ग्रामण्यांचा इतिहास : Page 32 of 132

आलों. पुढेही होईल. तुम्हीच एक ब्राम्हणांत अध्वर्यु आणि तुमचेच हुकुमांत सारे ब्राह्मण आहेत असे नाहीं. बहुत थोर ब्राह्मण पुष्कळ आहेत. शास्त्रग्रंथ लटके होतील असे घडणार नाहीं. लटिका कलह वाढवूं नये. परंतु या उत्तराने पेशवा व त्याचे पक्षपाती यांचा दुराग्रह सुटला नाहीं. बाळाजीनें मुंजी थांबविल्या नाहींत, तेव्हां ब्राह्मणांनी हातघाईवर येऊन दंगा करण्यास सुरुवात केली. रघुनाथपंत अमात्याने घटिका विछिन्न करून घंगाश उडवून टाकलें. मोरोपुंत पेशवे व बाळंभट चितळे यांस बाळाजींने सांगितलें कीं, ''तुम्ही महाराजांच्या पट्टाभिषेकाचा विषय चित्तांत धरून निक्षेप करीत आहांत त्याअर्थी मी अशी प्रतिज्ञा करितों कीं, प्रथमत: महाराजास राज्याभिषेक करवून नंतर माझ्या मुलांच्या मुंजी करीन. मत्सरानें फुरफुरलेल्या या दांभिक धर्मभिमानी ब्राह्मणांची समजूत घालण्याचा अटोकाट यत्न करण्यात आला. परंतु मत्सर दुराग्रह न सुटे तेव्हां त्या सालीं मुंजी तहकूब करून नंतर हे सर्व वृत्त महाराजांस श्रुत केलें. व परस्परें ऐकण्यांतही सकरारांत आले. तदनंतर एक-दोन रोजी महाराजांनी चिटणीस यांस एकांती बोलावून आणून या गोष्टीची चर्चा भवति न भवति फार जाहली ..... क्षत्रिय आहोत किंवा नाहींत हें दाखवावयाचें परंतु यास अनुकूल ब्राह्मण मंडळी होणार नाहीं याकरितां तुम्हांसही अडवून बोलतात. वरकड त्यांचें काहीं चालतच नाहीं. परंतु तुम्हीं आपले प्रकरण क्षेत्रांस पाढवून संमतें आणवावीं आणि कार्यसिध्दी करावी. याप्रमाणें मुंजी तहकुब करून घडलेलें वर्तमान बाळाजीनें महाराजांस कळविलें. बाळाजीची प्रतिज्ञा ऐकून महाराजांस मोठा संतोष वाटला. त्यांनी लागेल ती मदत देण्याचें बाळाजीला आश्वासन दिलें. त्यानंतर महाराजांबरोबर गुप्त मसलत करून बाळाजीनें काशीहून गागाभट्ट नामें महापंडित आणून त्याच्या हस्तें राज्याभिषेक करवावा असें ठरविलें. तेव्हां महाराजांच्या अनुमतीनें गागभट्टास आणण्याकरिंता त्यानें केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित व सोमनाथभट्ट कात्रे या त्रिवर्गास गागा भट्टजीस आणण्यास काशीस रवाना केलें. या त्रिवर्ग भट्टजींनी काशईस जाऊन महाराजांच्या पैशाचा मात्र फन्ना उडवला व गेले तसे हात हालवीत परत आले. येतांना 'शिवाजी महाराजांस छत्र सिंहासनाचा अधिकार नाही ' अशा अर्थाचे गागाभट्टाचें पत्र मात्र घेऊन आले. त्यावरून महाराजांसहि वाईट वाटलें आपला सर्व व्यूह ढांसळून तडतों कीं काय असे त्यांना वाटलें. तेव्हा बाळाजीनें महाराजांस समजाविलें की, या पंडित व सर्वज्ञ ह्मणविणाऱ्या ब्राह्मणांस आपल्या पूर्वजांविषयीं असावी तितकी माहिती नसल्यामुळें त्यांना आपलें प्रकरण गागाभट्टास नीट समजावितां आले नाहीं. तेव्हां पुन्हां दुसरा कोणी जाणता माणूस पाठविला पाहिजे. आपल्या पदरच्या ब्राह्मणमंडळींनें जाणूनबुजून हा खोडसाळ प्रकार केला असला पाहिजें हें महाराजास न समजण्याइतके ते दुधखुळे खास नव्हते म्हणून त्यांनी निळो येसाजी प्रभू पारसनीस यांस पाठविण्याविषयीं सांगितलें. त्यावरून निळो येसाजी काशीस गेले, त्यांनी गागाभट्टजींस सर्व मजकूर यथातथ्य समजावून सांगितला व शिवाजी राजे शुध्द क्षत्रिय आहेत अशी त्यांची खात्री करून दिली. शिवाजी महाराजांची वंशावळ उदेपुराहून आणून, तेथील राजघराण्यांतीलच हे एक राजपुरुष आहेत असा पुरावा बाळाजींने आधींच आणून निळो येसाजीजवळ दिला होता. त्यावरून खात्री होऊन गागाभट्टजी रायगडास आले. रायगडास आल्यावर गागाभट्टांनी आपल्या पूर्ण खात्रीकरिंता पुन्हां चौकशी करून अनेक ग्रंथ पाहून असा शेवट असा निर्णय केला कीं, 'शिवाजी महाराज हे शूद्र; त्यांना राजसिंहासनाचा अधिकार नाहीं,' येथेहीं गागाभट्टाच्या कानाचा चावा घेण्यास मत्सरी चिलटांनी संधी साधली नसेल असे म्हणवत नाहीं. आमच्याजवळ असलेल्या एका अप्रकाशित बखरींत म्हटलें आहे : श्रीमन्नदनवन गौरी त्रिकंटक वाराणसी क्षेत्रस्थ गागाभट्ट दिक्षित वंशान्वय संजात श्रीमन्ना सिंहासनाधीश्वर महाराजाधिरात श्रीमछीवाजी महाराज यांस पट्टाभिषेक करण्याकरिंता श्री महाक्षेत्राहून आणिल. तें समयीं चांद्रसेनीय प्रभु कायस्थ यांचा सिंहासनाधिकार हे क्षत्रिय आसा निर्णय करून शूद्रास अधिकार नाहीं असें स्पष्ट नूतन गागाभट्टी म्हणोन ग्रंथ संपूर्ण शास्त्र पौराणांतर इतिहास वाक्यें आनकूल घेऊन केला. ते समयीं मोरोपंत पेशवे व निलो सोनदेव -जमदार याणीं गागभट्टास येकांती आपलें घरीं नेऊन नानाप्रकारें समजाविलें कीं तुम्हीं प्रभूंचा