासविण्याचा यत्न नेहमी करीत असतात. फार दूर कशाला? राष्ट्रीय चमूचे एक कप्तान विद्वद्वर्य रा. रा. महादेवजी बोडस यानी ` वर्णव्यवस्था` (चित्रमयजगत् जाने. १९) लेखांत "मुंबईतील पळशे लोकांनी ब्राह्मण म्हणण्याकरितां कित्येकदा कोर्टाचे उंबरे झिजविले " असा कुत्सित व इतिहासाचें गाढ अज्ञान दाखविणारा शेरा ठोकलाच आहे ना? हा शेरा वादार्थ घटकाभर खरा मानला तरी त्यांतसुद्धां शु. यजुर्वेद्यांची उर्फ पळश्याची माणुसकी चित्पावनांपेक्षा कांकणभर अधिक सरस ठरते. "स्वतःला ब्राह्मण म्हणण्याकरितां पळश्यांनी कोर्टाचे उंबरे झिजविले" त्यांत त्याची कायदेप्रीति व सनदशीरपणा तरी दिसून येतो. पण स्वतः सनदशीरपणाचे चौघडे अलीकडे त्रिकाळ बडविणाऱ्या चित्पावनांच्या पूर्वजांनी स्वतःला ब्राह्मण ठरविण्याकरितां आपल्या अत्याचारी स्वार्थाला साऱ्या मराठेशाहीचा बळी दिला. त्यांत त्यांचा कोणता सद्गुण सिद्ध होत असेल तो सध्याच्या चित्पावन बृहस्पतीनींच जगाला समजाऊन द्यावा हें बरें ! स्वतः एखाद्यावर हल्ला करावा आणि तो धडपडू लागला किंवा रडू लागला म्हणजे आपण म्हणावें `कायहो, कितीहो हा व्रात्य? एकसारखा रडून ओरडून आकांडतांडव करीत आहे! अशांतलाच रा. बोडसांच्या विधानाचा झोंक आहे. शु.यजुर्वेद्यांनी आपले ब्राह्मण्य सिद्ध करण्याकरितां कधीहि कोर्टाची पायरी चढल्याचे ऐकिवात नाहीं किया त्यांच्या इतिहासावरूनहि तसें दिसून येत नाहीं. त्यांच्या वृत्त्या हरण करण्यास सोकावलेल्या चित्पावनांनीं जेव्हां जेव्हां त्यांच्यावर हल्ले चढविले तेव्हां तेव्हां मात्र त्यांनी त्यांस कोर्टाचे पिंजरे दाखवून आपले हक्क सिद्ध करून घेतले आहेत. वास्तविक ज्या चित्पावनांनी आगाशीच्या श्रीभवानीशंकराच्या लिंगाससुद्धां प्रायश्वित देण्यास सोडलें नाहीं. ते काय या भोळ्या कायदेप्रिय `पळशाची पर्वा थोडेच करितात? बरे, पळशे नांव तरी कोणी काढले? तेंहि या अद्वितीय चित्पावन टांकसाळीतून अलीकडेच बाहेर पडलेलें आहे. अगदी प्राचीन अंधाराचा इतिहास बाद केला तरी शके १२२१ स राजा बिंबाने या गंगातीरस्थ ब्राह्मणांस कोकणप्रांती आणून स्थायिक केल्यापासून तो शके १६६८ पर्यंत यांना ‘यजुर्वेदी ब्राह्मण’ हीच संज्ञा होती. पोर्च्यूगीजांच्या राज्यांतसुद्धा त्यांना हेंच नाव होते. फार काय पण चित्पावन पेशव्यांनीसुद्धा आपल्या कागदोपत्री यांना `यजुर्वेदान्तर्गत वाजसनेय ब्राह्मण `असेंच म्हटलें आहे. अर्थात ‘पळशे’ संज्ञा यजुर्वेद्यांवर बळजबरीने लादण्याचे पुण्य कृत्य त्यांच्या अहोरात्र चुरस करणाऱ्या उपऱ्या चित्पावनांनीच संपादिलेले आहे व या पुण्याईच्या समर्थनार्थ :--
कैवर्तकस्य भिल्लस्य पिता भवति यो नरः । मातायां गोलकी नारी पालाश ज्ञातिरुच्यते ॥
असंस्कृत व अशुद्ध लोक धर्मग्रंथांतहि घुसडण्यास त्यांनी कमी केलेलें नाहीं, परंतु इतर ऐतिहासिक पुरावा जरी बाजूला ठेवला तरी श्रीमच्छंकराचार्यानी शके १७४५ (सन १८२३) सालीं दिलेल्या आज्ञापत्रांत असे स्पष्टच म्हटलें आहे की "हे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण. यांस कोकणप्रांती येऊन भूपप्रसन्नतानुग्रहें वृत्ति संपादन करून बहुत वर्षे राहिले. तदनंतर कोंकणस्थचित्पावन यांचे ज्ञातीनें तुमच्या वृत्तिहरणार्थ इतर ज्ञाती यांस अनृत द्वेष समजावून विद्वेषता वाढवून ‘पळशे ब्राह्मण’ असें सांगो लागले. परंतु तुमचे पळशे असें नांव ज्ञातीस नाहीं व शास्त्रांतही हें नांव नाहीं, द्वेषानें म्हणतात."
चित्पावनांनीं शु. यजुर्वेद्यांचा बराच छळ केला. तरी सुद्धा इंग्रजी अंमल असलेल्या मुंबई बेटातील शु.य. रहिवाश्यांवर मात्र त्यांच्या परशुरामास्त्राचा कांहींहि परिणाम झाला नाहीं. यांचे कारण वे. शामाचार्य नांवाच्या यजुर्वेदी ब्राह्मणास ता. १ ऑगष्ट १७२३ इ. रोजी इंग्रज कंपनीनें एक पेटंट उर्फ सनदपट्टा वंशवतनी करून दिला होता. त्या सनद पट्टयानें मुंबई बेटांतील हिंदुलोकांकडील धर्मसंबंधी हक्काचे स्वामित्व त्याच्या हाती असल्याने चित्पावनांसारख्या उपऱ्या ब्राह्मणांची ढवळाढवळ तेथे कांहीं चालत नसे. उलट, कोणी त्याच्या अधिकारमर्यादेंत अपराध केल्यास टाऊन हॉलच्या पटांगणांत त्याच्या हातचे बाराबारा फटके खाऊन हद्दपार व्हावें लागत असे, असें म्हणतात.
पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजांचा अंमल झाल्यावरसुद्धां चित्पावनांनीं शु. य. नां उपसर्ग देण्याचे आपलें पवित्र ब्राह्मणकर्म ठिकठिकाणी चालू ठेवलेच होते व आजदिनतागायतसुद्धां या प्राचीन परंपरेची री ओढणारे परशुरामाचे अवतार चित्पावन समाजांत मधून मधून दृष्टीस पडतच असतात.
इ.स. १८२३ साली ठाणें येथील श्रीसिद्धेश्वराच्या अर्चेबद्दल चित्पावनांनी वाद उत्पन्न केला. त्यावरून हें प्रकरण फिर्यादीपर्यंत जाऊन अखेर निवाडा शु. यजुर्वेदी यांच्याच तर्फे झाला.
इ.स. १८५९ साली वसईस असाच एक खटला निघाला. तेथील शु. यजुर्वेदी ब्राह्मण ज्योतिष व उपाध्येपणाची वृत्ती चालवीत असतां चित्पावन व कऱ्हाडे यांनी त्यांची वृत्ती बंद करण्याचा उपक्रम केला. लग्नांत वृत्तीवाले ब्राह्मणांस मुद्दाम वगळून दुसऱ्याच जोशाकडून घटिका मांडवून पत्रिकपूजन केले. त्यावरून चौकशी होऊन वृत्यंशी शु.यजुर्वेदी यांचे तर्फे निवाडा झाला.
इ.स. १८७३ साली आगाशीसही वरील प्रमाणेच प्रकार झाला. तेव्हां तें ही प्रकरण कोर्टापर्यंत जाऊन निकाल शु. यजुर्वेदी वृत्यंशी यांचे तर्फे झाला.
पेशवाईत आगाशी येथे श्रीभवानीशंकराचे देऊळ बांधले होते ते बांधिल्यापासून शु.यजुर्वेदी व चित्पावन हे देवालयांत एकत्र बसून पूजा अर्चा करीत असता इ. स. १८७२ मध्ये पर्जन्यानिमित्त संततधाराभिषेक व्हावा म्हणून उभय जातींनी विचार केला. परंतु चित्पावन आपला अभिषेक प्रथम व्हावा असे म्हणू लागले व वाजसनेयी तें कबूल करीनात । तेव्हां चित्पावनांनी देवालयास कुलूप लावून टाकलें हें प्रकरण कोर्टात जातां शु.यजुर्वेदी यांच्या तर्फे निकाल झाला. या खटल्यांत एका चित्पावनानें अशी खोटी साक्ष दिली की बर्डे या नावाच्या एका इसमास वाजसनेयाकडे जेवल्यामुळे प्रायश्चित दिलें । वास्तविक बर्डे हा कैक वर्षे वाजसनेयांकडे जेवीत होता व त्याजबरोबर ज्या त्याच्या इतर आप्तेष्टांनी व जातभाई चित्पावनांनी पंक्तिव्यवहार केला त्यांना कोणी केव्हां प्रायश्चित दिलें त्याचा कांहींच पत्ता नाहीं !
शु.य. ब्राह्मणांच्या ग्रामण्यांचा इतिहास अत्यंत विस्तृत आहे. त्याचा या थोडक्या जागेत समावेश करता येणें शक्य नाही. तथापि शितावरून भाताची परीक्षा करता येण्याजोगा मजकूर आम्ही दिला आहे. सरतेशेवटी याच ज्ञातींतील लोकप्रिय कविराज कै. मोगरे यांच्या प्रासादिक काव्यशब्दांत भरतवाक्य करून आम्ही या प्रकरणाची रजा घेतों.
आर्या
आज उद्यां वा कालें तुमचे उद्देश सिद्ध होतील ॥
माध्यंदिनचि न इतरहि युष्मच्छमलाभ विप्र घेतील ॥ २१ ॥
शमुनि कालवशें हें सर्वहि लोकापवाद वावटळ ||
जनमतवातावरणी अविचाराचा नुरेल लेश मळ ॥ २२ ॥
सदसद्विचार सूर्य प्रगटुनिया लोकमानसाकाशीं ॥
अज्ञानध्यान्ताच्या विलया नेईल सर्वथा राशी ॥ २३ ॥
अन्योन्यवैर सोडुनि भेटाया आपआपल्या भावां ॥
गौड द्राविड सारे प्रेमानें मारतील हो धांवा ॥ २४ ॥
आनन्दाश्रुजलानें अन्योन्यांच्या तनूस न्हाणून ||
म्हणतिल मुकलों मुकलों होतो निजबांधवां न जाणून ।। २५ ।।
गौडसारस्वत ब्राह्मण व पाठारे प्रभू
या ज्ञातीवरील ग्रामण्यांची हकिकत आमच्याजवळ बरीच आहे. परंतु इतर ज्ञातीप्रमाणे आपापल्या ज्ञातीच्या ग्रामण्या प्रकरणाचा इतिहास स्वतः तपासून पहाण्यास यांच्यापैकी कोणी इतिहासज्ञ वेळेवर न आल्यामुळे ती प्रकरणे तशीच ठेवावी लागली, याबद्दल फार दिलगिरी वाटते
परमेश्वराची प्रार्थना
जावो लयाला मतभेद सारा
एका वरो भारत या विचारा
महाराष्ट्र जाणो झणी ऐक्यवर्म
देवा! जनीं चेतवि राष्ट्रधर्म
****
परिशिष्ट
चित्पावनांचा इतिहास
ग्रामण्यांचा इतिहासावरून वाचकांच्या ध्यानांत आलेच असेल की त्यांतील मुख्य चळवळ चित्पावन हे होत. अमक्याला वेदोक्ताचा अधिकार आहे आणि तमक्याला नाही हा ब्राह्मण हा शूद्र : हा अनुलोम हा प्रतिलोम इत्यादि नाना प्रकारच्या सबबी काढून इतर समाजांचा ज्यांनी सत्तामदाच्या धुंदीत अनिर्वाच्य छळ केला, ते हे चित्पावन तरी कोण? यांचे अधिकार तरी कोणते? यांची उत्पत्ति काय? आणि यांना इतकें धर्मगुरूत्वाचे साम्राज्य-सिंहासन कधि व कोणी दिलें? हे किंवा असलेच प्रश्न साहजीकच उद्भवतात. या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणें किंवा त्या प्रश्रांची चर्चा करणें हे आमच्या ताकदी बाहेरचे आहे म्हणून ज्यांना हा अधिकार होता. इतिहासशास्त्री किंवा विद्वान् पंडीत म्हणून ज्यांची मान्यता आधुनिक एकाहि चित्पावनाला किंवा कोणालाहि अमान्य करता यावयाची नाही, अशाच मंडळींचे उद्गार व त्यांनी चित्पावनांच्या इतिहासाबद्दल लावलेले शोध यांचा येथें परामर्ष घेण्याचे ठरविलें आहे. खालील उताऱ्यांत नमूद होणाऱ्या मतांबद्दल आमचे स्वतःचे असे निश्चित मत काहीहि नाहीं. लोक काय बोलतात हे आम्ही नमूद करीत आहोत, तें मान्य करणें किंवा खोडून टाकणे हे इतिहाससंशोधक म्हणविणाऱ्या आधुनिक विद्वानांचे काम आहे ! तें त्यांनी खुशाल करायें, आमची काही हरकत नाही.
(१) कै. जीवनराव चिटणीस :--
(१) सह्याद्रिखंडात चित्पावनांची उत्पत्ति परशुरामाने कोळयांपासून केली अशी कथा आहे. या कथेंतील बीज अलिकडील शोधावरून जी माहिती मिळते तिला जुळतें असें आहे परंतु एकंदर कथा बनावट दिसते. परशुराम आणि चित्पावन हे समकालीन असते तर द्रविडांप्रमाणे चित्पावनांचा उल्लेख भारतात आला असता. भारतात चित्पावनांचा उल्लेख नाही. तो सह्याद्रिखंडात मात्र आहे. हा ग्रंथ स्कंदोवाच या नावाखाली लिहिला गेला आहे म्हणून तो भारतानंतरचा होय.
(२) चित्पावनांचा वर्ण, त्यांचे डोळे वगैरे यहुदी लोकांशी मिळती दिसतात. स्कंदपुराणांतील त्यांच्या उत्पत्तीचें जें बीज कीं, पश्चिम समुद्रांतून वाहून आलेल्या चौदा प्रेतांपासून चित्पावन केलें तें बीजही अलिकडील शोघांस बळकटी आणते. मलबार प्रांती परशुरामशक म्हणून चालू आहे त्याला "कोल्लम आंडु" असे म्हणतात. त्याचा अर्थ पश्चिमेकडील वर्ष असा आहे. हिंदुस्तानांतील अगदीं पश्चिमेकडील लोकांत चित्पावनांचा म्हणून जो परशुरामशक तो पश्चिमेकडील वर्ष या नावाने ज्या अर्थी चालू आहे त्या अर्थी त्यांत ध्वनित केलेला पश्चिमेकडील प्रदेश म्हणजे पश्चिम (अरबी) समुद्राच्या पलिकडचाच असला पाहिजे असे मानावें लागतें. तेव्हां यावरूनही चित्पावन हे हिंदुस्तानाबाहेरून आलेले लोक असावेत असें दिसते. शिवाय परशुरामशकाचा आरंभ व नोहाच्या जलप्रलयाचा काल हेही जुळतात, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे.
(३) चित्पावनांसंबंधानें पूर्वापार ग्रह काय आहेत यासंबंधाने पाहीले तर हे लोक मोठे हुशार, बुद्धिमान व मोठे कल्पक, त्याचप्रमाणे अधिकारी व संपत्तिवान असतो व ब्राह्मणधर्माचे नियम मोठ्या काळजीपूर्वक पाळीत असताही देशस्थ वगैरे ब्राह्मण त्यांस कमी मानीत व अजूनही थोडा बहुत प्रमाणाने मानतात. पूर्वी त्यांचा धंदाही हलक्या प्रतीचा होता. हरकारू किंवा गुप्त बातमीदार हे लोक असत. बाळाजी विश्वनाथ यास पेशवाई मिळाल्यापासून या जातीचा वास्तविक उदय व उद्धार झाला. देशस्थ ब्राह्मण यांजबरोबर अन्नव्यवहार करीत नसत. पेशव्यांनी पंत प्रतिनिधींच्या मार्फत तैलंगी ब्राह्मणांस दुप्पट दक्षिणा वगैरे देऊन अन्नव्यवहाराची सुरूवात केली. तथापि पुरंधरे यांचे एथे पेशव्यांचे पान निराळेच मांडले होते. पेशव्यांनी पुढे इतर ब्राह्मणांशी शरीरसंबंध घडवून आणण्याच्याही खटपटी केल्या. संपत्ति व अधिकार हाती असल्यामुळे त्या खटपटीत त्यांना यश आलें हे स्वाभाविकच आहे. या कृतीनें पेशव्याचा सुधारणा करण्याचा उच्च हेतु होता असें अलिकडे दर्शविण्यांत येते. परंतु आपल्यातील कमीपणा घालविण्याकरिता या खटपटी होत्या असेंच इतिहासावरून दिसते देशस्य वगैरे जुमानिनात म्हणून त्यांची वतनेंहि पेशव्यांनी काढिली. शेवटचा बाजीराव पेशवा यास नाशिक एथे गंगेवर एका विशेष घाटावरून (गणेश टेकडीवरून) गंगेचे स्नानास उतरू दिले नाही असें ग्रँटडफ म्हणतो.
(४) चित्पावनांचे पूर्वजांची माहिती व त्यांचे ठिकाण यासंबंधानें लोकांत एकदा शंका उत्पन्न झाली. तेव्हां मलबार प्रांतातील लोकांनी चित्पावनांच्या उत्पत्तीसंबंधी माहिती मिळविण्याकरिता जाहीरनामे प्रसिद्ध केले. ठिकठिकाणी जाहीरनामे लाविले असून सभेंस चित्पावन हजर होते. त्यांना आपण हिंदु आहोत हे सिद्ध करता आले नाही व त्यांच्या ब्राह्मण्यासंबंधानें कोणत्याही ब्राह्मणांनी आपली संमति दिली नाही. सभेंत हे लोक आफ्रिका खंडातून आलेले आहेत असे सिद्ध झालें. चित्पावनासंबंधानें जो जाहीरनामा लावला होता तो कानडी भाषेत आहे. त्यातील बराच महत्त्वाचा भाग `सामाजिक धर्मसुधारणा` पृ. २७५ वरून खाली देतों :--
आफ्रिका खण्डद इजिप्त देशदिन्द बन्दिरुव इजिप्तवान् जिप्तवान या चितपावन (कोंकणस्थ ) एवं जातिय निर्णयवु चितपावन जातीय विषयवागी नडदिरुव रिकार्डनु साद्यंत वागि सभेयवरु विमर्शे माडिनोडिदायितु मत्तु प्रतिबंदु विषयद मेलु विचार माडि सभेयवरु पट्टिरुव अभिप्राय सल्पददे इवुगळंनु पर्यालोचीसलु चितपावन जातियु भरतखंड इल्ल आफ्रिका खण्डदेन्दु निर्णय वागिरुते. मत्तु अवर जातियवराद शोधकरु ओप्पिरुवन्ते ये सभेय वरिगू निजवागि कण्डु बन्दद्दरिन्द भरतखण्डद ब्राह्मणरल्ल एन्दु निर्णयवागुत्तदे. ई आफ्रिका खण्ड हअर संसर्गदति भरतखण्डद दशविरुद्ध शेरदे इरुवदु सदाचारणे योग्य वाणिधे.
ई सितपावन जातीय विषय वागि इष्टु खण्डित वाद निर्णयवु ईवरिगु यारिन्दलु माडल्यट्टिर लिल. चितपावनरिन्द ईग सभेगे बन्दिरुव जबाबिनल्ली निराधारवागि बरेयल पट्टिरुत्तादे. आधारवु इल्लदे होदरे यल्ला ब्राम्हणर संमति यन्नादरू कळूविस बेकेन्दु सभेइंद केळल्ल पट्टित्तु. अदरन्ते संमति यन्नु अथवा आधारवन्नूसुद्धा कळुविस ल्लिल्ल, आद्दरिन्द सभेयवरु विचारवाडी चितपावन जातीय आफ्रिकाखण्ड मुन्ताद द्वीपान्तर दिन्द बन्दद्देन्दु निर्णइसल्ल पट्टीतू.
चितपावनरु भरतखण्ड ब्राह्मण रोळगे शेर बेक्यन्दु असत्य साधन वन्नु माडुत्तारे, आदकारण भरतखण्डद ब्राह्मणादि चातुर्वर्ण दवरु इन्या असत्यक्के अवकाश उण्टागद हागे दक्षतेइन्द सत्यसाधनवन्नु माड बेकागिरुतदे. सत्यमेव जयते नानृतम्.
भावार्थ :-- चित्पावनजातीच्या संबंधाने आलेल्या साद्यंत कागद पत्रावर व त्याचप्रमाणें आणखी ऐतिहासिक गोष्टी व अन्य विषय यावर सभेच्या लोकांनी विचार करून जे कांहीं अभिप्राय ठरविले ते चांगल्या प्रकारे अवलोकन केले असतां चित्पावन जात ही भरतखंडांतील मूळची नव्हे, तर आफ्रिका खंडातील इजिप्त देशांतील होय. हें सिद्ध होते. शिवाय त्यांच्या ज्ञातीतील शोधक लोकांनी कबूल केल्याप्रमाणें व सभेच्या सभासदांनाही खरोखर दिसून आल्यावरून हे भरत खंडांतील ब्राह्मण नव्हेत असें सिद्ध होते. आफ्रिका खंडांतील या लोकांबरोबर हिंदुस्तानांतील दशविध लोकांनीं मिसळून रहाणें हें सदाचारास योग्य नाहीं. या चित्पावन जातीच्या संबंधानें कोणताही निश्चयात्मक ठराव अजून झाला नाहीं. चित्पावन लोकांकडून या सभेस जें कांहीं लिहून आलेलें आहे त्यास काहीं आधार नाहीं. आधार जरी नाहीं तरी सर्व ब्राह्मणांची संगति निदान पाठवावी असें सभेकडून कळविलें होतें. तथापि समति किंवा आधारसुद्धां पाठविला नाहीं. याकरिता सभेनें विचार करून चित्पावन जातीचे लोक आफ्रिका खंड नामक द्वीपांतरांतून आलेले आहेत असे ठरविण्यांत आले आहे. चित्पावन लोक हे भरतखंडांतील ब्राह्मण लोकांत मिसळण्याकरितां अधर्मी व मतलबी आचार विचार लोकांच्या मनांत बिंबविण्याकरितां खोट्यानाट्या युक्तिप्रयुक्तीनें प्रयत्न चालवितात. तस्मात् भरतखंडांतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारी वर्णार्थी चित्पावनांच्या खोडसाळपणाकडे वेळेवर मोठ्या दक्षतेनें व सावधगिरीनें असावें. सत्याचा जय होईल.
(२) कै. प्रो. राजाराम रामकृष्ण भागवत :-- ( उद्गार) सन १८८७
(१) कोंकणस्थ परशुरामाबरोबर आपला संबंध लावतात. तो केवळ आपले अतिप्राचीनत्व सिद्ध व्हावें म्हणून, दुसरा अर्थ त्यांत मुळींच नाहीं. पृ. १०६. (२) कोंकणस्थ हे मूळचे प्रायः शेतकी करणारे लोक हे थोडेबहुत कुळकरणाच्या संबंधाने पसरलेले दिसतात. पण यांस बरकत आली. बाळाजी विश्वनाथास पेशवाई मिळाल्या दिवसापासून. पू. १०८ (३) पूर्वी कोंकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे यांचा संकर अष्टागर प्रांतीं बराच झालेला सुप्रसिद्ध आहे. पृ. ११०, (४) चित्पावन हे मूळचे शेणवी लोकांप्रमाणे गोकर्णाच्या जवळचे असल्यामुळे जेथे हे गेले तेथे यांनीं आपलें अतिप्राचीनत्व स्थापन करण्यासाठी म्हणून गोकर्णाजवळ विशेष माहात्म्य माजलेल्या परशुरामाचा आपणाबरोबर संबंध जाहीर केला. पण खरोखरी पहातां हे मूळचे पूर्वी लिहिल्याप्रमाणे प्रायः शेतकी करणारे लोक असून, शंकेश्वरच्या शंकराचार्याच्या वेळी यांस ब्राह्मणपणाचा लाभ झाला. पृ. ११०.
(३) के. रा. रा. रामचंद्र भिकाजी गुंजीकर, " सरस्वति मंडळ " सन १८८४.
(१) पूर्वी घाटावरील देशस्थ ब्राह्मण चित्पावन ब्राह्मणांचे पंक्तीस जेवावयास बसत नसत. परंतु त्यांनी खटपट करून एक पंगत करविली. तथापि विद्देमध्ये हे मूढ असल्यामुळे देशस्थ त्यांचा तिरस्कार करीत म्हणून त्यांनी नाशीक, काशी इत्यादि स्थळी आपले लोक पाठवून त्यांजकडून विद्या करविली. वाई, त्र्यंबकेश्वर इत्यादि स्थळी स्वजातीयांची क्षेत्रे केली. तैलंगणांतून तैलंग ब्रह्मण आणवून, त्यांना इतरांपेक्षा दुप्पट दक्षिणा देण्याचा कायदा करून, त्यांजकडून स्वजातीय मुलांना वेदाध्ययन करविले. (२) हे लोक मनाचे सरळ नसतात आणि अल्पस्वल्प स्वार्थासाठी राज्याची राज्ये धुळीस मिळविण्याला मागेपुढें न पहाणारे लोक या जातीमध्ये आजपर्यंत पुष्कळ उत्पन्न झाले. आणि त्यांनी आपले पराक्रम त्या रीतीनें दाखविले. (३) स्वजातीच्या हितासाठी अन्यजातींशी द्वेष करून त्यांचे जे वास्तविक हक्क किंवा अधिकार त्यांकडे दुर्लक्ष करणें, किंवा ते दाबून टाकणें हें मात्र वाईट, यद्यपि चित्पावन ब्राह्मणांमध्ये अशा प्रकारचे कित्येक लोक झाले खरे, आणि अजूनहि असल्या कोत्या मनाचे कित्येक त्यांच्यामध्ये आहेत, हेंहि खरें. (४) यांच्या आंगी आर्जवशक्ति हें मोठे कसब आहे आणि तेणेकरून ते कसलेही मोठे काम सहज तडीस नेतात(५) या चित्पावन ब्राह्मणजातीमध्ये मुली विकून पैसे घेण्याचा धंदा फार चालतो आणि कोकणामध्ये तर तो फारच आहे. (६) या लोकांनी `चित्पावन` हा शब्द भाषेतून मुळींच गाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जर त्या शब्दामध्ये कांहीं वाईट नाहीं, तर तो शब्द गाळून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न का बरे करावा? आणि ही गोष्ट खरी आहे की, पुण्यामध्ये चित्पावन ब्राह्मण म्हणजे कोण हे बहुशः अलीकडील मुलांना माहीतही नाही. अलीकडील चित्पावन सर्व आपणास कोकणस्थ ब्राह्मणच म्हणवितात. वास्तविकपणे पाहतां कोकणातील चित्पावन, देवरुखे, किरवंत, कऱ्हाडे, वगैरे सर्वांस `कोकणस्थ` हा शब्द लावावा. पण तसे न करता चित्पावनांनी आपणापुरताच हा शब्द पक्का करून घेतला. यावरून चित्पावन या शब्दापासून त्यांच्या मनामध्ये कांहीं तरी वाईट अर्थ येत होता असें दिसतें. परंतु कित्येकांनी ज्यांचे चत्त पवित्र ते ‘चित्तपावन’ असा अर्थ बसविला आहे. परंतु असा विलक्षण शब्द उत्पन्न होण्याला प्रसंग काय झाला, हे कोठेही प्रसिद्ध नाहीं. आणि तसें त्यांचे पवित्र चित्त असल्याचें प्रमाणही दिसत नाही. ‘पावन’ म्हणजे पवित्र हाही अर्थ पुनः ओढाताणीचाच आहे. (७) [ अ ] चित्पावन ब्राह्मण हिंदुस्थानांतील इतर ब्राह्मण लोकांपेक्षा फार गोरे असतात; त्यांचे डोळे घारे, बांधा प्रायः उंच आणि नाक सरळ असतें [ व. ] चित्पावन ब्राह्मण ज्या प्रदेशामध्ये पूर्वीपासून राहत आले आहेत, त्या प्रदेशाला ‘वर्वर’ कोंकण हे नाव आहे. [ क. ] वर्वर कोकणाच्या थेट पश्चिमेस समुद्राच्या पलिकडे समोर आफ्रिका खंडांतला इजिप्त म्हणून देश आहे, तेथें समुद्र किनाऱ्यापासून पश्चिमेस पन्नास कोसांवर ‘बर्बर’ या नावाचें प्राचीन नगर आहे आणि त्या सर्व प्रदेशालाही ‘बर्बरीदेश’ अशी सामान्य संज्ञा आहे. [ड.] बर्बरी देशांतील लोक हिंदुस्थानांतील लोकांपेक्षा फार गोरे, त्यांचे डोळे घारे, बांधा उंच आणि नाक सरळ असतें. (८) ‘चित्पावन’ हा शब्द जिप्तवान म्हणजे ईजिप्तवाला याचा अपभ्रंश ;आणि बर्बर कोंकण म्हणजे कोकणाच्या ज्या प्रदेशांत बर्बर देशचे हे लोक येऊन राहिले तो प्रदेश.
(९) या प्रदेशांतील चित्पावन ब्राह्मण आपणांस कोंकणस्थ ब्राह्मण म्हणवितात, परंतु दक्षिणेत कानडा आणि मलबार या प्रदेश कोंकणस्थ ब्राह्मण हे नांव वैष्णव सारस्वतांतच आहे, चित्पावनांसनाही. तेथे चित्पावनांस चित्पावन हेंच नांव आहे, दुसरें नाहीं. (१०) गोमांतक मलबार इत्यादि स्थळी पाहतां चित्पावनादिकांना ब्राह्मण हा शब्द कोणी लावीत नाहीत. "ब्राह्मण आणि कुळंबी लोकांच्या भाषणांतील `बामण` हे दोन्ही शब्द तेथे केवळ सारस्वत ब्राह्मनांच लावतात, आणि चित्पावनादिकांना केवळ गुरवाप्रमाणे मानतात. मलबार प्रांती कोची, गंजेश्वर इत्यादि सारस्वतांच्या देवळांमध्ये चित्पावनादिकांना मुळींच येऊ देत नाहीत. तेथे कित्येक स्थळी तर सारस्वत ब्राह्मण चित्पावनांना विहिरीसही शिवू देत नाहींत.
(4) The Peshwas, who attained sovereign anthority in the Mratha Nation, were of this class (Chitpawan, Cocanist) from this circumstance, and the power which it naturally threw into their hands, pretend to some superiority in castes; but these pretentions are not well founded. They are termed Chitpawan which, amongst other significations, means `a dead body raised. Their origin, according to what is mentioned in a Sanskrit work entitled. The Syhadree Kind was 14 dead bodies of defferent castes that had been Drowned in the sea, whence they were transported by Vishnu in his outar of Pureshram, after he had forced the sea to give up the Concan, or Pureshram Ksheter and re-animated to people his new country. From these 14 families sprang the Concani Brahmins, who are now distinguished by 60 surnames. The Deshist Brahmins, although they have surnames, prefer the distinction of their father`s name, or the place of their residence, to their surname, which they will seldom mention.
The Concanists Brahmins, before the elevation of Balaji Vishwanath, commonly called the first, though in fact the fifth Peshwa, were not employed as clerks and men of business, but as "HARKAROOS" and spies. They carefully suppress or destroy all copies of the Syhadri Kind, where their origin is mentioned and a respectable Brahmin of Waee was, a few years ago, disgraced by Baji Rao for having a copy of it.
Grant Duff`s" HISTORY OF THE MAHARATTAS."
Cambray Edition, Page 9, Footnote.
(5) Mr. JAMES BURGES says as follows: Trichur is the capital of Cochin, southward Cranganore, where
Jews and Syrian Christians have been established since the third or fourth Century A. D. It is the principle residence of the Black and the White Jews. BENNI ISRAILS say that their ancestors came to India about 16 or 18 hundred years ago, from a country northward (See Lands of the BIBLE-Volume 2nd, page 667) or from the northern Province to avoid persecution that followed in the train of its constant invasions by a host of conquerers. They were in number seven men and seven women who were saved from a waterygrave, on the occasion of ship-wreck, which took place near Chewl (चेऊल) about thirty miles to the south-east of Bombay. The place where they found the refuge is named Naugon (नागांव). They and their descendents met with considerable favour from the Native Princes, though they conceived themselves to be sometimes forced to conceal their principles.
As they increased they spread themselves among the villages of the Konkan, particularly those near the cost lying between the Bankot river, and the road which traversers the Country between Panwel and Bhor ghaut. In their locality and also in Bombay in which they began to settle after it came into the possession of the English: their descendents are still to be found. (Vide page 667 Lands of BIBLE-Vol. II. by Jhon Wilson, D. D. F. R. S.). Thus their motive in coming to India was the safety of their lives and property, but although they went to a new place or to a new country they brought with them their misfortunes, and consequently the ship in which they came to their Indian refuge was wrecked near Hennery and Kennery Islands in the Indian ocean. These islands are about fifteen miles distant from Chewl which was a great emporium of trade with the Red Sea about 2,000 year ago. Of the ship-wrecked only seven women and seven men were saved and took refuge on the shores of Nagaon a village on the coast about six miles from Hennery and Kennery islands. Many of the drowned were washed away to the shores of the very village where the seven pairs took refuge, while others were carried to other shores, of which nothing was known until recent times.
Recent researches have discovered that the ancesters of the Konkanastha or Chitpawun Brahmins were probably some ship wrecked foreigners who were cast ashore at the foot of the Sahyadri Hills. The 14 corpses of these foreigners were according to a Hindu Legend animated with life on a pyre or Chita by Parashuram as mentioned in the Hindu Puranas. The colony of these Chitpawuns was established at Chiplon. It seems that the ancestors of the Chitpawuns did not enter Konkan by land but came in from far beyond the sea. Their fair complexion, their light and grey eyes, and the legend of their ship-wreck corroborate the statement. Some say that the ancestors of this tribe have probably come by ships either from Egypt or through Egypt, while others maintain that they are the descendents of Jews from Barbary a province in Africa and that they came through Egypt.
(6) Such was their exalted position that the Peshwa at the head of the Maratha Confideracy, who held the most commanding station of any Indian sovereign, was long excluded from eating at table with any Brahmins of high cast.
Ward`s India and the Hindoos.
pp. 199-200.
(7) Under the rise of Balaji Wishwanath Peshwa, who belonged to their (Chitpawan) class, the Chitpawans held a low position, and were known chiefly as spies or harkaroos. Even after several generations of power and wealth with strike attention to Brahmin rules, the purer classes of Brahmins refuse to eat with them, and it is said that when Bajirao the last Peshwa (1796-1818) was at Nashik, he was not allowed to go down to the water by the same flight of steps as the priests.
Bomay Gazetteer, (Poona) p. 101.
(8) The late Peshwa Bajiraw is the son of the famous Ragoba. Although his family is Brahminical, yet not being of the highest order, the purer, clases of Brahmins refuse to eat with them; and at Nassick, a place of Pilgrimage near the source of Godavery, he was not allowed to descend by the same a flight of steps used by the holy priests. The Poona Brahmins affect an extreme purity, and abstain from animal food, and some of them object to eating carrots; but notwithstanding their sanctified abstinence, they are held in extreme contempt by their carnivorous brethern of Bengal and upper Hindoostan.
Description of Hindustan, By
Mr. Hamilton. Vol. II, p. 197.
(9) At length when sitting on the mountains of Concan (i. e. the Sayhadree range or Western Ghauts) he (Purushuram) espied on the shore below, the putrefied corpses of fourteen Mlenchhas (any people not Hindoos), which had floated there, borne by tides from distant lands to the Westward. Rama restored them to life, taught them religious knowledge and after converting them into Brahmins, performed his sacrifice. He, afterwads, by means of his fiery darts compelled Samudra, the Indian Neptune, to retire several miles from the foot of the Ghauts and allotted to his protegees the strip of land thus recovered from the sea. From these fourteen men sprang the Kukanastas or Concanes tribe of Maratha, and the pious Hindoo still discovers in their leneaments trace of a corpse-like expression of countenance inherited from their forefthers.
Goa and The Blue Mountains, By Richard
F. Burtoo. pp.14-15.
(10) This word is revillingly or jocosely derived from chita (चिता) the pyre, and Pavan (पावन) or pure. The two together signifying pure from the pyre. This rendering is based on Puranic legend which relates that Parashuram, the sixth incarnation of Vishnu, recovered miraculously from the sea the strip of land now forming the Konkan, the Sawantwadi Territory, Goa, Kanara and Malabar and made it over to Brahmans converted into that state from corpses placed on the pyre. Other would resolve the word into Chitta (चित्ता) and Pavan (पावन) the pure of heart. Both of these may be true, but the first has a historical value, as it seems to me and indicate that the first ancestors of this tribe have probably come by ships either from some other part in India or from the opposite coast of Africa. This is a section of the Kaunkana sub-division of the Dravidic class.
Late Rao Saheb Vishwanath Narayan Mandlik, Journal of the Bombay Branch of the Royal
Asiatic Society January 1865.
(11) His new dominions being provided with no separate order of priesthood, Parshuram founded the caste of the Concan Brahmins, who are to this day disclaimed as such by those of the rest of India. They compose a large portion of the ruling characters in the Maratha State and in their various predatory incursions into other countries started to seek with avidity for the copies of a work containing the history of their origin,for the purpose of destroying it and the Eastern Brahmans affirm that the orders for this purpose given to their illiterate troops have produced a large and indiscriminate destruction of manuscript.
According to the fable, he created them by restoring to life the putrid bodies of some men drowned in a river or according to more general tradition of ship-wreck mariners; indicating apparently the act of foreign origin, which appearance at this day does not much discredit.
Historical Sketch of India, By Lt. Col. Mark Wilks
Vol. I. pp. 157-58.
(12) According to the Puranics, Pursuram, having extirpated the Cshettris and filled the earth with blood, wanted to perform a sacrifice, but could find no Brahman to assist, on account of his being defiled with the effusion of so much human blood. As he was standing on the summit of the mountains of Kuncan, he spied fourteen Dead Bodies stranded on the adjacent shores below; these were the corpses of so many Menchhas, who had been flung into the sea by their enemies in distant countries in the west. They had been wafted by the winds and were then in a high state of putrefaction. Rama recalled them to life, imparted knowledge to them, and conferred on them the Brahminical ordination; and bid perform the sacrifice. From these fourteen dead men is descended the Kucanastha tribe of Marathas: thus called, because, since that time, they have always stayed and remained in the Kucan.
The Hindu Pantheon, By Edward Moor, F. R. S. p. 351.
(13) The destruction of the Kshetriyas by Parasurama; his disgust with the Brahmins, and retiring to a hermitage; several Rishes followed; and looking on the Western sea, advised him to reclaim land from it. The sea-king promised to render to him land, as far as he could cast an arrow. He thus reclaimed a tract of land of three yojanas (30 miles) in breadth westward; and in length from Nisica to Canyacumari 300 yojanas southward, or more than 3,000 miles. He located Brahmans therein, turning the Boyijati (भोई जाति) into Brahmans; settling one; thousand of them there; and appoint ing to them lands for their support. He told them that if they had any cause of sorrow, or regret, they might think on him, and he would appear.He then retired to the fane at Gokernam. The said Brahmins, to test his veracity, recalled him, without causes; whereupon being angry he condemned them to lose the power of assembling together in council; and to become servile. They accordingly mingled with Sudra females; and became a degraded race. Connections with Sudra women have produced the meanest case Chitpawuns.
Taylor`s Oriental Mss. Vol. III.
P.705.
अलेक्झांड्रीयांतून मुसलमानांच्या छळामुळे देशत्याग करून निघालेल्या प्राचीन ज्यू (यहुदी) लोकांबद्दलचा खालील उतारा चित्पावन नोकरशाहीच्या भवतांच्या धांगडधिंग्याशी किती जुळता येतो ते पाहण्यासारखे आहे.
(14) They first piqued themselves upon an exact observance of law; to which they added a great number of traditions that they pretended to have received from their ancestors, and to which they much more strictly adhered than to the Law itself though contrary to each other. They acknowledged the immortality of the Soul and in consequence another life after this. The affected an outside virtue, regularity and austerity, which acquired them them great consideration with the people, but under that impositions appearance they concealed the greatest vices, sordid avarice, insupportable pride, an insatiable thirst of honours and distinctions, a violent desire for ruling above and envy that rose almost to fury against all merit but their own; an irreconciliable hatred for all who presumed to contradict them; a spirit of revenge capable of the most horrid excesses and what was still there a more distinguished characteristic and outdid all the rest, a black hypocracy which always wore the mark of religion.
Ancient History, By C. Rolin. pp. 299.
खालील मजकूर एका एथ्नॅाग्राफीप्रवीण इतिहासज्ञाकडून आलेला आहे. यांतील मुद्दे चूक आहेत की बरोबर आहेत, हे इतिहासप्रविणांचे पहाण्याचे काम आहे.
THE IMMIGRATIONS OF THE CHITAWUNS,
The are many proofs and corroborative facts to show that the Chitpawuns have come to India from Egypt through Persia, Baluchistan and the Makran coast.
(1) Sanskrit Texts.
(a) See Sahyadri Khund, Chapter 81, where they say that they are Kaivartas from the banks of the Indus, experts in Vyadha Karma (fishery).
(b) Late Vishnu Shastree Pandit, Editor of Indu Prakash (16th June 1873) exposed the mischief of fraudulent interpolation of 3 Shlokas composed by Messrs. Sathe and Ghate (Chitpawuns).
(c) The Hon. Rao Saheb (late) Vishwanath Narayan Mandlik published an essay in R. A. S. Journal Bombay Vol. VIII page 3, in which he maintains that the ancestors of Chitpawuns have probably come from opposit coast of Africa.
(d) That they (Chitpawuns) are Berbers, p. 67 ibid.
(2) Berbers.
(a) See Ratzel`s History of Mankind, p. 12.
(b) J. H. Leewe`s Ethnography, pp. 156-160.
(e) S. Laing`s Origin of Man, p. 399.
(d) That Berbicon or Berberic was a tract in Sindh at the mouth of the Indus.
(3) Possible stages of immigration:- are visible in family names which Mr. Bal Gangadhar Tilak says in his " Arctic Home "page 292,are usually place names.
(a) Bam (बाम) a river and ancient town in Persia.
(b) Gokhale - Gokhalan is the name of a tribe in Persia. (Vide Lord Curzon`s " Persia " Vol. I, page 270.)
(e) Lele--Lale is a place in Baluchistan,
(d) Gadre Gadrocia was a province in Baluchistan, like Kirman, (Ibid, Vol. I. 228.) The Gadras of Baluchistan represent a mixed race born of the Baluchis from Egyptian women seized and sold as slaves.
(e) About female slaves imported to India, Mr. Edwardes says in his Census Report 1901, that "Hand-some young women of Hellas (the Mediterranean Coast) destined to attend upon the King of the Country and ery "charoh" in his court. It is presumed that they were imported by these Kaivartas, who are or were themselves fair,"
(f) Slaves were treated like poor relations. (Ratzel, Vol. I, p. 446).
(g) Slaves not inferior to poor relations, (Ibid p. 477).
(h) Supply of slaves from Persia, (Lord Curzon`s Persia page 520).
(4) Traces of Egyptian Origin.
(a) Compare the Egyptian features of the figures in the Elephanta caves near Sopura or Bombay, where they possibly worked.
(b) Worship, Bull (and the Gemini), The bull has been held to be the most sacred animal in Egypt, because between 2426 B. C. and 266 B. C. the equinox was retrograding through the constellation Taurus the bull. (Brennand`s Hindu Astronomy, page 12).
(5) Anthropometry.
They are broad-headed, grey-eyed and often blond like the Egyptains.
(6) NOTE:- There is no mention of the Chitpawuns in the Vedas or in the earliest Sanskrit texts for the simple reason that they represent a later immigration. They themselves say that went to the Konkan coast from Sind, and Sind records show that the worship of Gemini (as Shiva and Parvati) and the bull (as Nundi) was imported from Egypt in the first Century B. C. The fact that there are no grey-eyed, blond, curly-haired and broad-headed Brahmans in the interior of the Great Indian Peninsula implies the immigration of these people by sea. There is the additional corroboration of the family place-names from Lower Persia and Lower Baluchistan, added to the surname Tivarekar which clearly shows connection with the sea-weed known as Tivare (Ougeinia Dalbergioides).
HISTORICUS
****